गम्मत म्हणजे इथे येताना आमच्यापैकी प्रत्येकाला विमानाचा काही वेगळाच अनुभव आला होता. मी आलो त्या विमानाने एकदा 'रन्वे मिस' केला आणि साधारण दहा फुटाच्या अंतरावर असताना पायलटची ट्युब पेटली आणि त्याने उतरता उतरता पुन्हा 'टेकऑफ' घेतला. माझ्या अजून एका सहकार्‍याचं विमान धावपट्टीच्या आधीच चार सहा फुट उतरलं आणि मग कसंतरी धडपडत धावपट्टीवर पोहोचलं. अजून एका विमानाचं पुढचं चाक उतरताना उघडलचं नाही आणि हे वेळीच लक्षात आल्यावर परत 'टेकऑफ लंडिंग'चे सोपस्कार करावे लागले. तोपर्यंत आत बसलेल्या पासिंजरांचे जीव टांगणीला लागलेले असतात हे ओघानेच आलं. तेव्हा इथे तळावर उतरताना 'अल्लावर' सहज विश्वास बसावा अशी आपोआपच व्यवस्था केली जाते असं म्हणायला हरकत नाही ('अल्ला' भक्तानी आपल्या अस्तित्वाची जाणीव देण्यासाठी दिवसातून पाच वेळा 'बांगेची' सोय केली आहे). हल्ली कुणीही नवीन आलं की 'आज तू कशातून वाचलास?' हा प्रश्न सगळे विचारतात. एकामेकांची चौकशी करायची सवय लागते ती अशी. परवा मी याच विषयावर बोलत असताना एका मित्राने 'अरे टर्बो-प्रॉप हवेत बंद पडलं तरी जास्त वेळ तरंगत राहतं' अशी माहिती पुरवूऩ 'जीव टांगणीला लावण्याची सोय त्यात असते' अशी पुस्ती जोडली. एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई. आपल्या जवळ निजायला घेई. तिच्या जवळ कितीतरी खेळ किती बाहुल्या किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी. छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते. सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे "बाबा मला भरवा. मी मोठी झाले, म्हणून काय झाले ?" मग प्रेमाने बाप तिला घास देई. सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला "हे बघ मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको मारू नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर." सावत्र आई म्हणाली "हे मला सांगायला हवे ? तुम्ही काळजी नका करू. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुटया भात जेवायला वाढीन कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन वणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरूप परत या." सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे. एक दिवशी तर तिच्या कोवळया हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईनं डाळिंबाचे झाड लावले.काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळयांत पाणी आणून म्हणाली "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा तेथे कोणाचे काय चालणार ?" बाप दु:खी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना झोपताना डाळयांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे. त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले ! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी. शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळिंब. कलिंगडाएवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणार तोच आतून गोडसा आवाज आला "हळूच चिरा मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले. बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा बाबा पुन्हा मला साडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीकत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही असत्य छपत नाही मला कळले. मी नीट वागेन." पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीनं वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची. कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही. सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे <बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते .असा तो डुबा. परंतु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला. सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना; कृष्ण दिसेना; गाई-गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्रापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. देवा तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवल नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे;लोभी आहे देवा. कृष्णा ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.' इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे का तारे ? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार;तिच्या मानेचा घोट घेणार;तोच बहुला करुणवाणीने त्याला म्हणाली;वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही;कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते, परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असले. त्याला शेवटचा पान्हा पाजून; त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन.वाघ म्हणाला; 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मुर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल; मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहात असेल.' बहुला म्हणाली; 'वाघोबा तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलांची तुला दया येऊ दे. मी खरंच परत येईन; मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल; सागर कोरडे होतील अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा दाखव; जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येंते.' व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला;'बरं आज परीक्षाच घेतो. जा लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बासून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे;तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.' बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही; कोणास ठाऊक ! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दुधाने थरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला; वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभीषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या; काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्ह्ते. घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही; ह्याचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुव्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना.डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला; आई का ग रडतेस ? तुला काय झालं ? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय ? त्यानं तुला मारलं होय ? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं ?' बहुला म्हणाली; बाळ मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.' डुबा : मग तू का रडतेस ? कृष्णदेव तुझ्यावर रागावला ? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही ? त्यानं तुला हाकलून दिलं होय ? तुला यायला इतका उशीर का झाला ? बहुला : कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये. डुबा : तू का निघून गेलीस ? तू माझ्यावर रागावलीस वाटतं ? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो; म्हणून रागावलीस ? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस ? आई मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही. आई माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे ? बहुला गहिवरून म्हणाली; ' बाळ; तुला कोण वाईट म्हणेल ? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन ? अरे; पिताना मला ढुश्या देतोस; त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.' डुबा : मग तू का रडतेस ? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस ? मी का फक्त तुझं दूधच पिऊ ? तुझं दु:ख नको ऐकू ? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू ? बहुला : बाळ; सारं सांगत्ये; ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये; तो जवळ ना यमुना; ना गाई; ना गोपाळ; ना कृष्ण; सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार; तोच मी त्याला म्हटलं; ' वाघोबा; माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते; मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या ! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्वापासून च्युत कशी होऊ ? तू एकटा जगात राहाणार; अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ; आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जात नकोस; चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो.' असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला; 'आई; मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन'.बहुला सदगदित होऊन बोलली; 'बाळ; तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील ? तू मोठा हो. एक दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.' डुबा म्हणाला; 'आई; तुझं दुसरं सारं ऐकेन; परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन; 'मला खा.' तू सांग; 'मला खा.' बाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.' बहुला व डुबा रानात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते . हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते; त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सांपाकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरुवेलीवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता ! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती. बहुला व डूबा कोणी बोलत नव्हते; बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने; भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली; 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला; 'मी भ्यायलो नाही काही; हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला. डुबा : तू का रे तो वाघोबा ? माझ्या आईला खाणारा तूच ना ? वाघोबा; माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक.बहुला : नको रे वाघोबा. त्याचं काय ऐकतोस ? तू आपला मला खा हो. वाघ : बहुले; इतका उशीर का झाला ? मी म्हटलं; तू येतेस की नाही ? न येण्याचं ठरवीत होतीस ना ? बहुला : नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुद्धा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे; 'मलाच जाउ दे. त्याची समजूत घालण्यात वेळ गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस काही. फसवण्याचं स्वप्नातसुद्धा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण; तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.' डुबा : वाघोबा; नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे माझं अंग तुला आवडेल; तुझ्या पिलांना आवडेल. बहुला : त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार ? वाघोबा; तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे; तुम्हा सर्वांचं पोट भरेल. वाघ : मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता; आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस - कोवळं कोवळं - माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला; तयार व्हा. आता उशीर नको. बहुला; डुबा; माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा. मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला; 'वाघोबा; खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.' द्यघ : गप्प बस. बालणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे. डुबा : मला मरणाची भीती थोडीच आहे. बहुला : बाळ; आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको.मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात; त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात; ह्याची वाट पाहू लागली; परंतु छे:; ह्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा ह्यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याएवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली; तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली; तो त्यांना समोर कोण दिसले ? पालनवाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | मोरमुकुट तो माथ्यावरती मंजुळ मुरली धरली ओठी गळयात डोले सु-वैजयंती प्रभुवर आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | रक्षण भक्तांचे करणारा भक्षण असुरांचे करणारा श्यामसावळा गिरी धरणारा धावत आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | उभा राहिला देव येउनी हृदयी गेला उचंबळोनी बहुलेच्या सत्वास पाहुनी अतिशय धाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने दुब्याला थोपटले. देव म्हणाला; 'बहुले; बाई कष्टी होउ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढे चालवशील. बहुले तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली; देवा; हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळुन दूर जाण्याचा मोह मला कधीही न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू ?' एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगीतला. "आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर !" ती रडत म्हणाली. "तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला. राणी काय करणार काय बोलणार ? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये !" "तुमची आज्ञा प्रमाण " असे म्हणून पित्याच्या पाय पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले. "हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू. " ती म्हणाली. आईचां आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली. "कोण तुम्ही कुठल्या ? या रानावनातून एकटया कुठे जाता ? " "मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली. "ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला. दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडुक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची ? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उडया मारीत गेला. सापाची भूक शमली ; बेडकाचेही प्राण वाचले.भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरूण येत होता. "कोण रे तू ? कुठला ? रानावनात एकटा का ?" राजपुत्राने विचारले. "मला तुमचा भाऊ होऊ दे. " तो म्हणाला. "ठीक हरकत नाही. " राजपुत्र म्हणाला. तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला. "मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका. " तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू; त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने ? जवळच एक शहर दिसत होते. प्रसादांचे; मंदिराचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला "त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती; घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाचे मिरवत नेण्यासाठी या !" दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला; नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते; ठायी ठायी आसने; फुलांचे गुच्छ होते; पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह; त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले. आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोडयांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाडयात उतरला. तेथील जीवन सुरू झाले. "तू रे कोण ?" राजपुत्राने विचारले. राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्कर्‍या होता. राजाने त्याला विचारले. "कोण आला आहे राजपुत्र ?" "मी बातमी काढून आणतो." तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजपुत्राकडे गेला. पहारेकर्‍यांनी त्याला हटकले. तो म्हणाला; "मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे." नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले. "पाठवा त्याला." राजपुत्र म्हणाला. खुशमस्कर्‍या आला. राजपुत्राची तो करमणुक करू लागला. तो तेथील हास्यविनोद एकून त्याची बहीणही आली. थोडया वेळाने खुशमस्कर्‍या जायला निघाला. "येत जा !" राजपुत्र म्हणाला. "राजाने येऊ दिले तर !" तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजाकडे गेला व म्हणाला; "राजा; राजा; त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा !" "ठीक आहे." राजा म्हणाला. दुसर्‍या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला; आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला; "तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो." "ती माझी बहीण !" "ती माझी राणी होऊ दे !" "मी तिला विचारीन !" "कळवा मला काय ते !" राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली. "राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही !" राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कर्‍या आला. " काय उपाय ? " राजाने विचारले. " त्याला म्हणावे; तुझी बहीण तरी दे; नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधार्‍या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो; नाहीतर डोके उडवण्यात येईल ! " राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली; " दादा का रडतोस ? " त्याने तो वृतांत सांगितला. ती म्हणाली; " गावाबाहेर जाऊन दो कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस ! " राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावर ती हरिणी बनली. वार्‍याप्रमाणे ती पळत सुटली. अंधार्‍या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले येऊन ती म्हणाली; " जा; राजाला ही नेऊन दे ! " राजपुत्राने तार्‍याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्कर्‍याला म्हणाला; " आता कोणता उपाय ? " " त्याला सांगा की; बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे; नाही तर डोके उडवीन ! '' खुशमस्कर्‍याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला; " दादा का रडतोस ? " राजपुत्राने वृज्ञल्तलृांत निवेदिला. " रडू नकोस; दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस !" राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डरांव; डरांव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडुक जमा झाले. तो त्यांना म्हणाला; " त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन: पुन्हा बुडया मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू; राजाच्या अंगणात ढीग घालू ! " सार्‍या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणार्‍या मोत्यांचे ढीग पडले. भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला " राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीची मोती निवडुन घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून ! " राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाडयात परत आला. राजाने खुशमस्कर्‍याला विचारले " आता काय ? " " त्या राजपुत्राला म्हणावे; बहीण दे; नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून येते." खुशमस्कर्‍याने सुचविले. " तो स्वर्गात कसा जाणार ? " " तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू ! " राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला " दादा; का दु:खी ? " राजपुत्राने सारी कथा सांगितली. " रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा; की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा ! " राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला. " महाराज; या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या." सर्प म्हणाला. " हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल." शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले ने तो निघुन गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला; " दादा जा व राजाला सांगा की; त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्कर्‍याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या !" राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाडयासमोर ही गर्दी ! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्कर्‍यास बोलावले व सांगितले; "अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे ! " "मी कसा जाऊ ?" "या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा !" लोकांनी टाळया पिटल्या. " दुष्टाची बरी जिरली!" कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाडयात आला व भावंडांना म्हणाला; "हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो. येथे राहण्यात अर्थ नाही. चला आपण जाऊ." रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फारळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला; "दादा; मला निरोप दे! मी जातो!" "मला कंटाळलास?" "दादा; मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा; सुखी व्हा!" असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोडया अंतरावर फण फण करीत निघून गेला. थोडया अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला; "दादा; मलाही निरोप दे!" "का रे जातोस ?" "दादा; मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!" असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुन उडया मारीत निघून गेला. पुन्हा थोडया अंतरावर बहीण म्हणाली; "दादा; मलाही निरोप दे!" "तूही चाललीस ?" "होय दादा. पादसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मयाळू हो!" बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वार्‍याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली. राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी ! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे;असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थीत होती. "कोण आहे ? " पहारेकर्‍यांनी दरडावले. "मी राजपुत्र." " माझा बाळ ! माझा बाळ ! " म्हणत राणी घावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला. " शहाणा होऊन आलास ? " राजाने विचारले. " होय तात ! " तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊ या. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.दुर्योधन कृष्णाच्या दालनात प्रवेशला. मंचकावर भगवान श्रीकृष्ण निद्रिस्त पहुडलेले होते. दुर्योधन उत्तरीय सावरत कृष्णाशेजारच्या उच्चासनावर विराजमान झाला आणि भगवंत जागे होण्याची शांतपणे वाट पाहात बसला. काही क्षण गेले आणि अर्जुन घाईने आत प्रवेशला. प्रथम दुर्योधनावर दृष्टी जाताच अर्जुन गोंधळून थबकला. मग त्याची दृष्टी कृष्णावर गेली. कृष्ण अजूनही प्रगाढ निद्रेत होते. आपल्याला उशीर झाला आहे याची त्याला जाणीव होऊन अर्जुन काही क्षण विचार करत तसाच उभा राहिला. मग आपल्याला योग्य असे दुसरे आसन दिसते काय हे पाहण्यासाठी त्याने कक्षावर नजर फिरवली, पण त्याला एकही आसन दिसले नाही. मग काही विचार करून तो पुढे झाला आणि दुर्योधनाच्या छद्मी हास्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत कृष्णाच्या पावलांशी गुडघे टेकून बसला आणि रात्रीने प्रभातेची वाट पाहावी त्या अधीरतेने कृष्ण जागृत होण्याची वाट पाहू लागला. काही क्षण गेले. बाहेर प्रभातेचा पदचाप कानी पडताच मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. भगवंत जागे झाले. त्यांची नजर प्रथम आपल्या पायाशी विनमरपणे बसलेल्या अर्जुनावर पडली. मग त्यांनी दुर्योधनाकडे पाहिले. मंद हास्य करीत त्यांनी विचारले, "एवढ्या लवकर आपण उभयता येथे कसे आलात? आपल्याला येऊन फार वेळ तर झाला नाही ना?" "कृष्णा, तुला माहीतच आहे, की आम्हा कौरवांत आणि पांडवांत सख्य नाही. आमच्यामध्ये रीतसर समेट होणे असंभव आहे. त्यामुळे आम्ही युद्ध करून आर्यावर्तावर कोणी राज्य करावे याचा निर्णय करावा असे ठरवले आहे. तू आम्हा उभयतांचा नातेसंबंधी आहेस. या युद्धात तू आमचा पक्ष घेऊन युद्ध करावे अशी माझी इच्छा आहे." दुर्योधन म्हणाला. "मी तुला मदत करावी असे तुला का वाटते दुर्योधना? मी पूर्वीपासून पांडवांचा पक्षपाती आहे असे सारे म्हणत असतानाही, आणि तू माझी त्यासाठी नेहमीच निंदा करत असतानाही, माझी मदत मागायला यावे याचे मला आश्चर्य वाटते आहे" दुर्योधन यावर मंद हसला. "कृष्णा, मी क्षत्रिय आहे आणि उच्चकुलीन आहे. राजनीतीचा मी चांगला अभ्यास केला आहे. राजनीतीत कोणीही कायमचा मित्र नसतो की शत्रू नसतो. त्यामुळे मी तुला मुळीच शत्रू मानत नाही. शिवाय तू माझा नातेसंबंधी असल्याने माझा तुझ्यावर काही अधिकार आहेच. तू मला मदत केल्याने तुझ्यावरचा पक्षपातीपणाचा आरोप दूर होईल आणि तुझी कीर्ती अधिक धवल होईल, असे मात्र खात्रीने वाटते. शिवाय तुझ्यासारखा ज्ञानी मनुष्य आमच्या बाजूला असला तर आमचा मोठाच नैतिक विजय होईल. केवळ तुझ्यामुळे, पांडवांची बाजू लंगडी असली तरी त्यांना जे मदत करायला उभे राहिले आहेत तेही माघार घेतील. त्यामुळे मी तुझी मदत मागायला आलो आहे." "दुर्योधना, केवळ एवढ्यामुळेच मी तुला मदत करायला तयार होईन असे तुला वाटले तरी कसे? तू माझा नातेसंबंधी आहेस हे खरे, पण तेवढे पुरेसे नाही. ज्या कंसाला मी ठार मारले तोही माझा नातेवाईकच होता, हा इतिहास तुला माहीतच आहे." "होय कृष्णा, मला इतिहास चांगलाच माहीत आहे. पण ती वेळ वेगळी होती. कारणे वेगळी होती. येथे परिस्थिती वेगळी आहे. वेळ वेगळी आहे. आपण आर्यावर्ताचे भवितव्य ठरविण्यासाठी येथे बसलो आहोत. तू नसलास तर आम्हाला विजयच मिळणार नाही असे नाही. तू स्वत:सुद्धा अनेक युद्धे हरला आहेस, हाही एक इतिहासच आहे. पण तू स्वत:ला धर्मनिष्ठ समजतोस, म्हणून धर्माची बाजू घ्यायला का होईना तू माझ्या बाजूने युद्ध करावेस असे मला वाटते." कृष्णाच्या चेहर्‍यावरचे हास्य अधिक विस्तारले. मग त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि मृदू स्वरात विचारले, "यावर तुझे काय म्हणणे आहे, अर्जुना?" आपली बाजू पटवून देण्यासाठी शब्द खर्चण्यापेक्षा नम्रता स्वीकारणे अनेकदा हितावह ठरते हे माहीत असलेला अर्जुन शिर झुकवून म्हणाला, "भगवंता, तू माझा मित्रच नव्हेस तर सखा आहेस. तू जे ठरवशील ते मला मान्य आहे." "तुम्ही माझ्यासमोर मोठा बिकट प्रश्न उभा केला आहे." कृष्ण म्हणाला. ""तुम्ही दोघेही माझे आप्त आहात हे खरे. त्यामुळे मला पक्षपाती धोरण स्वीकारणे योग्य वाटत नाही. जेव्हा दोन्ही बाजू धर्म आणि न्याय आपल्याच बाजूला आहेत असे गृहीत धरतात तेव्हा फक्त युद्धानेच धर्म आणि न्याय कोणाच्या बाजूने आहे हे ठरवावे लागते हेही खरे. त्यामुळे युद्ध होणार आणि मला कोणाचीतरी बाजू घ्यावी लागणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे आणि मी एकाच वेळी सर्वांची बाजू घेऊ शकत नाही हेही उघड आहे. तेव्हा मला यावर थोडा विचार करावा लागेल." "कृष्णा, मी तुझ्याकडे सर्वप्रथम आलो आहे आणि जो प्रथम मदत मागायला येतो त्यालाच मदत करणे ही पुरातन रीत आहे. तुझ्यासारखा सज्जन हा परिपाठ तोडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे तू मलाच मदत करायला हवीस." "दुर्योधना, तू प्रथम आला आहेस हे खरे आहे. पण मी अर्जुनास प्रथम पाहिले हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे माझ्यापुढचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. पण मी यावर एक तोडगा सुचवतो. जर तो तुम्हा उभयतांना मान्य झाला तर मी उभयतांना मदत केल्यासारखीच होईल." "सांग कृष्णा." अर्जुन अधीरतेने म्हणाला. "एकीकडे मी आहे आणि दुसरीकडे माझी दोन अक्षौहिणी सेना आहे. या युद्धात मी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही. कारण माझ्याच हस्ते माझ्या आप्तांवर वार व्हावा हे मला योग्य वाटत नाही. माझी सेना मात्र कोणाचीही आप्त नसल्याने ती मात्र युद्ध करेल. "आता युद्ध न करणारा मी हवा, की शस्त्रास्त्राने सिद्ध अशी अक्षौहिणी सेना हवी याचा निर्णय तुम्ही मला द्यायला हवा. हे दुर्योधना, तू प्रथम आलास म्हणून आणि ज्येष्ठ आहेस म्हणून तू मला प्रथम सांग, तुला काय हवे आहे?" दुर्योधन काही क्षण स्तब्ध बसला. अर्जुन अनिवार उत्कंठेने दुर्योधन काय उत्तर देतो याची वाट पाहू लागला. "हे जनार्दना, तू माझा आप्त आहेस, आणि तरीही आजवर तूच माझा विरोध केला आहेस. पण मी फक्त तुझी आणि फक्त तुझी मदत मागायला आलो होतो, त्यामुळे मला फक्त तूच हवा आहेस." दुर्योधन उत्तरला. कृष्णाचा चेहरा आश्चर्याने विस्फारला गेला. जणू दुर्योधन त्याची मागणी करेल अशी त्याची अपेक्षाच नव्हती. पण आता त्याने शब्द दिला होता आणि त्याच्यासारखा धर्मवेत्ता दिलेला शब्दलणे शक्य नव्हते. "तथास्तु! अर्जुना, तुझ्या वाटयाला आता माझी सेना आली आहे. तिचा योग्य विनियोग कर आणि युद्धात जय मिळव" कृष्ण म्हणाला. अर्जुनाच्या नेत्रांत अश्रू उभे राहिले. सर्व आशा संपलेल्या मनुष्यासारखा तो प्रतिमावत बसून राहिला. नंतर रुद्ध कंठाने तो म्हणाला, "जनार्दना...का एवढा तू निष्ठूर झालास? का तू माझा असा त्याग केलास? मी आता द्रौपदीला काय सांगू? तिची तुझ्यावर अनन्यसाधारण भक्ती आहे. तुझ्या आशेवर तिने वनवासातील दु:सह्य कष्ट सहन केले. केवळ तुझ्यावर श्रद्धा ठेवून अपमानांच्या अगणित राशी तिने भोगल्या. मी धर्मराजास काय सांगू? आमच्या हृदयात सदैव वसणार्‍या परमात्म्याने आमचा त्याग केला आहे असे सांगू? तो धीरगंभीर ज्ञानी मनुष्य ही वेदना कशी सहन करेल? हा आघात त्याला कोलमडून टाकण्यास पुरेसा आहे. हे भगवंता, जर तू आमच्या बाजूस नसशील तर हे युद्ध करण्यात तरी काय अर्थ आहे? जा दुर्योधना, तुझे राज्य तुला लखलाभ असो. आम्ही पाच बंधू द्रौपदीसह या आर्यावर्तात कोठेही जाऊन राहू." कृष्णाची मुद्रा गंभीर झाली होती. "हे अर्जुना, जर तुला तुझी बाजू न्यायाची वाटत असेल तर तुझी बाजू सिद्ध करण्यासाठी तुला युद्ध करणे भाग आहे. जर तू खरेच धर्मनिष्ठ आहेस तर मी तुझ्या बाजूने आहे की नाही यामुळे तुझ्या युद्धाच्या निर्णयावर फरक पडता कामा नये. धर्म आणि न्याय भावनांच्या तुलेत तोलता येत नाहीत. धर्म सूक्ष्म आहे आणि त्याचे अनंत पैलू आहेत. धर्म हा सामान्य बुद्धीच्या मनुष्यांच्या पकडीबाहेरचा आहे. हे अर्जुना, धर्माला कोणतीच बाजू नसते. धर्म सर्वत्र आहे आणि शाश्वत आहे. एका भूमीच्या तुकडयावर उभे राहून एका पर्वताकडे पाहात असता तो पर्वत वेगळाच भासतो तर अन्य ठिकाणावरून पाहिले असता तो अजून वेगळा दिसतो. हे नरपुंगवा, धर्म हा असाच आहे. मी आजवर धर्माकडे तुझ्यावरील प्रेमापोटी, तुझ्या हिताच्या दृष्टीने पाहात होतो. आता माझी बाजूलली आहे. आणि मी ज्या नव्या बाजूने आहे त्याच बाजूने धर्माकडे पाहीन, हे आता उघड आहे. "हे पांडवा, केवळ मी तुझ्या बाजूने आहे म्हणून धर्मही तुझ्या बाजूने आहे किंवा मी तुझ्या बाजूने नाही म्हणून धर्म तुझ्या बाजूने नाही, असे काही नाही, धर्म केव्हाही कोणाच्याच बाजूने नसतो. तो आपल्या बाजूने असल्याचा भरम मात्र निश्चयाने असतो. या भरमापार जर तू जाशील, तर तुझे हेतू धर्मनिष्ठ नाहीत हे सुद्धा तुझ्या लक्षात येईल." "कृष्णा, तू परस्परविरुद्ध लढतो आहेस. हे परमात्मस्वरूपा, केवळ बाजू बदलताक्षणी शब्दलणे हे केवळ सामान्य प्रतीच्या मनुष्यासच शक्य आहे. आजवर मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली. कारण तू पुरुषश्रेष्ठ आहेस, आत्मस्वरूप आहेस अशी माझी भावना होती. परंतु आता असे वाटते आहे की मी काहीतरी चूक केली आहे. तू माझ्या बाजूने नाहीस तर ठीक आहे. आम्ही तरीही हे युद्ध करू आणि या युद्धात जय मिळवू." एवढे बोलून अर्जुन उठून उभा राहिला. आता त्याच्या मुद्रेवर निश्चयाची आभा झळकत होती. ही सृष्टी एक विजात्र खेळ असल्याची पूर्ण जाणीव असलेला कृष्ण मंद हास्य करीत म्हणाला, "अर्जुना, सारे मानव सामान्य आहेत. सारे मानव स्वार्थी आहेत. आपल्या श्रद्धेशी ठाम नसणे हे त्याच्या क्षुद्रपणाचेच लक्षण आहे. असो. तू माझा सैन्यसंभार घेऊन परत जा. द्रौपदी आणि युधिष्ठिरास माझे अभीष्ट कळव." अर्जुन किंचित वाकून, दुर्योधनावर एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत वळाला आणि त्या दालनातून निघून गेला. "दुर्योधना, तू माझे एवढे बलाढ्य सैन्य न मागता युद्ध न करणार्‍या, नि:शस्त्र अशा मला का मागितलेस?" कृष्णाने काही क्षणानंतर विचारले. आपल्या मुद्रेवर नेहमीच आपल्या श्रेष्ठत्वाची प्रौढी मिरवणारा दुर्योधन म्हणाला, "हे कृष्णा, केवळ सैन्यबलाने युद्धे जिंकली जात असती तर अनार्यांचा विनाश अल्पसंख्य आर्यांना कसा करता आला असता? विजयाची दुंदुभी संख्येने अधिक असलेले नव्हे तर श्रेष्ठ नेतृत्व असलेले लोकच फुंकू शकतात. हे जनार्दना, सैन्य तर मजजवळ पुष्कळ आहे. रथी आणि महारथींचीही मजजवळ कमतरता नाही. कमतरता होती ती फक्त तुझी. केवळ तू माझ्या बाजूस आहेस हे समजले तर माझा सामान्य सैनिकही महारथीच्या आत्मबलाने लढेल. आणि आता तू माझ्या बाजूस आहेस. हे कृष्णा, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे." "दुर्योधना, तू बुद्धिवंत आहेस यात शंका नाही. पण मी तुझ्या बाजूने येऊन तुझे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करून पांडवांचा विजय सुकर करणार नाही असा विश्वास तुला का वाटतो? मी पांडवांना नेहमीच आपला स्नेही मानले आहे. तू त्यांच्यावर अनंतदा अन्याय केला आहेस. कपटाचरण करून त्यांना वनवासी केले आहेस. तू मलाही मी शिष्टाई करण्यास आलो असता बंदी बनवण्याचा अधम प्रयत्न केला आहेस. याबद्दल माझ्या मनात राग नसेल हा विश्वास तुला का वाटतो?" दुर्योधन म्हणाला, "हे कृष्णा, तू तसे करणार नाहीस याबद्दल मला विश्वास आहे; पण समजा, जरी तू माझ्यावर राग धरून बिभीषणाप्रमाणे माझ्या पराजयासाठी पांडवांना मदत केलीस तरीही तो माझाच विजय आहे, हे निश्चयाने समजून अस. "हे पंडिता, तू स्वत:स नारायणाचा अवतार समजतोस. तू सर्वत्र व्यापून राहिला असून केवळ मानवाच्या हितासाठी हा नरजन्म घेतला आहेस असे म्हणतोस. "भीष्म व द्रोणही तुला परमात्मस्वरूप मानून भजतात. असा तू, जर अधर्माचरणी झालास तर तुझ्या चेहर्‍यावरील हा भगवत्तेचा मुखवटा गळून पडेल. या जगात अढळ श्रद्धा ठेवावी असे काहीही नाही हे सर्व मानवजातीस कळून येईल आणि सारे अधर्म करू लागतील. तू परमात्मा नसलास, तरी सारे तुला परमात्मा मानतात आणि तशी श्रद्धा ठेवतात. तुझ्यावरची ही श्रद्धा भंगली तर हे कृष्णा, या पृथ्वीतलावर पुन्हा कोणी कोणावर श्रद्धा ठेवणार नाही. पती पत्नीवर विश्वास ठेवणार नाही, की पिता पुत्रावर. सार्‍या जगात संशयाचे बीज रोवले जाईल व त्याचा फोफावणारा वृक्ष सारे जीवन व्यापून उरेल. ही भूमी वीराण बनेल. "हे कृष्णा, हे युद्ध झाले तर मोठी हानी होईल असे नाही. यात माझा पराजय झाला तर फार तर माझी बाजूच अन्यायाची होती असे जग समजेल आणि माझा द्वेष करेल. आणि जर मी विजयी झालो तर मग पांडव अधम होते याचा साक्षात्कार जगाला होईल. जेत्यांची तळी उचलणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे विजयाने माझ्यावर काही विशेष फरक पडेल असे नाही. पण जर तू बदललास तर मग ही पृथ्वी नि:शेष होईल. "हे कृष्णा, मी माझे जीवन पूर्ण सामर्थ्यासह जगलो आहे. मी क्षत्रियास शोभेल अशाच पुरुषार्थाने जगलो आहे. मी कधीही कोणासमोर शिर झुकवले नाही. पण मी कोणावर अन्यायही केला नाही. हे कृष्णा, हे राज्य माझे आहे अशी माझी श्रद्धा आहे, आणि ज्यावर माझी श्रद्धा आहे, त्यासाठी मी माझे प्राणही देऊन टाकीन. माझ्या श्रद्धा या परिस्थिती पाहून पाठ वळवणार्‍या क्षुद्र मानवाच्या श्रद्धा नव्हेत. या दुर्योधनाच्या श्रद्धा आहेत. त्या मेरुपर्वताइतयाच अचल आणि दृढ आहेत. "हे कृष्णा, तू ज्ञानी आहेस. तुला सारे कळते; पण तू मानव आहेस आणि मानवास शोभेलसे रागद्वेषही तुझ्यात आहेत. पण सर्वांनी तुझ्यावर देवत्व लादले आहे आणि तू आता त्या देवत्वाचा गुलाम आहेस. तुला देवासारखेच वागावे लागेल आणि माझी दृढ बाजू घ्यावी लागेल. कारण तू तुझ्या शब्दांनी आता माझ्याशी बांधला गेला आहेस. "हे कृष्णा, काय सांगावे, तरीही कदाजात तूलशील. माझ्याबद्दल उरात द्वेष ठेवून माझ्या पराजयाचा मार्ग उघडशील. पण मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या बाजूने असतानाही जर माझा पराभव झाला तर मी तो दुर्दैव म्हणून स्वीकारेनही; पण मग या जगात तुझी नालस्ती होईल. आणि तोच माझा खरा विजय असेल. "हे कृष्णा, ही भूमी तशी कोणाचीही नव्हे, आम्ही केवळ प्रजेचे प्रतिपालक. मी प्रतिपाल केला नाही तर अन्य कोणी करेल. मला राज्याची हाव आहे असे सर्वांना वाटते; पण जनार्दना, तसे असते तर एका सुतपुत्रास मी एखादे राज्य दान दिले नसते. जे दान मी एखाद्या अपरिजातास देऊ शकतो ते पांडवांस देऊ शकत नाही असे तुला वाटते तरी कसे? पण दान घेणारा विनमरच असला पाहिजे. दान घेणार्‍याला कोणताही अधिकार नसतो. कोणी नमरपणे प्राणदान मागितले तर मी प्राणही देईन, पण जर अधिकाराने कोणी मजजवळ तृणपाते मागितले तर ते मी काही केल्या देणार नाही, हे नीट समजावून घे. कारण ज्यावर माझाही अधिकार नाही, त्यावर अन्य कोण अधिकार सांगणार? "प्रत्येक प्राणी स्वभावाने बांधला आहे. आणि त्याचा स्वभाव हाच त्याचा धर्म आहे. माझा स्वभाव असा आहे आणि त्या स्वभावानेच मी जगणे यातच माझा धर्म सामावला आहे. "कृष्णा, तू माझ्या बाजूने आहेस, एवढेच मला पुरेसे आहे. पण तू मुक्त आहेस. तू शस्त्र हाती घेण्याचीही मला गरज नाही. मी राजा म्हणून, माझ्याशी एकनिष्ठच राहिले पाहिजे याचेही तुजवर बंधन नाही. तू या मुक्त वायूप्रमाणेच स्वतंत्र आहेस" कृष्ण मंचकावर उठून बसला आणि म्हणाला. "हे वीरा, नि:शंक रहा. तुझा विजय निश्चित आहे. सारेच विजय रणभूमीवर मिळत नसतात. काही विजय श्रेष्ठ मनुष्यांच्या ंतरातच असतात. सुखाने जा दुर्योधना, मी तुझ्याबरोबर आहे." दुर्योधन उठला. श्रीकृष्णास वंदन केले आणि गजराजाच्या डौलाने बाहेर पडला.अर्जुन खिन्न मुद्रेने युधिष्ठिराच्या शिबिरात आला तेव्हा तेथे युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव द्रौपदीसह बसलेले होते. अर्जुनाची खिन्न्ता पाहून युधिष्ठिराने विचारले, "अर्जुना, असे काय अशुभ घडले आहे की ज्यामुळे तू निराश आहेस?" अर्जुनाच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले व तो सद्गदित कंठाने म्हणाला, ""हे महाबली, कपटी दुर्योधनाची अखेरची चालही यशस्वी झाली. कृष्णास त्याने शब्दात पकडून आपल्या बाजूला वळवले. आपल्याला मिळाली ती फक्त श्रीकृष्णाची सेना. पण या सैन्याचा आपल्याला काय उपयोग? आपल्याला हवा होता तो आपला सखा कृष्ण. केवळ तोच आपल्या चातुर्याच्या बळावर आपल्याला विजयश्री आणून देऊ शकला असता." हे वृत्त कळताच सार्‍यांवरच खिन्न्तेचे मळभ दाटून आले. मग युधिष्ठिर म्हणाला, ""ठीक आहे. जसे परमेश्वराच्या मनात आहे तसे होईल." यावर भीम संतप्त होऊन, नेत्रांतून अग्निज्वाला ओकत म्हणाला, "या कपटी दुर्योधनाला मी रणांगणात माझ्या गदेने ठेचून ठार मारेन." द्रौपदीच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता. ती म्हणाली, "माझा सखा माझ्यापासून का दुरावला? असे आम्ही कसले घोर पातक केले होते की त्याची आम्हाला अशी शिक्षा मिळावी?" नकुल आणि सहदेव भयभीत सशांप्रमाणे भीमार्जुनाकडे पाहात बसले. अर्जुन म्हणाला, "आता आपल्याला स्वबलानेच हे युद्ध करावे लागेल हे निश्चित! कृष्ण किमान हाती शस्त्र घेणार नाही ही आपल्या लाभाचीच बाब आहे. आता आपणाकडे एकूण नऊ अक्षौहिणी सेना आहे तर द्रुपद, युयुधान, विराट, धृष्टकेतूसारखे महावीरही आहेत. कौरवांकडे भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तासारखे वीर आहेत. कौरवांकडील भीष्म आणि द्रोण आपलेच हितचिंतक आहेत. त्यामुळे हे महावीर संपूर्ण सामर्थ्याने आपल्याशी काही केल्या लढणार नाहीत. आपल्याला खरी भीती आहे ती कर्ण आणि अश्वत्थाम्याची. कर्ण पहिल्यापासून माझा द्वेष करतो, त्यामुळे कर्ण आपल्याला जड जाणार आहे हे निश्चित. परंतु मी माझे सारे सामर्थ्य पणाला लावून त्याचा पाडाव करेन. अश्वत्थाम्यासही आपणास रणात पाडता आले तरच आपला विजय सुकर होईल." युधिष्ठिर म्हणाला, "तू म्हणतो ते खरे आहे अर्जुना, पण कृष्ण जर त्यांच्या बाजूने असेल तर तो सर्वांना अग्निस्फुल्लिंगाप्रमाणे प्रदीप्त करेल. त्याचे भाषण ऐकले की नेभळटांना सुद्धा स्फुरण चढते. नद्याही मार्ग सोडून धावू लागतील असे शब्दसामर्थ्य त्याला लाभले आहे. नाही अर्जुना, आपला विजय सुकर नाही." भीम काडकन शड्डू ठोकत, आरत नेत्र करत म्हणाला, "हे बंधो, असे भयभीत भाषण फक्त तूच करू शकतोस. तुझ्यामध्ये पुरुषार्थ असा नाहीच. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे तुला काहीच वाटत नाही. आपल्याला भोगाव्या लागलेल्या यमयातनांचे तुला विस्मरण झालेले दिसते. स्वत:ला धर्म संबोधतोस तू, परंतु धर्माचे गूढ तुला माहीत नाही. आम्हाला वडीलपणाचा धाक दाखवत आमच्या पुरुषार्थास दडपणे तेवढे तुला चांगले मिते. द्यूतगृहात तू माझ्या करोधावर आवरण घातले नसतेस तर त्या नीच दुर्योधनाचे मस्तक मी माझ्या गदेने तेथेच छिन्न-भिन्न केले असते." युधिष्ठिराच्या काळजीयुत चेहर्‍यावर प्रथमच हास्य जवळुरले. "भीमा, तुम्हाला मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. जर यापूर्वी कृष्ण आपल्या बाजूने नसता तर आपण युद्धाचा कदापि विचार केला नसता, याची तुला जाणीव आहे. कृष्णानेच आपल्या ंत:करणात सूडाचा वन्ही प्रदीप्त केला हे तू विसरतो आहेस. आता आपण युद्धाची घोषणा केली आहे आणि नेमकी त्यावेळीस कृष्णाने बाजूलली आहे. आपण आता माघारही घेऊ शकत नाही, याची मला चांगलीच जाणीव आहे. आता आपण या परिस्थितीतून चांगला मार्ग कसा काढायचा हे पाहायला हवे," "कसला मार्ग?" द्रौपदीने आशेने विचारले. "द्रौपदी, तुझी कृष्णावर अनन्यसाधारण भती आहे. तो तुझ्या शब्दांबाहेर जाणार नाही असा विश्वास मला वाटतो. कृष्ण काही स्वखुशीने दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेला नाही. केवळ दिल्या शब्दाच्या पेचात सापडून त्याला कौरवांची बाजू घ्यावी लागली आहे. याचाच आपण चांगला फायदा करून घेऊ शकतो. कृष्णाला तू जर खाजगीत भेटलीस आणि कौरवांचा भेद सांगण्याचे किंवा त्यांचा पराजय कसा करता येईल, याचे रहस्य विचारलेस तर तो तुला निश्चितपणे सांगेल. शिवाय कौरवांकडची विदूर-संजयासारखी माणसेही आपल्या बाजूला आहेत. ते आपल्याला मदत करू शकतील. तेच आपल्याला विजयाचा मार्ग दाखवू शकतील." "कृष्ण माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, याची मला खात्री आहे." द्रौपदी प्रसन्न होत म्हणाली. या नव्या कल्पनेने पांडवांच्या मनात आनंद दाटून आला. भीम तेवढा तटस्थ होता. तो म्हणाला, "कृष्ण कसाही असला तरी तो दुटप्पी नाही. तो श्रेष्ठ राजकारणी आहे हे खरे, पण तो वचनभंग करणार नाही. त्याला आता जर दुर्योधनाची बाजू घ्यावी लागली असेल तर तो काहीही झाले तरी ती बाजू सोडणार नाही. शिवाय आपण पराकरमी आहोत आणि आपल्या बुद्धिचातुर्यावर आपला विश्वास आहे. आपण छलकपटाने दुर्योधनाचा घात करण्यापेक्षा मग आत्मघात का करून घेऊ नये? आपण आजवर अनंत यातना भोगल्या आहेत. आपण राज्यभरष्ट होऊन चौदा वर्षे वण-वण करत भटकलो आहोत. आता आपण पुन्हा राज्य प्राप्त करण्यासाठी युद्धाचा पट ंथरला आहे. युद्धात बाहुबल महत्त्वाचे आहे, बंधो! छलकपट अधर्माचे लक्षण आहे आणि त्याला तुझ्यासारख्या धर्मपंडिताने त्यास समर्थन द्यावे, हे आश्चर्य आहे." "भीमा, धर्म सूक्ष्म आहे. भल्या-भल्यांना त्याचे नीटपणे आकलन झाले नाही. सामान्य व्यती सरधोपट धर्मतत्त्व हेच आदर्श ठेवतात आणि त्याप्रमाणे जगतात. आपण येथे युद्ध फक्त राज्यप्राप्तीसाठी करतो आहोत काय याचा विचार करायला हवा. कौरवांनी आपल्याला प्रथमपासून द्वेषबुद्धीने अलग ठेवले. त्यांनी द्वेषबुद्धीने आपल्या वधाचे प्रयत्न केले. कधी तुला विष खाऊ घातले, तर कधी जविंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारंवार कपट केले असूनही आपण कधीही आजवर असत्याचा मार्ग धरला नाही. परंतु आता युद्धाची दुंदुभी फुंकली गेली आहे. आपली बाजू सत्याची की असत्याची हे युद्धातील विजय-पराजय ठरवणारआहे. "या जगतातील व्यवहारधर्म असा आहे की जो जिंकतो त्याचीच बाजू सत्य आहे असे मानले जाते. पराजिताचे सत्यही असत्य ठरते. त्याला अनंत दूषणे दिली जातात आणि अधम कोटीत ढकलले जाते. जर आपला पराजय झाला तर आपल्या यातनांचे सारे संदर्भलतील. सत्तेसाठी हपापलेल्या भावांनी सुबुद्ध कौरवांशी रक्तरंजति युद्ध केले आणि त्यात त्यांचा विनाश झाला असेच लोक म्हणतील. लोकोतीत फार मोठे सामर्थ्य आहे. लोक जेत्यांना डोयावर घेतात आणि पराजितांना पापी मानतात. आपणही हरलो तर पापी ठरू. मग या आपल्या धर्माचरणाची आणि सत्याची किंमत ती काय? लोक ते कधीच जाणू शकणार नाहीत आणि लोक जे जाणत नाहीत त्याचे काही एक मूल्य नाही. हिरा जोवर मातीत गाडला गेला आहे, तोवर त्याचे कुणाला आकर्षण असणार? तो जेव्हा बाहेर काढला जातो आणि तो जेव्हा सर्वांचे नेत्र दिपवतो तेव्हाच त्याला मूल्य येते." भीम यावर म्हणाला, "आपण आपल्या ंतरात्म्याला पटणार्‍या सत्याचा मार्ग धरून चालणार आहोत की लोक काय म्हणतील याचा विचार करून चालणार आहोत हे आपण प्रथम ठरवायला हवे. जी गोष्ट आपल्या ंतरात्म्याला मान्य नाही, ती शब्दांचे मधुर अवगुंठण घालून लोकांसमोर ठेवून कितीही प्राप्त यियिकार होऊन झाली तरी माझ्या मते त्याची काही एक किंमत नाही. शेवटी सत्य आणि धर्म याची मर्यादा ही आपल्या-आपल्यापुरती घालून घ्यावी लागते आणि त्या मर्यादेतच जीवन जगावे लागते. आपण आपल्या मर्यादा सोडून धर्माचा उपमर्दच करत नाही काय? "जर आपण व्यवहारधर्माचा विचार करत असू, तर आपल्याला दुर्योधनालाष देण्याचा तरी काय अधिकार आहे? मला वाटतेआ, आपण आता कृष्णाबद्दल सारे काही विसरावे आणि स्वबलावर युद्धाची सिद्धता करावी." द्रौपदी यावर अग्निप्रलयाप्रमाणे संतप्त होत उद्गारली, "याचा अर्थ तुम्हाला माझ्या मानभंगाची काहीच पर्वा नाही असा होतो. तुमच्या प्रतिज्ञांचे काय झाले? की एका दुर्बल स्त्रीला तेवढ्यापुरते सांत्वन लाभावे म्हणून त्या केल्या होत्या?" भीम यावर व्यथित होत म्हणाला, "द्रौपदी, मला माझ्या प्रतिज्ञांचे एक क्षणही विस्मरण झालेले नाही. देहात प्राण आहे तोवर मी त्या प्रतिज्ञा पार पाडणारच." "मग आपण आपल्यातच का विवाद घालतो आहोत? आपल्याला विजय हवा आहे आणि त्या अधमांचा विनाश. मी कृष्णाची अवश्य भेट घेईन." भीम सोडून इतरांच्या मुखावर समाधान पसरले. द्रौपदी कृष्णाच्या शिबिरासमोर थांबली. द्वारावरील रक्षकांनी द्रौपदीस ओळखून आदबीने अभिवादन केले आणि आत कृष्णाला वृत्त द्यायला गेले. कृष्ण तेव्हा मंचकावर बसून चिंतन करण्यात निमग्न झाले होते. "द्रौपदीदेवी आल्या आहेत." कृष्ण भानावर आले आणि द्रौपदीला आत आणण्याची आज्ञा दिली. द्रौपदी साध्या वेषात होती पण तरीही ती एखाद्या विद्युल्लतेसारखी तेजस्वी दिसत होती. तिचा करोध जणू तिच्या नेत्रांत साकळला होता. कृष्णाने तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि जणू काही क्षणार्धात त्याला सारे काही कळून चुकले. "बोल कृष्णे... का आली आहेस तू?" द्रौपदीने त्याच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहिले. मग ती म्हणाली, "हे कृष्णा, तू असा का रुष्ट झालास आमच्यावर की ज्यामुळे तू त्या पापी कौरवांची बाजू घ्यावीस? अरे, तूच तर नेहमी आम्हांला धीर दिलास, आमच्यावरील संकटे सुसह्य व्हावीत म्हणून उपदेश केलास. या युद्धाच्या कगारावर तूच आम्हांला आणून ठेवलेस... आणि तूच आमचा शेवटी त्याग केलास? असे कोणते प्रलोभन तुला पडले पुरुषोत्तमा! का तू सुद्धा आपल्या दिल्या वचनांना जागू नयेस..." "हे कृष्णे, मला तुझा उद्वेग समजतो आहे. मला समजते आहे की तू एवढी का संतप्त झाली आहेस. तुला द्यूतगृहातील तुझ्या अपमानाचा सूड घ्यायचा होता. तुला तुझ्या पाचही पतींवर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा होता. तुझी फक्त माझ्यावर श्रद्धा होती. मी तुझ्याबरोबर असलो तरच तुझ्यावरील अन्यायाचाला घेतला जाईल याची तुला जाण होती," "होय कृष्णा, तू अगदी माझ्या मनातीलच बोलतो आहेस. पण तुझे वागणे मात्र त्याच्या अगदी उलट आहे. का पुरुषोत्तमा, का तू असा वागलास?" कमल उमलावे तसे हास्य कृष्णाच्या मुखावर उमलले. "हे कृष्णे," कृष्ण मृदुलतम तृणांकुरांसारख्या कोमल शब्दात म्हणाला, ""धर्म फार सूक्ष्म आहे. तुला त्याची जाणीव कशी असेल? मी परमात्मा असूनही अद्यापही धर्म मला नीट समजला आहे असे मला वाटत नाही. मी अन्य प्राणिजगताबद्दल अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की ते अगदी मी दाखवलेल्या मार्गाने जात आहेत. पण मनुष्यप्राण्याचे काही वेगळेच आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म सा आहे त्यापेक्षा जास्ति गुंतागुंतीचा बनलेला आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म जास्त कुटिल आणि जटिल बनला आहे. कृष्णे, मी धर्माचा निर्माता आहे, म्हणून मलाच धर्म एवढा जटिल-कुटिल का आहे, हे समजावून घ्यायचे आहे." कृष्णाचेलणे ऐकूण द्रौपदी जास्तच गोंधळात पडली. कृष्ण , आपला सखा , आज एवढा अलिप्त आणि कोड्यात का पडतो आहे हे द्रौपदीला समजेनासे झाले. ती म्हणाली, "हे कृष्णा, हे सख्या, तुला काय हवे आणि काय नको हे तुलाच जास्त माहीत. मी अज्ञ आहे, सामान्य आहे. मला एवढेच माहीत आहे की तू न्यायाची बाजू सोडून अन्यायाची बाजू घेतली आहेस!" कृष्ण यावर म्हणाला, "कृष्णे, मला एका प्रश्नाचे उत्तर देशील?" "विचार कृष्णा... कोणताही प्रश्न विचार." "तुला अर्जुनाने पणात जिंकले होते. नियमाप्रमाणे तोच तुझा पती होता. पण युधिष्ठिराने जेव्हा माता कुंतीची आज्ञा म्हणून तुला पाचही बंधूंशी विवाह करावा लागेल असे सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" द्रौपदीच्या चेहर्‍यावर कृष्णमेघ दाटी करून आले. तिची मुद्रा सुकल्या पुष्पाप्रमाणे म्लान झाली. तिच्या कंठातून शब्द फुटेनासा झाला. "बोल कृष्णे, माझ्यापासून काही लपवू नकोस." कृष्ण जरा मोठयाने म्हणाला. त्याची मुद्रा गंभीर झाली होती. त्याच्या चेहर्‍यावरचे तेज उगवत्या सूर्याप्रमाणे वाढले होते. "कृष्णे, मी या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून कधीतरी मिळेल याची अनेक वर्षे वाट पाहात होतो. सांग कृष्णे, तुला एकाशी नव्हे तर पाच बंधूंशी विवाह करावा लागणार आहे, हे सांगण्यात आल्यावर तुला काय वाटले?" द्रौपदीच्या चेहर्‍यावरील आभा, रात्र होताच प्रकाशाने विरून जावे तशी विरली होती. तिच्या नेत्रांत अश्रू दाटी करून आले. ती खाली बसली. मस्तक झुकवले. अश्रूंचा महापूर वाहू लागला. रात्रीने पहाट होण्याची वाट पाहावी तेवढ्याच आतुरतेने द्रौपदी काही बोलेल याची कृष्ण वाट पाहात होता. "का हा प्रश्न विचारलास कृष्णा? का?" कृष्णाने प्रत्युत्तर दिले नाही. तो शांतपणे आपल्या आसनावर बसून राहिला. द्रौपदीलालावे लागेलच हे जणू त्याला माहीतच होते! "का माझ्या हृदयावर आता ओरखडे काढतो आहेस कृष्णा? का? अरे, तूच तो होतास ना... जो म्हणाला होता... धर्माने हा विवाह मान्य केला आहे म्हणून... अरे, तूच म्हणाला होतास ना की मी... मी पूर्वजन्मात धर्मकार्यात काही चूक केली म्हणून मला हे पाचही पतींशी विवाह मान्य करावे लागतीलच म्हणून, आणि तूच मला हा प्रश्न विचारतो आहेस?" कृष्ण उद्विगत झाला. "कृष्णे, तू साधी आहेस आणि मूर्खही! तू अयाजिन आहेस. तुझा जन्म यज्ञातून झाला. तुला कसला आला पूर्वजन्म? तुला जर कधी पूर्वजन्म असताच तर तू विद्रोह केला असतास... प्राणार्पण केले असतेस... पण तू तसे केले नाहीस. कारण माझ्या प्रिय द्रौपदी, तू अयाजिन होतीस. तुला कसले आले पूर्वकार्य? पण केवळ व्यास म्हणाले आणि तू ते मान्य केलेस. तू मान्य केलेस द्रौपदी, कारण तुला पूर्वसंस्कार नव्हते. मला खरे सांग द्रौपदी, तुला तेव्हा नेमके काय वाटले? खरे उत्तर दे... मला सत्य जाणायचे आहे." द्रौपदी जरा सावरून बसली. तिला असे वाटले जणू ती या अवघ्या जन्मात एकदम बावळट ठरली आहे. "कृष्णा, खरे सांगू?" "होय द्रौपदी... मला सत्यच ऐकायचे आहे..." "मी या पाचही पतींपासून संतुष्ट आहे!" "तू संतुष्ट आहेस द्रौपदी. तू का संतुष्ट आहेस हे सुद्धा मला माहीत आहे पण कृष्णे, जेव्हा तुला फक्त अर्जुनाशी नव्हेतर सर्व बंधंूशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" द्रौपदी काही क्षण विचार करत राहिली. मग म्हणाली, "मला तेव्हा काय वाटले? कृष्णा, अरे तेव्हा मला कळत तरी काय होते? मला एवढेच माहीत होते की, जसे मला वागायला सांगितले गेले आहे तसेच मी वागले पाहिजे. हे खरे की मला अर्जुनाचे आकर्षण वाटले होते. पण तेही जेव्हा त्याला प्रथम पाहिले तेव्हा! मुळातच माझ्या पित्याने माझ्यासाठी एवढा अवघड पण का ठेवला होता हेच मला समजले नव्हते." "मग?" द्रौपदी बोलायची थांबली तेव्हा कृष्णाने विचारले. "मला विवाह म्हणजे काय, स्त्री-पुरुष संबंध नेमके काय असतात हेच माहीत नव्हते. मी वयात आले आहे आणि आता स्वयंवरात मला योग्य असा पती मी निवडायला हवा असेच मला सांगण्यात आले होते." "मग कृष्णे, जेव्हा कर्णाने धनुष्य उचलले तेव्हा "मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही.' असे तू का म्हणालीस?" कृष्णाने विचारले. "मला तसे सांगण्यात आले होते." द्रौपदी मळभावून आलेल्या स्वरातम्हणाली, "म्हणजे?" कृष्णाने ंमळ आश्चर्याने विचारले. कृष्ण भीष्माचार्यांच्या शिबिरात आला तेव्हा स्वत: तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसणारे भीष्माचार्य श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा करून त्यास उच्चासनावर बसविले व स्वत: हात जोडून साध्या आसनावर बसले. "हे देवकीनंदना, तुझे क्षेम तर आहे ना?" "होय कुरुकुलश्रेष्ठा. माझे क्षेम आहे. परंतु आपण आज प्रसन्न्दिसत नाही." प्रदीर्घ सुस्कारा सोडून भीष्म म्हणाले, "हे कृष्णा, तू आमच्या बाजूला येऊन मिळाला आहेस याबद्दल आनंद व्यक्त करावा की खेद याबद्दल माझ्या मनाचा काही केल्या निश्चय होत नाही." "का बरे असे?" कृष्णाने कोमल स्वरात विचारले. "मी कौरव असलो, मला दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल हे खरे असले तरी पांडवांबद्दल माझ्या मनात किती अपार ममता आहे हे सारे जाणतात. यासाठी मी दुर्योधनाची बालबुद्धी, दुरुत्तरेही ऐकून घेत असतो. तू पांडवांचा नेहमीच सखा राहिला आहेस. असे असताना पापी दुर्योधनाच्या पक्षास, हे कृष्णा, तूही येऊन मिळालास याचे मला नवल वाटते आहे." कृष्णाच्या श्यामल चेहर्‍यावर मंद हास्य पसरले. जणू काही महन्मंगल प्रभेने प्राचीवर आपले शुभचिन्ह अंकित केले असावे असे तेज कृष्णाच्या चेहर्‍यावर झळकले. "हे कुरुकुलश्रेष्ठा, ज्याच्या ज्ञानाला अनंत आकाशही सीमा घालू शकत नाही अशा श्रेष्ठ तापसा आणि पराकरमात प्रत्यक्ष परशुरामही बरोबरी करू शकत नाही अशा श्रेष्ठ महावीरा, तुमच्या मनात संभरम निर्माण व्हावा हे खचितच आश्चर्यदायी आहे. असो. "हे भीष्मा, आपणास दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल असे आपण आगरहाने म्हणत आहात. आपल्या अंत:करणात पांडवांबद्दल अपार ममता आहे हे सर्व आर्यावर्तात विख्यात आहे. असे असताना आणि आपल्यावर कुरूंचे कसलेही बंधन नसताना आपण दुर्योधनाचीच बाजू घ्यावी लागेल असे का म्हणत आहात? खरे तर आपण अवश्य पांडवांना जाऊन मिळायला हवे. पांडवांनाही यामुळे केवढा आधार मिळेल." श्रीकृष्णाच्या तोंडून अनपजेक्षत वाय ऐकायला मिळाल्याने क्षणभर स्तंभित झालेले भीष्माचार्य स्वत:स सावरून म्हणाले, "हे कृष्णा, प्रत्येक पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुला माहीत नाही असे दिसते. काहीही झाले तरी धृतराष्टाचे मीठ खाल्ले आहे मी. त्याच्याशी द्रोह करून पांडवांच्या बाजूने जाऊन युद्ध करू शकत नाही हे उघड आहे. पण जनार्दना, तुला तर माझ्यासारखे कसले बंधन नव्हते. का रे तू पांडवांचा त्याग केलास?" श्रीकृष्णाने आर्द्र दृष्टीने त्या वयोवृद्ध तपस्व्याकडे पाहिले आणि तो मौन राहिला. "हे कृष्णिकुलवंतस, मला पांडवाची काळजी वाटते. या युद्धात सर्वसंहार होणार हे निश्चितच आहे. पांडवांचा पराजय झाला तर मला यातना होतील." श्रीकृष्ण तरीही मौन राहिला. जरा शाने श्रीकृष्णाने विचारले, "हे भीष्मा, युद्धात तुम्ही पांडवांना अभयदान दिले आहे, हे खरे काय?" "होय. मी एकाही पांडवास रणात वधणार नाही पण आजच दशसहस्र पांडवसेना वधेन असे मी दुर्योधनास सांगितले आहे." "असे का भीष्माचार्य?" "असे का म्हणजे? पाचही पांडव मला प्रिय आहेत. धर्म, क्षात्रतेज आणि त्यांची विनम्रता विश्वप्रसिद्ध आहे. त्यांच्यावर पातकी दुर्योधनाने अनंत अत्याचार केले आहेत. पांडवांचा राज्याधिकार त्याने हिरावून घेतला आहे. मी कसा पांडवांना वधू?" श्रीकृष्णाच्या श्यामल मुखावरील आभा अधिकच दीप्तिमान झाली. "मग तुम्ही पांडवांच्या पक्षालाच जाऊन का मिळत नाही? तेच अधिक धर्मसंगत आणि न्याय्य ठरणार नाही का? तुमची पांडवांवर प्रीती आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यांना रणात वधणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यात लाभ तो कोणता? तुम्ही अर्थाचे दास आहात म्हणून कौरवांच्याच बाजूने राहावे लागेल असे म्हणता ते पूर्ण खरे नाही हे तुम्हासही माहीत आहे. तुम्ही स्वत: ज्येष्ठ कौरव आहात. या राज्याचे विभानि होऊ नये म्हणूनच तुम्ही आजन्म बरह्मचर्यवरताची शपथ घेतलीत हेही खरे आहे. "मग तुम्हीच या राज्याचे कौरव-पांडवांत विभानि व्हावे असेही म्हणत आहात. तुमची पांडवांवर प्रीती आहे आणि त्या प्रीतीस्तव युद्धात त्यांचा वध करणार नाही असेही म्हणता आहात. तुम्ही अर्थाचे दास आहात आणि म्हणून कौरवांच्या बाजूने युद्ध करावे लागेल असे आताच तुम्ही मला सांगितलेत. "हे महावीरा, आपले भाषण असंबद्ध आहे असे आपणास वाटत नाही? या राज्यावर पांडवांचाच अधिकार आहे असे आपणास मनोमन वाटते. मग हे महाश्रेष्ठ, आपण मीठ खाल्लेत कोणाचे? पांडवांचेच ना? मग आपण अवश्य पांडवांकडे जायला हवे. त्यांच्या पक्षास मिळून सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला जे दुष्ट वाटतात त्यांच्याशी युद्ध करायला हवे. हाच धर्म आहे कुरुश्रेष्ठ!" "कृष्णा, तूही असंबद्ध बोलतो आहेस असे नाही तुला वाटत? तू आता कौरवांचा पक्ष घेतला आहेस आणि माझ्यासारख्या वीराला शत्रुपक्षास जाऊन मिळायला सांगतो आहेस, काय हा धर्म आहे?" "होय. हाच धर्म आहे." कृष्ण पूर्ववत शांत स्वरात म्हणाला, ""दिग्भरमित योद्धे कधीही विजयश्री खेचून आणत नाहीत. युद्ध सुरू व्हायच्या आधीच जे शत्रुपक्षाची भलावण करतात ते योद्धे मित्र नव्हे तर शत्रू आहेत असेच कोणीही समराटाने धरून चालायला हवे. हीच राजनीती आहे. हे कुरुकुलभूषणा आणि ती आपणास माहीत नाही असे मी तरी कसे म्हणू? आणि त्यात दुर्योधनाने तुम्हाला प्रथम सेनापती बनवण्याचा निर्धार केला आहे. मग या युद्धात कौरवांचा विजय कसा होईल?" भीष्माचार्य काही क्षण अधोवदनाने मौन राहिले. "हे कृष्णा, तू नारायण आहेस. आपल्या दिव्य दृष्टीने तू सारे काही जाणतोस. मग मला प्रश्न का विचारतो आहेस?" कृष्णाच्या मुखावर कमलदले उमलावीत तसे प्रशांत हास्य उमलले. "मला तुमच्याकडूनच ऐकायचे आहे." तो म्हणाला. "दुर्योधन किंवा पांडव... हे खरे कारण नव्हेच. हे दयाघना, मी दुर्योधनाचा पक्ष घेतला तो त्याचे मीठ खातो म्हणून नाही हे सुद्धा सत्य आहे. मी पांडवांशी युद्ध करणार नाही ते सुद्धा खरे आहे. हे परमेश्वरा... हे युद्ध माझ्या नियतीशीअहे." "कोणती नियती?" "मी सांगायलाच हवे? हे नारायणा, तुला सर्व विदित आहेच." "होय... तुम्हीच सांगायला हवे." "पण का?" "हे नरश्रेष्ठा, या भूतलावर प्रत्येक णि आपल्या नियतीशीच युद्ध करीत असतो. जन्मो-जन्मीची इष्ट-अनिष्ट कर्मे आपली नियती अधाजेलखित करीत असते. त्यातून कोणाचीही सुटका नाही. माझीसुद्धा नाही. तुमची नियती मला माहीत आहे. पण तुम्ही तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहात आहात हे जाणून घ्यायचे आहे मला." आपल्या शोकात साकळून गेलेले भीष्माचार्य नेत्र मिटून आपल्याशीच काही क्षण द्वंद्व करीत राहिले. "हे मधुसूदना, मला ंबेचा शाप आहे. ती या जन्मी शिखंडीच्या रूपाने द्रुपदाघरी अवतरली आहे. शिखंडी माझा मृत्यू आहे. त्याच्याकरवी माझा वध व्हावा ही माझी नियती आहे आणि द्रुपद पांडवांचा श्वशुर असल्यानेशिखंडी या युद्धात पांडवांच्याच बाजूने युद्ध करणार याबद्दल माझ्या मनात संशय नाही. "मग मला काही झाले तरी कौरवांच्याच बाजूने लढावे लागेल. तरच शिखंडी मला रणात वधू शकेल. युद्धभूमीवर मृत्यू आला तर मला स्वर्ग मिळेल. एरवी शिखंडी मला वधू शकणार नाही, हे तर प्रसिद्ध आहे. हे युद्ध कौरव-पांडवांसाठी नाही, माझ्या वधासाठी आहे. आणि मी ंबेवर अन्याय केला याचा सल काही केल्या माझ्या ंत:करणातून जात नाही. "याचसाठी मी कौरवांच्या बाजूने युद्ध करणार आहे. पांडवांना मी वधावे हा काही माझ्या या युद्धाचा हेतू नाही. आता माझे पुष्कळ आयुष्य झाले आहे आणि जगण्याची विजजगीषा कधीच मरून गेली आहे." श्रीकृष्णाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच रुंदावले. तो वीणेने रुणझुणावे तशा ंत:करणास वेड लावणार्‍या स्वरात म्हणाला, "कुरुपुंगवा, मला तुमचे उत्तर मिळाले. पण तुम्ही अद्यापही दिग्मूढ आहात हे सत्य आपण जाणून घ्यायला हवे. तुम्ही हे युद्ध स्वत:च्या नियतीसाठी करीत आहात असे तुम्ही म्हणता. तुमची नियती खरीही आहे. पण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे. हे सनातन सत्य आहे. त्याला तुम्हीही अपवाद नाही. मग मृत्यू कोणाच्या हस्ते येतो की आपसूक यालाही काही महत्त्व नाही. "मृत्यू' हा फक्त "मृत्यू' आहे, जो जीवनाचा प्रकाशमान मार्ग बंद करून ंधारकडयावरून मनुष्यास फेकून देतो. मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार की नरक याची चिंता जविंत असताना केल्याने फार मोठे पुण्य लाभणार आहे, असा भरम कोणी करून घेऊनये. "समजा हे युद्ध घडणारच नसते, तर शिखंडीने आपली प्रतिज्ञा कोणत्या तरी मार्गाने पूर्ण केली असतीच ना! तुमचा नियत मृत्यू झाला असताच ना! पण त्यासाठी पांडवांना वधायचे नाही किंवा कौरवांचीही बाजू सोडायची नाही, असा अट्टागरह का? पांडवांना वधणार नाही पण पांडवांची दशसहस्र सेना आजच वधेन असे विधान तरी मग तुम्ही का केलेत? केवळ पांडव तुमचे आप्त आणि इष्ट आहेत म्हणून? त्या निष्पाप-पोटार्थीसाठी युद्ध करणार्‍या सैनिकांशी तरी मग तुमचे काय वैर आहे? आणि तुम्हाला वाटते, दुर्योधनाची बाजू अन्याय्य आहे. ती न्याय्य आहे की अन्याय्य असा निरपेक्ष निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही भावनाशील पुरुष आहात. भावनाशील पुरुष निरपेक्ष न्याय-अन्याय ठरवू शकणार नाही हे उघड आहे. पण प्रत्येक पुरुष आपल्या सद-सद्विवेक बुद्धीच्या जोरावर न्याय आणि अन्यायाच्या चर्चा करतो. आणि ंबेशी नेमका न्याय झाला की अन्याय हे तरीही तुम्ही ठरवू शकत नाही, पण तिच्या हातून, या जन्मी वध होणार हे मात्र तुम्ही निश्चयाने समजून चालला आहात. या भूमीचे नेमके शासक कौरव असावेत की पांडव याबद्दलही तुमचा निर्णय निश्चयाने झालेला नाही, अन्यथा पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुम्ही मला सांगितली नसती. " आणि कौरवांच्या बाजूने लढेन परंतु पांडवांना युद्धात ठार मारणार नाही असे विधानही तुम्ही केले नसते. "हे नरपुंगवा, मग तुम्ही युद्धात भागच का घ्यावा? बलराम ज्याप्रमाणे कौरव-पांडवांना समान मानून युद्धात भाग न घेता तीर्थयात्रेस निघून गेला त्याप्रमाणे तुम्हीही का शस्त्रसंन्यास घेत नाही? तुमच्यामुळे कौरवांचा विजय होणार नाही की तुम्ही जोवर सेनापती राहाणार आहात तोवर पांडवांचाही विजय होणार नाही. मग ज्यामुळे कोणाचाही जय-पराजय अधोरएखित होणार नाही, अशा युद्धाचे सेनापत्य आपण का स्वीकारीत आहात? केवळ शिखंडीला तुम्हाला युद्धात ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून? पण तरीही शिखंडीसारखी कापुरुष तुम्हाला युद्धात मारू शकत नाही... त्यासाठी तुम्हाला शस्त्र खाली ठेवण्याचाच पर्याय निवडावा लागेल, हे काय तुम्हाला माहीत नाही? " आणि हे नरश्रेष्ठा, पांडवांचे जेवढे हित तुम्ही पाहता तेवढेच जर पांडव तुमचेही हित पाहात असतील तर सा तुम्ही पांडिवांना युद्धात न वधण्याचा निर्णय घेतला आहे तसा पांडवांनी घेतला आहे का? जर तुम्ही एकमेकांचे आप्त आहात तर मग ही निष्ठा एकेरी कशी? ती दुहेरी का नाही? आणि खरे तर युद्धात कोणी आप्त नसतो की इष्ट नसतो. समोर फक्त शत्रू असतो आणि युद्ध फक्त शत्रूंशी होऊ शकते, आप्तांशी नाही. " आणि आपण सारे मेलेलेच आहोत. आज आपण जिवंत दिसतो आहोत ते काळाच्या अनंत धाग्यावर आपण थोडे अलीकडे आहोत म्हणून. क्षणाक्षणाने मृत्यू आपल्या दिशेने चालत येतोच आहे. हे पुन: पुन्हा जन्मणे आणि मरणे अहोरात्रीच्या नियत कृत्यासारखे आहे. "पण मग त्यासाठी असा सर्वविनाशी संकल्प का करावा? "नियती आपण घडवतो. आपल्या कर्मानी घडवतो. जेव्हा आपली विवेक बुद्धी स्थिर असते, शाश्वत असते तेव्हा नियतीसुद्धा तेवढीच उज्ज्वल धवल असते. जेव्हा आपली कर्मे आपला विवेक सोडून होतात तेव्हा नियतीही तेवढीच करूर फळे आपल्या ओटीत टाकते. "नियती अजरा मर नाही. ती नियती मनुष्य घडवतो. नियती मनुष्य घडवत नाही..." "हे महाबाहो, युद्धाने आपण कोणती नियती घडवत आहोत याची थोडीतरी कल्पना कधी करून पाहिली आहे काय? युद्धात जय मिळाला किंवा पराजय जरी झाला, तो कर्मफल लाभाची आशा ठेवल्याने लाभला की कर्मफल अपेक्षा न ठेवता लाभला यामुळे युद्धाचा परिणामलणार आहे काय? "ज्या शाश्वत धर्माची आपण कामना करतो, जो धर्म हा या धपरत्रीवरील सर्व सजीवसृष्टीस आपल्या हातात-हात घालून चालायला सांगून सर्व मंगलदायी मोक्षाची आपण कामना करतो तो धर्म या जया-पराजयाने मलिन होईल हे आपणास का वाटत नाही? "प्रत्येक कर्मास फल अटळपणे जाकटलेले असते. मग त्याची कामना असो की नसो, धुळीतून चाललो की धुळीवर पदजान्हे आपसूक बनतात. युद्ध केले की निसंहार होणार, मग स्वत: मेलो की अन्य मेलेत याची अपेक्षा असो किंवा नसो. "हे ज्ञानवंता, तुझी नियती तू स्वत: घडवली आहेस आणि आता युद्ध हे कर्म आहे. त्यामध्ये तुझा वध होणे ही तुझी नियती आहे, पण हा वध युद्धातच व्हावा ही काही तुझी नियती नाही. म्हणजेच युद्धाचे हे कर्म करावयाचे की टाळायचे हे सर्वस्वी तुझ्या विवेकावर अवलंबून आहे. कौरवांचा द्वेष वाटतो, पांडवांबद्दल प्रीती वाटते, जरा या भावनांच्याही पार जाण्याचा प्रयत्न करून पाहा. कौरव व पांडव आपापल्या व्यतिगत पातळीवर आपापली कर्मे करीत आहेत. पण तुम्ही ज्ञानी आहात. कर्माची निवड डोळसपणाने करणे हे ज्ञानवंताचे इष्ट कर्तव्य नाही काय? "परंतु हे महाबाहो, तुम्ही पूर्वी विजात्रवीर्यांच्या पत्नीस अपत्यदान देण्याची सत्यवर्तीदेवींची आज्ञा अव्हेरली होती. सत्यवतीदेवींनी तुम्हाला राज्यासनावर बसून कुरुकुलाची वंशवृद्धी करण्याविषयी सांगूनही आपण आपल्या दृढप्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहायचे ठरवून मातेचीच समकालीन धर्मसंगत आज्ञा पाळली नाही. जेव्हा इष्टानिष्टतेच्या निर्णयाचा क्षण येतो तेव्हा विगत काळात विशिष्ट परिस्थितीत केलेली प्रतिज्ञा याही विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात कायम ठेवायची की नूतन परिस्थिती पाहून विवेकाने निर्णय घ्यायचा याचे स्वातंत्र्य मानवास आहे, असे असूनही कुरुवंशाचे वर्धन अन्य बरह्मर्षीकरवी करावे, असा सल्ला आपण सत्यवतीदेवीस दिला आणि आपला प्रतिज्ञेचा निर्णय कायम ठेवला. कदाजात आपण प्रतिज्ञाभंगाचा दोष घेऊन का होईना पण धर्माज्ञा पाळली असती तर इतिहास काही वेगळा घडला असता. असो. "नियती स्वत: मनुष्य घडवतो ती अशी. प्रत्येक कर्मास अटळपणे फळ जाकटलेले असते ते असे. ंबेच्या संदर्भातही तुम्ही अन्याय केला हे सांगणे आवश्यक आहे. विजात्रवीर्य युवा व विवाहयोग्य असतानाही काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरास तुम्ही विजात्रवीर्यास समवेत न नेता स्वत: स्वयंवरास गेलात. आपण या तीनही कन्यांचे अपहरण करताना आर्यविवाहांचे आठ प्रकार सभेस सांगितले. त्यानुसार स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा व लोकांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वश्रेष्ठ आहे, असे आपण स्वत:च म्हणालात. म्हणजे ंबा, ंबिका आणि ंबालिका या तीनही, तुम्ही सर्व क्षत्रियांचा पराजय करून त्यांचे हरण केले असल्याने, विधिवत तुमच्या ंगना होत्या. परंतु तुम्ही त्यांना तुमच्या धाकटया भावास अर्पण केले. परंतु ंबेने शाल्वास मनाने वरले होते! हे खरे की ते तुम्हास माहीत नव्हते व जेव्हा माहीत झाले तेव्हा तुम्ही तिला शाल्वाकडे परतही पाठवले,पण शाल्वाने तिचे पाणिगरहण केले नाही. शाल्वाने तिचे पाणिगरहण करावे यासाठी तुम्हीही कोणता प्रयत्न केला नाही. उलट तुम्ही आपले गुरू परशुरामांशी युद्धाचा पवित्रा घेतलात. म्हणजे तुम्ही गुरूची आज्ञाही पाळली नाहीत. ंबेला शेवटी अग्निकाष्ठे भक्षण करावी लागली. "हे नीतिशास्त्रविदा, तुमच्या ज्ञानाबद्दल आणि पराकरमाबद्दल आकाशातील देवताही गुणगान गातात. परंतु आपल्या भरात्यासाठी धर्माज्ञा अव्हेरून कन्यांचे अपहरण करणे धर्मसंगत होते काय या प्रश्नाचा विचार तुमच्या मनी कधी आला नाही. तुम्ही धर्मज्ञ आहात आणि सारे विश्व तुमच्या धार्मिक आचरणाची प्रशंसा करते. तुमचे अनुकरण करते. एक आजन्म बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा तुमच्या किती धार्मिक निर्णयांच्या आड आली आहे, याचाही विचार, हे नरवृषभा, तुम्ही करायला हवा होतात. " आणि ही प्रतिज्ञा आपण का केली होती बरे? असे काय घडले होते की ज्यामुळे तुम्हाला एवढी कठोर प्रतिज्ञा करावी लागली? कारण तुम्ही विवाह केल्याने पुत्रोत्पत्ती झाली तर तुम्ही ज्येष्ठ राजपुत्र असल्याने तुमच्या संततीस राज्याधिकार मिळेल अशी आशंका धीवरकन्या सत्यवतीस होती. सत्यवतीस ते भय वाटू नये म्हणून तुम्ही बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा केली आणि "भीष्म' हे नामाभिधान प्राप्त केले आणि ज्या राज्याच्या अखंड अस्तित्वासाठी आपण ही प्रतिज्ञा केली त्याच राज्याचे कौरव आणि पांडवांत विभानि व्हावे असा अधार्मिक सल्ला आपण धृतराष्ट्रास का दिलात? जर धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ असल्याने त्याचाच राज्यावर अधिकार आहे, असे आपणास वाटत होते व ते सिद्धही होते तर सर्वच राज्य, युधिष्ठिरास राज्याभिषेक करून, त्याच्या स्वाधीन करावे असा निर्णय आपण का दिला नाही? की राज्याचे खरे वारस कोण यासंबंधी तुमच्या मनात संभरम होता? "हे उदारहृदया, सत्य आणि असत्य अशा दोनच बाजू सत्य असतात. अर्धे असत्य आणि अर्धे सत्य मिळून ना असत्य बनते ना सत्य बनते. "हे धर्मश्रेष्ठा एकतर पांडवांचा या राज्यावर अधिकार आहे किंवा फक्त कौरवांचा आहे. अर्धा पांडवांचाही अधिकार आहे आणि अर्धा कौरवांचाही अधिकार आहे म्हणून राज्याचे विभानि करा ही कोणती राजनीती? याचे उत्तर गतकालाचे परिशीलन करूनही मला काही केल्या मिळत नाही. तुम्ही ज्येष्ठ कौरव आहात आणि कितीही त्याग केला असला तरीही त्याच राज्याच्या हिताची बाबिदारीही तुम्हीच घेतली आहे आणि म्हणूनच संन्यास न घेता तुम्ही कर्मशील आहात. तुमच्या पराकरमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हीच पुरुष अर्थाचे दास असतात असे तुम्हालाच न शोभणारे उद्गार कसे काढता? "कारण हे ज्ञानवंता, पुरुष अर्थाचा नव्हे तर धर्माचा दास असतो आणि धर्म सूक्ष्म आहे. अतींद्रिय आहे. त्याचे अस्तित्व अर्थाएवढे स्पष्ट आणि ढोबळ नाही. अर्थ हा धर्माचा भाग आहे. धर्म हा अर्थाचा भाग नाही, हे सर्वविदित आहे. अर्थ शोक देतो तर धर्म स्वानंद देतो, कारण धर्म काळ घडवतो. अर्थ काळ घडवत नाही. हे पुरुषश्रेष्ठा, मनुष्य जन्माने, कर्माने आणि मृत्यूने धर्माचा दास असतो, कारण हाच धर्म मनुष्याच्या मोक्षाचे कारण बनतो. ज्याचे जीवन अर्थाच्या दास्यत्वात आहे त्याला निर्णयस्वातंत्र्य नाही की मोक्षही नाही. "तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, खरे तर ज्येष्ठ कुरू या नात्याने तुम्ही आजच्या या समरप्रसंगास जबाबदार आहात आणि ही बाबिदारी आल्यानंतरही "मी अमुक एक कृत्य करीन, तमूक करणार नाही.' अशी निर्णायकता दाखवण्याचेही साहस करत आहात. आणि शिखंडीच्या हस्ते तुमचा मृत्यू व्हावा ही नियती सत्य व्हावी, यासाठी एवढा निसंहार तरी का? जर ती नियती आहे, तर हे महायुद्ध न होताही सत्य होईल." श्रीकृष्णांचे भाषण ऐकून भीष्माचार्य सद्गदित झाले होते. त्यांच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता. जणू काही त्यांच्या छातीवर कोटयवधी नाराच बाणांचा वर्षाव झाला होता. ते म्हणाले, "हे परमेश्वरा, विगत कोणालाही शेवटपर्यंत सोडीत नाही. काल हा सर्वांना आपल्या मायावी पाशात घेऊन चाललेला असतो. मी अर्थाचा दास आहे की नाही याविषयी माझ्या मनात संभरम असला तरी मृत्यू माझ्या निकट आला आहे याचे ज्ञान मला झाले आहे आणि मृत्यू समरांगणावर आला तरच स्वर्गाची महाद्वारे माझ्यासाठी उघडतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंकानाही. "हे मधुसूदना, मी बरह्मचर्याची प्रतिज्ञा केली तेव्हा मी तरुण होतो आणि मला त्यावेळीस वाटले तेवढे काही माझे धर्मज्ञान नव्हते हे सत्य आहे. कारण धर्म कणाकणाने आपले शाश्वत स्वरूप मनुष्यास दाखवीत जातो. काही लोकांपेक्षा मी अधिक बुद्धिमान होतो आणि तातांची इच्छा पूर्ण करणे व त्यासाठी काय वाटेल ते बलिदान देणे हा मी माझा त्याक्षणीचा धर्म मानला. मी त्याक्षणी कळालेल्या धर्माप्रमाणे वागलो. परंतु माझे बलिदान पाहून ना तातमहाराजांनी द्रवून सत्यवतीमातेचा त्याग केला ना सत्यवतीमातेने मला या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी स्वत: काही त्याग केला. कारण तिच्या दृष्टीने राज्यभोग महत्त्वाचे होते. तिची आणि तिच्या होणार्‍या पुत्रांची सुरक्षितता महत्त्वाची होती. हे दयाघना, मी विजात्रवीर्यासाठी कन्या आणल्या कारण ती माझ्याच मातेची आज्ञा होती. अन्यथा विजात्रवीर्य स्वयंवरात उभा राहता तर त्याच्या गळ्यात शूद्र स्त्रीसुद्धा वरमाला घालती ना! पण कुरुवंश चालायला तर हवा होता. विजात्रवीर्याचा विवाह आवश्यक तर होता. त्याचसाठी तर मी स्वयंवरात गेलो. विजात्रवीर्यासाठी तीन कन्या तर घेऊन आलो, पण हे पुरुषोत्तमा, ंबेने जेव्हा शाल्वाविषयीची तिची भावना प्रकट केली तेव्हा मीच तर तिला कुरुकुलाच्या बंधनातून मुत केले! "मी.... तिचा स्वीकार कसा करू शकत होतो? मी तिला माझ्यासाठी नव्हते हरण करून आणलेले. मी शाश्वत निर्विकार होतो. ंबाच काय, या विश्वातील कोणतीही रमणी माझ्या हृदयावर अधिराज्य करू शकत नव्हती. माझी प्रतिज्ञा हीच माझी प्रिय पत्नी होती. " आणि गुरू परशुरामांची आज्ञा तरी मी का ऐकावी? शाल्वाने तिचा पुन्हा स्वीकार केला नाही यात माझा कायष होता? ती अभुता होती. मनाने वरलेल्या पतीशी प्रामाणिक होती. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही, मग परशुरामांनी मलाच तिचा स्वीकार करण्याची आज्ञा का करावी? ती आज्ञा त्यांनी शाल्वाला का केली नाही. ंबेचे माझ्यावर प्रेम असते आणि तिने मलाच पती म्हणून वरले असते आणि माझी प्रतिज्ञा तळपत्या सूर्याएवढी सत्य असतानाही गुरूंनी आज्ञा केली असती तर कदाजात मी माझी प्रतिज्ञा विसरूनही गेलो असतो. "पण ंबेला माझा सूड हवा होता. तिला शाल्व हवा होता. पण शाल्वाने तिला अव्हेरले. तिला मी नकोच होतो आणि गुरूंची आज्ञा मानून मी तिला आपली अर्धांगी बनवली असती तरी ती माझी नाही हे वास्तव काय मला विसरता आले असते? "नाही, वृष्णिकुलवंतस, नाही. पण अजाणतेपणे का होईना मी ंबेचा वध करणारा बनलो. तिला शाल्व मिळाला नाही. तिला विजात्रवीर्य नको होता आणि मी गुरूंची आज्ञा जाणतेपणे अव्हेरली. "सारीच पातके मनुष्याच्याच स्वेच्छेने होत नाहीत. हे यादवा, अगदी धर्मानेच वागत असतानाही मनुष्याच्या हातून पातके होतात. धर्म अतिसूक्ष्म आहे, असे ज्ञानीनि म्हणतात ते याचमुळे. कारण काळ हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आज जी गोष्ट धर्मनियत वाटते ती उद्या तशी असेलच याची खात्री कोण देणार? आज जे कर्म शुभ वाटते ते उद्या अशुभ ठरणार नाही याचा कोणाला विश्वास आहे? त्यामुळे मी गतकाळात केलेली कर्मे शुभ होती की अशुभ हे आजच्या काळासंदर्भात ठरण्यात काय अर्थ आहे? परंतु हे धर्मश्रेष्ठा, तू म्हणालास त्याप्रमाणे कर्मे शुभ ठरोत की अशुभ, मनुष्य आपल्या कर्मांनीच नियती घडवीत असतो आणि मी ंबेचा वधकर्ता ठरल्याने तिच्या हातून माझा या जन्मी का होईना वध व्हावा ही माझी नियती आहे आणि ही नियती मी स्वत:च घडवली आहे. "हे सव्यसाची, सर्व भूते आपल्या ठायी आणि आपण सर्व भूतांठायी असतो हा बरह्मभाव तर तू जाणतोसच आणि हे जाणूनही संपूर्ण बरह्माचे ज्ञान मानवास कधीच होत नाही. कारण मनुष्यास जोवर तो स्वत:च अज्ञात आहे तोवर त्याला इतर चराचर कसे ज्ञात होणार आहे? माझी पांडवांवर प्रीती आहे हे सत्य आहे. राज्याधिकार त्यांनाच मिळायला हवा असे मला वाटते तेही सत्य आहे. राज्य ही कोणाची व्यतिगत मालमत्ता नसून जो प्रजेचे धर्माने प्रतिपालन करू शकतो त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे असेच शास्त्रे सांगत नाहीत का? जन्माने नियुत झालेला राजा दुष्ट असेल तर प्रजेने खुशाल त्याला हटवून योग्य व्यतीस राजा म्हणून नेमावे असे शास्त्र सांगत नाही काय? मग दुर्योधनाचा पराजय व्हावा आणि पांडवांना यशश्री मिळून त्यांना हे कुरूंचे पवित्र राज्य मिळावे असे मला वाटणे स्वाभाविकच आहे. त्यासाठीच मी युद्धात पांडवांना वधणार नाही असा निर्णय घेतला आहे आणि मला तो योग्य वाटतो. "तरीही हे करुणाघना, मला तुझ्याही वर्तनाचे नवल वाटते आहे. तू सुद्धा आयुष्यभर पांडवांना साह्य केले आहेस. पांडवांविषयी तुला प्रीती आहे, हे सारे आर्यावर्त जाणते. तू आणि अर्जुनाची जोडी म्हणजे नर-नारायणाची जोडी आणि तू त्याचा त्याग करून दुष्टांशी गाठ बांधलीस हे काही केल्या माझ्या मनाला पटत नाही." एवढे बोलून भीष्माचार्य दीर्घ सुस्कारे सोडीत अर्धोन्मीलित नेत्रांनी स्वस्थ बसले. गोपालाने आपल्या स्निग्ध दृष्टीने थकलेल्या भीष्माचार्यांचे अवलोकन केले आणि म्हणाला, "भावना जेव्हा मनुष्याच्या विवेकावर अधिष्ठान गावू लागिते तेव्हा प्रत्येक मनुष्य धर्माचाच आधार घेत आपल्या चुकीचे समर्थन करू लागतो हे अजरा मर शास्त्र आहे, सत्य आहे! तुम्ही आता वृद्ध झाला आहात आणि विवेकाची जागा भावनांनी घेतली आहे. भावनांच्या आवेगात घेतला जाणारा निर्णय कितीही धर्मसंगत वाटला तरी तो अधर्मीच मानला जायला हवा, असे माझे नित्य सांगणे आहे. "कारण विवेक शाश्वत आहे तर भावना क्षणिक आहेत. विवेक मनुष्यास परमात्मतत्त्वाच्या निकट नेतो तर भावना मनुष्यास त्याच्या कर्मात कायमच्या खिडून टाकतात. तुमचे पांडवांवर प्रेम आहे व त्यासाठीच राज्यावर त्यांचा अधिकार आहे असे तुमचे कथन आहे. आणि तरीही तुम्ही द्रोण, विदुरादि धर्मश्रेष्ठ पांडवांचे हितचिंतक असूनही आजवर राज्याधिकार धृतराष्ट्राकडून काढून पांडवांच्या हाती देण्यात असमर्थ ठरला आहात. जे खांडव प्रस्थाचे राज्य पांडवांना मिळाले तेच राज्य, खरे असो की खोटे, पण जुगारात हरून आपले स्वातंत्र्यही पांडवांनी गमावले याकडे कोणीही धर्मज्ञ डोळसपणे पाहात नाही ही विसंगती नाही काय? आणि प्रत्येक वेळी युद्धाचा विकल्प उपलब्ध असूनही पांडवांनी युद्धाचा ंगीकार केला नाही कारण त्यांना भावंडांशी युद्ध नको होते, हा सत्याचा अपमान नाही काय? अन्यथा आज तरी पांडव युद्धाच्या तयारीत का आलेअसते? "हे तुम्हासही माहीत आहे कुरुकुलभूषणा, की या क्षणी या राज्याचे अधिपती महाराज धृतराष्ट्र आहेत, दुर्योधनादी कौरव नव्हेत. युधिष्ठिरास तरी राजा होण्याचे समाधान मिळाले, दुर्योधनास यौवराज्याभिषेकही कधी झाला नाही हे वास्तव तरी आहे की नाही? म्हणजे फक्त दुर्योधनास राज्यलोभ आहे हे विधान करण्यासाठी कोणता सबळ पुरावा आपल्याकडे आहे? दुसरे असे की, दुर्योधन दुष्ट आहे, हे विधान करताना प्रजेवर अत्याचार करण्यासाठी त्याच्याकडे काही राज्याधिकार तरी हवेत की नकोत? खरे तर पांडवांचे आव्हान दुर्योधनास नसून महा राज धृतराष्ट्रांना आहे, असाच या घटनांचा अर्थ होत नाही काय? कारण दुर्योधन ना राजा आहे ना युवराज आहे. तो धृतराष्ट्राचा पुत्र आहे, एवढीच काय ती वस्तुस्थिती. "पण हे महाबाहो, या धरत्रीचे समराट धृतराष्ट्र आहेत. ते ंध आहेत आणि ते पुत्रप्रेमाने गरस्त आहेत. त्यामुळेच तर या युद्धास त्यांनी संमती दिली आहे. पण दुर्योधनावर आगपाखड करीत असताना आपण धृतराष्ट्रांना का बरे सोडतो आहोत? कारण ते ंध आहेत आणि ंधास राज्य करण्याचा अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे आणि म्हणूनच धृतराष्ट्र ज्येष्ठ असतानाही ते ंध आहेत म्हणून पांडूस राज्याधिकार दिला गेला. तो कनिष्ठ असतानाही. "मग ज्येष्ठ धृतराष्ट्राला पांडूच्या निधनानंतर राज्याधिकार न देता,ज्याप्रमाणे इतिहासात घडले आहे की विजात्रवीर्य जात्रांगदाच्या मृत्यूनंतर लहान असल्याने तुम्ही स्वत:च माता सत्यवतीच्या आदेशाने कारभार चालवायला सुरुवात केली तशी पांडूच्या मृत्यूनंतर त्याचे ज्येष्ठ पुत्र हस्तिनापुरी आल्यानंतर,तुम्ही किंवा अन्य कोणी युधिष्ठिरास राजा बनवून तो मोठा होईपर्यंत राज्यकारभार का हाकला नाही? धृतराष्ट्रास तो ंध आहे म्हणून पुन्हा पदच्युत करणे तुम्हाला सहशिय होते. कारण एकदा ज्या नियमाने एखाद्याला अपात्र ठरवले त्यालाच दुसर्‍या नियमाने जर पात्र ठरवता येते तर त्यालाच मूळ नियमाने पुन्हा अपात्र ठरवणे तुम्हाला कोठे अशक्य होते? " आणि तरीही जर पांडवांचाच राज्यावर खरा अधिकार आहे या धर्मवंतां-वर तुमचा विश्वास होता आणि आजही आहे, तर कौरवांचे, धृतराष्ट्राचे तुम्ही मीठ खाल्ले नाही हे उघड आहे. जर तुम्ही अर्थाचे दास असाल तर पांडूच्या अर्थाचे दास आहात आणि म्हणूनच पांडवांना युद्धात जिंकण्याचा मार्ग सहसाध्यि करण्यासाठीच तुम्ही कौरवांची बाजू सोडायला तयार नाही आहात. "हे कुरुकुलश्रेष्ठा, तुमचे हे वर्तन अधर्माचे आहे. शास्त्राने सांगितले आहे की, आपल्या विवेकबुद्धीस जी गोष्ट श्रेष्ठ वाटते ती प्राप्त करण्यासाठी धर्मसंगत मार्गाने प्रयत्न करायला हवा. तुम्ही कौरवांच्या बाजूने युद्ध करून एकाही पांडवास न वधता त्यांची दशसहस्र सेना वधेन अशी अट घालून सेनापतिपदाची वस्त्रे नेसण्यापेक्षा, पांडवांच्या पक्षास मिळून, त्यांच्या बाजूने युद्ध करून, प्रसंगी धार्तराष्ट्रांना वधूनही तुमचा धर्म जास्त उज्ज्वल-धवल व सयुतिक होईल. कारण तुम्ही तुमच्या विवेकाने वागला असाल! परंतु ज्याच्यावर विश्वास नाही अशा पक्षाचे सेनापत्य स्वीकारणे हे निश्चयाने अधर्माचे होईल. " आणि हे उदारहृदया, हे लक्षात घ्या की या युद्धात जर तुमचा मृत्यू यावा असे तुम्हाला वाटत असेल तर ते जे तुमच्यावर प्रीती करतात असे तुम्हाला वाटते त्यांचे हित करीत असताना जर असा मृत्यू आला तर, तुम्ही इच्छामरणी असलात आणि स्वर्गाचे द्वार उघडेपर्यंत जरी आपले प्राण स्तंभन करून थांबलात, तरीही स्वर्गाची द्वारे निमिषार्धात बंद होतील. तुम्हाल अनंतकाळ आकरोश करीत त्या द्वाराबाहेर थांबावे लागेल हे निश्चित. "तेव्हा हे पुरुषश्रेष्ठा, अद्यापही वेळ गेली नाही. कौरव या युद्धात जिंकोत की पांडव, तुम्ही नि:संशयपणे ज्या पक्षास मिळायला हवे त्या पक्षास समर्पण हृदयाने मिळा. कारण हे आत्मस्वरूप बरह्म अविनाशी आहे. या अव्यय तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. हे श्रेष्ठपुरुषा, नित्य अविनाशी व अचिंत्य असा शरीराचा मालक, तो आत्मा, त्याला प्राप्त होणारे हे देह नाशवंत व अनित्य होत. सत्य हे आत्म्याएवढेच नित्य आणि सर्वव्यापक आहे. तुला जे सत्य पटले आहे, त्या सत्यासाठी तू यज्ञ कर. तुझा कोणी नाश करू शकत नाही, की ज्यांनी तुझा नाश करावा अशी तुझ्या कर्मांची नियती आहे, तेही तुझा नाश करू शकत नाहीत. "हे महाभागा, मनुष्य नेहमीच युद्धरत असतो आणि प्रत्येक युद्धरत जीव हा क्षत्रिय असतो. कारण आल्या प्रसंगी युद्ध करणे हे प्रत्येक जन्म घेणार्‍या जीवास करमप्राप्त असते. विजय-पराजय हे प्रत्येक क्षणाच्या युद्धाशी निगडित असतो आणि जो तटस्थ बुद्धीने या विजय-पराजयाकडे पाहतो त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार हे नेहमीच उघडे असते. "तेव्हा हे भरतवंशश्रेष्ठा, दु:खी होऊ नकोस, असे अश्रू वाहवू नकोस. मी कौरवांचा पक्ष घेतला आहे म्हणजे मी कौरवांचा असा भरम तू बाळगू नकोस. मी तटस्थ आहे. मी कोणाचाही नाही. मला कोणतीही कर्मे जाकटत नाहीत. मी याक्षणी कोणाच्याही बाजूने नाही. कारण जेव्हा मनुष्य बाजू घेतो तेव्हा त्या बाजूनेच घटनांकडे पाहातो. त्यातून शाश्वत सत्य हाती लागत नाही. तुम्हाला पांडवांबद्दल प्रीती आहे, तर त्या प्रीतीस्तव अवश्य तुम्ही पांडवांच्याच पक्षाला जाऊन मिळायला हवे आणि तेच शास्त्र सांगते." यावर वयोवृद्ध तापस भीष्माचार्य काहीहीलले नाहीत. ते मौन राहिले. अश्रू ढाळीत राहिले. श्रीकृष्णाने जीवनभर आपली साथ दिली, परंतु नेमक्या अटी-तटीच्या क्षणाला त्याने बाजू बदलल्याने भीम कृद्ध झाला असला तरी आपल्या नितांत पराक्रमावर त्याचा विश्वास होता. कृष्णाला भेटून आल्यापासून द्रौपदीही अस्वस्थ होती. युधिष्ठिराने तर या स्थितीत आपण युद्ध न करता पुन्हा वनवासात निघून जावे असे विधान करून भीमाच्या क्रोधात अधिकच भर पाडली होती. अर्जुनाचे श्रीकृष्णावर नितांत प्रेम होते. श्रीकृष्णाच्या ऐवजी त्याची सेना आपल्या वाटयाला यावी याच्या दु:खात तो मग्न होता. नकुल आणि सहदेवाची अवस्था निराळी नव्हती. शांत होती ती माता कुंती. कुंती आपल्या पुत्रांस भेटण्यासाठी शिबिरात आली तेव्हा द्रौपदी धर्मराज युधिष्ठिरासमवेत आणि अन्य पतींसमवेत एका आसनावर बसली होती. कुंतीस पाहताच उभयतांनी उठून धर्मनिष्ठ कुंतीस प्रणाम केला. पुत्रास अमरत्वाचा आशीर्वाद देऊन कुंती आसनावर बसली. मातेस खिन्न पाहून युधिष्ठिराने त्या खिन्न्तेचे कारण विचारले असता कुंती म्हणाली, "पुत्रा, तुम्हा पाचही मुलांसाठी माझा आत्मा किती तिळ-तिळ तुटत असतो याची तुला जाणीव आहे. या सामराज्याची खरी समराज्ञी मी. मीच खरे तर तुला सोबत घेऊन राज्यशकट हाकावा अशी खरी राजनीती, परंतु पाहा,दुर्भाग्याने असे काही दान पदरात टाकले आहे की तुम्हा भावंडांना आपल्याच अधिकारांसाठी प्राणांना पणावर लावावे लागत आहे. कृष्ण खरे तर माझा निकट संबंधी, परंतु आज तोही विरुद्ध पक्षास जाऊन मिळाला आहे. गांधारीपुत्राने त्याच्यावर अशी कोणती माजेहनी टाकिली की ज्या योगे अर्जुनरूपी नराचा स्नेही कृष्णरूपी नारायणाने त्याग करावा? "माझ्या धर्मनिष्ठ मुला, शेवटी मी आई आहे. माझा तुम्हा सर्वांच्या पराक्रमावर दृढ विश्वास आहे. देवेंद्र जरी युद्धास समोर ठाकला तरी त्याला पराजित करण्याचे सामर्थ्य तुम्हा पाच भावंडांत आहे. परंतु हे धार्तराष्ट्र महापातकी आणि दुष्ट आहेत. त्यांच्यासमोर युद्धात तुमचा निभाव कसा लागणार हे मला काही केल्या कळत नाही. त्याचमुळे मी खिन्न आहे. कृष्ण तुम्हासोबत असता तर त्या महाचतुर पुरुषाने अशक्यप्राय यशही तुम्हाला खेचून आणून दिले असते. "हे माझ्या धर्मनिष्ठ यमपुत्रा, तू म्हणजे धर्म. धर्माने तुझ्या रूपाने अवतार घेतला असावा असे तुझे आचरण पाहून वाटते. धर्म आणि अधर्मातील हे युद्ध आहे असे माझे मातृहृदय मला कळवळून सांगते आहे आणि या युद्धात तुझा जय होईल असाच माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु माझे मातृहृदय मात्र अनामिक आशंकेने व्याप्त झाले आहे. हे युद्ध करावे काय? की काही काळ वाट पाहून आपली स्थिती अधिक सक्षम झाल्यानंतर युद्ध करावे याबद्दल माझ्या मनात द्वंद्व आहे." "तू अगदी माझ्या मनातीलच बोललीस." युधिष्ठिर म्हणाला, ""माते, युद्ध हे एक अनिष्ट कर्म आहे असे माझे मन मला नेहमीच सांगत आले आहे. ज्या युद्धात अनंत जीवांचा संहार होऊन पृथ्वी रतात भिते ते युद्धि अमानवीच होय. कृष्ण हा स्वत: नारायणाचा अवतार आहे, असे मलाही वाटत होते. माझी त्यावर पराकोटीची श्रद्धा होती. पण त्याने अजाणतेपणे का होईना अधर्माची बाजू घेतली आहे. धार्तराष्ट्रांनी आजतागायत आमच्या नाशासाठी एवढी पातके केली आहेत की नरकातच त्यांना स्थान मिळेल असे मला नि:श्चयाने वाटते. परंतु हा युद्धाचा प्रसंग समोर येऊन ठाकला आहे. माझी इच्छा नसतानाही हा प्रसंग यावा हे खजातच दुर्दैव. परंतु माते, हे माझे अन्य बंधूही मला सहमत नाहीत. भीम तर नेहमीच युद्धज्वराने पछाडलेला असतो." भीमाने हे विधान ऐकताच विकट हास्य केले आणि म्हणाला, "सबलांनी सबल नीतीचा आणि दुर्बलांनी दुर्बल नीतीचा स्वीकार करावा हे अटळच आहे. समरप्रसंग समोर ठाकता युद्ध करणे ही सबळ नीती तर तेयुद्ध टाळून कर्मसंन्याशाच्या गप्पा माराव्यात ही दुर्बल नीती. हे माते, युधिष्ठिर हा क्षात्रवेषातील बराह्मण आहे असे मी जे सदैव सांगत आलो आहे ते त्याचमुळे. आपण राज्याधिपती व्हावे असे जर या माझ्या धर्मज्ञ ज्येष्ठ बंधूस वाटत नाही तर त्याने इंद्रप्रस्थीचा राजमुकुट तरी का परिधान केला होता म्हणतो मी? या राज्यावर आम्हा पांडवांचा अधिकार आहे आणि ज्यावर आपला अधिकार आहे, त्यावर कोणी उपटसुंभ स्वत:ची सत्ता चालवत असेल तर ते स्वस्थ संन्यासीमनाने पाहात राहणे हे भेकडपणाचे नाही तर मग अन्य कशाचे लक्षण आहे? "माते, युधिष्ठिर तेवढा धर्मज्ञ! मग आम्ही कोण आहोत? द्यूत टाळ असे यास वारंवार सांगूनही द्यूताचा हट्ट करणारा हा माझा ज्येष्ठ बंधू काय धार्तराष्ट्रांेवढाच दुष्ट नाही? द्रौपदी ही आम्हा पाचही बंधूंची पत्नी. तिला द्यूतात पणावर लावायचा स्वामित्व अधिकार कोणी या ज्येष्ठ बंधूस दिला होता? एकवस्त्रा असतानाही मानिनी याज्ञसेनीचा भीषण अपमान झाला. त्यांचा सूड घ्यायच्या गप्पा सोडून केवळ कृष्ण कौरवांच्या पक्षाला मिळाला म्हणून त्या आधी युद्धोत्सुक असलेला युधिष्ठिर आता संन्यासाच्या गप्पा मारू लागला आहे, हे अनिष्ट आहे. दुर्दैव आहे. "माते, पण हे युद्ध होणारच. आणि मी तुला खरे सांगतो, कोणत्याही युद्धात आपल्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही, आपली शती कमी आहे की अधिक, यास काही अर्थ नाही. माते, विजय फक्त मनात असतो आणि विजयाचा दृढ संकल्प असेल तर विपरीत स्थितीतही विजय मिळू शकतो. इतिहासातही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. " आणि मी म्हणतो, कोण हा श्रीकृष्ण, ज्याच्या सोबत असल्या-नसल्याने आम्हा पांडवांना फरक पडणार आहे? हे खरे की तो कालपर्यंत आम्हा पांडवांचा समर्थक होता. पण श्रीकृष्ण समर्थक होता म्हणून आम्ही यशस्वी झालो असे आजवर काय घडले आहे बरे? शेवटी त्याचाच कट्टर शत्रू, जो जरा संध, त्याचा काटा मीच काढला ना? श्रीकृष्णास ज्याने अनेक वेळा पराभूत केले त्याचा वध जर मला करावा लागला तर श्रीकृष्ण नारायणाचा अवतार असे आम्ही पांडव का म्हणतो बरे? "केवळ तो चतुर आहे म्हणून? शिशुपालाने श्रीकृष्णाच्या अगरपूजेस विरोध केला ते योग्यच होते असे मी म्हणेन. ज्याला कोणतीही नीती नाही, सोयीप्रमाणे पक्ष घेतो तो परमात्म्याचा अवतार होऊ शकणार नाही, हे तर शाश्वत सत्य आहे. "तेव्हा हे माते, तू संशयी होण्याचे काही कारण नाही. धर्मराजाचे मन नेहमीच अस्थिर असते आणि त्याला इतिहास साक्षी आहे. अधिक विचार करणार्‍या कोणत्याही पुरुषाला शेवटी कर्मनिश्चिती करता येत नाही, हे जेवढे शाश्वत सत्य आहे तेवढेच ते या माझ्या ज्येष्ठ बंधूस लागू पडते. "हे माते, या युद्धात आमचा विजय होणार याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही आणि हा केवळ अंध आत्मविश्वास नाही. त्यासाठी अर्जुन, नकुल-सहदेव आणि ज्येष्ठ बंधो, जरा थोडा कौरवांच्या बाजूचा विचार करा. "संख्येचा विचार केला तर आपल्या बाजूने आधी सात अक्षौहिणी सेना होती, तर आता श्रीकृष्णाची सेना येऊन मिळाल्याने आपली संख्या नऊ अक्षौहिणी एवढी झाली आहे आणि संख्येने जवळपास तेवढीच, म्हणजे नऊ अक्षौहिणी सेना कौरवांच्या बाजूने आहे म्हणजेच संख्येने दोघांचे बलाबल समान आहे. "आपल्याकडे द्रुपद, धृष्टद्युम्नासारखे महावीर आहेत. तसेच सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुराज, कुंतिभोज आणि शौढ्यासारखे महारथी आहेत. कौरवांचा विचार करता भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कृप, विकर्ण, अश्वत्थामा, भूपरश्रवा आदी महारथी आहेत. आपले सारे महारथी, हे मनोदुर्बल धर्मराजा, तुझ्यावर सर्वस्वी निष्ठा ठेवून आहेत. परंतु सुदैवाने कौरवांचे तसे नाही. "भीष्माचार्यांचेच म्हणशील तर त्यांनी आपणा सर्व भावांवरील प्रीतीमुळे युद्धात एकाही पांडवास वधणार नाही असा दृढनिश्चय केला आहे आणि भीष्माचार्य ही प्रतिज्ञा पाळणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र संशय नाही, कारण ते सत्यवचनी आहेत. खरे तर त्यांनी अशी काही प्रतिज्ञा केली नसती तर आपण या युद्धाचा विचार करण्यातही अर्थ नव्हता, कारण जेथे त्यांना परशुराम पराजित करू शकले नाहीत, त्या इच्छामरणी महापुरुषास कोण वधणार? हेही खरे की शिखंडी आपल्याच बाजूने आहे आणि शिखंडीवर शस्त्र चालवणार नाही अशीही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे; एरवी शिखंडी भीष्माचार्यांना ठार मारू शकणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण आता भीष्माचार्य पांडवांना वधणार नाहीत आणि ते शिखंडीवर शस्त्र चालवणार नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे भीष्माचार्यांच्या जविंत असेपर्यंत आम्ही सारेच पांडव सुरक्षित आहोत. "तेव्हा अधिकात अधिक दिवस त्यांनीच सेनापती म्हणून राहावे आणि त्या काळात कौरवांचे अधिकाधिक रथी-महारथी यांचे आपण उच्चाटन करावे असे मला वाटते आणि महाबाहू अर्जुनास ते अशक्य नाही. "द्रोणाचार्यांचेच म्हणशील माते, तर त्यांचेही आमच्यावर पुत्रवत प्रेम आहे. जेवढे त्यांचे प्रेम या सव्यसाचीवर आहे, तेवढे स्वत:चा पुत्र, जो अश्वत्थामा त्याच्यावरही नाही, त्यामुळे तेसुद्धा कोणाही पांडवांस वधणार नाहीत; पण ते तरीही आपल्या अनंत बाहूबलाने आमचा नाश करू शकतात हे वास्तव आहे, कारण ते अखेर आमचे गुरू आहेत आणि आम्हापेक्षा ते युद्धशास्त्रात अधिक प्रवीण आहेत हे तर सत्य आहे. परंतु हे माते, तरीही पांडवांची बाजू वरचढ आहे. कारण ज्या द्रुपदाने त्यांचा वारंवार अपमान केला आणि ज्याचा सूड या महागुरूने आमच्याच करवी उगविला तो द्रुपद आमच्याकडे आहे आणि त्याच द्रुपदाने याच द्रोणाचार्यांच्या नाशासाठी भयंकर यज्ञ रजाला. त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांची उत्पत्ती झाली. ज्या द्रोणाच्या नाशासाठी यज्ञ झाला, त्या यज्ञातून उत्पन्न झालेला धृष्टद्युम्न आमचा आहे आणि त्याच यज्ञातून उत्पन्न झालेली द्रौपदीही आम्हां बंधूची पत्नी आहे. तेव्हा या युद्धात द्रोणाचार्यांचा वध नियत नियतीमुळे महारथी धृष्टद्युम्न करणार हे सुद्धा निश्चित. " आणि माते, कृपाचार्यांची तर गोष्टच वेगळी आहे. ते आमचे सर्वप्रथम गुरू होते आणि ते अमर आहेत. त्यांना कोण वधू शकणार? कळीकाळातही ते सामर्थ्य नाही; पण ना ते आमचे द्वेष्टे आहेत ना मित्र आहेत. द्रोणाचार्यांच्या वधानंतर, द्रोणाचार्य त्यांचे मेहुणे असल्याने कदाजात ते काजेपष्ट होतील हे खरे; पण दुर्योधनाची त्यांच्यावरही प्रीत नाही. त्यामुळे मला कृपाचार्यांची काळजी करावी वाटली तरी ती एवढी गंभीर नाही. "विकर्ण हा धार्तराष्ट्र महारथी खरा; पण खुद्द कौरवांत तो दुय्यम समजला जातो. त्यामुळे या महापुरुषाचा अहंकार अगदीच दुखावला गेला आहे आणि मी असे ऐकतो की तो दुर्योधनासही दुरुत्तरे करतो. हा महारथी विकर्ण दुर्योधनाच्या विजयौवजी पराजयासाठीच अधिक प्रयत्न करेल असा माझा दृढ विश्वास आहे आणि तेही आमच्याच फायद्याचे आहे. "अश्वत्थामा मात्र सर्वांत अधिक घातकी आहे. तो अखेर द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि कर्णाप्रमाणे किंवा अन्य कोणाही कुरू महायोद्धयांप्रमाणे शापित नाही. मी असे ऐकतो की तो दुर्योधनावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याच्याच यशासाठी झटतो. परंतु खुद्द त्याचा पिता त्याच्यावर प्रेम करीत नाही. अश्वत्थामा शीघरकोपी आणि अविचारी आहे, असे सारे म्हणतात. त्यामुळे आपण त्याच्याबद्दलच फक्त सावध राहिले पाहिजे. "फक्त कर्ण तेवढा महत्त्वाचा कारण तो आम्हा पांडवांचा पुरेपूर द्वेष करतो. तो शापित आहे हे खरे. पर तरीही त्याला आपण गांभीर्याने घ्यायला हवे. भीष्माचार्यांनी त्याला अर्धरथी म्हटल्याने आपला तात्पुरता फायदा झाला असला तरी तो कायम टिकणार नाही. अर्जुनास तर तो वधण्यास आतुर झाला आहे. सर्व शस्त्रे आणि अस्त्रांचे ज्ञान असणारा आणि पांडवांच्या नाशासाठी टपलेला तोच एक महाधनुर्धर कौरवांच्या बाजूने आहे आणि मला फक्त त्याचीच काळजी वाटते. परंतु जर भीष्माचार्य अधिक काळ जविंत राहून सेनापती राहिले तर तोवर कर्ण हाती शस्त्र घेणार नाही, ही आपल्याच लाभाची गोष्ट आहे. " आणि कर्णाच्या काही अहंगंडाच्या समस्या आहेत. तो क्षत्रिय नाही. सामान्य सूतपुत्र आहे. द्रोणाचार्यांनीही त्याला अव्हेरले आणि महागुरू परशुरामांनी तर त्यास शापिले आहे. कर्ण अर्जुनासही जड जाईल हे खरे. कदाजात दोघांचे युद्ध या दोघांसाठीही अखेरचे असेल. परंतु कर्ण शापित आहे आणि जरी त्याच्या निष्ठा सर्वस्वाने दुर्योधनाच्या चरणी असल्या तरीही कदाजात आपण त्यालाही दूर करू शकतो. तेव्हा कर्ण आणि अश्वत्थाम्याचीच आपण काळजी करायला हवी. "स्वत: दुर्योधन रणात महापराक्रमी आहे, हे कालत्रयी सत्य आहे; पण तो गदाधर आणि मीही गदाधर. जे काही अंती होईल ते त्याच्यात आणि माझ्यात आणि त्याची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा मी केली आहेच, त्याने नाही. मी अवश्य दुर्योधनाची मांडी फोडेन... कारण त्याच मांडीवर थाप मारून त्याने माझ्या लाडया पत्नीस,... द्रौपदीस दुष्ट खुणा केल्या होत्या! युद्धात हे पातक आहे हे खरे; पण मी माझी प्रतिज्ञा नक्की पार पाडणार हेच अटळ विधिलिखित आहे आणि त्या योगेच माझा विजयही सुकर होणार आहे. " आणि हे माते, मी जे सांगितले त्यावरून एक गोष्ट ध्यानी घे. आमच्या बाजूचे वीर अभंग आहेत. त्यांच्या या माझ्या ज्येष्ठ भरात्यावरील निष्ठा अटळ आहेत आणि ते किंचितही शापित नाहीत. माझ्याकडे असा एकही वीर नाही ज्याने "एकाही कौरवाला ठार मारणार नाही.' अशी प्रतिज्ञा केली असेल! "दुर्योधनाचा पक्ष दुभंगलेला आहे. खुद्द त्याच्या पित्यास, महाराज धृतराष्ट्रास, या युद्धाबद्दल ममत्व नाही. त्याचे मनही दुंभगलेले आहे आणि हे प्रिय ज्येष्ठ भरात्या, ज्यांचे नेते दुंभगलेले असतात अशा नेत्यांच्या प्रजेस कधीही यश मिळत नाही, हे समजावून घे. आपल्याला, कृष्ण आपल्या बाजूने नसतानाही, जय मिळणार हे निश्चित आहे. कारण आपल्या बाजूने कोणीही दुभंग मनाचा नाही, "फक्त तू सोडून. " आणि हे ज्येष्ठ पांडवा, मन स्थिर ठेव, संतुलित ठेव. कारण पुन्हा लक्षात घे, विजय मनात असतो. रणभूमीवर नसतो. युद्धात मृत्यू पावूनही अजरा मर झालेले कितीतरी योद्धे आहेत; पण त्या वीरांच्या मृत्यूने राजास यश दिले आहे. तू आमचा ज्येष्ठ भराता या नात्याने आमचा राजा आहेस आणि हे पृथ्वीपालका, या रणात तुला किंचितही क्षती होणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. "हे माते, कृष्णास विस्मरूयात आपण, कारण तो हाती शस्त्र घेणार नाही. तो बोलतो खूप चतुर आणि कधी असेही वाटते की त्याच्या ओठांवर देवी सरस्वतीचे अधिष्ठान आहे. होताही तो आमचा सखा कधीतरी, परंतु शत्रूचे मित्रत्व होणे आणि मित्रांशीही शत्रुत्व होणे ही निरीत आहे. अन्यथा ज्या द्रुपदास बांधून अर्जुनाने गुरू द्रोणांसमोर उपस्थित केले, तोच द्रुपद आज आपल्या पुत्रांसह आमच्याबरोबर या संगरात सारी सेना घेऊन का आला असता? "का द्रौपदी आमची भार्या झाली असती? "नियती आमच्या बाजूने आहे. कौरवांच्या नव्हे आणि म्हणूनच हे युद्ध केलेच पाहिजे. आपला जय निश्चित आहे." यावर पंडुपत्नी कुंतीने समाधान व्यत करीत धर्मराज युधिष्ठिराकडे पाहिले आणि म्हणाली... "तुम्हाला कर्णाचेही भय बाळगण्याचे कारण नाही." द्रौपदीने चमकून माता कुंतीकडे पाहिले. "मला तसे तातांनी सांगितले होते. या जगात हा पण पूर्ण करू शकतील असे दोनच पुरुष आहेत. पण या दोहोंत एक मला योग्य नाही. तो खालच्या जातीचा आहे. तुला त्याला नाकारावे लागेल असे तात म्हणाले. मी तातांची आज्ञा अव्हेरू शकत नव्हते. त्यांची शी इच्छा होती तिसेच मी वागले." कृष्णाच्या मुखावर पुन्हा स्मित उमलले. "म्हणजे, तुला अर्जुनाशी का विवाह करायचा आहे हे सांगण्यात आले नव्हते." "नाही पुरुषोत्तमा, एक पुरुष कर्ण आहे हे सांगण्यात आले होते, परंतु दुसरा कोण आहे याची मला मुळीच माहिती नव्हती. हे दयाघना, तुम्हीही स्वयंवरास उपस्थित होतात. अर्जुन बराह्मणवेषात होता. त्याची वस्त्रे मलिन होती आणि तो अतिसामान्य दिसत होता. परंतु मला माझ्या तातांनी शी आज्ञा |इ|दिली होती त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात वरमाला घालण्याखेरी मिला गत्यंतरच नव्हते. मी आज्ञाधारक कन्येप्रमाणे वागले. मी माझा धर्म पाळला." "परंतु द्रौपदी जेव्हा तुला पाच बंधूंशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" "मला काय वाटले ते मला कोणी विचारलेच नाही कृष्णा. धृष्टद्युम्न अशा विवाहाच्या विरोधात होता. तात गोंधळून गेले होते. पण व्यासांनी या विवाहाचे समर्थन केले. असा विवाह धर्मसंगत आहे असे सांगितले. मला धर्मज्ञांच्या इच्छा डावलता येणे कसे शक्य होते?" कृष्ण आसनावरून उठून उभा राहिला आणि द्रौपदीजवळ आला. तिचा चेहेरा वर उचलला आणि तिच्या कमलनयनांत दाटून आलेले अश्रू उत्तपरयानेटिपले. "हे सखे, तुझी वेदना मला समजली." " आणि तरीही कृष्णा तू दुर्योधनाची बाजू घेत आहेस! तू माझ्या अपमानांचा मुळीच विचार करीत नाहीस. तू एवढा निष्ठूर का झाला आहेस?" कृष्णाच्या चेहर्‍यावर गांभीर्य व्याप्त झाले. तो म्हणाला, "द्रौपदी, व्यासांनी तुझ्यावर अन्याय केला. पांडवांनी तुझ्यावर अन्याय केला. जो धर्म तुला सांगण्यात आला तो कोठला धर्म? जर युधिष्ठिरासारखा धर्मज्ञ स्वत:च "मातेची आज्ञा' प्रमाण मानून तुझ्याशी विवाहाची इच्छा प्रदर्शित करतो तर त्याच युधिष्ठिराने पतिधर्म विसरून तुला पणावर कसे लावले? नाही सुभगे, धर्म असा नव्हे. जो धर्म व्यक्तीच्या इच्छेचा आणि भावनांचा आदर करीत नाही तो धर्म नव्हे." द्रौपदीने कृष्णाकडे विस्मित मुद्रेने पाहिले. "म्हणजे कृष्णा..., हा विवाह धर्मसंगत नाही?" "नाही द्रौपदी. हा विवाह धर्मसंगत नाही." मग काही वेळ शांत राहिल्यावर कृष्णाने विचारले, ""द्रौपदी, ज्या कर्णाने आधी पण जिंकला, तो तुझा खरा पती असताना त्याला अवमानित करण्यास तुला सांगण्यात आले. तो कर्ण कोण आहे हे तुला माहीत आहे?" द्रौपदीच्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नजान्ह होते. "कर्ण हा पहिला पांडव आहे सुभगे. तो कुंतीचा प्रथम पुत्र आहे." "नाही कृष्णा..." द्रौपदी गोंधळून गेली होती. "होय द्रौपदी... कर्ण हा कुंतीपुत्र आहे, सूतपुत्र नव्हे. आणि द्रौपदी, जरी कर्ण सूतपुत्र असता तरी धर्माप्रमाणे तुला त्याचाच पती म्हणून स्वीकार करावा लागला असता. कारण स्वयंवराचा पण घाजेषत करताना हे स्वयंवर फक्त क्षत्रियांसाठीच आहे असे सांगण्यात आले नव्हते. अर्जुन तर बराह्मण म्हणून या स्वयंवरात सामील झाला होता." "म्हणजे माझा फक्त वापरच करण्यात आला तर!" द्रौपदी क्षणार्धात सारे काही समजून उद्गारली. ""अरे कृष्णा, पण तूही याबद्दल मला काहीच का म्हणाला नाहीस? जर पांडव एवढे अनीतिमान होते तर तू तरी का त्यांची बाजू घेतलीस? का त्यांची बाजू घेऊन कुरु-सभेत संधीचा प्रस्ताव घेऊन गेलास? का कृष्णा तू हा अन्याय उघडया डोळ्यांनी पाहिलास?" कृष्णाने द्रौपदीचे आकरंदन सहानुभूतीने ऐकून घेतले. "द्रौपदी तुझा जन्म यज्ञातून झाला. ज्या यज्ञातून तुझा जन्म झाला तो यज्ञच मुळात द्रोणाचार्यांच्या वधासाठी योग्य पुत्रास जन्म देण्यासाठी झाला होता. त्या यज्ञातून तुझाही जन्म झाला. अगदीच अनपजेक्षतपणे पण द्रुपदाने तुझाही स्वीकार केला, कारण त्याला तूही एखाद्या दिव्य शस्त्रासारखीच प्राप्त झाली होतीस. हे मंगले, द्रुपदाने तुझा विवाह अर्जुनाशी व्हावा असा निश्चय केला कारण पांडव आणि कौरवांतील हाडवैर एकदिवस युद्धातलणार याची त्याला खात्री होती. जर तुझा विवाह कर्णाशी होता तर एकटा द्रुपद कौरवांशी लढून द्रोणाचार्यास कसा वधू शकला असता? त्यामुळे तुझा विवाह एखाद्या पांडवाशी होणेच आवश्यक होते. द्रुपदाला बळ हवे होते आणि ते बळ फक्त पांडव देऊ शकत होते. त्यात तुझा विवाह पाचही भावांशी झाला तर ऊनिच उत्तम! त्यामुळे द्रुपदाने त्यासही, या अनैतिक कर्मासही, विरोध केला नाही. "कारण हे द्रौपदी, मुळात तू त्याच्या रक्ताची कन्या नव्हतीस. "आपल्या रक्ताच्या कन्येला वेश्यावृत्ती करायला कोण भाग पाडेल? तू त्यांच्या रक्ताची नव्हतीस. हे सखे, म्हणून त्यांनी तुझा विवाह पाच बंधूंशी लावला. आणि स्वत:स धर्मज्ञ म्हणवणारा युधिष्ठिरही तुझ्या मोहात गुरफटल्यामुळे त्यानेही हा अन्याय होऊ दिला. " आणि हे सखे, मला तुझा विवाह पाच बंधूंशी झाला आहे हे वृत्त मिळाले तेव्हा मी द्वारकेस होतो. "स्वयंवरानंतर मी लगोलग परतलो होतो. तू कोणा पुरुषोत्तमास वरलेस हे जाणण्याची मला तिळमात्र इच्छा नव्हती. मी तेथे आलो होतो तो एक निमंत्रित म्हणून! मला सत्य घटना कळली तोवर तुझा पाचही बंधूंशी विवाह झालेला होता. "हे याज्ञसेनी..द्रुपद हाच खरा बुद्धिमान मनुष्य. मनुष्यस्वभावाचे ज्ञान त्याच्याएवढे कोणास असेल? ज्याने द्रोणासारख्या विद्वान बराह्मण मित्रास बालपणी दिलेले वचन टाळले. त्याला ओळखसुद्धा दाखवण्याचे सौजन्य दाखवले नाही. बराह्मण द्रोणास त्याने क्षात्रधर्म स्वीकारण्यास भाग पाडले. एका शांत ज्योतीस दावानलात रूपांतपरत केले. पांडव-कौरव द्रोणाचे शिष्य बनले. पांडवांनी द्रुपदास केवळ द्रोणांची आज्ञा म्हणून पराजित केले. आणि द्रुपदाने या द्रोणाचा सूड घेण्यासाठी केवढा अघोरी यज्ञ आरंभावा? द्रौपदी, धृष्टद्युम्न तर जन्माला आलाच... पण त्या बरोबर तूही जन्माला आलीस. एखाद्या लवलवत्या तेजाळ शस्त्राच्या पात्यासारखी! "याज्ञसेनी, हे संुदरी, हे कमलनयने, तुझे अश्रू आवर. असा शोक तुला शोभत नाही. हे सागराएवढे अथांग हृदय असलेल्या सहृदये, सारे मानवी जीवनच दंभ आणि सूडाने व्यापलेले असेल तर तुझ्यासारख्या अयाजिन मानवी जीवाचे दुसरे काय होणार आहे बरे? "ज्यांनी इतिहास घडवला आहे असे वाटते त्या व्यक्ती अनेकदा क्षुद्र असतात. खरे इतिहास घडवणारे अज्ञातच राहतात. त्यांचे कर्तह्रित्व जगाला नेहमीच अज्ञात राहाते. द्रुपदाचे तसेच झाले आहे द्रौपदी. त्याचे कर्तह्रित्व अज्ञात राहिले आहे. तुझ्याही दृष्टीने, पांडवांच्या दृष्टीने आणि कौरवांच्या दृष्टीने. पांडव आणि कौरव परस्पर द्वेषाने ंधळे झाले आहेत. त्यांना हवे आहे विनाशक, एक सर्वसंहारक युद्ध. होईलही हे युद्ध; पण हे सुभगे, कोणास मिळणार आहे ंतिम विजय? कोण भोगणार आहे या पृथ्वीचे राज्य? धर्मराज की दुर्योधन? कोण?" कृष्ण या प्रश्नांवर शांत झाले. त्यांच्या कमलनयनांतच काय तेवढे तेजाळ प्रश्नजान्ह उरले. द्रौपदी अश्रुपात करत होती. जीवनातील नग्न सत्य जणू तिने प्रथमच पाहिले होते आणि त्या दर्शनाने ती भेदरून गेली होती. स्वत:चे ंत:करण उकलण्याची आवश्यकता तिला कधी भासलीच नव्हती. ती समराट द्रुपदाची कन्या होती. विश्वात सर्वात बलशाली असलेल्या पाच पुरुषांची ती पत्नी होती, कधीकाळी ती समराज्ञीही होती आणि ती पणावरही लावली गेली होती आणि अरण्यवासातील भयंकर वर्षेही तिने भोगली होती. एखाद्या क्षुद्र दासीप्रमाणे वर्षभर सैरंधरीची भूमिका निभावताना ती कामलोलुप कीचकाच्या जवळारी नरेने होरपळून गेली होती. आपण एखाद्या श्रेष्ठ पतिवरतेप्रमाणे आचरण करीत आहोत या ंध विश्वासाने ती आजवर जगत आली होती. पाचही पतींच्या भावनांची कदर करण्यात रात्रीची कृष्णस्वप्ने धवलतेत परिवर्तित करण्याचा कसोशीने यत्न केला होता. पाचही भावांतील सुप्त असूया आणि जवळाराची तीच एकमेव साक्षीदार होती. कारण ती पाचही भावांची शय्यासोबतीण होती! आणि तरीही ती श्रेष्ठ पतिवरता होती. कारण तिने या पाचही बंधूंना एकाच व्यक्तीत रूपांतपरत करून टाकले होते. एकच व्यक्ती नाही हररात्री वेगवेगळा पुरुष भासत? वेगवेगळे वर्तन करत? वेगवेगळ्या मागण्या करत? मग येथे ते पाच बंधू असले म्हणून काय झाले होते बरे? नियतीने तिला या विलक्षण कगारावर आणून ठेवले होते आणि तिने तिचे हे भाग्य स्वीकारले होते. तिचा चेहरा अविरत अश्रुपाताने भिऊनि गेला होता. तिने आपल्या वस्त्राच्या शेमल्याने स्वत:चा चेहरा पुसला. ंत:करणात जारवेदनेने दाटून आलेला हुंदका गिळण्याचा असमर्थ प्रयत्न करीत तिने कृष्णाकडे अनिवार आशेने पाहिले. जणू तिच्या सार्‍या समस्यांचा ंत करणारा देव-पुरुष तिच्यासमोर बसला होता आणि तो एका तेजाळ कटाक्षाने तिच्या अनंत समस्यांचा ंत करणार होता. कृष्णाला जणू तिचे हृद्गत कळले. अपार करुणेने त्या दयाघनाचे ंत:करण व्याकुळ झाले. तो आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या अपार अलिप्ततेस क्षणभर तिलांली देऊनि त्याने द्रौपदीस जवळ घेतले आणि घनकाळोखाच्या लाटांप्रमाणे हेलकावे घेणार्‍या केशकलापावरून हात फिरवत तो म्हणाला, "हे कृष्णे, हे सायंकाळची आभा शी, तिशी काया असलेल्या लाडया भगिनी, अशी व्यथित होऊ नकोस. या विश्वात पराकोटीचा अन्याय झाला अशी तू एकमेव स्त्री नाहीस. गोठलेले अनंत अश्रू आजही माझ्या काळजात एका कोपर्‍यात थिजलेले आहेत. अनंत वेडयापिशा वेदनांना मी अलिप्तपणे आपल्या ंगा-खांद्यावर वागवले आहे. हे लाडके, मुनष्यास जर कधी आपण मनुष्य असण्याचा अर्थ समजला असता तर कदाजात या वेदनांना कधीच विराम मिळाला असता. पण अद्यापही केवढा अज्ञात आहे हा गहन आणि तेवढाच सोपा अर्थ बरे? हे याज्ञसेनी, फक्त थोडी ऊनि साहसी हो. थोडे दूर कर गं भरमांचे पडदे आणि पाहा तू श्रेष्ठच आहेस. कारण तू पचवले आहेस मानवी दंभाचे विष. तू सहन केला आहेस पराकोटीचा अन्याय आणि प्रिय भगिनी, तू आहेस एखाद्या अनिवार जज्ञासेने जीविन जगणार्‍या तृणांकुराएवढीच जीवनोत्सुक!" कृष्णलायचा थांबला. त्याचा वीणोत्सुक स्वर तरीही जणू चराचराच्या कणाकणांत ओथंबून साचून राहिला आणि स्तब्धपणे वातावरणात स्पंदित होत राहिला. द्रौपदीने मूकपणे आपले अश्रू पुसले. स्वत:तल्या विकराल खाईत ती एवढी खोल उतरली होती की वर्तमानाचा क्षण गाठण्यासाठी तिला अलांघ्य कडा चढावा लागणार होता. कृष्ण समंसिपणे स्तब्ध उभा होता. वाट पाहात होता. द्रौपदी अधोवदनाने बसली होती. जीवन एवढे करूर असते हे तिला माहीतच नव्हते. पुरुषांच्या विश्वात तिने पुरुषांचे द्वेष-मत्सर आपल्या हृदयात रुविले होते, पण स्वत: स्त्री असली तरीही स्त्रीच्या दृष्टीने तिने कधी विगताकडे पाहिलेच नव्हते. परंतु आता व्हायचे ते होऊन गेले होते. तिने कृष्णाकडे मान वर करून पाहिले. भावनांच्या मायावी हातात शब्द येता येत नव्हते. पण धीर वाढला तशी ती म्हणाली, "हे करुणाकरा, जे घडले ते सत्य आहे. पण माझ्या जीवनाची ती एकच बाजू नव्हती. मी पतींशी नेहमीच प्रामाणिक राहिले. त्यांची सुख-दु:खे मी काळजाच्या कणगीघरात दडवून ठेवली आहेत. परंतु मी समराज्ञी होते. प्रजा माझी देवतेप्रमाणे पूजा बांधत होती. आणि माझी मानखंडना पापी दुर्योधनाने भरसभेत केली. हे देवा, जर तू धावला नसतास तर मला प्राणत्याग करावा लागला असता. अन्यायाने द्यूत खेळून आम्हांला वनवासात पाठवले त्या दुष्टांनी. आताचे होणारे युद्ध अपरिहार्य झाले ते केवळ दुर्योधनामुळेच. आमचा अधिकार आम्हास न देता आम्हांला लुबाडू पाहणार्‍या अधार्मिकांच्या संगतीत हे दयाघना, तू गेलासच कसा? "हे न्यायी परोपकारी कृष्णा, तू सुद्धा कुरुसभेत स्वत: संधि-प्रस्ताव घेऊन गेला होतास. हे युद्ध टळावे यासाठी तू स्वत:चीही मानखंडना सहन केलीस. त्या घमेंडी दुर्योधनाने तुलासुद्धा बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. पाच गावेच काय पण सुईच्या अगरावर बसेल एवढीही मीनि देणार नाही अशी दर्पोक्ती त्याने केली. आणि त्याचा तुला जरा देखील करोध येत नाही की अपमान वाटत नाही? खुशाल त्याच्या बाजूस जाऊन मिळाला आहेस? आमचा असा त्याग करताना तुला थोडेही वाईट वाटले नाही? "हे पुरुषोत्तमा, हे बघ, माझी व्यथा उकरून अखेर साध्य काय होणार आहे? आम्ही बेवारस झालो आहोत. आम्हांला तुझ्याखेरी कोणाचा आधारि नाही. आम्ही वारंवार अपमानित झालो आहोत. दु:ख आणि वेदनांच्या अपार राशी आम्ही पचवल्या आहेत ही वस्तुस्थिती तर बदलत नाही? हे दयाघना, किमान तू एक गोष्ट तर निश्चयाने करू शकतोस आणि ती म्हणजे आम्हांला आमचे राज्य मिळवून दे. आम्हांला युद्ध नको. नरसंहार नको. आता तू कौरवांच्या बाजूने आहेस आणि कौरव तुझे ऐकतील." कृष्ण मानवाच्या आवर्तनी स्वभावाकडे दिग्मूढ होऊन पाहात राहिला. पण क्षणभरातच, हेही एक अपजेक्षत आहे, ते लक्षात येऊन म्हणाला, "हे कृष्णे, युद्ध करणे वा टाळणे माझ्या हाती नाही. मी माझी संपूर्ण सेना पांडवांच्या हवाली केली आहे आणि मी कौरवांच्या हवाली आहे. मी स्वत: युद्धात भाग घेणार नाही हेही प्रसिद्धच आहे. कौरव आणि पांडव उभयता माझे नातेवाईक आहेत. मी कोणताही पक्षपात करू शकत नाही." "पण हे कृष्णा, न्यायाची बाजू घेणे यात कोणता पक्षपात आला?" "हे कृष्णे, मुळातच न्याय आणि अन्याय यातील सीमारेषा संदिग्ध आहे. मी पांडवाची बाजू संपूर्णपणे घेतली म्हणून पांडव न्यायी ठरत नाहीत. खरे तर न्यायाची बाजू कोणाचीही कधीही असू शकत नाही. हे सुभगे, ही पृथ्वी परमात्मतत्त्वाने ओथंबून ओसंडते आहे. या भूमीवर मानवापेक्षा प्राचीन आणि मानवापेक्षा संख्येने अधिक असणारे प्राणी जर मालकी सांगत नाहीत तर मानवासारख्या क्षुद्र भावनाशील प्राण्यास हा अधिकार कोणी दिला? हे सुलक्षणे, यच्चयावत बरह्मांडातील एका कणावरही कोणाचीही सत्ता नाही तरीही त्यावर सत्ता सांगत न्याय-अन्यायाच्या रीती-भाती आपण ठरविण्याचा प्रयत्न करतो यापेक्षा मोठा विनोद कोणता असेल हे सांग बरे मला? तेव्हा तुमची बाजू न्यायाची आणि कौरवांची अन्यायाची असे काही तुला म्हणता येणार नाही. कारण हा झगडाच-जो कोणाचेही असूच शकत नाही अशा-क्षुद्र कारणांकपरता आहे. परंतु, ही मानवाची सवयच आहे त्याला तुम्ही पांडव किंवा हे कौरव तरी काय करणार बरे? आणि जर अखेर मानवाच्याच नियमाने जायचे तर मग युद्धास पर्याय तरी काय आहे? जे ठरायचे ते रणभूमीवरच ठरेल. जर पांडव न्यायी आहेत तर मी त्यांच्याबरोबर आहे की नाही याने कोणता फरक पडणार आहे? कारण मी तर हाती शस्त्र घेणार नाही. मी कोणाचा वध करणार नाही. माझ्यामुळे कोणाच्याही जयापराजयात काही फरक पडणार नाही ही तर वस्तुस्थिती आहे! हे सुभगे, तुझे पती बलशाली आहेत. शस्त्रास्त्रविद्या पारंगत आहेत, तेव्हा तुला चिंता तरी कसली?" "म्हणजे, तू आम्हास कसलीही मदत करणार नाहीस तर!" "हे द्रौपदी, मी आता कौरव आहे असे समज. मी तुला मदत तरी काय करणार! आणि ती अपेक्षा तू ठेवूही नकोस. पांडवांनी तरी तुला माझ्याकडे का बरे पाठवावे? स्वत: अर्जुन काय माझ्याकडे येऊ शकत नव्हता? किंवा स्वत: धर्मराज तरी? पण तू आलीस. कारण हे लाडके, तू आता राजकारणात पडली आहेस. तू नेहमीच पांडवांचे शस्त्र होतीस. आजही आहेस. पण, त्यापेक्षा तू त्यांचे ंत:करण चेतवशील तर कदाजात ते त्यांच्यात आहे त्यापेक्षा अधिक पराकरम गाजवू शकतील!" द्रौपदीने असहायपणे कृष्णाकडे अखेरचे पाहिले. अखेर ती मानी स्त्री होती. कोठपर्यंत झुकायचे ते तिला चांगले माहीत होते. आणि ती पुरेशी झुकली होती. आता आपल्या हाती मातीखेरीज काही लागणार नाही याची जाणीव तिला झाली. ती म्हणाली, "रि तसेच होणार असेल तर त्याला इला तिरी काय आहे? माझे पती पराकरमी आहेत. ते समरांगणावर निश्चयाने पराकरम गावितील आणि यशश्री प्राप्त करतील. हे कृष्णा, तो तुझा पराभव असेल याच्याच मला अधिक यातना होत आहेत." "हरकत नाही द्रौपदी. मलाही तोच तर अनुभव घ्यायचा आहे. जय किंवा पराजय, जीवन किंवा मृत्यू, लाभ किंवा तोटा, कीर्ती किंवा अपकीर्ती याने जो संतुष्ट किंवा असंतुष्ट होतो त्यासारखा अज्ञानी जीव या विश्वात असू शकत नाही. अपकीर्ती किंवा पराजयाने मला असा कोणता फरक पडणार आहे बरे? मी अलिप्तपणे या खेळाकडे पाहतो आहे. या खेळात मी आहेही आणि नाहीही. खरे तर जे काही ठरणार आहे ते तुम्हा कौरव-पांडवांत ठरणार आहे. माझा मुळी त्याच्याशी संबंधच काय! " आणि द्रौपदी, जर पराजयच झाला तर पराजित होणारे पहिले कौरवच नसतील. माझी बाजू न्यायाची असूनही जरा संधाने मला पराजित केलेच नव्हते की काय? म्हणून मी काय अपकीर्त झालो? मी नाही द्वारका वसवली? मग पांडव का नाही मग स्वत:चे राज्य निर्मऊ शकत? जे गमावले त्याची खंत करीत सूडाने प्रज्वलित राहणारे मानव कधीही श्रेष्ठ श्रेय प्राप्त करू शकत नाहीत, हे काय पाडवांना, माझा एवढा सन्मान करूनही कळत नाही? जर अन्यायच घडला तर अन्याय होणारे पांडवच पहिले नसतील. काय यापूर्वी कधी कोणावर अन्यायच झालेला नाही? म्हणून काय प्रत्येकाने शस्त्र उभारून एकमेकांवर तुटून पडायचे? आणि त्यातही जो जिंकतो तो काय न्यायीच असतो? आणि मृत्यू-हे याज्ञसेनी, जन्माला जो आला त्याला मृत्यू अटळ आहे. जर या युद्धात माझा मृत्यू झाला तर कदाजात मी प्रसिद्ध होईन; पण जर हाच मृत्यू अन्य कोठेतरी एखाद्या य:कश्चित मनुष्याच्या हातून झाला तर? अपघाताने झाला तर? वृद्धापकाळाने मी मेलो तर? नाही, कृष्णे, जे अटळच आहे त्याची चिंता क्षुद्र मुनष्य करतात आणि जे टाळता येते ते टाळण्यासाठी मात्र कोणीच प्रयत्न करीत नाही. पांडवांनी युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केला पण कौरवांना हे खरे, आता युद्धच हवे आहे. कारण हे याज्ञसेनी, संपूर्ण विनाश एकवेळ परवडला, पण चिंतित, भयभीत जीवन नको असे कोणा मनुष्यप्राण्याला आज वाटत नाही बरे? कौरवांनाही तीच भीती वाटते. जोवर पांडव आहेत तोवर कौरव चिंतेतून मुक्त नाहीत आणि जोवर कौरव आहेत तोवर पांडवही चिंतेतून मुक्त नाहीत. त्यामुळे आता भूतलावरहोंपैकी कोणीतरी एकच राहणार हे निश्चित आहे. यातून केवढाही भीषण विनाश घडू दे! सारा समा उद्धवस्त होऊ दे! संस्कृती नष्ट होऊ दे! पण किमान जो कोणी उरेल तो स्वत:ला यशस्वी नाही तर स्वत:स धर्मज्ञ तर म्हणवून घेईल? "हे सुभगे, युद्ध अटळ आहे हे तू समजून चल. मी तुमच्या बाजूने असतो तर युद्ध अधिकच निश्चित होते. विनाश निश्चित होता. आताही असे समज की विनाश निश्चित आहे. "मग जर विनाशच होणार आहे तर उरणार तरी कोण शेवटी? कौरव किंवा पांडव. परंतु हे याज्ञसेनी, जर राज्य करायला प्रजाच उरली नाही तर? फक्त वृद्ध स्त्रिया आणि बालकेच या पृथ्वीतलावर उरली तर? कोणत्या श्रेयाच्या प्राप्तीची महती तुम्ही गाल? किंवा कौरव गातील? "हे प्रिय भगिनी, प्रजा असेल तर राज्य करण्यात मौ आहे, काही अर्थि आहे. प्रजेएशवाय राज्य कधी अस्तित्वात येऊ तरी शकते काय? आणि समजा कौरव न्यायी तर कौरव जिंकणार, पांडव न्यायी तर पांडव जिंकणार हे मान्य केले तरी सुलक्षणे, सांग मला एक, या युद्धात जे सैनिक मरणार आहेत, त्यांच्या आत्म्यांवर, प्राणांवर तुझा किंवा कौरवांचा काय अधिकार आहे बरे? "कारण या युध्दात जे सामान्य सैनिक सामील आहेत ते काही आत्म्याशी चर्चा करून नव्हे की, कोण प्रामाणिक, कोण न्यायी आणि कोण अप्रमाणिक आणि कोण अन्यायी आहेत ते त्यांनी ठरवावे! ते तर पोटार्थी सैनिक. फक्त पोट भरले की संपले. पण हे सुभगे, ते अखेर तुझ्यासारखेच हाडा-मांसाचे मुनष्य-जीव आहेत. हे खरे, की कदाजात त्यांना तुझ्याएवढी बुद्धी नसेल. ते भीम-अर्जुनाएवढे पराकरमी नसतील. पण शेवटी भीमार्जुनही अशाच सैनिकांच्या जीवांवर प्रबळ होतात. पण जेवढा भीमात प्राण आहे, जेवढा अर्जुनात प्राण आहे, तेवढाच प्राण काय सामान्य सैनिकात नाही? त्यांच्या निष्ठा काही नाण्यांच्या मोबदल्यात खरीदल्या म्हणजे त्यांचे प्राण काय तुमचे झाले? "नाही द्रौपदी. हा अन्याय शतकानुशतके झाला आहे. पुढेही होईल. मनुष्य निर्बउद्ध असला म्हणून काय त्याच्या प्राणांचे मूल्य संपले? हे द्रौपदी, त्यांच्या प्राणांचे तेवढेच मूल्य आहे जेवढे तुझे आहे, माझे आहे. हे आकरंदणार्‍या हृदया, का आकरंदन करते आहेस बरे? का तुझ्या नेत्रांतून सतत अश्रुधार वाहते आहे बरे? "रडू नकोस. हे पांचाली आकरंदू नकोस." द्रौपदी अनंत काळ आपल्या हृदयावर साकळून आलेल्या शोकाच्या समुद्रास दूर हटवण्याचा प्रत्यन करीत वर पाहात अश्रुथिजल्या स्वरात म्हणाली, "ठीक आहे कृष्णा, जसे तुझ्या मनात असेल तसे होईल. मी अज्ञ आहे. मला काही केल्या काही कळत नाही. सारे जीवनच शेणामातीचे झाल्यासारखे वाटते आहे. "हे करुणाकरा, मी परत जाते आता. माझे पती माझी वाट पाहात असतील." द्रौपदी उठून उभी राहिली. कृष्णास नमरपणे प्रणिपात केला आणि शिबिरातून बाहेर पडली. सर्वज्ञ श्रीकृष्णाच्या शांत मुखावरील वेदना अधिकच गहिरी झाली. कमलनयन परमात्मस्वरूप भगवान श्रीकृष्णाने आपले नेत्र उघडले आणि या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या अद्भुत सृष्टीकडे अनिवार जिज्ञासेने पाहिले. द्रोणाचार्य श्रीकृष्णाच्या तेजोमय मुखाकडे भक्तिभावाने पाहात होते. "श्रीकृष्णा, तुझी लीला अपार आहे, परंतु तरीही माझ्या मनातील शंका काही केल्या दूर झाली नाही. पांडवांची बाजू सत्य की कौरवांची, हे समज की विवाद्य आहे. परंतु हे नारायणस्वरूपा, तू कशी बाजू बदललीस? ज्या बाजूने तू सदैव राहिलास, ज्यांचे नेहमीच क्षेम चिंतिले, ज्यांच्या हितासाठी तू सदैव तत्पर राहिलास, ज्यांच्या हितासाठी तू नीतीलाही कधी-कधी दूर ठेवले आहेस, आता त्यांची बाजू सोडणे हे तुला शोभते काय? श्रीकृष्णा, जसे गंगेने उलटे वाहू लागावे, पृथ्वीने स्थानच्युत व्हावे असेच तुझे वर्तन नाही काय? धर्म खूप सूक्ष्म आहे आणि ज्ञानवंतांनाही अनेकदा धर्म समजत नाही असे म्हणतात. परंतु तू तर धर्माचा संस्थापक आहेस. तुझ्यातूनच, यज्ञातून ज्वाला उत्पन्न व्हाव्यात, तसा धर्म निघाला आहे. धर्म स्थिर, अविचल आणि निर्विकार असतो असे ज्ञानीनि म्हणतात. परंतु तुझ्या वर्तनाने धर्म हा अस्थिर, चंचल आणि कसाही वाकवता येईल असे सर्व जगतास वाटू लागेल आणि मग देवताही आपले वर्तनलतील. ब्रह्मदेवही स्थानच्युत होईल पण तुझ्या या वर्तनामागे काहीतरी गूढ असेल असे मला वाटते आणि ते समजावून घेण्याची अनावर जज्ञासा मिला झाली आहे. "हे श्रीकृष्णा, कदाचित दुर्योधनाच्या पक्षास मिळाल्यासारखे दाखवून पांडवांचे अंती हित करावे असे तुझ्या मनात असेलर्‍आजनीतीशास्त्रातील भेदाची नीती पूर्वीच्या अनेक राजांनी अमलात आणली आहे, असे मी जाणतो. परंतु अशा राजांना इतिहासात नेहमीच अधम कोटीचे स्थान लाभले आहे. त्यांचा भेदनीतीने झालेला जय शुद्ध नाही, असे पूर्वाचार्यांचे मत आहे आणि तरीही असे कृत्य सामान्य व्यतीने केले तर ते क्षम्य आहे असे आपणास म्हणता येईल. परंतु ते स्वत: श्रीकृष्णाने केले तर मग श्रीकृष्णचारित्र्याबद्दल संदेह उत्पन्न होईल या विषयी माझ्या मनात शंका नाही. "तेव्हा तूच माझ्या संशयाचे निराकरण करावे, असे मला वाटते." एवढे वयोवृद्ध, तपस्वी शोभतील असे द्रोणाचार्य स्वस्थ उभे राहिले आणि अनिवार जज्ञासेने श्रीकृष्णाकिडे पाहू लागले. श्रीकृष्णाच्या मुखावर नेहमी असते तशी नीरव शांती होती आणि त्या शांतीचे तेज सर्व चराचरास गंभीर बनवत होते. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांकडे पाहिले आणि विचारले, "आचार्य, हे युद्ध आता होणार हे निश्चितच आहे. तेव्हा या युद्धात कोणाचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते?" आपल्या प्रश्नाचे उत्तर न देता श्रीकृष्णाने अन्य प्रश्न केला आहे हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आले. परंतु उत्तर देण्याच्या निश्चयाने ते म्हणाले, "श्रीकृष्णा, हा फार मोठा अवघड प्रश्न तू विचारला आहेस यात संशय नाही. पाचही पांडव, द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, शिखंडीसह सारे कौरव माझे शिष्य आहेत. कर्ण आणि एकलव्यही माझे अप्रत्यक्ष शिष्य आहेत आणि तू हे जाणतोस. "हे करुणाकरा, शिष्य हा गुरूस पुत्रासमान असतो हे शास्त्रवचन तू जाणतोसच. त्यामुळे धृतराष्टाचे जसे कौरवांवरच प्रेम आहे किंवा प्रिय म्हणून भीष्माचार्यांचे आणि पुत्र म्हणून कुंतीचे पांडवांवरच प्रेम आहे तसे काही माझे नाही. कौरव आणि पांडव हे एका अर्थाने माझे पुत्रच होत आणि उभयतांवर मी प्रेम करतो ही वस्तुस्थिती आहे आणि माझे शिष्य आपापसात युद्ध करायला निघाले असता गुरूचे मन भावनाकल्लोळाने गबिलेले असिणार हेही निश्चित. "हे द्वारकाधीशा, पुत्राने आशीर्वाद मागितला तर "विजयी भव' असे म्हणणे शास्त्रसंमत आहे, हे तूही जाणतोसच. परंतु येथे शिष्यरूपी पुत्रांतच संघर्ष असल्याने आणि युद्धात कोणा एकाचाच जय संभव असल्याने उभयतांना "विजयी भव' असा आशीर्वाद दिला तर एकाला तरी दिलेला आशीर्वाद असत्य ठरणार आहे हेही निश्चित. अशा अवस्थेत आशीर्वाद खोटा ठरणे हेही गुरूस अहितकारी आणि कीर्ती कलंकित करणारे ठरेल हेही तेवढेच सत्य वचन. "म्हणूनच या युद्धात कोणाचा जय व्हावा असे मला वाटते, हा जो प्रश्न तू मला विचारला आहेस, त्याचे उत्तर निश्चितच अवघड आहे आणि हे सुद्धा तू जाणतोसच. "बरे मी सा सिर्व शिष्यांवर प्रीत करतो तेवढीच प्रीत माझे शिष्य माझ्यावर करतात की काय हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जर एखादा शिष्य माझ्यावर प्रीत करीत नसतानाही माझा आशीर्वाद मागत असेल आणि मी फक्त द्यायचा म्हणून "विजयी भव' आशीर्वाद देऊनही तो शिष्य पराजित झाला तर माझ्याकडे खोटा आशीर्वाद दिल्याचे पातक येणार नाही. "आता हे पाहा करुणाकरा, दुर्योधन माझा द्वेष्टा असता तर त्याने मला या युद्धात, पांडव माझेही प्रिय शिष्य आहेत हे ज्ञात असतानाही, सहभागी करून घेण्याचे ठरविले नसते. कारण हे दयामय प्रभू, जी व्यती आपले अहित चिंतिते, शत्रुपक्षाचे यश अपजेक्षते अशा व्यक्तीने आपल्या पक्षाने लढावे असे अपजेक्षणारा एकतर मूर्ख तरी असला पाहिजे किंवा स्वत:च्या नाशास तो निमंत्रण देतो आहे, असे तरी म्हणावयास हवे. किंवा याहीपुढे जाऊन त्या व्यक्तीवर राजाचे निरातिशय प्रेम तरी असले पाहिजे, असे मला वाटते. "दुर्योधन मूर्ख नाही हे तू जाणतोसच. कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही ज्याने सूतपुत्र कर्णास राजा बनवले, आपल्या धाकटया भावांना एका मुठीत ठेवले, राजा धृतराष्ट्रावर प्रभाव कायम ठजेवण्यात यश मिळवले त्याला मूर्ख कसे म्हणता येईल? बरे त्याला आत्मनाशाची आस आहे, असेही मला म्हणता येत नाही. कारण उलटपक्षी दुर्योधन लोभी आहे असाच प्रचार आजवर झाला आहे, हेही तू जाणतोसच. आणि सारे कळूनही आत्मनाशाची आस बाळगणारा मग अति-ज्ञानीच म्हणायला हवा, आणि दुर्योधन तर तसाही नाही, अन्यथा पांडवांना राज्याचा हिस्सा मिळू नये यासाठी त्याने आजवर एवढ्या कलृप्त्या का लढविल्या असत्या? तेव्हा तो सुज्ञ आहे आणि असे असूनही जर मी पांडवांचे हित चिंतित आलो आहे हे ज्ञात असतानाही जर तो स्वत:च्याच पक्षात राहून मी युद्ध करावे हे जर अपजेक्षत असेल तर त्याचेही माझ्यावर प्रेम असायला हवे आणि मी त्याच्या पक्षाने जर युद्ध करणार असेल तर मी त्याला जय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करीन हा विश्वास त्याच्यात असला पाहिजे, हेही तेवढेच खरे. "पांडवांचे मविर प्रेम आहे, हे तर सर्वविख्यात आहे. अर्जुनानेच माझा वैरी जो द्रुपद, यास बंदी बनवून माझ्यासमोर आणून माझ्या वैराग्नीचे शमन केले आणि या य:कश्चित द्रोणास पांचालाधिपती बनवून द्रुपदाच्या बरोबरीस आणून बसविले, हेही सारे जाणतात. शिवाय अर्जुन हा माझा सर्वात प्रिय शिष्य आहे, कारण धनुर्वेदातील सार्‍या कला तो माझ्याकडून शिकला आणि त्यात निष्णात बनला. त्यामुळे गुरू म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो, हेही खरे. "धर्म, भीम, नकुल आणि सहदेवही माझे तेवढेच प्रिय शिष्य आहेत. आणि त्यांना ज्ञानदान करण्यात मी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. "शिष्य म्हणून मला जेवढा अRउनाचा अभिमान आहे, तेवढाच सूतपुत्र कर्णाचा सुद्धा आहे. जेवढा अभिमान मला गदायुद्धात प्रवीण असल्याबद्दल भीमाचा आहे तेवढाच दुर्योधनाचाही आहे. त्यामुळे हे युद्ध यान पक्षात होत असल्याने विजयी कोण झाला यास महत्त्व नाही. हे दयाघना, जो हरेल, तोही माझाच शिष्य असल्याने कारण अंतत: माझ्या गुरुपदास काळिमा लागणार आहे, हे निश्चित! " आणि या युद्धात कोणा एका पक्षाकडून तरी माझाही सहभाग असल्याने मी ज्या पक्षाकडून युद्ध करेन त्या पक्षाचा जर पराजय झाला तर माझे गुरुत्व अपयशी होईल हेही तेवढेच खरे नाही काय? " आणि हे गोपाला, माझी समस्या याहूनही अधिकच गहन आहे. द्रुपदाने माझ्या संहारासाठी यज्ञ मांडिला होता हे तू जाणतोसच. त्यातून धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला आहे, हे सर्वविख्यात आहे. धृष्टद्युम्न माझ्या मृत्यूसाठीच यज्ञातून अवतरला आहे आणि नियतीची शोकांतिका म्हण किंवा माझा नियतीवरील अटळ विश्वास म्हण, जो माझ्याच मृत्यूसाठी जन्मास आला आहे त्याच धृष्टद्युम्नास मीच सारे शस्त्रास्त्र विद्येचे ज्ञान दिले आहे. धृष्टद्युम्नही, जो माझा मृत्यू आहे तो माझा शिष्यच आहे आणि त्याच यज्ञातून निर्माण झालेली याज्ञसेनी द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी आहे. द्रुपदाने आपले सामर्थ्य पांडवांच्या मागे उभे केले आहे हे तू जाणतोसच. या सार्‍यामुळे माझ्यापुढची समस्या अधिकच जटिल झालीअहे! "धृष्टद्युम्न माझा शिष्य आहे आणि त्याला वधण्यास मी समर्थ असलो तरी त्याच्या हातून म मृत्यू यावा ही माझी नियती असल्याने मी त्यास कसा वधू? आणि शिष्यास वधणे हे पुत्रहत्येएवढेच पातकी कर्म असल्याने मी ते कसे करू? आणि जोवर माझ्या हाती शस्त्र आहे, तोवर मला वधण्यास या यच्चयावत विश्वात कोणी समर्थ नाही, हेही वास्तव आहे, हे तू जाणतोसच. "परंतु अखेर धृष्टद्युम्न आणि माझ्यातील ही व्यतिगत गोष्ट आहे. युद्ध हे कोणा एका व्यक्तीसाठी नसते. ते राजाच्या हेतूच्या यशासाठी असते हे शास्त्राचे गुह्य आहे आणि जर मला दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करायचे असेल तर ते माझ्या व्यतिगत यशापयशासाठी किंवा भाग्याने लिहिलेल्या नियतीसाठी नसून दुर्योधनाच्या हितासाठी करावे लागेल हेही तेवढेच शास्त्रमान्य सत्य. आणि समज मी पांडवांच्या पक्षास जाऊन मिळालो तर मला पांडवांच्याच यशासाठी प्रयत्न करावा लागेल तेही निश्चित. परंतु त्यामुळे ऊनि एक विजात्र परिस्थिती निर्माण होईल आणि ती मला विषद करायलाच हवी. "मी पांडवांच्या पक्षास का मिळावे हा प्रथम प्रश्न आहे. पांडव माझे प्रिय शिष्य आहेत आणि ते नेहमीच माझे इष्ट चिंतितात, हे सत्य आहे. परंतु कोणत्याही पक्षास मिळताना, जर मी उभय पक्षांचा गुरू असेन तर, माझ्याकडे तेवढेच समर्थनीय कारण हवे. एकतर मला कौरवांचा पक्ष सत्य वाटायला हवा किंवा पांडवांचा पक्ष सत्य वाटायला हवा. आणि सत्य एकाच बाजूने असू शकत नाही, ते कधी-कधी दोन्ही बाजूंनी असू शकते. परंतु आपण मनुष्यांच्या जगात जगत असल्याने सत्य हे पूर्ण सत्य असू शकत नाही. माणसाचे सत्य हे नेहमीच थोडयातरी असत्याने परिष्कृत असते. तेव्हा अधिक सत्य की कमी सत्य एवढाच फरक मानवासंदर्भात करता येतो. तेव्हा अधिक सत्य कौरवांच्या बाजूने आहे की अधिक सत्य पांडवांच्या बाजूने आहे, याचा निर्णय एका मनुष्यानेच घेणेसुद्धा त्यामुळे तेवढेच अनिर्णायक असू शकेल. " आणि मी सुद्धा मनुष्य आहे. तेव्हा माझा विवेक, तो मला कितीही योग्य सल्ला देत असला तरी, शास्त्रार्थाने योग्य असेलच असे काही मी निश्चयाने सांगू शकत नाही. हे युद्ध सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे, असेही मला निश्चयाने म्हणता येत नाही, कारण जर या युद्धात जय मिळावा म्हणूनन अक्षौहिणी सेना तू पांडवांच्या साहाय्यार्थ दिली असेल आणि फक्त तू एकटा कौरवांच्या बाजूने असशील, तर तुलाही नेमकी कोणती बाजू सत्य वाटत आहे हे नक्की करता आलेले नाही हे निश्चित. "रि कौरव असत्य आहेत आणि जर हे युद्ध फक्त सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी असेल तर कौरवांच्या बाजूने मग एकाही सैनिकाने युद्ध करता कामा नये, नाही तर नऊ अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्या बाजूने युद्ध करू इच्छिणारे एवढे रथी-महारथी असत्य आहेत हे सिद्ध होईल. किंवा सत्यासंदर्भात त्यांचा काहीतरी भरम झाला आहे, असे म्हणावे लागेल! त्यांची कीर्तीही यामुळे कलंकित होईल. त्यांची संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या असार्थकी होईल. "तेव्हा या युद्धाचा आणि शाश्वत सत्याचा संबंध नाही असे मला निश्चयाने वाटते. धर्म हा सत्य असतो आणि जेथे सत्य नाही तेथे धर्म नाही आणि येथे तर धर्म निश्चयानेन्ही पक्षांच्या बाजूने नाही, असे मला म्हणावेसे वाटते. "मग हे युद्ध कशासाठी आहे? राज्यलक्ष्मीसाठी! कौरवांकडून राज्य कूनिं घ्यावे या अनिवार आकांक्षेने पांडव युद्धास सज्जा आहेत तर पांडवांस आपल्या राज्याचा कणमात्र हिस्सा द्यायचा नाही या निश्चयाने कौरव युद्धास सज्जा आहेत. हे युद्ध राज्यासाठी आहे. भूमीसाठी आहे आणि या भूमीवर आपलाच अधिकार आहे हे उभयपक्षास वाटते आहे. " आणि एखाद्या सीमित वस्तूवरन किंवा अधिक पक्ष अधिकार सांगू लागतात तेव्हा त्याचा निर्णय संहारक युद्धानेच होणार हेही तेवढेच सत्य. आणि "अधिकार' ही मानवी संकल्पना आहे असे मला वाटते. कारण सत्य धर्म पाहिला तर या यच्चयावत विश्वात कोणाचाही अगदी तृणपात्यावरही अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे. "तेव्हा हे युद्ध धर्म किंवा सत्यासाठी नसून अधिकारासाठी आहे आणि राज्यावर, अगदीच राजनीतिशास्त्राने पाहिले तर, कौरवांचा अधिकार आहे की पांडवांचा हे सुद्धा सांगता येणे अनिश्चित आहे. कारण हे ज्ञानवंता, हे तू सुद्धा जाणतोसच की जो ज्येष्ठ त्याला राज्याधिकार मिळायला हवा. "त्या अर्थाने पाहिले तर युधिष्ठिराचा जन्म आधी झाला. म्हणून त्याचा या राज्यावर अधिकार आहे. परंतु धर्म सूक्ष्म आहे. आधी संकल्प होतो, मग सिद्धी. संकल्प आणि सिद्धीत केवढेही अंतर असले तरी संकल्प आधी होणे ही खरी निर्णायक स्थिती असेही पूर्वाचार्य म्हणतात. जन्म केव्हा झाला अथवा गर्भधारणा केव्हा झाली यावर ज्येष्ठत्व माजेअयचे ठरविले तर या प्राप्त प्रश्नात गंभीर समस्या निर्माण होते. गांधारीची गर्भधारणा कुंतीअधी झाली होती हे तर सर्व जाणतात. म्हणजे संकल्प आधी झाला होता पण कौरवांचा जन्म पांडवांनंतर झाला. या दृष्टीने पाहायला गेले तर जन्म उशिरा होऊनही कौरव ज्येष्ठ ठरतात. " आणि नीतिशास्त्रातील दुसरी समस्या अशी, की केवळ ज्येष्ठ आणि कनिष्ठ या भेदावर अवलंबून राहून अधिकार फक्त ज्येष्ठांच्या हाती द्यावा हे कसे ठरवणार? भीष्म ज्येष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार मिळाला नाही हे तर खरे आहे ना? आणि बलराम ज्येष्ठ असतानाही द्वारकाधीश तू आहेस हे सुद्धा तेवढेच सत्य ना? माझ्या मते ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भेद या प्रसंगी लावता कामा नये. कोण योग्य आणि कोण अयोग्य एवढाच माझ्या मते खरा प्रश्न असला पाहिजे. "आता हा प्रश्न कोणामागे किती समर्थक आहे या न्यायाने सोडवायला गेल्यास, उभय पक्षांमागे समान बलाबल असल्याने निश्चित निर्णय अशक्य आहे. समजा एखाद्या पक्षामागे कमी बल असले म्हणून तो पक्ष अयोग्य आहे असेही काही केल्या म्हणता आले नसते. कारण संख्येच्या बलावर जर योग्यायोग्य निर्णय होऊ लागला तर खंडीभर अज्ञ लोक मूठभर सुज्ञ लोकांस सह पिराजित करू शकतील आणि मग योग्यायोग्यतेच्या व्याख्याच बदलून जातील. "म्हणजेच, कौरव योग्य आहेत की पांडव याचा निर्णय शास्त्रांच्या अर्थाने लागणे शक्य नाही. कोण नेमका योग्य आहे, हे काही केल्या आपल्याला ठरविता येणार नाही. "तेव्हा या दोन पक्षांमध्ये युद्ध होणे आणि या युद्धात कोणाचा तरी पराजय होणे अपरिहार्य आहे. बहुसंख्य प्रश्न ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या बलाने सुटत नसून बाहुबलानेच सुटू शकतात हेही कटू सत्य आहे आणि हे एवढे करूनही जो जिंकतो त्याचीच बाजू सत्याची होती असेही काही केल्या निश्चयाने म्हणता येत नाही, कारण आजवरच्या सर्वच जेत्यांची बाजू सत्याची होती असे काही म्हणता येत नाही आणि जे हरले ते पातकी होते असेही विधान करता येत नाही. हे परमात्म्या, तू स्वत:ही जरा संधाकरवी सव्वीस वेळा पराजित झाला असला तरीही तुला कोणी असत्य म्हटल्याचे माझ्या ऐकिवात नाही. "त्यामुळे कोणाचा विजय व्हावा असे तू जे मला विचारलेस हा खरेच अवघड प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर शास्त्रार्थाने देणेही अशक्य आहे हे उघडच आहे. मग येथे आता उरते "द्रोण' नामक व्यक्ती आणि तिच्या भावना. या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन आणि परिस्थितीने निर्माण केलेल्या वंचना. "शास्त्र कितीही ज्ञात असले तरी व्यती नेहमीच आपल्या अनुभवांनी आलेल्या समजुतींनुसार वर्तन करते आणि त्याचे शास्त्रार्थाने त्याचे समर्थन करीत असते. "तेव्हा सत्य काय आहे, यापेक्षा मला काय वाटते तेवढेच खरे तरमहत्त्वाचे आहे. माझ्यावर माझ्या परिस्थितीची काय बंधने आहेत, तीही महत्त्वाची आहेत. "मी उभय पक्षांचा गुरू आहे ही आता माझ्या दृष्टीने दुय्यम गोष्ट आहे. पांडवांनी माझा दृढ शत्रू जो द्रुपद, त्याच्या कन्येशी विवाह केला आणि माझ्या शत्रूशी सख्य केले याचे मला नेहमीच वाईट वाटत आले आहे. द्रुपदाने माझ्या नाशासाठी घोर यज्ञ केला आणि त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला हे घोर सत्य ज्ञात असूनही त्यांनी द्रौपदीशी जाणीवपूर्वक विवाह केला आणि धृष्टद्युम्नास आपल्या पक्षाकडे ओढून घेतले हेही सत्य आहे. धृष्टद्युम्न माझा शिष्य. मी, तो माझ्या वधाकपरता जन्मास आला आहे हे ज्ञात असतानाही, त्याला मी सर्व ज्ञान देऊन पुत्रसमान केले, तोही शिष्य आज पांडवांच्या बाजूने आहे, हे सुद्धा सत्य. ज्या पक्षाला माझ्या वधासाठी आतुर व्यती आहेत, त्यांच्या पक्षास काही झाले तरी माझ्यासारखा कठोर निश्चयी मनुष्य जाणार नाही हे अटळ सत्य आहे. "कारण मानवी विकारांनी भरलेल्या मानवी जगतात सत्य काय आहे, यापेक्षा काय सत्य वाटते हे महत्त्वाचे असते हे खरोखर दुर्दैव होय. " आणि मी आधी बराह्मण असल्याने स्वत: युद्ध न कपरता द्रुपदाची खोडी शिष्यांकरवी मोडली होती. आता मी मात्र स्वत:च क्षात्रधर्माचा अंगीकार करून द्रुपदाची आणि धृष्टद्युम्नाची खोडी जरिवायचे ठरविले आहे." एवढे प्रदीर्घ भाषण करून श्रांत झालेल्या द्रोणाचार्यांनी भूमीवर बसकण मारली आणि ते नेत्र मिटून आत्मचिंतनात मग्न होऊन गेले. श्रीकृष्णानेही द्रोणाचार्यांच्या बाजूस बसून त्यांचे प्रदीर्घ अवलोकन केले आणि म्हणाला, "हे ज्ञानश्रेष्ठा, हे महागुरू, तुमच्या भावना मला समजल्या." यावर द्रोणाचार्यांनी नेत्र उघडून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि म्लान हास्य करण्याचा यत्न केला. "हे ज्ञानवंता, तुमच्या प्रश्नांचे बरचसे उत्तर तुम्हीच दिले आहे. हे खरे आहे की धर्म सूक्ष्म आहे, असे सारेच म्हणतात. परंतु अधिक सूक्ष्मात गेलो आपण, तर धर्म नावाची कोणतीच गोष्ट या मानवी जगतात अस्तित्वात नाही हे तुमच्या लक्षात येईल. अंधार आणि प्रकाश यात आपण सा भेदि करतो तसा भेद अधर्म आणि धर्मात करता येत नाही आणि तीच मानवाची मोठी शोकांतिका आहे. "सनातन सत्य आणि धर्म अविचल आहे, परंतु मानवाचा धर्म मात्र परिवर्तनीय आहे. श्वेतकेतूच्या पूर्वी पुरुष आपल्या कन्यांशीही संबंध ठेवीत असत असे इतिहास सांगतो आणि त्याकाळी अशा संबंधास कोणी अधर्म मानीत नव्हते. फार काय, यमाच्या कालापूर्वी भगिनीगमन कोणी अधर्म मानीत नव्हते. परंतु भगिनीगमन यमाने निषिद्ध ठरविले. तेव्हा मानवी धर्म परिवर्तनीय आहे, हे निश्चितपणे दिसून येते. " आणि जेही काही परिवर्तनीय आहे ते नित्य असू शकत नाही. आणि जे काही अनित्य आहे त्याला धर्म म्हणता येणार नाही. "म्हणजेच मनुष्याच्या जगतात ज्याला शाश्वत अर्थाने धर्म म्हणतात, तसा धर्म नसतोच. खरे तर मनुष्यास धर्म जेव्हा क बोलतो तेव्हा तो संघर्ष करू शकणार नाही. कारण ज्यावर आपली सत्ता असूच शकत नाही, त्यावर सत्ता मिळवण्याचा यत्न करणे किंवा सत्ता आहे असे समजणे हे मूर्खपणाचे लक्षण नाही काय? "तेव्हा हे ब्रह्मर्षी, हे युद्ध हे सत्यार्थ नाही. युद्ध हे विकारार्थ आहे आणि मानवी विकारांना अंत नाही. मानवी आकाक्षांना अंत नाही. कितीही प्राप्ती झाली तरी अधिकाची प्राप्ती करण्यासाठी सारेच मानव आपले यत्न करीत असतात. "केवळ मी आजवर पांडवांची बाजू घेतली की नाही याला काही महत्त्व नाही कारण खरे तर मी बाजू घेतली म्हणून पांडवांची बाजू सत्याची ठरत नाही, तसेच मी आज कौरवांची बाजू घेतली आहे, म्हणून त्यांचीही बाजू सत्याची ठरत नाही. "खरे तर कोणाचीच बाजू सत्याची नाही आणि कोणाचीच बाजू असत्याची नाही. आणि असे असूनही तुम्ही आणि मी मानव असल्याने, मानवी विकारांचे सारेच बळी पडत आहोत हेही तेवढेच सत्य! परंतु माझ्या मनात मात्र कोणाचेही काहीही सत्य नाही. कारण हे सारे मानवी जीवन एक मोठा व्यामिश्र खेळ आहे, हे मला पटलेले आहे. पांडवांनी अधर्म वर्तन करूनही स्वत:ला धर्मज्ञ म्हणावे, त्यातील विरोधाभास अनुभवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर होतोच. त्याचप्रमाणे दुर्योधन अधर्मी आहे असे सारे जग म्हणते तेव्हा त्याचे अधर्मत्व आहे तरी काय हे कळावे यासाठी मी त्याच्याबरोबर आहे. "कारण धर्म म्हणजे नेमके काय यासंबंधी माझ्याच मनात आता संभरम निर्माण झाला आहे. "कारण हे ब्रह्मर्षी, धर्म मी निर्माण केला, असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा धर्म म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते हे मी सांगणे करमप्राप्त आहे. "धर्म खरे तर खूप साधा आणि सरळ आहे. त्याची तत्त्वेही तेवढीच साधी आणि सोपी आहेत. सत्याने वागा असे मी सांगितले, पण मानवी सत्य हे मानवी विकारांनी व्यापलेले सत्य असते. त्यामुळे साधे-सरळ सत्य दूर राहते. आणि मानवी सत्य हे केवढे विरोधाभासाने भरलेले आहे, हे तुम्हीच मला आताच स्पष्ट केलेत. तेव्हा धर्माची अन्य तत्त्वे स्पष्ट करण्यात तरी काय अर्थ आहे? "तेव्हा मला अभिप्रेत असलेला धर्म आणि आचरणात असलेला धर्म यात जर महदंतर असेल तर ज्या यच्चयावत सृष्टीसाठी मी धर्म निर्माण केला त्या धर्मात काहीष तर नाही ना असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे. "पण हे ब्रह्मर्षी, यच्चयावत विश्व मी निर्माण केलेल्या धर्माने चालते, दृश्य आणि अदृश्य अशी सृष्टीही माझ्या तत्त्वांनी चालते. प्रकाश आणि अंधार हे स्पष्ट वास्तव सारीच सृष्टी रोजच अनुभवते. कारण ते सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे वास्तव यच्चयावत सृष्टी रोजच अनुभवते. कारण दोन्हीही सत्य आहेत. "आहे आणि नाही' यातील फरकही सारीच सृष्टी नित्य अनुभव करते, कारण तेही शाश्वत सत्य आहे, आणि जे आहे ते "आहे' असे मानून चालणारी सृष्टी जे नाही ते "नाही' हेही गृहीत धरते. "पण मनुष्याची गोष्टच वेगळी. तो जे आहे ते "आहे' हे मान्य करूनही जे "नाही' ते "आहे' कसे बनवायचे यासाठी जीवापाड कर्म करीत असतो आणि नाही ते "आहे' बनवण्यासाठी अनंत यातना सहन करीत असतो. त्यासाठी शत्रू बनवीत असतो. त्यासाठी मित्र बनवीत असतो. "धर्म फार साधा आणि सरळ आहे; पण त्यासाठी तेवढेच सरळ मन हवे आणि मन ही केवढी व्यामिश्र गोष्ट बनली आहे. मनुष्यास, अन्य प्राण्यांस अप्राप्य जे मन, ते आहे आणि मनाने मनुष्य आकाशात भरार्‍या घेत असतो. प्राप्त स्थितीत असंतुष्ट राहणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच त्याचा शाश्वत अधर्म आहे. "कारण जेव्हा आकाशातील तारका प्रकाशतात तेव्हा कोणास सुख मिळते आणि कोणास यातना होतात याचा विचार तारका कधी करत नाहीत. मनुष्य मात्र प्रत्येक कर्म करीत असता स्वत:स सुख होते की इतरांस याचा विचार करीत असतो. ही धपरत्री जेव्हा अन्न प्रसवते तेव्हा ते अन्य सृष्ट भक्षण करणार आहे की दृष्ट याचा विचार करीत नाही. कारण तो सृष्टीचा शाश्वत धर्म आहे; पण मनुष्य मात्र आपल्या कर्माचे फल कोणास मिळणार आहे, याचा विचार करत असतो आणि केवळ विचारांनीही तो सुखी किंवा दु:खी होत असतो. "खरे तर मी निर्माण केलेला धर्म या मानवी परिप्रेक्ष्यात कसा लागू पडतो हे अनुभवण्यासाठी मी हा खेळ रचला आहे. "हे ब्रह्मर्षी, तू महाज्ञानी आहेस, परंतु मानवाचे ज्ञान हे शून्य कसे ठरते हे तुम्हीच मला दाखविले आहे आणि हा मलाच एक धडा आहे. "या होणार्‍या युद्धात कोण जिंकणार हा खरा प्रश्न नाहीच. खरा प्रश्न आहे, शाश्वत धर्म अस्तित्वात आहे की नाही, एवढाच! "त्यासाठी मी निरामय मनाने सर्वांशीलतो आहे. "श्रवतो आहे. "बस! हे ब्रह्मर्षी... अधिक काय सांगू?" कृष्णसखा पार्थ, अर्जुन, दीनवदनाने श्रीकृष्णासमोर उभा होता. अमावास्येच्या आदल्या दिवसाची रात्र असल्याने आकाशात तारकांनी गच्च दाटी केली होती आणि हवा संथ गतीने वाहात यच्चयावत सृष्टीस परमात्मस्पर्शाने आशीर्वाद देत होती. अर्जुन म्हणाला हे कृष्णा, माझे मन मोहाने ग्रस्त झाले आहे. उद्या सकाळी युद्ध सुरू होणार आहे आणि हे युद्ध माझ्याच आप्तांशी असल्याने मी हे युद्ध का करावे, माझ्याच भ्रात्यांच्या वधास कारणीभूत होऊन पातकांचा असह्य भार का घ्यावा हा प्रश्न मला व्यथित करतो आहे. आता तूही आमच्या बाजूस नाहीस त्यामुळे धर्मानेही आमची साथ सोडली आहे की काय असे मला तीव्रतेने वाटते आहे. हे मधुसूदना, युद्ध हे भीषण कर्म आहे आणि त्यामुळे असंख्य जीवांचा संहार होणार आहे. केवळ राज्यलाभासाठी जर माझ्याच आप्तेष्टांची हत्या झाली तर माझी कीर्ती कलंकित होईल, हे तर निश्चित. त्यामुळे शस्त्रसंन्यास घेऊन पुन्हा अरण्याची वाट चालावी असे मला वाटते आहे. युधिष्ठिराचेही असेच मत आहे. धृतराष्ट्रपुत्रांस खुशाल राज्यलक्ष्मीचा भोग घेऊ देत. आमचे त्याबद्दल आता काहीही म्हणणे नाही. तू हे माझे मत दुर्योधनापर्यंत पोहोचव आणि या युद्धास टाळ. तसे केल्याने आमचीही कीर्ती अक्षय राहील आणि आम्ही धर्माने वागलो असेच इतिहास सांगेल. क्षणिक लाभापेक्षा अजेय कीर्ती ही फार लाभाची ठरेल असे मला निश्चयाने वाटते. श्रीकृष्ण म्हणाला हे पार्था, धर्म सूक्ष्म आहे आणि मानवी व्यवहार हे एवढे गुंतागुंतीचे आहेत की, प्रसंगी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरविण्यात ज्ञानवंतही कमी पडत असतात. उद्या सुरू होणारे युद्ध हे तुम्हा आप्तेष्टांत आहे, असे जे काही तू समजतो आहेस ते केवळ मायेमुळे. हे पार्था, मानवी जीवनच मुळात मायेने व्यापलेले आहे. मायेमुळेच कोणी मित्र वाटतो तर कोणी शत्रू. कोणी प्रिय वाटतो तर कोणी अप्रिय. दुर्योधन-भीष्मादी व्यती तुला आप्त वाटतात कारण ही माया.आरे, मायेमुळे मानवात वास करणारा आत्मा झाकलेला असतो. ती माया मनुष्यास सत्य काय ते कदापि कळू देत नाही. मायेचे आवरण दूर कर. मायेचे आवरण योगाने दूर केलेस, तर तुझ्या लक्षात येईल की, तुझा येथे कोणीही आप्त नाही. तसाच तुझा कोणी शत्रूही नाही. त्यामुळे हे पार्था, तू का मोहग्रस्त होतो आहेस? शोक हा अनित्य आहे, म्हणूनच शोक त्याज्य आहे. आनंद शाश्वत आहे म्हणून आनंद प्रेय आहे. आणि हेही लक्षात घे पार्था, की जन्म आणि मृत्यू या घटनाही अनित्य आहेत. म्हणून जन्माबद्दल आनंद व्यक्त करणे आणि मृत्यूबद्दल शोक करणे, त्याज्य आहे. हा शाश्वत धर्म मी तुला सांगत आहे. आप्तांशी युद्ध करावे की नाही हा मोह तुझ्या मनात निर्माण झाला आहे; पण "आप्त' हे आप्त नाहीत हे तुला मायेचे आवरण दूर केल्याखेरी किळणार नाही. तेव्हा या भूतलावर तुझे युधिष्ठिर, द्रौपदीसह कोणी आप्त नाहीत हे शाश्वत सत्य तू ध्यानी घे. कारण हे धनंजया, प्रिय वाटणे हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव बनतो तेव्हा त्याला काही अप्रियही वाटणार हे निश्चित आहे आणि प्रिय आणि अप्रियतेमधील सीमारेषा मानवी भावनांनी घातलेल्या असतात. भावनांचा त्याग केलास तर कोणी प्रिय वाटणार नाही की कोणी अप्रिय. आणि साधू हा भावनाहीन असला पाहिजे. आणि ज्याला भावना नाहीत त्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसते. त्याचे मन निर्विकार आणि अलिप्त असते. अशा व्यतीस कोणतेही कर्म षिद्ध नसते की निषिद्ध. तेव्हा हे शत्रुतापना, तुला हा जो शोक होत आहे, त्याचे मला काही एक कारण दिसत नाही. कारण हे पार्था, तू या युद्धाच्या दिशेने स्वत:हून चालत आला आहेस आणि हे तुझे वर्तन अंती युद्धातच परिणत होणे हे अधिक इष्ट असे मला वाटते. हे धनंजया, जर कौरव तुझे आप्त आहेत तर तेवढेच पांडवही तुझे आप्त आहेत. एवढेच नव्हे तर पांडवांवर श्रद्धा ठेवून या संगरात तुझ्या बाजूने जे कोणी उतरले आहेत तेही तुझे आप्तच आहेत. आता हे युद्ध करावयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ टळून चुकली आहे. मनुष्य आपल्याच कर्मांनी आपले भवितव्य नित्य घडवीत असतो. परन्तु जे काही घडते ती आपली नियती असते या विरोधाभासाने मानवी मन व्याप्त असल्याने, हे पार्था, मनुष्य आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवीत नाही. उद्या घडणारे युद्ध हे एकाकी घडते आहे असे नसून त्याची बीजे सर्वांनीच इतिहासात पेरून ठेवली आहेत आणि त्यास खतपाणी घातलेले आहे. तेव्हा आता एकाएकी त्या कर्माचे फल म्हणून हे, जे युद्ध ते, तुला अव्हेरता येणार नाही. कारण ते आता तुझ्या एकटयाच्या हातीही नाही. फार तर तू एकटा संन्यस्त होऊ शकशील. परंतु मग तुला जे वाटते की तुझी कीर्ती अक्शक्य होईल ते काही खरे नाही. बाबारे, एक भित्रा मनुष्य अशीच तुझी त्रैलोयात कीर्ती होईल. सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मानवी धर्म यात भेद आहे तो यामुळेच. कारण अमुक एक कर्म करावे की नाही याचे सर्वदा मनुष्यास स्वातंत्र्य असते असे नाही. मनुष्य जन्मास येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो. आणि ज्या परिस्थितीत त्याची वृद्धी होते, त्या परिस्थितीचे पारतंत्र्य आपसूक त्याच्या गळ्यात पडत असते. मी तुला सांगितलेच आहे हे सव्यसाची, की या जगात काही प्रिय नसतानाही मनुष्यास काही गोष्टी प्रिय वाटतात. कारण त्याची परिस्थिती. तसेच या जगात काही एक अप्रिय नसताही त्या गोष्टी अप्रिय वाटतात कारण मनुष्याची परिस्थिती. मनुष्य खर्‍या अर्थाने परिस्थितीचे अपत्य असतो. परिस्थिती मनुष्यास घडविते, यश देते किंवा अपयश देते. परंतु हे प्रिय कुंतिपुत्रा, परिस्थितीच मुळात अनित्य असल्याने मनुष्याचे यश आणि अपयशही तेवढेच अनित्य असणार हे उघड आहे. तेव्हा उद्या जी परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीचा तू दास आहेस आणि हे माया-मोहाने भरलेले संभाषण विसरून तुला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करावा लागणार आहे. परंतु उद्याची परिस्थिती ही अनित्य आहे कारण परवाची परिस्थिती कशी असेल ते उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा अनित्य स्थितीत विजय लाभतो की पराजय, मृत्यू लाभतो की जीवन हे सुद्धा ठरवणे तेवढेच अनित्य आहे. म्हणून हे कौंतेया, असा शोकमग्न होऊ नकोस.' अर्जुन म्हणाला हे नारायणा, मी मनुष्य आहे आणि मी विकारांनी ग्रस्त आहे हे तर सत्य आहे परंतु तू आताच म्हणालास की सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मनुष्याचा धर्म यात भेद आहे. मला हे सांग की असे का? धर्म हा एकच असला पाहिजे आणि तो सर्वांना सारखाच लागू पडला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा हे उदारहृदया, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. कृष्ण म्हणाला हे पार्था, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात खचितच मला आनंद वाटेल. कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो. धर्म ही मूलत: मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा स्पर्श मानवी धर्मास होणे सहशिय आहे. पण मनुष्य हाही सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो. मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य बराह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असे समजून मानवी धर्माचे विभानि करीत धर्माचा संकोच करीत असतो. शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वत: मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शिवाय धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूपलू शकते. आणि जे बलहीन आहेत त्यांच्यावर धर्म लादला जातो तर जे शक्तिशाली आहेत तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात हा इतिहास आहे. याचाच अर्थ असा की, मानवी धर्म अनिश्चित असून तो अक्शक्य नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल? म्हणजेच, मानवी धर्म शाश्वत नाही आणि जे शाश्वत नाही त्याप्रमाणेच आचरण करण्याचा आगरह कोणी का धरावाबरे? आता हे पार्था, मी तुला चिरंतन धर्माची गुह्ये सांगतो. हा धर्म सृष्टीच्या उत्पत्तीकाली ब्रह्मदेवाने केला आणि त्याच धर्माने सारे चराचर चालत असून ज्या योगे आकाशीच्या तारका भूमंडळावर कोसळत नाहीत किंवा तेजोमय सूर्य पृथ्वीच्या निकट येऊन पृथ्वीस दग्ध करीत नाही किंवा ज्या योगे अरण्यातील समस्त हिंस्र प्राणिजगत एकत्र येऊन मानवांवर सामूहिक हल्ले करीत नाहीत, तो धर्म मी तुला सांगतो. पार्था, लक्षपूर्वक ऐक. सर्व सृष्टी ही अवकाशात उत्पन्न होते आणि अवकाशातच लय पावते. अवकाश हेच सृष्टीचे निर्मितीकारण आहे आणि अवकाश हेच सृष्टीचे संहाराचे कारण आहे. याच परम अवकाशास आपण ब्रह्मदेव म्हणतो आणि सर्व चराचरात ब्रह्माचे आस्तित्व आहे, असे म्हणतो. आणि हे तत्त्व फार गूढ आहे, जे तत्त्व यापूर्वी कोणी एजेकलेले नाही, ते तत्त्व मी तुला सांगत आहे. अवकाशरूपी ब्रह्म हेच सृष्टीचे राजकारण आहे आणि यातूनच दिव्य अद्भुत गोष्टींची निर्मिती झाली आहे, हे निश्चयाने सत्य आहे. या निर्मितीसाठीच सर्व राजतत्त्वांबरोबरच धर्माचीही निर्मिती झाली. हा धर्म हाच विश्वाचा नियमनकर्ता प्राण आहे. त्याच योगे सर्व सृष्टीचे व्यवहार नित्य होत असतात. ज्याप्रमाणे राज सूर्य ज्या समयी उगवतो त्याच समयी तो नित्य उगवत असतो. ऋतुचकर आपल्याला कळूही न देता अब्जावधी वर्षे अव्याहत चालू राहते. जो प्राणी आज जन्माला आला तो युवा होऊन वृद्ध होताना आणि एक दिवस मृत्युमुखात जाऊन स्थिर होताना आपल्याला दिसतो. हे धनंजया, सृष्टीच्या या नियमात कधीही बाधा येत नाही, हे शाश्वत सत्य आहे. दक्षिणायनाचे उत्तरायणात परिवर्तन होणे, हे आपण निश्चयाने सांगू शकतो. त्याचयोगे आपण आपलेही जीवन या अव्याहत ऋतुचकराशी जुळवून घेत असतो. हे पार्था, ऋतुचकर शाश्वत आहे. नभोमंडपी नक्षत्रांनी आपले स्थान कधीलायचे हे सुद्धा शाश्वत आहे, परंतु मनुष्य कधी आणि कसे वागेल याचे भाकीत कोणीही ज्ञानी मनुष्य करू शकत नाही, हे तेवढेच सत्य नाही काय? पार्था, धर्माचे ऊनि एक गुह्य तुला मी सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. सृष्टी जड, अर्धचेतन आणि चैतन्य या तीन तत्त्वांत वाटली गेली आहे. जड सृष्टी ही अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे, याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. अर्धचेतन सृष्टी म्हणजे सकल चराचरात वास करणारी जीवसृष्टी. यात डोळ्यांनीही दिसणार नाहीत अशा अंतूंपासूनि ते समुद्रतलात विहार करणारे, हजार माणसांचे वनि जेवढे भरेल, एवढे अवाढव्य जीव वास करत असतात आणि मी असे ऐकतो की त्यातील अनेक जीव मनुष्याच्या निर्मितीपेक्षाही प्राचीन आहेत आणि त्यांचे सामर्थ्य एवढे आहे की, ते कोणत्याही धैर्यशाली पुरुषासही भयभीत करू शकतील. परंतु हे पार्था, ही जीवसृष्टी एवढी पुरातन आणि समर्थ असताही, या सृष्टीने कधी या भूमीच्या एका कणावरही अधिकार सांगितल्याचा इतिहास नाही. ही सृष्टी जन्मास येते, नियत कर्मे करत असते आणि एक दिवस मृत्यूही पावत असते. जन्म आणि मरणाबाबत या सृष्टीने कधी हर्ष किंवा खेद व्यत करत असताना मी पाहिलेले नाही किंवा क्षणिक हर्ष-खेदासच जीवनाचा आधार मानत भविष्यामध्ये कसे वर्तन करावयाचे याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, असे माझ्या पाहण्यात नाही. कारण हे पार्था, चिरंतन धर्माचे पालन करण्यात मानवेतर जीवसृष्टीच श्रेष्ठ आहे आणि चैतन्याचेच म्हणशील तर, चैतन्य कोणत्याही दुर्तत्त्वाहून अबाधित आहे. अग्नी हे चैतन्य आहे आणि अग्नी हा शुद्ध असतो हे सारे ज्ञानीनि जाणतात. प्रकाशही चैतन्य आहे आणि तो निर्विकार आणि सनातन असून सार्‍या जीवसृष्टीचे कारण असूनही कधी अहंग्रस्त झाल्याचे ऐकिवात नाही. नियमानेया धरेवर र्पन्यि वर्षत असतो आणि त्यायोगे ही पृथ्वी सुफलाम होत असतानाही र्पन्याने किधी अहंभाव बाळगून "मी अमुक जीकाणी वर्षेन, अमुक जीकाणी नाही' असे ठरवल्याचे एजेकवातनाही. हे धनंजया, चैतन्य हेच मूळ ब्रह्मस्वरूप आहे. या चैतन्याने अर्धचेतन आणि जड सृष्टीची निर्मिती केली आहे. असे असूनही सर्व जीवमात्र, जड आणि अदृष्ट सृष्टीस चैतन्य सारख्या प्रमाणात आप-पर भाव न ठेवताही आपला भाग देत असते. आणि हे पार्था, हाच शाश्वत-सनातन आणि चिरंतन धर्म आहे. परंतु मानवी धर्माचे काही वेगळेच आहे. मानवी धर्म स्थिर नाही. मानव स्थिर नाही. सृष्टीविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य कष्ट घेतो हे खरे, परंतु हे ज्ञान तो स्वत:च्या स्वार्थासाठी आणि अभ्युदयासाठी वापरीत असतो आणि एवढे करूनही त्याचा स्वार्थही शाश्वत नाही. मानवाचा स्वार्थ शाश्वत नाही, म्हणून त्याचा परमार्थही शाश्वत नाही. म्हणूनच मानवाचे जग हे अनित्य आहे आणि त्याचा धर्मही अनित्य आहे. तेव्हा मनुष्य आपल्या स्वनिर्मित धर्माने वागणार हे जर सत्य आहे, तर त्याला शाश्वत धर्माचा तरी काय उपाय? शाश्वत धर्माने पाहू जाता हे पार्था, तुझे कोणी आप्त नाहीत. कोणी इष्ट नाहीत. तू तुझाच आहेस आणि तू जर तुझाच असशील तर मायेचे आवरण नष्ट करून तथागत दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहावयास हवे. मग भूमीसाठी युद्ध का करायचे हा प्रश्न तुला पडणे स्वाभाविक आहे. कारण पार्था, भूमी ही मनुष्याच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, कारण ती फक्त मानवासाठी निर्माण झालेलीनाही. दुसरे असे की, हे शत्रुतापना, इतर वाईट आहेत हे समजून त्या वाइटाचे निराकरण करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, असे जे समजतात. तेही अज्ञानी होत. तुझा संघर्ष कौरवांशी आहे. ते तुझे आप्त आहेत असेच तू म्हणतो आहेस आणि आप्तांशी संघर्ष नको अशी उपरतीही तुला झाली आहे. परंतु त्यामुळे तुला जो संदेह झाला आहे, त्याचे काही निराकरण होत नाही. कारण तू संन्यास घेण्याच्या गप्पा मारीत असताना दुर्योधनाचा दावा बरोबर आहे, असेही काही केल्या म्हणत नाहीस. आणि जर तुझ्या मते दुर्योधनाचा दावा बरोबर नाही, असे असेल तर तो दावा खोटा करण्यासाठी तरी तुला युद्ध करावे लागेल, नाही तर दुर्योधनाचा दावा खरा आहे, असे मान्य करून तरी तुला युद्ध टाळावे लागेल. आता, युद्ध करायचे की नाही, याचा निर्णय तुला घ्यावाच लागेल. या युद्धात जय मिळेल की पराजय, आप्तांची हत्या होईलकी तुझी, याचा विचार करण्यात काही एक अर्थ नाही, असे मला निश्चयाने वाटते. तेव्हा शोक सोड आणि युद्धास दृढनिश्चयाने तयार हो, असेच माझे तुला सांगणे आहे. अर्जुन म्हणाला हे नारायणा, तू मला शाश्वत धर्म आणि मानवी धर्मातील फरक सांगितलास. हे खरे की, मानवी धर्म हा शाश्वत नाही. परंतु मीही मनुष्यच आहे आणि मनुष्य असल्याने मला मनुष्यांचा धर्म लागू पडतो, हे तर सत्य आहे. मी मनुष्य असल्याने मला विकार आहेत. ते असल्यानेच कौरव हेही माझे आप्तच आहेत, भीष्म माझे पितामह आहेत आणि द्रोणाचार्य माझे गुरू आहेत, हे मी कसे विसरू? हे परमात्मना, स्मृती मनुष्यास असतात आणि त्या अन्य जीवसृष्टीपेक्षा तीव्रतर असतात हे तर तुला ज्ञात आहे. आणि स्मृतीया मनुष्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांचे संगरह करतात आणि मनुष्याचे कोणाही व्यतीशी असणारे वर्तन हे त्याच्या त्या-त्या व्यतिसंदर्भात साचलेल्या स्मृतींशी संबंधित असेल हेही तर सत्यआहे. परंतु हे कृष्णा, अन्य सजीव वा अजीव सृष्टीस स्मृती आहेत की नाहीत हा प्रश्नच आहे. परंतु ज्याअर्थी अन्य पशू सूड घेण्यास तत्पर झाल्याचे पाहण्यात नाही, त्याअर्थी पशूंस स्मृती नसाव्यात किंवा असल्या तरी अत्यल्प असाव्यात, असे मला वाटते. परंतु हे करुणाकरा, मनुष्याच्या स्मृती तीव्रतर असून अगदी बालपणीही घडलेल्या घटना त्याच्या लक्षात राहातात आणि त्या स्मृतींवर आधापरत त्याचे भविष्यातील वर्तन होत असते. मनुष्यास स्मृतीच नसत्या तर आम्हीही येथे युद्धासाठी का मिलो असतो? आणि त्यामुळेच मनुष्यधर्म हा वेगळा असणार आहे, हे निश्चितच आहे. प्रत्येक घटनाच्या स्मृती मानवावर संस्कार करीत जाणार असल्याने मानवी व्यवहार अनित्य राहणार आहे हे तेवढेचखरे. परंतु हे श्रीकृष्णा, मनुष्यास उपरती होऊन त्याने कधी ज्ञानवंतांनीसांगितलेल्या मार्गाकडे पाहून मोक्षासाठी प्रयत्न करू नये असे थोडेच आहे? युद्ध हे नि:संशय भीषण कर्म होय आणि हे कर्म करण्यापेक्षा ते न केलेले बरे असे मला वाटते, तेव्हा तू मला योग्य ते दिग्दर्शनकर. श्रीकृष्ण म्हणाला हे पार्था, मी तुला कर्मविषयक सिद्धांत विस्ताराने विषद करतो. तो तू लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुझा मोह दूर होईल. मनुष्यच काय परंतु ही चराचर सृष्टी प्रतिक्षणी कर्म करीत असते. कर्म केल्यावाचून सजीव काय, अजीव सृष्टीही पळभर राहात नाही. मनुष्यास नकळतही मनुष्य अनेक कर्मे करीत असतो किंवा काही कर्मे करावीत की न करावीत याचे स्वातंत्र्यही मनुष्यास नसते. परंतु ही निसर्गाची शाश्वत कर्मे आहेत आणि या कर्माची कोणतीहीहा मनुष्यास होत नाही. परंतु संकल्प करून त्यानुसार जी कर्मे मनुष्य करीत असतो, त्या कर्मांची इष्टानिष्टता कशी आहे, यापेक्षा त्या कर्माचा संकल्प इष्ट आहे की अनिष्ट यावर कर्माचे इष्टानिष्टत्व ठरत असते. कर्माची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आहे. प्राणिमात्र अन्नपासून होतात. अन्न र्पन्यापासूनि उद्भवते तर र्पन्यि यज्ञापासून होते आणि सारी सृष्टी म्हणजेच यज्ञ होय असेही तू समजावून घे. कर्म अनंत आहे आणि अक्षय आहे. कर्माखेरी जिगाचे रहाटगाडगे पळभरही चालणार नाही, हे तू समजून अस. परंतु संकल्पाने केलेले कर्म हे शुभ आहे की अशुभ, ते सर्वांच्या हितार्थ आहे की त्यातून सर्वांचेच अहित होणार आहे, असे कोणतेही संकल्पधारी कर्म सर्वथा त्याज्य होय. कारण हे शत्रुतापना, असे पाहा की, माझे म्हणून या त्रिभुवनात काही एक कर्तव्य उरलेले नाही. नियत कर्मे करीत असूनही मी नैष्कर्म्य वरत धारण केले आहे, कारण माझ्या मनात या कोणत्याही कर्माचा संकल्प नाही. संकल्प नसता केलेल्या कोणत्याही कर्माचे पातक मनुष्यास जाकटत नाही, असे "कर्म' असूनही कर्म नसते हे समजून अस. कारण मी संकल्पित कर्म करू लागलो तर मीच उत्पन्न केलेले लोक नष्ट करणारा होईन आणि मग सृष्टीचा घात होईल. संकल्पाने जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा तो संकल्प करणारा कर्माचा कर्ता होतो. त्यामुळे कर्त्यास कर्माचा शुभाशुभ दोष लागतो. एवढे नव्हे तर ज्यांच्यावर कर्त्याच्या कर्मांचा परिणाम होतो, त्यांचीही फळे कर्मकर्त्यास जाकटत असतात. प्रत्येक कर्मास कर्मफळ अटळपणे जाकटलेले असते आणि त्याचा भोग प्रत्येक मनुष्यास घ्यावा लागतो. आणि असे पाहा की, ज्ञानी मनुष्यही आपल्या प्रकृतिस्वभावाने वागत असतो. त्यामुळे इंद्रियनिगरह करून कर्म केले असता कर्मफल जाकटत नाही, असे जे मानतात ते मूढ होत. आणि हे कौंतेया, मनुष्य सृष्ट किंवा दृष्ट असे जे काही कर्म करतो ते कामामुळे. काम हा मनुष्याचा मोठाच शत्रू होय. परंतु त्याने मनुष्याच्या आत्म्यास आच्छादिले आहे. त्यामुळे मनुष्यास सत्य आणि शाश्वत ज्ञानाचे कधीही दर्शन होत नाही. त्यामुळे युद्ध हे भीषण कर्म होय, हे जे तू म्हणतो आहेस ते यथार्थच आहे. कारण या कर्मामागे संकल्प आहे आणि एकाच्या संकल्पसिद्धीसाठी अन्य जीवांस अपाय व्हावा असे कर्म शाश्वत धर्माने त्याज्य असायला हवे. परंतु हे पार्था, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझा जो नियत धर्म आहे, त्याचे काय याचाही तू विचार केला पाहिजेस. कारण असे पाहा की, स्वधर्माने वागत असता मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर होय, असे पूर्वज्ञानवंतांनी म्हणून ठेवले आहे. स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार केल्यानेही तुझा नाश होईल, असे मला वाटते. अर्जुन म्हणाला हे ज्ञानवंता, तू असा कोड्यातल बोऊन मला संभरमित का करतो आहेस? एकीकडे युद्ध हे त्याज्य आहे, असे तू म्हणतो आहेस आणि तूच मला माझ्या धर्माने वाग असेही सांगतो आहेस, असे का याचा उलगडा तू कर. श्रीकृष्ण म्हणाला जे काही आपोआप प्राप्त होते, त्याचा संतुष्ट मनाने स्वीकार करणारा मनुष्य हा त्रैलोयातही श्रेष्ठ असतो, परंतु जे प्राप्त होत नाही ते प्राप्त करण्याचा संकल्प करून जो कोणी कर्म करीत असतो तो नि:संशय अधम कोटीत जातो. युधिष्ठिरास राज्यश्री प्राप्त व्हावी या संकल्पाने तू युद्धायमान झाला आहेस आणि म्हणूनच हे युद्ध त्याज्य आहे, असे मला म्हणावेसे वाटते. परंतु ज्या संकल्पाने तू युद्धरत झाला आहेस, त्याच संकल्पाने प्रतिपक्षही युद्धास सज्जा असल्याने शाश्वत धर्म काय आहे आणि आपण आप्तांशी युद्ध का करावे हा तुझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न निरर्थक आहे. आणि तुझा संकल्प प्राचीन असल्याने आणि काळाचे रहाटगाडगे उलटे फिरविता येत नसल्याने तुला तुझ्याच संकल्पापासून हटता येणे शक्य नाही आणि म्हणूनच आता संकल्प कसाही असो, त्या संकल्पार्थ एवढी सिद्धता केल्यानंतर तुला हा कर्मयज्ञ करणे करमप्राप्त आहे. कारण हे शत्रुंया, जिन्माने तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियास योग्य असेच संस्कार तुझ्यावर झाले आहेत. युद्ध करणे हा क्षत्रियाचा विहित धर्म आहे आणि त्या धर्माने युद्ध हे कर्म तुला प्रेय असणे स्वाभाविक आहे. तू युद्ध कर असे जे मी म्हणालो ते तुझ्या धर्मावर आणि संकल्पावर दृष्टी ठेवून. तू या युद्धातून दूर झालास तरीही हे युद्ध होणारच नाही, असेही आता नाही. कारण हे युद्ध फक्त तुझ्या व्यतिगत संकल्पनासाठी होते आहे, असे म्हणणे अर्धसत्य आहे. द्रुपद, धृष्टद्युम्न, भीम, द्रौपदीसह अनेकांचे या युद्धासाठी संकल्प सिद्ध आहेत, कारण त्यांचे व्यतिगत संकल्पही हे युद्ध होण्यासाठी बाबिदार आहेत. तेव्हा हे युद्ध केवळ तुझ्यासाठी होत आहे, असे अहंभावी विधान तू करू नयेस हे उत्तम. त्यामुळे या यज्ञाचा संकल्प झालाच आहे. यज्ञासाठी समिधाही आयत्या तयार आहेत आणि होताही मंत्रध्वनी करीत आहे, असे असता हा यज्ञ होणे हेच श्रेयस्कर. बरे, हे युद्ध केल्याने तुला स्वर्गप्राप्ती होणार की नाही किंवा युद्ध न केल्याने स्वर्गप्राप्ती होईल की नाही याचे तरी ज्ञान तुला कोठे आहे? तुला समजलेला भूतकाळ तेवढा तुला ज्ञात आहे, वर्तमान अत्यंत अस्थिर असून प्रचंड गतीने तो भूतकाळाच्या महापात्रात विलीन होत आहे आणि भविष्य गडद अंधाराने व्याप्त आहे. आणि हे पाहा, संकल्प कसाही असो, तो नेटाने सिद्धीस नेणारा मनुष्य हा संभरमित मनुष्यापेक्षा कधीही श्रेष्ठ होय. तेव्हा हे पार्था, हा संभरम सोड आणि नेटाने संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नकर. अर्जुन म्हणाला तू जे म्हणालास ते ठीकच आहे, परंतु हे श्रीकृष्णा, माझ्या मनाचे समाधान काही केल्या अद्याप होत नाही. युद्ध म्हटले की हत्या अटळ आहे आणि ज्याची हत्या होते तो मृत्यूनंतर कोठे जातो, कसा वागतो, कसा राहतो हे जाणण्याची इच्छा मला झाली आहे. कारण तू सारे जाणतोस. श्रीकृष्ण म्हणाला पार्था, हासुद्धा तुझा नियत मोह आहे. हे शुभंकरा, जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकास अटळ आहे. जो जन्माला आला, त्याला मृत्यू येणारच हे तुला माहीतच आहे आणि असे पाहा की, प्रत्येक जीव सतत मृत्यूस सोबत वागवीत चालत असतो, असे सारे म्हणतात. जो जन्मताना दिसतो, तो जन्मताच मेलेला असतो. फक्त कालरूपी मायेमुळे मनुष्यास जीवन आणि मृत्यू यामध्ये अंतर दिसते आणि केवळ या मधल्या काळातील यश आणि अपयशासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. ज्यांना ही काळाची माया कळली आहे, त्यांच्या दृष्टीने मुळात कोणतीही घटना घडत नाही. कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात असते आणि स्वत: काळ हा मायारूपी आहे. म्हणूनच जे म्हणतात की, सृष्टीची उत्पत्ती झाली, ते मूढ होत किंवा या सृष्टीचा लय होणार आहे असे जे मानतात तेही अज्ञ होत. अवकाश जसे निर्गुण आणि निराकार असते, जे या सृष्टीला जन्म देते असे वरकरणी दिसते तशीच सृष्टी ही खरे तर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु ती असल्याचा भास होतो तो काळामुळे आणि हे लक्षात घे की, खरे तर काळ मागे गेल्यासारखा फक्त भासत असतो. परंतु जर काळनामक तत्त्व आहे, तर ते येते कोठून आणि जाते कोठे, कशात लय पावते हे कोण सांगणार? आणि जर काळच मुळात भरामक आहे, तर ज्या काळामुळे सृष्टीचा किंवा मनुष्याचा जन्म झाल्यासारखे वाटते तो जन्मही खरा नव्हे किंवा मृत्यूही खरा नव्हे. त्यामुळे खर्‍या अर्थाने पाहाशील तर जन्मातच मृत्यू आहे आणि मृत्यूतच जन्म आहे. जीवन हे एका स्थिर, अविचल कालजेयी बिंदूप्रमाणे आहे. ज्याला भरमांतील भरामक जीवन जगायचे आहे, त्याला त्याच जगण्याच्या नियमांनी वागणे इष्ट होय, हे मी तुला सांगतो. परंतु ज्याला हा भरम नष्ट करण्याची विजजगीषा आहे, जो कमबद्रियांचे व्यापार आवरू शकतो, त्याला जन्म नसतो की मृत्यू. त्याला सुख नसते की दु:ख, त्याला भावना नसतात की विचार. तोच कालातीत होतो आणि अवकाशात विलीन होतो. हे पार्था, तुला जे वाटते आहे की, तुझ्याकडून हत्या होणार आहेत, त्या कोणाच्या? येथे मारण्यासाठीच कोणी नाही तर मरणारा कोण असेल? आणि ज्यांना मारशील असे तुला वाटते ते पूर्वीच मेलेले आहेत. आणि त्यात तुझाही समावेश आहे. जे आज घडते आहे, ते पूर्वीही अनंत वेळी घडले आहे आणि पुढेही घडत राहणार आहे. प्रत्येक वेळी हेच संभरम, हेच शोक, याच आकांक्षा आणि त्याच त्या सुखाची कल्पना असते. पार्था हे कधी विस्मरू नकोस. त्यामुळे या लोकानंतर अन्य कोणता लोक मिळेल आणि तेथे सुखे मिळतील की यातना, याचा विचार पार्था, फक्त अज्ञ लोक करीत असतात. हे पार्था, येथे तुला मी समोर दिसतो आहे आणि कृष्ण नामक ही व्यती आहे, असे तू म्हणतोस. त्याचप्रमाणे येथे भीष्माचे, कर्णाचे, दुर्योधनाचे आणि अन्यांचे वास्तव्य आहे. या सर्वांपेक्षा तू स्वत:स वेगळा समजतोस. परंतु हे धनंजया, खरे पाहता सारे एकाकार आहेत. एकाच अस्रि भरमांची रूपे आहेत. मी आणि तू एकच आहोत. खरे तर कोणी शत्रू नाही की कोणी मित्र. मग एकास पुण्य मिळेल आणि दुसर्‍यास पाप असे कोणतेही कर्म अस्तित्वात नाही. एकास मोक्ष मिळेल, तर दुसर्‍यास नरक असेही काही नाही. परंतु मनुष्य आपल्या प्रत्येक कर्मास समर्थन देण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आश्रय धरीत असतो आणि हेच त्याच्या अध:पतनाचे खरे कारण आहे. कारण जर मनुष्य हाच एक भरम आहे, तर त्या भरमाला आधार देणारे तत्त्वज्ञानही एक भरमच नाही काय? परंतु मनुष्य नुसत्या भरमात नसतो, तर संभरमातही असतो. तो भरममय असल्याने तो स्वत:विषयीही भरम निर्माण करीत कर्तव्य आणि अकर्तव्याच्या द्वंद्वात सापडलेला असतो. अमुक एक कर्तव्य केल्याने मला सुख मिळेल की ते कर्तव्य न करण्याने सुख मिळेल असे द्वंद्व त्याला सामोरे येत असते आणि कोणीही महापुरुष असला आणि त्याने कोणतेही कर्तव्य इष्ट समजून जाणतेपणे पार पाडिले तरीही त्याला दोष देणारे ऊनिच भरमित लोक या पृथ्वीतलावर नसतीलच असे नाही. तेव्हा जे ज्ञानी आहेत त्यांनी कर्म केले काय आणि न केले काय, अज्ञ लोकांनीही कर्म केले काय आणि न केले काय,कोणाचेही शाश्वत कल्याण किंवा शाश्वत अकल्याण होऊ शकत नाही. तेव्हा कर्मसंबंधाने अभिमान बाळगणे सर्वथा गैर होय. तेव्हा हे युद्धरूपी कर्म त्वां केल्याने जे मृत्यू पावणार आहेत, त्यांचे काय होईल किंवा तुझे काय होईल ह्या विचारांमध्ये काहीएक अर्थ नाही. कारण जो स्वत:च मृत आहे, अशास कोण कायमारणार? अर्जुन म्हणाला हे गोपाळा, तू तर मला हे अतिभयंकर तत्त्वज्ञान सांगितलेस. तू म्हणतोस त्याप्रमाणे जर सत्य असेल, तर जे मला दिसते, अनुभवास येते आणि ज्या ज्ञानाने अनुभवांचे विश्लेषणही करता येते ते सारेच असत्य होऊन जाईल. मग जर काही सारेच भरम आहेत, तर हे सारे का आणि कशासाठीहोते? मी जन्माला आलो, हा मी तुझ्यासमोर असल्याने सत्य अनुभव आहे, तद्वतच आम्हा पांडवांना राज्याधिकारापासून वंजात करण्यासाठी धार्तराष्ट्रांनी ज्या ज्या लृप्त्या लढवल्यात याचाही अनुभव असल्याने तेही सत्य आहे. आता यद्वत तू माझ्यासमोर आहेस, आकाशात अनंत तारकामंडळ तेजाने प्रेपरत आहे, तद्वत हे सारे अनुभव घेणारा मी सुद्धा तुझ्यासमोर असल्याने हे सारे सत्य असलेचपाहिजे. आणि जे सनातन सत्य, तूही एक मानव सांगतो आहेस, तर तुझ्या सत्यातही काहीतरी खोट असली पाहिजे. शिवाय तू म्हणतोस तसेच खरे मानले तर मग या सृष्टीचा नियंता म्हणजे तूच तो अत्यंत करूर आणि जीवघेणे खेळ करणारा आहेस, असेच मला म्हणावे लागेल. तेव्हा हे मधुसूदना, खरे सत्य तेवढेच मला सांग. असे खेळ माझ्याशी करून मला अधिकच दिशाहीन करू नकोस. श्रीकृष्ण म्हणाला हे कौंतेया, सत्य मानवास नेहमीच भयभीत करते. म्हणूनच जे सत्य प्रिय वाटते तेच तो स्वीकारतो आणि आनंदात लीन होतो. सूर्य जोवर लोभस दिसतो तोवर त्याकिडे दुरून पाहण्यास महात्म्यांनाही आनंद होतो. परंतु जेव्हा सूर्याचे लोभस तेज हे भरम असून खरा सूर्य पाहताच येत नाही हे लक्षात येते तेव्हा मात्र मनुष्याचा भरमनिरास होतो आणि सूर्याचेही भय वाटू लागते. प्रत्येक मनुष्यमात्रास वाटते की, या सृष्टीचा रचनाकर्ता दयाळू आहे आणि त्याची मनोभावे अर्चना केली की आपल्याला सुख मिळेल. परमात्मा दयाळू नाही, हे सत्य मनुष्याच्या कधीही लक्षात येत नाही. यापेक्षा मनुष्याचे अधिक दुर्दैव ते काय असणार? हे परंतपा, लक्षपूर्वक ऐक, मी दयाळू नाही की निर्दय नाही. मी कोणावर कृपा करीत नाही, की अवकृपा करीत नाही. जो मला भतो त्याला मी निकटतम मानेन आणि जो भणारि नाही त्याला अन्य लोक मिळेल असेही काही नाही. कारण जर भरममय का होईना सारे लोक माझ्यातच वास करीत असतात तर कोणाहीबद्दल आपरि भाव मी कसा ठेवीन? हे पार्था, मला तूही प्रिय नाहीस, की दुर्योधनही प्रिय नाही. मला हे विश्व प्रियही नाही की अप्रियही नाही. या विश्वात काहीही त्याज्यही नाही की प्रेयही नाही. खरे तर मी याही बाजूस नाही की त्याही बाजूस नाही. मग मला तू भलेसि की नाही हे महत्त्वाचे नाही. कारण मला भजावे की अन्य कोणास हा तुझा प्रश्न आहे आणि कधी कधी भरमही भरमाला शांती देऊ शकतो, तद्वत कोणाचीही पूजा ही कोणासही शांती देऊ शकेल; पण म्हणून माझी कृपा झाली किंवा अवकृपा झाली, असे जे समजतात, ते मूढ-अज्ञ नि होत. तू म्हणतोस की तू जन्माला आलास आणि माझ्यासमोर आहेस म्हणून तुझे आस्तित्व सत्य आहे. धृतराष्ट्रांनी तुम्हा पांडवांना यातना दिल्या हा तुझा अनुभव तुझ्या दृष्टीने सत्य आहे. आणि जर तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझा अनुभव सत्य असेल तर दुर्योधनाचाही जन्म झाला आहे, हे सुद्धा सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हा पांडवांचा राज्यावर अधिकार नाही, असे त्याला जे वाटते तेही सत्य आहे आणि जर तुझेही सत्य आणि त्याचेही सत्य तर मग "सत्य' विषयक अनेक प्रवाद निर्माण होऊ शकतील. आणि दुर्योधन तेवढा दुष्ट आणि तुम्हीच धर्मशील असे ठरवायला तरी नेमका कोणता आधार आहे बरे? हे कौंतेया, या भरमाचा पडदा तरी मी दूर करू इच्छितो. असे पाहा की, एका स्त्रीशी पाच बंधू मिळून विवाह करणारे आणि त्या स्त्रीची अनुज्ञाही न घेणारे तुम्ही, या धरतीवरील या भरामक काळातील कोणता नियम पाळलात बरे? ज्या द्रुपदाचा पूर्वी पराभव करून तो आपल्या गुरूचा शत्रू आहे, हे विदित असताही नंतर त्याच्याशी सख्य साधणारे तुम्ही पांडव कोणत्या नियमाने चालले आहात बरे? ज्या कुंतीस, कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे हे, सत्यज्ञान असताही अद्यापही तुम्हा पांडवांस सांगत नाही, त्यामागील गूढार्थ काय बरे? मी अशी अनेक उदाहरणे, हे पार्था तुला सांगू शकतो आणि असे असूनही आपण धर्मशील आहोत अशी वल्गना तू कशी करू शकतोस? जे अधर्माने वागत असतात त्यांनी, इतरांनी मात्र धर्माने वागले पाहिजे किंवा तुम्ही स्वत: ज्या तत्त्वास धर्म मानता त्याच धर्माने इतर सर्वांनी वागायला हवे, असे समजण्यात किंवा आगरह धरण्यात कोणता अर्थ आहे बरे? एखाद्या धीवराने जाळे फेकले आहे, हे ज्ञात असता त्या जाळ्यात जे मासे अडकतात तेषी की धीवरषी? धर्म फार सूक्ष्म आहे. हे पार्था, तुम्ही म्हणता की जुगार हा अन्यायी होता आणि त्यात तुमचे राज्य हिरावले गेले. जुगार अन्यायी होता तर तुम्ही स्वतंत्र राजे असल्याने, जसे आज युद्धोत्सुक आहात, तसेच तेव्हाच युद्ध करण्याचा मार्ग तुमच्याकडे खुला होता. परंतु तुम्ही तेव्हा युद्ध टाळलेत आणि द्यूत न्याय्य होते हे अप्रत्यक्षपणे मान्य केलेत. मग दुर्योधनास त्याचा दोष कसा लागतो? शिवाय आपली या सृष्टीच्या कणावरही, अगदी स्वत:च्या देहावरही, सत्ता नाही हे मान्य असतानाही स्वत:स आणि पत्नीस डावावर कसे लाविलेत? जे कर्म तुम्ही स्वत:च्या इच्छेने केलेत, स्वत:स व पत्नीस डावावर लावण्याचा अधिकार नाही हे माहीत असताही स्वत:स व पत्नीस डावावर लाविलेत त्याबद्दल अन्य कोणाकडेही कोणता दोष येतो बरे? आणि एवढे असताही आज तुम्ही पांडव युद्धास तयार झाला आहात. आपण तेवढे धर्मशील आहोत असे म्हणत आहात. उद्या युद्ध सुरू होणार आहे, हेही तुला ज्ञात आहे आणि तरीही युद्धसंन्यासाबाबत तू बोलतो आहेस. म्हणजे तुझा संकल्पही दृढ नाही, हेच यातून प्रतीत होत नाही काय? तेव्हा तुझा संकल्प सत्य नाही. हे पांडवा, म्हणूनच तूही सत्य नाहीस आणि तू जेवढा सत्य नाहीस हे सत्य आहे तद्वतच आज आणि उद्या हे अंतरही सत्य नाही. युद्धही सत्य नाही आणि ज्यांच्याशी तू युद्ध करेन म्हणतोस किंवा ज्यांच्याशी युद्ध करणार आहेस, असे म्हणतोस तेही सत्य नाही. कारण ज्यास शाश्वत धर्म म्हणतात, असा धर्म मानवी जगतात कधीही अस्तित्वात नव्हता. मुंग्यांना वारुळ मेरुपर्वत वाटतो आणि छोटा तलाव महासागर वाटतो. त्याचप्रमाणे मनुष्याचे आहे. परंतु हे विश्व अतिविराट असूनही शून्य आहे, याचे ज्ञान त्यास कधी होत नाही. हे अर्जुना, तू संभरमित आहेस, कारण तुझा संकल्प संभरमित आहे. तुझे अस्तित्व हे सुद्धा संभरमित आहे. तू म्हणतोस की नभोमंडपीच्या तारका हे सत्य आहे. परंतु तेही सत्य नाही. हे कौंतेया, काल हा केवढा भरामक आहे, हे तुला माहीत नाही. तू ज्या तारकांना शा या क्षणी पाहात आहेस, तशाच त्या या क्षणी नाहीत आणि याक्षणी त्या कशा आहेत, हे ज्ञात होण्याचे मानवाकडे कोणतेही साधन नाही, हे तुला माहीत नाही. हे परंतपा, जेव्हा तू आकाशाकडे पाहतोस तेव्हा तो आकाशाचा वर्तमान नसतो, तर तू अतिदूरच्या भूतकालाकडे पाहात असतोस. कदाजात या क्षणी अनेक तारका पतन पावलेल्या असतील तर त्यांची जागा नव्या तारकांनी घेतलेली असेल. आणि भवितव्याकडे पाहण्याचे तर मनुष्याकडे कोणतेही साधन नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भरामक आहेत. कारण खरे तर कोणी द्रष्टा नाही आणि कोणतेही दृश्य नाही. परन्तु कालनामक राशीमुळे द्रष्टा आणि दृश्य हा विभेद निर्माण होतो. तेव्हा मी तुझ्यासमोर उभा आहे हे सुद्धा खरे नाही, कारण "मी' म्हणजे नेमके काय याचे ज्ञानही तुला नाही. मी तुला कधी द्वारकाधीश वाटतो, तर कधी परमात्मा. मी कधी सखा वाटतो, तर कधी शत्रू. "मी' म्हणजे काय याचे तुझे ज्ञान जर अपूर्ण असेल तर मी "मी' आहे हे तुझे ज्ञानही भरामक होय. आणि तू तुझ्या जीवनात जे अनुभव घेतलेस आणि तो जो तू माझ्यासमोर उभा आहेस असे जे काही तू म्हणालास, तेही सत्य नाही. कारण तुझे अनुभव जे तुला तुझे वाटतात आणि त्या अनुभवांचा अन्वयार्थ जो तू काढला आहेस, तोही सत्य नाही. तुझा अनुभव तू तुझ्या परिप्रेक्ष्यातून पाहतो आहेस म्हणून तू शाश्वत अर्थाने माझ्यासमोर उभा आहेस असेही नाही. नदीमध्ये त्याच पाण्यात हात घालता येत नाही. तो हातही तोच नसतो. आणि त्याहीपुढे जाऊन खरे तर पाणीही नसते आणि हातही नसतो. हे पार्था, मनुष्यास कधीही ज्ञान होत नाही. ज्ञानाचा समज होत असतो. आणि समज सिसेलितात तसतसे मानवाचे ज्ञानहीलत असते आणि जे परिवर्तनीय आहे आणि परिवर्तनीय म्हणून काळासह आहे ते ज्ञान हे सत्य ज्ञान असू शकत नाही. कारण पार्था, असे ज्ञानीनि म्हणतात की चराचर सृष्टी भूताकडून भविष्याकडे जात असते आणि काळ मात्र भविष्यातून येवून भूतकाळात विलीन होत असतो. त्यामुळे मनुष्य जगत असतो असे म्हणणेही तर्कदुष्ट आहे. खरे तर तो भविष्यातून वर्तमानात येणार्‍या काळात जगत असतो आणि काळ मात्र भूतकाळात विलीन होत असतो. आणि मनुष्य मात्र भूतकाळातून वर्तमानात आणि नंतर भविष्यकाळात प्रवेश करीत असतो. असा परस्पराजविरोध प्रवाह, आणि असा प्रवाह की जो मनुष्यास जिवंत असल्याचे समाधान देतो तो काळ, एवढा भरामक आहे. आणि याच काळाची गंमत अशी की, वर्तमान क्षणिक असतो. भूतकाळ सीमित असतो आणि भविष्यकाळ प्रदीर्घ असतो. आणि तरीही मनुष्यास वाटते की तो धर्मशील आहे आणि त्याला मोक्षाचा अधिकार आहे. परंतु काळ हाच भरामक असल्याने कोणासही इतिहास नाही आणि कोणासही भविष्यकाळ नाही. मग वर्तमानाची तर गोष्टच सोड. मग मोक्ष कोठे आहे? आणि अनुभवास येते ते सारे सत्यच असे विधानही काही केल्या करता येत नाही. सूर्यराज उगवतो असे सत्य आपल्याला अनुभवयाला मिळते. परंतु सूर्य उगवत नसून पृथ्वीच स्वत:भोवती फिरत असल्याने सूर्य स्थिर असूनही चर वाटतो असे असूच शकणार नाही काय? तेव्हा तुला माझा अनुभव येतो आहे हे विधानही जर सत्य नसेल तर तुला कौरवांच्या संदर्भात काय अनुभव आला तोही असत्य असू शकेल. किंवा कौरवांना तुमच्या संदर्भात जो अनुभव आला तोही असत्य असू शकेल. तेव्हा जरन्ही बाजू सत्य नाहीत तर सत्याचा जय होईल हे विधानही असत्य आहे. परंतु तुला तुझे भरम आहेत आणि कौरवांना त्यांचे भरम आहेत. या युद्धात पराजित झाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतीलच असेही नाही किंवा जय मिळाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतील असेही नाही. आणि जो नंतर याचा इतिहास सांगितला जाईल तोही सत्य असेलच असेही नाही. तेव्हा एवढ्या असत्य इतिहासात आणि भरामक वर्तमानात आपण जगत असताना आणि आपणच उद्या एक नवा असत्य इतिहास घडवीत असताना धर्म आणि सत्याच्या वल्गना करण्यात अर्थ तरी काय बरे? आपण नेहमीच भरामक इतिहासात जगत असतो आणि भरामक इतिहासाला जन्म देत असतो. पण असे असूनही जी सत्यसृष्टी या कालापासून किंवा आपल्या तथाकथित अनुभवांपासून अलिप्त असल्याने, आणि जी स्वत:तच शून्य असल्याने ज्याला आपण इतिहास म्हणतो तो इतिहास नसून आपल्या साजेयस्कर स्मृतींचा एक हिस्सा असतो. आणि या स्मृतीही खर्‍या नसतात कारण जो स्मृतींचा अर्थ देतात तो कधी खरा नसतो. आणि इतिहास कधीही वर्तमानातलता येत नाही. आणि इतिहासाचा अन्वयार्थ मग स्वाभाविकपणेच असत्य असतो. कारण जे नसतेच ते प्रदीर्घ वाटत असताही अल्प असते. हे सारेच जसे नाही तसे वाटत असल्याने तो एक भरमच होय. तेव्हा हे पार्था, तू जविंत आहेस असे तुला वाटते परंतु तू जविंत नाहीस, तसेच हे यच्चयावत विश्वही जविंत नाही. असे असताही तुला तू जविंत मानतोस आणि मलाही तू तुझ्या परिप्रेक्ष्यात का होईना अनुभवतो आहेस ते काळामुळे आणि हा काळ भूतकाळाकडून भविष्याकडे जात नसून भविष्याकडून भूतकाळाकडे जात असतो. आणि हा विरोधाभास असल्याने तुझेही अनुभव विरोधाभासी आहेत हे निश्चित समजून अस. आणि या भरमात का होईना, पण एक जीवन आहे. ते जीवन आकलनात येत नसताही ते आकलनात आले आहे असे वाटते, तोही एक भरम होय. आणि जो आकलन करीत असतो, तो आकलनकर्ता यथार्थ आकलन करून आपले वर्तन करेल असे काही निश्चयाने सांगता येत नाही. तेव्हा आकलन आणि आकलनकर्ता यांतही विरोधाभास आहे असे दिसते तर मग आकलनही खरे नाही आणि आकलनकर्ताही खरा नाही. कारण घटना जर एकच असेल तर तिचे आकलन भिन्न कसे हा प्रश्न निर्माण होईल आणि आकलन भिन्न असेल तर घटना ही पुन्हा निरपवाद आणि अगम्य होऊन जाईल. तेव्हा हे पार्था, मायेस दूर कर आणि माझ्याप्रमाणेच समजावून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुझे आकलन आणि माझे आकलन यात फरक पडणार आहेच आणि जर असेच असेल तर ज्ञानाच्या आणि परमार्थाच्या बाता मारण्यात अर्थ तरी काय बरे? उद्या युद्ध सुरू होणार आहे. तू युद्ध करणार की नाही हा खरा प्रश्न नाही; पण संन्यास घेऊनही तुझ्या मनातील युद्ध संपणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे. आणि युद्ध मनात असो की प्रत्यक्षात, तेही कर्मच आहे. आणि कर्म म्हटले की त्याला फळ हे अटळपणे जाकटलेले असते. मग ते भरामक का होईना आणि भरमातच जगणार्‍या मानवास कर्मफलत्वे सुख मिळणे किंवा दु:ख होणे हेही अटळच आहे. तेव्हा तुला मानसिक युद्ध करायचे की प्रत्यक्ष याचा निर्णय, हे पार्था घे. असा हताश आणि निराश होऊ नकोस. कारण सत्य फार दूर आहे. पण तुला जे सत्य वाटते, त्यासाठी का होईना शोक सोड. एवढे बोलून श्रीकृष्ण स्वस्थ उभे राहिले. पदचरणांशी बसलेला अर्जुन अश्रू ढाळीत होता. आपला हा सखा आज एवढा परका का झाला हेच त्याला कळत नव्हते. त्याने श्रीकृष्णाचा चरणस्पर्श केला आणि म्हणाला, हे श्रीकृष्णा, दयाघना, तू आज केवळ बाजूललीस म्हणून माझ्या आत्म्याच्या एवढ्या चिंध्या केल्या आहेस. या जगात काहीही, अगदी तू सुद्धा स्थिर नाहीस याचा आता मला साक्षात्कार झाला आहे. असो, मी योग्य वाटेल तसे करेन. आणि एवढे बोलून, पाठ वळवून, कौंतेय अर्जुन निघून गेला. परमात्मस्वरूप श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि आपल्या शिबिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. यानंतर नेमके काय झाले हे महत्त्वाचे नाही. कौरव आणि पांडव या मातब्बर पक्षांत युद्ध झाले की नाही, झाले असल्यास त्यात नेमका कोणाचा जय झाला आणि जे पराजित झाले त्यांचे काय झाले यात रस घेण्यात फारसा अर्थ नाही. कारण इतिहास नावाची कोणतीही गोष्ट सत्य नाही. आणि जे काही सत्य नाही ते जाणण्यात अर्थ नाही असेच नाही का श्रीकृष्णाने सांगितले? तेव्हा इतिहास अज्ञात असण्याएवढे सुख नाही. वर्तमान नाहीच असे मानण्याएवढे निरपेक्ष सत्य नाही आणि जर इतिहास नाही आणि वर्तमानही नाही तर भविष्य आहे असे मानणे मूढपणाचेच लक्षण नाही काय? म्हणून कौरव-पांडवांचे नेमके काय झाले, कोणाचा पक्ष सत्य होता आणि कोणाचा असत्य हे जाणण्यात तरी काय अर्थ आहे, जेव्हा काहीच सत्य नाही? काल शून्य आहे. हे जाणणे हेच खरे सत्यधर्माचे ज्ञान होय. सकाळची वेळ. काचेचे ग्लासेस लावलेल्या इमारतीच्या जंगलातील एक इमारत आणि त्या इमारतीच्या चवथ्या मजल्यावर एक एक करुन एका आय टी कंपनीचे कर्मचारी यायला लागले होते. दहा वाजायला आले आणि कर्मचाऱ्यांची गर्दी अचानक वाढली. सगळे कर्मचारी ऑफीसमध्ये जाण्याची गर्दी आणि घाई करु लागले. कारण एकच होते - उशीर होवू नये. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ दरवाजावरच स्मार्ट कार्ड रिडरवर नोंदली जात होती. नुसती जाण्याची वेळच नव्हे तर त्यांचा दिवसभरातील एकूण आत बाहेर जाण्याचा वावरच त्या कार्ड रिडरवर नोंदवीला जात होता. कंपनीचा जो काचेचा मुख्य दरवाजा होता त्याला मॅग्नेटीक लॉक होते आणि तो दरवाजा कर्मचाऱ्यांनी आपापले कार्डस दाखविल्याशिवाय उघडत नव्हता. त्या कार्ड रिडरमुळे कंपनीचा नियमितपणाच नाही तर सुरक्षाही राखल्या जात होती. दहाचा बझर वाजला आणि तोपर्यंत कंपनीचे सर्व कर्मचारी आत पोहोचले होते. अगदी कंपनीची डायरेक्टर आणि सिईओ अंजलीसुध्दा. अंजलीने बी.ई कॉम्प्यूटर केले होते आणि तिचं वय जास्तीत जास्त 23 असेल. तिचे वडील, आधीचे कंपनीचे डायरेक्टर आणि सिईओ, अचानक वारल्यामुळे, वयाच्या मानाने कंपनीची फार मोठी जबाबदारी तिच्यावर येवून पडली होती. नाही तर तिचं हसण्या खिदळण्याचं आणि मजा करण्याचं वय. तिचे पुढचे शिक्षण यु.एस. ला घेण्याची तिची इच्छा होती. पण वडील वारल्यामुळे तिची इच्छा अपूर्णच राहाली होती. तीही कंपनीची जबाबदारी तर चोखपणे बजावीत होतीच सोबतच आपला अल्लडपणा अवखळपणा जपण्याच्या सारख्या प्रयत्नात असायची. अंजली हॉलमधून दोन्ही बाजुला असलेल्या क्यूबिकल्सच्या मधील रस्त्यातून आपल्या कॅबिनकडे निघाली. तशी ती ऑफीसमध्ये कॅजुअल्सच वापरणे प्रिफर करायची - ढीला पांढरा टी शर्ट आणि कॉटनचा ढीला बदामी पॅंन्ट. अगदीच एखाद्या प्रोग्रॅममध्ये किंवा स्पेशल क्लायंटसोबत मिटींग असेल तेव्हाच ती फॉर्मल ड्रेस घालायची. ऑफीसच्या बाकी स्टाफ आणि डेव्हलपर्सनाही फॉर्मल ड्रेसची काही ताकीद नव्हती. ते ज्यात कंफर्टेबल असतील असा साधा आणि सुटसुटत पेहराव करण्याची सगळ्यांना सूट होती. ऑफीसमधल्या कामाबद्दल अंजलीचं एक सूत्र होतं. की तुम्ही ऑफीसमधलं कामही ऍन्जॉय करु शकले पाहिजे. जर तुम्ही कामही ऍन्जॉय करु शकले तर तुम्हाला कामाचा शिन कधीच येणार नाही. तिने ऑफीसमध्येही काम आणि विरंगूळा किंवा छंद याची चांगली सांगड घालून तिच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टीव्हीटी वाढवली होती. तिने ऑफीसध्ये स्विमींग पुल, झेन चेंबर, मेडीटेशन रुम, जीम, टी टी रुम अश्या वेगवेगळ्या सुविधा कर्मचाऱ्यांना देवून त्यांची ऑफीसची ओढ आणि आपलेपणा वाढविण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिला त्याचे चांगले परिणामही दिसायला लागले होते. तिच्या ऑफीसकडे जाता जाता तिला तिच्या कंपनीचे काही कर्मचारी क्रॉस झाले. त्यांनी तिला अदबीने विश केलं. तिनेही एक गोड स्माईल देत त्यांना विश करुन प्रतिउत्तर दिलं. ते नुसते भितीपोटी तिला विश करीत नव्हते तर तिच्या कर्मचाऱ्यांच्या मनात तिच्याबद्दलचा तिच्या कर्तुत्वाबद्दलचा एक आदर दिसत होता. ती तिच्या कॅबिनजवळ पोहोचली. तिच्या कॅबिनचंही एक वैशीष्ट होतं की तिची कॅबिन बाकिच्या कर्मचाऱ्यांपेक्षा भारी सामानाने भरलेली नसून ज्या सुविधा तिच्या कर्मचाऱ्यांना होत्या त्याच तिलाही तिच्या कॅबिनमध्ये पुरवल्या गेलेल्या होत्या. 'मीही तुमच्यातलीच एक आहे' ही भावना त्यांच्यात रुजावी म्हणून कदाचित असे असेल. ती तिच्या कॅबिनजवळ पोहोचताच तिने तिच्या कॅबिनचं स्प्रिंग असलेलं ग्लास डोअर आत ढकललं आणि ती आत शिरली. अंजलीने ऑफीसमध्ये आल्याबरोबर रोजची महत्वाची आणि आवश्यक कामे उरकून घेतली. जसे महत्वाची पत्र, महत्वाच्या ऑफीशियल मेल्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स इत्यादी. काही महत्वाच्या मेल्स होत्या त्यांना उत्तरं पाठवली. काही मेल्सचे प्रिट्स घेतले. सगळी महत्वाची कामे उरकल्यावर तिने तिच्या कॉम्प्यूटरवर चॅटींग सेशन ओपन केलं. कामाचा शिण जाणवायला लागला की किंवा वेळ असल्यास ती चॅटींग करायची. हा तिचा रोजचाच खाक्या होता. एवढ्या मोठ्या कंपनीला सांभाळायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कामाचा ताण, टेन्शन्स यांपासून विरंगुळा मिळविण्यासाठी तिने चॅटींग हा चांगला पर्याय शोधला होता. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. तिने चॅटींग विंडो मधील मेसेजेस वाचता वाचता फोन उचलला. अगदी कॉम्प्यूटरच्या पॅरेलल प्रोसेसिंग सारखी ती सगळी कामं एकाच वेळा हाताळू शकत असे. '' यस मोना'' '' मॅडम .. नेट सेक्यूराज मॅनेजींग डायरेक्टर ... मि. भाटीया इज ऑन द लाईन...'' तिकडून मोनाचा आवाज आला. '' कनेक्ट प्लीज'' '' हाय'' चॅटींगवर कुणाचा तरी मेसेज आला होता. अंजलीने कुणाचा मेसेज आहे ते चेक केलं. 'टॉम बॉय' मेसेज पाठविणाऱ्याने धारण केलेलं नाव होतं. ' काय लागट माणूस आहे हा' अंजलीने विचार केला. हा 'टॉम बॉय' नेहमी चॅटींगवर असायचाच असायचा. आणि अंजलीने चॅटींग सेशन ओपन केल्याबरोबर त्याचा मेसेज हमखास यायचा. ' याला काय काम धंदे आहेत की नाहीत... सदान कदा नुसता चॅटींगवर पडलेला असतो' अंजलीने आजही त्याला इग्नोर करण्याचं ठरविलं. दोन तिन ऑफलाईन मेसेजेस होते. अंजली कान आणि खांद्याच्या मधे फोनचं क्रेडल पकडून की बोर्डवर सफाईने तिची नाजुक बोटं चालवीत ते ऑफलाईन मेसेजेस चेक करु लागली. '' गुड मॉर्निंम मि. भाटीया... हाऊ आर यू'' अंजलीने फोन कनेक्ट होताच मि. भाटीयाचं स्वागत केलं आणि ती भाटीयाचं बोलणं ऐकण्यासाठी मधे थांबली. '' हे बघा भाटीयाजी... वुई आर द बेस्ट ऍट अवर क्वालीटी ऍन्ड डिलीवरी शेड्यूलस... यू डोन्ट वरी... वुई विल डिलीवर युवर प्रॉडक्ट ऑन टाईम... आमची डिलीवरी वेळेच्या नंतर झाली असं कधी झालं आहे का?... नाही ना?... देन डोंट वरी... तुम्ही एकदम निश्चिंत राहा... यस... ओके... बाय.. '' अंजलीने फोन ठेवून दिला आणि पुन्हा दोन डीजीट डायल करुन फोन उचलला, '' जरा शरवरीला आत पाठव'' फोनवरच्या संभाषनामुळे अंजलीचं कॉम्प्यूटरवर लक्ष राहालं नव्हतं. कारण महत्व म्हटलं तर आधी कामाला होतं आणि बाकिच्या गोष्टी नंतर. तेवढ्यात कॉम्पूटरवर 'बिप' वाजली. चॅटींग विंडोत अंजलीला कुणाचा तरी मेसेज आला होता. अंजलीनं चिडून मॉनिटरवर बघितलं. ' पुन्हा त्या टॉम बॉयचाच मेसेज असणार' तिने विचार केला. पण तो मेसेज टॉम बॉयचा नव्हता. म्हणून तो ती वाचायला लागली. मेसेज होता - ' तुला माझा मित्र व्हायला आवडेल?' मॉनिटरवर अजुनही ' तुला माझा मित्र व्हायला आवडेल?' हा चॅटींगवर आलेला मेसेज दिसत होता. आता याला काय प्रत्यूतर पाठवावे की जेणेकरुन हा आपला पिछा सोडेल असा विचार करीत अंजलीने मेसेज पाठविणाऱ्याचं नाव बघितलं. पण तो 'टॉम बॉय' नव्हता हे पाहून तिला हायसं वाटलं. ' का नाही? जरुर... मैत्री करण्यापेक्षा निभावनं महत्वाचं असतं' अंजलीने मेसेज टाईप केला. तेवढ्यात शरवरी - अंजलीची सेक्रेटरी आत आली. '' यस मॅडम'' '' शरवरी तुला मी कितीदा सांगितलं आहे ... की डोन्ट कॉल मी मॅडम... कॉल मी सिम्प्ली अंजली... तु जेव्हा मला मॅडम म्हणतेस मला एकदम 23 वर्षावरुन 50 वर्षाचं झाल्यासारखं वाटतं'' अंजली चिडून म्हणाली. ती तिच्यावर रागावली तर खरं पण मग तिला तिचंच वाईट वाटायला लागलं. अंजली अचानक एकदम गंभीर होवून म्हणाली, '' खरं म्हणजे पापा अचानक गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर येवून पडली आहे... नाहीतर हे माझे हसण्या खिदळण्याचे दिवस आहेत... खरं सांगू... मी तुला इथे मुद्दाम बोलावून घेतलं...की जेणेकरुन या अशा तणावपुर्ण कामाच्या वातावरणात माझं हसणं, खिदळणं कुठे हरपून ना जावं... कमीत कमी तू तर मला अंजली म्हणू शकतेस... लक्षात ठेव तू माझी मैत्रिण आधी आणि सेक्रेटरी नंतर आहेस... समजलं'' अंजली म्हणाली. '' यस मॅडम ... आय मीन अंजली'' शरवरी म्हणाली. अंजली शरवरीकडे बघुन गालातल्या गालात हसली. शरवरी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली तेवढ्यात पुन्हा कॉम्पूटरचा अलर्ट बझर वाजला. चाटींगच्या विंडोत पुन्हा मेसेज आला होता - 'तुझं नाव काय आहे?' ' माझं नाव अंजली ... तुझं ?' अंजलीने मेसेज टाइप केला. अंजलीने एंन्टर की दाबली आणि बोलण्यासाठी शरवरी बसली होती तिकडे आपली चेअर फिरवली. '' तर नेट सेक्यूराचा प्रोजेक्ट काय म्हणतो?...'' अंजलीने विचारले. '' तसं सगळं तर ठिक आहे ... पण एक मॉड्यूल सिस्टीमला वारंवार क्रॅश करतो आहे ... बग काय आहे काही समजत नाही आहे... '' शरवरीने माहिती पुरवली. तेवढ्यात चॅटींगवर पुन्हा मेसेज आला- ' माझं नाव विवेक आहे... बाय द वे... तुझ्या आवडी-निवडी काय आहेत... आय मीन हॉबीज?' अंजलीने कॉम्पूटरकडे बघितले. आणि त्या मेसेजकडे दुर्लक्ष करीत ती चिंतायुक्त चेहऱ्याने शरवरीकडे बघायला लागली. '' त्या मॉड्यूलवर कोण काम करतो आहे?'' अंजलीने विचारले. '' दिनेश माहेश्वरी'' शरवरीने माहीती पुरवली. '' तोच ना जो मागच्या महिण्यात जॉईन झाला तो?'' अंजलीने विचारले. '' हो तोच'' '' त्याच्या सोबत ताबडतोब कुणीतरी सिनीयर असोशिएट कर आणि सी दॅट द मॅटर इज रिझॉल्वड '' अंजलीने क्षणातचं त्या प्रॉब्लेमचे मुळ हेरुन त्यावर उपायसुध्दा सुचवला होता. '' यस मॅडम... आय मीन अंजली'' शरवरी अभिमानाने अंजलीकडे पाहत म्हणाली. तिला तिच्या मॅनेजमेंट कौशल्याचे नेहमीच असे कौतूक वाटत असायचे. अंजलीने पुन्हा आपला मोर्चा आपल्या कॉम्प्यूटरकडे वळवला. शरवरी तिथून उठून बाहेर निघून गेली आणि अंजली कॉम्प्यूटरवर आलेल्या चॅटींग मेसेजला प्रतिउत्तर टाईप करु लागली. ' हॉबीज ... हो .. वाचन, पोहणे... कधी कधी लिहिणे आणि ऑफ कोर्स चॅटींग' अंजलीन मेसेज टाईप करुन 'सेन्ड' की दाबून पाठवला आणि चॅटींगची विंडो मिनीमाईझ करुन तिने मायक्रोसॉफ्ट एक्सेलची दुसरी एक विंडो ओपन केली. ती त्या एक्सेल शिटमधिल आकडे वाचत त्यात गढून गेली. कदाचित ती तिच्या कंपनीच्या कुण्या प्रोजेक्टचे फायनांसिएल डिटेल्स चेक करीत होती. तेवढ्यात पुन्हा एकदा चॅटींगचा मेसेज आला. ' अरे वा .. काय योगायोग आहे... माझ्या आवडीनिवडीसुध्दा तुझ्या आवडीनिवडीशी जुळताहेत... अगदी हुबेहुब .. एक कमी ना एक जास्त ...' तिकडून विवेकचा मेसेज होता. ' रिअली?' तिने उपाहासाने प्रतिउत्तर दिले. फ्लर्टींगचा हा जुना नुस्का अंजलीच्या चांगलाच परिचयाचा होता. तेवढ्यात पियून आत आला. त्याने काही कागदपत्र सह्या करण्यासाठी अंजलीच्या समोर ठेवले. अंजलीने त्या सगळ्या कागदपत्रांवर एक धावती नजर फिरवली आणि ती सह्या करु लागली. ' आय स्वीअर' मॉनिटरवर विवेकने तिकडून पाठवलेला मेसेज आला. कदाचित त्याला तिच्या शब्दातला उपाहास आणि खोच लक्षात आली असावी. ' मला तुझा मेलींग ऍड्रेस मीळू शकेल काय ? ' तिकडून विवेकचा पुन्हा मेसेज आला. ' anjali5000@gmail.com' अंजलीने खास चॅटींगवरील अनोळखी लोकांना पाठविण्यासाठी ओपन केलेल्या मेलचा ऍड्रेस त्याला पाठवून दिला. अंजलीने आता आपली चेअर फिरवून आपली डायरी शोधली आणि आपल्या घड्याळाकडे बघत ती खुर्चीवरुन उठून उभी राहाली. आपली डायरी घेवून ती जाण्यासाठी वळली तेवढ्यात पुन्हा कॉम्प्यूटरवर चॅटींगचा बझर वाजला. तिने जाता जाता वळून मॉनिटरकडे बघितले. मॉनिटरवर विवेकचा मेसेज होता, ' ओके थॅंक यू... बाय ... सी यू सम टाईम...'इंटरनेट कॅफेत विवेक एका कॉम्प्यूटरच्या समोर बसून काहितरी करीत होता. एका त्याच्याच वयाच्या मुलाने, कदाचित त्याचा मित्रच असावा, जॉनीने मागून येवून त्याच्या दोन्ही खांद्यावर आपले हात ठेवले आणि त्याचे कांधे दाबल्यागत करीत म्हणाला, '' हाय विवेक... काय करतो आहेस ?'' आपल्या तंद्रीतून बाहेर येत विवेकने मागे वळून पाहाले आणि पुन्हा आपले कॉम्प्यूटरवरचे काम सुरु ठेवीत म्हणाला '' काही नाही यार... एका मुलीला मेल पाठविण्याचा प्रयत्न करतो आहे'' '' ओ हो... तो मामला इश्क का है'' जॉनी त्याला चिडवित म्हणाला. '' अरे नाही यार... बस फक्त मित्र आहे...'' विवेक म्हणाला. '' प्यारे ... मानो या ना मानो... जब कभी लडकीसे बात करना हो और लब्ज ना सुझे... और जब कभी लडकीको खत लिखना हो और शब्द ना सुझे... तो समझो मामला इश्क का है ...'' जॉनी त्याला अजुन चिडविल्यागत करीत म्हणाला. विवेक काही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला. '' बघ बघ गाल कसे लाल लाल होताहेत...'' जॉनी म्हणाला. विवेक पुन्हा काहीही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला. '' जब कोई ना करे इन्कार ... या ना करे इकरार ... तो समझो वह प्यार है '' जॉनी त्याला सोडायला तयार नव्हता. आता मात्र विवेक चिडला, '' तू इथून जाणार आहेस की माझा मार खाणार आहेस?...'' '' तु समजतो तसं काही नाही आहे... मी फक्त माझ्या पिएचडीचे टॉपीक्स सर्च करतो आहे आणि मधून मधून विरंगुळा म्हणून काही मेल्स पाठवितो आहे बस्स...'' विवेक आपले चिडणे आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न करीत म्हणाला. '' बस्स?'' जॉनी. '' तु आता जाणार आहेस का?... की तुझी एवढ्या सगळ्या लोकांसमोर अपमानीत होण्याची इच्छा आहे?'' विवेक पुन्हा चिडून म्हणाला. '' ओके .. ओके... काम डाऊन... बरं तुझ्या पिएचडीचा टॉपीक काय आहे?'' जॉनीने विचारले. '' इट्स सिक्रीट टॉपीक डीयर... आय कान्ट डिस्क्लोज टू ऐनीवन...'' विवेक म्हणाला. '' टू मी आल्सो ?...'' जॉनीने विचारले. '' यस नॉट टू यू आल्सो'' विवेक जोर देवून म्हणाला. '' तुझं हे बरं आहे... सिक्रसीच्या नावाखाली ... प्रेमाचे चाळेही चालवायचे...'' जॉनी म्हणाला. '' तू ते काहीही समज...'' विवेक म्हणाला. '' नाही आता मी समजण्या गिमजन्याच्या पलिकडे गेलो आहे...'' जॉनी म्हणाला. '' म्हणजे?'' '' म्हणजे ... मला काहीएक समजण्याची गरज उरलेली नाही'' '' म्हणजे?'' '' म्हणजे माझी आता पक्की खात्री झाली आहे'' जॉनी म्हणाला. विवेक पुन्हा चिडून मागे वळला. तोपर्यंत जॉनी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत तिथून दाराकडे निघून गेला होता. सकाळचे दहा वाजले असतील. अंजलीने घाईघाईने आपल्या कॅबिनमध्ये प्रवेश केला. अंजली कॅबिनमध्ये आली तेव्हा शरवरीची आपली आवरा आवर चाललेली होती. अंजलीच्या अनुपस्थितीत तिच्या कॅबिनची पुर्ण जबाबदारी शरवरीवर असायची. अंजलीने कॅबिनमधे प्रवेश करताच शरवरी अदबीने उभी राहात म्हणाली, '' गुडमॉर्निंग...'' 'मॅडम' तिच्या तोंडात येता येता राहालं होतं. अंजली तिला कितीही मैत्रिणीप्रमाणे वाटत असली आणि तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे वागत असली तरी शरवरीला तिच्या या कॅबिनमधे तरी तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे वागणं कठिणंच जायचं. अंजलीने आत आल्या आल्या शरवरीच्या पाठीवर एक थाप मारली, '' हाय'' तिच्या मागून तिचा ड्रायव्हर तिची सुटकेस घेवून आत आला. जशी अंजली आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाली, तिच्या ड्रायव्हरने तिची सुटकेस तिच्या बाजुला टेबलवर ठेवली आणि तो तिच्या कॅबिनमधून बाहेर निघून गेला. शरवरी अंजलीच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने तिच्या अपॉईंटमेंट्सची डायरी उघडून तिच्या समोर सरकवली. अंजलीने आपल्या कॉम्पूटरचा स्विच ऑन केला आणि ती डायरीमधील तिच्या अपॉईंटमेट्स वाचायला लागली. '' सकाळी आल्याबरोबर मिटींग...'' अंजली कसस तोंड करीत म्हणाली, '' बरं या दूपारच्या सेमीनारला मी जावू शकणार नाही.. शर्माजींना पाठवून दे...'' '' ठिक आहे'' शरवरी त्या अपॉईंटच्या बाजुला स्टार मार्क करीत म्हणाली. '' काय करणार या लोकांना तोंडावर नाहीही म्हणता येत नाही आणि वेळेच्या अभावी सेमीनारला जावूही शकत नाही... खरंच एखाद्या कंपनीच्या हेडचं काम काही सोपं नसतं.'' अंजली आपली सूटकेस उघडून त्यातले काही पेपर्स बाहेर काढू लागली. पेपर काढता काढता एका पेपरकडे बघून, तो पेपर बाजुला काढून ठेवत ती म्हणाली, '' आता हे बघ... या कंपनीच्या टेंडरचं काम अजून अर्धवटच पडलेलं आहे... हा पेपर जरा त्या कुळकर्णीकडे पाठवून दे...'' '' कुळकर्णी आज सूट्टीवर आहेत'' शरवरी म्हणाली. '' पण त्यांची सूट्टी तर माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंतच होती...'' अंजली चिडून म्हणाली. '' हो...पण आत्ताच थोड्या वेळापुर्वी त्यांचा फोन आला होता... ते येवू शकणार नाहित म्हणून'' शरवरी म्हणाली. '' का येवू शकणार नाहीत?'' अंजलीने रागाने विचारले. '' मी विचारलं तर त्यांनी काही न सांगताच फोन ठेवून दिला.'' '' हे कुळकर्णी म्हणजे अगदी इरिपॉन्सीबल माणूस...'' अंजली चिडून म्हणाली. आणि मग जे अंजलीची बडबड चालू झाली ती थांबायला तयार नव्हती. शरवरीला पुरेपुर कल्पना होती की अंजली अशी बडबड करायला लागली की काय करायला पाहिजे. काही नाही चूपचाप बसून नुसती तिची बडबड ऐकून घ्यायची. मधे एकही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. अंजलीनेच तिला एकदा सांगितले होते की जेव्हा आपला बॉस असा बडबड करीत असतो, ती त्याची बडबड म्हणजे त्याचा एकप्रकारे स्ट्रेस बाहेर काढण्याचा प्रकार असतो. जेव्हा त्याची अशी बडबड चाललेली असते तेव्हा जी सेक्रेटरी त्याला अजून काही सांगून किंवा अजून काही विचारुन त्याचा अजून स्ट्रेस वाढवत असते ती मोस्ट अनसक्सेसफुल सेक्रेटरी म्हणायची. आणि जी सेक्रेटरी निमूटपणे आपल्या बॉसची बडबड ऐकत आपल्या बॉसची पुन्हा नॉर्मल होण्याची वाट पाहाते ती मोस्ट सक्सेसफुल सेक्रेटरी म्हणायची. अंजलीची बडबड आता बंद होवून ती बऱ्यापैकी शांत झाली होती. ती हातात काही पेपर्स आणि फाईल्स घेवून मिटींगला जाण्यासाठी खुर्चीवरुन उठून उभी राहाली. शरवरीही उठून उभी राहाली. बाजूला सुरु झालेल्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघत ती शरवरीला म्हणाली, '' तू जरा माझ्या मेल्स चेक करुन घे... मी मिटींगला जावून येते...'' आणि अंजली तिच्या कॅबिनमधून बाहेर जायला निघाली. '' पर्सनल मेल्ससुद्धा ?'' शरवरीने तिला छेडीत गालातल्या गालात हसत गमतीने विचारले. '' यू नो... देअर इज नथींग पर्सनल... आणि जेही काही आहे... तुला सगळं माहित आहेच...'' अंजलीही तिच्याकडे पाहत, हसत म्हणाली आणि घाईघाईने मिटींगला निघून गेली. सकाळी सकाळी रस्त्यावर लगबगीने हातात बॅग घेवून चालत विवेकची कुठेतरी जाण्याची गडबड दिसत होती. मागुन धावत येवून त्याचा मित्र जॉनीने त्याला जोरात आवाज दिला, '' ए सुन गुरु... इतनी सुबह सुबह कहां जा रहा है'' विवेकने वळून बघितले आणि पुन्हा पुर्ववत तो लगबगीने समोर चालू लागला. '' कुण्या पोरीबरोबर पळून बिळून तर जात नाहीस...'' जॉनीने तो थांबत नाही आहे आणि त्याची गडबड पाहून विचारले. जॉनी अजूनही त्याच्या मागून धावत धावत त्याच्या जवळ येवून पोहोचण्याचा प्रयत्न करीत होता. '' काय कटकट आहे... जरा दोन दिवस बाहेर चाललो आहे... त्याचाही एवढा गाजावाजा...'' विवेक बडबड करीत समोर चालत होता. '' दोन दिवस गावला चाललो आहे... तेवढीच तुझ्यापासून सुटका'' विवेक चालता चालता जॉनीला मोठ्याने म्हणाला. '' थोडा थांब तर खरं ... तुला एक अर्जंट गोष्ट विचारायची होती...'' जॉनी म्हणाला. विवेक थांबला आणि जॉनी धावत येवून त्याच्याजवळ पोहोचला. '' बोल ... काय विचारायचे? ... लवकर विचार ... माझी बस सुटेल'' विवेक त्रासल्या चेहऱ्याने म्हणाला. '' काय झालं मग काल?'' जॉनीने विचारले. '' कशाचं?'' विवेकने प्रतिप्रश्न केला. '' तेच त्या मेलचं? ... काल मेल पाठवली की नाहीस? '' जॉनीने त्याला छेडल्यागत त्याच्या गळ्याभोवती खांद्यावर हात ठेवीत विचारले. '' काय विचित्र माणूस आहेस तू... कोणत्या वेळी कशाचं काय महत्व याचा काही ताळमेळ नसतो तुला ... तिकडे माझी बस लेट होत आहे आणि तुला त्या मेलची पडली आहे...'' विवेक त्रासिकपणे त्याचा आपल्या खांद्यावर ठेवलेला हात झटकत म्हणाला. विवेक आता पुन्हा लगबगीने पुढे चालू लागला. '' काय गोष्ट करतो यार तू?... बसपेक्षा मेल केव्हाही महत्वाची ... आता मला सांग हावडा मेल, राजधानी मेल.... ह्या मेल मोठ्या की तुझी ती टपरी बस?'' जॉनी अजूनही त्याच्या मागे मागे जात त्याला छेडीत होता. विवेकला कळले होते की आता या जॉनीशी वाद घालण्यात किंवा त्याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता. तो समोर मुकाट्याने लांब लांब पावले टाकीत जोरात चालू लागला. आणि जॉनीही बडबड करीत आणि खट्याळपणे गालातल्या गालात हसत त्याच्या मागे मागे त्याला छेडत चालू लागला.शरवरी अंजलीच्या कॅबिनमधे कॉम्प्यूटरवर बसलेली होती. अंजली तिची सकाळची मिटींग आटोपून तिच्या कॅबिनमधे परत आली. तिने घड्याळाकडे बघितले. जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते. खुर्ची मागे ओढून ती तिच्या खुर्चीवर बसली आणि मागे खुर्चीला रेलून आपला थकवा दूर करण्याचा प्रयत्न करु लागली. शरवरीने एकदा अंजलीकडे बघितले आणि ती पुन्हा आपल्या कॉम्प्यूटरच्या कामात व्यस्त झाली. ''कुणाची काही खास मेल?'' अंजलीने शरवरीकडे न बघताच विचारले. '' नाही... काही खास नाही... पण एक त्या 'टॉमबॉय' ची मेल होती'' शरवरी म्हणाली. '' टॉमबॉय ... काही लोक फारच चिकट असतात ... नाही?'' अंजली म्हणाली. '' हो ना...'' शरवरीला अंजलीच्या बोलण्याचा रोख लक्षात आला होता. कारण अंजलीने पुर्वी तिला एकदा त्या टॉमबॉयबद्दल सांगितले होते. '' आणि हो ... एक अजून कुण्या विवेकची मेल होती'' शरवरी पुढे म्हणाली. '' विवेक?... हो तो काल चॅटींगवर भेटलेला तोच असेल... मी सांगतेना त्याने काय लिहिले असेल.. तुझं वय काय?... तुझा पत्ता काय?... माझं वय फलाना फलाना आहे... माझा पत्ता फलाना फलाना आहे.. आणि मी फलाना फलाना काम करतो... आणि हळू हळू तो आपल्या खऱ्या जातिवर येणार... या माणसांची सर्व जातच अशी असते... लागट.. लोचट आणि चिकट...'' '' तू म्हणते तसं काहीही त्याने लिहिलेलं नाही आहे...'' शरवरी मधेच तिला तोडत म्हणाली. '' नाही? ... तर मग एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टची सिफारस केली असणार त्याने... म्हणजे तो प्राडक्ट खरेदी आपण करायचं आणि त्याने फुकट कमिशन खायचं'' अंजली म्हणाली. '' नाही तसंही त्याने काही लिहिलेलं नाही.'' शरवरी म्हणाली. '' मग?... मग काय लिहिलेलं आहे त्याने?'' अंजलीने उत्सुकतेने मान वळवून शरवरीकडे पाहत विचारले. '' त्याने मेलमधे काहीच लिहिलेलं नाही आहे.. त्याने ब्लॅंक मेल पाठवलेली आहे आणि खाली फक्त त्याचं नाव 'विवेक' असं लिहिलेलं आहे'' शरवरी म्हणाली. अंजली एकदम उठून सरळ बसली. '' बघू दे..'' अंजली शरवरीकडे वळून कॉम्प्यूटरकडे बघत म्हणाली. शरवरीने अंजलीच्या मेलबॉक्समधील विवेकची मेल क्लीक करुन उघडली. खरंच ती मेल ब्लॅंक होती.. '' अंजली तू काहीही म्हण ... पण या मुलात 'स्टाईल' आहे... ऍटलिस्ट एवढं नक्की की आहे की हा मुलगा बाकी मुलांपेक्षा जरा हटके आहे...'' शरवरी अंजलीच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. '' तू जरा चूप बसतेस ... आणि काय मुलगा ... मुलगा लावलं आहे... तुला तो कोण कुठला... त्याचं वयं काय... काही माहित आहे?... तो एखादा रंगेल, खुसट बुढाही असू शकतो... तुला माहित आहेच आजकाल लोक इंटरनेटवर कसं पर्सनलायझेशन करतात...'' '' ... हो तेही आहे म्हणा... पण काळजी करु नकोस... हे घे मी आत्ताच त्याची सायबर तहकिकात करते'' शरवरी पटापट कॉम्प्यूटरच्या किबोर्डचे काही बटनं दाबत म्हणाली. थोड्या वेळातच कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर जणू एक रिपोर्ट अवतरला. '' इथे तर त्याचं नाव फक्त विवेक असं लिहिलेलं आहे... अडनाव लिहिलं नाही आहे... मुंबईला राहणारा आहे आणि पिएच डी करीत आहे... वय आहे...'' शरवरीने जणू एखाद्या गोष्टीचा क्लायमॅक्स उघड करावा तसा एक पॉज घेतला. अंजलीचीही आता उत्सुकता जागृत झाली होती आणि ती शरवरी त्याचं वय काय सांगते याची वाट पाहू लागली. '' पिएचडी? ... म्हणजे नक्कीच कुणीतरी बुढ्ढा खुसट असला पाहिजे... मी म्हटलं होतं ना?'' '' आणि त्याचं वय आहे 25 वर्ष...'' शरवरीने जणू क्लायमॅक्स उघड केला. '' तो नूर ए जन्नत मिस अंजली अब क्या किया जाए? शरवरी तिला छेडीत म्हणाली. अंजलीही प्रयत्नपुर्वक आपला चेहरा निर्वीकार ठेवीत म्हणाली, '' तर मग? ... आपल्याला त्याचे काय करायचे आहे? '' देने वाले अपना पैगाम देकर चले गए करने वाले तो अपना इशारा कर चले गए उधर बडा बुरा हाल है दिलके गलियारोंका अब उन्हे इंतजार है बस आपके इशारोंका '' '' वा वा क्या बात है ...'' शरवरी आपल्याच शेरची तारीफ करीत म्हणाली, '' आता काय करायचं या मेलचं? '' '' करायचं काय ... डिलीट करुन टाक'' अंजली बेफिकीरपणे... म्हणजे कमीत कमी तसा आव आणित म्हणाली. '' डिलीट... नही इतना बडा सितम मत करो उसपर... एक काम करते है ... कोरे खत का जवाब कोरे खतसेही देते है ...'' शरवरीने पटापट कॉम्प्यूटरच्या किबोर्डची बटन्स दाबली आणि त्या ब्लॅंक मेलला ब्लॅंक रिप्लाय पाठूवन दिला. अंजलीने आज सकाळी आल्या आल्या तिच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरु केला, चॅटींगचा विंडो ओपन केला आणि कुणाचा चॅटींगवर ऑफलाईन मेसेज आहे का ते बघू लागली. कुणाचाच ऑफलाईन मेसेज नव्हता. तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव तरळले पण ते लपवत ती तिच्या समोर टेबलवर ठेवलेले रिपोर्टस चाळायला लागली. तिच्या टेबलसमोर शरवरी बसलेली होती. ती बारकाईने अंजलीच्या एक एक हालचाली टीपत होती आणि गालातल्या गालात हसत होती. रिपोर्ट चाळता चाळता अंजलीच्या लक्षात आले की ती गालातल्या गालात हसत आहे. तिने पटकन एक कटाक्ष शरवरीकडे टाकला. '' का गं का हसत आहेस?'' अंजलीने तिला विचारले. शरवरीही मोठ्या सफाईने आपल्या चेहऱ्यावरचे हास्य लपवून गंभीर मुद्रा धारण करीत म्हणाली, '' कुठे... मी कुठे हसत आहे?... '' तेवढ्यात अंजलीच्या कॉम्प्यूटरचा बझर वाजला. अंजलीने पटकन मान वळवून उत्सुकतेने आपल्या कॉम्प्यूटरच्या मॉनीटरकडे बघितले आणि पुन्हा रिपोर्ट वाचण्यात मग्न झाली. '' दोन दिवसांपासून मी बघते आहे की जेव्हाही चाटींगचा बझर वाजतो तू सर्व कामधाम सोडून मॉनीटरकडे बघतेस... काय कुणाच्या मेलची किंवा मेसेजची वाट पाहते आहेस की काय? '' शरवरीने विचारले. '' नाही ... कुठे काय?'' अंजली म्हणाली आणि पुन्हा आपल्या टेबलवर ठेवलेले रिपोर्ट वाचण्यात मग्न झाली. म्हणजे कमीत कमी तसं भासवायला लागली. कॉम्प्यूटरचा बझर पुन्हा वाजला. अंजलीने पुन्हा पटकन उत्सुकतेने मॉनीटरकडे बघितले आणि यावेळी ती तिची चाकाची खुर्ची झटक्यात वळवून कॉम्प्यूटरकडे तोंड करुन बसली. '' हा नक्कीच त्या विवेकचा मेसेज आहे'' शरवरी पुन्हा तिला छेडीत म्हणाली. '' कोणत्या विवेकचा?'' अंजलीही काही न कळल्याचा आव आणित म्हणाली. '' कोणता? ... तो त्या दिवशी चॅटींगवर भेटलेला'' शरवरीही तिला सोडण्याच्या मुडमधे नव्हती. '' हे तू एवढ्या खात्रीने कसं काय म्हणू शकतेस?'' अंजलीने कॉम्प्यूटरवर काम करता करता विचारले. '' मॅडम तुमच्या चेहऱ्याचा रंग सगळं काही सांगतो आहे'' शरवरी गालातल्या गालात हसत म्हणाली. प्रथम अंजलीच्या चेहऱ्यावर चोरी पकडल्यागत गांगारलेले भाव आले. पण पटकन स्वत:ला सावरत ती रागाचा आव आणित म्हणाली. '' तू जरा माझा पिछा सोडतेस ... केव्हापासून बघते आहे सारखी माझ्या मागे लागली आहेस... ऑफिसची बघ किती कामे पेंडीग पडली आहेत... ती जरा जावून बघ बरं..'' अंजली म्हणाली. अंजलीचा इशारा समजून शरवरी तिथून उठली आणि गालातल्या गालात हसत तिथून निघून गेली. शरवरी गेल्याबरोबर अंजलीने पटकन कॉम्प्यूटरवर आलेला विवेकचा मेसेज उघडला.अंजलीने कॉम्प्यूटरवर आलेला विवेकचा चॅटींग मेसेज उघडला खरा पण तिला तिचं हृदय धडधडत आहे असं जाणवायला लागलं. तिला स्वत:लाच आपल्या बेचैन मन:स्थितीचे आश्चर्य वाटत होते. तिने पटकन त्याने पाठविलेला मेसेज वाचला - '' हाय गुड मॉर्निंग ... हाऊ आर यू?'' त्याच्या मेसेज विंडोत लिहिलेले होते. तिने आपण उगाचच गुरफटत तर नाही ना चाललो याची स्वत:शीच खात्री करुन जपूनच उत्तर टाईप केले - '' फाईन...'' आणि उगीचच आपल्या मनाची अधिरता दिसून येवू नये म्हणून तिने एक ते शंभर पर्यंत आकडे मोजले आणि मग बरीच वेळ झाली आहे याची खात्री करीत सेंड बटनवर क्लीक केले. '' काल मी गावाला गेलो होतो'' तिकडून ताबडतोब विवेकचा मेसेज आला. ' तू काल का चॅटींगवर भेटला नाहीस?' या अंजलीच्या मनात घोळत असलेल्या प्रश्नाला उत्तर देवून त्याने जणू तिच्या हृदयाचाच ठाव घेतला आहे असे तिला वाटले. खरंच मनकवडा की काय हा?... अंजलीला एक क्षण वाटून गेले. '' हो का?'' तिनेही खबरदारी म्हणून कोरडीच प्रतिक्रिया व्यक्त केली. '' अजून काही विचारणार नाहीस?'' त्याने विचारले. ती त्याचा मेसेज आल्यानंतर उत्तर देण्यास मुद्दाम विलंब लावीत होती पण त्याचे मेसेजेस ताबडतोब, जणू मेसेज मिळण्याच्या आधीच टाईप केल्याप्रमाणे येत होते. '' तूच विचारकी '' तिने रिप्लाय पाठविला. तिला उगीचच मुलगा मुलगी पहायला आल्यानंतर वेगळ्या खोलीत जावून जसे बोलतात तसे वाटायला लागले. '' अगं त्या दिवशी मी तुला ब्लॅंक मेल यासाठी पाठवली होती की तुझी मला काहीच माहिती नाही ... मग काय लिहिणार?... पण मेल पाठविल्याशिवाय राहवेना... मग दिली पाठवून ब्लॅंक मेल..'' मग त्यानेच पुढाकार घेवून विचारले, '' बरं तू काय करतेस?... म्हणजे शिक्षण की जॉब?'' '' मी बी. ई. कॉम्प्यूटर केले आहे... आणि जी. एच. इन्फॉरमॅटीक्स या स्वत:च्या कंपनीची मी सध्या मॅनेजींग डायरेक्टर आहे'' तिने मेसेज पाठविला. तिला माहित होते की चॅटींगमधे आधीच स्वत:ची खरी माहिती देणं धोकादायक असतं. पण तरीही ती स्वत:ची खरी माहीती जणू तिच्या नकळत टाईप करीत होती आणि पाठवित होती. '' अरे .. बापरे!.. '' तिकडून विवेकची प्रतिक्रिया आली. '' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना?... नाही ... म्हणजे मी कुठेतरी वाचलं आहे की स्त्रियांना त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही म्हणून ... '' त्याने तिला जपूनच प्रश्न विचारला. तिने पाठविले, '' 23 वर्ष'' '' अगं हे तर मला आधीच माहित होतं... मी तुझ्या मेल आयडी वरुन बघितलं होतं ... खरं सांगू? तू जेव्हा सांगितलंस की तू मॅनेजींग डायरेक्टर आहेस ... तर माझ्या समोर 45-50 वयाच्या एका वयस्कर बाईचं चित्र उभं राहालं होतं ...'' तो थोडा मोकळा बोलत होता. तिला त्याच्या गमतीदार स्वभावाचं गालातल्या गालात हसू येत होतं. त्याने तिचं वय सायबर सर्च द्वारे शोधलं हे जाणून तो सुद्धा तिच्याबाबत तेवढाच उत्कट असल्याचं तिला जाणवलं. '' तू तुझं वय नाही सांगितलंस?...'' तिने प्रतिप्रश्न केला. '' मी माझ्या मेल ऍड्रेसच्या माहितीत ... माझं खरं वय लिहिलं आहे...'' त्याचा तिकडून मेसेज आला. त्याच्या या उत्तराने तिला त्याच्यातला वेगळेपणा अजूनच जाणवत होता.विवेक कॉम्प्यूटच्या समोर बसून काहीतरी वाचत होता. तेवढ्यात त्याचा मित्र हळूच पावलाचा आवाज न होवू देता त्याच्या मागे येवून उभा राहाला. बराच वेळ जॉनी विवेकचं काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करु लागला. '' क्या गुरु... कहां तक पहूँची है प्रेम कहानी? '' जॉनीने अनपेक्षीतरित्या त्याला प्रश्न विचारला. विवेक एकदम दचकून मॉनीटरवरील विंडो मिनीमाईझ करायला लागला. '' लपवून काही उपयोग नाही ... मी सगळं वाचलं आहे'' जॉनी म्हणाला. विवेक आपल्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव लपविण्याचा प्रयत्न करीत पुन्हा मॉनीटरवरील विंडोज उघडीत म्हणाला, '' बघ तर .. तिने मेलसोबत काय अटॅचमेंट पाठवलेली आहे'' '' मतलब आग बराबर दोनो तरफ लगी हूई है .... वैसे उस चिडीयाका कुछ नाम तो होगा... जिसने हमारे विवेक का दिल उडाया है'' जॉनीने विचारले. '' अंजली'' विवेकचा चेहरा सांगताना लाजेने लाल लाल झाला होता. '' बघ बघ किती लाजतोयस'' जॉनी त्याला छेडीत म्हणाला. '' बघू ... काय पाठविले आहे तिने?...'' जॉनीने त्याला पुढे विचारले. जॉनी बाजुच्याच स्टूलवर बसून वाचू लागला तर विवेक त्याला त्या अंजलीने अटॅच करुन पाठविलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमबद्दल माहिती देवू लागला - '' हा एक जॅपनीज सॉफ्टवेअर इंजीनिअरने लिहिलेला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे... या प्रोग्रॅमसाठी रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजीजचा वापर करण्यात आलेला आहे. जेव्हा आपण कॉम्प्यूटरच्या मॉनिटरसमोर बसलेलो असू तेव्हा जो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतो तो वेगवेगळ्या रंगात विभागल्या जावून मॉनिटरवर परावर्तीत होतो. या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारा परावर्तीत झालेल्या किरणांची तिव्रता एकत्रीत करुन त्याला या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने फोटोमध्ये परिवर्तीत केलं जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही या प्रोग्रॅमला रन कराल तर मॉनिटरवर पडलेल्या परिवर्तनाच्या तिव्रतेला एकत्रित करुन हा प्रोग्रॅम तुमचा फोटो तयार करु शकतो. पण फोटो काढतांना फक्त एवढं लक्ष ठेवावं लागतं की तुम्ही बरोबर मॉनिटरच्या अगदी समोर, समांतर आणि समानांतर बसलेले आहात. मॉनीटर आणि तुमच्या चेहऱ्यात जर तिरपा कोण झाला तर फोटो बरोबर येणार नाही.'' '' म्हणजे हे सॉफ्टवेअर फोटो काढते तर?'' जॉनीने विचारले. '' हो ... हे बघ आत्ताच थोड्या वेळापुर्वी मी माझा फोटो काढलेला आहे'' विवेकने कॉम्प्यूटरवर त्याचा फोटो उघडून दाखवला. '' अरे वा... एकदम बढीया ... जर असं असेल तर कॅमेरा विकत घ्यायची गरजच पडणार नाही..'' जॉनी आनंदाने म्हणाला. '' तेच तर..'' विवेकने दुजोरा दिला. '' थांब... मला जरा बघू दे... मी माझा फोटो काढतो..'' जॉनी मॉनीटरच्या समोरच्या स्टूलवरुन विवेकला उठवीत तिथे स्वत: जावून बसत म्हणाला. जॉनीने स्टूलवर बसून माऊस कर्सर मॉनीटरवर इकडेतिकडे फिरवीत विचारले, '' हं आता काय करायचं?'' '' काही नाही ... फक्त ते स्नॅपचं बटन दाबायचं... पण थांब आधी थोडं व्यवस्थीत सरळ बस'' विवेक म्हणाला. जॉनी सरळ बसून माऊसचा कर्सर 'स्नॅप' बटन जवळ नेवून ते बटन दाबू लागला. '' स्माईल प्लीज '' विवेक म्हणाला. जॉनीने आपला चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न केला. '' रेडी ... नाऊ प्रेस द बटन'' विवेक जॉनीने 'स्नॅप' बटनवर माऊस क्लीक केला. मॉनीटरवर एक-दोन सेकंदासाठी 'प्रोसेसींग' म्हणून एक मेसेज आला आणि मॉनीटरवर फोटो अवतरला. जसा मॉनीटरवर फोटो आला विवेक जोर जोराने हसायला लागला आणि जॉनीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मॉनीटरवर एका हसणाऱ्या माकडाचा फोटो अवतरला होता. दिवसागणीक अंजली आणि विवेकचं चॅटींग, मेल करणं वाढतच होतं. मेलची लांबी रुंदी वाढत होती. एकमेकांचे फोटो पाठविणे, जोक्स पाठविणे, पझल्स पाठविणे... मेल पाठविण्याचे किती तरी निमित्तं त्यांच्याजवळ होती. हळू-हळू अंजलीला जाणवायला लागलं की आपण त्याच्या प्रेमात पडलो आहोत. पण प्रेमाची कबुली तिनं त्याच्याजवळ किंवा त्यानं तिच्याजवळ कधीही दिली नव्हती. त्याच्या मेलगणिक... मेलमधल्या प्रत्येक वाक्यागणिक... त्याच्या प्रत्येक फोटोगणिक, त्याच्या व्यक्तीमत्वाचा एक एक पैलू तिला उलगडत होता. आणि तितकीच ती त्याच्यामधे गुंतत होती असं तिला जाणवत होतं. तिनं सुध्दा स्वत:ला रोखलं नाही, किंबहूना स्वत:ला आवरण्यापेक्षा स्वत:ला झोकून देण्यात तिला आनंद वाटत असावा. पण प्रेमाच्या कबुलीबाबत ती फार जपून पावले टाकीत होती. तिच्याजवळ निमित्त होतं की तिनं अजून त्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. तसं त्याचं प्रेम तिला जाणवत नव्हतं असं नाही. परंतु तो सुध्दा कदाचित तेवढाच जपून वागत होता. कदाचित त्यानंही तिला अजून प्रत्यक्ष न भेटल्यामुळे. तो आपल्याला भेटल्यानंतर टाळणार तर नाही ना? याबद्दल ती एकदम बेफिकीर होती. विश्वामित्रालासुध्दा भूरळ पडावी असं तिचं सौंदर्य होतं. अंजली आपल्या कॉम्प्यूटरवर चाटींग करीत होती आणि तिच्या टेबल समोर खुर्चीवर शरवरी बसलेली होती. कॉम्प्यूटरवर आलेली एक मेल वाचता वाचता अंजली म्हणाली, '' शरवरी बघ तर विवेकने मेलवर काय पाठवले आहे'' शरवरी खुर्चीवरुन उठून अंजलीच्या मागे जावून उभी राहून काम्प्यूटरच्या मॉनीटरकडे पाहू लागली. एवढ्यात या दोघांचं एकमेकांना काही तरी पाठवणं सुरुच असायचं. आणि शरवरीलाही त्या दोघांची प्रेमयूक्त देवाणघेवाण पहायला आणि वाचायला मजा वाटायची. मॉनीटरवर एक छोटं चायनीज बाळ गमतीदार प्रकारे डांस करीत होतं. डांस करता करता ते बाळ एकदम शू करायला लागलं. ते पाहून दोघीही हसायला लागल्या. '' कुठून हा काही काही शोधतो'' अंजली म्हणाली. '' हो ना मी तर कीती इंटरनेटवर सर्फ करते पण माझ्या पाहण्यात हे ऍनीमेशन कधीच कसं आलं नाही'' शरवरीने दुजोरा दिला. तेवढ्यात एक वयस्कर माणूस दरवाज्यावर नॉक करुन आत आला. तो माणूस येताच अंजलीने आपली चाकाची खुर्ची फिरवून आपले लक्ष त्या माणसाकडे केंद्रीत केलं. शरवरी तिथून निघून घेली. तो वयस्कर माणूस तिच्या टेबलच्या समोर खुर्चीवर बसताच अंजली म्हणाली, '' बोला आंनंदजी..'' '' मॅडम ... इंटेल कंपनीने आपल्या सगळ्या कोलॅबरेटर्स सोबत एक मिटींग ठेवलेली आहे. आत्ताच थोड्यावेळापूर्वी त्यांचा फॅक्स आला आहे... त्यांनी मिटींगची तारीख आणि व्हेन्यू आपल्याला पाठविला आहे... आणि सोबतच मिटींगचा अजेंडाही पाठविलेला आहे...'' आनंदजीने माहिती पुरवली. '' कुठे ठेवली आहे मिटींग ?'' अंजलीने विचारले. '' मुंबईला ... 25 तारखेला ... म्हणजे .. येणाऱ्या सोमवारी'' आनंदजी कॅलेडरकडे बघत म्हणाले. अंजलीही विचार केल्यासारखे करीत कॅलेंडरकडे बघत म्हणाली, '' ठिक आहे कन्फर्मेशन फॅक्स पाठवून द्या... आणि मोनाला माझे सर्व फ्लाईट आणि होटल बुकींग डिटेल्स द्या'' '' ठिक आहे मॅडम'' आनंदजी उठून उभे राहत म्हणाले. आनंदजी तिथून निघून गेले तसं अंजलीने आपली चाकाची खुर्ची गर्रकन फिरवून आपले लक्ष कॉम्प्यूटरकडे केंद्रीत केलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. पटकन तिने मेल प्रोग्रॅम उघडला आणि घाईघाईने ती मेल टाईप करायला लागली- '' विवेक ... असं वाटतं की लवकरचं आपल्या नशिबात भेटणं लिहिलेलं आहे...विचार कसं? काहीतरी क्लायमॅक्स रहायला पाहिजे ना? पुढच्या मेलमधे सगळे डिटेल्स पाठविन... बाय फॉर नाऊ... टेक केअर .. ---अंजली...'' अंजलीने पटापट कॉम्प्यूटरचे दोन चार बटन्स दाबून शेवटी ऐंन्टर दाबला. कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवर मेसेज अवतरला - 'मेल सेन्ट' विवेक सायबर कॅफेमधे आपल्या कॉम्प्यूटवर बसला होता. पटापट हाताची सफाई करुन काही जादू केल्यागत त्याने गुगलमेल ओपन करताच त्याला अंजलीची मेल आलेली दिसली. त्याचा चेहरा आनंदाने चमकायला लागला. त्याने एक क्षणही न दवडता पटकन डबल क्लीक करुन ती मेल उघडली आणि वाचायला लागला - '' विवेक ... 25 तारखेला सकाळी बारा वाजता एका मिटींगसाठी मी मुंबईला येत आहे... 12.30 वाजता हॉटेल ओबेरायला पोहचेन... आणि मग फ्रेश वगैरे होवून 1.00 वाजता मिटींग अटेंड करेन... मिटींग 3-4 वाजेपर्यंत संपेल... तु मला बरोबर 5.00 वाजता वर्सोवा बिचवर भेट... बाय फॉर नॉऊ... टेक केअर'' विवेकने मेल वाचली आणि आनंदाने उठून उभा राहत '' यस्स...'' म्हणून ओरडला. सायबर कॅफेतले बाकी जण काय झालं म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तेव्हा तो भानावर आला आणि लाजून खाली बसला. तो पुन्हा आपल्या रिसर्चच्या संदर्भात इंटरनेटवर सर्च ईंजीनवर माहिती शोधू लागला. पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. केव्हा एकदा तो दिवस उजाडतो की ज्या दिवशी अंजली मुंबईला येते आणि आपण तिला वर्सोवा बिचवर भेटतो असं त्याला झालं. ' वर्सोवा बिच' त्याच्या डोक्यात आलं पण त्या बिचचं त्याच्या डोक्यात चित्र उभं राहीना. कारण तो तिथे कधी गेला नव्हता. वर्सोवा बिचचं नाव तो ऐकुन होता पण तो कधी तिथे प्रत्यक्षात गेला नव्हता. तसा तो मुंबईला राहून पिएचडी करीत होता खरा पण तो कधी जास्त फिरत नसे. मुंबईची बरीच ठिकाणं त्याने पाहिली नव्हती. इथे बसल्या बसल्या काय करावं म्हणून त्याने गुगल सर्च ओपन केलं आणि त्यावर 'वर्सोवा बिच' हे सर्च स्ट्रींग दिलं. इंटरनेटवर बरीच माहीती, फोटो, जाण्याचे मार्ग अवतरले. त्याने ती माहीती वाचून जाण्याचा मार्ग नक्की केला. आता अजून काय करावं? त्याचं डोकं नुसतं सुन्न झालं होतं. चला तिने पाठविलेल्या जुन्या मेल वाचाव्यात आणि तिचे फोटो पहावेत म्हणून तो एक एक करुन तिच्या जुन्या मेल्स वाचू लागला. मेलच्या तारखांवरुन त्याच्या लक्षात आलं की त्यांचं 'प्रकरण' तसं जास्त जुनं नव्हतं. आज जेमतेम 1 महिना झाला होता जेव्हा ती प्रथम त्याला चॅटींगवर भेटली होती. पण त्याला त्यांची ओळख कशी कितीतरी वर्ष जुनी असावी असं वाटत होतं. त्यांनी एकमेकांना पाठविलेल्या मेल्स आणि फोटोंवरुन त्यांना एकमेकांचा पुरता अंदाज आला होता. स्वभावातल्या बऱ्याच खाचाखोचाही कळाल्या होत्या. ' ती आपण कल्पना केल्याप्रमाणेच असणार ना?' त्याच्या डोक्यात एक प्रश्न डोकावून गेला. की भेटल्यानंतर आपण कल्पनाकेल्याच्या एकदम विपरीत कुणीतरी परकं, कुणीतरी अनोळखी आपल्यासमोर उभं रहायचं. ' चला प्रत्यक्ष भेटल्यानंतर ती शंका तरी दूर होऊन जाईल' त्याने तिच्या फोटोंचा अब्लम चाळता चाळता विचार केला. अचानक त्याला त्याच्या मागे कुणीतरी उभं आहे याची चाहूल लागली. त्याने वळून पाहाले तर जॉनी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होता. '' साल्या आता प्रकरण एवढंच आहे तर तूला आजुबाजुचं भानही राहत नाही ... लग्न झाल्यानंतर तुझी काय स्थिती होते काय माहीत?'' जॉनी त्याला छेडीत म्हणाला. '' अरे... तु केव्हा आलास?'' विवेक आपल्या चेहऱ्यावरचे गोंधळल्याचे भाव लपवित काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. '' पुर्ण अर्धा तास तरी झाला असेल... लग्न झाल्यानंतर तु आम्हाला नक्कीच विसरणार असं दिसतं'' जॉनी पुन्हा त्याची छेड काढीत म्हणाला. '' अरे नाही यार... असं कसं होईल?... कमीत कमी तुला तरी मी विसरु शकणार नाही'' विवेक त्याच्या समोर आलेल्या पोटात एक गुद्दा मारण्याचा अविर्भाव करीत म्हणाला.अंजली वर्सोवा बीचवर येवून विवेकची वाट पहायला लागली. तिने एकदा घड्याळाकडे बघितलं. त्याला यायला अजून वेळ होता. म्हणून तिने समुद्राच्या काठावर उभं राहून समुद्रावर दुरवर एक नजर फिरवली. नजर फिरवता फिरवता तिचे मन भूतकाळात डोकावू लागले. तिच्या मनात तिच्या बालपणीच्या आठवणी उचंबळून यायला लागल्या... वर्सोवा बीच हे अंजलीचं मुंबईतलं आवडतं ठिकाण. लहानपणी ती तिच्या आई वडिलांसोबत इथे नेहमी येत असे. तिला तिच्या आईवडीलांच्या आठवणीने दाटून येत होते. आता जरी हा समुद्रकिनारा स्वच्छ वाटत नसला तरी तिच्या लहानपणी तो आतापेक्षा बराच स्वच्छ होता. समोर समुद्राच्या लाटांचा आवाज अजूनच तिच्या हृदयात कालवाकालव करीत होता. तिने मनगटावरच्या घड्याळावर पुन्हा एक नजर टाकली. विवेकला तिने संध्याकाळी पाचची वेळ दिली होती. पाच वाजुन गेले तरी तो अजून कसा आला नाही?... तिच्या मनात प्रश्न डोकावून गेला. कुठे ट्रॅफिकमधे अडकला असेल... मुंबईची ट्रॅफिक म्हणजे... कधी माणूस कुठे अडकेल काही नेम नसतो... तिने पुन्हा सभोवार आपली नजर फिरवली. समोर किनाऱ्यावर एक मुलगा समुद्राच्या किनाऱ्यावर रेतीसोबत खेळत होता. ते पाहून पुन्हा तिच्या मनाने भूतकाळात झेप घेतली आणि ती पुन्हा बालपणाच्या आठवणीत बुडून गेली. ती तेव्हा 12-13 वर्षाची असेल जेव्हा ती आई वडिलांसोबत याच बीचवर आली होती. ती तिची आई आणि वडील, तो मुलगा जिथे खेळत होता, जवळपास तिथेच वाळूचा किल्ला बनवित होते. तेवढ्यात तिचे वडील तिला म्हणाले होते, '' बघ अंजली तिकडे तर बघ...'' समद्राच्या किनाऱ्यावर एक मुलगा काहीतरी वस्तू समुद्रामध्ये दूरवर फेकण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. तो मुलगा ती वस्तू जोरात आत समुद्रात फेकत होता. पण समुद्राच्या लाटा त्या वस्तूला पुन्हा किनाऱ्यावर आणून सोडीत. तो मुलगा पुन्हा पुन्हा त्या वस्तूला समुद्रामध्ये खूप दूरवर फेकण्याचा प्रयत्न करी आणि पुन्हा पुन्हा त्या लाटा त्या वस्तूला काठावर आणून सोडीत. मग तिचे वडिल तिला म्हणाले होते - '' बघ अंजली तो मुलगा बघ... तो ती वस्तू समुद्रात दूरवर फेकण्याचा प्रयत्न करतो आणि ती वस्तू पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येते... माणसाच्या जिवनात दु:ख आणि सुखाचं असंच असतं... माणूस जसं जसं आपल्या जिवनातील दु:खाला दूर सारण्याचा प्रयत्न करतो...त्यावेळेपुरतं वाटतं की आता दु:ख पुन्हा कधीच येणार नाही... पण दु:खाचं त्या वस्तूसारखं असतं... जितकं तुम्ही त्याला दुर फेकण्याचा प्रयत्न करणार ते पुन्हा तेवढ्याच जोराने किनाऱ्यावर येणार... आता बघ तो मुलगा थोड्या वेळाने आपल्या खेळण्यात गुंग होईल ... आणि त्या वस्तूला तो पुर्णपणे विसरुन जाईल ..मग जेव्हा त्याला त्या वस्तूची आठवण येईल... ती वस्तू त्याला किनाऱ्यावर शोधून सुध्दा सापडणार नाही ... तसंच माणसाने दु:खामधे न गुरफटता ... सुख दु:खांना स्थितप्रज्ञतेने जर तोंड दिलं तर त्याला त्या दु:खाचा त्रास होणार नाही ...देअर विल बी पेन बट टू सफर ऑर नॉट टू सफर वील बी अप टू यू!'' तिला आठवत होतं की तिचे वडिल कसे छोट्या छोट्या गोष्टीतून खुप काही बोलून जायचे. जेव्हा अंजली आपल्या आठवणीच्या तंद्रीतून बाहेर आली, तिच्यासमोर विवेक उभा होता. उंचापूरा, धडधाकट, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवरुन ओसंडणारा अपूर्व उत्साह. तिने पाहालेल्या फोटतल्यापेक्षा कितीतरी देखणा तो वाटत होता. ते एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असल्यामुळे दोघांचे चेहरे आनंदाने उजळलेले होते. दोघंही एकमेकांकडे नुसते एकटक बघत होते.अंजली आणि विवेक दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली, '' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला..'' '' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे..'' अंजली म्हणाली. '' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' विवेक म्हणाला. फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. बोलत बोलतच ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला, '' अंजली... एक गोष्ट विचारू?'' तिने डोळ्यांनीच होकार दिला. '' माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले. त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली. विवेकचं हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं. आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला... पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?... तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला. आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?... ती जर 'नाही' म्हणाली तर?... त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या. थोड्या वेळाने ती म्हणाली, '' चला आपल्याला निघायला पाहिजे..'' तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते. पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते... पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते. '' .. तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले. '' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली. पण तोही काही कमी नव्हता. '' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस'' ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली. '' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली. आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. विवेकचा आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले. अंजली गाडी ड्राईव्ह करीत होती आणि गाडीत समोरच तिच्या शेजारच्या सीटवर विवेक बसला होता. गाडीत बराच वेळ दोघंही काही न बोलता जणू आपल्याच विचारात गढून गेले होते. खरं विवेक तिने विचार केल्याप्रमाणे कितीतरी उत्साही, उमदा आणि देखणा आहे... आणि त्याचा स्वभाव किती साधा सरळ आहे... पहिल्याच भेटीत त्याने लग्नाचा प्रश्न विचारुन आपल्या बद्दलच्या भावना सरळ सरळ व्यक्त केल्या ते एका दृष्टीने बरेच केले... खरं म्हणजे तो प्रश्न विचारुन त्याने आपल्यालाही त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यास योग्य संधी आणि वाव दिला आहे... तिला आता त्याच्याबद्दल एक आपलेपणा वाटत होता. तिने आता त्याच्यात तिच्या भावी आयुष्यातला एक सहचारी ... एक मित्र... एक सुख दु:खात नेहमी सोबत देणारा सोबती बघणे सुरु केले होते. तिने विचार करता करता त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्यानेही तिच्याकडे पाहून एक मधूर स्मित केले. पण तोही आता आपल्याबद्दलच विचार करीत असेल का?... '' तू अभ्यास वैगेर केव्हा आणि कधी करीत असतो... नाही म्हणजे नेहमी तर चॅटींग आणि इंटरनेटवर बिझी असतोस'' अंजली काहीतरी बोलायचं आणि विवेकला थोडं छेडण्याच्या उद्देशाने म्हणाली. विवेक तिच्या छेडण्याचा मुड ओळखून नुसता हसला. '' मागच्या एका महिन्यात तुमच्या कंपनीचा प्रोग्रेस काय म्हणतो?'' विवेकने विचारले. '' चांगला आहे ... का?... आमची कंपनी दिवसेदिवस प्रगतिशीलच आहे'' अंजली म्हणाली. '' नाही म्हटलं... नेहमी चॅटींग आणि इंटरनेटवर बिझी असल्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामावर झाला असेल ... नाही?'' विवेकही तिच्या छेडण्यास प्रतिउत्तर देत म्हणाला. तिही नुसती त्याच्याकडे पाहून हसली. तिला त्याच्या हजरजबाबीपणाचे नेहमीच कौतूक वाटत आले होते. अंजलीची गाडी एका आलीशान हॉटेलसमोर - हॉटेल ओबेरायसमोर येवून थांबली. गाडी पार्कींगमधे नेवून पार्क करीत अंजली म्हणाली, '' एक मिनीट मी माझा मोबाईल हॉटेलमधे विसरली आहे... तो मी घेवून येते आणि मग आपण निघू... नाहीतर चल काही तरी थंड गरम घेवू आणि मग निघू '' अंजली गाडीच्या खाली उतरत म्हणाली. अंजली उतरुन हॉटेलमधे जावू लागली आणि विवेकही उतरुन तिच्या सोबत हॉटेलमधे जावू लागला. हॉटेलचा सुईट जसजसा जवळ येवू लागला एका अज्ञात भावनेने अंजलीच्या हृदयाची गती वाढू लागली. एका अनामिक भितीने जणू तिला ग्रासले होते. विवेकही जरी तिच्या मागे मागे चालत होता पण त्याला त्याच्या श्वासांची गति विचलीत झालेली जाणवत होती. अंजलीने हॉटेलच्या सुईटचा दरवाजा उघडला आणि आत गेली. विवेक दरवाजातच अडखळल्यासारखा उभा राहाला. '' अरे येकी आत ये ना'' अंजली त्यांच्यात निर्माण झालेली एक, असहजता एक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. '' बस '' अंजली त्याला बसण्याचा इशारा करीत म्हणाली आणि तिथे कोपऱ्यात ठेवलेला फोन उचलण्यासाठी त्याच्या शेजारीच बसली. अंजलीने विवेकच्या शेजारी ठेवलेला फोन उचलण्यासाठी हात समोर केला आणि म्हणाली, '' काय घेणार थंड की गरम'' फोन उचलता उचलता अंजलीच्या हाताचा पुसटसा स्पर्ष विवेकला झाला होता. त्याचं हृदय धडधडायला लागलं. अजलीलाही तो स्पर्श सुखावह आणि हवाहवासा वाटला होता. पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखविता तीने ऑर्डर देण्यासाठी फोनचा क्रेडल उचलला. फोनचा नंबर डायल करण्यासाठी तिने दुसरा हात समोर केला. यावेळी त्या हाताचाही विवेकला स्पर्ष झाला. आतामात्र विवेक स्वत:ला रोखू शकला नाही त्याने अंजलीने फोन डायल करण्यासाठी पुढे केलेला हात हळूच आपल्या हातात घेतला. अंजली त्याच्याकडे पाहून लाजून गालातल्या गालात हसली. तिला तो हात त्याच्या हातातून सोडवून घेववेना. जणू तो हात सुन्न झाला होता. त्याने आता तो तिचा हात घट्ट पकडून ओढून तिला आपल्या आगोशात घेतले होते. सगळ कसं पटापट घडत होतं आणि ते अंजलीलाही हवंहवसं वाटत होतं. तिचं अंग अंग गरम झालं होतं आणि ओठ थरथरायला लागले होते. विवेकनेही आपले गरम आणि अधीर झालेले ओठ तिच्या थरथरत्या ओठांवर टेकवले. अंजलीचे एक मन म्हणत होते प्रतिकार करावा, पण दुसरे मन तर विद्रोही होवून सर्व मर्यादा तोडू पाहत होते. तो तिच्यावर हावी होत होता आणि तिची जणू त्राण गेल्यागत अवस्था झाली होती. विवेकने तिला पटकन आपल्या मजबुत आगोशात उचलून बाजुच्या बेडवर घेतले. तिला त्याच्या त्या उचलण्यात एक आधार देण्याची पुरुषी आणि हक्काची जाणीव दिसली की तिही काही प्रतिकार करु शकली नाही. किंबहुना तीच्याजवळ प्रतिकार करण्याची शक्तीच उरली नव्हती. तिला त्याचा तो प्रश्न आठवला '' अंजली माझ्याशी लग्न करशील?'' आणि तिचे उत्तर आठवले, '' मी थोडीच नाही म्हणाले'' तिला आता त्याच्या बाहुपाशात एक सुरक्षीततेची जाणीव होवू लागली होती. तिही आता त्याच्या प्रत्येक भावनांना साद घालीत प्रतिसाद देत होती. '' विवेक आय लव्ह यू सो मच'' तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. '' आय टू'' विवेक तिच्या गळ्याचे चुंबन घेत जणू तिच्या कानात म्हणाला. हळू हळू त्याचा मजबुत पुरुषी हात तिच्या नाजूक शरीराशी खेळायला लागला. आणि तीही एखाद्या वेलीसारखी त्याला बिलगून जणू तिच्या भावी आयुष्याचा आधार त्याच्यात शोधत होती. ' हो मीच तुझ्या भावी आयूष्याचा आधार ... साथीदार आहे' या हक्काने आता तो तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढू लागला. ' हो मीही आता सगळं तुला अर्पण करुन तुझ्या स्वाधीन करते आहे...' या विश्वासाच्या भावनेने अंजलीही त्याच्या अंगावरचे एक एक कपडे काढायला लागली. अंजली अचानक दचकून झोपेतून जागी झाली. तिने बेडवर शेजारी बघीतले तर तिच्या शेजारी विवेक निर्वस्त्र अवस्थेत चादर अंगावर पांघरुन गाढ झोपी गेलेला होता. पण झोपेतही त्याचा एक हात तिच्या निर्वस्त्र अंगावर होता. इतक्या दिवसांत रात्री अचानक वाईट स्वप्नातून जागी झाल्यानंतर तिला प्रथमच त्याच्या हाताचा एक मोठा आधार वाटला होता. अंजली चिंताग्रस्त तिच्या खुर्चीवर बसली होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर शरवरी बसली होती. विवेकसोबत घालविलेला एक एक क्षण आठवत मागचे तिन दिवस कसे गेले अंजजीला काहीच कळले नव्हते. पण आज तिला काळजी वाटायला लागली होती. "" आज तिन दिवस झालेत ... ना तो चाटींगवर भेटतो आहे ना त्याची मेल आली आहे.'' अंजली शरवरीला काळजीच्या सुरात म्हणाली. एका दिवसात कितीतरी वेळ चॅटींगवर चॅट करणारा आणि एका दिवसात कितीतरी मेल्स पाठविणारा विवेक आज तिन दिवस झाले तरी एकदाही चॅटींगवर भेटत नाही आणि त्याची एकही मेल येत नाही ही खरोखर एक काळजीची आणि चिंतेची बाब होती. "" त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल ना?'' शरवरीने विचारले. "" हो कॉलेजचा नंबर आहे ... पण त्याला तिथे फोन करने योग्य होईल का?'' अंजली म्हणाली. "" हो तेही आहे म्हणा'' शरवरी म्हणाली. "" मला काळजी वाटते की त्याला माझ्याबद्दल काही गैरसमज तर झाला नसेल ना... तो माझ्याबद्दल काही चुकीचा विचार तर करीत नसेल ना... '' अंजलीने जणू स्वत:लाच विचारले. हॉटेलमधे जे झालं ते योग्य झालं नाही... त्यामुळे विवेक कदाचित आपल्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करीत असेल कदाचित... पण जे झालं ते कसं ... अचानक... दोघांच्याही ध्यानीमनी नसतांना घडलं... आपण त्याला हॉटेलमधे बोलवायलाच नको होतं... त्याला हॉटेलमधे बोलावलं नसतं तर हा प्रसंग कदाचित टळला असता... अंजलीच्या डोक्यात विचारांच थैमान चाललेलं होतं. "" मला नाही वाटत तो चुकीचा विचार करीत असेल... तो दुसऱ्याच काही कारणांमुळे तुझ्या संपर्कात नसेल... जसं की तो काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल...'' शरवरी अंजलीच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होती. अंजलीने शरवरीला हॉटेलमधे घडलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर सांगितलेलं दिसत होतं. तसं ती तिला खुप जवळची आणि जिवाभावाची मैत्रिण समजत होती आणि तिच्यापासून काहीही लपवित नव्हती. "" त्याला हॉटेलच्या आत बोलावलं नसतं तर कदाचित ही वेळ आली नसती '' अंजली म्हणाली. "" नाही गं तसं काही नसावं... त्याचं तु उगीच वाईट वाटून घेवू नकोस.'' शरवरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती. मोनाने घाईघाईने तिच्या समोरुन जाणाऱ्या आनंदजींना थांबविले. ""आनंदजी तुम्ही शरवरीला बघितलं का?'' मोनाने विचारले. "" हो .. ती वर तिकडे विकासकडे आहे... का काय झाल?'' आनंदजीने मोनाचा काळजीयूक्त चेहरा बघून विचारले. "" नाही अंजली मॅमने तिला ताबडतोब बोलावलं आहे... तुम्ही तिकडेच जात आहात ना ... तर तिला अंजली मॅमकडे ताबडतोब पाठवून देता का प्लीज... काहीतरी महत्वाचं काम दिसतं'' मोना आनंदजींना म्हणाली. "" ठिक आहे ... मी आत्ता पाठवून देतो ..'' आनंदजी पायऱ्या चढत वर जात म्हणाले.शरवरीला आनंदजींचा निरोप मिळाल्याबरोबर ती ताबडतोब अंजलीच्या कॅबिनमधे हजर झाली. पाहाते तर अंजली हताश, निराश दोन्ही हाताच्या मधे टेबलवर आपलं डोकं ठेवून बसली होती. "" अंजली काय झालं?'' अंजलीला त्या अवस्थेत बसलेलं पाहून शरवरी काळजीने तिच्या जवळ जात, तिच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली. तिने तिला इतकं हताश आणि निराश, आणि तेही ऑफीसमधे कधीच बघितलं नव्हतं. असं काय अचानक झालं असावं?... अंजलीने हळूच आपलं डोकं वर उचललं. तिच्या हालचालीत एक शिथीलता, एक जडपणा जाणवत होता. तिचा चेहराही एकदम काळवंडलेला दिसत होता. हो तीचे वडील अचानक हृदयविकाराने वारले तेव्हाही ती अशीच दिसत होती... जडपणे आपला चेहरा कॉम्प्यूटरच्या मॉनीटर कडे करीत अंजली म्हणाली, "" शरवरी... सगळं काही संपलेलं आहे'' कॉम्प्यूटरचा मॉनीटर सुरुच होता. शरवरीने पटकन जवळ जावून कॉम्प्यूटरवर काय आहे हे बघितले. तिला मॉनीटरवर विवेकची अंजलीने उघडलेली मेल दिसली. शरवरी ती मेल वाचू लागली - "" मिस अंजली... हाय... वुई हॅड अ नाईस टाईम ... आय रिअली ऍन्जॉइड इट.. आनंदाने ओथंबून भरलेले आणि तुझ्या आणि माझ्या प्रेमाने भिजलेले ते क्षण मी माझ्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कैद करुन ठेवलेले आहेत... मी तुझी माफी मांगतो की ते क्षण मी तुझ्या परवानगी शिवाय कॅमेऱ्यात कैद केले... ते क्षण होतेच असे की मी माझा मोह आवरु शकलो नाही... तुला खोटं वाटतं... बघ... त्या क्षंणापैकी एका क्षणाचा फोटो मी या मेलसोबत पाठवित आहे... असे बरेच क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात आणि माझ्या हृदयात कैद करुन ठेवलेले आहेत... विचार आहे या क्षणांना .. या फोटोंना इंटरनेटवर पब्लीश करावं म्हणत होतो... काय कशी अफलातून आयडिया आहे? नाही? ... पण ते तुला आवडणार नाही... नाही तुझी जर तशी इच्छा नसेल त्या क्षणांना मी कायमचं माझ्या हृदयात डांबून ठेवू शकतो... पण त्यासाठी तुला त्याची एक किरकोळ किंमत मोजावी लागेल... काय करणार प्रत्येक गोष्टीची एक ठराविक निर्धारीत केलेली किंमत असते ... नाही?...काही नाही बस फक्त 50 लाख रुपए... तुझ्यासाठी अगदी किरकोळच आहेत... आणि हो... पैशाचा बंदोबस्त लवकरात लवकर कर... पैसे कुठे कसे पोहोचवायचे आहेत ... हे नंतरच्या मेलमधे कळविन... मी या मेलसाठी तुझी हृदयापासून माफी मागू इच्छीतो... पण काय करणार काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं... पुढच्या मेलची प्रतिक्षा कर... आणि हो... मला पोलिसांची फार भिती वाटते बरंका... आणि जेव्हा मला भिती वाटते तेव्हा मी काहीही करु शकतो .... अगदी खुनसुद्धा... --- तुझा ... फक्त तुझा ... विवेक '' मेल वाचून शरवरीला जणू तिच्या पायाखालची जमीन सरकावी असा भास होत होता. ती एकदम सुन्न झाली होती. असंही होवू शकतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने विवेकबद्दल काय विचार, काय ग्रह केला होता आणि तो काय निघाला. '' ओ माय गॉड ही इज अ बिग फ्रॉड... आय कांट बिलीव्ह इट...'' शरवरीच्या विस्मयाने उघड्या राहालेल्या तोंडातून निघाले. शरवरीने मेलसोबत अटॅच केलेल्या फोटोच्या लिंकवर क्लीक करुन बघितले. तो अंजलीचा आणि विवेकचा हॉटेलच्या सुईटमधला एकमेकांना आगोशात घेतलेला नग्न फोटो होता. '' पण त्याने हा फोटो घेतला तरी कसा?'' शरवरीने शंका उपस्थित केली. "" मी मुंबईला कधी जाणार ... कुठे थांबणार... याची त्याला पुर्ण पुर्वकल्पना होती '' अंजली म्हणाली. '' हे तर सरळसरळ ब्लॅकमेलींग आहे. '' शरवरी आवेशात येवून चिडून म्हणाली. '' त्याच्या निरागस चेहऱ्यामागे एवढा भयानक चेहराही लपलेला असू शकतो ... मला तर अजूनही विश्वासच होत नाही आहे'' अंजली दु:खाने म्हणाली. '' कमीत कमी लग्नाच्या आधी आपल्याला त्याचे हे भयानक रुप कळले... नाही तर देव जाणे काय झाले असते...'' शरवरी म्हणाली. '' मला दु:ख पैशाचे नाही आहे... दु:ख त्याने माझा एवढा मोठा विश्वासघात करावा या गोष्टीचे आहे. '' अंजली म्हणाली. '' समजा ... एक क्षण गृहीत धरु की आपण त्याला 50 लाख रुपए दिले... पण पैसे घेतल्यानंतर तो पुन्हा आपल्याला ब्लॅकमेलींग करणार नाही या गोष्टीची काय शाश्वती... मला वाटते तू त्याला एकदा मेल पाठवुन समजावण्याचा प्रयत्न कर ... जर तरीही तो अडून राहाला तर आपण यातून काही तरी दुसरा मार्ग काढूया'' शरवरी तिला धीर देत म्हणाली. सायबर कॅफेमधे आपापल्या क्यूबीकल्स मधे लोक आपापल्या इंटरनेट सर्फींग मधे बिझी होते. काही कॉम्प्यूटर्स उघड्यावर होते तिथेसुध्दा एकही कॉम्प्यूटर रिकामा नव्हता. की बोर्डच्या बटनांचा एक विशीष्ट आवाज एका विशीष्ट लयीत संपूर्ण कॅफेत येत होता. सगळे जण, कुणी चाटींग, कुणी सर्फींग, कुणी गेम्स खेळण्यात तर कुणी मेल्स पाठविण्यात असे आपापल्या कामात गुंग होते. तेवढ्यात एक माणूस दरवाज्यातून आत आला. तो कावऱ्याबावऱ्या नजरेने आणि ज्या तऱ्हेने आत इकडे तिकडे पाहत होता त्यावरुन तरी तो प्रथमच इथे आला असावा असं जाणवत होतं. रिसेप्श्न काऊंटरवरील स्टाफ मेंबर त्याच्या समोर ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर पत्याचा गेम 'सॉलीडेअर' खेळत होता. त्या माणसाची चाहूल लागताच त्याने पटकन, मोठ्या सफाईने आपल्या मॉनीटरवरील तो गेम मिनीमाईझ केला आणि आलेला माणूस हा आपला बॉस किंवा बॉसच्या घरचं कुणी नाही हे लक्षात येताच तो पुन्हा तो गेम मॅक्सीमाईज करुन खेळू लागला. तो आत आलेला माणूस एक क्षण रिसेप्शन काऊंटरवर घूटमळला आणि थांबून स्टाफला विचारु लागला - '' विवेक आला का?'' त्या स्टाफने निर्वीकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत विचारले - '' कोण विवेक?'' '' विवेक सरकार ... खरं म्हणजे तो माझा मित्र ... आणि त्यानेच मला इथे बोलावले आहे..'' तो माणूस म्हणाला. '' अच्छा तो विवेक... नाही तो दिसला नाही आज.. तसा तर तो रोज येत असतो पण कालपासून मी त्याला बघितलं नाही... '' काऊंटरवरील स्टाफने उत्तर दिले आणि तो आपल्या समोर ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर पुन्हा 'सॉलीडेअर' खेळण्यात मग्न झाला. अंजली कॉन्फरंन्स रुममधे भिंतिवर लावलेल्या छोट्या पडद्यावर प्रोजेक्टरच्या सहाय्याने शरवरीला काहीतरी समजावून सांगत होती. आणि शरवरी ती जे सांगत होती ते लक्ष देवून ऐकत होती. '' शरवरी जसं तु सांगितलं होतं तशी मी विवेकला समजावून बघण्यासाठी एक मेल पाठवली आहे... पण त्याला नूसती मेलच न पाठविता मी एक मोठा डाव खेळला आहे... '' अंजली सांगत होती. '' डाव? ... कसला?...'' शरवरीने काही न समजून आश्चर्याने विचारले. '' त्याला पाठविलेल्या मेलसोबत मी एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अटॅच करुन पाठवला आहे'' अंजली म्हणाली. '' कसला प्रोग्रॅम?'' शरवरीला अजूनही काही उमगलेले दिसत नव्हते. '' त्या प्रोग्रॅमला 'स्निफर' म्हणतात... जशी विवेक त्याला पाठवलेली ती मेल उघडेल .. तो स्निफर प्रोग्रॅम रन होईल...'' अंजली सांगू लागली. '' पण तो प्रोग्रॅम रन झाल्याने काय होणार आहे?'' शरवरीने विचारले. '' त्या प्रोग्रॅमचे काम आहे ... विवेकच्या मेलचा पासवर्ड माहीत करणे... आणि तो पासवर्ड माहीत होताच तो प्रोग्रॅम आपल्याला तो पासवर्ड मेलद्वारा पाठवेल... '' अंजली सांगत होती. '' अरे वा... '' शरवरी उत्साहाने म्हणाली पण दुसऱ्याच क्षणी काहीतरी विचार केल्यागत शरवरीने विचारले, '' पण त्याचा पासवर्ड माहीत करुन आपल्याला काय मिळणार आहे?'' '' ज्या तऱ्हेने विवेक मला ब्लॅकमेल करीत आहे... त्याच तऱ्हेन होवू शकतं की तो अजून बऱ्याच जणांना ब्लॅकमेलींग करत असेल...किंवा त्याच्या मेलबॉक्समधे आपल्याला त्याची काहीतरी कमजोरी... किंवा काहीतरी आपल्या उपयोगाचे माहित पडेल... तसं सध्या आपण अंधारात तीर मारतो आहोत... पण मला विश्वास आहे आपल्याला काहीना काही नक्कीच मिळेल'' '' हो ... शक्य आहे'' शरवरी म्हणाली '' मला काय वाटतं... आपल्याला आपला दुश्मन कोण आहे हे माहित आहे... तो कुठे राहातो हेही माहीत आहे... मग तो आपल्यावर वार करण्याआधी आपणच जर त्याच्यावर वार केला तर?'' '' ती शक्यताही मी पडताळून पाहाली आहे... पण तो सध्या त्याच्या होस्टेलमधून गायब आहे... वुई डोन्ट नो हिज व्हेअर अबाऊट्स'' तेवढ्यात कॉम्प्यूटरचा बझर वाजला. अंजलीने आणि शरवरीने पटकन वळून मॉनिटरकडे बघितले. मॉनिटरकडे बघताच दोघींच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य तरळले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अंजलीने विवेकच्या मेलला अटॅच करुन पाठविलेल्या सॉफ्टवेअरचीच ती मेल होती. आता दोघींनाही ती मेल उघडण्याची घाई झाली होती. केव्हा एकदा ती मेल उघडतो आणि केव्हा एकदा विवेकच्या आलेल्या पासवर्डने त्याचा मेल अकाऊंट उघडतो असं अंजलीला झालं होतं. तिने पटकन डबलक्लीक ती मेल उघडली. '' यस्स!'' तिच्या तोंडून विजयी उद्गार निघाले. तिने पाठविलेल्या स्निफरने आपले काम चोख बजावले होते. तिने विजेच्या गतिने मेल सॉफ्टवेअर ओपन केले आणि ... '' हा त्याचा मेल आयडी आणि हा त्याचा पासवर्ड'' म्हणत विवेकचा मेल ऍड्रेस टाईप करुन त्या प्रोग्रॅमला विवेकच्या मेलचा पासवर्ड पुरविला. अंजलीने त्याचा मेल अकाऊंट उघडताच अजून की बोर्डची दोन चार बटन्स आणि दोन चार माऊस क्लीक्स केले. आणि दोघीही कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघायला लागल्या. '' ओ माय गॉड ... आय जस्ट कान्ट बिलीव्ह'' अंजलीच्या उघड्या तोंडून उद्गार निघाले. शरवरी आलटून पालटून एकदा मॉनिटरकडे तर दुसऱ्यांदा अंजलीच्या आश्चर्याने उघड्या राहलेल्या तोंडाकडे बघत होती. अंजली आपल्या ऑफीसमधे खुर्चीवर बसून काहीतरी विचार करीत होती. तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. कदाचित तिला तिच्या जिवनात एकदम अशी कलाटणी येईल अशी अपेक्षा नसावी. तिने तिचा कॉम्प्यूतर सुरु तर करुन ठेवला होता पण तिला ना चाटींग करण्याची इच्छा होत होती ना कुणा मित्राला मेल पाठविण्याची. तिने आपल्या ऑफीशियल मेल्स चेक करुन घेतल्या आणि पुन्हा ती विचार करीत बसली. तेवढ्यात तिच्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. तिने आपली चेअर फिरवून कॉम्प्यूटरकडे आपले तोंड केले- ' हाय ... मिस अंजली' विवेकचा चॅटींग मेसेज होता. तिला जाणवलं की तिच्या हृदयाची स्पंदनं वाढत आहेत. पण यावेळी स्पंदनं वाढण्याचं कारण वेगळं होतं. अंजली नुसती त्या मेसेजकडे बघत राहाली. तिला आता काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात शरवरी आत आली. अंजलीने शरवरीला विवेकचा मेसेज आल्याचा इशारा केला. शरवरी पटकन त्यांनी काहीतरी आधी ठरविल्याप्रमाणे बाहेर निघून गेली. अंजली अजूनही त्या मेसेजकडे पाहत होती. ' अंजली कम ऑन एकनॉलेज यूवर प्रेझेन्स' विवेकचा पुन्हा मेसेज आला. ' यस' अंजलीने टाईप केले आणि सेंड बटनवर क्लीक केले. अंजलीला कॉम्प्यूटर ऑपरेट करतांना तिच्या हातात आणि बोटांत प्रथमच कंपनं जाणवत होती. ' मी आता मेलमधे सगळी डीटेल्स पाठवित आहे' विवेकचा मेसेज आला. ' पण 50 लाख रुपए दिल्यानंतरही पुन्हा तू ब्लॅकमेल करणार नाहीस याची काय शास्वती?' अंजलीने मेसेज पाठवला. विवेकने तिकडून एक हसणारा छोटा चेहरा पाठविला. यावेळी अंजलीला त्या चेहऱ्याच्या हसण्यात साधेपणापेक्षा गुढपणा जास्त जाणवत होता. ' हे बघ... जग विश्वासावर चालतं ... तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल... आणि तुझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा काय पर्याय आहे?' तिकडून विवेकचा खोचक प्रश्न विचारणारा मेसेज आला. आणि तेही खरंच होतं... तिच्याजवळ त्याच्यावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा काहीही पर्याय नव्हता... अंजली आता त्याने पाठविलेल्या मेसेजला काय उत्तर पाठवावे याचा विचार करु लागली. तेवढ्यात त्याचा पुढील मेसेज आला - ' ओके देन बाय... दिस इज अवर लास्ट कन्व्हरसेशन... टेक केअर... तुझा ... आणि फक्त तुझा विवेक...' अंजली त्या मेसेजकडे बराच वेळ पाहत राहाली. नंतर तिला काय सुचले काय माहीत तिने पटापट किबोर्डवर काही बटनं दाबली आणि माऊसवर काही क्लीक्स केले. तिच्या समोर तिचा मेलबॉक्स अवतरला होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे आणि विवेकने चाटींगवर सांगितल्या प्रमाणे त्याची मेल तिच्या मेलबॉक्समधे येवून पडलेली होती. तिने क्षणाचाही विलंब न लावता ती मेल उघडली. मेलमधे 50 लाख रुपए कुठे कसे आणि केव्हा नेवून ठेवायचे याची तपशिलवार माहिती दिली होती. सोबतच पोलिसांच्या भानगडीत न पडण्याबद्दल ताकिद दिली होती. अंजलीने आपल्या घडाळाकडे बघितले. अजूनही पैसे मेलमधे नमुद केलेल्या जागी पोहोचविण्यास 4 तासांचा अवधी शिल्लक होता. तिने एक दिर्घ श्वास घेवून एक सुस्कारा सोडला. ती तसे करुन तिच्या मनावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. तसे चार तास म्हणजे तिच्यासाठी पुरेसा अवधी होता. आणि पैशाची व्यवस्थाही तिने आधीच करुन ठेवली होती - अगदी पैसे सुटकेसमधे पॅक करुन. मेलकडे पाहता पाहता तिच्या अचानक लक्षात आले की मेलसोबत काहीतरी अटॅचमेंट पाठवलेली आहे. तिने ती अटॅचमेंट उघडून बघितली. तो एक JPG फॉरमॅटमधील एक फोटो होता. तिने क्लीक करुन तो फोटो उघडला. तो त्यांचा हॉटेलच्या रुम मधील दिर्घ चूंबन घेत असतांनाचा फोटो होता. जॉनी आपल्याच धूनमधे मस्त मजेत शिळ घालत रस्त्यावर चालत होता. तेवढ्यात त्याला मागून अनपेक्षीतपणे कुणीतरी आवाज दिला. '' जॉनी...'' जॉनी शिळ वाजवायचं थांबवून एक क्षण तिथेच थबकला. आवाज ओळखीचा वाटत नव्हता म्हणून त्याने मागे वळून बघितले. एक माणूस घाई घाईने त्याच्याजवळ येत होता. जॉनी त्या माणसाकडे असमंजसपणे बघायला लागला कारण तो त्या माणसाला ओळखत नव्हता. मग याला आपलं नाव कसं काय माहित झालं?.. जॉनी विचार करीत गोंधळलेल्या मनस्थितीत उभा होता. तोपर्यंत तो माणूस येवून त्याच्याजवळ पोहोचला. '' मी विवेकचा मित्र आहे... मी त्याला कालपासून शोधत आहे... मला कॅफेवरच्या त्या पोराने सांगितले की कदाचित तुला माहित असेल'' तो माणूस म्हणाला. कदाचित त्या माणसाने जॉनीच्या मनाचा उडालेला गोंधळ ओळखला असावा. '' नही तसा तर तो मला सांगून गेला नाही ... पण मी काल त्याच्या होस्टेलवर गेलो होतो... तिथे त्याचा एक मित्र सांगत होता की तो 10-15 दिवसांकरीता कुण्या नातेवाईकाकडे गेला आहे...'' जॉनीने सांगितले. '' कोणत्या नातेवाईकाकडे ?'' त्या माणसाने विचारले. '' नाही तेवढं मला माहित नाही ... त्याला मी तसं विचारलं होतं पण ते त्यालाही माहित नव्हतं ... त्याला फक्त त्याची मेल आली होती'' जॉनीने माहिती पुरवली. अंजली आपल्या खुर्चीवर बसलेली होती आणि तिच्या समोर टेबलवर एक बंद ब्रिफकेस ठेवलेली होती. तिच्या समोर शरवरी बसलेली होती. त्यांच्यात एक गुढ शांतता पसरली होती. अचानक अंजली उठून उभी राहाली आणि आपला हात हळूच त्या ब्रिफकेसवरुन फिरवीत म्हणाली, '' सगळ्या बाबी पुर्णत: लक्षात घेतल्या तर एकच गोष्ट ठळकपणे समोर येते..'' '' कोणती?'' शरवरीने विचारले. '' की आपल्याला त्या ब्लॅकमेलरला 50 लाख देण्याव्यतिरिक्त आपल्याजवळ सध्यातरी दुसरा मार्ग नाही आहे... आणि आपण रिस्कसुद्धा तर घेवू शकत नाही'' '' हो तुझं बरोबर आहे'' शरवरी अधांतरी बघत काहीतरी विचार केल्यागत म्हणाली. अंजलीने ती ब्रिफकेस उघडली. ब्रिफकेसमधे हजार हजारचे बंडल्स व्यवस्थीत एकावर एक असे रचून ठेवलेले होते. तिने त्या नोटांवर एक नजर फिरवली, मग ब्रिफकेस बंद करुन उचलली आणि लांब लांब पावले टाकीत ती तिथून निघून जावू लागली. तेवढ्यात तिला मागून शरवरीने आवाज दिला - '' अंजली...'' अंजली ब्रेक लागल्यागत थांबली आणि शरवरीकडे वळून पाहू लागली. '' काळजी घे '' शरवरी तिच्याबद्दल काळजी वाटून म्हणाली. अंजली दोन पावले पुन्हा आत आली, शरवरीजवळ गेली, शरवरीच्या खांद्यावर तिने हात ठेवला आणि वळून पुन्हा भराभर पावले टाकीत तिथून निघून गेली. घनदाट जंगल. जंगलात चहुबाजुकडे वाढलेली उंच उंच झाडे दिसत होती. आणि झाडाखाली वाळलेली झाडांची पानं पसरलेली होती. जंगलातील झाडाच्या मधील अरुंद जागेतून रस्ता शोधीत एक काळी काचं चढवलेली काळी कार नागमोडी वळने घेत त्या वाळलेल्या पानांतून चालू लागली. त्या कारच्या चालण्यासोबतच त्या वाळलेल्या पानांचा एक विचित्र चुरगाळल्यासारखा आवाज येत होता. हळू चालत असलेली ती कार त्या जंगलातून रस्ता काढीत काढीत एका झाडाजवळ येवून थांबली. त्या कारच्या ड्रायव्हर सिटचा काळा काच हळू हळू खाली सरकला. ड्रायव्हींग सिटवर अंजली काळा गॉगल घालून बसली होती. तिने कारचे इंजीन बंद केले आणि बाजुच्या झाडाच्या बुंध्यावर लागलेल्या लाल खुणेकडे बघितले. तिने हेच ते झाड अशी मनाशी खुनगाठ बांधली असावी... नंतर तिने जंगलात चौफेर एक दृष्टी फिरवली. दुर-दुरपर्यंत एक चिटपाखरुही दिसत नव्हते. जवळपास कुणाचंही अस्तीत्व नसावं याची शाश्वती करुन तिने तिच्या पलिकडील सिटवर ठेवलेली ब्रिफकेस उचलून प्रथम आपल्या मांडीवर घेतली. ब्रिफकेसवर दोनदा आपला हाथ थोपटून तिने आपल्या मनाचा निश्चय पुन्हा पक्का केला असावा. आणि जणू आपला निश्चय पुन्हा डगमगला जाईल का काय या भितीने तिने पटकन ती ब्रिफकेस कारच्या खिडकीतूनच्या त्या झाडाच्या बुंध्याच्या दिशेने फेकली. धप्प आणि सोबतच वाळलेल्या पानांचा चुरगाळल्यासारखा एक विचित्र आवाज आला. झाले आपले काम संपले... चला आपली या प्रकरणातून एकदाची सुटका झाली... असा विचार करुन तिने सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्या क्षणीच तिच्या मनात एक विचार डोकावून गेला. खरोखरच आपली या प्रकरणातून सुटका झाली का?... तिने पुन्हा आजुबाजुला बघितले. आजुबाजुला कुठेही काहीही मानवी हालचाल दिसत नव्हती. तिने पुन्हा कार स्टार्ट केली. आणि कार गर्रकन वळवून ती तिथून वेगात निघून गेली. जणू तिथून निघून जाणे हे तिच्यासाठी त्या प्रकरणातून कायमचे सुटण्यासारखे होते. कार निघून गेली तशी त्या सुनसान जागेत एका झाडावर एका उंच जागी एक मानवी हालचाल जाणवली. एका झाडाच्या पानाच्या रंगाचे हिरवे कपडे घातलेल्या, तोंडावर त्याच रंगाचे कापड गुंडाळलेल्या आणि उंच झाडावर बसलेल्या एका माणसाने त्याच हिरव्या रंगाचा वायरलेस आपल्या तोंडाजवळ नेला. '' सर एव्हरी थींग इज क्लिअर ... यू कॅन प्रोसीड'' तो वायरलेसमधे बोलला आणि पुन्हा आपली चौकस नजर इकडे तिकडे फिरवू लागला. कदाचित ती कार निघून गेली ती परत तर येत नाही ना. किंवा त्या कारचा पाठलाग करीत इथे अजून कुणी तर आलं नाहीना याची तो खात्री करीत असावा. '' सर एव्हती थींग इज क्लिअर... कन्फर्मींग अगेन'' तो पुन्हा वायरलेसमधे बोलला. त्या झाडावरच्या माणसाचा इशारा मिळताच ज्या झाडाच्या बुंध्यावर लाल निशान केले होते त्या झाडाच्या बाजुलाच असलेल्या एका मोठ्या वाळलेल्या पानांच्या ढिगामधे हालचाल झाली. कार सुरु झाल्याचा आवाज आला आणि त्या वाळलेल्या पानांच्या ढिगाला बाजुला सारत, त्यातून एक कार बाहेर आली. ती कार हळु हळू पुढे सरकत जिथे ती ब्रीफकेस पडलेली होती तिथे गेली. कारमधून एक काळे कपडे आणि तोंडावर काळे कापड बांधलेला एक माणूस बाहेर आला. त्याने चौकस नजरेने इकडे तिकडे बघितले. जिथे त्याचा माणूस झाडावर बसलेला होता तिकडे पाहाले आणि त्याला अंगठा दाखवून इशारा केला. झाडावर बसलेल्या माणसानेही अंगठा दाखवून प्रतिसाद दिला आणि सर्वकाही कंट्रोलमधे असल्याचा संकेत दिला. त्या कारमधून उतरलेल्या त्या काळे कपडे घातलेल्या माणसाने आजुबाजुला कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करीत ती खाली पडलेली ब्रीफकेस हळूच उचलली. ब्रीफकेस उचलून घेवून कारच्या बोनटवर ठेवून उघडून बघितली. हजार रुपयांची एकमेकांवर ठेवलेली बंडल्स दिसताच त्याच्या चेहऱ्यावर लावलेल्या काळ्या कपड्याच्या मागे लपलेल्या चेहऱ्यावर नक्कीच आनंदाची एक लहर पसरली असेल. आणि त्या नोटांचा सुगंध त्याच्या नाकातून शिरुन त्याच्या डोक्यापर्यंत भिनला असेल. त्याने त्यातलं एक बंडल उचलून बोट फिरवून चाळून बघितलं आणि पुन्हा ब्रिफकेसमधे ठेवून दिलं. त्याने पुन्हा ब्रिफकेस बंद केली. झाडावर बसलेल्या माणसाला पुन्हा अंगठा दाखवून सगळे व्यवस्थित असल्याचा इशारा केला. ती काळी आकृती पुन्हा ब्रिफकेस घेवून तिच्या कारमधे येवून बसली. कारचे दरवाजा बंद झाला, कार सुरु झाली आणि हळू हळू वेग पकडत भन्नाट वेगाने ती कार तिथून नाहीशी झाली. जणू तिथून निघून जाणे हे त्या व्यक्तीसाठी त्या नोटांवर लवकरात लवकर कायमचा हक्क मिळविण्यासारखे होते. त्या मनाला सलणाऱ्या, नव्हे मनाला पुर्णपणे उध्वस्त करु पाहणाऱ्या प्रसंगाला आता 10-15 दिवस तरी झाले असतील. त्या प्रसंगाला जेवढं शक्य होईल तेवढं विसरुन अंजली आता पुर्ववत आपल्या कामात मग्न झाली होती. किंबहूना त्या कटू आठवणी आणि त्या कटू यातना टाळण्यासाठी तिने स्वत:ला पुर्णपणे कामात डूबवून घेतले होते. मंध्यतरीच्या काळात अंजलीला आयटी क्षेत्रात एक मानाचा समजल्या जाणारा 'आय टी वुमन ऑफ द ईअर' अवार्ड मिळाला होता. त्या अवार्डच्या निमित्ताने बऱ्याच प्रेसवाल्यांची तिच्याकडे रिघ लागली होती. तिलाही ती रिघ हवीहवीशी वाटत होती. त्या निमित्ताने तिचा एकटेपणा टाळल्या जात होता आणि एकटेपणा टळल्यामुळे त्या कटू आठवणी तिला सतावित नव्हत्या. मागील चारपाच दिवसांपासून जवळपास रोजच कधी वर्तमान पत्रात तर कधी टीव्हीवर तिचे इंटरव्हू झळकत होते. अंजली ऑफीसमधे बसलेली होती. शरवरी तिच्या बाजुलाच बसून तिच्या कॉम्प्यूटरवर काम करीत होती. तो वाईट अनुभव आल्यापासून अंजलीचं चॅटींग आणि मित्रांना मेल पाठविणं एकदमच कमी झालं होतं. फावल्या वेळात ती नुसतीच बसून शुन्यात बघत विचार करीत असायची. तिच्या मनात विचारांचा अगदी गोंधळ उडत असे. पण ती ताबडतोब ते विचार आपल्या डोक्यातून झटकून टाकायची. आताही तिच्या मनात विचारांचा कसा गोंधळ उडाला होता. तिने ताबडतोब आपल्या मनातले विचार झटकून मनाला दुसऱ्या कामात गुंतविण्याचा प्रयत्न करीत टेबलचा ड्रावर उघडला. ड्रॉवरमधे तिला ते तिने जपून ठेवलेले वर्तमानपत्राचे कात्रण दिसले. ' आय टी वुमन ऑफ द इअर - अंजली अंजुळकर' वर्तमानपत्राच्या कात्रणारवर हेडलाईन होती. तिने ते कात्रण बाहेर काढून टेबलवर पसरविले आणि पुन्हा ती बातमी वाचायला लागली. ही बातमी वाचायला आता यावेळी आपले वडील असायला पाहिजे होते... तिच्या मनात एक विचार चमकून गेला. किती अभिमान वाटला असता त्यांना... आपल्या लेकीचा... पण नियतीसमोर कुणाचे काय चालते... आता बघा ना हाच एक ताजा अनूभव... ती विचार करीत होती तेवढ्यात कॉम्प्यूटरचा बझर वाजला. बऱ्याच दिवसांपासून चॅटींग आणि मेलींग कमी केल्यापासून सहसा कॉम्प्यूटरवर कुणाचा मेसेज येत नसे.... मग आज हा कुणाचा मेसेज असावा... कुणी हितचिंतक?... की कुणी हितशत्रू... आजकाल कसं प्रत्येक गोष्टीमधे तिला दोन्ही बाजू दिसत असत- एक चांगली आणि एक वाईट. ठेच लागल्यावर माणून प्रत्येक पावूल कसा जपून टाकतो तसं. अंजलीने वळून मॉनीटरकडे पाहाले. '' विवेकचा मेसेज आहे...'' कॉम्प्यूटरवर बसलेली शरवरी अंजलीकडे पाहून भितीयूक्त स्वरात म्हणाली. शरवरीच्या चेहऱ्यावर भिती आणि आश्चर्य साफ दिसत होतं. त्याच भावना आता अंजलीच्या चेहऱ्यावरही उमटल्या होत्या. अंजली ताबडतोब उठून शरवरीजवळ गेली. शरवरी अंजलीला कॉम्प्यूटरसमोर बसण्यास जागा देवून उठून तिथून बाजूला झाली. अंजलीने कॉम्प्यूटरवर बसण्यापुर्वी शरवरीला काहीतरी खुणावले तशी शरवरी ताबडतोब दरवाजाजवळ जावून अंजलीच्या कॅबिनमधून लगबगीने बाहेर पडली. '' मिस. अंजली ... हाय ... कशी आहेस?'' विवेकचा तिकडून आलेला मेसेज अंजलीने वाचला. एक क्षण तिने विचार केला आणि तीही चॅटींगचा मेसेज टाईप करु लागली - '' ठीक आहे... '' तिने मेसेज टाईप केला आणि सेंड बटनवर क्लीक करुन तो मेसेज पाठवून दिला. '' तुला पुन्हा त्रास देतांना मला वाईट वाटतं आहे... पण काय करणार ... पैसा ही साली गोष्टच वेगळी असते... कितीही जपून वापरली तरी संपून जाते...'' तिकडून विवेकचा मेसेज आला. अंजलीला शंका आली होतीच की तो अजून पैसे मागणार... '' मला यावेळी 20 लाख रुपयाची नितांत गरज आहे...'' तिकडून विवेकचा मेसेज आला. '' आत्ता तर तुला 50 लाख रुपए दिले होते... आता माझ्याजवळ पैसे नाही आहेत...'' अंजलीने पटकन टाईप करुन मेसेज पाठवला सुध्दा. मेसेज टाईप करतांना तिच्या डोक्यात अजूनही बऱ्याच विचारांचं चक्र सुरु होतं. '' बस हे शेवटचं... कारण हे पैसे घेवून मी परदेशात जाण्याचा विचार करतोय'' तिकडून विवेकचा मेसेज आला. '' तु परदेशात जा... नाहीतर कुठेही जा ... मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही ... हे बघ... माझ्याजवळ काही पैशाचं झाड नाही आहे... '' अंजलीने मेसेज पाठवला. '' ठिक आहे... तुला आता मला कमीत कमी 10 लाख रुपए तरी द्यावे लागतील... पैसे केव्हा कुठे आणि कसे पाठवायचे ते मी तुला मेल करुन सांगीन...'' तिकडून मेसेज आला. अंजली काही टाईप करुन त्याला पाठविणार त्याआधीच विवेकचा चॅटींग सेशन बंद झाला होता. अंजली एकटक तिच्या समोरच्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पहायला लागली. ती मॉनिटरकडे पाहत होती खरी पण तिच्या डोक्यात डोक्यात आता विचारांचं काहूर माजलं होतं. पण पुन्हा तिच्या डोक्यात काय आलं काय माहित ती पटकन उठून तरातरा आपल्या कॅबिनमधून बाहेर पडली. 'इथीकल हॅकींग कॉम्पीटीशन - ऑर्गनायझर - नेट सेक्यूरा' असा मोठ्या अक्षरात लिहिलेला बॅनर स्टेजवर लावला होता. आज कॉम्पीटीशनची सांगता होती आणि विजेते जाहिर केले जाणार होते. पारीतोषीक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंजलीला बोलावण्यात आलं होतं. स्टेजवर त्या बॅनरच्या बाजुला अंजली प्रमुख पाहुण्यांसाठी राखून ठेवलेल्या खुर्चीवर बसली होती. आणि तिच्या बाजुला एक वयस्कर माणूस बसला होता. कदाचित तो 'नेट सेक्यूरा' चा हेड असावा. तेवढ्यात स्टेजच्या मागून ऍन्कर समोर माईकपाशी जावून बोलू लागला, '' गुड मॉर्निंग लेडीज ऍंड जन्टलमन... जसे की तुम्ही सगळे लोक जाणता आहाच की आमची कंपनी '' नेट सेक्यूराचं हे सिल्वर जूबिली वर्ष आहे आणि त्या निमीत्ताने आम्ही इथीकल हॅकींग या प्रतियोगीतेचं आयोजन केलेलं होतं... आज आपण त्या प्रतियोगीतेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे पारितोषीक वितरणाच्या टप्प्यात पोहोचलो आहोत... या पारितोषीक वितरणासाठी आपण एका खास पाहूण्यांना प्राचारण केलेले आहे... ज्यांना एवढ्यातच आय टी वूमन ऑफ द ईयर हा मौल्यवान अवार्ड देवून सन्मानित करण्यात आलेलं आहे... '' हॉलमधे बसलेल्या सर्वांच्या नजरा स्टेजवर बसलेल्या अंजलीवर खिळल्या होत्या. अंजलीनेही एक मंद स्मित आपल्या चेहऱ्यावर धारण करुन हॉलमधे बसलेल्या लोकांनवरुन एक नजर फिरवली. '' आणि त्या प्रमुख पाहूण्यांच नाव आहे... मिस अंजली अंजुळकर .... त्यांच्या स्वागतासाठी मी स्टेजवर आमच्या एक्सीक्यूटीव मॅनेजर श्रीमती नगमा शेख यांना आमंत्रित करतो...'' श्रीमती नगमा शेख यांनी स्टेजवर येवून फुलांचा गुच्छ देवून अंजलीचं स्वागत केलं. अंजलीनेही उभं राहून त्या फुलाच्या गुच्छाचा नम्रपणे स्विकार करुन अभिवादन केलं. हॉलमधे टाळ्यांचा कडकडाट घूमला. जणू एका क्षणात हॉलमधे उपस्थित सर्व लोकांच्या अंगात एक उत्साह संचारला होता. टॉळ्यांचा गजर ओसरताच ऍन्कर पुढे बोलू लागला - '' आता मी स्टेजवर उपस्थित आमचे मॅनेजींग डायरेक्टर श्री. भाटीयाजी यांच्या स्वागतासाठी आमचे मार्केटींग मॅनेजर श्री. सॅम्यूअल रेक्स यांना आमंत्रित करतो आहे...'' श्री. सॅम्यूअल रेक्स यांनी स्टेजवर जावून भाटीयाजींचं एक फुलांचा गुच्छ देवून स्वागत केलं. हॉलमधे पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. '' आता भाटीयाजींना मी विनंती करतो की त्यांनी इथे येवून दोन प्रोत्सानपर शब्द बोलावेत'' ऍन्करने माईकवर जाहिर केले आणि तो भाटीयाजींची माईकजवळ येण्याची वाट पाहत उभा राहाला. भाटीयाजी खुर्चीवरुन उठून उभे राहाले. त्यांनी एक नजर अंजलीकडे टाकली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केलं. आणि स्थूल शरीर असल्यामुळे हळू हळू चालत भाटीयाजी माईकजवळ येवून पोहोचले. '' आज इथीकल हॅकींग या स्पर्धेसाठी आमंत्रित केलेली ... जी.एच इन्फॉर्मॆटीक्स ची मॅनेजींग डायरेक्टर आणि आय टी वूमन ऑफ दिस इयर मिस अंजली अंजुळकर, इथे उपस्थित माझ्या कंपनीचे सिनीयर आणि जुनियर स्टाफ मेंबर्स, या प्रतिस्पर्थेत भाग घेतलेले देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले उत्साही युवक आणि युवती, आणि या स्पर्थेचा निकाल ऐकण्यास उत्सुक असलेले लेडीज ऍन्ड जन्टलमन... खरं म्हणजे... ही एक स्पर्धा म्हणून नव्हे तर प्रत्येकाच्या जिवनातली प्रत्येक गोष्ट ही एक स्पर्धाच असते... पण स्पर्धा ही खिलाडू वृत्तीने खेळली गेली पाहिजे हे महत्वाचे... आता बघा ... हा एवढा मोठा आमच्या कंपनीचा स्टाफ पाहून मला एक गोष्ट आठवली... की 1984 साली आम्ही ही कंपनी सुरु केली... तेव्हा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त 3 होती... मी आणि अजुन दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्स... आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक दिवस लढत झगडत... प्रत्येक दिवसाला एक स्पर्धा समजून आजच्या या स्थितीला पोहोचलो... मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आज आपल्या कंपनीने या देशातच नव्हे तर विदेशातही आपला झेडा फडकविला आहे आणि आज आपल्या कर्मच्याऱ्यांची संख्या... 30000 च्या वर आहे...'' हॉलमधे पुन्हा एकदा उत्स्फुर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा कडकडाट ओसरल्यावर भाटीयाजी पुन्हा पुढे बोलू लागले. पण स्टेजवर बसलेली अंजली त्यांचं भाषण एकता एकता केव्हा आपल्याच विचारात बुडून गेली हे तिला कळलेच नाही... %%%%%%%%%%%%http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus %%%%%%%%%% CS671A: amasare 150807 पान नं. 1 हे आत्मचरित्र नाही. आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्या संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे. पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ? प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नाते जाणवते का ? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडयातुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पान नं. 2 पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू गात माझ्या झाडावर उतरतं. चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात. ...हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कां जमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ? एक होता राजा आणि एक होती.. (एक कोण होती ?) ... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ? की...(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त ...एक होती परी आणि ती झाली म्हातारी ? .... .... सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच. सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल. म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे, असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळ खेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत. अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browne च्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं. आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे पान नं. 3 करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ? आजा पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही. सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Gray of the purest melanchol. झाडेदेखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी या बाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्या सजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून- पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेले नसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही. अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ? की आशादायक ? मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हे पाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो. प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्याभोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच, या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहे हे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ? माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुख दत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित पान नं. 4 कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते, नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ स्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही. पान नं. 5 आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा- आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले. पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच. मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो. अधूनमधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ? आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीर दुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधूनमधून शंका येई. पण समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले, आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?"" त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं, ""किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !"" पान नं. 6 ""आप्पा, मला ओळखलंत ?"" ""माझे भाई नाही आले ?"" म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले. डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणताक्षणी आले होते ते आता घरी जायला निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,""आप्पांचं सर्व काही फार छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून जगवत ठेवू नका."" डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती. असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे"" आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला. बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते. पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना- सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो. कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान ! कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने, नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही. आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा पान नं. 7 वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा,भावनांचा गुंता आहे. तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा यासाठी हा सलारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरे वगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ? हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली. मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदम मन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीही एकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी असेच कौतुक केले होते असेल... फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत, मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे. आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना. किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते. खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्त आहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे ! मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ? रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही पान नं. 8 अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था. तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाहीपुढे मदतीसाठी याचना केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुलेमाणसे घरात होती. सेपाकपाणी, आलेगेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्या काळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालू आहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काही करणे, अगदी पुढलामागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे... सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्याशिवाय कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरे माझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूप काही होते. अगदी परवापरवापर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे. पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांत पुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेक व्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला पान नं. 9 कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच आहे; पिंड तोच आहे. संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल, पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळीप्रसंगी मीही ते करू शकले असते. पण जिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वी कधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही. याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली, आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा, तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हां सर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधी कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडे यांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाच इतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर पान नं. 10 बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हाकपभर चहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत. या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ? पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतो हे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे. यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नातजावयाला पोचव-म्हणजे आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मी त्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळतीसएक वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते. मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे, रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्या अधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांना नक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल. हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तो त्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ? मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुणदोषही अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याचसारखी मी फार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही, कारण लहानपणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेर राहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तर माझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतो हे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही. हा पिडांचाच धर्म ना ? पान नं. 11 तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिला फार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडा हा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझे त्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडा पाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशी काही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडे तिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातले हिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूर एकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही. त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा, दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेच सद््गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रास होईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नातदेखील नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या, आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकारक ठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ पान नं. 12 माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग `लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच. आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली; पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे. मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत यासाठीही ही धडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरून प्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे. समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा, कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ? जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा ! या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार. कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा तापच होत असेल. आईमधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हा दोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटक पाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काही न्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का होईना. पण ते न्यूनही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग. आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते. व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून पान नं. 13 पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजे दुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो. कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा. स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिक पुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातून आलेल्या या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेम मिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरे बोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच. या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरच वास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारी माणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्याला थोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पण आता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत. आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभव वेगळेच सत्य सांगून जातात. आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे. त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हां बहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशी मिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्या बाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंध येतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारी असतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रम अधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असा अंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाच घरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजात असले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फार कोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूण कमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतर लोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर या कामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करत राहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भात नेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते. आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता, आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो. पान नं. 14 आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्य आणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतून कधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते. आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टी लागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसून धुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत. धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तू विणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणि वर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीत तरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलट करून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचे ते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवर पाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती. तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे. तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे. त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेच असायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचा असा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतच नव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी ही महारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई. चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायला म्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे.""दिलंय ते निमूटपणे खा. उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवण मलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पण तुला दिलंय ते तू खा."" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्या सर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतो आणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टी चालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, काय काय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचा माल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच. एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणे आईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणी टाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईने चौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी पान नं. 15 थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच, पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचा पाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्या धोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचं मलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांग औषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयाने ओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणि बाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्या जन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे ते ड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानात टाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे. आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली. एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदा लावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळी तिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही. पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या या सोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, की आईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभी असल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दल तिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते. आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचा माल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पण त्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर ""एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावा लागेल"" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे ! गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाई म्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीही रत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठी गेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे. केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची. तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटात मात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावर पडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरी दुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू ती पान नं. 16 घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांला देई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईची अपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळ रेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचा विरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावर आपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला, त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेला कसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचा पूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल. आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग, कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फार सहानुभूतीने वागावे. ""ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ?पण आम्ही शहाणी आहोत ना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांला डोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली,वेडी झाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हाताने नाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तर तुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांड मला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता का कधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथे ही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझं नशीब !"" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतका उमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचा दृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीला येणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तर वाटू लागला नसेल ? कोण जाणे ! अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेले होते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामाला चोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मला ठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊन पोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरू झाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे या बाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चे निमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेच तिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिला सुंदरसा फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केलेस त्याबद्दल मला खूपच आनंद झाला. तो गुच्छ मी खरोखरीच मनापासून स्वीकारला हे तुला कळावे म्हणून मी हा सोबत त्या गुच्छासकट काढलेला माझा फोटो तूला पाठवीत आहे. तुझे प्रत्यक्ष अभिनंदन करण्यासाठी मी बहुतेक दि. 7 जूनला चारूबरोबर येईन. कारण चारु त्या दिवशी त्या दिवशी पुण्याहून इकेड येणार आङे. तू आजारी असे चोरून सांगितले. आता प्रकृती कशी आहे ? कळावे, राजाभाऊ व दिदींना सा.न. तुझा डॉक्टरकाका 00EF0काशिनाथ घाणेकर मी ते पत्र कितीदा तरी वाचले पण समाधान होईना. एका शब्दावर मात्र मी परत परत अडखळत होते- 'डॉक्टरकाका' हे संबोधन मात्र मला मुळीच आवडले नाही त्या नावाने त्यांना हाक मारयची नही असे मी अगदी पक्के ठरवून टाकले. मी त्यांना नुसतं 'डॉक्टर' एवढंच म्हणायचं. ठरवलं. 00EF300EF08 पत्र मिळाल्यावर दोन दिवसांनी सात तारीख उजाडली. सकाळी चारु ~ काका येऊन पोहोचल्याचा फोन आला होता. पण त्यांच्याबरोबर डॉक्टर येतीलच याची काही मला खात्री नव्हती. त्या दिवशी दुपारी तीन वाजता आत्तीसह आम्ही एका बंगाली चित्रपटाची ट्रायल बघायला फेमस महालक्ष्मी येथ जाणार होतो. भर दुपारच्या उन्हात चारुकाका आणि डॉक्टर आमच्या घरी हजर झाले. माझ तर नुसती तारांबळ उडाली. डॉक्टर आल्या आल्या मला 'हॅलो' म्हणाले. आमच्या कोल्हापूरी पद्धती ~ प्रमाणे वयाने मोठया असणाऱ्या मंडळीना वाकून नमस्कार करायची आम्हाला सवय लावलेली होती. पण बरोबरीच्या वयाच्या असल्यासारखे डॉक्टरांनी मला 'विश' केले होते. त्यामुळे त्यांना वाकून नमस्कार करायचा, हात जोडून नमस्कार करायचा,की त्यांच्यासारखेच 'हॅलो' म्हणायचे या गोंधळात मी पान नं. - 19 सापडले होते. पण नेहमीप्रमाणे पास झाल्याचा म्हणून मी डॉक्टरांना वाकून नमस्कार केला. डॉक्टर स्वत: दुसऱ्यांना वाकून नमस्कार करायचे, पण दुसऱ्यांनी त्यांना नमस्कार केलेला आवडायचा नाही. नंतर नंतर पुढे लक्षात आले की सर्वच घाणेकर बंधूंना दुसऱ्यांनी त्यांना नमस्कार केल्याचे आवडत नाही. त्या दिवशी बंगाली चित्रपटाची ट्रायस बघून चौपाटीला आईस्क्रीम खायला जायेच ठरले होते. माझ्या पास होण्याचे सेलिब्रेशन होते. आमच्याबरोबर डॉक्ट~ रांनीही यायचे ठरवले . माझी अवस्था तर आंधळा मागतो एक आणि.... अशी झाली होती. ट्रायल अर्धी झाली आणि डॉक्टर मधूनच उठले . कारण त्यांच्या क्लिनिकमध्ये ( डॉक्टरांना दवाखाना म्हटलेले आवडायचे नाही) त्यांना एका ऑपरेशनसाठी जायचे होते. आत्तीने डॉक्टरांना गाडी घेऊन जायला सांगितले, पण डॉक्टर म्हणाले- ""आय विल टेक कॅब. तुमचा चित्रपट संपेपर्यंत मीही मोकळा होईन. तुम्ही जाताना मला पिक अप करा."" डॉक्टर इंग्रजी खूपच स्टाईलीश बोलत होते. टॅक्सीला 'कॅब' म्हणतात हे मला नव्याने समजले. फेमस महालक्ष्मीपासून डॉक्टरांचे घर तसे जवळच होते. त्यांना घेऊन आम्ही चौपाटीला 'क्रीम सेंटर' मध्ये पोहोचलो. आईस्क्रीम येईपर्यंत सर्वाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या . मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मधे मधे तोंड घालायचे नाही अशी आम्हाला ताकीद असल्यामुळे आम्ही बहिणी गप्पच होतो. मी माझे दोन्ही कोपर टेबलावर टेकवून त्यांचे बोलणे ऐकत बसले होते. एवढयात आत्ती चारुकाकांना हसत हसत म्हणाली--""चारू , कांचनकडे बघि ~ तलं का ? नवं घडयाळ सर्वांना दिसावं म्हणून कशी हात वर ठेवून बसली आहे."" मला आत्तीचा अस्सा राग आला. मी आता लहान का होते ? आणि अशी चेष्टा तीही डॉक्टरांच्या समोर ? माझा पडलेला चेहरा डॉक्टरांच्या लक्षात आला असावा. त्यांनी माझ्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहात माझे घडयाळ बघायला मागि ~ तले. मी मुकाटयाने माझे घडयाळ त्यांच्या दिशेने सरकवले . डॉक्टरांना उलट ~ सुलट करून ते घडयाळ पाहिले आणि आहे बुवा ! असा आविर्भाव करीत त्यांनी ते घडयाळ मला परत केले तेवढीच हळूवार फुकंर. पान नं. - 20 00EF000EF39 जूनच्या शेवटच्या आठवडयात आम्ही आत्तीबरोबर कोल्हापरूला गेलो. एक तर 'मराठा तितुका' चे शवटचे शूटिंग होते, आणि जुलेच्या पहिल्याच आठवडयात बरेच दिवस गाजत असलेला सीमा-रमेश देव यांचा विवाह होता. दोघांशीही आत्तीचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्या लग्नाला हजर राहणे अत्यावश्याकच होते 'मराठा तितुका ' चे आत्तीचे सर्व शूटिंग संपत आले होते. तसा सगळा चित्रपटच पूर्ण होता आला होता, डॉक्टर व जीवनकला यांच्यावरील गाणी तेवढी चित्रित व्हायची होती, आणि त्याच दरम्यान बाबा फ्ल्यूने आजारी पडले होते. हे मुंबईकर एकदा गेले की परत लवकर सापडणार नाहीत असा विचार करून बाबांनी त्यावेळी कोल्हापूरमध्येच असणाऱ्या दादांना (राजा परांजपे) सांगितले की - ""राजा, तुमच्या नव्या दिग्दर्शन पद्धतीप्रमाणे जो काय ़़ तून कॅमेरा लावायचा तो लाव आणि एवढी दोन गाणी घे."" त्या दोन गाण्यातील एक द्वंद्वगीत होते 'नाव सांग सांग नाव सांग.' आणि दुसरे गाणे होते---'रेशमाच्या धाग्यांनी.' बाबांनी नव्या पद्धतीने गाणे घे असे चेष्टेने सांगितले असले तरी दादांनी त्या ऐतिहासिक वातावरणाशी सुसंगत अशी ती गाणी इतकी सुरेख घेतली की ती कुठेही वेगळी , ठिगळ लावल्यासारखी वाटत नाही, की बाबांच्या दिग्दर्शन ~ पद्धतीपेक्षा निराळी वाटत नाहीत. गाणी आणि चित्रपट दोन्हाही पूर्ण झाले. सीमा-रमेश देव यांचे लग्न झाले. जेवण झाल्यावर लग्नघरातूनच आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो. आमची व जीवनकलाची अशी दोन गाडया होत्या. जीवनकला आमच्या गाडीत बसली होती. तर तिच्या गाडीत चारुकाका, तिचे वडील आणि कॅमेरामन अरविंद लाड. ड्रायव्हिंग करत होते डॉक्टर. त्यांच्या इतर सगळ्या लकबीप्रमाणे त्यांचे गाडी चालवणेही डौलदार होते. पण जरा फास्टच होते. चारुकाका पुण्यात उतरले आणि आम्ही मुंबईची वाट धरली. खोपोलीत थांबून ही मंडळी राजमाची पॉइंटवर विसावली. तिथला तो परिसर, पावसाळी वातावरण संध्याकाळचा भन्नाट वारा पाहून एखादा दगडसुद्धा रोमांचित व्हावा. कथा ~ कादंबऱ्यांच्या जगात पाऊल (नुकतीच) टाकलेली मी भारावलेली असले तर पान नं. - 21 नवल नव्हते. एवढयात एक छोटेसेच पण सुंदर गुलाबाचे फुल तोडून डॉक्टरांनी माझ्या समोर धरले. ते फूल सुंदर की, त्या फुलासारखेच निरागस दिसणारे तांबूस वर्णाचे डॉक्टर अधिक सुंदर असा संभ्रम पडत होता. षोडश वर्षीय मी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून अशी लोभसवाणी भेट घेताना हरखून गेले. डॉक्टरांच्या यातील काही गावीही नसेल. त्या वेळी तिथे असलेल्या सर्व मंडळीमध्ये सर्वात छोटी मुलगी म्हणूनही त्यांनी ते फूल मला सहदही दिले असेल. पण ज्युलिएटने ज्या भावनेने रोमियोकडून फूल मला सहजही दिले असेल. त्या भावनेने मीही ते फूल डॉक्टरांच्याकडून स्वीकारले. खंडाळ्यापासून मात्र आमच्या एका पाठोपाठ एक जाणाऱ्या दोन्ही गाडया एकमेकीपासून दुरावल्या. जीवनकलाही आता आपल्या गाडीत जाऊन बसली . या मात्र मला मुळीच एकटे वाटले नाही. त्या सुंदर गुलाबाची सोबत बरोबर होती. आजही ते फूल मी जपून ठेवले आहे. मुंबईला परत आले आणि कॉलेजची नवलाई सुरु झाली. कॉलेजमध्ये आल्यावर समजले की, डॉक्टर आणि अरुण सरनाईक हेही रुईया कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे तर रुईया कॉलेजबद्दल अधिकच जिव्हाळा वाटायचा लागला. 00EF000EF310 ऑगस्ट महिन्यातील गोष्ट असेल. एका संस्थेने 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाचा प्रयोग मदतीसाठी जाहीर केला होता. त्याची तिकीटे आत्तीलाही घ्यावा लागली होती. शूटिंगमुळे तिला जाणे शक्य नव्हते. तर डॉक्टरांचे नाटक म्हटल्यावर मी एका पायावर जायला तयार असायची. आम्ही दोघीतिघी बहिणी ( मी व माझ्या मामेबहिणी. माझ्या दोन मामांची आठ मुले आणि मी अशा नऊ जणांचा माझ्या आजीने व आईने एकत्रच वाढविले , नावालाच आम्ही आत-मामेभावंडं आहोत किंबहुना सख्ख्या नाताहून आमचे नाते अधिक घट्ट आहे. आत्तीने आम्ही सर्वांना सारखेच वाढविले. माझ्यामध्ये व त्यांच्यामध्ये ती जरा सुद्धा भेदभाव करू देत नसे . स्वत:ही करत नसे) पान नं. - 22 आणि आमच्या बरोबर सोबत म्हणून आमच्या जवळ राहणारे मधू आपटे यांना पाठविले होते. कारण रात्री साडेआठ वाजता प्रयोग बिर्ला मातोश्री सभागृहा मध्ये होता. आम्ही येणार याची डॉक्टरांना अजिबात कल्पना नव्हती. फोन करून सांगावं तर त्या वेळी त्यांच्याकडे फोनही नव्हता. पण जेव्हा कधी त्यांच्याकडे फोन येईल तेव्हा पहिला फोन ते मला करतील असे त्यांनी मला प्रॉमिस दिले होते. पहिल्या अंकानंतर त्या संस्थेचा काही तरी समारंभ होता. योगायोगाने त्या दिवशी 75 वा प्रयोग होता. समारंभाचे अध्यक्ष होते. ले. ज. शंकराव थोरात. 'रायगड' चे मी पन्नास आणि पंच्चाहत्तर असे दोन प्रयोग पाहिले होते. म्हणजे इजाबिजा तिजा या नात्याने नाटकाचा शतक महोत्सव पाहायला मिळणे फारसे दूर नव्हते. मध्यंतरामध्ये आम्ही डॉक्टरांना भेटण्यासाठी आत गेलो. रंगपटात एका बाजूला डॉक्टर कुणाशी तरी बोलत उभे होते. आम्हाला पाहून झालेला विस्मय आणि आनंद दोन्हीही डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता. डॉक्टर गप्पा मारण्याच्या मुडमध्ये होते. खूप बोलत होते. मी त्यांच्याकडे एकटक बघत उभी होते.. ते डॉक्टरांच्याही लक्षात आले. त्यांनी विचारले, ""काय पाहतेस ?"" मी म्हटले, ""तुम्ही अंगात घातलेला हा ऐतिहासिक वेष , ही दाढी आणि त्यावर तुमचे हे सिगारेट ओढणे. चमत्कारिक वाटतंय. "" डॉक्टर होकाराची मान हलवीत म्हणाले, ""खरं आहे. ह्या सिगारेटमुळे एका मोठया माणसाच्या भेटीचा योग मी गमावून बसलोय. एका प्रयोगाला इतिहास कार बाबासाहेब पुरंदरे आले होते. माझं काम आवडून ते मला भेटायला आत आले तर मी सिगारेट ओढीत उभा होतो."" सिगारेट ओढणाऱ्या संभाजीला त्यांना भेटायचे नाही असे ते म्हणून ते आले तसेच फिरले. पण बाबासाहेब पुरंदरे पेशव्यांच्या जीवनावर नाटक लिहीत आहेत. त्यात मात्र डॉ. घाणेकरांनीच पेशव्याचे काम करावे असा त्यांचा आग्रह होता. गप्पांच्या ओघात कळले की, आम्हाला किंग जॉर्ज शाळेमध्ये (मुलींच्या शाळेत ) पाचवी ते अकरावी या वर्गांना मराठी व हिंदी भाषा शिकवणाऱ्या शिक्षिका सौ. सुंदर घाणेकर म्हणजे डॉक्टरांच्या तीन नंबर बंधूच्या पत्नी. त्यांची पान नं. - 23 मुलगी शोभाही शाळेत माझ्यापुढे एक वर्ष होती. तिचाही विषय निघाला. डॉक्टरांची ती विशेष लाडकी दिसली. शोभा खूपच सुंदर दिसायची. तिचे केसही खूप छान, लांब होते. शाळेच्या गॅदरिंगमध्ये वगेरे ती नेहमी भाग घ्यायची. आम्हाला शिकवणाऱ्या बाईंची मुलगी म्ह्णून तर आम्हाला तिच्याबद्दल विशेष वाटायचे. गंमतीची गोष्ट म्हणजे तिची व डॉक्टरांची जन्मतारीख एकच होती 14 सप्टेंबर . डॉक्टरांची जन्मतारीख होती- 16 सप्टेंबर. डॉक्टरांच्याबद्दल आता अधिकच जवळीक वाटायला लागली. आमचा जन्म महिना एकच. जन्मसारखा सम. त्याही पाठोपाठच्या. नंतर नंतर डॉक्टर म्हणायचेही , ""मी कांचनपेक्षा फक्त दोन दिवसांनी मोठा आहे."" डॉक्टरांच्या न माझ्या वयामध्ये पंधरा वर्षांचे अंतर होते. पण सुरुवातीपासूनच हे अंतर मला कधीही जाणवलं नाही. कारण प्रेमाला वयचं नसतं ना ? सप्टेंबर उजाडला आणि मला माझ्या वाढदिवसाचे वेध लागले. माझा हा वाढदिवस अगदी पहिल्यापासून खूपच थाटात साजरा व्हायचा. कितीही धावपळ असली तरी आत्ती तेवढा एक दिवस आठवणीने राखून ठेवायची. माझ्यापेक्षा वयाने सव्वा महिन्यानी मोठया असलेल्या माझ्या मामेबहिणीचा विजूचा आणि माझा वाढदिवस एकत्रितपणे साजरा केला जायचा. घरात एखादे कार्य असावे तशी अगदी बाहेरगावहूनही सर्व मंडळी यायची. लग्नसमारंभाला व्हावा तसा मोठा स्वयंपात व्हायचा. दिवसभर बऱ्याच दिवसांनी सर्व एकत्र आल्यामुळे धमाल व्हायची. रात्री मात्र एखादा जुना मराठी सिनेमा पाहून कार्यक्रमाची सांगता व्हायची. या वेळी डॉक्टरांनाही बोलवावे असे मला तीव्रतेने वाटत होते. आत्तीला तसं मी भीत भीतच विचारले. पण नकार देक आत्ती म्हणाली--- ""नको. नुकताच त्यांच्याशी परिचय झाला आहे. ते येणार म्हणजे काही तरी प्रेझेंट आणणार. त्यांना कशाला भुर्दंड ?"" मी हिरमुसले. पण एकदा आत्तीने एखादी गोष्ट नाही करायची म्हटली की त्यावर अपील नसे. पण माझे मन मात्र डॉक्टर यायला हवेत हा धोषा सोडायला तयार नव्हते. पंधरा तारखेला संध्याकाळी खुद्द डॉक्टरांनीच फोन केला. ते फोनवर पान नं. - 24 आत्तीला विचारीत होते--- ""कांचनचा उद्या वाढदिवस ना ? मला का नाही बोलवलं ? तरीही मी उद्या येणार आहे. "" आता मात्र आत्तीचा अगदी नाइलाज झाला, आणि तिने डॉक्टरांना माझ्या वाढदिवसाचे रीतसर आमंत्रण दिले. मला तर काय करू आणि काय नको असे होऊन गेले. डॉक्टरांच्या घरी फोन नव्हता. त्यांना फोन करण्यासाठी शेजारच्या पेट्रोलपंपावर जावे लागे. त्यामुळे इतका त्रास घेऊन डॉक्टरांचे स्वत:हून फोन करणे, आमंत्रण नसतानाही मी येणारच असे निग्रहाने सांगणे, या सर्वाची संगती लावण्यात दुसरा दिवस कधी उजाडला हे समजलेच नाही. आणि ते आले. 'स्वयंवर' मधील रुक्मिणीसारखं ते आले ना. (दादा) ते आले ना. असं म्हणतं नाचावसं वाटत होतं. पण त्यावेळी ते अशक्य आणि अप्रस्तुतही होतं. सगळ्या भावना आतल्या आत दाबून ठेवीत नम्र मुलीसारखी मी डॉक्टरांच्यासमोर नमस्कारासाठी वाकले. डॉक्टरांनी जरासे चुकचुकत, नारा ~ जीने वरच्यावर मला उचलले. कारण तेच. दुसऱ्यांनी केलेला नमस्कार (वाकून) अप्रिय होता. डॉक्टर आले आणि माझ्या द्दष्टीने कार्यक्रमात खऱ्या अर्थाने 'जान' आली. पत्त्तांचा डाव बसला. आमच्याबरोबर आरडाओरडा करीत डॉक्टर चक्क 'गाढव' सुद्धा खेळले. जेवण, गप्पा , नकला, गाणी इ. घरगुती करमणु ~ कीचे सगळे कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी मात्र डॉक्टर परत गेले. फुग्यातील हवा जावी तसा माझा उत्साह ओसरला. वाढदिवसा दिवशी चारुकाकांनी डॉक्टरांचा 'रायगड' मधील अतिशय रुबाबदार पोझमधील एका मोठा फोटो फ्रेमसहित माझ्या हातात ठेवला. माझ्या ~ सहित सर्वांचाच समज झाला की, डॉक्टरांनी माझ्या वाढदिवसानिमित्त तो मला प्रेझंट दिला. त्यानंतर त्यावर दादांनी टीकाही केली की, स्वत:चाच फोटो दुसऱ्याच्या वाढदिवसाला काय म्हणून प्रेझेंट द्यायचा ? मी सगळं या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले. कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एखाद्या प्रेयसीने प्रियकराचा फोटो स्वीकारावा तसा मी तो फोटो मनोमनी स्वीकारला, आणि मध्यभागी असणाऱ्या जेवणाच्या खोलीत तो भिंतीला अडकवून ठेवला. सगळ्या खोल्यांतून येता जाता या खोलीतून यावे-जावे लागे. त्यामुळे येता जाता तो फोटो दिसे. पण नंतर कधी तरी समजले की, चारूकाकांनी डॉक्टरांच्याकडून पान नं. - 25 तसे दोन फोटो मागून घेतले. एक स्वत:साठी आणि दुसरा माझ्यासाठी मी डॉक्टारांती फॅन आहे असे समजून चारुकाकांनी तो फोटो मला फ्रेम करून दिला होता. बिचाऱ्या डॉक्टरांच्यावर उगीचच टीका झाली. 00EF300EF011 या वेळेपर्यंत चारुकाका, अभिनेत्री रत्ना (आताच्या रत्ना भूषण) आणि आम्ही चौघी बहिणी यांची खूपच गट्टी जमली होती. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला मी मंडळी आली असता, ऑक्टोबरमध्ये चित्रपटासृष्टीच्या वर्षांनिमित्त क्रॉस मेदानावर एक खूपच भव्य प्रदर्शन भरणार होते. त्याला आम्ही सर्वांनी जायचे ठरविले . डॉक्टरांनीही मी सुद्धा येणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे तारीख निश्चित करून चारुकाका पुन्हा पुण्याला जाऊन परत आले. त्या दिवशी संध्याकाळी जायचे ठरले होते. पण चारुकाका नको म्हणाले. मला काहीच अर्थबोध होईना. त्याचे स्पष्टीकरण करीत चारुकाकांनी सांगितले की , डॉक्टरांनी आपली फियाट गाडी विकून टाकली होती, व त्यांचे खास मित्र बाबा जावळे यांच्या सल्ल्या वरून जॉगर ही इंपोर्टेड गाडी घेण्याच्या विचारात होते. नेमकी तीच गोष्ट इरावतीबाईंना-डॉक्टरांच्या सौभाग्यवतींना पसंत नव्हती, आणि ते योग्य होते. कारण जॉगरसारखी गाडी बाळगणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे होते. कारण डॉक्टरांना हे कुणी समजावयाचे ? त्यांना गाडयांचा अतोनात नाद होता, आणि त्यांची उडी ही नेहमी उंचावरून असायची. ह्या गाडी घेण्याच्या प्रकरणा वरून दोघा पति-पत्नीमध्ये अबोला सुरू होता. तेव्हा अशा तंग परिस्थितीमध्ये डॉक्टरांना बोलावू नये असे चारुकाकांना वाटत होते. बऱ्याचशा नाराजीनेच मी सर्वांच्याबरोबरब प्रदर्शन बघायला गेले. जाताना आम्ही डॉक्टरांच्या घरावरून गेलो. घरात डॉक्टर अस्वस्थपणे फेऱ्या घालीत असलेले दिसले. अंगावर बाहेर जाण्याचे कपडेही होते. डॉक्टरांना जाण्याची तारीख व साधारण वेळही माहीत होती. आमची वाट तर पाहात नसतील ? माझ्या उद्विग्नेमध्ये अधिकच पान नं. - 26 भर पडली. प्रदर्शनामध्ये पहिलेच दालन प्रभात कंपनीच्या चित्रपटा-छायाचित्रांचे होते. तिथे फिरत असताना प्रख्यात नट चंद्रमोहन यांच्या छायाचित्रासमोर मी थांबले, आणि कुठे तरी वाचल्याचे आठवले की, डॉक्टरांच्या चित्रपटसृष्टीतील आगमना विषयी लिहिताना त्या पत्रकाराने लिहिले होते, डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे डोळे प्रख्यात नट चंद्रमोहन यांच्या डोळ्यांची 'याद' करून देतात. शेजारी उभ्या असलेल्या चारुतकाकांना मी मोठया कौतुकाने म्हटले-- ""चारुकाका हेच ना ते चंद्रमोहन, ज्यांच्या डोळ्यांशी डॉक्टरांच्या डोळ्यांची तुलना करतात ?"" आणि माझ्या कौतुकावर बोळा फिरवीत चारुकाक म्हणाले---- ""काश्याचे डोळे काय घेऊन बसलीस ? मी स्वत: चंद्रमोहनना प्रत्यक्ष पाहिलंय ना. त्यांनी नुसतं पाहिलं तरी विजारीत ला व्हायचं."" हे एवढं वर्णन ऐकल्यावर मी पुन्हा म्हणून दुसरं काही चारुकाकांना विचा ~ रायच्या भानगडीत पडले नाही. याच महिन्यात सत्तावीस तारखेला यशवंतराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली 'रायगड' चा शंभरावा प्रयोग धुमधडाक्यात पार पडला. आता डॉक्टरांच्या महोत्सवी नाटयप्रयोगांना आम्ही आमंत्रित असणे हे ठरून गेल्यासारखे झाले होते. 'रायगड' चे एकशेतीन प्रयोग झाल्यावर धी गोवा हिंदु असोसिएशनशी मतभेद झाल्यामुळे डॉक्टरांनी 'रायगड' ला राम राम ठोकला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर दोन वर्षे डॉक्टरांचे एकही नाटक रंगभूमिवर आले नाही. चांगले नाटकच त्यांना मिळू शकले नाही, की मिळूनही ते डॉक्टरांनी स्विकारले नाही, हे काही समजू शकले नाही, पण 'रायगड' नंतर धी गोवा हिंदु असोसिएशनतर्फे येणारे वसंत कानेटकरांचे नवे नाटक 'मत्स्यगंधा' होते, आणि त्यामध्ये डॉक्टर भीष्मीची भूमिका करणार आहेत असे त्यांच्या मुलाखतीमधून वाचले होते. 'रायगड' डॉक्टरांनी सोडल्यामुळे वसंत कानेटकर त्यांच्यावर रागावले होते. त्यांनीही डॉक्टरांना कदाचित मस्त्यगंधामध्ये भूमिका देण्यास विरोध केला असेल, अगर धी गोवा हिंदु असोसिएशननेही त्यांच्याशी बिनसल्यामुळे डॉक्टरांच्या नावावर फुली मारली असेल. पण दुसरी कुठही संस्थाही डॉक्टरांना आपल्या नाटकामध्ये घेत नव्हती. काय असेल ते असो. पण डॉक्टरांचे रंगभूमीवरील दर्शन दुर्मिळ झाले पान नं. - 27 होते एवढे खरे. 'रायगड' चे झगमगते यश पाठीशी असूनही हे घडले होते, घडत होते. 00EF300EF012 या दरम्यान डॉक्टारांचे तीनही चित्रपट पूर्ण झाले होते. 'पाहू रे किती वाट' प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटातील डॉक्टरांची भूमिका फारशी महत्वाची अथवा नजरेत भरणारी नव्हती. त्यांचे पहिल्या चित्रपटातील दर्शनही फारसे सुखावह नव्हते. 'मराठा तितुका मेळवावा' तर बालशिवाजी आणि जिजाबाई यांच्यावर संपूर्णतया बेतलेला होता. डॉक्टरांनी अभिनीत केलेल्या 'भाव्याचे' पात्रही काल्पनिक. डॉक्टरांचे शहरी, ब्राम्हणी व्यक्ती मत्व त्या मऱ्हाटमोळ्या व्यक्तिरेखेच्या अगदीच विरूद्ध. डॉक्टरांनी अभिनयाच्या जोरावर भाव्याची भूमिका निभावून नेली. पण पॅडिंग वगेरे गोष्टीही त्यांच्या बाबतीत केल्या गेल्या नाहीत त्यामुळे प्रकृतीनेही ते खूपच किरकोळ वाटले. बाबा मात्र 'शूर आम्ही सरदार' या गाण्याच्या चित्रीकरणावर आणि डॉक्टरांनी केलेल्या अभिनायावर तसेच त्यांच्या घोडयावर बसण्याच्या कौशल्यावर मनापासून खूष होते. काशिनाथच्या विशिष्ट पद्धतीने घोडे चालविण्याच्या पद्धतीमुळेच गाण्याची रंगत वाढली असे बाबा कौतुकाने म्हणायचे. सुखाची सावली मात्र अजून प्रदर्शित झाला नव्हता. दिवाळी झाली, आणि दादांनी (राजा परांजपे) आपल्या श्रीपाद चित्रतर्फे 'पाठलाग' या चित्रपटाती सुरुवात केली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी या चित्रपटांच्या यशामुळे दादांचा उत्साह द्विगुणित झालेला होता. मोठया उत्साहाने त्यांनी 'पाठलाग' ची निर्मीती सुरु केली होती. सदेव काहीतरी नवीन देण्याची प्रथा असणारे दादा या चित्रपटाबद्दल विशेष अपेक्षा ठेवून होते. काऱण मराठी ~ तील हा पहिला रहस्य चित्रपट होता. तसा हा नायिकाप्रधान चित्रपट . नायिकेची भूमिका ही दुहेरी होती. जगाच्या पाठीवर व सुवासिनीमुळे , सिमा व दादांचे ; कलावंत व दिग्दर्शक म्हणूनच चांगलेच सूर जमले होते. त्यामुळे दादांनी सीमाताईंनाच नायिका म्हणून घ्यायचे निश्चित केले होते. पान नं. - 28 त्यांनी तसे सीमाताईंना सांगूनही ठेवले. त्यावर त्यांनी रमेश देव यांना विचारून निर्णय कळविते असे सांगितले . झाले. दादा रागवले. त्यांचे म्हणणे दुसऱ्या कुणाकडे काम करताना सीमाने फारतर रमेशला विचारावे. पण त्याच्याकडे चित्रपट करताना रमेशला विचारायची काय आवश्यकता आहे ? परंतू सीमाताईंचेही बरोबर होते. एकतर आता त्यांता रमेश देव यांच्याबरोबर विवाह झाला होता, आणि दुसरे म्हणजे लग्नानंतर रमेश देवने यांच्याशिवाय दुसऱ्या नायकाबरोबर नायिकेचे काम करायचे नाही, असे त्यांनी जाहीरही केले होते. 'पाठलाग' चित्रपटाच्या वेळी तीच तर अडचण प्रमुख होती. कारण पाठलागमध्येही नायकाचे काम करण्यसाठी दादांनी डॉक्टरांना निश्चितही केले होते. दादाही आपला निर्णय बदलणार नव्हते. सीमाताईंच्या निर्णयामुळे संतापलेल्या दादांनी नवीन मुलींकडून ती भूमिका करून घेईन असा विडा उचलला होता. जिद्दीने त्यांनी सुमन ताटे ह्या रंगभूमिवरील नवीन अभिनेत्रीला त्या भूमिकेसाठी घेतले. तिचे 'भावना' असे बारसे केले. या वेळी मला एका गोष्टीची आठवण झाली, 'सुवासिनी' चित्रपटाची पात्र ~ योजना त्या वेळी ठरत होती ; त्या वेळेची गोष्ट. दादा , आत्ती आणि मी गाडीतून वरळीहून चाललो होतो. डॉक्टरांच्या घराजवळून आमची गाडी जात असताना आत्ती दादांना विचारीत होती--- ""काशिनाथला तुम्ही सुवासिनीमध्ये का नाही घेत ?"" त्यावर दादा म्हणाले--- ""तो नवीन असल्यामुळे वितरक त्याला घेऊ देण्यास तयार नाहीत."" ह्या वेळेपर्यंत आत्ती व दादा कुणाविषयी बोलताहेत याचा मला तरी बोध होत नव्हता. इतकंच काय काशिनाथ नावाचा कुणी नट आहे याचा मला पत्ताही नव्हता. कारण काशिनाथ हे तसे जुनेच वाटणारे नाव ऐकल्यावर मला तर ते एखाद्या वृद्ध नटाचे वाटले. त्यामुळे सुवासिनी चित्रपटातली नायिकेच्या पित्याच्या भूमिकेसाठी ( ही भूमिका चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी केली आहे.) ही चर्चा चालली आहे असे वाटले. त्यामुळे मी त्यात फारसा रसही घेतला नाही. 'सुवासिनी' मधील नायकाची भूमिका रमेश देव यांनी केली ज्यासाठी दादांना आधी डॉक्टरांना घ्यायचे होते. आता 'पाठलाग' चित्रपटात रमेश देव पान नं. - 29 असते तर सीमाताईंनी काम केले असते, पण दादांनी या वेळी मात्र डॉक्टरांना अजिबात बदलायचे नाही असा पक्का निश्चय केला होता. दोन नवे आणि प्रकृतीने किरकोळ असलेले कलावंत निवडलेले पाहून दादांचे अगदी जवळचे दिग्दर्शक मित्रही राजाभाऊ शिशुवर्गातील मुलं घेऊन चित्रपट करताहेत अशी चेष्टा करायचे. नाताळच्या सुट्टीत मीही कोल्हापूरला गेले होते. त्यावेळी तिथे आत्तीचे 'गोरा कुंभार' या मराठी चित्रपटाचे तर दादांच्या 'पाठलाग' चित्रपटाचे शूटिग सुरू होते. माझा दिवसभर मुक्काम जयप्रभा स्टुडिओमध्ये असायचा. थोडा वेळ बाबांच्या (भालजी पेंढारकर) ऑफिसमध्ये तर थोडा वेळ सेटवर शऊटिंग पाहायला जाणे असा माझा आलटून पालटून दिवसभराचा कार्यक्रम असायचा. 00EF000EF313 एक जानेवारीचा दिवस होता. सकाळी मी स्टुडिओमध्ये पोहोचले तर बाबांच्या निवासस्थानाबाहेरील व्हरांडयामध्ये (बाबा सुरुवातीपासून स्टुडिओमध्येच राहायेच ) डॉक्टर तोडांसमोर वर्तमानपत्र धरून वाचत बसले होते. मी अगदी उत्साहाने जाऊन डॉक्टरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पण डॉक्टर इतके शिष्ट की, वर्तमानपत्रातून मानही न वर करता स्वारीनी उत्तर दिले, ""मी ख्रिश्चन नाही."" मला असा संताप आला होता म्हणू सांगू ? त्या क्षणी मी रागावले होते. पण खरं सांगू 'हम उनकी इन्ही अदाओंपर मरते थे.' त्या दिवशी डॉक्टरांनी माझं अगदी भरीतच करायचं ठरवलं होतं. आम्ही दोघे बसलो होतो. तिथे बाबाही नंतर येऊन बसले. 31 डिसेंबर व 1 जानेवारी साजरी करण्याच्या पाश्चात्त्याच्या पद्धतीचा भारतातही प्रभाव वाढत चालल्याबद्दल बाबा चिडून बोलत होते . डॉक्टर मधून मधून त्यांना खाद्य पुरवीत होतेच. तरुण पिढीची वागण्यावर सर्वसाधारण चर्चा चालू होती तोपर्यंत ठीक आहे पण डॉक्टारांनी आता माझ्यावर मोर्चा रोखला. ते बाबांना म्हणाले--- ""दुसऱ्यांचे कशाला हवे ? तुमच्या मानसकन्येला विचारा की, दिवसभर उरावर तो ट्रांझिस्टर घेऊन त्या हिंदी सिनेमांच्या गाण्यात गढलेल्या असतात."" पान नं. - 30 झालं. आता बाबांची सरबत्ती मला उद्देशून सुरू झाली. बराच वेळ त्यांनी त्या विषयावर माझे बौद्धिक घेतले. मी मनातल्या मनात डॉक्टरांच्यावर चडफडत होते. डॉक्टर नसलेल्या मिशीवर ताव मारीत कशी झाली ़़़़़ असा चेहरा करून बसले होते. मी मान खाली घालून बाबांचे बोलणे ऐकत होते. त्यांच्या एका वाक्याने मात्र लक्ष केंद्रित केले. ते सांगत होते-- ""गाणीच ऐकायची तर ती सिनेमातील पांचट आणि पाचकळ प्रेमाची गाणी हवीत कशाला ? आपल्या ~ कडे दुसरं संगीत ओस पडलंय का ? आणि प्रेम करायचं तर लेलामजनूसारखं करावं. खरं प्रेम सर्व उपाधीच्या पलीकडचे प्रेम."" 'पाठलाग ' चित्रपटापासून माझ्या डॉक्टरांशी गाठीभेटी वाढायला लागल्या. डॉक्टर मात्र माझ्याकडे त्यांची चाहती या द्दष्टिकोणातून पाहात असावत. कारण डॉक्टरांना चाहत्यांचे अतोनात वेड होते. ते म्हणायचे विष्णुपंत पाग ~ निसांचे जसे 'संत तुकाराम' चित्रपटामुळे घरोघरी फोटो लागले, तसा माझाही फोटो माझ्या संभाजीमुळे घरोघरी लागला पाहिजे. डॉक्टरांचा दावा तसा अवा ~ जवीही नव्हता. मी मात्र तशी फारच चिकित्सक होते. एखादी गोष्ट, वस्तू, माणूस, कलावंत मला फारशी लौकर पलंत पडायची नाहीत. त्यामुळेच माझ्या द्दष्टीने अभिनयामध्ये दिलीपकुमार हा शवेटचा शब्द होता. नवीन येणारे कलावंत थोडेफार तरी दिलीपकुमारच्या जवळपासही जाणारे असतील तर मला आवडायचे. त्यामुळेच चाहती म्हणून माझी दुसरी आवड होती अरुण सरनाईक. तेही माझा गंमतीने उल्लेख महाराष्ट्रातील माझी एकमेव पंखी (फॅन) असा करीत. डॉक्टरांना माझे हे दिलीपकुमार वेड नाहीत होते. पण त्यांचा आवडता, लाडका होता राज कपूर. आमचे दोघांचे त्या वेळी आणि नंतरही जास्तीत जासत वाद-विवाद, भांडणे झाली ती दिलीपकुमार-राज कपूर यांच्यावरूनच. पण दिलीप कुमार अरुण सरनाईक आवडणाऱ्या कांचनला आपणही आवडतो याची डॉक्टरांनी कल्पना होती. त्यामुळेच मी त्यांचीही फॅन आहे असे त्यांना वाटत होते. पान नं. - 31 00EF000EF314 डॉक्टरांचा समभाजी मला निःसंशय आवडत होता. पण त्याहूनही डॉ. काशिनाथ घाणेकर या व्यक्तिमत्त्वावर माझे मनापासून प्रेम बसले होते. डॉक्टरांच्या- मुळे मी फार वेडावून गेले होते. डॉक्टरांच्यामध्ये मी काय पाहिलं असावं ? मला खरं उंचापुऱ्या,रूबाबदार, पिंगट डोळ्यांच्या, पुरूषी व्यक्तीमत्त्वाची आवड होती. कदाचित माझ्या वडिलांना लहानपणापासून पाहिल्यामुळे ती आवड जोपासली असेल. त्यामुळेच वसंत जोगळेकर,जंद्रकांत मांढरे,सी रामचंद्र ही रूबाबदार मराठी मंडळी मला खूप आवडत असत. कोल्हापूरसारख्या संस्थानी वातावरणामध्ये राहिल्यामुळेही असेल मला उंचेपुरे रूबाबदार पुरूष खूप आवडत. असं असताना डॉक्टरांचे कोकणस्थी मध्यम बांध्याचे व्यक्तिमत्त्व माझ्या आवडीमध्ये कुठेच बसत नव्हते. डॉक्टरांचे मोठे निळे डोळे आरपार वेध घेत. त्यांचे एखाद्या लहान मुला- सारखे खळाळून हसणे पाहात रहावसे वाटे. भावदर्शी चेहराही त्यांच्याजवळ होता. अंहं,पण यातील मी वेडावून जावे अशे त्यांच्याजवळ काय होते ? घरी, शेजारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहात होते. ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरच का ? आणि मग एकच उत्तर डोळ्यासमोर येते. डक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्व ! `सो व्हॉट ? ' असं बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने,धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. डॉक्टरांच्यावर झालेल्या मध्यमवर्गीय ब्राम्हणी संस्करामध्येही माराठाजातीच्या स्वभावांची वेशिष्टे कुठून निर्माण झाली होती कळायला मार्ग नव्हता. पण माझ्या उपजत आवडीना ही सगळी डक्टरांची वेशिष्ट्ये आकर्षून घेत होती हे नक्कीच होते. पण हे आकर्षण,हे वाटणे मात्र फक्त माझ्या बाजूने होतेत हेही नक्कीच होते. 8 फेब्रुवारी 1964 रोजी नटसम्राट बालगंधर्व यांचा 75 वा वाढदिवस मोठया धुमधडाक्याने शिवाजीपार्क मेदानावर साजरा होणार होता. हिंदुस्थानातील सर्व राज्यांमधील मातब्बर नाटय व्यावसायिक मंडळी आवर्जून उपस्थित राहणार होती. सत्तरी उलटलेली आणि फारशी उठबसही न करता येणारी माझी आजी- सुध्दा मोठया उत्साहाने आपल्या लाडक्या बाळगंधर्वांना पाहायला जाणार होती. पान नं. 32 तिला सदेव चिकटून असणारी मी, नेमकी त्या दिवशी तिच्याबरोबर गेले नाही. आत्ती व माझी मोठी बहीण बेबी तिच्याबरोबर गेल्या होत्या. मी त्यांच्याबरोबर न जाण्याचे कारण म्हणजे त्याच दिवशी आमचा कॉलेज- डे होता. माझ्या आयुष्यातील पहिला कॉलेज डे, त्याची अपूर्वाईही तितकीच होती. रूईया कॉलेजचे कॉलेजडेला दिले जाणारे फिशपॉडस््ही फार प्रसिध्द होते. त्यामुळे तर खूपच उत्सुकता होती. खूप मजेत त्या दिवशी घरी परत आले. तर सगळा मूडच खराब झाला. कारण गंधर्वसोहळ्याचे जे वर्णन ऐकले,त्यावरून कॉलेज-डे पुढल्या वर्षी बघायला मिळाला असता पण असा गंधर्व-सोहळा आता न होणे असाच सर्वाचा सूर होता, आणि माझ्या दृष्टीने विशेष म्हणजे त्या समारंभाला डॉक्टरही गेले होते. त्या प्रचंड गर्दीतून हातांची साखळी करून डक्टरांनी आमच्या सर्व स्त्रियांना गाडीपर्यत सुरक्षित कसे आणून पोहोचविले याचे इत्थंभूत वर्णन जेव्हा आमच्या बेबीकडून ऐकले त्यामुळे तर डॉक्टरांच्याबद्दल कोण कौतुक वाटले. बालगंधर्व हा मराठी रंगभूमीवरील एक अद्भुत चमत्कार. पण आमच्या पिढीला ती दंतकथा वाटावी अशी परिस्थिती प्रमाण कोणतेच नाही. त्यांच्या निव्वळ छायिचित्रावर समाधान मानावे लागे. परंतु त्यामध्ये त्यांचे देखणे रूपच पाहायला मिळते. नाही म्हणायला अजून माझी आजी गंधर्वपद्धतीनं लुगडे नेसत होती. डाव्या खांद्यावर घेतलेला पदर उजव्या खांद्यावरून उलटा करून टाकीत होती. गंधर्वाच्या आठवणीत हरवलेली माझी आजी एका पायाने ताल देत आपल्या गोड आवाजात गंधर्वांची गाणी गुणगुणत असायची. कधी तरी गंधर्वाच्या आठवणीही ती सांगायची. पण प्रचितीला ते पुरत नव्हते. त्यांच्यावर एखादी डाक्युमेटरी फिल्म तरी त्या काळी करून ठेवायला हवी होती. मी गंधर्वांनी प्रत्यक्ष असे एकदाच पाहिले होते. 24 जून 1959 रोजी शिवाजी मंदिर (जुने) मधे नाना साहेब फाटक यांच्या एकसष्ठी समारंभाला गंधर्व प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांना खुर्चीत बसवून उचलून आणावे लागले होते. माझ्या बालमनाला प्रश्न पडला होता हेच का ते बालगंधर्व ? दातांची कवळी बसवल्यामुळे शब्दोच्चारही नीट होत नव्हते. उलट त्या दिवशी मनात ठसले ते 61 वर्षाचे,त्याही वयात जोषात हॅम्लेटची भूमिका करणारे पान नं. 33 रूबाबदार नानासाहेब फाटक. तरूणपणीची इमारत कशी बुलंद होती ते अव- शेषही सांगत होते.`जगावं की मरावं' हे वाक्य आपल्या सप्तकात फिरणाऱ्या आवाजाने नानासेहब कसे खेळवीत होते याचा आजही विसर पडत नाही. त्या वेळी नानासाहेबांच्याही तोंडात दातांची कवळी होती. डक्टर नानासाहेबांचे इतके भक्त का होते हे सहज समजून येत होते. मात्र हेही सूर्यप्रकाशाइतके सत्य होते की, ज्यांच्याबद्दल शत्रूचेही दुमत नाही अशा तीन व्यक्तींची नावे मी ऐकत होते. त्यांतील अग्रक्रमावर होते बालगधर्व तर दुसऱ्या दोन व्यक्ती होत्या के. एल.सहगल व लता मंगेशकर. 00EF315 एफ. वाय.ची परीक्षा कॉलेजची असल्यामुळे आमची परीक्षा मार्चमधेच आटपली. आणि मी सुट्टीसाठी पुन्हा एकदा मोकळी झाले. 1 एप्रिल जवळ येत चालला,तसं कुणाला `फूल' करावे या विचारात आम्ही असताना पहिले नाव डोळ्यासमोर आले ते चारूकाकांचे. दोन-तीन दिवस आधीपासूनच सर्व योजना आखली. पण आन्हाला यश आले नाही. अपयशाने आम्ही सगळ्या बहिणी आणि रत्ना खूपच हिरमुसल्या झालो. रत्ना त्या दिवशी सकाळपासूनच आपल्या मातोश्रीबोरबर आमच्याकडे येऊन थांबल्या होत्या. पण बार फुसका निघाला. मग आम्ही आमचा मोर्चा डॉक्टरांच्याकडे वळविला. सुदेवाने या वेळेपावेता डॉक्टरांच्याकडे फोनही आला होता. डॉक्टरांच्याकडे जेव्हा पहिल्यांदा फोन सुरू झाला तेव्हा ते शूटिंगसाठी बाहेर गावी गेले होते. पुढे चार-पाच दिवसांनी ते मुंबईमधे परतले होते. ते घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. परंतु फोन पाहिल्यावर त्यांना मला दिलेले प्राॉमिस आठवले. त्यामुळे त्यांनी तेवढया रात्री आमच्या घरचा फोन फिरवला. मी केव्हाच झोपेत गुडूप झाले होते. अर्धवट जागी,अर्झवट झोपलेली अशी मी होते. तशाच परिस्थितीमध्ये मी रिसीव्हर कानाला लावला. आणि वाऱ्याच्या हळुवार झुळकीसारखे डॉक्टरांचे शब्द कानामधे शिरले- ""रागावली नाहीस ना बेटा ? एवढया रात्री फोन केला म्हणून ? पण तुला पान नं. 34 कबूल केलं होतं ना ? म्हणून तुला झोपेतून उठवलं. आता झोप हं. गुड नाईट "" आता मात्र मी पूर्ण जागी झाले होते.`रायगड' मधे काम केल्यापासून `बेटा' हा शब्दही डक्टरांच्या तोंडी सारखा असायचा. आता नीटसे आठवत नाही. पण आवाज बदलून तारूने टेलिफोन ऑपरेटर आहोत असे सांगून, तुमचा ट्रंक कॉल येतोय असे सांगून डॉक्टरांना बराच वेळ ताटकळत ठेवले. बराच वेळ झाला तरी ट्रंक-कॉल जोडला जात नाही असे पाहून डॉक्टरांचा पारा चढायला लागला. डॉक्टरांचा आवाज टीपेत गेला आणि आम्हाला हसू आवरणे शक्य होईना. रिसीव्हरही खाली ठेवावा लागला. डॉक्टर तसे चाणाक्ष. त्यांनी लागलीच फोन करून आम्हीच चावटपणा केल्याचे कबूल करून घेतले आणि थोडयाच वेळात आपल्या गाडीने आमच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले. त्या दिवशी डॉक्टर जेवायलाही थांबले. जेवण,गप्पा यामधे आम्ही तो दिवस घालविला. गप्पा मारता मारता मी डॉक्टरांना सहज म्हणूनच विचारले की त्यांचा विवाह हा प्रेमविवाह आहे की ठरवून झालेला विवाह आहे ? प्रशअन ऐकताच डॉक्टर एकदम गंभीर होत म्हणाले- ""का ? हा प्रश्न का विचारलास ? आमची बायको स्थितप्रज्ञासारखी वाटते म्हणून ?"" डॉक्टरांचा चेहरा आणि सूर बदललेला पाहून मी गडबडले आणि घाईघाईने स्पष्टीकरण देत म्हणाले- ""तुम्ही बी.डी.एस.आणि त्या एम.डी. आहेत. ठरवून झालेल्या लग्नात सहसा असे घडत नाही. मुली शक्यतो आपल्यापेक्षा अधिक शिकलेल्या मुलाशीच लग्न करणं पसंत करतात. त्यामुळे मला सारखं वाटायचं तुमचा प्रेमविवाह असावा. पण खरं सांगू तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही प्रेमविवाह कराल असं वाटतं. पण त्या..."" माझे बोलणे ऐकल्यावर मात्र ताणले गेले डॉक्टर काहीसे सेल झाल्यासारखे झाले आणि म्हणाले.- ""मी आता आमचे लग्न कसे ठरले ते सांगतो. त्यावरून तूच ठरव आमच्या लग्नाला कोणत्या प्रकारात घालायचे."" टाकायचे. तिथे जाणे याच्या जिवावर येई. पण आता कॉलेजची लायब्ररी होती. नवी.कोरीकरकरीत. चिरेबंदी. खूप ऐसपेस. मोठमोठाली दारे आणि खिडक्यांची. त्यांच्या असंख्य काचा रोज पुसलेल्या,धुतलेल्या.सकाळी बाहेरच्या व्हरांडयातून धावत बागडत आलेले ऊन त्या कांचाना बिलगे. त्या झळाळून जात. जणु सकाळचा सूर्य अगणित अल्लाउद्दिनचे दिवे तिथे उगाळीत बसला आहे ! काचेच्या कपाटात पुस्तके- अल्लाउद्दिनचे लाड पुरविणाऱ्या राक्षसासारखी ! पण हे राक्षस सुंदर होते. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी कव्हरांचे कपडे.त्यावर सुंदर चित्रांची, नक्ष्यांची, वेलबुट्टयांची जागजागी गोंदणे. छातीवर,डोक्यावर सोनेरी अक्षरांची पदके आणि शिरपेच. ही पुस्तके म्हणजे शब्दकळेची नवी दृष्टी देणारी, कल्पनेच्या बागेतील काळ्या चाफ्याची फुले ! या पुस्तकांतून अनेक पात्रे बाहेर येत. याच्या डोक्यातल्या विचारचक्रावर स्वार होत. स्वतःशी गिरक्या घेत फिरत राहत. दिवसचे दिवस हा त्यांच्या संगतीत राही. तिथे हा डिकन्सच्या डेव्हिड कॉपरफ्लीड बरोबर रडला होता. सॅम वेलर,हकलबरी फिनबरोबर मनमुराद हसला होता. इब्सेनच्या अनोख्या नाटयशिल्पाने चकित झाला होता. शॉच्या बुध्दीच्या स्फल्लिंगांनी दिपून गेला होता. नुकत्याच झालेल्या रशियन राज्यक्रांतीचे इतिहास वाचून थरारून उठला होता. काव्य,कथा,कादंबऱ्या, नाटके, इतिहास,तत्त्वज्ञान यांची ती पुस्तके विचारसौदंर्याचे घडेच्या घडे याच्या डोक्यावर ओतीत. हा त्याने न्हाऊन निघे. ती सुंदर सोनेरी अक्षरांची पुस्तके हा घरी नेई. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात रात्ररात्र वाचीत राही. सकाळी ती बिछान्यावर अस्ताव्यस्त पडलेली दिसत. तेव्हा दागिन्यांची पेटी उपडी केल्यासारखी दिसे ! या सुंदर जगात, या दरिद्री घरात एक कोण कुठली अनोळखी मुलगी बायको म्हणून आणयची ! छट् ! मुळीच नाही ! कुणी म्हणेल, ""अरे तुझं हे स्वप्नांचं जगा आहे !आज असेल- उद्या नसेल. खरं जग तेवढंच काय ते खरे !"" पण स्वतंत्र असलो तर खरे जगसुध्दा आपण जिंकू असे याची घमेंड म्हणे. काय व्हायचे, कोण व्हायचे एवढे नुसते ठरविले की झाले ! आगरकरांचे `विकारविलसित' नाटक याने वाचले, तेव्हा म्हटले, ""हात्तिच्या !हेच का आगरकरांचं लेखन ? याच्यापेक्षा दसपटीनं चांगलं नाटक मी लिहिन !"" ए.व्ही. स्कूलातच हरिभाऊ आपटयांच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या. मग एक हस्तलिखित मासिक काढले. त्यात `'""मध्यकाल"" म्हणून ऐतिहासिक कादंबरीचे दोनतीन हप्ते लिहून काढले. याने मावळे पाहिले नव्हते. किल्ले बघितले नव्हते. पण त्यातल्या गढयाकिल्ल्यांची वर्णने अगदी हुबेहूब साधली होती. निदान याच्या स्वतःच्या दृष्टीने ! शिवाय सातारचा `अजिंक्य तारा' किल्ला बघितलेल्या पळसुलेनेही याला तसे सांगितले होते ! पान नं. 20 पण खऱ्या जगात आगरकर आणि हरिभाऊ आपटे होते तशाच मामीही होत्या. भाऊही होते. मामी हिरमुसत होत्या. भाऊ चिडिला येत होते.""का नको लग्न?कॉलेजात दुसऱ्यांची झालेली नाहीत? वेळीच केलं नाही तर मुलं बिघडतात, फुकट जातात."" हा कोंडीत सापडला.याला वाटले इथे आई हवी होती. तिने साफ मोडता घातला असता. पण प्लेगचे दिवत होते. आई तीस मेलावर मामांकडे गेली होती. ती नव्हती म्हणूनच भाऊंनी उचल केली होती. तिला कळायच्या आत सगळे पक्के करायचे. एक दिवस भांडण निकरावर आले. भाऊंनी साफ सांगितले,""ऐकायचं नसेल तर घरात राहू नकोस !"" हा बोर्डिंगात मित्राकडे जाऊन राहिला. इन्टरसायन्सच्या परीक्षेचे दिवस. एके दिवशी पुस्तक नेण्यासाठी हा घरी आला. भाऊ नळाजवळ पाणी भरत होते. बोलले,""अरे, रोज रामाचा नेवेद्य न्यावा लागतो देवळात. तो कडक सोवळ्यातल्या स्वयंपाकाचा. हिच्यानं आताशा होत नाही. आदळआपट करते. स्वयंपाक करायला घरात दुसरी हवी. रामाच्या पूजा नेवेद्यावर आपला संसार आहे. काही थोडं तुझ्यासाठी कधी केलं असलं तर एवढं माझ्यासाठी कर."" याचे घट्ट झालेले मन अश्रूंच्या पाण्यात विरघळले. याने म्हटले,""करतो.पण आठ मार्चला माझी परीक्षा आहे. त्यानंतर तरी करा."" ते घाईने म्हणाले,""नाही, नाही.तीन तारखेनंतर मुहूर्तच नाही. पोटात भीती असणार. पुढे ढकलले तर याची आई येईल.सगळेच मुसळ केरात घालील. वऱ्हाड लग्नगावी गेले.तीन मार्चला लग्न. दोन मार्चला आईला परतवाडयाहून परस्पर लग्नघरी आणले.तिला कळल्याबरोबर ती रडायला लागली. भाऊंना म्हणाली, ""तुम्ही माझ्या मुलाचा सत्यानाश केलात !"" वरघोडयासाठी गावात घोडा मिळाला नाही. म्हणून एक घोडी आणली. ती गाभण होती. तिच्यावर बसून हा मांडवाकडे निघाला घोडीची पाठ रूंद. हा डगमगायला लागला. केव्हा पडू ही सारखी पोटात भीती. पुढच्या आयुष्यात याची एका संस्थानच्या राणीसाहेबांशी ओळख झाली. त्या परित्यक्ता होत्या. मनाने, बुध्दीने, वागण्याबोलण्यात नेहमी विमनस्क. एकदा सहज बोलून गेल्या,""अहो, माझी वरात हत्तीवर अंबारीत बसून मोठया थाटामाटात निघाली. पण अर्ध्या रस्त्यातच हत्ती उधळला ! मग तसंच लवकरच आमचं लग्नही उधळून गेलं !"" याच्या लग्नाचा मांडव चार पावलांवर होता. म्हणून वरघोडयावरून खाली न पडता हा जेमतेम तिथे पोचला एवढेच. पण हे लग्न पुढे उधळायचे मात्र राहिले पान नं. 21 नाही ! यानंतर पाचच दिवसात इंटरसायन्सची युनिव्हर्सिटीची परीक्षा झाली. तीत याने गणिताचे तिन्ही पेपर कोरे दिले ! आपल्या हुशारीने पुढे कॉलेजची फेलोशिप आणि नंतर परदेशची शिष्यवृत्ती मिळवणारा हा मुलगा प्रथमच नापास झाला. या अपयशाने याचे घर हादरून गेले. आई हतबुध्द झाली. हे अघटित झाले म्हणून वडील गांगरले. हुशार, होतकरू मुलगा वाया गेला. म्हणजे आता घराला गरिबीचा फास कायम ! पण हा आपल्याच आसुरी आनंदात मग्न होता. `एका असावध क्षणी मला गाठलंत. तुमच्या कर्मकांडासाठी माझा बळी दिलात. मग घ्या आता ! जगावर, तुमच्यावर स्वतःवर सूडच घेऊन दाखवतो !' नंतरच्या वर्षी हा पुन्हा कॉलेजमध्ये गेला, तो पार काळवंडलेल्या मनाने. हळूहळू भोवतीलची माणसे सावरली.नवी सून म्हणून काही सणवार साजरे व्हायचे. एकदा याची बायको मंगळागौरीला गेली होती. याच्या कॉलेजात दोनतीनच मुली. पण त्या कुठ नाही तर तिथे जाऊन अडमडल्या ! त्यांना कळले तेव्हा त्या चकित झाल्या `बेडेकरचं लग्न झालं ? आणि तू त्याची बायको ?तू ? कमाल झाली !' याने हे ऐकले तेव्हा हा पार विरमून गेला. याची कल्पनाशक्ती प्रबळ. अतिरंजन हा तिचा स्वभाव. आता लायब्ररीच्या काचांवरचे कोवळे ऊन मावळून गेले. हा हॉकीचा शौकी. पांढरे कॅनव्हासचे जोडे घालून मुले स्टिका घेऊन मेदानावर धावत. संधिप्रकाश झाला म्हणजे चटपट धावणारे ते पांढरे पाय उडया मारीत जाणाऱ्या बगळ्यांसारखे दिसत. पाठीशी हात घेऊन हा नुसता मेदानाबाहेर उभा राह्यचा !ते सगळे सफेत जोडे म्हणजे विकट हास्य करीत आपल्याकडे बघणाऱ्या दुर्देवाचे दात ! जणू तोंड लपवावे म्हणून याने सभांतून बोलणे सोडून दिले. वर्गात मागच्या शेवटच्या बाकावर बसू लागला. ईर्षेच्या,धाडसाच्या रंगभऱ्या जगातून उठून गेला. याला वाटे केवढी आपली उमेद ? केवढी उडी होती ! जीवनाच्या लढाईसाठी आपण तारूण्याची तलवार किती त्वेषाने म्यायातून उपशीत होतो ! आणि ती अर्ध्यातच तुटली ! खरे तर याची बायको मुळीच वाईट नव्हती. गबूला बायको मिळाली ती सावळी. याची गोरी होती, कामसू होती. मुख्य म्हणजे अबोल होती. संसाराला यापेक्षा काय हवे? पण तिच्याकडे बघितले की याला वाटे, `आपलं संपलं आता. सगळी हौस विरली. आनंद गेला. खेळ संपले. तेलपाणी लावल्यामुळं उन्हातल्या केतकीच्या पानासारखी चकचकणारी हॉकी स्टिकची पाती,क्रिकेटची बॅटी, टेनिसच्या रँकेटस् गेल्या. त्यांच्या जागी केरसुण्या, मुसळं आणि सुपं येऊन बसली. आता याच घरात राह्यचं...कुठं तरी कारकुनी करायची...मग पोरं होणार पान नं. 22 त्यांचं नशीब आपल्या अभागी भावंडांसारखंच ! चंडोल पक्षी आपले मऊ परांचे ऊर काटयाला टेकवतो आणि हळूहळू तो काटा टोचून घेत बसतो. जास्त मधुर गाता यावे म्हणून ! याने आपल्या उरात हताशेची सुरू खुपसून घ्यायला सुरवात केली. वेदनेचे गाणे आळवता यावे म्हणून !' या लग्नामुळे आपल्या आयुष्याचा विचका झाला आहे असे हा अनेक वर्षे स्वतःला आणि अगदी क्वचित दुसऱ्यालाही सांगत आला आहे. पुढे याने मनोविल्शे- षणावरची पुस्तके वाचली आणि अनेक वेळच्या आपल्या विचित्र वागण्याची मुळे तरूणपणच्या आपल्या या धक्क्यात शोधली. मी पुष्कळदा याला म्हटले आहे की, `तू म्हणतोस हे तितकंसं खरं नाही.' मी प्रश्न विचारले की हा चिडतो. `तुला बायको नकोशी गहोती ना ?मग तू तिच्याशी नवरा म्हणून वागला नाहीस ? पुढे दिवसचे दिवस तिला सोडून गेलास. पण जेव्हा थोडा वेळ भेटलास तेव्हा तिच्या अंगाला हात लावला नाहीस ?' पण पुढच्या प्रश्नाने हा भडकून उठतो. मी विचारतो, `ठीक आहे. स्वतःवर सूड घेण्यासाठी तू मुद्दाम नापास झालास, असा आव आणतोस. मग कोरे पेपर्स दिलेस ते फक्त गणिताचेच का ? इंग्रजी,फिजिक्स, केमिस्ट्रीचे का नाही ? खरी गोष्ट अशी आहे, की तू दोन गणिताचे तास बुडविलेस, हायस्कुलातल्या आपल्या मित्रांच्या ओढीनं. खरं म्हणजे तू गणितात पास झाला असतास,च असं नाही. आपला उनाडटप्पूपणा उघडा पडू नये म्हणून तू हे लग्नाचं निमित्त शोधलंस आणि मनात जायंबदी झाल्याचा मुखवटा घालून फिरतो आहेस !' शेवटी हा निकरावर येऊन म्हणतो, ` असेल, माझं सोंग असेल. पण सत्याच्या आगीनं जळून मरण्यापेक्षा सोंग करून जिवंत राहता येत असेल तर चुकलं कुठं ? सोंग सोडली तर जगच संपेल !' याची सोंगे बघितली, की मला शिवरामपंत परांज्यांची एक मुलखावेगळी कल्पना आठवते. परांजपे पट्टीचे वक्ते आणि लेखक. एका काळी खूप गाजलेल्या `काळ' वर्तमानपत्राचे संपादक. एकदा त्यांनी लिहिले...`फार पूर्वी माणसाचे मन त्याच्या उरात लपलेले नव्हते. ते चेहऱ्यावर डोळ्यांखाली, गालावर असे. अगदी उघड आणि पारदर्शक. डोक्यात विचार आला, की तो स्पष्टपणे दिसायचा. त्या उघड्यावर असलेल्या मनात ! परिणाम असा झाला की माणसाला खोटे बोलता येईना !कारण प्रत्येकाच्या ओठात एक आणि पोटात दुसरेच, हे बाहेर उघड दिसे. त्यामुळे सगळ्यांचे खायचे आणि दाखवायचे दात एकच होऊन गेले ! समाजाची धारणा अशक्य होऊन बसली.! माणसे त्या मनावर लहानमोठी पांघरूणे घालू लागली. पट्टया मारू लागली आणि ते मन हळूहळू आत जाऊन शेवटी उरात दडून बसले ! पान नं. 23 त्यामुळे शिक्षकांना सत्याचा महिमा गाता येऊ लागला. समाजसेवकांना न्याय,समता यांचा उपदेश करून चरितार्थ चालवता येऊ लागला. पुरूषांना बायकांशी आणि इन्कम्टॅक्स ऑफिसात खोटे बोलता येण्याची सोय झाली ! माणसांचा समाज पुन्हा सुरळीत चालू झाला !' शिवरामपंताची ही कल्पना आठवली म्हणजे मला वाटते या आत दडपून टाकलेल्या मनाचा कोंडमारा होत होता. कारण बाहेर वर येण्याची त्याला बंदी. तरीही ते एखादे वेळी उसळी मारू बघे. मग मानवी संस्कृतीने सगळ्या मानवी सुप्त वासनांना, इच्छांना,विकारांना आणखी खोल,अंतर्मनाच्या तळघरात दडपले. तिथे अहोरात्र वावरणारे हे वासनाविकराचे उंदीर एखाद्या वेळी शर्थ करून मोकळ्या हवेसाठी बाहेर वर येतात. घटकाभरच्या मोकळेपणाच्या आनंदाने भावनाविकारांचे चीत्कार करतात. या चीत्कारांना कधी कधी कथा, काव्ये,कादंबऱ्या,नाटके यांचे रूप लाभते !सामान्य माणसे अंतर्मानाच्या या ईषद् विश्वरूपदर्शनाने भयचकित होतात. मग चीत्कारणाऱ्या या कलासत्क उंदरांची ससेहोलपट सुरू होते ! याचे मन घायाळ झाले होते. तरी अंतर्मन धडधाकट होते. या दिवसांतही ते मधूनमधून उसळी मारून वर येई. खरे म्हणजे याला लिहिण्याचा कंटाळा. त्यात मन थिजलेले. आपली शब्दकळा आपण जाणूनबुजून गमावून बसलो आहो अशी याची खात्री. पण वेळ आली तेव्हा याचे अतंर्मन चेव घेऊन उठले. त्याने आपली स्वप्ने सजीव व्हावी म्हणून याची लेखणी लिहिती केली. प्रथम कॉलेजच्या मासिकात आणि नंतर लगेच याच्या पहिल्या नाटकात. मासिकाच्या मराठी विभागाचा हा संपादक झाला तो अगदी जुलुमाचा रामराम म्हणून.हा वाङ्मयाचा नादी म्हणून याची कीर्ती मुलांत पसरली, ती लाकडाच्या मोळ्या विकणाऱ्या एका बाईमुळे ! आणि त्या बाईपर्यंत याला पोहोचविले ते दुसऱ्या एका स्त्रीने. उमरावतीच्या मुलींच्या सरकारी हायस्कूलातल्या एका शिक्षिकेने. कृष्णाबाई खरे यांनी. कॉलेजात गणेशोत्सव होता. तिथे कृष्णाबाई व्याख्यानासाठी आल्या. तरूण, लहानसर चण, रूप घरगुती पण तेजस्वी. चेहऱ्यावर बुध्दिमत्तेची झाक, डोक्यावंर काळेभोर दाट केस आणि मानेवर भरगच्च केसांचा, डोळ्यातं भरेल असा मोठा अंबाडा. याने कृष्णाबाईचे नाव ऐकले होते. गबूची बायको म्हणजे याची वहिनी. ती मुलीच्या हायस्कुलात होती. सगळ्या मुलींच्या तोंडी या बाईविषयी कौतुक आणि आदर दिसे. कारण त्यांचे शिक्षण पुण्याच्या कर्व्याच्या शिक्षणसंस्थेतले. प्रख्यात विद्वान आणि तत्त्वज्ञानी लेखक वामन मल्हार जोशी यांच्यासारखे त्यांचे शिक्षक, कर्व्यांचा त्याग आणि कर्तृत्व यांच्या धूसर पडछाया या त्यांच्या विद्यार्थिणीच्या भोवती. पान नं. 24 विषय `जुने मराठी वाङमय' असे काही तरी होता. बाईचे बोलणे भारदस्त. शब्दांचे उच्चार स्पष्ट,अस्खलित. पण विषयापेक्षा त्यांची भाषाच चटकन मन वेधून घेई. अशी शुध्द, सोज्वळ,लाघवी,शहाण्णव कुळीची वाटावी,अशी मराठी भाषा याने पूर्वी कधी ऐकली नव्हती. वऱ्हाडकरांच्या मराठी भाषेवर नेहमी हिंदी, उर्दू शब्दांचा, वाक्प्रचारांच्या पडसादांचा तवंग असतो. त्या भाषणातल्या निखळ मराठी निनादांकडे याचे काम टक लावून बघत राहिले. बोलण्याच्या ओघात जुन्या गाण्यांची उदाहरणे येत होती. आपला सवंगडी कृष्ण मथुरेचा राजा झाला ही हर्षाची वार्ता एकमेकींना सांगता सांगता गोपी गात सुटल्या.`गडे ग कृष्णगडी अपुला !राजा मथुरेचा झाला, उतावळी राधा कृष्णाच्या भेटीला निघाली. तिच्या लगबगीत `वारियाने कुंडल हाले' आणि मग `डोळे मुरडित राधा चाले.' त्या मधुर शब्दाच्या कर्णस्पर्शाने याचे शब्दलोभी मन महिरून गेले. पुढे अनेक दिवस राधेच्या कानातील कुंडलांप्रमाणे ही सुंदर शब्दांची कुंडले याच्या कानात डुलत राहिली. मग याने ठरविले, ते काही नाही. ही जुनी सुंदर गाणी गोळा करायला हवीत. कॉलेज गावाबाहेर लांब एकीकडे होते. समोरचा रस्ता पुष्कळसा निर्मनुष्य. खेडयापाड्यातल्या बायका जळाऊ लाकडाच्या मोळ्या डोईवर घेऊन त्या रस्त्याने गाणी म्हणत गावाकडे जात. बाभळी-हिवरीची लाकडे. त्या स्त्रियांच्या डोक्यावर या लाकडांचे काटे पण जिभेवर शब्दांची फुले ! उगाला दिवस पक्षी किलबी ले अंब्याला घोस साजरे लागले याने ते एकदा ऐकले. मग खिशात एक टिपणवही टाकली त्यांच्या मागून अंतरावर चालायचे. ऐकलेले लगेच टिपून घ्यायचे. आंब्याला घोस साजरे लागले मेना करी नवस शंभू राजा गांजली ग गांज ली कशानं गांज ली एका पुत्रानं वांझली मेना माझी वांझली म्हणजे काय ?वांझ झाली ?गे नवीनच सुटसुटीत क्रियापद आहे. पान नं. 25 वा: म्हणजे हे नुसते गाणे टिपणे नव्हे. भाषासंशोधन होते आहे ! एखाद्या वेळी शब्द नीट ऐकू यावा म्हणून हा झटकन पुढे होई. बायकांपासून चारपाच हातांवर.मग एक दिवस एक बाई उलटली. याच्या डझनभर टिपण- वहया भरतील इतके नवीन शब्द आणि याने कधी न ऐकलेले अगणित वाक्प्रचार तिने याला ऐकवले ! त्यांचे स्पष्ट खणखणीत उच्चार कसे करायचे याचेही बाभळीची काठी हातात घेऊन प्रात्याक्षिक दिले ! आणि हा भांबाळून गेला ! मागून कॉलेजची चारपाच मुले सायकलीवरून आली. त्यांनी याला सोडविले बायका बडबडत पुढे निघून गेल्या. मुले थोडा वेळ रेंगाळली. एकाने विचारले, ""काय झालं रे ?"" ""काही नाही. हा त्या बायकांचं संशोधन करीत होता. त्या म्हणाल्या नाही करायचं !"" दुसरा म्हणाला. ""पण संशोधन कसलं?"" तिसऱ्याने विचारले. ""बायकांच्या मागून फिरताना त्यांच्या नितंबांची लय नुसीतच वर खाली दिसते की आडवीसुध्दा !"" दुसरा संस्कृतचा विद्यार्थी होता त्याने सांगितले ""लेको, तुम्ही सगळे हलकट आहाता !"" याने संतापून म्हटले. या आणि अशी मुलांनी याला कॉलेजच्या मासिकाचा संपादक म्हणून निवडून दिले हा `नाही नाही ' म्हणत होता. त्यांनी आग्रह केला.""उर्दूला मराठी इतकीच पानं मासिकात हवीत"" हा म्हणाला,""हे नाही चालायचं.मराठी मुलं बहुसंख्य आहेत"" दुप्पट आकाराची पंचवीस तीस पानं भरून काढायला लिहिणारे आहेत का कुणी ?"" शेवटी ठरले याने मराठीचा मजकूर गोळा करायचा. कमी पडला तर मात्र मराठीला आणि उर्दूला सारखी पाने द्यायला हवीत. याने जंगजंग पछाडले. छापखान्यात मजकूर द्यायची तारीख आली. उर्दूचा संपादक रोज विचारायचा, ""शिल्लक राहतात ती पानं मला केव्हा देतोस?"" कुणी लिहायलाच मिळेना. हा पाने कशी भरणार ? मग याने ती सगळी पाचपंचवीस पाने स्वतःच्या मजकुराने भरून काढली ! संपादकीय प्रस्तावना, एक लघुकथा,एक नाटयछटा,पुढे जो प्रकार `गुजगोष्टी' म्हणून प्रसिध्दी पावला तसला एक `बाईच्या तोंडात बुवा' नावाचा लेख,दोन चार पाने भारदस्त संपादकीय टिपणे, आणि त्या काळी खूप गाजलेल्या `बंधनाच्या पलीकडे' या पान नं. 26 कादंबरीवर अगदी निराळ्या रितीने लिहिलेले एक विस्तृत परिक्षण. बहुतेक लेखांच्या शिरोभागी लेखक म्हणून कल्पित आमि टोपण नावे !कॉलेजात देशमुख, देशपांडे, कुलकर्णी पुष्कळ. त्यात दोनचार कल्पित देशमुख देशपांडयांची भर पडली तर ते मुलांच्या ध्यानात येण्यासारखे नव्हते. पण कवितेच्या कुंकवाशिवाय मासिकाला सौभाग्य नाही ! याने वीस पंचवीस ओळीची एक कविताही हट्टाने लिहून काढली. कवितेचे नाव होते `गणेश चतुर्थीचा चंद्र' कवितेतली कल्पना याला खूप हुशारीची वाटली होती. गणेश चतुर्थीला चंद्र बघितला की पाहण्याच्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे. त्या आरोपातून वाचावे म्हणून याच्या कवितेतला नायक संध्याकाळी लवकर घरी परतला.पण त्या दिवशी त्याचे नशीबच ओढवले होते. रस्त्यातच एका तरूणीचा मुखचंद्र दोन पायावर चालत येऊन त्याच्यासमोर उभा ठाकला. चतुर्थीच्या नुसत्या चंद्रकोरीच्या दर्शनाने जरा चोरीचा आळ येतो तर या सबंध सोळा आणे चंद्राच्या भेटीमुळे सगळे इंडियन पिनल कोडच आपल्या डोक्यावर आदळणार असे नायकाला भय वाटले. तो पळणार होता पण त्या तरूणीने त्याला अडविले, ""चोरी, कुठे जातोस?"" त्याने बुचकळ्यात पडून विचारले,""चोर ?मी? मी काय चोरी केली बुवा?"" तिने आरोप केला,""तू माझं ह्दय चोरलंस !"" याला खूप आवडलेली ही कविता याने याचे यवतमाळचे कविमित्र वामन नारायण देशंपाडे यांच्याकडे कौतुकाने पाठवून दिली. वामनरावांनी याच्या ओबडधोबड काव्यरचनेवर मत देण्याचे खुबीने टाळले. आणि याचीच कल्पना घेऊन तिच्यावर एक नवी कोरी कविता रचून याच्याकडे पाठवून दिली ! तिची रसाळ प्रासादिक रचना बघून याच्या ध्यानात आले, उत्तम कल्पना आणि भिकार रचना म्हणजे सुंदर स्त्रीचे झोपेतले घोरणे !त्यानंतर स्वयंस्फूर्त काव्यरचनेचा उपद््व्याप याने आयुष्यात कधीही केला नाही ! याने कविता छापली. मग सहज नजरेस पडेल अशी ज्याच्या त्याच्या पुढे हा ती कविता सरकवी आणि कौतुकाची वाट बघे !त्या काळात याचा एक मित्र होता. गंपू मोटे. हरि मोटेचा पुतण्या. गंपूने कम्युनिस्ट वाङ्मय वाचायला सुरवात केली होती. त्याने याची कविता वाचली आणि चिडून म्हटले, ""बूर्झ्वा लेकाचा !काव्यमय नाटक चोरांच्या गोष्टी सांगतो आहे ! अरे तू खरे चोर पाहिले आहेस कधी ? गरिबी चोरीची माय,चुलूम चोरीचा बाप असतो हे ठाऊक आहे तुला ?"" याने सुध्दा खरे चोर पाहिले होते तर! पण ते पुस्तकात. व्हिक्टर ह्यूगोचा झॉ व्हालझां. त्याच्या `ल मिजराल कादंबरीचा नायक. ह्यूगोला आणि स्वतःला अमर करून गेला तो. पान नं. 27 याला नेहमी वाटे. खरेच असे ह्यूगोसारखे लिहियला हवे. लिहूच कधी तरी. आपणसुध्दा लोकांवरचा जुलून,गांजलेल्यांची गरिबी, रंजलेल्यांचे देन्य अगदी जवळून पाहिले आहे. का नाही लिहिता येणार 'ल मिझराब्ल सारखे ? याने गरीब बघितले होते ते गबूच्या माडीवरून.श्रीमंताच्या पंक्तीत बसून ! समोरच्या रस्त्यावर मजूर भर उन्हात खडी फोडीत बसत. घामाझोकळ होत. वडाच्या, निंबाच्या सावलीत एकाददोन बेकार निराशेने उपाशीच पसरलेले असत. त्याच सावल्यात कापसाच्या गाडयांचे बेल बांधलेले. ते मात्र पोटभर गवत खात असलेले ! पण गरिबी गरिबी म्हणायची ती सुध्दा याच्याइतकी कुणी पाहिली नसेल असे याला वाटे. याची स्वतःची गरिबी होती. पण ती थोडी फॅशनेबलच. अगदी खालच्या थरातली, पण तरीही पांढरपेशा. याचा एक मित्र होता. मनोहर वेद्य कॉलेजच्या पहिल्या वर्षात याच्याजवळ बसे. सालस,गोड स्वभावाचा मुलगा. याच्या बोलण्यावर फार लुब्ध. वेद्य राह्यचा जेमतेम उभ्या असलेल्या दोन खोल्यांच्या पडक्या घरात. भिंती ढेपाळलेल्या. छप्पर तुटके वासे आणि फुटकी कौले यांचे. जळमटांनी भरलेले. घरात तो आणि त्याची आई. ती नेहमी थोडी आजारी. वेद्य पडतील ते कष्ट करी. जेमतेम पेसे मिळवी आणि शिक्षण करी. वेद्याला याच्या श्रीमंत मित्रांत जागा नव्हती. तो याला आपल्या घरी घेऊन जाई. हसून म्हणे ""तुला इथे आणायला मुळीच संकोच वाटत नाही. तुला चहा द्यावा लागत नाही. कारण तू चहा घेतच नाहीस."" मग तासन् तास गप्पा चालत एकदा प्लेगचे दिवस होते. बोलता बोलता खूप संध्याकाळ झाली. याला लांबच्या झोपडीवर जायचे. वेद्य म्हणाला,""आता केव्हा पोहोचशील आणि केव्हा जेवशील ?आज इथेच जेव ना?"" मग त्याने आईला विचारले. तिने `हो' म्हटले आणि त्याला हळूच काही सांगितले. वेद्य शेजारच्या घरी गेला आणि वाटी दीडवाटी तांदूळ घेऊन आला. थोडया वेळाने हे दोघे जेवायला उठले. भात,आमटी,दोन कांदे. आई आमटी वाढत होती. भातावरची झाकणी काढलेली होती. आई काढायला गेली तो त्यात एक मेलेले उंदराचे पिल्लू ! छपरातून आधी केव्हा तरी पडून शिजलेले ! `अरे देवा !' म्हणत आईने कपाळाला हात लावला. वेद्य पार गोरामोरा होऊन गेला. बाहेरच्या खोलीत हे दोघे सुन्न होऊन बसले. वेद्य हताशपणे म्हणाला,""आता काय करायचं ?"" याने विचारले,"" तू काय करणार आहेस ?"" आत आई मुकाटयाने डोळे पुशीत होती. तिकडे बघत वेद्य म्हणाला,""थोडा आजूबाजूचा भात काढून खाईन. नाहीतर आईला फार वाईट वाटेल."" याने पान नं. 28 म्हटले ""चल, मी पण थोडा खाईन."" पण वेद्याने ऐकले नाही. भयानक दारिद्याची आणि त्यातल्या अगतिकतेची परिसीमा याने पुढे मोठे झाल्यावर सांगली येथेही पाहिला. तिथे हा सिनेमाचा स्टुडिओ चालवीत होता. लहान लहान खोल्यांच्या लांब बराकी. आडव्या उभ्या रांगांत बांधलेल्या. त्यात स्टुडिओची निरनिराळी खाती. लॅबोरेटरी, कॅमेऱ्याच्या खोल्या, स्टोअर,स्टुडिओ- तल्या बायंकाची खोली, मेकअप,कपडेपट.कपडेपटात तराळे काम करी. तिशिपस्तिशीचा,दणकट शरीराचा आणि अगदी अबोल. कपडेपटाच्या समोरच्या अंगणात एक पारिजातकाचे झाड होते त्याच्या लहान पारावर स्टुडिओतल्या बायका बसत. बाळकाबाई,मथुराबाई,बकुळाबाई. स्टुडिओतल्या माणसांशी कधीकधी त्यांची हळू आवाजात थट्टामस्करी चाले. मग एकाएकी तराळे येईनासे झाला. काय झाले, कुठे गेला कुणी सांगेना. हा विचारात पडला. मग एकाने सांगितले,""तराळे आता यायचा नाही. त्याला लकवा झाला आहे."" अरे !मलखांबासारखा पिळदार तराळे. त्याचा वेताचा मलखांब होऊन गेला ? वाकणारा, लुळा पडणारा !पण तो आहे कुठे ? पेशाची सोय काय आहे ? शेवटी याला कळले. तराळे स्टुडिओतल्याच बकुळाबाईकडे पडून आहे. पण एकदोघांनी सांगितले, ""साहेब, तुम्ही तिकडे जाऊ नका. वस्ती बरी नाही. आणि जाऊन करणार काय ? अखेर शेवटी तो लकवा !"" पण याच्याने राहवेना. एक दिवस स्टडिओतून पायी निघाला. रस्त्यात ठरविले आज तराळेला भेटायचेच. सांगलीच्या सदासुख थिएटरच्या बाचूंची चिंचोळी गल्ली. आत दोन्ही बाजूला वेश्यांची घरे. त्यांची दारे लाज सोडल्यासारखी उघडी. पुढे जावे की मागे जावे याला कळेना. याने धीर केला. बकुळाबाईचे घर विचारले. ते गल्लीच्या टोकाशी समोर होते. याला पाहिल्याबरोबर बकुळाबाई चपापली. याने विचारले,""तराळे आहे का इथं ?"" ती बघतच राहिली. शेवटी ती म्हणाली, ""हायते"" पण गल्लीतल्या दारादारातून बायका येऊन उभ्या राहिल्या होत्या. बकुळाबाई- कडे कोण मातबर गिऱ्हाईक आले होते ते बघायला! हा गोंधळून गेला. बाहेरच्या बाहेर परत जावे म्हणून याने सबब काढली, ""सिगरेटचं पाकीट घेऊन येतो."" पण आत तराळेने याचा आवाज ऐकला होता. त्याने विचारले,""कोण बेडेकरसाहेब आले आहेत का ग ?"" आता परत फिरणे शक्य नव्हते. याने भीत भीत आत पाऊल टाकले. एकच खोली. पस्तीस चाळीस चौरस फुटांची समोरच्या कोपऱ्यात चूल. स्वयंपाक. दारातून आत पाऊल पडे ते या स्वयंपाकघरात. खोलीच्या मधोमध दोरीवरून टाकलेला एक गोणपाटाचा पडदा. अगदी जमिनिपर्यंत लोंबलेला. पान नं. 29 स्वयपांकघरातून पडद्यापलीकडे किंवा तिकडून स्वयंपाकघरात थोडे काही दिसले तर त्या पडद्याखालच्या विरळ दशांतून. हा पडद्यापलीकडे गेला. तिथे तराळे असहाय्य होऊन पडला होता. खाली पटकुराचा बिछाना. त्यावर अर्धांग लुळे झालेले शरीर. त्या चिमटलेल्या जागेत हा जेमतेम बसला. अर्धा भिंतीला टेकून, दुसरा खांदा गोणपाटाच्या पडद्याला लावून. तराळेने बकुळाबाईला म्हटले, ""चहा देतेस ?"" ती `व्हय' म्हणून पडद्यापलीकडे गेली. याने तराळेच्या विचारपुशीला सुरवात केली. इतक्यात घराचे दार लागल्याचा आवाज ऐकू आला.याला वाटले बकुळाबाई चहा आणायला बाहेर गेली. पण ती गिऱ्हाईक घेऊन आत आली होती.! तिने धंद्यासाठी दार लावले होते! याने तराळेचा हात हातात घेतला होता. तो एकदम ताठ झाला. त्याचा चेहरा बघितला तो पार थिजलेला, शरमून गेलेला. भीतीने गांगरलेला ! पुढच्या काही मिनिटांतच पडद्यारपलीकडे काय होत आहे हे याच्या ध्यानात आले आणि हा अगदी खळबळून गेला. इकडे हे दोघे, स्तब्ध,मुके झालेले पडद्यापलीकडे अबद्र आवांजाची किळसवाणी खुसखुस ! एकाद दुसऱ्या शिवीचे, शरीराच्या घुसळणुकीचे धसमुसळीचे, बांगडयांचे, श्वासांचे, धपापण्याचे आवाज ! याला दरदरून घाम सुटला. पण तोसुध्दा या दारूडया गिऱ्हाइकाने दंगा केला तर आपण त्यात सापडू आणि गावभर बभ्रा होईल म्हणून असावा ! थोड्यावेळाने दार उघडले. पलीकडे शांत झाले. मग बकुळाबाईने चहाचा कप,एक दोन बिस्किटे आणि गोल्डफ्लेकचे एक पाकीट याच्यापेढे ठेवले. तराळे हताशपणे तिला म्हणाला,""अगं साहेब जाईपर्यंत तरी थांबायचंस!"" बकुळाबाईने उत्तर दिले,""काय करू ? घरात आठ आणेच होते. साहेबांना सिगरेटचं पाकीट हवं होतं.!"" बकुळाबाईसाठी, वेद्यासाठी याच्या लेखणीला कधी पाझर फुटला नाही. तिला लहर लागली तेव्हा पौरणिक परीकथांत आणि विलायती बोटीतल्या खुशालीत रंगलेल्या प्रेमकहाण्यांत ती दंग झाली ! याच्याच आवडत्या व्हिक्टर ह्यूगोने म्हणून ठेवले होते. `नव्या निर्मितीसाठी पृथ्वी आपल्या उरात नांगराचे तीक्ष्ण फाळ आनंदानं खुपसून घेते, तेव्हाच तिला मातीतून धान्याच्या मोतीदाण्याचं पीक काढण्याचं सामर्थ्य येतं. रंजल्यागांजल्यासाठी स्वतःच काळीज फाडून घ्यायला तयार होणे तर राहोच, याने उसन्या श्रीमंतीत आणि पांढरपेशा संस्कृतीच्या संगतीत पोटातले पाणीही कधी ढवळू दिले नाही ! आणि हा `ल मिझराब्ल' लिहिणार ! लिहिणे राहो पण अशा अनेक अनुभवांच्या आघातांनी याच्या मनाचा घाट सारखा बदलतो आहे. हे मला दिसत होते. पान नं . 30 शब्द : - 10604 वाचनाची हौस मात्र मनसोक्त फिटत होती . पण वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलता आले तरचे ते पुन्हा पुन्हा जगता येते . आणि अंगी लागते . हा बोलणारा कुणाजवळ कॉलेजातले सगळे निव्वळ खेळातले सोबती आणि वायफळ गप्पाष्टकी . चक्रधर देशमुख होता . तत्त्वज्ञान विषयात मुरलेला . पण त्या विषयाच्या भाराखाली अर्ध्या उमरीतच मनाने म्हातारा ! त्याला कॉलेजात मुली किती हे सुध्दा माहीत नसणार ! मग नाटके , कांदबऱ्या , खेळ , मजा यांची ओळख दूरच ! एकदा याने देशमुखला एक खूप चुरशीची हॉकी मॅच बघायला ओढून नेले . तिथे शेकडो प्रेक्षक उत्साहाने ओरडत निम्मा वेळ हवेत उडले ! पण देशमुख थंड ! एवढेच म्हणाला , "" शहाणीसुर्ती बावीस माणसं , हातात काठया घेऊन जिवापाड आटापिटा करतात . तासभर . केवळ एक लहान चेंडू दोन खांबांच्या मधे ढकलण्यासाठी ! आश्चर्य आहे ! "" एकदा देशमुखला याने गुएटेची ` तरूण व्हेर्टरची दुःखे ' ( Sorrows of young Werther ) अगदी गदगदत सांगितली . ऐकून देशमुख म्हणाला , "" व्हेर्टर शार्लोटसाठी रडला हे ठीक आहे . पण तुझा गळा का असा वारंवार दाटून येतो आहे . ? "" रसिक श्रोत्याची ही उणीव हरी मोटेने भरून काढली हरी याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान . त्याचा पुतण्या शेषराव मोटे याच्या क्रिकेट संघातला . शेषराव वयाने याच्या बरोबरीचा . त्याच्यामुळे हरी कधी कधी याच्याकडे येई . पुढे यांची घसट वाढली ती हरीच्या घरातल्या एका बाईच्या कृपेमुळे ! उमरावतीचे मोटे घराणे श्रीमंत . त्या घराण्यात तीन पाती होती . हरी सगळ्यात धाकटया पातीचा . तो आणि त्याचा लहान भाऊ . दोघे लगानपणा - पासून पोरके . त्यामुळे सगळ्या मुलांनी स्वतःच्या पंक्तीला जेवायचे ही चुलत्यांची शिस्त . घरात नेहमी पाहुणेरावळे . जेवणात गोडधोड असायचे . जाता येता स्वयंपाकघरातून पक्वान्नांचा वास दरवळे . या मुलांच्या तोंडाला पाणी सुटे . ती तिथे घुटमळत . पण घरातली बाई मत्सरी आणि कावेबाज होती . ती मुलांना आधी एकटे गाठी आमि बजावी "" श्रीखंड केलं आहे . मी स्वतः पंक्तीला वाढीन . पण तुम्ही ` नाही नको . . आवडत नाही . . ' म्हणत पानात पडू द्यायचं नाही . मी खूप आग्रह करीन तरी तुम्ही पानावर आडवं पडून मला अडवायचं . नाही ऐकलंत तर तुम्ही देवघरातला रूपया चोरलात म्हणून सांगेन ! "" मग ही मुले जिभेला सुटलेल्या पाण्याचे आवंढे गिळीत अर्धपोटी राहायची ! बाई कळवळून पंक्तीत म्हणायच्या , "" काही केलं तरी यांना जातच नाही ! डॉक्टरला तरी दाखवा ! "" असले जेवण संपले की हरी घाईने सायकल मारीत पान नं . 31 अर्ध्या मेलावरच्या गबूच्या माडीवर यायचा . तिथल्या खाल्चाय हॉटेलातून श्रीखंड , भजी मागवायचा . ती घाईने खाऊन शाळेत जायचा . हाही हरीकडे आपल्या सायकलवर जायचा . याची सायकल मोडकी , गंजलेली काळपटलेली . उपेक्षेच्या उकिरड्यावर पडलेल्या एखाद्या म्हाताऱ्या विधवे - सारखी ! एक दिवस हरीचे चुलतभाऊ डॉक्टरची मोठी पदवी मिळवून इग्लंडहून परत आले . त्यांची पाती मोटे घराण्यात सगळ्यात श्रीमंत . त्यांनी याची सायकल बघितली आणि विचारले , "" कुणाची रे ही सायकल ? "" त्यांना कुणीतरी म्हटले , "" हरीच्या मित्राची . "" त्यावर लगेच तुच्छेतेने ते बोलून गेले , "" वा : ! खूपच श्रीमंत मित्र मिळवले आहेत आमच्या हरीनं ! "" शेषरावने भीमरावांचे हे बोलणे याला सांगितले तेव्हा अपमानाच्या जाणिवेने हा मनातून अगदी जळून गेला . याने हरीकडे जाणे सोडून दिले . एकदा दोनदा हरीने ` यात माझा काय दोष ? ' म्हणून याची समजूत घालण्याचाही यत्न केला पण याने दाद दिली नाही . असेच चालू राहिले असते तर कदाचित हरीचा आणि याचा संबंध त्याचवेळी तुटला असता . पण जॉर्ज बर्मार्ड शॉ यांनी या दोघांना पुन्हा जवळ आणून सोडले ! 1926 - 27 साल असावे . शॉचे ` सेन्ट जोन ' नाटक इंग्लंडात रंगभूमीवर आले . आधीच हा शॉचा वेडा . त्यात त्या नाटकाच्या बेसुमार गौरवाचे उद्गार याला कॉलेजच्या लायब्ररीत येणाऱ्या विलायती वर्तमानपत्रातून वाचायला मिळत . सेन्ट जोनचे काम करणारी पहिली नटी सिबिल थॉर्नडाइक . तिचे नाटकातले फोटो त्या वर्तमानपत्रांतून येत . त्या नटीच्या अभिनयगुणांचा गौरव हा अनेक वर्षे ऐकत आला होता . नाटकाचे निदान पुस्तक तरी बघायला मिळावे या विचाराने हा अगदी बेचेन झाला . पण उमरावतीसारख्या आडगावात विलयती नाटकाचे इतके ताजे पुस्तक सहजासहजी कुठून मिळणार ? एक दिवस शेषराव याला म्हणाला , "" अरे ते तू कुठलं जोन का जॉनचं नाटक म्हणतोस ते तर भीमरावभाऊंनी इंग्लंडहून आणलं आहे . त्यांच्या टेबलावर पडलेलं असतं ! "" आता याच्या मनाची कोण फरपट ! अपमान गिळायचा आणि भीमरावांकडून पुस्तक आणयचे ? छट् ! पण मग पुस्तक समोर तरी वाचायला मिळत नाही म्हणून तडफडत राहावे लागेल ! चालेल ? तरी एक दोन दिवस याने नेट धरला . पण मध्येच विचार आला . दुसऱ्या कुणी ते वाचायला नेले तर संपलेच ! शेवटी याचा धीर खचला . हा चुंबत हरीकडे गेला आणि हरीने ते पुस्तक याला मिळवून दिले ! याने ` सेन्ट जोन ' ची पारायणे केली . भीमरावांनी लंडनमध्ये नाटकाचा प्रयोगही बघितला होता . ते पुष्कळदा हरीजवळ त्याबद्दल बोलत . हा नाटक वाचून त्यातला उपसंहारासारखा काही भाग रंगभूमीवर कसा उभा करतात हे खोदखोदून पान नं . 32 हरीच्या मार्फत भीमरावांना विचारण्याची खटपट करी . ! तासन् तास हे दोघे त्या नाटकाविषयी बोलत राहत . मग आपल्या आनंदाचे वाटेकरी करण्यासाठी याने ` सेन्ट जोन ' चे पुस्तक यवतमाळचे आपले मित्र वामन नारायण देशंपाडे यांचेकडे धाडून दिले . आणि सोबत ` अपूर्व . . अलौकिक . . अप्रतिम . . मास्टरपीस ' अशी शेलकी भलामणही जोडली . आठ दिवसांनी वामनरावांचे पत्र आले . "" तुम्ही शॉच्या वर्तमानपत्री कीर्तीला हुरळून गेला आहात . ` सेन्ट जोन ' पेक्षा प्लेटोनं लिहिलेलं सॉक्रेटिसाचे संवाद , हे पुस्तक अनेक पटीनं सरस आहे असं मला वाटतं . ! "" याने ते संवाद पुन्हा वाचून काढले . मग याच्या ध्यानात आले . आपल्या बुध्दीत इतर गुण असतील नसतील . पण मुख्य गुण वाहावत जाण्याचा आहे ! गुणदोषांचा विवेक करण्याचा विचक्षणपणा आपल्या अंगी नाही वामनची रसिकता डोळस असा याला नेहमी भरवंसा . प्रत्येक वेळी त्या रसिकतेच्या स्वतंत्र वृत्तीने हा अचंब्यात पडे . याच दिवसांत कधी नाही ती गंधर्व नाटक मंडळी उमरावतीला आली . तिच्या संगीतमधुर नाटयप्रयोगांमुळे सगळ्या गावावर उत्सवाची रौनक चढली . जत्रेला लोक धावावे तसे शनिवार रविवारच्या नाटकांना प्रेक्षक नागपूर बिलासपूरपासून , दोनशेतीनशे मेलांवरून उमरावतीला येत . शिकवण्या करून साठवलेले पेसे याने ती नाटके पुनःपुन्हा बघण्यात उडवून टाकले . गंधर्वाच्या अभिनयापुढे आणि गाण्यापुढे दुसरे सगळे आनंद रद्द आहेत असे याला होऊन गेले . आणि याने वामनला पत्र पाठविले . "" हा अलौकिक प्रतिभेचा नटनायक आहे . तुम्ही बघायलाच हवा . "" वामन आला . त्याने नाटके बघितली . फार अलौकिक वगेरे काही नाही असा शेरा दिला . आणि याला आणि हरीला समोर बसवून गंधर्वांच्या गाण्याच्या शेलीची आणि अभिनयगुणाची इतकी सविस्तर विचक्षणा केली की हे दोघे बघतच राहिले . ! एकदा हा आणि हरी यवतमाळला वामनरावांकडे जायला निघाले . धामणगांवपर्यंत अर्धा रस्ता रेल्वेचा . पुढे मोटरने यवतमाळ . धामणगावला गंपू मोटेही राहात होता . बडनेऱ्याच्या स्टेशनावर बुकस्टॉलमध्ये प्रख्यात नाटककार कृ . प . खाडिलकर यांच्या नव्या ` मेनका ' नाटकाचे पुस्तक दिसले . हरीने बारा आण्याला ते घेतले . आणि ते घेऊन धामणगावच्या गाडीत हा वाचीत बसला . त्या तासभराच्या प्रवासात याने पुस्तक संपवले आणि खिडकीतून बाहेर फेकून दिले ! साहजिकच हरी खूप रागावला . याने सांगितले "" अरे , भिकार आहे अगदी ! "" "" पण मला वाचायचं होतं . "" "" असलं रद्दड लिखाण ? "" याचा पुस्तकाबद्दलचा राग अजून ओसरला नव्हता . "" खाडिलकरांचं लिहिणं रद्दी ? शुध्दीवर आहेस का ? "" पान नं . 33 "" खाडिलकर झाले म्हणून काय झालं ? सरळ सुंदर ` विद्याहरण ' सारखं नाटक लिहियचं तर त्यांनी पुराणातली कथा घेऊन आपल्या राजकीय प्रचारासाठी राबवली ! कथा तरी सुंदर निवडायची गौतमअहल्येसारखी ? "" "" हे बघ , तू स्वतःला फार शहाणा समजतोस नेहमी . एखादं नाटक लिहून दाखव . मग असला शिषटपणा करीत जा . "" ते बोलणे याला लागले . हरी तसे बोलला नाही . पण पुस्तक फेकन द्यायचे असले तर ते स्वतः विकत घ्यावे असे हरीच्या मनात खात्रीने आले असणार ! खाडिकरांसारख्या थोर नाटककराने आपली अशी निराशा केली याचा याला खरोखरच राग आला होता . आपण नाटक लिहून बघायचेच असे याने स्वतःशी ठरविले . ` सेन्ट जोन ' आणि गंधर्वाची नाटके यामुळे याच्या मेंदूतले नाटयरसायन आधी खदखदत होतेच . आता याने गौतमअहल्येच्या कथेचा धोशा घेतला . त्यावेळी हा ज्युनियर बी . ए . होता . पुराणातून , कीर्तनातून , पोथ्यांतून रवीन्द्रनाथांसारख्याच्या लिहिण्यातून कथेचे निरनिराळे संदर्भ याने गोळा केले . पहिल्या अंकातल्या देखाव्याचा नकाशा तयार केला . त्यावर हे पात्र इकडून येणार हे तिकडून अशा खुणा करायला सुरवात केली . मग ध्यानात आले शेवटी इंद्र गौतमाचे रूप घेऊन अहल्येकजे येतो ते स्टेजवर कसे दाखवणार ? एकच पात्र दोघांची कामे करणार ? म्हणजे दोघांमध्ये नाटकात खटकाच उडायचा नाही . आणि इंद्राच्या पात्राने कितीही रंगरंगोटी केली तरी त्याचा चेहरा गौतमचा काम करणाऱ्या नटासारखा हुबेहूब कसा दिसणार ? पहिल्या अंकाची चर्चा जोरात चाले . चक्रधर देशमुख आणि कधी कधी तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर रामनाथन् यांच्याबरोबर . देखाव्याचा नकाशा समोर घेऊन हा देशमुखला म्हणायचा , "" का म्हणून येतो ? "" "" अरे अहल्येच्या मागे येतो . "" "" मग ठीक आहे . बाहेर यायला कारण आहे . पण आत काय करीत होता ? "" "" नाच . . . गाणं . . . मद्य . . . "" "" तो स्वतः आल्याबरोबर तेच बोलतो ना ! "" पात्रे उगीचच आली , उगीचच गेली म्हणजे देशमुख बुचकळ्यात पडे . रंगभूमीवर पात्रांचे येणे जाणे नेहमी सकारण हवे . रंगभूमीबाहेरच्या त्यांच्या जीवनाचे प्रेक्षकांना भान देणारे हवे . बर्नार्ड शॉची पात्रे हवी तेव्हा केवळ लिहिण्याच्या सोयीसाठी रंगमंचावर येतात आणि बाहेर जातात . त्यामुळे शॉच्या नाटकांची रचना ढिसाळ असते हे याने नुसते वाचले होते . आता याला नाटकाच्या पान नं . 34 बांधणीचे ताणतणाव कुठल्या खुंटांना कसे बांधून ठेवायला हवेत याचा उमज पडू लागला . एक दिवस रामनाथन् म्हणाले , "" ठीक आहे . इंद्र आला . तो जातो केव्हा ? "" "" अंकाच्या शेवटी शेवटी "" याने उत्तर दिले . "" पण का जातो ? "" रामनाथन््नी विचारले . "" नंतर लगेच अंक संपतो ना ! "" याने वेडयासारखे उत्तर दिले . "" शाब्बास ! तू मोठाच नाटककार आहेस ! थांबला तर अंकाचा पडदा डोक्यात पडले म्हणून इंद्र जातो म्हणायचा . "" "" सर , तो खूप मोठी धमकी देऊन जातो ना ! अहल्येला ओढून आणीन म्हणून ? "" देशमुखाने याला मदत केली . "" अरे पण इंद्र म्हणजे देवांचा राजा . सर्वसत्ताधीश . मग त्याच वेळेला का नाही ओढून नेत तिला ? नाटक संपेल म्हणून ? "" रामनाथन््नी विचारले . "" पण तिथं गौतम बृहस्पती आहेत ना ? "" हा मध्ये पडला . "" दोन साधे ब्राम्हण ? राक्षसांचासुध्दा वध करणाऱ्या इंद्रापुढं ? "" "" सर , ते साधे ब्राम्हण नाहीत . महान तपस्वी आहेत . त्यांची तपश्चर्येची शक्ती मोठी आहे "" रामनाथन् थोडे विचारात पडले . नंतर एकदम म्हणाले , "" तपश्चर्येची शक्ती दॅट््स राइट ! बरोबर . शक्ती म्हणजे एनर्जी . . . ती संहार करू शकते . . एनर्जी नवंही निर्माण करू शकते . . "" ते ऐकल्याबरोबर याच्या डोळ्यांसमोर लख्ख होऊन गेले . तपश्चर्येची शक्ती , एनर्जी नवेही निर्माण करू शकते ? मग गौतमाने तपश्चर्येच्या सामर्थ्याने आश्रमात राजवाडा , मायामंदिर निर्माण केले आणि तिथे एखाद्या राजपुत्राचे रूप घेऊन येईन म्हटले तर ? शेवटच्या अंकातला नाटकातला सगळ्यात कठीण पेच सुटलाच की ! याने दुसरे सगळे लिहून बघितले होते . नाटकाच्या संवादांखेरीज . ते साधले नाही तर ? मधून मधून हा हताश होई . ` आपल्याला काही करायचंच नाही . ' असा संन्यासाचा झटकाही येई . अशाच एका झटक्यामुळे आपल्याला नाटयसंवाद लिहिता येतील हे याला उमगले . ! कॉलेज गॅदरिंगमध्ये नाटक बसवायचे ठरले . गडकऱ्यांचे ` प्रेमसंन्यासं ' त्यात कमलाकराचे काम याने करावे म्हणून कमिटिने ठरविले . त्याच वेळी याला , आपल्याला काहीच करायचे नाही , सभांतून बोलायचे नाही , लोकांच्या पुढेच यायचे नाही या वृत्तीची उबळ आली . मुलांनी बराच आग्ह केला . पण याने साफ नकार दिला . मला माहीत आहे . ` मुलांनी आणखी आग्रह करावा , आपली आर्जवं करावी ' असे याला वाट होते . आयुष्यभर याला अशी रूसून , रागावून बसण्याची आणि मग कुणी तरी समजूत घालायला येतो का याची वाट बघत बसण्याची पान नं . 35 सवय आहे . ! लहानपणी एकदा गबूबरोबर जेवताना गबू काही बोलला . याला वाटले हा आपल्या गरिबीचा अपमान करतो आहे . बिचाऱ्या गबूच्या तसले काही मनातही नव्हते . पण हा ताटावरून उठला आणि याने पाच पावलांवर असलेल्या गबूच्या घरात आठदहा महिने पाऊलसुध्दा टाकले नाही ! पण गबूचाही हट्ट . याच्याशिवाय जेवायचे नाही ! मग रोज संध्याकाळी गबूचे नोकर दोघांचेही पाटताट याच्या चंद्रमऔळी घरात घेऊन येत . मामी अन्नाची भांडी तिथे आणीत आणि दोघांची ताटे वाढून जेवण होईपर्यंत समोर बसून राहात . एकदा हा रात्री अकरा वाजता घरी आला , तो याच्या घरात गबू मामींच्या मांडीवर उपाशी झोपलेला आणि समोर या दोघांची ताटे वाढून ठेवलेली ! तेव्हा दहा महिन्यांनी हा विरघळला . वाढलेली ताटे उचलून गबूच्या घरात गेला आणि तिथे पुन्हा त्याच्या बरोबर जेवला ! पण आयांना , गबूंना , मामींना प्रेम करीत राहणे एवढाच एक मुख्य उद्योग असतो . बाहेरच्या जगाला हजार उद्योग आणि फुरसत कमी . ते तुमची मनधरणी किती करणार ? शेवटी मुले कंटाळली . त्यांनी काम दुसऱ्याला दिले . तालमी सुरू झाल्या . नाटकाची तारीख जवळ आली . गावातल्या थिएटरात नाटक व्हायचे . सगळ्या बडयाबडया अधिकाऱ्यांना , लहानमोठया धेंडांना नाटकाची निमंत्रणे गेली . गुरूवारी रात्री नाटक तर आदल्या सोमवारी रात्री कमलाकरचे काम करणाऱ्या व्ही . एम . देशपांडेला भयंकर ताप भरला . डॉक्टरांनी छाती तपासली आणि सांगितले , "" दहा दिवस बिछान्यावरून उठायचं नाही ! "" म्हणजे नाटक बारगळणार ! मुलांना कमीपणा येणार ! पुन्हा गॅदरिंगची कमिटि याच्याकडे आली . आता हा म्हणाला , "" करतो , पण . . "" मग याने पुष्कळ अटी घातल्या . कॉलेजमधून सुटी घेईन पण हजेरी लागली पाहिजे . . दिग्दर्शकाच्या घरी जाणार नाही . . . स्वतः निरनिराळ्या मुलांबरोबर तालमी करीन . चुंबत सगळे कबूल झाले . तीन दिवसांत नाटकात उभे राह्यचे . याने नक्कल सुरू केली . महत्त्वाचे आणि मोठे प्रवेश अगदी बिनचुक पाठ करायचे . लहान प्रवेशातले संवाद गोलमाल सारांशाने ध्यानात ठेवायचे ! नाटकात कमलाकर आणि द्रुमन यांचे दोनतीन प्रवेश होते . त्यात कमलाकर बोलतो आणि द्रुमन उत्तर देते तेव्हा कमलाकर ` चूप ' ` खबरदार ' वगेरे म्हणून तिला थांबवतो आमि आपली भाषणे म्हणतो असा भाग आहे . याने द्रुमनचे काम करणाऱ्या पोराला सांगून ठेवले "" हे बघ , मी साधारण सरासरीने , सारांशाने संवाद बोलेन . तू तुझी वाक्ये बरोबर म्हण . "" त्या पोराने सांगितले , "" तुला हवं ते बडबड . पण शेवटचं क्यूचं - खुणेचं - वाक्य बरोबर दे म्हणजे झालं . "" पान नं . 36 नाटक रंगत गेले . द्रुमनचा प्रवेश आला . याचा खुणेच्या वाक्यांचा गोंधळ उडून गेला . ते कुठे तरी आले की द्रुमन मध्येच तोंड घालायची . मग हा ओरडे "" चूप ! माझं आधी ऐकून घे . "" मग द्रुमन गोंधळून गप्प बसे . एक दोन मोठाले संवाद हा पार विसरला . तेव्हा याने एका मागोमाग एक अशी पाच सात वाक्ये स्वतःशीच म्हणून टाकली ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातल्या काही लाक्यांना लोकांनी टाळ्या दिल्या ! हा चकित होऊन थांबला . द्रुनला दरडावून म्हणाला , "" हं आता बोल . "" द्रुमन झालेले पोरगे म्हणाले , "" बोलतो ना . पण क्यूचं वाक्य कुठं आहे ? ते म्हण ना ! "" लोक हसले . पण याच्या ध्यानात आले , गडकऱ्यांच्या नाटकात आपण आपले संवाद सहज घुसवू शकतो तर आपल्या नाटकातले संवाद लिहिण्यात काय कठीण आहे ? नाटकाचे संवाद म्हणजे हॉकीचा खेळ . वाक्यांचे चेंडू मागेपुढे उलटसुलट फिरवायचे . कधी हवेत उडवायचे . समोरच्याला चकवायचे . हुलकवण्या द्यायच्या . ! पण चेंडू सारखा पुढे न्यायचा , खेळ सारखा गतिमान ठेवायचा . प्रश्नाचे वाक्य शेरभर वजनाचे असले तर त्याचे उत्तर सव्वा शेराचे हवे . देशमुखला ते मराठी संवाद वाचून समजत . पण रामनाथन््ना इंग्रजी करून सांगावे लागत रामनाथन्् आणि हा दोघेही हिंदी . दोघांतले हिंदुस्थानी इंग्रजी एकमेक लावून समजून घेत . पण रामनाथन््ने टॉलेव्हिनला सांगितले , "" बेडेकर नाटक लिहितो आहे ! "" टॉस्टेव्हिननी याला विचारले तेव्हा थोडया शब्दांत संविधानक सांगून याने मोकळे व्हावे की नाही ? पण याचा उत्साह दांडगा . याने संवादासकट नाटक सांगायला सुरवात केली ! नाटकातली तारा देवगुरू बृहस्पतीची बायको . तिला पहिल्या अंकात चंद्र म्हणाला , "" विद्वान बृहस्पतीची बायको तारा . तिला मदनाची तोंडओळखही नाही हे आश्चर्य नव्हे काय ? "" यावर तारेने सव्वा शेर वजनाने उत्तर दिले , "" शीतल किरणांच्या चंद्राने सर्वांगाचा भडका उडवून द्यावा हे त्याहीपेक्षा आश्चर्य नव्हे काय ? "" याला प्रश्नोत्तरे फार आवडली होती . पण आता टॉस्टेव्हिनना ती इंग्रजीत सांगताना याची तिरपिट उडाली . याने ठोकून दिले , "" Isn ' t it a greater wonder that icecold moon rays inflame me ? "" छे : ! याला वाटले यापेक्षा चांगले भाषांतर हवे . मह म्हणाला , "" make me very hot ! "" ऐकल्याबरोबर टॉस्टेव्हिन चकित होऊन म्हणाले , "" Dash it ! "" हा भांबावला . साहेबाला आपली हुशारी आवडली नाही की कळलीच नाही ? टॉस्टेव्हिननी विचारले , "" अरे , हे तुमचं मराठी स्टेज आहे तरी कसलं ? इथं थिएटरातल्या शेपाचशे लोकांसमोर बायका रंगभूमीवर येऊन म्हणत फिरतात मी व्हेरी हॉट झाले आहे ! आणि प्रेक्षक स्वस्थ बसून ते ऐकतात ? "" नाटकाचा पहिला अंक तयार झाला . तो इंद्राच्या दरबारातला होता . मुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासून पसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरी आल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तर हाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही ""पोट दुखते आहे,"" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"" आजच नेमकं हिचं पोट कसं दुखायला लागलं ?"" तर आई म्हणाली,""तिचे दिवस भरत आले आहेत, ती लवकर बाळंत होणार असेल."" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरी आले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिने त्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखत असल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असते हेच ऐकवले. तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मी म्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तू जा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोज सेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणि दुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे. तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतका चांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वर मला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्या त्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटे होते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही. आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, की त्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचं औदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी, पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही. मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकन काही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्य हा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे. कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो. शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरे घासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा. माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण या कुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून पान नं. 18 मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मी सहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवा मागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचे नाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असा कुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचे सोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवती छोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांना स्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फार मोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने न ओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही. मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी ते विसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' ही निःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मला वाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन. आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयाला येण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती. बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्द विचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ? या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज या खेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनही आवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो. आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांची बहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधा मावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. ती शंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असं काही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली. नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्याला वकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्या काळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचित बऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते. आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काही कामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणून एका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी पान नं. 19 माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचे आणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करून ठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळे नेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेली होती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतके डॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून या बाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?"" असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या : एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करता येतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही. बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढा होणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयव अभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकल कॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असे असताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ? तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळे आणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरात राहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्य होईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं. त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोलले नाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडया वेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले. ""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणही आता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तर काही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठी इतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या."" आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणार नाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करत बसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरी काही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?"" खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्यात तो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते. मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराची आहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकत नाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली पान नं. 20 आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही का जाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करू शकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरी शक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनं वाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचा की तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण या हाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्या शरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचा विचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाई कशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रित इच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?"" मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होते लहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पा तो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरच चपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस, युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात, थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशी परिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथे बदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे- आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काही खटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधा आप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगली झाली असतीस !"" त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्या पोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेच मृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातून वगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही. मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखे पलंगावरच होते. मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला, क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो, एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मग हा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं पान नं. 21 असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मला समाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीच मुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ? थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केली तर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मला लाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळ लोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचे वडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दल जे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजे या दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकत नाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत. माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकून वागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्या बाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीत शक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागा गुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तर सासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळण लावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्की ठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे. माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला. हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचा जन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीत नव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हे तर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवस साजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशी झाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलता बोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने पान नं. 22 माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळू मीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते, मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजरा करणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपात बेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडू करत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडी वगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली, ""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मला आईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्ट इतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवस खास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही. भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्या आवडीचा खास असा सेपाक करत असे. असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणती हे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दाम लक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षात ठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असा छंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझी जन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केला आणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरी कसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासून वाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्या लक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो. मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊन होताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो. आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवत नसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्या ध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्या दिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ? वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायला लागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणि कसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येत नाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायला मिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय पान नं. 23 केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशी महत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीही असती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यक असला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीच वाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभव आहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? "" माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्या आप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागत असे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्या सर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेच लोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहत होती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पण चहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरत असे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानित वाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षी असलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढे तो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते. ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावर चहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचा कप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मग घाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखा चहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय. त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसून सांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहा हवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत. आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेला अर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपच घेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आत आणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही `मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले, तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कप निधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरे वर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच पान नं. 24 राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्न झाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते. माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्या वेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूप मोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे, तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारी प्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तर त्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खास असतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्या कां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तर नसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझी आई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्र या बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वज जीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चित आणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्या पूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दी लाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्या होत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकद आईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथम करीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्या आई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्म असतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा. सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,ते घर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशी असावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने या बाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मला नाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडं आजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचं घर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्या नशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तर बेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे. एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडी वगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत. पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात पान नं. 25 जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काही भांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडला आहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडते आणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकता फिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा. भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घर घेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांना मित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याची खूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठी यापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे. आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिला अभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्र मुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरी ती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही, पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाच वर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. ती तयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफी नेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांना मित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊ अगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंना कुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असा आग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे, असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असे मनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते. हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचे नाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिला लेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय, एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे, रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्या त्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेक बाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे पान नं. 26 कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलून दाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होत त्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःख होते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही. आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून ती सत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशी तिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाही असल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेला बसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजा यथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ? आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेल की ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयार असेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणि शेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिला सर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंध नव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पण त्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचा काडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते. पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणि माझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोण जाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले. त्यावर मी म्हटले. ""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मग प्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली ती माझ्या हातची कशी चालली ग ?"" तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिला नसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला, त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे."" मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेले पुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एक सत्यनारायण माहू पूजला होता. आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याची भरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या पान नं. 27 पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होते असणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठी मी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हे आतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने ही अशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे. माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरते सगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे, घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भाग होता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिका नव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणि मुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातून किंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतून उद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनी त्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केला असता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमाने सहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटया असोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्या होण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपण दुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिक ओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांना मनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त- स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेव दूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणी कितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातून त्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणि तक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो. म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेच काही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागू पडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकी इतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्या स्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात. मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांची चेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही. पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती पान नं. 28 भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातच तीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मग आमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नाना जोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्या खोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्या वास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्या विचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळी माझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. या बाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्या संबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हां सगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागही येतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेम करण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूप असूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी. गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्या मृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणं जरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पण या दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातून लाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतून निर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळात मनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काही दुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठं विचित्रच आहे. मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीन प्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते. पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टच नव्हती. पान नं. 29 शब्द :-1597 शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायला आली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली. माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?) होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला ही सवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडे यांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईही म्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचे चित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबा रंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताच मानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजी त्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असता तरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटले असते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासून किती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितच नव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावत असे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळे असेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणि म्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारी आजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलून धावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढे स्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला न समजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पण मृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो. दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालची गोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर `अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसून पूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरून आले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाट सुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाज येताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली ही सरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्य तितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीत होते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे पान नं. 30 कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले. भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती. मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणून त्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणात टाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंप कधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्या मित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचा विचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो. तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्या ऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांची जामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी. त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतला कॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळे पाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते. आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मी दोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगा अश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्या दिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनी नायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंड स्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजे दिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो. मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरही लोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगे उसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांत पलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हर महादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे."" हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे न चुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रिया नेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते ती त्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची. मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदू आहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार. `मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळी भय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही पान नं. 31 बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर का होईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तर प्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्या पाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मला कळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झाला होता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढा परतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकर विचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूड काढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतर कुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं. या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतून विध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असं काय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगत असतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही. भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्या दृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचे धेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा, राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगर नेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस, चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टी मी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायला लागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजे वाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही. प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ? मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्व अशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मला वाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासून लाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणि दुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायला हवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. वाटले तर असे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि पान नं. 32 इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचे वेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हा द्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच हा विचारही आहेच. आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेली नाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगा दाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचा आजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणि आपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जे वर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरच अवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचा मला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचा विचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मी मरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कां खर्च करावी ? म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ? स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं, एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीची आठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचा एकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला, लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेच उत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्या पूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे. तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूर धामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्या घोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसे ते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार. त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता धामापूरला जातो. इरावताबाई एम. बी. बी. एस. झाल्यावर ज्या ससून हॉस्पिटमध्ये (पुण्याच्या इंटर्नशीप करीत होत्या तिथे एक दिवस डॉक्टर आपल्या मित्राला भेटायला गेले होते. त्या वेळी जिना उतरत असलेल्या इरावती गोडबेले या तरुणीला त्यांनी पाहिले. प्रख्यात लेखिका मालतीबाई बेडेकर आणि एका ओळखीच्या गृहस्था मार्फत विवाहाचा प्रस्ताव मांडला गेला. लग्नानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळणार असेल तर त्या लग्नाला तयार आहोत असे इरावतीबाईंनी सांगितले. डॉक्टरांनी ती गोष्ट अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता.( उलट लग्नानंतरही एम्. डी. चा अभ्यास डॉक्टरांच्या प्रोत्साहानानेत इरावतीबाईंनी पूर्ण केला) दोघांच्याही घरच्या वडील मंडळींच्या संमतीने हा विवाह निश्चित झाला.ह डॉक्चर आमच्या घरातून गेल्यानंतरही डॉक्टरांचे एक वाक्य सारखे राहून राहून आठवत होते- ""आमची बायको ना स्थितपज्ञ"" आणि त्यामुळे बाबांच्या 'थोराताची कमळा' या चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण येत होती. त्या चित्रपटातील त्या प्रसांगामधे सतत उपदेश करणाऱ्या गंभीर येसूबाई राणीच्याकडे बघून संभाजी महाराज विचारतात-- ""राणीसाहेब, तुमच्या पोथी मधे शृंगाराचा एक तरी अध्याय आहे की नाही.?"" का कुणास ठाऊक संभाजीच्या वरील प्रश्नाशी डॉक्टरांचे 'ते' वाक्य कुठं तरी जुळतयं असं मला राहून राहून वाटत होतं. 16 कॉलेजला सुट्टी असल्यामुळे चित्रपट बघायला जाण्याचे आमचे कार्यक्रम जोरदारपणे सुरू होते. आमच्या बरोबर आमची आजी असायची. तिच्यावर आम्हाला सोपवून आत्ती निर्धास्त असायची. एके दिवशी आम्ही मेहमूदचा 'भूत बंगला' हा चित्रपट बघायला जायचं ठरवलं . चित्रपटाचे नाव ऐकूनच माझ्या आजीने तोंड वाकडे केले. त्यामुळे ती आली नाही. मात्र दुपारी तीनचा शोच पाहायचा आणि दिवेलागणीच्या आधी घरी परत यायचे अशी तिची ताकीद होती. सकाळीच डॉक्टरांचा फोन झाला होता. तेव्हा आम्ही लोटस थिएटरमधे चित्रपट बघायला जाणार आहोत हे त्यांना सांगितले होते. बाल्कनी- पान नं. - 36 मधे जाण्यासाठी आम्ही जिना चढत असतानाच , डॉक्टरही तिथे आलेले आणि तिकीट काढताना दिसत होते. आम्ही चौघी बहिणी खूपच नर्व्हस झालो. कारण आमच्या बरोबर घरातील कुणीही मोठे माणूस नव्हते. डॉक्टर तर आता आमच्या जवळच बसणार. त्यातच डॉक्टर प्रसिद्धीच्या झोतातील व्यक्ती. त्यामुळे त्यांना ओळखणाऱ्या लोकांना वाटणार आम्ही सर्व मिळून , ठरवून चित्रपटाला आलेले आहोत. मुख्य म्हणजे आमच्या आजी व आत्तीला समजले तर त्या म्हणणार आम्हाला न विचारता परस्पर कार्यक्रम ठरवला आणि त्याबद्द्ल भरपूर बोलणीही खावी लागणार . त्या वेळेला डॉक्टरांची एक-दोन अभिनेत्रीबरोबर चर्चा सुरू होतीच. त्यांतील एकीबरोबर डॉक्टर त्या लोटसमध्ये चित्रपट पाहायला गेले होते असे कुणी तरी सांगत होते. म्हणजे आता चर्चा करायला आमची नावं सापडायची. आम्ही चौघीही रडकुंडीला आलो होतो. कुठून सिनेमाला आलो असा पश्चात्ताप वाटा~ यवा लागला. चित्रपटाला गर्दी काहीच नव्हती. त्यामुळे सीट लंबर्स वेगले येऊन तरी लांब लांब बसता येईल ही आशा पण मावळली. आता तर डॉक्टर आमच्याच शेजारी बसणार हे नक्कीच झाले. मी मुद्दामच सगळ्यात मागे राहिले. आणि डॉक्टरांना आमच्या रांगेच्या पुढच्या रांगेत बसण्याची विनंती केली. थिएटरमध्ये अंधार होता म्हणून बरं. नाहीतर उजेडात असलं काही डॉक्टरांना सागण्याचा धीर मला झाला असता की नाही कुणास ठाऊक ! इंटरव्हलपर्यंत माझे धड चित्रपटात लक्षही लागत नवह्ते. डॉक्टर नारज झाले नसतील ना अशी शंका येत होती. ते नारज झाले असतील तर अस्वाभाविक काहीच नव्हते. इटंरव्हलमध्ये चहा-कॉफी घ्यायला येणार का असे डॉक्टरांनी आम्हाला विचारले. आम्ही नाही म्हणताच ते एकटेच बाहेर गेले. एरवी भरपून खायला घेऊन छित्रपट बघण्याची आमची सवय. पण तोंडाची सगळी चवच गेली होती. मला अगीदच राहवेना म्हणून उठून बाहेर गेले. डॉक्टर चित्रपट अर्ध्यावर सोडून तर गेले नाहीत ना ? हेही बघायचे होते. एका खिडकापाशी समुद्राकडे बघत डॉक्टर शांतपणे सिगरेट ओढीत उभे होते. त्यांच्या शेजारी उभी राहात मी हळूच विचारले, ""रागावलात ?"" डॉक्टर उदास हसले आणि मानेनच नाही म्हणाले. आता थोडेसे दडपणही कमी झाल्यासारखे वाटत होते. पण रूखरूख पान नं. - 37 कायम होती. चित्रपट संपल्यावर डॉक्टर आम्हाला म्हणाले----""आता माझ्या घरी येऊन चहा प्यायला तरी तुमची हरकत नाही ना ?"" आता मात्र आम्हालाही नाही म्हणणे अशक्य होते. डॉक्टर त्यांच्या गाडीतून आणि आम्ही आमच्या गाडीतून डॉक्टरांच्या ब्लॉकवर पोहोचलो. डॉक्टरांचा ब्लॉक आम्ही प्रथमच पाहात होतो. डेन्टल कॉलेजमधील लेक्चररची नोकरी सोडून 26 जानेवारी 1962 रोजी डॉक्टरांनी राहत्या घरीच आपले क्लिनिक सुरू केले होते. नाटक-चित्रपटांची धावपळ त्यांच्या मागे होतीच आणि त्याच्याशिवाय त्यांना करमत नव्हते. डॉक्टरांच्या बरोबर डॉक्टरांचे सहकारी डॉ. विद्याधर कापडीही क्लिनिक पाहात होते. पुढे पुढे तर डॉक्टर नाटक-सिनेमा मध्ये खूपच व्यस्त झाले आणि डॉ. कापडी पूर्णवेळ क्लिनिक पाहायला लागले. कुणाला डॉ. घाणेकरच ट्रीटमेंट द्यायला हवे असतील तर तेवढया वेळेपुरते डॉक्टर स्वत: तिथे हजर राहात. आम्ही डॉक्टरांच्या घरी पोहोचलो तेव्हा काकी (इरावतीबाईंना मी इतर माझ्या बहिणी म्हणत त्याप्रमाणे काकीच म्हणायाची. तेही नाइलाजाने. नाही तरी मी उघडपणे त्यांना काय म्हणू शकणार होते ?) सायंकाळी पाच वाजताच आपल्या लालबाग येथील दवाखान्यात गेल्या होत्या. त्यांना परत यायला रात्रीचे 8-8।। तरी व्हायचे. सकाळीही त्या 9 ते 12 दवाखान्यात जायच्या. डॉक्टरांच्या घरी गजानन नावाचा एक पोरगेलासा गडी होता. घरातील सर्व कामं तोच करायचा. डॉक्टरांच्या घरासमोरील गोपचार चाळीतील जयवंती मंत्री ह्या डॉक्टारांच्या मित्रांच्या बहिणीचीही खूप मदत व्हायची. डॉक्टरांनी तिला बहीण मानली होती. डॉक्टर बाहरे गावी गेले की, ह्या जयूचीच इरावतीबाईंना सोबत व्हायची. डॉक्टरांच्या ब्लॉकचा हॉल बऱ्यापेकी मोठा होता. त्यामुळे त्या हॉलचे पार्टी ~ शनने दोन भाग करून अर्धा भाग पेशंटना बसायला तर अर्धा भाग खासगी वापरासाठी होता. दोन बेडरूम्सपेकी एक बेडरूमचे क्लिनिक केले होते , तर दुसरी बेडरूम डॉक्टर स्वत:साठी वापरीत होते. आम्ही घरी पोहोचल्यावर डॉक्टरांनी गजाननला चहा करायला सांगितला आणि आम्ही गप्पा मारत बसलो. थोडया वेळात चहाही आला. तो घेऊन घरी. पान नं. - 38 जाण्याच्या तयारीने आम्ही उठू लागलो, तर डॉक्टर सारखा थांबण्याचा आग्रह करीत होते. पण पळणारे घडयाळ आणि अंधारणाऱ्या दिशा आम्हाला सारखी उठण्याची सूचना देत होत्या. उदासपणे डॉक्टर म्हणाले-- ""आता तुम्ही जाणार. थोडया वेळाने क्लिनिक बंद करून डॉ. विद्या रापडी जाईल. मग मी एकटा इथे असणार. रोज रोज तरी कुणाकडे किती जायचं ? दुसरी मित्रमंडळी आहेत. पण तिथे गेलो की 'त्या चक्रव्यूहात' सापडतो ण्हणून इरावती म्हणते घरात बसून प्या. घरात ती बाटलांची खोकीच्या खोकी आणून ठेवते. मग एकटा असलो ती पीत बसतो. खरं सांगू ज्या दिवशी छोटी छोटी पावलं माझ्या घरामध्ये रांगतील त्या दिवशी सगळ्या बाटल्या ह्या गॅलरीतून खाली फेकून देईल."" यावर आम्ही कुणी काही बोलण्यासारखे नव्हतेच. पण परमेश्वराचा मात्र राग येत होता. जी बाई स्वत: स्त्री-रोगतज्ज्ञ, जिने शेकडो स्त्रियांना मातृत्व प्राप्त करून दिले होते, तिचीच कूस रिकामी राहावी. हात रिते असावेत, काय म्हणावे कर्माला ? इरावतीबाईंना मूलच होत नव्हते अशातीलही भाग नव्हता. वारंवार गर्भपात व्हायचा. डॉक्टर सांगत होते की, त्या स्वत: किती याबाबतीत प्रयत्न करतात, उपाय करून घेतात. औषध, इंजेक्शन्स शस्त्रक्रिया यांना तर गणतीच नव्हती. पण कशालाच येश येत नव्हते. हे सर्व ऐकून मी तर फार विषण्ण होऊनच तिथून उठले. 17 फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या डॉक्टरांच्या तिसऱ्या चित्रपटाचे --'सुखाची सावली' चे फारच थंडे स्वागत झाले होते. डॉक्टरांची स्वत:चीही खूप निराशा झाली होती. सुमती क्षेत्रमाडे यांच्या 'वृदा' या कादंबरीवर हा चित्रपट आधार ~ लेला होता. डॉक्टरांच्या चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी मुद्दाम ही कादंबरी आणून वाचली होती पण गजानन जहागिरदारांचे दिग्दर्शन. दत्ता डावजेकर यांचे अत्यंत गोड संगीत पान नं. - 39 नायिका जयश्री गडकर असा सगळा संच असूनही चित्रपटाची भट्टी बिघडली. मी खूप उत्सुकतेने ह्या चित्रपटाच्या प्रीमियरला गेले होते. पण तितकीच निराशा वाटयाला आली. एकच गोष्ट लक्षात राहिली, ती म्हणजे डॉक्टरांच्या शेजारी प्रथमच बसून मी हा चित्रपट पाहिला. हा एवढा आनंद सोडला तर डॉक्टरांच्या चित्रपटसृष्टीतील भविष्याबद्दल चिंताच वाटायला लागली. डॉक्टर 'पाठलाग' चित्रपटाची प्रतीक्षा चातकासारखी करत होते. पाठलागचे यश निश्चित होते. फक्त सर्व थरातून त्याचे स्वागत कसे होते याची उत्सुकता आम्हा सर्वांना होती. विशेषत: ग्रामीण भागाबद्दल. कारण 'सांगते ऐका' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशामुळे , मराठी चित्रपट हळूहळू फक्त तमाशा चित्रपटांच्या विळख्यात सापडायला लागला होता. राजा परांजपे, राजा ठाकूर, दत्ता धर्माधि ~ कारी अशांसारख्या हातावरच्या बोटावर मोजण्यासारखी मंडळी नव्या वाटा तुडवीत होती. पण तमाशा चित्रपटांचा धंदा होतो या एकाच गोष्टीवर सर्व निर्माते येऊन अडखळत होते, आणि आता सर्व मराठी चित्रपट त्याच रस्त्याने जाणार असा रंग दिसायला लागला होता. 26 मार्च रोजी प्लाझा चित्रपटामध्ये 'पाठलाग' प्रदर्शित झाला. अपेक्षेहूनही तो अधिक यशस्वी झाला. हा चित्रपट पाहून पु. ल. देशपांडे इतके प्रभावित झाले की , थिएटरमध्येच दादांना मिठी मारीत म्हणाले, 'राजा. तुझ्यासाठी पुन्हा एकदा मराठी चित्रपट लिहावासा वाटतो.' मराठीतील उत्तमोत्तम लेखक आणि त्यांच्या अप्रतिम कथा हे मराठी चित्रपटाचे बलस्थान होते. पण अशाच लेखकांनीच मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि दर्जाच्या द्दष्टीने मराठी चित्रपटांची घसरण सुरू झाली. अपवादानेच मराठी चित्रपट चांगले निघत होते. ह्या पार्श्वभूमिवर 'पाठलाग' चे यश अद्वितीय होते. डॉक्टरांच्या अभि ~ नयाची खूप तारीफ झाली. भावना या अभिनेत्रीचा तर प्रश्नच नव्हता. त्या ती भूमिका अक्षरश: जगल्या. सर्वस्व ओतून ही अवघड भूमिका त्यांनी साकार केली. हवा विरळ होत जाताना एकदम ऑक्सिजन मिळावा तसा 'पाठलाग' च्या यशाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गुदमारणाऱ्या डॉक्टारांना दिलासा मिळाला. पंरतु आधीच्या तीनही चित्रपटांनी डॉक्टरांच्याबद्दल मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मनात संदेह निर्माण केला होता. त्या वेळी माधवराव शिंदे (निर्मात-दिग्दर्शक) चंद्रकांत काकोडकर यांच्या पान नं. - 40 'वंदना' ह्या कौटुंबिक कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याच्या तयारीमध्ये होते. दोन भावाची कथा. पण सगळा चित्रपट मोठया वहिनीवर केद्रिंत होता. ती भूमिका आत्ती करत होती. मोठे भाऊ चंद्रकांत होते तर धाकटया भावाच्या भूमिकेसाठी डॉक्टरांची निवड केली गेली होती, पण आधीच्या तीनही चित्रपटांच्या अपयशाने माधवराव शिंदे डॉक्टरांना बदलण्याचा विचार करीत होते. दुसऱ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आत्ती जेव्हा कोल्हापूरला गेली होती तेव्हा तिला हा बदल समजला. तिने माधवराव शिंदे यांना स्वखर्चाने पुण्याला 'पाठलाग' चित्रपट पाहायला पाठविले. आणि तो चित्रपट पाहून मगच तुमचा निर्णय बदला असे आग्रहाने सांगितले. पुण्यामध्येही 'पाठलाग' तुडुंब गर्दीत सुरू होता. चित्रपट पाहून माधवराव शिंदे यांनी डॉक्टारांची निवड कायम केली. 'पाठलाग' चित्रपटाने सर्वच द्दष्टीने चेत्यन्य आणले. त्या चित्रपटाचगृहामध्ये कधी मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते तिथेही मुंबईत 'पाठलाग' झळकला.य दादा 'पाठलाग' चित्रपटाचा फिल्मचा डबा घेऊन मिश्किलपण हसत पुढे धावताहेत आणि प्रेक्षक त्यांचा पाठलाग करताहेत असे एक व्यांगचित्र बाळा ~ साहेब ठाकरे यांनी काढून दिले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतही 'पाठलाग' ची जोरदार हवा पोहोचली. अभिनेते दिलीपकुमारचे सेक्रेटरी प्रेमजी यांनी हिंदी चित्रपटासाठी पाठलागचे अधिकार खरेदी केले. पाठलाग हिंदीमध्ये निर्माण होतो आहे असं ऐकल्यावर इतर प्रांतीय भाषीय निर्मातेही दादांना भाटू लागले. दक्षिणेतील मातब्बर दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांनी तामीळ, तेलगू इ. भाषांतील हक्कांसाठी दादांची भेट घेतली. त्यावेळी त्याच्या एका हिंदी चित्रपटासाठी त्यांना एका नवोदित मराठी कलावंताची आवश्यकता होता. प्रसाद यांनी एखादे नाव सुचविण्यास दादांना सांगितले. भूमिका प्रमुख आणि चांगली होता. कथा आणि भूमिकेचे स्वरूप ऐकून दादांनी प्रसादना विचारले, 'या भूमिकेसाठी तुम्ही काशिनाथला का घेत नाही ?' प्रसादना ती सूचना पसंत पडली. डॉक्टरांचा एक इंटरव्ह्यू घेऊन प्रसाद यांनी तीन चित्रपटांसाठी डॉक्टरांना करारबद्ध केले. मराठी वृत्तपत्रांनी, सिनेनियतकालिकांनी ठळक शब्दांमध्ये ही बातमी प्रसिद्ध केली. चित्रपट होता दादी-माँ. पान नं. 41 18 'दादी-माँ' च्या प्रत्यक्ष चित्रीकरणाला अजून अवधी होता. त्या दरम्यान 'लक्ष्मी आली घरा' चे कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओमध्ये शूटिंग झाले. मला वाटतं सुरुवातीचे 3-4 दिवसांचे शूटिंग झालं असेल नसेल. एक दिवशी रात्री उशीराच डॉक्टर घरी आले. कोल्हापूरमध्ये आमचे स्वत:चे घर असूनही आत्ती पूर्वापासून माईंच्या घरीत राहायची. त्यात कधीही खंड पडला नाही. डॉक्टर हातात एक टेलिग्राम घेऊन आले होते. तो मुंबईहून डॉक्टरांच्या बंधूंनी-शामराव यांनी-पाठविला होता. इरावतीबाईंना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. कारण 'नेहमीचेच' होते. काळजी करण्यासारखे नव्हते. पण डॉक्टर नंतर रागवायला नकोत म्हणून ती तार पाठविली होती. डॉक्टर ती तार आत्तीला दाखवून विचारीत होते. ""काय करू ?"" त्यांना मुंबईला जायचे असावे. पण शूटिंगही नुकतेच सुरु झाले होते. आत्तीने त्यांना सांगितले की -- ""आता तुम्ही कसलीही काळजी करू नका. कसलाही विचार न करता आधी मुंबई गाठा. माधवराव शिंदे यांना काय सांगायचे ते मी त्यांना उद्या सांगेन. चित्रपट सुरू झाला आहे. हे काही शेवटचे शूटिंग नाही. हे कारण ऐकल्यावर माधवराव नक्की सर्व ऑडजेस्ट करतील ."" भांबावलेल्या डॉक्टरांना दिलासा मिळाल्यासारखा वाटला. डॉक्टरांनी येताना आणलेल्या सायकलीला वेग दिला आणि क्षणात नाहीसे झाले. वेगाने जाणाऱ्या डॉक्टरांच्याकडे कौतुकाने पाहात आत्ती माईंना म्हणाली---- ""पुण्यामध्ये राहिलेल्या मुलांना सालकलीवर किती सहज बसता येतं नाही ?"" थोडयाश्या विश्रांतीने इरावतीबाई पूर्ववत हिंडू लागल्या . डॉक्टरही शूटिगमध्ये गंतले. मराठी चित्रपट साधारणपण महिन्याला दहा दिवस शूटिंग करून चार महिन्यात पूर्ण केला जातो. 'लक्ष्मी आली घरा' चे शूटिंग त्याच पद्धतीने पार पडले. कॉलेज सुरू होईपर्यंत मलाही 2-3 महिने आत्तीबरोबर पान नं. - 42 ह्या शूटिंगसाठी कोल्हापूरला जाता आले. मला स्वत:ला मराठी चित्रपटांच्या शूटिगसाठी जायला आवडे.कारण सर्व वातावरण घरगुती वाटे. सगळी माणसं आपली वाटत. हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला मी क्वचितच जायची. अगदी माझ्या आवडत्या दिलीपकुमारचे शूटिंगही मी कधी मुद्दाम जाऊन पाहिले नाही, इतके तिथले वातावरण परके वाटे. माधव शिंदे यांच्या सुरेल चित्राच्या युनिटने तर मला अगदी जन्मापासून पाहिले होते. त्यामुळे तर तिथे कसलीच औपचारिकता नव्हती. या चित्रपटात आत्ती व डॉक्टर यांच्याशिवाय चंद्रकांत मांढरे, शरद तळवळकर, इंदिरा चिटणीस, रत्ना, उमा ही कलावंत मंडळी होती. डॉक्टरांची व शरद तळवळकरांची 1954 पासूनची ओळख. त्यामूळे शूटिंग खूपच खेळीमेळीत चाले. गंभीर प्रकृतीचे चंद्रकांत मांढरेही आमच्या हसण्या-खेळण्यात भाग घेत. माधवराव शिंदे हेही तसे अबोलच. पण त्यांचे सहाय्यक माधवराव भोईटे हे त्यांचे व स्वत:चे असे दोघांचेही बोलण्याचे काम करीत. अभिनेत्री इंदिरा चिटणीस सुंदर कोकणी बोलत. त्यांना कोकणी बोलताना ऐकून डॉक्टरही त्यांच्याबरोबर सफाईदारपणे कोकणी बोलत. आत्तीला ते संभाषण ऐकायला खूप आवडे. ती त्या दोघांना नेहमी कोकणीमध्ये बोला असा आग्रह करायची. डॉक्टरांचे कोकणी बोलणे ऐकून तर आश्चर्याने आ वासला होता. मला प्रश्न पडायचा डॉक्टरांना भाषा तरी किती येतात ? कारण एकदा मी त्यांना आमच्या घरून फोनवर कुणाशी तरी छानपेकी गुजराथी बोलताना ऐकले होते. मला त्या वेळी आणि आजही प्रश्न पडतो की, डॉक्टराना इतके चांगले गुजराथी येऊनही नाटकांतून कसे काम केले नाही ? वेळेचा अभाव हे कारण मला एकदा डॉक्टरांना सांगितले होते आणि ते खरेही होते. आणखी कारण म्हणजे गुजराथी नाटकं शनिवार-रविवार असायची. आणि मराठी नाटकांच्या द्दष्टीने तेच दिवस महत्वाचे असायचे. डॉक्टरांचे इंग्रजी उत्तम होते. आता दादी-मां साठी तर ते अगदी शिक्षक ठेवून हिंदी-उर्दू भाषेचा अभ्यास करीत होते. मी परभाषा शिकण्यात फारच कच्ची होते. त्यामुळे तर डॉक्टरांचे बहुभाषिकत्वाचे मला फारच अप्रुप वाटायचे. पान नं. - 43 19 शूटिंगच्या व्यतिरिक्त डॉक्टर व मी जास्त करून बाबांच्या सहवासात अधिक असायचे. बाबाचे विचार आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहायचे. बाबा खूप वेळेला अध्यात्म, ईश्वराचे स्वरूप अशासारख्या विषयावर बोलायचे . डॉक्टर अधून मधून प्रश्न तरी विचारायचे. पण मला तेही धाडस व्हायचे नाही. काही वेळेला काही गोष्टींचा अर्थही कळायचा नाही. पण बाबांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटायचे. एस्. एस्. सी होईपर्यंत मला बाबांची खूप भीतीही वाटायची. बाबांना स्टुडि ~ ओत भेटायला गेले तरी कधी एकदा त्यांना नमस्कार करते आणि बाहेर पडते असे व्हायचे. एकदा मला वाटतं मी आत्तीचे काही जुने फोटो आणण्यासाठी जयप्रभा स्टुडिओमध्ये गेले होते. तर नेमके बाबा समोर आले. माझी ओळख सांगून मी नमस्कार करून उभी राहिले. तर बाबांनी कशासाठी आलीस असे विचारले. सारे बळ एकवटून आत्तीचे फोटो न्यायला आल्याचे सांगताच आत्ती म्हणजे कोण याचा बाबांना अर्थबोध होईना. तर आत्ती म्हणजे माझी आई एवढं सांगण्याचं सुद्धा त्या वेळी मला सुचेना. तिथे जवळच उभ्या असलेल्या लताबाई मंगेशकर माझ्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी बाबांना सांगितले ,""अहो बाबा, सुलोचनाबाईंना ती आत्ती म्हणते."" आणि एकदाची त्या समर प्रसंगातून माझी सुटका झाली. नंतर माझे जयप्रभा स्टुडिओमध्ये जाणेही वाढले. त्यामुळे बाबांना भेटण्याचे प्रसंगही वाढले. बाबांना माझ्या सर्व हावभावात, हसण्यात, बोलण्यात, अगदी पाहण्यात सुद्धा माझ्या वडिलांचा भास व्हायचा , बाबा व माझे वडील अगदी जानी दोस्त होते. त्यामुळे मला पाहताच त्यांना आपल्या मित्राची आठवण होऊन ते खूपच अस्वस्थ व्हायचे. 1956 साली माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले आठ वर्षांच्या वियोगानंतर कांचनच्या रूपानेच आबासाहेब चव्हाण (माझ्या वडिलांचे नाव) आपल्याला भेटताता असे बाबांना वाटे. स्वत:च्या मुलींच्यापेक्षाही जास्त प्रेम बाबांनी माझ्यावर केले. त्यांनी मला स्वत:ची धर्म ~ कन्या मानली आहे. बाबा निव्वळ देव , देश, धर्म, अध्यात्म यावर बोलत नसत. विविध विषय पान नं. - 44 त्याच्या बोलण्यात येत. त्यामध्ये मनोरंजक बोधपर कथा असत, संस्कृतचे ते चांगेल जाणकार आहेत. संस्कृतमधील उतारेच्या उतारे त्यांना मुखोद््गत आहेत. शिवाय मराठीत ते अर्थासहित स्पष्ट करण्याची हातोटीही त्यांच्याजवळ आहे. तितकेच इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. शेक्सपीयर, चार्ली चाप्लीन हे त्यांचे लाडके विषय आहेत. डॉक्टरांना तर हे सर्व विषय म्हणजे पर्वणीच असे. जुन्या मराठी नाटकांचेही ते साक्षीदार होते. गणपतराव जोशींना तर त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले होते. डॉक्टर तर गणपतराव जोशींना अभिनयातील 'आद्य देवत ' मानीत. त्यामुळे बाबांच्याकडून गणपतराव जोशींच्या आठवणी , त्यांचे आवाज लावणे, अभिनय याबाबतीत ऐकताना डॉक्टर अगदी जीवाचा कान करून ऐकायचे. अनेक प्रश्न त्यासंबधी बाबांना डॉक्टर विचारायचे. शंका निरसन करून घ्यायचे. तसे डॉक्चर फार चिकित्सक . अगदी साखरेची साल काढणारे म्हणा ना. सहसा त्यांचे समाधान व्हायचे नाही. समोरच्या माणसाला प्रश्न-उपप्रश्न विचारून ते हेराण करायचे. फक्त बाबांच्या बाबतीत मी पाहिले आहे की त्यांनी बाबांनी सांगितलेले पटायचे. तर्कशुद्ध वाटायचे. क्वचित कधी तरी डॉक्टरांनी बाबांचा एखादा मुद्दा खोडून काढला असेल. अगदी वेद्यकशास्त्रावरीलही बाबांची मते डॉक्टर ग्राह्य धरायचे. एरवी वेद्यकशास्त्रावर दुसऱ्या कुणी त्यांच्याशी संबंधीत नसणाऱ्या व्यक्तीने काही बोलणे केले तर डॉक्टरांना अजिबात खपायचे नाही. ""तू डॉक्टर की मी ? तुला त्यातलं काय समजतंय ? "" असे ते समोरच्या माणसाला फटकारीत. परंतु बाबांच्या बाबतीत डॉक्टरांचे सर्व नियम शिथिल होत. स्वत: बाबाही एखाद्या गोष्टीचे पूर्ण झान असल्याशिवाय किंवा माहिती असल्याशिवाय कधीही बोलायचे नाहीत. स्वत:च्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन करायचे नाहीत; आणि कुठलीही गोष्ट, कितीही अवघड असली तरी ती जास्तीत जास्त सोपी करून सांगण्याची विलक्षण हातोटी बाबांच्याजवळ आहे. बाबा डॉक्टरांनाही मनापासून सांगायेच---""काशिनाथ, तू सुविद्य आहेस. तुझा डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळ, आणि तुझ्या दर्जाला योग्य अशाच भूमिका स्वीकार. मिळेल ती भूमिका स्वीकारून जीवनाचा सिनेमा करू नकोस. तुला उत्तम अभिनयकला अवगत आहे. तिचा जपून वापर कर."" डॉक्टर बाबांना अगदी स्वत:च्या वडिलांसारखा मान द्यायचे. एरवी कुणा ~ पान नं. - 45 समोरही सिगारेट ओढणारे डॉक्टर बाबांना कळेल म्हणून चोरून सिगारेट ओढायचे. काही वेळेला स्टुडिओच्या आवारात मला टेहळणीवर उभी करून, एखाद्या आडोशाला जाऊन सिगारेटचे झुरके मारायचे. कारण दिवसभरात कुठ~ ल्याही वेळी बाबा सबंध स्टुडिओला चक्कर मारायचे. त्यांचे पायही मोकळे व्हायचे. आणि स्टुडिओची शिस्तही राखली जायची. त्यामुळेच सिगारेट ओढण्या ~ साठी डॉक्टरांना वेगवेगळ्या जागा शोधायला लागायच्या. डॉक्टर सकाळी आल्याबरोबर प्रथम येऊन बाबांना वाकून नमस्कार करीत. लागलीच शॉट असला तर मकेअपला जात. पण नसेल बाबांच्याजवळ बसून श्रवणभक्ती करीत. त्यापूर्वी मात्र सेटवर जाऊन दिग्दर्शकाला स्वत: आल्याची वर्दी द्यायला ते विसरत नसत. संध्याकाळी हॉटेलवर जाताना अथवा नाटकाला जायचे असेल तर पुन्हा एकदा नमस्काराचा कार्यक्रम होई. (काही चाणाक्ष नाटय ~ निर्माते डॉक्टर कोल्हापूरला शूटिंगला जाणार असले की, त्या भागातील नाटकाचा दौरा आखीत ) यात कधीही खंड पडला नाही. एकदा बाबांच्या ऑफिसमध्ये चौकात आत्ती, मी व बाबा बोलत उभे होतो. नेहमीप्रमाणे डॉक्टर घाईघाईने आले. बाबांना वाकून नमस्कार केला, आणि मेकअपला जातो असे सांगून वाऱ्यासारखे निघूनही गेले. ते गेलेल्या दिशेला पाहात बाबा म्हणाले, ""अनेक धान्याची सरमिसळ असावी तसा हा आहेय यात धान्य आहे, कडधान्य आहे आणि खडेही आहेत. कुणी ते वेगवेगळे करून स्वच्छ करील का ?"" मी मनातल्या मनात म्हणाले , हे शक्य झाले तर बाबा तुम्हालाच होईल. 20 जुलेमध्ये माझे कॉलेज सुरू झाले आणि माझ्या कोल्हापूरच्या फेऱ्या कमी झाल्या. पण माझी डॉक्टरांचीविषयीची ओढ वाढतच होती. त्यांच्यामध्ये मन अधि ~ काधिक गुंतत चालले होते. माझ्यासारखे डॉक्टरांना माझ्याबद्दल वाटत नाही हेही मला पूर्ण माहीत होते. पण माझे मन मला आवरत नव्हते. माझ्याजवळ पान नं. - 46 असलेला संयम इथे मात्र अपुरा पडत होता. मी अनेक वेळा माझ्या मनाला दरडवायची, तुझ्यामध्ये असे काय आहे म्हणून डॉक्टरांना तुझ्याकडे आकर्षित व्हावे ? अशी माझी मीच निर्भर्त्सना करू घ्यायची. 'पण प्रथम तुज पाहता जीव वेडावला' अशी माझी अवस्था झालेली होती. डॉक्टर आपले कधीही होऊ शकणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री होती. कारण डॉक्चर व इरावतीबाईंच्या संसारात मूल सोडता कसली उणील आहे असे कल्पनेतही वाटत नव्हते. मग डॉक्टर आपल्या आयुष्यात येतील ही नुसती इच्छा करणेही वेडेपणाचे होते. पण कळून-सवरून तो वेडेपणा मी करत होते. त्याची फार जबर किंमत मोजावी लागेल याचीही कल्पना होती. पण मन आता माघार घ्यायला तयार नव्हते. इतकंच काय दुसऱ्या कुणाशी विवाह ही कल्पनाही मला रुचत नव्हती. डॉक्टरशिवाय इतर कुणाशी विवाह करायचा नाही हे मी पक्के ठरवूनही टाकले होते. डॉक्टरांच्या शिवाय प्रियकर, पती म्हणून दुसऱ्या कुणाचा विचार मी आता करूच शकत नव्हते. माझा डॉक्टरांचीविषयीचा ध्यास अखंडपणे जागृत होता. डॉक्टरांच्या शिवाय आता दुसरे काही मला सुचत नव्हते. आभ्यासामध्येही लक्ष लागायचे नाही. वास्तविक पाहता ते माझे इंटरचे वर्ष होते. म्हणजे शिक्ष ~ णाच्या द्दष्टीने महत्वाचे वर्ष होते. पण तिकडेही माझे दुर्लक्ष होत चालले होते. ही जरी माझी परिस्थिती असली तरी कधी एका शब्दाने अथवा कृतीनेही मी माझे डॉक्टरांविषयीचे प्रेम डॉक्टरांच्याजवल व्यक्त केले नव्हते. नव्हे ते डॉक्टरां~ समोर प्रकट होऊ नये, त्यांना कसली पुसच कल्पनाही येऊ नये याचा मी आटोकाट प्रयत्न करायची. कारण डॉक्टरांच्याकडून अपेक्षाभंग, हेटाळणी व्हावी हे मी सहन करू शकले नसते. त्यापेक्षा माझे प्रेम अबोध , अबोल राहणेच मला मान्य होते. आगाऊ, आगंतुकपण न वाटेल अशा पद्धतीने मी डॉक्टरांच्यावर प्रेम करीत राहिले. त्यांच्यसाठी आपल्याला काही करता आले तर करत राहायचे एवढेच माझ्या प्रेमाचे प्रकट स्वरूप राहिले. डॉक्टर काही बाबतीत माझे ऐकू लागले. कांचन मुलीपेक्षा वेगळी आहे एवढीच जाणीव तरी नक्कीच त्यांना झाली असावी. ------------------------------------------------------ पान नं. - 188 81 तारूचे लग्न आटपले. त्याची आवराआवर आणि युरोप प्रवासाटी तयारी अशी दोन्ही कामं सुरू होती. आत्ती आणि डॉक्टर नेहमीसारखे कमाता. त्यातच पासपोर्ट,रिझर्व्ह बॅकेची परवानगी,व्हिसा,इंजेक्शन्स अशा परदेश प्रवासाला लागणाऱ्या गोष्टींची लगनीघाई उडाली. रिझर्व्ह बँकेचे काम तर निव्वळ डॉक्टर होते, म्हणूनच होऊ शकले, नाही तर जायलाच मिळाले नसते. पहिला परदेशीचा प्रवास आणि तोही डॉक्टारांच्या बरोबर, मी भलतीच खुशीत होते. त्यातच डॉक्टरांनी मला मनस्ताप देणारी बातमी दिली. मागे एकदा उल्लेख केलेल्या डॉक्टरांच्या `सखीला' दिवस गेले होते. ती ते मूल जन्माला घालू इच्छीत होती. तेही स्वतःच्या जबाबदारीवर. डॉक्टरांची आठवण म्हणून तिला ते मूल हवे होते. हे ऐकून प्रथम तर मी वेतागलेच. त्या विवाहित स्त्रीचा तर मला संतापच यायचा. पुरूष जर बाहेरख्यालीपणा करतो तर स्त्रीने का करून नये या बाबतीत स्त्री -स्वातंत्र्य पुरस्कर्ते म्हणण्याची शक्यता आहे. मला वादात पडायचे नाही. पण माझी स्वतःची मते ( या बाबतीत) अगदी सत्यवान-सावित्रीच्या काळातील आहेत. विवाहित स्त्रीची पतीशी असणारी एकनिष्ठता माझ्या दृष्टीने अग्रक्रम देणारी गोष्ट आहे. पटतच नसेल तर विभक्त होणे योग्य आहे. पण एकाच वेळी एखादी स्त्री दुहेरी निष्ठा ठेवू शकते, हे आजही माझ्या दृष्टीने कोडेच आहे. ह्या पार्श्वभूमीवर मला तीव्रतेने आठवण झाली. ती डॉक्टरांच्या जीवनात येऊन गेलेल्या दुसऱ्या एका विवाहित सखीची. आकर्षणाच्या पहिल्या आवेगात ती डॉक्टरांशी वागून गेली. पण ज्या वेळेला तिला आपला पती,संसार,विवाहिता म्हणून आपला समाजात असलेला दर्जा आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले तर होणारी मानहानी या सर्वांचे भान आले तेव्हा रपुढे अधिक न वाहवण्याचा तिने खंबीर निर्णय घेतला. डॉक्टरही तिच्यामध्ये गुंतलेले होते. पण त्या स्त्रीने हा गुंता पूर्णपणे तोडून टाकूनच व्यवस्थितपणे सोडविला. तिने आपले विचार व्यक्त करणारे एकच सुरेख पत्र डॉक्टरांना लिहून समजावले,आणि ती कायमची दूर झाली. आजही त्या स्त्रीबद्दल मला मनस्वी आदर आहे. पान नं. 189 डॉक्टरांच्या ह्याही विवाहित सखीबद्दल वाटणारी चीड मी मनातून दूर सारली. शिवाय मी मनस्ताप करून घेण्याचे काहीच कारण नव्हते. ती विवाहित स्त्री चांगली तिशी उलटलेली होती. पूर्ण समजदार होती. तिचे हित-अहित तिला चांगले कळत असेलच की ! शिवाय ह्या असल्या प्रकतरणात मी डॉक्टरांना स्पष्टच सांगून टाकले होती की, तुमचे तुम्ही काय वाटेल ते करा मात्र भावनिक गुंत- वणूक कुणात नसावी. एवढे पथ्य पाळा म्हणजे झाले. तेव्हा हाही विषय मी डोक्यातून काढून टाकला, आणि प्रवासाच्या तयारीत गुंतले. 23 जून रोजी दुपारी 1 वाजताचे आमचे विमान होते. सकाळी अकरा वाजताच आम्ही विमानतळावर पोहोचलो. मराठी कलावंत स्वखर्चाने परदेशी निघाले होते याचे सर्वानाच कोण कौतुक होते. एकजात साऱ्या वृत्तपत्रांनी याची नोंद घेतली होती. आप्टेष्ट,व्यावसायिक, स्नेही यांची विमानतळावर एकच गर्दी उडाली होती. श्रीकांत मोघेंच्या मते विमानतळावर एस.टी स्टँडचे स्वरूप आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे आणि ललिता पवार ह्याही येऊन सर्वांना आशीर्वाद देऊन गेल्या. जी जी पुरूषमंडळी आमच्याबरोबर होती त्यांच्या पत्नी आत्तीला येऊन सांगायच्या की, ""दिदी, आमच्या ह्यांना सांभाळा."" आत्ती ही प्रत्येकीला ""वहिनी, काळजी करू नका."" असे आश्वासन देत होती. चारू- काकांच्या पत्नी तर रडून रडून लालाबुंद झाल्या होत्या. फक्त इरावतीबाई तटस्थ होत्या. त्यांनी एकाही शब्दाने आत्तीला किंवा मला, डॉक्टरांच्याबद्दल काहीही सांगितले नाही. मला राहून राहून सारखे वाटत होते की, डॉक्टरांचे जाणे इरावती- बाईंना पसंत नसावे. कादिचित ते तसे नसेलही. डयक्टरही त्यासंबंधी काही बोलले नव्हते. पण इरावतीबाईंचे गप्प राहणे माझी शंका बळकट करीत होते. कस्टममध्ये जाण्याची घोषणा होताच आम्ही सर्वांना निरोप घेऊन आत गेलो. काचेच्या पलीकडे आपेष्ट मंडळी अजून रेंगावळी होती. पुन्हा एकदा सर्वांना पाहावे. म्हणून डॉक्टरांनी मागे वळून पाहिले तर त्यांना ती विवाहित `सखी' दिसली. डॉक्टर तिला स्तंत्रपणे हातही उचलून दाखवू शकले नाहीत. पण माझ्याजवळ चुकचुकत म्हणाले मात्र,""बिचारी ती आली होती."" डॉक्टरांच्या दंडाला धरून त्यांचे तोंड कस्टम ऑफिसरकडे करत मी म्हणाले- ""चला आता. निदान परदेशात तरी थंड राहा."" म्हणजे लिहिण्याच्या आधी इंद्र दरबार बघायला हवा होता . ! पण तशी सोय नव्हती ! तिसरा अंक गौतमऋषीच्या हिमालयातल्या आश्रमात . त्यासाठी हिमालय पाह्यला हवा . म्हणून याने मित्रांबरोबर पुढच्या उन्हाळ्याच्या सुटीत काश्मीरला जायचा बेत केला . पण पेसे ? याने एकदोन शिकवण्या धरल्या . टॉस्टेव्हिननीही याला मुद्दाम बोलावून एक शिकवणी मिळवून दिली . नॉर्मल स्कूलच्या सुपरिटेंडेड मिस् होम्स या गोऱ्या मडमेची . याने त्यांना मराठी शिकवायचे . अशा रीतीने याच्या मराठी इंग्रजी भाषांतराच्या कसबाला टॉस्टेव्हिननी हे सर्टिफिकिट देऊन टाकले . ! * * * * टॉस्टेव्हिनची याच्यावर मर्जी बसलेली दिसत होती . कुठेही दिसला की जवळ बोलावित . विचारपूस करीत . दोन चार थट्टेची वाक्ये बोसून पुढे जात . त्यांच्या बरोबरची कुत्री याच्या अंगावर उडया मारीत . वर्गातही ते याची विशेष दखल घेताना दिसत . त्यांचे शिकवणे हसत खेळत . एरवी स्वभाव करडा . पण वर्गात वागणे खेळीमेळीचे , आणि निःपक्षपाताचे . बोलणे चतुर . बुध्दिमान विनोदाचे . हा आपल्या हजरजबाबांनी त्यांच्यावर एखाद्या वेळी कडी करून जाई . हळूहळू हा त्यांच्या मनात भरत गेला . याचीही त्यांच्यावर भक्ती जडली . टॉल्टेव्हिनची मर्जी म्हणजे सरकारी नोकरीची शाश्वती . त्यांची प्रांताच्या गव्हर्नरपर्यंत वट त्यांची शिफारस म्हणजे उमेदवार मुलाच्या योग्यतेची , राजनिष्ठेची हमी . पण त्यांची मर्जी टिकवायची तर अभ्यासात तसेच खेळातही प्राविण्य हवे . हा हॉकी खेळायचा . अंगाने सडपातळ . धावण्यात चपळ . चेंडू उलटसुलट स्टिकने खेळवीत दोनतीन गडी सहज पार करून जाई . याची कॉलेजच्या संघात वर्णी लागली . एका वर्षी ऐन चॅम्पिअनशिप मॅच चालू असता याला एका विचाराचा झटका आला . आपण तर सगळे सोडले होते . मग इथे कसे ! लगेच याचा खेळ पार बिघडला . मॅच हातची गेली . तरी कप्तान मोहियुद्दीनने याला हट्टाने पुढच्या वर्षी पुन्हा कॉलेजच्या संघात खेळवले . याने आदल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढला . कॉलेजला जय मिळवून दिला . पण लवकरच मोहियुद्दीनसारख्या मुसलमान मुलांच्या सौहार्दाला तडे जायला सुरवात झाली . इतकेच नव्हे तर टॉस्टेव्हिननीही याच्यावर मेहेरनजर ठेवणारे दोन्ही डोळे मिटून घेतले . क्रोधाचा अंगार उधळणारा तिसरा डोळा वटारला ! 1921 साली महात्मा गांधीनी स्वराज्याची प्रचंड चळवळ सुरू केली होती . हे 28 - 29 साल . अजूनही त्या चळवळीच्या लहानमोठया लाटा देशभर खळाळत होत्या . गांधी , नेहरू पितापुत्र , चित्तरंजन दास , सुभाषचंद्र बोस यांची नावे सगळीकडे दुमदुमत होती . मुलांना साहजिकच या थोर पुढाऱ्यांचे आकर्षण फार . कॉलेजच्या गॅदरिंगसारख्या सबारंभांना या माणसांना बोलावण्याची हौस . पान नं . 38 साम्राज्यावादी इंग्रज प्रिन्सिपॉलसाहेबांना तर या नावांच्या उच्चाराने उलटी होणार ! पण उघडपणे नाही म्हणता येईना . बोस काही गुन्हेगार नव्हते . मुलांनी त्यांना बोलवायचे ठरवले . हाही त्यात होता . मग हळूहळू प्रिन्सिपॉलसाहेबांच्या मर्जीतल्या प्रोफेसरांनी हळू आवाजात मोडता घालायला सुरवात केली . हा इतर मुलांबरोबर त्यांच्याशी सुभाषबाबूंसाठी हिरिरीने वाद घाली . टॉल्टेव्हिन शासनकुशलही होते . त्यांचे कान आणि डोळे मर्जीतल्या मुलांच्या , प्रोफेसरांच्या मार्फत चौफेर फिरत . पण ते स्वतः उघडपणे पुढे येऊन सुभाषबाबूंना नाही म्हणेनात . मुले निकरावर आली . प्रोफेसरांच्या धमक्यांना बधेनात . मग एकाएकी दोनअडीचशे मुलांच्या त्या कॉलेजातली पाचपन्नास मुसलमान मुले एकत्र आली . म्हणू लागली , "" आम्ही गॅदरिंगमधे वंदे मातरम् म्हणू देणार नाही . त्यामुळे आमच्या भावना दुखावतात ! "" दोन्ही गट हट्टाला पेटले . मुलांचे तट पडले . एक म्हणे , "" नाही आली मुसलमान मुलं तर नाही सही . आम्ही सुभाषबाबूंना बोलावणार . ` वंदे मातरम् ' म्हणणार ! "" आता प्रिन्सिपॉलसाहेब साळसूदपणे म्हणू लागले , "" पाहिजे त्याला बोलवा . पण गॅदरिंग सगळ्या मुलांचं हवं . त्यासाठी आधी हे वंदे मातरम््चं भांडण मिटवा . फ्कत हिंदू मुलांचं गॅदरिंग मी होऊ देणार नाही "" हिंदू आणि मुसलमान हे साहेबाच्या हातातले चकमक झाडायचे दगड . आग लावायची झाली की नुसते एकमेकांवर घासायचे ! उमरावतीला एकच हायस्कूल होते . तोवर सगळे व्यवस्थित होते . पुढे तिथे निजामांनी मुसलमानांसाठी निराळे हायस्कूल बांधले . हिंदू आणि मुसलमान मुलांच्या हॉकीच्या स्पर्धा व्हायच्या . प्रत्येक सामान्याच्या वेळी पाचदहा खेंळाडूंची हिंदू - मुसलमान मुले वर्दळीवर येऊ लागली . सगळ्या कॉलेजची हवा तंग झाली . सगळीकडे चुगल्या , चहाडया , संशय आणि भीती . यालाही जोर चढला . हा सारखा आपल्या मुसलमान स्नेह्यांबरोबर वाद घाली . टॉस्टेव्हिननी याच्याशी बोलणे बंद केले . वर्गातही याच्याकडे बघेनासे झाले त्यांच्या कुत्र्यांनीही याची दखल घेणे सोडून दिले ! योगायोग असेल पण मिस होम्सनी याची शिकवणी थांबविली . आपण प्रिन्सपॉलच्या मर्जीतून पार उतरलो हे याला उघड दिसले . तरी हा आणि गॅदरिंग कमिटिची मुले माघार घेईनात शेवटी टॉस्टेव्हिननी रूद्रावतार धारण केला . ठेवणीतली अधिकाराची अस्त्रे बाहेर काढली . मुले घाबरली . सुभाषबाबू आले नाहीत . हे याचे कॉलेजचे शेवटचे वर्ष . मुले हिरमुसलेली . हाही खिन्न . आता इथे राहणे याला दुःसह झाले . पण बी . ए . ची परीक्षा झाल्याशिवाय इथून सुटका नव्हती . पान नं . 39 एवढयात कॉलेजच्या स्टाफ कौन्सिलच्या सभेत , अर्थशास्त्राचे प्रोफेसर नानावटी यांनी ठराव आणला . या मुलाला परीक्षेसाठी फॉर्म देऊ नये . ! गेल्या दोन वर्षांत , कॉलेजच्या कुठल्याही परीक्षेत हा अर्थशास्त्र या विषयात पास झालेला नाही ! म्हणजे आता खुद्द टॉस्टेव्हिननीच मनावर घेतले , तरच हा यातून निभावणार . पण ते तर याच्यावर संतापून बसलेले . याचे धाबे दणाणून गेले . अखेर कौन्सिलने ठरवले याला पॉर्म द्यायचा . म्हणजे टॉस्टेव्हिनच्या मनात अजूनही आपल्याविषयी हितबुध्दी आहे ! हा कृतज्ञतेने त्याचे आभार मानायला गेला ते म्हणाले , "" तुला फॉर्म देतो आहे याचे कारण , नाही दिला तर नियमाप्रमाणे पुढच्या वर्षी इथं प्रवेश द्यावा लागेल . ते मला नको आहे . नापास होऊन पुन्हा इथं येशील तेव्हा मी तुला सांगेन , तुला इथं जागा नाही . वाटलं तर खाजगी रीतीनं परीक्षेला बसू शकतोस ! "" हे डिसेंबरचे शेवटचे दिवस . फब्रुवारीअखेर युनिव्हर्सिटिची परीक्षा . याने तत्त्वज्ञान , इंग्रजी या विषयांची पुस्तके गुंडाळून ठेवली . सारखा अर्थशास्त्राचा धौशा . आताही याला आधी दोन वर्षात कळले होते त्यापेक्षा जास्त काही त्या विषयात कळले आहे असे वाटले नाही . मात्र त्याने परीक्षेच्या पेपरात , थोडयाशा गणिताच्या ज्ञानावर जागजागी अर्थशास्त्रातल्या सिध्दान्तांच्या खुलांशाचे आणि उदाहरणांचे ग्राफस् ( आलेख ) काढून ठेवले . अर्थशास्त्राचा एक पेपर प्रोफेसर नानावटी यांच्येकडेच तपासायला होता . त्यांनी याला मुद्दाम गाठून विचारले , "" माझ्या पेपरात तुला फर्स्ट क्लासच्या वर मार्क मिळाले आहेत . ते कसे ? आणि दोन वर्ष मला असं फसवायचं कारण काय ? "" तेव्हापासून याची खात्री आहे अर्थशास्त्र हे एक भोंगळ आणि बिनभरवशाचे शास्त्र आहे . ! यानंतर कॉलेजच्या उरलेल्या दिवसांत टॉस्टेव्हिन याच्याशी एकदाच बोलले हा बी . ए . च्या परीक्षेत वर आला . आणि याला कॉलेजची फेलोशिप मिळाली तेव्हा त्यानी याला बोलावून सांगितले , "" माझा नाईलाज झाला म्हणून ही फेलोशिप तुला मिळते आहे . फेलोशिपचे नियमच असे आहेत की तुला ती देण्याखेरीज गत्यंतर उरले नव्हते ! "" टॉस्टेव्हिनच्या या उघड रागाने हा विषण्ण होऊन गेला . तरीही याच्या मनात आशा शिल्लक होतीच . केव्हा तरी यांचा आपल्यावरचा राग निवळेल . पुन्हा यांचा आधार मिळेल . पण एम . ए आणि कायद्याच्या अभ्यासासाठी हा नागपूरला गेला . काही महिन्यांतच टॉस्टेव्हिनच्या सांगण्यावरून गुप्त पोलिसांचे अधिकारी याच्या मागे लागले . ! पान नं . 40 गांधीची चळवळ पुन्हा जोरात आली होती . या जुलमी इंग्रजी राजवटीचा निषेध करा . शाळा सोडा , वकिली सोडा , सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारा , असे गांधी रोज गर्जत होते . आणि एक दिवस मुंबईच्या एका लोकप्रिय इंग्रजी देनिकात उमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजचे प्रिन्सिपॉल एफ . पी . टॉस्टेव्हिन यांची सही असलेला त्यांच्या सरकारी नोकरीचा राजिनामा ठळकपणे पहिल्या पानावर प्रसिध्द झाला ! राजिनाम्यात लिहिले होते : "" या राजवटीने चालविलेले अन्याय आणि जुलूम माझ्याने सहन होत नाहीत . म्हणून मी राजिनामा देत आहे . "" सगळ्या मध्यप्रांतात खळबळ उडून गेली . तिथे एकदंर सरकारी कॉलेजे तीन . तिन्ही ठिकाणचे प्रिन्सिपॉल अस्सल रक्ताचे इंग्रज . सगळ्यांचे गव्हर्नरपाशी स्नेहाचे संबंध . नोकरीमध्ये त्यांचा दर्जा अतयुच्च श्रेणाची . नागपूरच्या कॉलेजच्या एका प्रिन्सिपॉलच्या मडमेच्या रिव्हॉल्व्हरची गोळी लागून कॉलेजचा भंगी मेला तेव्हा बाई फक्त काही दिवस इंग्लंडला जाऊन राहिल्या . यापेक्षा अधिक काही त्यांना सोसावे लागले नाही . असे या अधिकाऱ्यांना सरकारी संरक्षण त्यातला एक अधिकारी इंग्रज सरकारचा निषेध म्हणून राजिनामा देतो . आणि तोसुध्दा मुंबईच्या वर्तमानपत्रात ? देशभर लागोलग बातमी पसरेल अशी सोय करून ! साहजिकच सरकारची झोप उडाली . टॉस्टेव्हिन त्यावेळी सुटीसाठी इंग्लंडला गेले होते . त्यांच्याकडून लगेच खुलासा आला . बातमी साफ खोटी आहे . मग हे कारस्थान कुणाचे याचा शोध करणे आलेच ! आपल्याकडे गुप्त पोलीस आले याचा याला हबकाच बसला . याचे एक कारण म्हणजे टॉस्टेव्हिननी याचे नाव संशयितांच्या यादीत दिले होते . अधिकारी म्हणाला , "" साहेबांनी सांगितले हा मुलगा असे करीलसे मला अजूनही वाटत नाही . पण मला आता त्याचा भरवंसा राहिलेला नाही . "" अधिकाऱ्यांनी खोदखोदून चौकशी केली . अनेक वेळा अनेक तऱ्हेचा मजकूर त्यात टॉस्टेव्हिनच्या नावातली लहान मोठी इंग्रजी अक्षरे निरनिराळ्या रीतीने घालून याच्याकडून लिहवून घेतला . राजिनाम्याचे पत्र कॉलेजच्या अधिकृत शिक्क्याच्या कागदावर होते . तसा एखादा कागद सापडतो का हे बघण्यासाठी याचे सामान उसकटले . मग याचे हस्ताक्षर राजिनाम्यातल्या सहीच्या अक्षरांबरोबर कितपत जुळते ते बघण्यासाठी सरकारी हस्ताक्षरतज्ञांकडे पाठवून दिले . टॉस्टेव्हिनच्या या वागण्याचे याला खूप वाईट वाटले . रागही आला . त्यांना भेटण्यासाठी हा मुद्दाम उमरावतीला गेला . त्यांनी भेट घेण्याचे जवळजवळ नाकारलेच . बराच वेळ तिष्ठत ठेवले . अखेर भेट झाली तेव्हा याने म्हटले , "" सर मी चुका केल्या असतील . माझं वागणं तुम्हाला पसंत नसेल . पण मी तुमचा असा द्रोह करीन असं तुम्हाला वाटलं तरी कसं ? "" टॉस्टेव्हिन नुसते याच्यावर संतापाची नजर रोखून बघत होते . याला त्याचे पान नं . 41 भानच नव्हते . डोक्यावर स्वतःच्याच भावनांचा विचार . हा उत्तेजित होऊन बोलून गेला , "" माझ्यावर असा आरोप करताना . मला काय वाटेल याचा तरी विचार करायचा होतात ! "" आता त्यांच्या रागाचा एकदम उद्रेक झाला . ते गरजले , "" मूर्खा , तुम्हाला काय वाटेल याचा विचार करण्यासाठी आम्ही इथं या देशात आलेलो नाही . तुमच्यावर राज्य करण्यासाठी इथं आलो आहो . समजलास ? "" हा एकदम स्तंभित झाला . आपले गुरू आपल्या तोंडावर तू माझा शिष्य नाहीस गुलाम आहेस असे सांगताहेत यावर याचा विश्वासच बसेना . याला एक शब्दही सुचेना . पुढे अनेक दिवस टॉस्टेव्हनचे हे उद्गार याचे मन जाळीत राहिले . का नाही आपण त्यांना त्याच वेळी काही उत्तर दिले ? आपण निर्भीड आहो , सडेतोड आहो , तशीच वेळ आली तर कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याइतके निडर आहो अशी आपली ऐट होती . मग कुठून आला इतका भ्याडपणा ? या प्रश्नाचे उत्तर पुढे दहा वर्षांनी हा इंग्लंडला गेला तेव्हा याला मिळाले ! याला फेलोशिप मिळाली . त्यामुळे याचे आणि याच्या घराचे नुकसानच झाले . असे मला वाटते . घरून पेसे मागवावे लागले असते तर घरच्या परिस्थितीची याला वारंवार आठवण झाली असती . घरच्या माणसांनी ती दिली असती . आणि हा जास्त जागरूक राहिला असता . आता हा उमरावतीला येई . पाहुण्यासारखा राही . तेवढयापुरता मनाशी म्हणे . आपल्याला या घराचे , आपल्या माणसांचे , आपले शक्य तितक्या लवकर भले करायचे आहे ! माणसांच्या अशी ननुसत्या वाटण्यात आणि हातून ते प्रत्यक्ष घडण्यात जे भयकंर अंतर बहुधा पडते तीच माणसांच्या नात्यातली खरी शोकांतिका असते हे याच्या कधी लक्षातच आले नाही . आईची बग्गीत बसायची हौस पुरवायची , असे याचे मन वारंवार म्हणत आले . पण पुढे याच्याजवळ गाडी आल्यावरसुध्दा मुद्दाम उमरावतीला जाऊन तिला आणून गाडीत बसवायची याने इतकी दिरंगाई केली की ती निघूनही गेली ! वडिलांच्यावर हा मनाने थोडा रूष्ट . तरी त्यांच्या कष्टाचे चीज आपल्या हातून व्हावे असे याला वाटे . पण आयुष्यात कधी याच्याकडून त्यांना पेशाचा हातभार लागला नाही . तेही इतके मानी की पुढे याच्या घरी येऊन राहिले तेव्हा स्वतःच्या श्मश्रूचे चारसहा आणेसुध्दा हट्टाने स्वःत देत ! पण हा घरी असे तेव्हा याचे वागणे घरातलाच एक असे दिसे . वागण्यात गरिबीची लाज वाटत असल्याचे किंचितही दिसत नसे . वेळ आली तर दळणाचा डबा खांद्यावर घेऊन हा गिरणीवर जाई . मात्र त्यात एखादे पुस्तक घालून नेई . तिथेच वाचीत बसे . याच्या बायकोचे पान नं . 42 एकदा लहानसे ऑपरेशन करावे लागले . त्यासाठी तिला ठेवावे लागले घरापासून दीड मेल असलेल्या डफरिन इस्पितळात . ते गरिबांसाठी असलेले म्युनिसिपालिटीचे इस्पितळ . उन्हाळ्यात प्यायच्या पाण्याची तिथे मारामार . हा घरून भरलेली घागर खांद्यावर घेऊन निघे . गावच्या भर रस्त्यातून ती वाहून नेई . एखादा श्रीमंत मित्र रसत्यात भेटला तर बोलण्यासाठी मनसोक्त थांबे . साहजिकच तिला बिचारीला वाटले असणार , याचे आपल्यावर खरेच प्रेम आहे ! हा कधी तिला टाकून रागावून , तुसडेपणानेसुध्दा बोलला नाही . त्यामुळे तिची ही समजूत बळावली असणार . पण हा त्या घरात मनाने नेहमीच पाहुणा होता . गबूदादाच्या मामी म्हणत , "" बाबूचं वागणं म्हणजे केवळ दृष्टीची माया आणि पात्रीची भक ! एकदा त्यानं पाठ फिरवली की दोन्ही बाबतीत हात धुवून मोकळा ! "" पण अशी पाठ फिरवणे ही याला सुटका वाटे . सुटका कशापासून ? घरापासून की बायकोपासून ? हेही याला त्यावेळी स्पष्टपणे कळत नसे . किंबहुना आपण सुटका शोधतो आहो हेहीयाच्या बरीच वर्षे लक्षात आले नाही . एल्एल् . बी च्या टर्म्स याने भरल्या . परीक्षेपूर्वीचे सातआठ महिने काढायचे होते . त्यावेळी योगायोगाने हा उज्जयिनिला गेला . एक दिवसासाठी . पण तिथे राहिला आठ महिने ! तेव्हा याच्या ध्यानात आले . आपण घरी राहू शकलो असतो . पण ते टळावे म्हणून आपण इथे राहत आहोत ! त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत हा मुंबईला गेला . तिथल्या एफ्लिन्स्टन कॉलेजात याचे उमरावतीचे काही मित्र होते . तिथून परत येताना नेहमीचा मार्ग नको म्हणून याने नागदा , इंदूर , भोपाळ , भुसावळ असा रस्ता धरला . मध्येच कालिदासाची उज्जयिनी लागली . तिथे आज उतरू , गाव बघू आणि उद्या जाऊ म्हणून याने बाडबिस्तरा उतरवला . एत धर्मशाळा गाठली . सकाळी गाव बघायचे म्हणून हा निघाला . उज्जयिनी गावाबाहेरची ती माधोनगरची वस्ती . रहदारी अगदी तुरळक . कोवळे ऊन . बाजूच्या कुरणातून एक तरूण मुलगी जात होती . तलम शुभ्र मलमलीचा वेष . वाऱ्यावर भुरभुरणारे केस . बरोबर दोन पांढरीशुभ्र कुलुंगी कुत्री . तिघेही बागडत असलेली . काही वेळाने ती मुलगी रस्त्यावर आली . आता रूपही देखणेपणाने मुसमुसलेले दिसले . याला मोह झाला हिला विचारावे महाकाळेश्वराचे मंदिर , क्षिप्रा नदी कुणीकडे ? पण मुलीचा चेहरा इतका शांत , सोज्वळ आणि स्वतःशीच मग्न असलेला दिसला की याला विचारण्याचे धाष्टर्य झाले नाही . शिवाय तिची सोबतीची कुत्री एकदम ताठ झाली , याच्याकडे रोखून बघत राहिली हेही एक कारण होतेच ! त्या मुलीचे नाव नलिनी तर्खड हे पुढे तिथे राहिल्यावर याला कळले . उज्जयिनिच्या विनोद मिल्समधल्या घनचक्कर माणसांना काही काळ स्वतःवर पान नं . 43 स्वारी करू देते , धुंदी चढेपर्यंत त्यांना हवेत गरगर फिरवते आणि शेवटी अनेकांना जमिनिवर आपटते . नलिनिबाई तर्खड अशी अभ्यांपेकी ठरल्या . नलिनीबाईना त्या दिवशी याने असे बघितले . आणि त्यांचे जीवन सिनेमाच्या जगात सुकून जातानाही पाहिले . प्रभात फिल्म कंपनीच्या ` अमृतमंथन ' चित्रपटात त्या पहिल्याने चमकल्या . लवकरच रूपेरी पडद्यावरची नवी तारका म्हणून भारतीय कीर्ती पावल्या . त्यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या एका भागीदाराशी लग्न केले आणि काही काळ त्या कंपनीच्या एक मालकीण म्हणून वावरल्या . त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा प्रभातमध्येच ` लाखाराणी ' बोलपटाचे दिग्दर्शन करीत होता . पंचवीस तीस पायऱ्या असलेले सेंटिग . त्यावर एक महाद्वार होते . तिथे नायिका बसली होती . याने तिला सांगितले , "" तयार व्हा . शॉट घ्यायचाय ! "" तयार व्हायचे म्हणजे दागिने घालायचे , जोडे चढवायचे , चेहऱ्याची रंगरंगोटी ताजी करायची . कलेच्या आणि कीर्तीच्या बाबतीत अजून अर्धीकच्ची असलेली ती नायिका उठली . आणि तिने हाक मारली , "" आया , हमको सजाव . "" मग त्या सेटच्या पंचवीस पायऱ्या चढत , एका हातात सजावटीची पेटी आणि दुसऱ्या हातात नाजूक मखमली जोडे घेऊन एक स्त्री वर आली . त्या नलिनीबाई तर्खड ! त्यांच्या अगतिक अवस्थेला आधार म्हणून ` प्रभात ' ने त्यांना मेकअपच्या खात्यात नोकरी दिली होती ! याच्या डोळ्यांपुढे ती उज्जयिनितली सकाळ तरळली . हा सुन्न होऊन गेला . पण त्या सकाळी उज्जयिनित या दोघांचीही भविष्ये दिवसाच्या उजेडाआड दडलेली होती . त्या दिवशी ही दोघे हळूहळू दोन दिशांनी आपापल्या भवितव्याकडे चालत गेली . याचे भविष्य पुढच्या पन्नास पावलांतच एक लहानसा वळसा घेणार होते . चहा घ्यायला हवा म्हणून हा हॉटेल शोधू लागला . समोरच एक शाळा होती . हम रस्त्याच्या दोन्ही बाजूला चुन्याविटांची इमारत . विस्तीर्ण , पण एक मजली दोनतीनशे मुले . इथे कुठेतरी हॉटेल असणार म्हणून हा घुटमळला . व्हरांडयात खांबाला टेकून एक गृहस्थ उभे होते . मध्यम वय . लांबट सावळा चेहरा . बंद गळ्याचा लांब कोट . अंगावर उपरणे . नेसू धोतर आणि पायात पंपशू . त्यांनी याला आत बोलाविले . चहा सांगितला . कोण , कुठले , किती राहणार , शिक्षण इत्यादी चौकशी केली आणि चहा झाल्यावर म्हटले , "" एक मेहेरबानी करू शकाल ? "" "" काय करायचे ? "" "" आमच्या इंटर आर्टस््च्या इंग्रजीच्या अध्यापकांना काल अचानक गावी जावे लागले . तुम्ही जर आता तासभर त्यांचा वर्ग घेतलात तर मुलांचा वेळ कारणी लागेल . "" हा ` हो ' म्हणाला . नेमलेले पुस्तक घेऊन निघाला . सगळ्या व्हरांडयाला पान नं . 44 वळसा घालायचा . मग शेवटची खोली याच्या वर्गाची . मुलांचा थोडा गोगांट चालू होता . हा थबकला . पाचपन्नास मुलांपुढे उभे राह्यचे ? मुले अनोळखी . पर प्रांतातली . आपण विद्यार्थी असताना काही प्रोफेसरांची कशी भंबेरी उडवीत होतो ते याला आठवले . त्यात आपला हा प्रवासातला मळका देशी पोषाख . आधीचे इंग्रजीचे प्रोफेसर सुटाबुटात असणार . तो रूबाब , ही घोंगडीची टोपी , धोतर , वहाणा यांच्या अंगी कसा येणार ? वर्गात पोचला . मुलांना कल्पना नव्हती . त्यांच्यासमोर नवा चेहरा , नवा शिक्षक . गावढया पोषाखातला . हा इंग्रजी शिकवणार ? त्यातून शेक्सपिअर ? मुले एकदम बोलायची थांबली . याच्याकडे बघू लागली . तरूण चेहरे . वर माना करून मुकाट बघणारे . कुतूहल , उत्कंठा थोडा मिस्किलपणा यांनी भरलेले . याने बोलायला सुरवात केली . देशी पोषाखातून उमटलेली ती विलायती वाणी ऐकताच मुले चकित झाली असावी . त्यांची नजर खडळली . शिकवित होता ते नाटक याने कॉलेजात असताना वाचलेले होते . याच्या ते आवडीचे होते . हा बोलत होता . मुले ऐकत होती , बघत होती . त्यांचे वर केलेले चेहरे , स्वातीच्या पावसाच्या थेंबाची वाट पाहत असलेल्या शिंपल्यांसारखे ! याला वाटू लागले . मुलांची मने हात लांब करून आपले बोट धरू पाहताहेत . चला , आम्ही येतो बरोबर म्हणताहेत ! याला वाटून गेले , शिक्षकाचा पेशा काही माणसांना जन्मभर गुंतवून ठेवतो तो असल्या अनुभवामुळे तर नसेल ? तासाची घंटा झाल्यावर हा थोडा भानावर आला . मघाचे गृहस्थ वर्गात शेवटच्या बाकावर बसले होते असे याला दिसले . याने पुस्तक परत करीत म्हटले , "" बरं आहे . छान गेला वेळ येतो आता "" पण त्यांनी याला ऑफिसात नेले . म्हटले , नाही तरी तुम्ही सात आठ महिने कुठं तरी काढणाराच ना ? मग इथंच राहा ना . आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू . मागच्या अध्यापकांना देत होतो तोच पगार तुम्हाला देऊ . "" याच्या मनात विचार आला ; ` नाही म्हणून तरी कुठं जायचं ? उमरावतीला ? घरी ? याने ` हो ' म्हटले . आणि लगेच मुलांनी याचे धर्मशाळेतले सामान आणून बोर्डिंगातल्या एका खोलीत टाकले . त्या खोलीत उभे राहून याने इकडे तिकडे बघितले . आणि याला लहानपणा - पासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले . आपली स्वतःची स्वतंत्र खोली ! आतून बंद केली की निवांत खाजगीपणा . लिहा , वाचा , स्वतःशी बोला , हसा . . . , हवा तो वेडेपणा करा ! कुणाची नजर नाही . कुणाचे भय नाही . आता नाटक लिहियचे झाले तर उमरावतीच्या रामाच्या देवळातल्या माडीवरच्या , थोडीशी धूळ भरलेल्या खिडकीत किंवा तिथल्या जिन्याच्या सांदीत अवघडून बसायला नको . कुणी मित्र आला तर त्याला गबूच्या माडीवर घेऊन पान नं . 45 जायला नको ! याला म्हणतात स्वातंत्र . शरीराचे . मनाचे ! इथे राह्यचा निर्णय याने स्वतः घेतला होता . आयुष्यात मागेही आणि पुढेही हा मित्रांच्या सांगण्याने , गरजेने , लोभाने वाहवत गेला . पण इथे राहिला केवळ स्वतः ठरवून आणि तेही सुखाचे , सुरळीत ठरलेले दिसत होते . शाळेचे मुख्य होते बॅनर्जी मास्तर . मुख्य म्हणजे मुख्याध्यापक नव्हेत . संचालक - मालक शांतर मृदू स्वभावाचे . अगदी मितभाषी . कुठल्याही वर्गावर शिकवीत नसत पण सगळीकडे त्यांची नजर असे . सगळी मुले त्यांना मनापासून मानीत . बॅनर्जीना म्हणायचे ` मास्तर महाशय ' . म्हणजे उच्चार करताना ` मास्तर मोशाय ' संध्याकाळी खेळण्याच्या मेदानावर मास्टर मोशाय फिरत . मुले खेळताहेत , व्यायाम घेताहेत हे बघत . खेळाडूंना बक्षिसे देत . निरनिराळ्या प्रांतातली मुले जमलेले . हॉकी उत्तम खेळत . परदेशात , परप्रांतात संध्याकाळ येते ती असीम एकटेपणा घेऊन . पण इथे हॉकीच्या खेळात मुलांबरोबर धावण्याहुंदडण्यात याचा वेळ केव्हाच निघून जाई . जेवण मारवाडी खाणावळीत . पंक्तीच्या बरबर मागे सांडपाण्याची नाली वहायची . पण जेवण चांगले . मुख्य म्हणजे पंक्तीला मुले . पाहता पाहता हा उज्जयिनित रंगला . उमरावती विसरला . पण फार दिवस हे टिकले नाही . कुठून आपण या विचित्र शाळेच्या गौडबंगालात अडकलो असे याला होऊन गेले . कॉलेजात इंटर आर्टस््चा वर्ग होता . पण इंटर आर्टस््च्या पहिल्या वर्षाचा नव्हता ! मुले यायची ती एकदम इंटरच्या दुसऱ्या वर्गात दाखल व्हायची ! आणि सगळी बाहेरच्या निरनिराळ्या कॉलेजांतून प्रिव्हिअसमध्ये नापास झालेली मुले मॅट्रिकच्या वर्गावर हा गेला . तिथली मुले पाचवी सहावी नापास झालेली . पण यंदा मॅट्रिकला बसणारी ! बाहेरच्या शिक्षणसंस्थांतून परीक्षेत नापास म्हणून शिक्षणात जखमी , जायबंदी झालेली मुले इथे यायची . कायद्याप्रमाणे अयोग्य असलेले उपचार करून घ्यायची . बरी होऊन पास होऊन वरच्या वर्गात पुन्हा आपापल्या कॉलेजात जायची ! तिथले प्रोफेसर , प्रिन्सिपॉल साहजिकच बुचकळ्यात पडत . ती शाळा नव्हती . शिक्षणाचे हॉस्पिटल होते ! आणि तिचा विस्तार सबंध देशभर . मद्रासपासून पंजाबपर्यंत , मुंबईपासून बंगालपर्यंत ! मुले आपापल्या प्रांतात घरी राहून अभ्यास करायची . पण परीक्षेला फॉर्म भरायची ती या शाळेमार्फत . परीक्षेला लाहोर बनारसला जायची , ती शाळेने तेवढ्यापुरत्या मिळवलेल्या स्पेशल रेल्वेगाडयांनी ! कसा कुणास ठाऊक पण मुलगा कुठूनही येवो तो परीक्षेचा फॉर्म भरताना ग्वाल्हेर संस्थानचा रहिवासी ठरे ! एकदा हा हॉकी खेळून परतत होता . मास्टर मोशाय व्हरांडयात सचिंत बसले होते . समोर एक मुलगा खाली मान घालून उभा होता . त्याला मास्टर मोशाय म्हणत होते , "" अरे , माझ्या गळ्याला किती दिवस तात लावशील ? "" याने विचारले , "" क्या हुआ मास्टरसाब ? "" त्यांनी शांतपणे उत्तर दिले , "" अहो दोन पान नं . 46 वर्षापूर्वी इथे आला . इंग्रजी चवथी नापास होऊन . मॅट्रिकला बसवा म्हणून . याचंही बरोबर आहे . चवथी फेल यापेक्षा मॅट्रिक फेल हे क्वालिफिकेशन नोकरीच्या दृष्टीनं अर्थातच मोठं . याला इथला रहिवासी ठरवून मॅट्रिकला बसवलं . हा नापास झाला . आता म्हणतो पुन्हा बसवा . एखाद्या वेळी सगळं बेंड फुटलं म्हणजे ? "" ऐकून हा एकदम हादरून गेला . किती भयकंर फसवणुकीच्या कारस्थानात आपण अडकलो आहो असे याला होऊन गेले . त्या रात्री झोप नाही . तोपर्यंतचे याचे जग युनिव्हर्सिटीचे कायदेकानू , नियम , प्रोफेसरांचे अधिकार , शिस्त यांनी भरलेले होते . नीती म्हणून हा जी मानीत होता त्याच्याशी ते सगळे सुसंगत होते . बी . ए . च्या परीक्षेचा फॉर्म मिळत नाही हे कळल्याबरोबर याचे जगच कोसळले होते . पण इथे याला दिसले , डझनभर प्रिन्सिपॉलांनी डझनभर फॉर्म नाकारले असते , तरीही तो इथून परीक्षेला जाऊन डिग्री मिळवून बसला असता ! म्हणजे सरकारी कायदेकानू , सामाजिक वर्तनाचे नियम निराळे आणि सनातन मावनी अंतःप्रवृत्तीने पुनीत केलेली नीतीमूल्ये अजिबात निराळी ? ही दोन्ही व्यवहारात एक राहत नाहीत ही गोष्ट वेगळी . ती एक असावीत की नाही हा प्रश्न आहे . मन शांत , निवांत करते , त्याची भूक भागविते , ती मानवी संस्कृतीची नीती . देहाची सुखसोयी संभाळते ती परिस्थिती - प्रणीत नीती . हल्लीचे सिच्युएशनल एथिक्स . आपण काय पत्करायचे ? रात्रभर विचारांची तगमग चालू होती . बाहेर व्हरांडयात बिछाना होता . दूर कुठे तरी मारवाडी बायका गाणी गात होत्या . त्या गाण्यातली व्यथा याला अधिकच असहाय्य करून गेली . सगळीकडे असंख्य टिटव्यांचा टिवटिवाट ऐकू येई . हा उठून बसला . ठरवले . इथून जायचे . गेलेच पाहिजे . आपण सरळ वागत आलो . सगळे कायदेकानू , नीतीनियम पाळीत आलो . आपल्याला हे करायचे नाही . दुसऱ्या दिवशी थोडे अडखळत याने बॅनर्जीना म्हटले , "" मास्टर मोशाय , हे जे आपण इथं करतो आहो हे सगळं बरोबर आहे असं तुम्हाला नेहमी वाटतं . ? "" त्यांनी उत्तर दिले , "" हे बघा , मी बरीच वर्ष मास्तर होतो . याच ग्वाल्हेर संस्थानाच्या शिक्षणखात्यात . मुलं अपयशी होतात ती नेहमीच केवळ अभ्यास न केल्यामुळे नव्हे . परीक्षेच्या वेळी त्यांच्या डोक्यात तुफानं उठतात . बारा महिने कष्ट करायचे आणि पेपराच्या तीन तासांत तारेवर चालण्याची कसरत करायची ! पाय चुकला की कपाळमोक्ष ! मुलगा नापास झाला तर नुसतं एकच वर्ष फुकट जातं असे नाही . पुष्कळदा त्याचं आयुष्यच पार बदलतं . फुकट जातं . तुमच्यसारखे भाग्यवान थोडे . अगदी सरळ जाऊन वरच्या डिग्य्रा घेणारे ! "" * * * * आपण भाग्यवान ? अगदी सरळ जाणारे ? वागणारे ? याची इंटरसायन्सची पान नं . 47 परीक्षा होती . युनिव्हर्सिटिची . त्या वर्षी याने अगदी अभ्यास केला होता . सगळ्यात कठीण विषय म्हणजे गणित . त्यातही कठीण स्टॅटिक्स अँड डायनॅमिक्स . सगळ्या मुलांना त्या पेपरचा धसका . नीट जमले तर मार्काचे घबाड हाती . नाही तर करवंटी ! हा त्या पेपरला बसला . हॉलमध्ये पेपर वाटले जात होते . ते पाहता पाहता याचे मन धडधडत होते . आपण अभ्यास केला आहे . पण त्यातले पेपरात काही नसले तर ? यंदाही नापास झालो तर ओटोपलेच सगळे ! शेवटी प्रश्नपत्रिका हातात पडली . वाचता वाचता हा चकित होत गेला . आठ प्रश्न , त्यावर उदाहरणे . प्रत्येक उदाहरण याने पूर्वी दहा वेळा सोडविले होते . सगळ्या प्रश्नांची उत्तरे डोक्यात तयार आहेत . पण हे असे कसे झाले ? आणि हे खरे आहे ? हर्षाने याच्या धमन्या उडू लागल्या . सगळे रक्त मेंदूकडे धावत सुटले . त्या असीम उत्तेजनेने बसल्या जागी याचा वीर्यपात झाला ! काही सुचेना . याने एक उत्तर सुरू केले . त्रिकोण काढला . त्याच्या कोनांना नावे दिली A B C . मग लिहियला सुरवात केली . AB ही बाजू अधिक BC ही बाजू म्हणजे . याने पुन्हा त्रिकोण बघितला . तो याच्या डोक्यात निराळेच उत्तर ! हा लिहित बोता त्या निराळ्याच बाजू ! त्यांचा काढलेल्या त्रिकोणाच्या आकृतीशी काही मेळ नव्हता . पुन्हा पुन्हा याने लिहून बघितले . पण काही सुधरेना . डोक्यात असायचे B , कागदावर उतरायचे C आणि आकृतीत ते अक्षर असायचे A ! हा अगदी गांगरून गेला . शेवटी निकरावर आला . याने समोरच्या मुलाला हळूच म्हटले , "" ए , जरा तुझा पेपर मला दिसेल असा धर "" त्या बिचाऱ्याने याची ती सोय केली . आता हा अक्षरन् अक्षर त्याच्या पेपरात बघून लिहू लागला . ! अगदी हुबेहूब दिसेलतेच . तसेच . त्याची CA बाजू तरयाचीही तीच . स्वतःच्या विचाराने नव्हेच . अजून तो करताच येत नव्हता . ! पर्यवेक्षकांची नजर गेली . ते घाईने जवळ आले . रागावले , "" काय चाललं आहे हे ? खबरदार असं करशील तर ! "" आणि पुढे गेले . पण हा थांबला नाही . प्रश्न अर्धा लिहून झाला होता . याची उतावीळ वाढली होती . कसेही करून एक बरोबर उत्तर लवकर संपले पाहिजे . मग डोके ताब्यात येईल . आपले आपल्याला पुढचे सुचेल . याने उघडपणे थोडे उठून , ओणवे होऊन , पुढचा पेपर बघून आपला लिहायला सुरवात केली ! आता मात्र पर्यवेक्षक संतापले , "" तुला परीक्षेतून बाद व्हायचं आहे वाटतं ? आता थआंबला नाहीस तर हॉलच्या बाहेर घालवीन . पुढची चार वर्षे शिक्षणातून बाद होशील ! "" यानेही कडेलोटासाठी उब्या केलेल्या माणसासारखे निर्वाणीने उत्तर दिले , "" सर , या पेपरमधला प्रत्येक प्रश्न मला येतो आहे . म्हणून मी हर्षानं पार गोंधळून गेलो आहे . माझा स्वतःवरचा ताबाच सुटला आहे . पान नं . 48 "" तुम्हाला ठाऊक आहे मी वर्षभर अभ्यास केला आहे . इतक्या उपरही तुम्ही घालवून देत असाल तर मी निघतो . "" पर्यवेक्षक अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ख्यात . आजूबाजूची मुले या दोघांकडे बघत होती . पर्यवेक्षकांनी याच्या खांद्याला स्पर्श केला आणि म्हटले , "" एकच प्रश्न लिहायचा असा . संपल्याबरोबर मला सांग . पुढे मात्र असा चावटपणा चालायचा नाही . "" आणि गेले . याने तो प्रश्न नीट लिहून संपविला . त्याबरोबर याच्या डोक्यातले रक्त एकदम उतरले . याने पुढचा सबंध पेपर सुरळीत लिहिला . चांगले मार्क मिळवले . आणि इंटरसायन्स पास झाला . पिढयामागून पिढया हे किंवा असलेच काही तरी चालले आहे . पुढे बऱ्याच वर्षांनी याचा मुलगा पेपर कसा गेला हे मुलाला विचारायला हा परीक्षाकेंद्राकडे निघाला . तो रस्त्यात खाली मान घालून आपला मुलगा घराकडे परत येतो आहे ! याने त्याला विचारले , "" अरे , दुसरा पेपर आहे ना ? "" "" आहे ना . पण मला परीक्षेला बसायचं नाही . "" त्याने उत्तर दिले . "" म्हणजे ? पहिला पेपर फार वाईट गेला ? "" "" मुळीच नाही . फार छान गेला . "" "" अरे मग . . . "" हा बुचकळ्यात पडला . त्यावर मुलाने चिडून म्हटले , "" हे काय हो काका ? तुम्ही आईनं वर्षभर माझ्याकडून अभ्यास करून घेतलात . मी परीक्षेत वर यावं म्हणून . आज पहिल्या पेपरच्या आधी तो पाटील भेटला . त्यानं एक कागद दाखवला . म्हणाला ` हे आठ प्रश्न येणार ' त्यातले आठही प्रश्न पेपरात आले . जसेच्या तसे ! मी वर्षभर अभ्यास केला . त्यानं वर्षबर उनाडक्या केल्या . पण आता त्याला आणि मला मार्क मिळणार सारखेच ! ही कसली कसोटी ? मी आता आयुष्यात कुठल्याच परीक्षेला बसणार नाही ! त्या मुलाची दुसऱ्या पेपरसाठी उरलेल्या थोडया वेळात समजूत काढता काढता याची दमछाक होऊन गेली . शेवटी मोठया नाखुषीने तो परत फिरला आणि परीक्षेला बसून पास झाला . . . . ` तीन तासातली तारेवरची कसरत ! चुकून पाय घसरला की सर्वनाश ! ' याने मास्टर मोशायना सांगितले , "" मी राहतो . "" * * * * आता हा त्या शाळेत रमून गेला . त्यातच एक दिवस याला हरी मोटेचे पत्र आले . "" उज्जयिनीला येतो आहे . बॅनर्जीनच्या शाळेमार्फत अजमेर बोर्डाच्या इंटरच्या परीक्षेला बसायचे आहे . "" पान नं . 49 छान ! म्हणजे हरी आता याच्या वर्गात बसणार आणि हा त्याच्या पुढे खुर्चीवर बसून वर्गात वाङ्मयावर व्याख्याने देणार ! पण खुर्ची आणि बाक सोडले तर दोघांमधल्या या नात्यात नवीन काही नव्हते . हायस्कूलच्या दिवसांपासून दोघांनाही वाङ्मयाची आवड . जवळ जवळ वेडच . पण या वेडात श्रमविभाग होता . याने वाचायचे , बोलायचे . हरीच्या सुस्त , दमेकरी स्वभावाला ऐकत बसणे आवडे . उमरावतीला असताना हा कधी कधी घरातले जळण चक्कीवर नेई . हरीची ओळख झाल्यावर याने गावातल्या गिरण्या सोडल्या आणि मोटयांच्या आवारातल्या चक्कीवर दळण नेणे सुरू केले . तिथे गेला की हरीचे नोकर याचे जळण उचलून नेत . हा त्यातली पुस्तके काढून घेई . आणि हरीच्या माडीवर वाचीत बसे . पुष्कळदा त्या पुस्तकाबद्दल दळण दुसऱ्या दिवशी घरी नेई आणि आईची बोलणी खाई ! हरीला दम्याचा विकार . त्यामुळे अभ्यासाच्या कष्टांचा बुध्दीवर फारसा बोजा पडलेला नसे . आंधळ्याचे कान तीक्ष्ण होतात , तशी पुस्तकी ज्ञानाच्या ओझ्यातून मुक्त राहिलेल्या त्याच्या बुध्दीला व्यवहाराची समज याच्यापेक्षा पुष्कळ जास्त . एखाद्या वेळी हा हरीला विचारी , "" काहीही बोललं तरी लोक माझ्यावर चिडतात असं का ? "" हरी संथपणे उत्तर द्यायचा , "" तू नेहमी इतकं मनापासून बोलतोस त्याचा हा परिणाम . इतकं मनातलं बोलून नीट जगता येत नाही . "" पुढे सिनेमातल्या बेकारीच्या दिवसांत एकदा हा त्याला म्हणाला , "" आता पाहीन पाहीन नाही तर स्वतःशीच फिल्म कंपनी काढीन ! "" पुन्हा हरी शांतच नुसते म्हणाला , "" ते करू नकोस "" याला राग आला . म्हणाला , "" तुला काय वाटतं मला फिल्म कंपनी काढता यायची नाही ? "" त्याने उत्तर दिले , "" तसं नाही . पण फिल्म कंपनी काढणं सोपं . ती बंद करता येणं फार कठीण ! "" याने ` ब्रम्हकुमारी ' नाटक लिहिले , तेव्हा दोघांच्या बोलण्याला नवाच विषय मिळाला . पहिला अंक तयार झाला . तो हरीला फार आवडला . त्याने याला कौतुकाने जळगावजामोदला नेले . तेथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राहात असत . त्यांनी याच्या नाटयरचेनेची आणि भाषेची फार प्रशंसा केली . तेव्हा हरी याच्यापेक्षाही जास्त खुशालून गेला . आणि स्वतः पुढचे अनेक दिवस एका हरभऱ्याच्या झाडावर अगदी उंच जागी जाऊन बसला ! मग संधी मिळेल तिथे याने आपले नाटक दाखवायला सुरवात केली . त्यावेळी गाजत असलेल्या काही मोठया लेखकांना याने गाठले . एकदोघांनी बरे म्हटले . पण लेखी भलामण करण्याचे नाकारले . त्यातले जे विशेष प्रसिध्द होते त्यांनी याला , पुढे याने स्वतः काही तरूण लेखकांना जसे वागविले तसे , तुसडेपणाने आणि उपेक्षेने वागविले . . . मग याने आयुष्यभर त्या लेखकांना फारसे मोजले नाही . या मोठया लेखकांत अपवाद ठरला तो नरसिंह चिंतामण केळकरांचा . त्यांचा दरारा मोठा . वाङ्मयात आणि पान नं . 50 राजकारणातही . त्यांच्यामागे अक्षरशः अनंत कामे . पण तेवढ्यातही वेळ काढून त्यांनी याची भेट घेतली , याचे नाटक लक्षपूर्वक वाचले आणि अनुकूल अभिप्रायही दिला . नाटकाविषयी अशा गेष्टी हा रंगवून सांगे . हरी त्या ऐकत बसे . पण आता त्याने स्वतःच एक नवा विषय बोलण्यासाठी मिळवला होता . तो कृष्णाबाई खरे यांचा . हा उमरावतीला असतानाच कृष्णाबाई मोटयांच्या आवारात राहायला आल्या होत्या . साहजिकच हरीच्या बरोबरच याचीही त्यांच्याशी ओळख झाली . त्यांनी याने नाटकही वाचले . तिघांनाही वाङ्मयाची आवड . त्यामुळे बोलायला विषय पुष्कळ . घराभोवती आवार मोठे आणि मोकळे . एक लहान टेनिसकोर्टही होते . बहुधा रोज संध्याकाळी हरी , हा , शेषराव इतर दोघे तिथे टेनिस खेळत . बाजूच्या मोठया विहिरीच्या पारावर गप्पा मारीत बसत . लवकरच याच्या कृष्णाबाईच्या ओळखीला स्नेहाचे स्वरूप आले . त्यांच्या हरीशी वाढत गेलेल्या मेत्रीमुळे याला या स्नेहाचे अप्रूप वाटू लागले . शक्य झाले तोवर पुढेही याने हा स्नेह कसोशीने जपला . लवकरच हरीच्या आणि कृष्णाबाईच्या मेत्रीचे प्रीतीत रूपांतर झाले . ही बातमी याला सांगण्यासाठी हरी मुद्दाम नागपूरला आला . हरीला अनेक वेळा याने आजारी , असहाय्य बघितले होते . त्यामुळे आता त्याला आलेला हुरूप आणि त्याला जन्माची सुसंस्कृत साथसोबत मिळण्याचा संभव याचा यालाही फार आनंद झाला . या आनंदात यांचा थोडासा स्वार्थी विचारही होता . गबूदादाच्या घरात नवी , अनोळखी वहिनी आली होती . त्यामुळे त्याच्या घराचा आधार अर्धामुर्धा झाला आहे असे याला वाटे . इथे तर काय आपला दोघांशीही स्नेह . म्हणजे आपल्याला विसाव्यासाठी एक घर जन्माचे मिळणार ! . . . पण हरी उज्जयिनीला आला तो आपला उफाळलेला दमा घेऊनच . त्याची अवस्था बघवत नव्हती . दमा उसळे तेव्हा बघणारेसुध्दा हवालदील होऊन जात . त्याची स्वतःची अवस्था हरीच जाणे ! रात्र रात्र मांडी घालून बसे . मांडीवर उशी . त्यावर दोन्हा हातात धरलेले डोके . आणि घशात घरघर . इतकी भयानक की ऐकणाराला वाटावे सकाळ उजाडणारच नाही ! ! अनेक औषधे झाली . आता काश्मीरहूनं एका वेद्याकडून एक नवी बुटी घेऊन आला होता . धाप लागली की गुडगुडीमधे बुटी ठेवायची आमि गुडगुडीसाठी निखारे लागत . याने गुडगुडीचे मातीचे तोंड उचलावे , फर्लांगावरच्या शेखदारांच्या हॉटेलात जावे , त्यांना उठवावे , निखारे घ्यावे , ते फुलते ठेवून घरी आणावे आणि गुडगुडी तयार करून द्यावी . हरी ती ओढी . हा बघत बसे . निखाऱ्यावर राख धरे . हरीचा चेहरा तसाच काळवंडलेला . त्याची बेठक पान नं . 51 विकलांग . याचे मन अनेक विचारांनी शंकाकुल होऊन जाई . थोडा बरा असला की हरी वर्गात येऊन बसे . आणि हा समोर उबे राहून सगळ्यांना शिकवी . गुरूशिष्याच्या नात्याची ही विचित्र तऱ्हा बघत राहून मुले अचंबा करीत . मास्टर मोशायांचा आणि हरीचा पूर्वीपासून परिचय होता . त्यांची हरीवर मर्जीही होती . त्यांनी हरीचा परीक्षेचा फॉर्म भरण्याची सगळी व्यवस्था केली . आणि त्याला जायला सुटी दिली . त्यानंतर पंधराच दिवसांत याच्या हातात एक तार पडली . ती तार म्हणजे याच्या भविष्याने घेतलेला एक साधा वळसाच नव्हता , कोलांटीउडी होती . त्या तारेमुळे याच्या आयुष्याची गाडी , नाकासमोर जाणारे थोडे आजूबाजूचे रूळ आणि सांधे ओलांडून एकदम एका अक्षुण्ण प्रदेशाकडे जाणाऱ्या रूळावर जाऊन राहिली ! तारेतला मजकूर साधाच होता . ` तुमचं ब्रम्हकुमारी ' नाटक आम्हाला आवडलं आहे . आम्ही ते बसवणार आहोत . शक्य तितक्या लवकर भेट व्हावी ' सहीः चितांमणराव कोल्हटकर , बलवंत संगीत मंडळी , एकोला . हा चकित झाला . अनंदित व्हायचेसुध्दा विसरला . कोल्हटकरांनी नाटक वाचले ? कसे ? केव्हा ? कुणामुळे ? हे शक्य कसे आहे ? चार वर्षापूर्वी याने नाटकाची चोपडी हरीच्या अंगावर फेकली होती . आणि चिडून म्हटले होते , ` आता या नाटकाबद्दल एक शब्दही कधी उच्चारायचा नाही . ' त्याच्या आधी हरीने नाटक रंगभूमीवर आणण्याची खटपट सुरू केली होती आणि याला आग्रह करकरून नाटक मंडळ्यांच्या दारी पाठविले होते . प्रत्येक ठिकाणी वाटयाला निराशा आणि कधी अपमान . गंधर्व नाटक मंडळी म्हणजे सगळ्या मंडळ्यांतले एक प्रख्यात गायक आणि नट मास्टर कृष्णराव यांच्याशी नातेसंबंध शोधून काढला . त्यांना गळ घातली आणि गंधर्व मंडळीच्या मालकांनी नाटक ऐकावे अशी व्यव्सथा केली . हा हुरूपाने गेला . केळकर - कोल्हटकरांसारखे थोर लेखक नाटक चांगले आहे म्हणतात . ते बालगंधर्वांना आवडणार नाही काय ? बेठकीला खुद्द नारायणराव राजहंस , मास्टर कृष्णराव , पटवर्धनबुवा आणि गणपतराव बोडसांसारखे अनुभवी , दर्दी नट . बोडसांनी नाटकाची कुचेष्टा केली . पण नारायणरावांनी कपाटातून एक अत्तराची बाटली काढली . आपल्या हाताने याच्या दोन्ही खांद्याना अत्तरे चोळीत म्हटले , "" वाः ! देवा , तुम्ही काय छान नाटक लिहिलं आहे ! "" पण थोडयाच दिवसांत ते कौतुक आणि अत्तर सारखेच लवकर उडून गेले ! दुसरी मंडळी त्यावेळचे प्रख्यात गायक नट बापूसाहेब पेंढारकर यांची ललितकलादर्श . हा त्यांना भेटायला नागपूरला गेला . नाटक ऐका म्हणून विनंती केली . ते म्हणाले , "" दुसऱ्यानं वाचलेलं ऐकू लागतो तेव्हा माझं मन मधूनमधून भरकटत राहतं . तुमचा विश्वास असेल तर नाटक माझ्याजवळ ठेवा . मी पान नं . 52 स्वस्थपणानं वाचीन . आमि काय ते सांगेन . "" याला वाटले टाळण्याची ही नवीन तऱ्हा आहे . तरी याने नाटक त्यांच्या हाती दिले . त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ दिवसांनी पुन्हा गेला . त्यावेळी पेंढारकरांच्या बोलण्यात जास्त सौहार्द आले आहे असे याला जाणवले . ते म्हणाले , "" तुमचं नाटक मला आवडलं . मी घेतलं असतं . पण माझी अडचण सांगतो . आमच्या मंडळीतला मी प्रमुख गायकनट . पण तुमच्या नाटकात मला योग्य असं कामच नाही . शिवाय आमचा सामाजिक नटकांवर भर . तुमचं नाटक पौराणिक . "" हा साहजिकच निराश झाला . ते बङून त्यांनी म्हटले , "" एक सांगतो . तुम्ही चांगलं नाटक लिहाल असं मला वाटतं . तुम्ही मला नट म्हणून डोळ्यांसमोर ठेवून एखादं सामाजिक नाटक लिहिलंत तर त्याचा मी अगदी मनापासून विचार करीन . "" तेवढयानेच याला हुरूप आला परत आल्यावर काही वर्षात पेँढारकरांसाठी याने फाशी या विषयावर नाटक लिहायला सुरवात केली . पण त्याचा एक अंक लिहून झाला तोच ग्वाल्हेर मुक्कामी पेंढारकर अचानक वारल्याची बातमी आली . पेंढारकरांच्या भेटीनंतर हा अगदी निराश झाला . पण हरी पिच्छा सोडीना . तो म्हणे , "" इतकं केलसं . आता मोठी अशी एकच मंडळी उरली आहे . दीनानाथ - कोल्हटकरांची बलवंत संगीत मंडळी . त्याची नाटकाची निवड चांगली असते . कोल्हटकर समजदार , चांगल्या अभिरूचीचे असावेत . तू एकदा त्यांना भेट नाही जमलं तर आपण हा नाद सोडू . "" नाही होय करता करता हा कबूल झाला . गाडीत बसला . मनातून कोल्हटकरांना भेटायचे या कल्पनेने भ्यालेला . पण याने स्वतःला धीर द्यायला सुरवात केली . गंधर्व , पेँढारकर हे आपल्याला अनोळखीचे . कोल्हटकरांचे अगदीच तसे नाही . ते आपल्याला एखादे वेळी ओळखतीलसुध्दा . शाळा कॉलेजच्या दिवसात हा वीर वामनरावदादांकडे पुष्कळदा जाई . त्यांचे टाकून दिलेले कागद उचकटत बसे . त्यांच्या कागदपत्रात जुन्या , केव्हा तरी रचून टाकून दिलेल्या सुंदर कविता सापडत . ` परवशता पाश देवे ' ही त्यातलीच एक . कचऱ्यात टाकून दिलेली तेजस्वी कविता . पुढे त्यांच्या ` रणदुंदुभी ' नाटकामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली . दुसरी एक होती . ` अमरत्वाचे मरण ' म्हणून . पुढे सावरकरांचे स्वतंत्रेचे स्त्रोत्र ऐकताना प्रत्येक वेळी याचे अंग रोमांचाने फुलून जाई . त्यावेळी याला वामनरावदादांच्या या कवितेची आठवण होई . त्या स्तोत्राइतकीच तेजस्वी . हा वामनरावदादांजवळ या कवितांसंबंधी बोले . त्यांना कळे या मुलाचा शब्दांचा कान तयार झाला आहे . ` रणदुंदुभी ' नाटकाचा एकेक प्रवेश लिहून होई तसतसा तो कोल्हटकरांना वामनरावदादा वाचून दाखवीत . मग याला विचारीत , "" काय विश्वनाथ , कुठे मवाळ नरम वाटतं ? "" अनेकदा हे असे झाले . यातले काहीच पान . 53 कोल्हटकरांना आठवणार नाही ? शक्यच नाही ! हा पुण्याला उतरला . स्टेशनसमोरच्या मुरारजी गोकुळदासाच्या धर्मशाळेत याने सामान ठेवले . सकाळी उठला . रस्त्यालगतच्या म्युनिसिपालिटीच्या नळावर स्नान केले . उमरावीहून जपून आणलेला एक स्वच्छ सदरा अंगात घातला . पानवाल्याच्या दुकानातल्या आरशात बघून आपली चार आण्यांची घोंगडीची टोपी याने नीट बसववली आणि कोल्हटकरांना भेटायला निघाला . शनिवार पेठेत गणेश प्रिंटिंग प्रेस नावाचा छापखाना होता . त्या वाडयात बलवंत संगीत मंडळीचा मुक्काम . याच्या सुदेवाने कोल्हटकर प्रेसच्या आवारात बाहेरच उभे होते . हा जवळ गेल्याबरोबर त्यांनी हास्यमुखाने विचारले , "" या . इथं केव्हा आलात ? "" याला वाटले आपले निम्मे काम झाले . पण याने नाटकाची गोष्ट काढली मात्र , रूपया चांदीचा पण वाजावा बद्द तसे . त्यांचे हसणे एकदम बद्द होऊन गेले ! तुसडेपणाने ते याला म्हणाले , "" छे ! मला वेळ नाही हो . "" याने पुन्हा विनवणी केली त्यांना म्हटले , "" तुम्ही नुसती दहा पानं वाचून बघा . नाही बरं वाटलं तर . . "" पण त्यांचे एकच उत्तर , "" छे ! शक्यच नाही . अगदी मुळीच वेळ नाही . इलाजच नाही ! "" तरी हा मिनतवारी सोडीना . तेव्हा एकदम तिरीमिरीवर येऊन ते बोलले , "" हे बघा बेडेकर , तुम्हाला एकदा सांगितलं जमायचं नाही म्हणून . आता तुम्ही मुकाटयाने स्वतः जाता की गडयाला हाक मारू ? "" रागाच्या भरात हा नव्या पुलावर कसा पोचला , तिथल्या कट्टयावर केव्हा बसला . याला कळलेच नाही . खाली नदी वहात होती . याच्या हातात नाटकाची वही . ही इथे फेकून द्यावी की उमरावतीला हरीच्या अंगावर ? अखेर त्याने ती हरीकडे दिली आणि म्हटले , "" बस ! आता हे नाटक कायमचं संपलं ! "" आणि आज त्याच कोल्हटकरांची नाटक बसवतो म्हणून तार आली होती . ! या गोष्टीला थोडासा उपसंहार आहे . पुढे चारपाच वर्षातच हा सांगलीच्या सिनेमास्टुडिओचा चालक झाला . कोल्हटकर याच्याबरोबर तिथे होते . गणपतराव बोडसही स्टुडिओजवळच राहत . ते संध्याकाळी गप्पा मारायला याच्या ऑफिसात येत . एके दिवशी ते म्हणाले , "" अहो , तुम्ही ते ` ब्रम्हकुमारी ' नावाचं नाटक लिहिलं आहे ते फार चांगलं आहे म्हणतात . आम्हाला वाचू द्या की . "" याने पुस्तक दिले अभागी आहात किती सुंदर नाटक आहे तुमचं ! आणि गंधर्वांना अगदी फिट बसलं असतं . मी तिथे होतो त्यावेळी हे माझ्याकडे आणलं असतंत तर . . पण नशिबातच नव्हतं तुमच्या ! तेव्हा याने गंधर्वाना नाटक ऐकविले तेव्हा गणपतरावांनी त्याची कशी कुचाळी केली त्याची आठवण दिली . कोल्हटकर शेजारीच होते . ते म्हणाले , पान नं . 54 "" बेडेकर , तुमचं भाग्य थोर म्हणून नाटक माझ्याकडे आलं . तुम्ही काळे की गोरे हे बघितलंसुध्दा नव्हतं . नुसतं तुमचं नाटक एकदा वाचलं आणि ठरवलं , हा माणूस नाटकाचा खरा दर्दी आहे . आपल्याला हवा . "" मग याने कोल्हटकरांना पुण्याच्या भेटीची आठवण दिली . ते थोडे खजील झाले म्हणाले , "" काय म्हणता ? मी असं केलं ? "" मग हॉकीत जसा पटाईत खेळाडू प्रतिस्पर्ध्याला उलटया बाजूला ( राँग साईडला ) घेतो आणि तडाखा मारतो तसे हे दोघे मोठे नट - मालक सापडलेले बघून याला जोर चढला . याने उपदेश करायला सुरवात केली . कोल्टकर म्हणाले , "" तुम्हाला कल्पना नाही . दर मुक्कामाला पाचपंचवीसजण नाटकं घेऊन येतात त्यांनी अभ्यास केलेला नसतो . रंगभूमी आतून बघितलेली नसते , आणि बेधडक . . . "" "" तरी सुध्दा . . "" याने त्यांना अडवीत म्हटले , "" कोल्हटकर , तुम्ही एका मोठया नाटयसंस्थेचे चालक होता . गडकरी , सावरकर , खाडिलकर यांच्यासारखे तुमचे नाटककार तुम्ही निवडलेत . याचा अर्थ उत्तम नाटक म्हणजे संस्कृतीच्या तुळशीवरची मंजिरी याची तुम्हाला नेहमी जाणीव होती . हे तुळशीचं रोपटं कुठंही असू शकेल , , दिसेल याबद्दल बोलतात , पण भांगेतसुध्दा एखाद्या वेळी तुळस उगवते हे विसरलात , असं नाही वाटत ? एवढे मोठे नाटककार देवल ते सुध्दा सांगली शेजारच्या पाचपंचवीस घरांच्या हरिपूरसारख्या खेड्यातूनच आले ना ? "" बिचारे कोल्हटकर याच्या माऱ्याने थंड होऊन निमूट बसून राहिले . यानंतर काही दिवसांची गोष्ट . याच्या एका चित्रपटाचे काम चालू होते . सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाचा धडाका . नंतर दिवसाचे हिशेब , देणीघेणी , तक्रारी , दुसऱ्या दिवसाच्या कामाची तयारी . अगदी थकून जायचा . पुष्कळदा कोल्हटकर बरोबर असत . एका संध्याकाळी सगळे जरा लवकर आवरले . हा आपल्या मॅनेजरला म्हणाला , "" झालं ना लिमये ? निघू ? "" "" तसं झालंच आहे . एक थोडं . . . "" "" काय ? "" "" एका मुलाला तुम्हाला भेटायचंय . "" "" कुठला मुलगा ? कशासाठी ? "" "" त्यानं एक सिनेमाची स्टोरी आणली आहे तुम्हाला दाखवायला . "" "" आं ? नाही . नको . आता नको . "" "" साहेब , सकाळी दहा वाजल्यापासून थांबला आहे . तुम्ही कामात होतात म्हणून मी त्याला बसवून ठेवला आहे . मुद्दाम पंढरपूराहून आला एह भेटायला . "" लिमयाने अजिजी केली . कस्टमचे डिक्लरेशन करताना डॉक्टरांच्या व माझ्या हातातील हिऱ्यांच्या अंगठ्यावर आक्षेप घेतला गेला. अंगठया काढणं आम्हा दोघांच्याही जीवावर आलं. होतं. माझे `के' अक्षरांची अंगठी तर डॉक्टरांनी एंगेजमेंट रिंग म्हणून माझ्या हातात घातली होती. त्या अंगठीच्या किमंतीचे पेसेही डॉक्टारांनी मला दिले होते. वाद चालूच होता. वाद घालायची डॉक्टरांना कोण हौस,आणि एकदम डॉक्टरांच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली. त्यांनी त्या कस्टम ऑफिसरला सांगितले की, ह्या आमच्या एंगेजमेंट रिंग्ज आहेत. त्या आम्ही काढू शकत नाही. डॉक्टरांनाही ती अंगठी प्रकृतीसाठी ज्योतिष्यांनी घालायला सांगितली होती. त्यामुळे तेही ती अंगठी काढू शकत नव्हते. आता कस्टम ऑफिसरचाही नाइलाज झाला आणि त्याने डॉक्टरांच्यासमोर शरणागती पत्करीत हसत हसत `ओ. के सर ' म्हणून त्या अंगठ्या घालायला आम्हाला परवानगी दिली, आणि आम्ही आमच्या विमानाकडे प्रस्थान केले. विमानात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही बारा-पंधरा जेवढे होतो तेवढेच त्या विमानात प्रवासी होतो. कोणी कुठेही बसू शकत होता. थोडया वेळाने मी टॉयलेटला जाण्याच्या निमित्ताने उठले, आणि डॉक्टरांच्याजवळ येऊन थोडीशी रेंगाळले. स्वतःचे चुरचुरणारे डोळे चोळत डॉक्टर म्हणाले, ""आज माझे डोळे लाला झाले आहेत ना ?"" ""तुमचे डोळे तर नेहमीच लाल असतात. त्यात काय नवीन? ""मी पटकन बोलून गेले. वास्तविक पाहता हे म्हणताना माझा निर्देश डॉक्टरांच्या रोजच्या जाग्रणाकडे होता. पण डॉक्टरांनी त्या बोलण्याचा संबंध त्यांच्या पिण्याच्या सवयीला उद्देशून घेतला. जरासे गुरगुरतच डॉक्टर मला म्हणाले- ""नवऱ्याशी कसं बोलायचं असतं ते आधी शिका."" अजून लग्नाचाही पत्ता नव्हता. पण डॉक्टर मला आपली पत्नी समजून माझ्यावर नवरेशाही गाज- बायला लागले होते. म्हणताता ना बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी. पान नं. 191 83 दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवर सूर्य असताना त्याने आम्हाला मॉरिशस- जवळ आणून पोहोचविले. खाली अथंगा समुद्र पसरला होता आणि त्यात हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. हिरव्या रंगाची मुक्त उधळणच परमेश्वराने ह्या बेटावर केली होती. पाचूचा खडा अंगठीत दिसावा तसे हे बेट दिसत होते. जणू पाचूचे बेटच. मंगेश पाडगावकरांच्या ओळी राहून राहून आठवत होत्या- पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले. मॉरिशसचे एम.एल.ए. शिवा बापू आणि कांबळी त्यांची मित्रमंडळी आमच्या स्वागताला आली होती. जमिनीवर पाऊल ठेवले आणि थंडीने शरीर शिरशिरलं. परदेशात येऊन पोहोचल्याची पहिली जाणीव झाली. औत्सुक्य,आनंद अशा संमिश्र भावनांनी मनं भारवली होती. सामान ताब्यात घेताना लक्षात आले एक महत्वाची बॅग मुंबईतच राहिली आहे. अगदी प्रथमग्रासे मक्षितापात असे झाले. पुढच्या मंगळवारशिवाय बॅग मिळू शकणार नव्हती. कारण त्या वेळी मुंबई-मॉरिशस अशी एकच फ्लाईट होती. म्हणजे मॉरिशसमधील मुक्काम आता वनाढविणे भागच होते, या सर्व गडबडीमुळे आत्ती व डॉक्टरांचे बर्लिन चित्रपट महोत्सवाला हजर राहणेही जमणार नव्हते. पण आता काही दुसरा इलाजच नव्हता. चार-चार जणांचा एक ग्रूप एकेका घरी उतरवण्यात आला. त्यामुळेही माझी डॉक्टरांची ताटातूट झाली. माझं मन फार खट्टू झाले. मात्र असे असले तरी दिवसाचे बरेच तास आम्ही हिंडण्या-फिरण्यासाठी एकत्र येत असू. मॉरिशसच्या आदरतिथ्याने आम्हाला लाजवलं. आतिथ्य करण्यात मराठीच काय पण तिथली बिहारी माणसंही मागे नसायची. चहाच्या कापाचाही खर्च ह्या मंडळींनी आम्हाला करू दिला नाही. सकाळी नऊ वाजता पेट्रोल भरून फूल केलेल्या गाडया आम्हाला फिरायला न्यायला हजर होत. रोज एकेकाकडे जेवण असे. अगदी मद्यपानासहित. तिथे तर दिवसातील कुठल्याही वेळी दारू `ऑफर' केली जाई. पण डॉक्टरांच्यासहित सर्व पुरूष मंडळींनी याबाबतीत कमालीचा संयम दाखवला. केवळ जेवणाच्या आधीच काही मंडळी मद्यपान करीत. पान नं. 192 डॉक्टरांची मात्र फार पंचाईत व्हायची. डॉक्टर आत्तासमोर मद्यपान करायचे नाहीत. पण आता मात्र इलाजच नसायचा. कारण सगळ्यांचीच घरं काही मोठी असायची नाहीत. जिथे मोठी घर तिथे स्वतंत्र खोलीत पिणांऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जायची. पण लहान जागेत आमने सामने यावेच लागे. अशा वेळी आत्तीने एक उपाय काढला होता. ती यजमानीणबाईंना विनंती करायची की, ह्या पुरूषांचं कधी आटपेल सांगता येणार नाही. तेव्हा आम्हा बायकांना आधी जेवायला वाढा. आम्ही जेवणाच्या खोलीत गेलो की, पुरूशमंडळीही मोकळे- पणाने आपला कार्यक्रम आटपायची. आत्तीचे तसे सर्वांनाच दडपण यायचे. दिवसाच्या पिण्यावर मात्र आत्ती अंकुक्ष ठेवून असायची. कारण दिवसभरात कुठे न् कुठे सार्वजनिक कार्यक्रम,प्रेक्षणीय स्थळे बघायला जाणे असायचेच. मॉरिशमधील वाकोवाज शहराच्या नगरपालिकेकडून सत्कार व चहापान, भारतीय राजदूतांची भेट, मॉरिशसचे पंतप्रधान राम गुलाम यांची दीर्घ भेट, टी.व्ही वर सादर केलेला मराठी कार्यक्रम अशा घटनांनी मॉरिशसमधील वास्तव्य संस्मरणीय ठरत होतं. मराठी चित्रपट महोत्सव व टी.व्ही वरील कार्यक्रमामुळे मॉरिशसची मंडळी आमच्या कलावंतांना ओळखायला लागली. ते चित्रपटातील नावानेच सर्वांना हाक मारीत. आत्तीची तर हिंदी-मराठी अशी दुहेरी ओळख होती. त्या मुक्कामातच टी.व्ही. वर आत्तीचा `मेरा घर मेरे बच्चे ' हा चित्रपट दाखविला गेला होता. डॉक्टरांचे हिंदी चिटपत्र पाहिलेली मंडळीही काही निघाली. सबंध युरोपच्या प्रवासात डॉक्टरांनी माझी व आत्तीची खूपच काळजी घेतली. टॅक्सी ठरवणे,चांगली खोली पाहून (हॉटेलमधील) तिथे आम्हा दोघईंची सोय करणे, सामान उचलणे अशासारख्या गोषीटीही त्यांनी आमच्यासाठी केल्या. शेवटी शेवटी तर बॅगा उचलून उचलून डॉक्टरांच्या हाताला घट्टे पडले. पण त्यांनी मला एकाही जड बॅगेला हात लावू दिला नाही. मला तर खूप लाजल्या- सारखं व्हायचं. काही वेळेला मी न राहून त्यातील बॅगा उचलायचीही.पण ती बॅग पटकन् माझ्या हातातून काढून घेत डॉक्टर कानाशी गुणगुणायचे- ""राणी, मी असताना तू हे करायचं ?जमायचं नाही.?"" डॉक्टरांचं माझ्या बाबतीतील काळजी घेणे काही वेळेला जरा असतीच व्हायचं आणि त्यातून समरप्रसंगही निर्मा व्हायचे. मी काय खावं आणि खाऊ नये. हे पान नं. 193 देखील डॉक्टरच ठरवायचे. जेवल्यानंतर मला आईस्क्रीम खायला मुळीच आव- डायचे नाही. पण मॉरिशसला आल्यापासून प्रत्येक जेवणाच्या वेळी ते असायचे आणि ते समोर आले की माझे तोंड वाकडे व्हायचे. एक दिवस आम्ही एके ठिकाणी रात्री जेवायला गेलो होतो. यजमानाने आग्रहपूर्वक आईस्क्रीमची प्लेट समोर धरली. मी ती `सॉरी' म्हणून नाकारणार एवढयात समोर जरा अंतरावर बसणाऱ्या डॉक्टरांचे फर्मान सुटले, ""परत करायचे नाही. ते आईस्क्रीम खा."" माझ्याजवळ बसलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांनी माझू कुंचबणा पाहात मला सांगितले की ""तुला हवे तेवढे खा. उरलेले मी खाईन."" मी नावापुरता एक चमचा तोंडात टाकला, आणि प्लेट जयश्री- बाईंच्या हाती सोपविली. डॉक्टरांनी नेमके तेवढेच पाहिले. बसल्या जागेवरूनच डॉक्टर माझ्यावर ओरडत म्हणाले,""त्यापेक्षा ते फेकून का देत नाहीस?"" हे त्यांचे वाक्या ऐकल्यावर जयश्री बाईही भडकल्या. त्यांचे म्हणणे ज्याअर्थी डॉक्टर ते आईस्क्रीम बाहेर कचऱ्यात फेकून दे असं म्हणताहेत, म्हणजे डॉक्टर त्यांना कचऱ्यापेक्षाही क्षुद्र समजताहेत आणि दोघआंची शाब्दिक मारामारी जुंपली, मी अगदी कानकोंडी होऊन बसले. पोटात मद्य आणि डोक्यात नशा यामुळे डॉक्टर जरा अधिकच एक्साईट होऊन बसले होते, त्यात हा वाद. डॉक्टर उठले आणि एकटेच तरातरा चालत बरेच इंतर निघून गेले. रात्रीची वेळ, नवीन शहर आणि डॉक्टर एकटेच निघून गेले होते. माधी अगतिकता इतकी की, मी उठून त्याच्यामागेही जाऊ शकत नव्हते. मग कुणीतरी जाऊन डॉक्टरांची समजूत घालून त्यांना त्यांच्या मुक्कामावर नेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना प्रत्यक्ष पाहीपर्यंत माझे चित्त ठिकाणावर नव्हते. आम्ही जिथे जिथे जेवायला जा असू तिथे तिथे बहुतेक स्वेच्छा भोजना- चीच वद्धत असायची. बऱ्याचदा डॉक्टर मला त्यांनी प्लेट भरून द्यायला सांगत. मला त्यात काहीच गेर वाटायचे नाही. कारण स्त्रीला जितका स्वयंपाक करायला आवडतो तितकाच तो करून वाढण्यातही समाधान वाटते. आणि मला स्वतःला तर जेवण वाढायला खूपच आवडते. मी अगदी चार-पाच वर्षांची होते तेव्हासुध्दा माझ्या वडिलांना जेवायला वाढायची. शिवाया मला आणखी कुणी प्लेट भरून द्यायला सांगितले तरी मला त्यात गेर वाटले नसते. पण खुल्या मनाने हे पान नं. 194 सांगण्याऐवजी ह्या विषायावर कुजबूज व्हायला लागली. एकदा आम्ही ब्लॅक रिव्हर सी शोअरवर पिकनिकसाठी गेलो होतो. त्या वेळी कुणी तरी खवचटपणे मोठयाने म्हणालेही- ""काशिनाथचं बरं आहे. त्याला वाढून द्यायला कांचन आहे. पण आपलं आपल्यालाच वाढून घ्यायला हवं."" त्या पिकनिकहून येताना गाडीत दृष्टान्त, साक्षात्कार,भविष्य ह्या विषयावर कुणी न् कुणी आपले अनुभव सांगत होते. डॉक्टरही आपला अनुभव सांगताना म्हणाले की, त्यांच्या स्वप्नात श्री गजानन महाराज ( शेगावचे नव्हते) आले होते. आणि त्यांनी डॉक्टरांना संततीत होईल अशा दृष्टान्त दिला होता. ते ऐकून आत्ती आनंदाने म्हणाली- ""चला. असं झालं तर देव पावला म्हणायचा. अगदी दुधात साखर म्हणायची. आता तेवढीच एक उणीव आहे."" डॉक्टर पुढे म्हणाले- ""पण माझ्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग आहे. कदाचित तेव्हाच ते शक्य होईल असं दिसतंय."" ""काही नको दुसरं लग्न वगेरे करायला. जे काही होईल ते वहिनींनाच होईल. असला विचारही करू नका."" आत्ती दटावीत डॉक्टरांना म्हणाली. डॉक्टरांनी माझ्याकडे हळूच पाहिले. त्या क्षणी नुसतं पाहण्यापलीकडे मी तरी दुसरं काय करू शकणार होते.? तब्बल बारा दिवसांच्या वास्तव्यानंतर आम्ही मॉरिशस सोडले. या अवधीत मॉरिशसचा अक्षरशः कोपरान् कोपरा पाहून झाला होता. इथली माणसं तर इतकी लाघवी की, निरोप घेताना त्यांना आणि आम्हालाही जड गेले. एम्.एल.ए शिवाबांरूचे डोळे तर पाणावले होते. या माणसाला शिवाजीमहाराजांचा केवढी अभिमान. एकदा आत्तीने त्यांना विचारले की, तुमचं प्रमुख अन्न भात आहे. पण त्यानं शक्ती कशी राहणार ? तर हा मराठा गडी अभिमानाने उद्गारला.- ""आमच्या अंगात शिवाजीमहाराजांचं रक्त आहे. आम्हाला काहीही होणार नाही."" या शिवाबापूंचं पूर्ण नाव बापूसाहेब नरवणे, ते सातापचे. त्यांनी शिवाजीचे पोषाख घालून स्वतःचे काही फोटोही काढून घेतले होते. पण त्यामध्ये बऱ्याच चुकाही होत्या. डॉक्टरांनी त्यांना आपला रायगडमधील फोटो त्या पोषाखाची पान नं. 195 नीट कल्पना येण्यासाठी दाखविला. तर शिवाबांपूनी तो फोटा घरी लावण्यासाठी मागून घेतला. डॉक्टरांचा संभाजी सागर पार करून परदेशीही पोहोचला. 84 आता पुढचा मुक्काम होता; क्लिओपात्राच्या देशाचा. ईजिप्तचा. आता मात्र आम्ही सगळे एकत्र एका हॉटेलात राहायला लागलो. खऱ्या अर्थाने सहप्रवास सुरू झाला. दोन-दोन माणसांच्या रूम्स असत. त्यामुळे डॉक्ट व श्रीकांत मोघे एका खोलीत राहात. सगळा युरोप ठरवलेल्या मुदतीमध्ये पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रत्येक देशाची प्रमुख शहरे तीही दोन-तीन दिवसांतच धावत पळत पाहावी लागत. त्याहूनही आम्ही स्वतंत्र गेलो होतो. त्यामुळे त्या त्या शहरा- तील पहिला अर्धा दिवस तर योग्य हॉटेल,जेवणाचे जवळपासचे ठिकाण, पेसे बदलून घेणे यातच जायचा. डॉक्टर आणि नमाडेसाहेब हुशार. ते हॅम,पोर्क अशापासून बनविलेले मोजकेच पण पौष्टिक पादार्थ खात. पण आम्ही बाकीची मंडळी मात्र हे खाल्ल्याने पाप लागले, ते खाल्ल्याने धर्म बुडेल या घोळातच असायचे. जयश्री गडकर व त्यांच्या आई तर इतक्या धार्मिक वृत्तीच्या की, मुंबईहून येताना त्यांनी छोटीशी बॅग भरून बरेचशे देव, पोथ्याही आणलेले होते. श्रावणही त्या दोघी पाळायच्या त्यामुळे उपास,व्रते, अक्ष्यक्ष भक्षण न करणे अशासारख्या गोषीटीही त्या दोघी कटाक्षाने पाळायच्या. डॉक्टर व नामाडेसाहेब स्वतःला लागणारे मद्यही विमानात अथवा विमान तळावरील डयूटी फ्री शॉपमधून विकत घेत. त्यामुळे त्यांचे बरेच पेसे बचत व्हायचे. फ्रँकफर्टला असताना गेलो त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो. इथे बऱ्याच ठिकाणी भुयारी मार्ग असायचे, आणि त्यातून ये-जा करण्यासाठी सरकत्या जिन्यांचा उपयोग केलेला असायचा. आम्ही हा प्रकार प्रत्यक्ष असा प्रथमच पाहात होतो. त्याच्या शेजारी साधा जिनाही असायचा. पण आम्ही ही नवी मौजही अनुभवायची ठरविली. जयश्री गडकर. पान नं. 196 श्रीकांत मोघे, डॉक्टर आणि मी बोलत बोलत कधी वर चढून गेलो ते समजलेही नाही. एवढयात कसला तरी आवाज झाला म्हणून आण्ही मागे वळून पाहिले तर त्या सरकत्या जिन्यावर योग्य त्या पायरीवर पाय न ठेवल्यामुळे जयश्री गडकर यांच्या आई मागच्या मागेच कोसळल्या होत्या. त्यांच्या मागेच असलेले आत्ती व चारूकाराही त्यांचा धक्का लागून खाली पडले होते. जयश्री गडकर यांच्या आईचा पदर त्या जिन्यात अडकून ओढला जात होता. जयश्रीबाईंनी तर रडून ओरडून आकांत मांडला होता. जयश्रीबाई,श्रीकांत मोघे आणि मी साध्या जिन्याने खाली धावलो. एवढय्ता माझ्या लक्षात आले की डॉक्टर अजून वरच थांबले आहेत. मी वळून त्यांच्या- कडे पाहात म्हणाले - ""अहो, असे उभे काय राहिलात ? खाली चला ना त्यांच्या मदतीला"" ""बाबांनी (भालजी पेंढारकर ) आपल्याला मुंबई सोडताना काय सांगितलं होतं,? आपल्या देशाचे नाव खराब होईल असं कोणतंही वर्तन करू नका. आता इथल्या लोकांनी हा प्रकार पाहिला म्हणजे ते म्हणतील, भारतीय लोकांना अजून नीट चालताही येत नाही. मी मुळीच खाली येणार नाही"" डॉक्टरांचे स्पष्टीकरण. आणि डॉक्टर स्तंभासारखे तिथेच उभे राहिले. एवढयात तिथल्याच एका स्थानिक माणसाने पुढे होऊन जिनाच थांबविला, आणि जयश्राबाईंच्या आईची सुटका झाली मला राहून राहून डॉक्टरांचे आश्चर्य वाटत होते की, सदेव मदत करायला पुढे असणारे डॉक्टर आजच असे का वागले असतील ? बरं त्यानंतर एकदा असा प्रसंग घडला की, पॅरिसला असताना जयश्री गडकर यांच्या हॉटेलमधील रूमचे दार इतके घट्ट बसले की, निघता निघेना, हॉटेलच्या लोकांचे दार उघड- ण्याचे जोरदार प्रयत्न चालू होते, पण त्याला वेळ लागत होता. त्यामुळे जयश्री- बाई आणि त्यांच्या आईचे घाबरून ओरडणेही वाढत होते. आम्ही त्यांच्या शेजारच्या खोलीतच होतो. आमच्या रूम्स बऱ्याच वरच्या मजल्यावर होत्या. खाली बघितलं तर चक्कर यायची, पण त्या दोघींचा आरडाओरडा ऐकून डॉक्टर बाहेरच्या बाजूनी गॅलरीतून शेजारच्या खोलीत उतरून आतून दार उघडते का ते बघायला जाण्यासाठी जीवघेणा पराक्रम करायला निघाले होते. आता ह्या पान नं. 197 दोन प्रसंगांची संगती कशी लावायची ? आणि डॉक्टारांचा नेमका स्वभाव कुठला समजायचा हे मला ठरविता येत नव्हते. 85 बर्लिनपर्यंत आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये एकत्र राहात असू. पण लंडन येथे आल्यावर मात्र पुन्हा पांगापांग झाली. प्रत्येकाचे कुणी ना कुणी ओळखीचे होते. मात्र एक-दोन व्यक्तींपेक्षा अधिकांची सोय होऊ शकत नव्हती. अभिनेते सूर्यकांत यांचेच कुणी ओळखीचे नव्हते. शिवाय त्यांना भाषेचीही अडचण होती, त्यामुळे ते व चारूकाका एके ठिकाणी राहिले. आम्ही ज्यांच्याकडे जाणार होतो ती छाब्रिया मंडळी होती मुंबईचीच. पण आम्हाला ते तसे अपरिचितच होते. एका हिंदी चित्रपट,निर्मात्याच्या ओळखीमुळे आम्ही त्यांच्याकडे जाणार होतो. छाब्रिया मंडळींचाही दोन बेडरूम्सचा छोटासा बंगला होता तसे ते दोन माणसांचीच व्यवस्था रू शकत होते. पण त्यांनीच जेव्हा सांगितले की आणखी एका माणसाची आम्ही सोय करू ,तर डॉक्टर आमच्याबरोबर तिथे राहायला आले. डॉक्टर छाब्रियांची गेस्ट व होस्ट म्हणून गटीट जमायला वेळ लागला नाही. तशी डॉक्टरांना सिंधी मंडळी आवडायची नाहीत. पण छाब्रिया मंडळींचे अगत्य पाहून डॉक्टरांचे सिंधी लोकांच्याविषयीचे मत पार बदलून गेले, इतका त्यांचा पाहुणचार अगत्यपूर्ण होता. डॉक्टरांच्या बरोबरचे सहजीवन लंडनमधील आठ दिवसांच्या वास्तव्यात खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळाले. छाब्रियांच्या बंगल्याच्या दोन्ही बेडरूम्स वरच्या मजल्यावर होत्या. आम्ही सगळे वर झोपायचो, तर डॉक्टर एकटेच हॉलमध्ये खाली झोपायचे. छाब्रियांचा बिझनेस घरात बसूनच चाले. तर छाब्रियाबाई वेळ जात नव्हता म्हणून दुपारच्या कुठेतरी पार्टटाईम नेकरी करायच्या. लग्नाला दहा वर्ष झाली तरी ह्याही घरात बाळराजांचे आगमन नव्हते. त्या घरात सकाळी लौकर अठायची तशी घाई नसायची. पण मी मात्र नेहमीच्या सवयीने लौकर उठून खाली यायची. दुलई पांघरून एखाद्या लहान मुलासारखे डॉक्टर झोपलेले असायचे. इंग्रजांच्या पान नं. 198 देशात, इंग्रजी पध्दतीने, डॉक्टरांच्या कपाळावर ओठ ठेकवीत ""गुड मॉर्निग डार्लिंग"" असं म्हणत मी डॉक्टरांना जागं करायची. तान्हाया बाळासारखे डॉक्टर निर्व्याज हसायचे, आणि आपल्या हाताची मिठी माझ्या गळ्यात अडकवीत `उं' करीत कुशीत शिरायचे. कुसुमाग्रजांची क्षमा मागून आणि त्यात किंचितसा बदल करीत मी डॉक्टरांच्या कानात कुजबूजायची.- ""काढ सख्या गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत "" मी चहा करीपर्यंत डॉक्टर सर्व आवरून यायचे. आल्हादायक सकाळ, पुढयात गरम गरम चहाचे कप, नीरवा शांतता, आणि सोबत सध्यातरी माझे एकटायचे असलेले डॉक्टर,असं चौरंगी वातावरण माझ्याभोवती होतं. भविष्याची चिंता न करता मी फक्त वर्तमान जागून घेत होते. सबंध दिवसात आम्हाला एवढाच काय तो एकान्त मिळायचा. पण तेवढया- वरही आम्ही खूश होतो. त्यात आनंद मानीत होतो. चहा झाला की, आण्ही आम्हाला जेवढी काही साफसफाई आणि आवराआवर करता यायची तेवढी करायचो. कारण छाब्रियांच्या घरात तिथल्या पद्धतीने नोकर नव्हता. अगदीच राजाराणीचा संसार. छाब्रिया तसेखूपच बायकोला मदत करायचे. पण छाब्रिया- बाईंच्यावर कामाचा ताण आमच्यामुळे तर अधिकच पडायचा. नाश्त्याची वगेरे तयारी करूनच आम्ही आत्ती, छाब्रिया मंडळींना उठवायचो. पण तोपर्यंत मात्र आम्ही आमच्या संसारात वावरल्यासारखे वावरायचो. एकत्र राहात असलायमुळे सकाळच्या नाश्तायापसून ते रात्रीच्या जेवणापर्यंत डॉक्टरांच्याकडे नीट लक्ष पुरविता यायचं. जेवणाच्या आधी छाब्रियांच्याबरोबर दुसऱ्या खोलीत बसून डॉक्टर माफक प्रमाणात मद्यही घेत. पण तेही अगदी जेवायच्या वेळेपर्यंतच. जेवण वाढलंय म्हटलं की चटकन् सर्व आवरून जेवणाच्या टेबलावर येत. छाब्रियाबाईही चांगल्याच सुग्रण आणि भलत्याच ह शी होत्या. अगदी नातलगांचे अगत्य करावे तसे त्या आमचे करीत होत्या. आम्हाला खाऊपिऊ घालीत होत्या. रात्री झोपताना चुकून दूध प्यायचे राहिले तर ही बाई स्वतः मोठे मोठे ग्लास दुधाने भरून घेऊन आमच्या बेडरूममध्ये हजर व्हायची. पान नं. 199 वेगळ्या वेळी केलेले जेवण , व्यवस्थीत झोप, माफक मद्य, आनंदी मूड या सगळ्यामुळे डॉक्टर एखाद्या गुलाबासारखे टवटवीत आणि सफरचंदासारखे रस - रशीत दिसायला लागले. प्रथमदर्शनी तर डॉक्टर एखाद्या ब्रिटिशासारखेच वाटायचे. लंडनमधील ते आठ दिवस अक्षरश: अविस्मरणीय ठरले. स्ट्रॅटफर्ड येथील शेक्सपीयरच्या स्मारकाला भेट देताना तर डॉक्टर एखाद्या तीर्थक्षेत्राला शेट द्यावी तसे भाविक झाले होते. त्यांना येथील थिएटर आणि स्टेज पाहायचे होते. पण तिथे रात्री होणाऱ्या प्रयोगाची तालीम सुरू असल्यामुळे आत प्रवेश मिळणार नव्हता. लंडनमधील आम्ही दोन नाटके पाहिली. बहुचर्चीत आणि दिर्घकाळ चाललेले 'माऊस ट्रॅप' हे नाटक तर पुढची तिकिटे न मिळाल्यामुळे आम्ही गॅलरीत बसून पाहिले. मात्र 'कोड्क्ट अन््बिकमिंग' हे नाटक तर मात्र आम्ही तिघांनी अगदी व्ही. आय. पी. च्या थाटात पाहिले. ही व्यवस्शा सुनील दत्त यांच्यामुळे होऊ शकली. नर्गिस व सुनिल दत्त यांच्याशी आत्तीचे अगदी जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. आत्ती लंडनला जाणार असल्याचे समजताच सुनील दत्त यांनी लंडन येथील आपल्या ऑफिसमध्ये सुलोचनाजींना लागेल ती मदत करा असे कळवून ठेवले होते. आम्हाला घरातून घेऊन जाण्यापासून ते मध्यंतरात बसल्या जागीच चहापानाची व्यवस्था करण्यापर्यंत आमची सरबराई केली गेली. लंडनमध्ये मी एक साडी खरेदी केली. ती आवडल्यामुळे तशीच एक साडी डॉक्टरांनी इरावतीबाईंसाठी खरेदी केली होती. पण त्या साडीवरील मोठया प्रिंटमुळे इरावतीबाई ती नेसतील की नाही अशी शंका डॉक्टरांना वाटत होती. पण मला ती साडी इतकी आवडली होती की , मी डॉक्टरांना सांगितले की, ""बाईंनाही साडी नेसून पाहिल्यावरही नाही आवडली तर ती माझ्यासाठी ठेवायला सांगा. मी ती नेशीन."" ""इरावतीने नेसलेली साडी तू नेसशील ?"" डॉक्टरांनी विचारले. त्यावर मी पटकन् म्हणाले, "" त्यांचा नवरा मला चालतो, मग त्यांची साडी का नाही चालणार ?"" मी असलं काही बोलेन अशी अपेक्षा नसल्यामुळे, आश्चर्याने वासलेल्या तोंड मिटायला डॉक्टरांना बराच काळ लागला. पान नं. - 200 खरेदीला वगेरे जाताना डॉक्टर उत्साहाने येत. त्यांचे सफाईदार इंग्रजी, दुस ~ ऱ्याला बोलून गार करण्याचे कसब ह्या त्यांच्या वेशिष्टयांचा बऱ्याच वेळेला वस्तूंच्या किंमती कमी करून मिळण्यासाठीही उपयोग व्हायचा. पॅरीससारख्या महागडया शहरातील दुकानातले आपले हे कसब वापरून त्यांनी खरेदी स्वत: करून दाखविली, खरेदी केलेल्या वस्तू नीट पॅक करून बॅगेत भरणे, कपडयांच्या घडया घालणे अशासारख्या गोष्टींतही ते मला मदत करीत. त्यामध्ये त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही, की ही बायकांटी कामं असं म्हणून नेहमीचे पुरुषांचे ताशेरे ओढले नाहीत. आत्तीला स्लिप डीस्कचा त्रास होता. त्यामुळे वाकणे, वजन उचलणे ह्याच्यासारखी कामे तिला करता यायची नाहीत. तिच्या व माझ्या सामानाची बांधाबांध आवरा-आवरी सगळी मला एकटीलाच करावी लागे, अशा वेळी माझा त्रास कमी व्हावा, मला मदत करावी म्हणून डॉक्टरांची सारखी धडपड चाले. शिवाय आत्ती फार वेळेचं बंधन पाळायची . तिला सर्व गोष्टी वेळेत व्हायला लागत. त्यामुळे तर माझी फार तारांबळ उडायची. एकदा तर मी केस धुतले होते आणि त्याचवेळी बाहेरही जायचे होते. ओले केस मोकळे सोडून बाहेर जाणेही आत्तीला आवडायचे नाही. शिवाय त्यात लंडन गारठवणारी थंड हवा ~ ही होती. छाब्रिया बाईंच्याकडून मला केस वाळवायला हेअर ड्रायर मिळाला. पण माझे लांब केल , माझे मीच वाळविताना माझी अक्षरश: सर्कस व्हायची. माझी त्रेधा पाहून डॉक्टरांनी ड्रायर आपल्या हातात घेतला आणि माझे केस हातात धरून वाळवायला सुरुवात केली. बघता बघता मी चार-पाच वर्षांची छोटी कांचन होऊन कोल्हापूरला पोहोचलो. तिथे माझ्या वडिलांच्या पुढयात बसलेली मी मला दिसायला लागले. माझे वडील माझ्या वेण्या घालायचे. दोन शिंगासारख्या दोन्ही कानांवरच्या वेण्या ताठपणे उभ्या राहायच्या. सगळे हसायचे पण माझे वडील माझ्या वेण्या घालायचे काही थांबायचे नाहीत. आज पित्याची जागा माझ्या पतीने घेतली होती. नातं बदललं होतं. पण हातातील वात्सल्य तसेच कायम होते. पान नं. - 201 86 मॉरिशमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी आपल्या घरी खुशालीची पत्रं पाठविली होती. पण डॉक्टरांनी दोन ओळीचं साधं कार्डही लिहिलं नाही. लांब असणाऱ्या माणसांना किती काळजी वाटते हे डॉक्टर लक्षात घ्यायचे नाहीत. मी आपली रोज त्यांच्या कानी कपाळी ओरडायची. शेवटी त्याला कंटाळून तरी डॉकटर पत्र लिहितील असं वाटायचं. पण कंटाळून त्यांनी ते काम माझ्या गळ्यात टाकलं आणि मलाच इरावतीबाईंना पत्र लिहायला सांगितलं. पत्र लिहिण्याचा कंटाळा कुणी केलेला मी पाहिला नव्हता. काही वेळेला मी चिडून म्हणायचीही सही करण्याचा तरी त्रास कशाला घेता ? अंगठेच उठवत चला. पण असल्या बोलण्याचाही डॉक्टरांच्यावर परिणाम होत नव्हता. लंडनमध्ये इरावतीबाईंची दोन-तीन पत्रं येऊन पडली होती. माझं पत्र त्यांना मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला होता. एका पत्रात नव्या गारंबीचा बापूचा अभिप्रायही कळविलेला होता. एकूणच त्या सगळ्या युरोप दौऱ्यात लंडनचे वास्तव्या संस्मरणीय ठरले. लंडनच्या आठवणी ह्या माझ्या सर्वात लाडक्या आठवणी आहेत. तिथल्यासारखे डॉक्टर पुन्हा कधीही दिसले नाहीत. भेटले नाहीत. जन्माला येऊन एकदा तरी पॅरीस पाहावे म्हणतात त्याचा पुरेपूर प्रत्यय आला. पॅरीस पाहताना डॉक्टर बरोबर असावेत ही गोष्टही अतिशय रोमांचकारी होती. काही योग तरी असे जुळून येत होते की कुठलीही ओढाताण न होता आपसूकच डॉक्टरांचा भरपूर सहवास मिळायचा. फ्रॅकफर्ट येथील सरकत्या जिन्याचा प्रकार झाल्यापासून आत्ती , जयश्री गडकर व त्यांच्या आईनी सरकत्या जिन्यावरून जाण्याचा धसकाच घेतला होता. पण इथली डिर्पांमेंटल स्टोअर्स इतकी अवाढयव्या आणि अनेक मजल्यांची असत की, ती बघायला जाताना ह्या सरकत्या जिन्यांचाच उपयोग करावा लागे. त्यामुळे ह्या तिघीही फक्त तळ ~ मजल्याचा भाग फिरून येत आणि तिथेच बसून राहात. पण आत्तीने मला मात्र अडविले नाही. ग्रुपमधील इतर मंडळीबरोबर ती मला वरचे सर्व मजले पाहायला पाठवायची. सुरुवातीला आम्ही सगळे एकत्रच असायचो. पण नंतर मात्र वेग ~ वेगळ्या विभागाला फिरता फिरता सगळे एकत्रच असायचो. पण नंतर मात्र वेग वेगळ्या विभागात फिरता फिरता सगळे पांगले जात आणि मग लक्षात यायचे पान नं. - 202 मी व डॉक्टर दोघेच तिथे आहोत. मग आमचा आनंद काय विचारावा ? आम्ही दोघे अगदी राजाराणी होऊन जात असू आणि हातात हात घालून अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत ती डिपार्टमेंटल स्टोअर्स पालथी घालत असू. अगदी शेवटच्या सप्तस्वर्गात पोहोचल्याची धुंदी असायची. पॅरीसला आयफेल टॉवर गेलो तेव्हाही अशीच सुरेख संधी चालून आली. आयफेलवर जाण्यासाठी प्रचंड आकाराच्या लिफ्ट्स आहेत. स्थानिक तशाच प्रवाशांच्या तिथे प्रचंड रांगा लागलेल्या असतात. आम्हीही रांगेत उभे होतो. आत्ती टॉयलेटमध्ये गेली होती. तिने नंबर मिळाल्यास मला व डॉक्टरांना पुढे जायला सांगितले होते. चारूकाका तिच्या सोबतीसाठी थांबले होते. डॉक्टर व मी लिफ्टने वर गेलो. ऑन दी टॉप ऑफ दी वर्ल्ड असल्यासारखे डॉक्टर हरखून गेले होते. या हू अशी आरोळी ठोकायचीच काय ती त्यांनी शिल्लक ठेवली होती. आता त्यांच्या अंगात 'संगम' मधील राजकपूर संचारला होता आणि 'संगम' मधील राधासारखी मी लाजून लाजून पाणी होत होते. अर्थात हा सीन काही फार वेळ टिकला नाही. कारण थोडयाच वेळात आत्ती व चारूकाकाही येऊन पोहोचले आणि डॉक्टरांचे पाय जमिनीवर टेकले. या प्रवासात डॉक्टरांच्यामुळे मी धीटही बनले. नेहमी मागे मागे राहणारी बुजऱ्यासारखी वागणारी मी. पण डॉक्टर मला मुद्दाम पुढे यायला लावीत. सर्वाशी बोलायला लावीत. चौकशी करण्याच्या काउंटरवर मला मुद्दाम पाठवीत आणि सर्व चौकश्या करून यायला लावीत. इंग्रजी भाषेचीही भीती वाटायची . संभाषणाचा सराव नसल्यामुळे आपले बोलताना काही चुकणार तर नाही ना ? याची सतत धास्ती वाटायची. पण एक इंग्लड वगळता सगळ्या युरोपमध्ये त्या त्या देशाची भाषा बोलली जायची. फ्रॉन्स, जर्मनीमध्ये तरी इंग्रजी येत असूनही तिथली रहिवासी मंडळी अट्टाहासाने आपल्याच भाषेत बोलत राहायची. ते पाहूनही मला माझ्या इंग्रजीबद्दल वाटणारा 'कॉम्प्लेक्स' दूर झाला. भाषेपेक्षा हातवारे करूनच काय हवे नको ते सांगावे लागे आणि हे कामही बहुतांशाने डॉक्टरच करीत आणि ते करून करून डॉक्टर अक्षरश: दमून जात. डॉक्टर सगळ्यात वेतागले ते माधे केस लांब का व कसे आहेत ही माहीती सांगूनच शेवटी शेवटी तर वेतागून ते म्हणायचे की ""आता मी यांना सांगतो की ही डोक्याला घासलेट लावते."" पुण्याच्या भानुविलासचे मालक पान नं. - 203 वि. वि. बापट यांची गांधी टोपी, कोट व धोतर हा वेष आणि माझ्या लांब वेण्या ह्या दोन गोष्टी सर्वांच्या खूपच कुतूहलाच्या . आम्हा दोघांनाही थांबवून फोटो काढले जायचे. काही वेळेला तर मुद्दाम फोटोग्राफर्स बोलावून हा कार्यक्रम वाहयचा. एखाद्या मुलीसारख्या दोन्ही वेण्या पुढे घेऊन मला फोटोसाठी उभे राहावे लागे. जिनिव्हा व झुरीचसारख्या शहरात पोहोचल्यावर तर डॉक्टरांनी आत्तीची सरकत्या जिन्याबद्दलची भीतीही घालवून टाकली. अक्षरश: तिच्या एका हाताला डॉक्टर व दुसऱ्या हाताला चारूकाका धरीत आणि लहान मुलाला पाऊल टाका यला शिकवावं तसं त्यांनी तिला त्या जिन्यावर चढायला उतरायला शिकवलं. आता तीही आमच्याबरोबर डिपार्टमेंटमध्ये स्टोअर्स, प्रक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असलेले सरकते जिने सहजतेने चढू उतरू लागली. पान नं. 203 87. हे चांदण्याचे चाळीस दिवस कसे सरले समजलेही नाहीत. मद्यापानाचा जिथे कोणताही विधिनिषेध बाळगला जात नाही. दिवस रात्रीच्या कुठल्याही प्रहरी पिणे जिथे निषिद्ध नाही. जिथे पाण्यासाठी दारू वाहते आणि पाणी दुर्मिळतेने वापरले जाते अशा वातावरणात राहूनही डॉक्टर अनुचित वागले असे घडले नाही. ते स्वतः स्वतंत्र होते. स्वतंत्र खोलीत राहात होते. स्वतःच्या पेशाने पीत होते. पण त्यांचा कुणाला उपद्रव अशा घडला असेल असे मला तरी स्मरत नाही. एकदा मात्र डॉक्टर लहान मुलासारखे रूसले होते. पॅरिसमध्ये असताना एके दिवशी अगदी जेवायच्या वेळी डॉक्टर गाढ झोपून गेले होते. ते दमले असतील म्हणून आत्तीने त्यांना उठवू दिले नाही. पण त्यांचे जेवण मात्र सर्वांच्या आधी प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेले होते. डॉक्टर झोपून उठल्यावर जेव्हा डॉक्टरांना कळले की त्यांना सोडून सर्व जेवले आहे, तेव्हा त्यांचा मूड एकदम ऑफ झाला,आणि रागाराने ते तसेच हॉटेलबाहेर निघून गेले. मध्यरात्री की पहाटे कधी परतले माहीत नाही. मी मात्र रात्रभर जागीच होते. सकाळी मी पान नं. 204 डॉक्टरांना त्यांच्या खोलीत निजलेले पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्या दिवशीही डॉक्टरांची समजूत घालताना दातांच्या कण्या कराव्या लागल्या. डॉक्टरांच्या ह्या लहान मुलासारखे रागावण्याने बाकीची मंडळीही वेतागली होती. दिवस हातात कमी,आणि पुढच्या शहरी जाण्याचे रिझर्व्हेशन झालेले होते. त्यामुळे प्रेक्षणीय स्थळे बघायला जाताना डॉक्टरना सोडूनच जायचे ठरले. मी तशीच चुळबुळत बसून राहिले. कारण डॉक्टरांशिवाय जाणंही जिवावर आलं होत, आणि डॉक्टरांशिवाय मी येत नाही असंही उघडपणे म्हणू शकत नव्हते. डॉक्टरांची समजूत घालण्यासाठी मला तर रडून रडून डोळे सुजवून घ्यावे लागले. पण त्यानंतर डॉक्टर इतके खुलले होते की, कुठले डॉक्टर खरे याचा मला पुन्हा एकदा संमभ्र पडला होता. हा एवढा प्रसंग वगळता मलासुद्धा डॉक्टरांच्या कडून कसलाच मनस्ताप झाला नाही. उलट सगळ्या प्रवासात अधिक मदत डॉक्टरांचीच झाली. प्रवास बराचसा सुसह्य त्यांच्यामुळेच झाला. एकदा तर मला आठवते की, आम्ही फ्रकफूर्टहून बर्लिनला जाण्यासाठी विमानतळावर आलो होतो. आमचे विमान सकाळी सव्वानऊ वाजताचे होते, आणि एअर-इंडियांचे ऑफिस दहा वाजता उघडणार होते. आमची तिकिटे त्या ऑफिसमध्ये राहिली होती. आता विमान चुकणार याची शंभर टक्के खात्री वाटायला लागली. पण ते आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. कारण पुन्हा एक दिवसाचा हॉटेलपासूनचा सगळा खर्च वाढणार होता. डॉक्टरांनी काय चमत्कार केला माहित नाही. दहा वाजता उघडणारे एअर-इंडियांचे ऑफिस डॉक्टरांनी नऊ वाजताच कसे उघडायला लावले त्यांचे त्यांना माहीत, आणि आम्ही ठरल्या प्रमाणे सव्वा नऊच्या विमानाने बर्लिनला रवाना झालो. 88 ह्या युरोपच्या प्रवासानंतर मात्र आम्हाला तीव्रतेने संसार थाटावा असे वाटा यला लागले. मुंबईत आल्यावर आता हा विषय कसा 'उघड' करायचा ह्याच विचारात मी व डॉक्टर होतो. स्वप्न्नाच्या दुनियेतून आता वास्तवाच्या जगात यायलाच हवे होते. हे वास्तव होते. त्याचे चटके बसणार होते. ते पान नं. - 205 सोसण्याची आमची तयारी होती. निदान सुरुवातीचे काही दिवस तरी त्रास होणारच होता. हे प्रवाहाच्या उलट दिशेने पोहणे होते. दमछाक अपरिहार्य होती. कदाचित नाकातोडांमध्ये पाणी जाऊन जीव घुसटण्याचीही शक्यता होती. पण त्याला आता दुसरा कोणाताही उपाय नव्हता. याबाबतीत डॉक्टरांचे व माझे एक ठरले होते की, डॉक्टरांनी आपल्या घराची आघाडी सांभाळावी आणि मी माझ्या घराची. जे काही घडलं आहे आणि आमची पुढे काय करायची इच्छा आहे ते ज्याचे त्याने आपापल्या घरच्या लोकांच्या समोर मांडायचे. म्हणजे साहजिकच या विषयाला घरच्या लोकांच्या समोर मांडायचे. म्हणजे साहजिकच या विषयाला आपोआप तोंड फुटले असते. मग आत्ती नक्कीच डॉक्टरांशी या बाबतीत बोलेल. वादही होईल. पण त्यातूनच का होईना काही तरी मार्ग नक्कीच निघेल. असा एकूण अंदाज आम्ही करत होतो. डॉक्टरांचे नातेवाईक पुष्तळच होते. सगळे भाऊ आणि एक बहीण त्यांच्याहून मोठे. शिवाय डॉक्टरांच्या आईही जिवंत होत्या. पण याही पेक्षा कठीण प्रश्न त्यांच्यासमोर होता तो इरावतीबाईंना सांगण्याचा. इरावतीबाईंना डॉ. दूर करणार नसले तरी , त्यांना त्यांच्या संसारात आणखी एका स्त्रीचा डॉक्टरांची पत्नी म्हणून होणारा प्रवेश कितपत रुचेल हा प्रश्नच होता. कारण इरावतीबाई कितीही स्थितप्रज्ञ, सोशीक , मोठ्या मनाच्या , क्षमा शील व वृत्तीच्या देवतेसारख्या असल्या तरी शेवटी त्याही एक स्त्रीच होत्या. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया तिखट झाली तर त्यात नवल नव्हते. डॉक्टर कितीही बेपर्वा, बेदरकार, धाडसी, मनात येईल तेच करणारे असले तरी त्या प्रसंगासाठी मात्र त्यांना निश्चयाचे बळ दिवसेंदिवस गोळा करावे लागत होते. माझी परिस्थिती निराळी नव्हती. मीही मनाची तयारी करतच होते. आत्ती समोर विषय कसा उघड करावा याची मनात व हरप्रकारे जुळणी करत होते. आम्ही युरोपहून परतल्यापासून आत्तीचे शूटिंग चक्र पुन्हा जोरात फिरत होते. मुंबई-कोल्हापरू-मद्रास अशी तिची त्रिस्थळी यात्रा सुरू होती. त्यातून तिच्याशी निवांत बसून बोलावे इतका वेळ मिळत नव्हता, आणि मलाही तोंड उघडायचे धाडस होत नव्हते. आत्ती माझी आई असली तरी मुलांना वडिलांचा जसा धाक , दरारा वाटतो तसा मला आत्तीबद्दल वाटायचा. त्यामुळे विषयाला तोंड फुटत नव्हते. पान नं. - 206 गोष्टीशी संबंध तरी त्याचे पडसाद, पडछाया आमच्या घरावर उमटली. कोल्हापूरचे बाबा व सौ. माईंचे जावई नरेंद्र काटकर यांचे अकाली निधन झाले. सौ.माई तर आत्तीला आपली मोठी मुलगीत मानीत. त्यामुळे माईंच्या घरा इतकेच ह्या घटनेचे दु:ख आमच्या सर्व घरालाही होते. ह्या अशा प्रसंगामुळे माझा विषय आत्तीसमोर काढणे मला योग्य वाटत नव्हते. पण त्यामुळे आमच्या विषयाचा काही तरी सोक्षमोक्ष लागणे लांबणीवर पडत होते. 89 चित्तरंजन कोल्हटकरांना घेऊन सुरू झालेले गारंबीचा बापूचा प्रयोग चालू होते. चित्तरंजन यांच्या बापूबद्दल संमिश्र प्रतिक्रिया होती. त्याचे पडसाद सिनेमा नाटकविषयक साप्तहिकांतूनही उमटत होते. आम्ही युरोपहून परत आलो तेव्हा नाटक सुरु होऊन जवळजवळ दीड महिना होऊन गेला होता. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नेमके डॉक्टर परत (युरोपहून) आल्यावरच. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात 'रसरंग' या साप्तहिकामध्ये पत्रकार वसंत भालेकर यांनी घेतलेली चित्तरंजन कोल्हटकरांनी बापू का स्विकारला ? चंद्रलेखाचे निर्माचे मोहन वाघ तर पत्र लिहून डॉक्टरांना कळवीत होते की, डॉक्टरांच्या तारखांच्या अभावी आणि काही ठिकाणी दौऱ्याला न येण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना गारंबीच्या बापूतून मोकळे केले होते. पण त्याचवेळी चंद्रलेखेने तुझे आहे तुजापाशीचे प्रयोग डॉक्टरांच्या सवडीने करायचे ठरवले होते. तर नव्या नाटका विषयीही बोलून ठेवले होते. पण रसरंगमधील चित्तरंजन ह्यांच्या मुलाखतीतमध्ये डॉक्टरांच्या अनेक दुर्गुणाचा पाढा वाचलेला होता. विशेषत: डॉक्टरांनी काढ लेल्या चिमट्यामुळे काळा-निळा झालेला आशालता यांचा दंड पाहूनच चित्त रंजन यांना विलक्षण चिड आली होती, आणि एका बेताल नटामुळे एक चांगेल नाटक बंद पडू नये म्हणून त्यांनी बापूची भूमिका स्वीकारली होती. हे चिमटा प्रकरण कसे थोडयाफार नाटयव्यावसायिकांनाच माहीत होते. पण मुलाखती पान नं. - 207 मुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलो. एरवी डॉक्टरांच्या वाऱ्यालाही उभी न राहू शकणारी मंडळी डॉक्टरांची चेष्टा करायची, ""काशिनाथपालून सांभाळा हं. तो चिमटे काढतो."" 'रसरंग' मधील ती चित्तरंजन यांची मुलाखत, डॉक्टरांची ही अशी होणारी चेष्टा ह्या सर्व गोष्टींचे मला मनस्वी दु:ख व्हायचे. हा विषय डॉक्टरांच्याजवळ काढून त्यांना आणखी मनस्ताप देणेही मला योग्य वाटत नव्हते. 'गारंबीच्या बापू' मध्ये बापूच्या संदर्भात बापूच्या मावशीच्या तोंडी एक वाक्या आहे--""आपल्या माण सांनी पांघरूण घालायचं असतं. अशा त्यांच्या अब्रुच्या चिंध्या करून वेशीवर टांगायच्या नसतात. त्या चव्हाटयावर मांडायच्या नसतात."" माझेही निचार याहून निराळे नव्हते. मात्र एक दिवस डॉक्टरांनी स्वत:च हा विषय माझ्याकडे काढला--- ""रसरंग वाचलास का ? त्याबद्दल काही विचारणार नाहीस का ?"" ""कोणती आनंदाची बातमी आहे म्हणून विचारायची ? आणि तसं स्पष्टीकरण द्यावसं वाटलं तर तुम्ही आपणहून द्यालच. "" मी म्हणाले. त्या चिमटा प्रकरणविषयी बोलताना डॉक्टर म्हणाले--- ""गारंबीच्या तिसऱ्या अंकात शेवटच्या प्रवेशात ते घडले. शेवटचा प्रवेश हा फार टेन्सचा असतो. माझी उलघाल, माझे उठणे-पडणे आणि त्याच वेळी माझे संवाद म्हणणे हे एका वेळी सुरू असेत. त्या वेळी राधा ( आशालता ) बापूला सावरत असते. त्याच्या क्षोमाला आवर घालत असते. अशा वेळी आशालताकडून एक ऑक्शन दरवेळी व्हायची की माझे लक्ष विचलित व्हायचे. त्या वेळेचा मूड सुटतो की काय, असं वाटायचं. मी बऱ्याचदा ती अक्शन न करण्याबद्दल तिला सांगतो. पण तिच्याही ते त्या वेळी लक्षात राहात नव्हते की काय कुणास ठाऊक ? आणि ती नेमकं तेच दरवेळी करायची. त्या दिवशी माझाही राग अनावर झाला. इतकं सांगूनही आशाच्या ते लक्षात राहात नाही तर तिला लक्षात राहील अशी आठवण राहावी म्हणूनच मी तो चिमटा तिला काढला."" डॉक्टरांचे म्हणणे की हे सर्व स्पष्टीकरण आता कितीजणांना देत बसायचं ? काही जणांचे मत होते की डॉक्टरांनी हे सर्व एकदा वृत्तपत्रांतून मांडावे. पण पान नं. - 208 डॉक्टरांच्या मते ते तेवढयावर थांबले नसते. कारण डॉक्टरांच्या लिहिण्यावर ती मंडळी आणखी काही तरी लिहिणार . एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्याशिवाय त्यातून काहीही निष्पन्न झाले नसते. तेव्हा डॉक्टरांनी त्यावर मौन पाळणेच स्वीकारले. हा शहाणपणाचा मार्ग असला तरी , डॉक्टरांच्या हातून चुका झाल्याच होत्या म्हणून ते गप्प राहिले. नाहीतर त्यांना नक्कीच उत्तर दिले असते, असे म्हणायलाही तोंड धरता येत नाही हेच खरं. 90 डॉक्टर माझ्यामुळे सध्या तणावात होते. त्यामध्ये आणि अशा प्रसंगाची भर पडत होती. त्यामुळे डॉक्टरांच्यावरील मानसिक ताण अधिकच वाढत होता. तो तसा ताण घेऊन वावरणे डॉक्टरांसारख्या उतावळ्या स्वभावाच्या माणासाला कठीण जात होते. 'गारंबीचा बापू' मध्ये डॉक्टर जेव्हा काम करायचे तेव्हा त्यांची ही अस्वस्थता त्यांच्या कामातही त्यांना छळायची. त्या नाटकात बापू देवासमोर राधेला कुंकू लावून मंगळसूत्र घालतो आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. त्या प्रसंगाच्या वेळी त्यांना नेमकी माझ्यासमोर भविष्यात होणार्या विवाहाची आठवण होऊन ह्दयातील धडधड वाढायची . तर राधा जेव्हा आपल्या मुलाची जात कोणती असेल अक्करमाशी असे विचारते तेव्हा डॉक्टर कमालीचे बेचेन व्हायचे. डॉक्टरांच्या सुपीक डोक्यातून त्या वेळी अनेक कल्पना निघत. इरावतीबाईंना घटस्फोट न देताही मला पत्नीपदाचा कायदेशीर दर्जा कसा देता .येईल याच्या ~ सारख्या विचारात ते असायचे. घरच्या मंडळीसमोर वेदिक पद्धतीने विवाह करायचा हे तर ठरले होतेच. पण या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी डॉक्टरांनी एक उपाय शोधून काढला होता. गॅझेटमधून ते माझे नाव बदलून घेणार होते. -कांचन काशिनाथ घाणेकर. कारण आपल्याला हवे ते नाव घेण्याचा आणि तो प्रचलित करण्याचा कायदेशीर हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. तेव्हा सरकारी मोहर लागूनच मला डॉक्टरांचे नाव मिळू शकणार होते. पान नं. - 209 सर्वात महत्वाचा मुद्दा होता मुलाचा. त्याच्या औरसपणाचा, आणि तो माझ्या द्दष्टीने फार महत्वाचा मी मानीत होते. मी माझ्या आयुष्याचे हवे ते करू शकत होते. पण जन्माला येणाऱ्या जिवाशी. त्याच्या आयुष्याशी खेळू इच्छीत नव्हते. मी एक वेळा माझ्या प्रेमाकरिता माझे आयुष्य समर्पित करू शकत होते. पण आमच्या सुखासाठी , प्रेमासाठी एका नव्या जीवाला अपमानित जीवन जगायला लावण्याचा आम्हा दोघांना काहीही अधिकार नव्हता, आणि म्हणूनच याबाबतीत मी डॉक्टरांना अगदी निक्षून सांगितले होते की, आपल्या मुलाला तुम्ही तुमचा कायदेशीर वारस म्हणून जगापुढे स्वीकारणार असाल, त्याला तुमचे कायदेशीर नाव लावता येणार असेल तरच तो या जगात जन्माला येईल. त्यावर डॉक्टर म्हणाले होते----- ""ज्या मुलांना वडिलांचे नाव लावता येत नाही त्यांच्या बाबतीती हा प्रश्न येईल. तुला जेव्हा मी उघडपणे पत्नी म्हणून स्विकारतो तेव्हा हा प्रश्न येतोच कुठे ? त्यातूनही तुला हे सर्व अधांतरी वाटत असेल तर माझ्याच मुलाला मी दत्तक घेईन. मग तरी तो माझा कायदेशीर वारस होईल ना ?"" डॉक्टरांच्या डोक्यात अशा अफलातून कल्पना येत. त्यांचे वादविवाद करणेही काही वेळा ऑइतके मुद्देसूद असे की , युरोपच्या दौऱ्यात आत्ती त्यांना म्हणा ~ यचीही की--- ""काशिनाथ , तुम्ही डॉक्टर आणि नट होण्यापेक्षा वकील व्हायला पाहिजे होते."" 91 या वेळी डॉक्टर ' मला काही सांगायचंय् ' च्या दौऱ्यावर जाणार होते . त्या दिवशी सकाळी प्रवासाला निघण्यापूर्वी निरोप घ्यायला डॉक्टरांचा फोन आला होता . डॉक्टर दुपारच्या मद्रास मेलने जाणार होते . नेहमीप्रमाणे किती दिवसांचा दौरा , कुठल्या तारखेला , कुठल्या दिवशी , कुठल्या गावी , कोणत्या थिएटरमध्ये , किती वाजता प्रयोग असेल याची जंत्री सांगून झाली . ती सर्व नोंद करून पान नं . - 210 ठेवायला सांगितली . ही अशीच एक यादी इरावतीबाईंच्याकडे . शक्य झाल्यास त्या त्या गावातील हॉटेल अथवा थिएटरचे टेलिफोन नंबर असल्यास डॉक्टर देऊन ठेवीत . बसचा प्रवास कधी असेल आणि हॉटेलमधील वास्तव्य किती असेल हेही डॉक्टर सांगून ठेवीत . ही सर्व काळजी कशासाठी डॉक्टर घेत की , कधी चुकून त्यांची प्रकृती बिघडलीच अथवा अपघातासारखा प्रसंग उद््भवला तर त्या ठिकाणी आम्हा घरच्या लोकांना त्वरीत संपर्क साधता यावा , अथवा जाता यावे . हे सर्व सांगून झाल्यावर डॉक्टरांनी जरासं दबकतच मला सांगितलं की , "" तुला एक बातमी सांगायची आहे . ' त्या ' सखीची डिलिव्हरी झाली आहे . ते पाहायला जाताना तिने बोलविले आहे . हे माझं पहिलं मूल आहे . ते पाहायला जाताना तू मला बरोबर यायला हवी आहेस . "" हे ऐकल्यावर क्षणभर संताप उसळला . ताडकन नाही म्हणून सांगावंस वाटलं . पण डॉक्टर प्रवासाला निघाले होते . बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो हा संस्कार कुठे तरी जागा झाला . शिवाय डॉक्टर पिता झाल्याच्या आनंदात होते . त्यांचा हिरमोड करणेही जीवावर आले होते . मी ' येते ' एवढेच डॉक्टरांना सांगितले . हॉस्पिटलचा पत्ता विचारून घेतला . आत्ती मद्रासला गेली होती . मामीला ' जरा काम आहे , जाऊन येते . ' असे सांगून घराबाहेर पडले . बरोबर प्रवासाची बॅग घेऊनच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये येऊन थांबले होते . पण मी येईपर्यंत त्यांनी मूल पाहिले नव्हते . जन्मलेली मूलं ठेवण्याच्या खोलीजवळ आम्ही जाऊन थांबलो . आत उभ्या असलेल्या नर्सने पांढऱ्या कपडयात घट्ट लपेटलेल्या एका छोटया बाळाला काचेच्याजवळ आणून दाखविले . आम्हीही जरा पुढे सरकलो . मी उगीचच त्या बाळात आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यात काही साम्य आहे का , ते पाहात होते . काल जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्यात साम्य शोधणे वेडेपणाचे होते . पण मला पुढची काळजी पडली होती . जर हे मूल डॉक्टरांच्या सारखे दिसले आणि त्या बाईच्या नवऱ्याला समजले तर ? माझ्याच अंगावर शहारा आला . मानेनेच मी तो विचार झटकला , आणि डॉक्टरांना काय वाटते ते बघावे म्हणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले , तर ते मूल बघायचे सोडून माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखीत उभे होते . डॉक्टरांच्याकडे बघत मी विचारले . पान नं . - 211 "" निघायचं ? "" डॉक्टरांनी मानेनेच होकार दिला . डॉक्टरांच्या ट्रेनची वेळ झाली होती . त्यांना स्टेशनवर सोडून मी घरी यायचे आधीच ठरवले होते . गाडीत आम्ही दोघेही गप्प होतो . गाडीत ड्रायव्हर असल्या ~ मुळे काही बोलणेही योग्य नव्हते . स्टेशनसमोर येताना डॉक्टर म्हणाले - - - "" डब्यापर्यंत चल ना . गाडी सुटायला अजून अवकाश आहे . आमच्या मालकीणबाईंचा आम्हाला तेवढाच अधिक सहवास मिळेल . "" मी खुदकन् हसले . साखरपेरणी करावी तर ती डॉक्टरांनीच . आम्हा दोघांवर मघापासून असलेला ताणही आता सेल झाला होता . गाडी सुटेपर्यंत मी थांबले होते . मी गाडी सुटायच्या वेळी डब्यातून खाली उतरताना . डॉक्टरा कानाशी कुजबुजले - - - - - "" आज आमचं भाग्य . राणीसरकार जातीनं आम्हाला निरोप द्यायला आल्या . "" कसं रागवायचं ह्या माणसावर ? "" सांभाळा . सौकर या . "" असं म्हणत मी डॉक्टरांना निरोप दिला . माझ्या किंवा डॉक्टरांच्या घराशिवाय बाहेर घडलेली माझी आणि त्यांचीही इतक्या वर्षांतील ( आमच्या लग्नापूर्वीची ) एकमेव भेट . तीही अशी विचित्र परिस्थितीमधील . 92 आम्ही युरोप दौऱ्याहून आल्यानंतर डॉक्टरांच्या दोन नव्या मराठी चित्रपटांचे शूटिंग सुरूही झाले होते . यो दोन्ही चित्रपटातचे निर्माते - मराठी होते . पण मराठी प्रेक्षकांमध्ये असलेली डॉक्टरांची क्रेझ ही मंडळी जाणून होती . त्यामुळे डॉक्टर काशिनाथ घाणेकरही हीरो म्हणून हवेत असा त्यांचा आग्रह होता . यातील ' देवमाणूस ' या चित्रपटाचे निर्माते होते ए . कृष्णमूर्ती , तर ' झेप ' या चित्र ~ पटाचे निर्माते होते प्रख्यात अभिनेत्री वेजयतीमांला व तिचे पती . डॉ . सी . बाली या दोन्हीही चित्रपटांते दिग्दर्शक होते . राजदत्त . दोन्हीही चित्रपट अजिबात चालले नाहीत . शिवाय त्या चित्रपटामधून पान नं . - 212 डॉक्टरांचा काही प्रभावही जाणवला नाही . राजदत्त - डॉक्टर ह्या युतीचा आणखी एक चित्रपट म्हणजे ' चंद्र होता साक्षीला ' तो तर फारच रखडला . डॉ . लागू , यशवंत दत्त , कानन कौशल , आणि डॉक्टर अशी नामवंत मंडळी असूनही हा चित्रपट प्रभावशून्य ठरला . त्यामुळे डॉक्टरांचे चित्रपट - व्यवसायातील भवितव्य जवळ जवळ अंधारकारमय झाले . ' देवमाणूस ' चे बाह्यचित्रिकरण डॉक्टरांच्या चिपळूणच्या जवळपास म्हणजे कोयनानगर , पोफळी , दापोली या भागात झाले होते . डॉक्टरांचा मुक्काम त्या निमित्ताने चिपळूणला होता . डॉक्टरांनी आपल्या आईलाही शूटिंग कसे असते ते तिथे नेऊन दाखविले होते . इरावतीबाईंनी दोन - चार दिवस जाऊन आलेल्या होत्या . मीही तिकडे येऊन जावे अशी डॉक्टरांची इच्छा होता . पण ते कसं शक्य होतं ? डॉक्टर मात्र रोज मला चिपळूणहून फोन करायचे . नशीब त्या वेळी आत्ती मुंबईत नव्हती . मी आता कधी आत्तीकडे विषय काढते असे डॉक्टरांना होऊन गेले होते . पण मला अजून संधी सापडत नव्हती . इकडे डॉक्टरांची अधीरता वाढतच होती . अशा वातावरणात एक दिवस डॉक्टरांनी भर दुपारी मला फोन करून सांगितले की , आमचं सर्व त्यांनी इरावतीबाईंना सांगून टाकले आहे . एवढं सांगूनचं डॉक्टर थांबले नाहीत तर त्यांनी तू इरावतीशी बोल असे सांगून इरावतीबाईंच्या हातात फोन दिला . एक सेकंदाच्या त्या काळात दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकणे , पंख्याखाली असूनही दरदरून घाम फुटणे अशासारख्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतला . इरावतीबाई समोर नव्हत्या तरी घशाला कोरड पडली होती . मी सगळे धेर्य कानांत आणि ओठात साठवत होते . एवढयात इरावतीबाईंचे शब्द कानावर आले - - - "" काय म्हणतात हे ? "" इरावतीबाईंचा स्वर साध्या पट्टीतच होता . मीही तितक्याच सपाट आवाजात उत्तर दिले , "" खरं आहे ते . "" एवढे तीनच साधे शब्द बोलूनही किती तरी हलकं वाटत होतं , दडपण दूर झालं होतं . इरावतीबाई अधिक काही बोलल्या नाहीत . त्यांनी फोन पुन्हा डॉक्टारांच्या पान नं . - 213 हातात दिला . डॉक्टरही आता खूपच रिलॅक्स वाटत होते . एखादी लढाई जिंक ~ ल्याच्या आनंदात होते . आणि मला सांगत होते - - - - "" ठरल्याप्रमाणे मी माझ्या बाजूने सर्व सांगून झाले आहे . आता तू हे कधी करणार आहेस ते सांग . "" "" लौकरच . "" असं म्हणून मी फोन खाली ठेवला . पण हा लौकर कधी उगवणार हे माझं मलाच कळत नव्हतं . आत्तीबरोबर बोलण्याचा निवांतपणा मिळत नव्हता . हे जरी खरं असलं तरी ते संपूर्णतया . खरं नव्हतं . आत्ती काही तीनही त्रिकाळ घराबाहेर राहात नव्हती . खरी गोष्ट होती ती ही की , आत्तीची लग्नासंबंधीची आग्रही मतं मला माहीत होती . आणि जनरीतीला सोडून असणारे हे अशा प्रकारचे लग्न मला करायचं आहे . डॉक्टरसारख्या एका विवाहित पुरुषावर मी प्रेम करते आहे हे सांगण्याचे धाडसच माझ्यामध्ये अजून येत नव्हते . नुसते वाटणे आणि प्रत्यशात ते करणे यात किती अंतर असू शकते याचा मला अनुभव येत होता . कुणामार्फत हे आत्तीपर्यंत पोहोचवावे किंवा तिला पटवून द्यायला सांगावं तर ही असली गोष्ट आत्तीला पटवून द्यायला कोण तयार होणार ? कारण माझ्या आधी त्या मध्यस्थांचा उद्धार व्हायचा . माझ्यासाठी इतरांना मनस्ताप द्यायची मला अजिबात इच्छा नव्हती . जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी मी घेणार होते . दुसऱ्या दिवशी डॉक्टारांच्याकडून आदल्या दिवशीच्या बोलण्याची इरावती बाईंची प्रतिक्रिया समजली . त्यांनी पहिलाच प्रश्न डॉक्टरांना विचारला , "" मीही अशीच वागले तर चालेल का ? "" "" अजिबात चालणार नाही . तूही मला हवीस . "" डॉक्टरांचे त्यावर उत्तर त्यावर आपण घटस्फोट घेऊ या असे इरावतीबाईंनी डॉक्टरांना सुचविले , पण त्यालाही डॉक्टरांनी ठाम नकार दिला आणि त्यातूनही इरावतीबाईंनी तो अट्टाहास केलाच तर त्यांना ' घाणेकर ' आडनाव लावून मुंबईत प्रॅक्टिस करता येणार नाही असा दमही भरला . मेडिकल प्रॅक्टिस हा इरावतीबाईंचा दुसरा श्वास होता आणि दहा वर्षांनंतर इतकी जम बसलेली प्रॅक्टीस पुन्हा दुसऱ्या नावाने करायची म्हणजे पहिल्या ~ पासून सुरुवात करायला लागणार होती . घटस्फोट घेण्याचा इरावतीबाईंचा इरादा पान नं . - 214 मोडून पडला असावा . पुढचे जे डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून मात्र मला खरंच नवल वाटलं . इरावतीबाई म्हणाल्या म्हणे की , निदान मुलगी तरी चांगली शोधली आहे . पण हे सर्व करण्याआधी तिची नीट व्यवस्था करा . नाहीतर तशीच तिला दारात आणून उभी कराल . , तिचं मूल शिकण्यात हुशार निघालं तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन . इरावतीबाई खरंच स्थितप्रज्ञ आहेत असं आता मला वाटायाला लागलं , कारण प्रत्यक्ष नवऱ्यामद्ये , त्याच्या प्रेमामध्ये , संसारामध्ये त्या भागीदार स्वीकारायला तयार झाल्या होत्या . सहसा स्त्रिया त्याला तयार होत नाहीत . मीही स्त्री असून ते स्वीकारलं होतं , कारण मी इरावतीबाईंच्या संसारात शिरले होते . मला डॉक्टर हवेत म्हटल्यावर मला ही तडजोड करणे भागच होते . पण इरावतीबाईंना हे असं ' पडतं ' घेण्याचं काही कारण नव्हतं . पण त्यांनी तरीही हे सर्व स्वीकरण्यात मोठेपणा दाखविला होता . मात्र त्यांना मूल नाही ही फार मोठी उणीव त्यांच्यामध्ये आहे म्हणून डॉक्टर माझ्याशी दुसरा विवाह करायला निघाले आहेत असे मात्र डोळ्यात पाणी भरून त्यांनी डॉक्टरांना ऐकवले . त्या वेळी त्यांना बरं वाटावं म्हणून की काय , डॉक्टर बोलून गेले - - - "" आणि तिलाही उद्या मूल झालं नाही तर ? माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणूनलच मी हे करतोय . "" इरावतीबाईंना बरं वाटावं म्हणून जरी डॉक्टर हे बोलले असले तरी मला मात्र हे ऐकून फार राग आला , आणि दु : खही झाले होते . त्यांच्या सर्वांच्याच प्रतिक्रिया समजल्या नाहीत . पण डॉक्टरांनी त्यांना काय उत्तरं दिली ते मात्र डॉक्टर मला सांगायचे . पण ही गोष्टच अशी विचित्र , नाजूक होती की तिला साथ करायची की विरोध करायचा अशा संभ्रमात मंडळी पडायची . या सर्वापेक्षाही मी कधी पाऊल उचलते , आणि कोणता निर्णय आत्ती घेईल त्याबद्दल डॉक्टर अधिक उत्सुक होते , मात्र इरावतीबाईंशी डॉक्टरांचे लग्न ठरले होते त्यावेळी त्यांची जी परिस्थिती झाली होती , तशीच माझी परिस्थिती आता झाली होती . पान नं . - 215 93 मी जशी आत्तीला कसं सांगावं अशा विवचेनेत होते तसेच डॉक्टरही त्या वेळी आपल्या लग्नाचा निर्णय वडिलांना कसा सांगावा या विचारात रखडले होते . या उलट इरावतीबाईंनी स्वत : चा निर्णय ठरताच आपल्या वडिलांना सांगून त्यांची संमती कधीच घेतली होती . आणि आपला हा लग्नाचा निर्णय डॉक्टर स्वत : च्या वडिलांना सांगून त्यांचा होकार कधीच मिळवतात याची प्रतिक्षा करायच्या . पण डॉक्टरांची परिस्थिती माझ्यासारखी होती . त्यांना प्रश्न पडला होता वडिलांना सांगायचं कसं ? कारण डॉक्टर नुकतेच बी . डी . एस . झालेले होते . लेक्चरर म्हणून नोकरी लागून सहा महिने झाले होते . आणि विशेष म्हणजे तीन मोठे भाऊ अजून लग्नाचे होते . इरावतीबाई सारख्या पत्रातून डॉक्टरांना वडिलांना सांगायला इतका का वेळ लागतोय याची चौकशी करायच्या . पंचविशी उलटलेल्या तरुणाला स्वत : च्या लग्नाबद्दल वडिलांना सांगायला इतका संकोच वाटतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे . पण डॉक्टरांना संकोच वाटण्यापेक्षा वडिलांची भीतीच अधिक वाटायची . त्यामुळे शेवटपर्यंत त्यांना स्वत : हे जाऊन वडिलांना सांग ण्याचे किंवा पत्राने कळविण्याचेही धाडस झाले नाही . डॉक्टरांनी आपले मोठे बंधू भाऊसाहेबांच्याद्वारा वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली . आणि मगच पुढल्या गोष्टी ठरल्या . घरची आघाडी यशस्वी रीत्या लढविल्यामुळे डॉक्टर आता कुठल्याही तणावा खाली नव्हते . पण त्याच्या उतावळ्या स्वभावाने आणि दारूच्या सवयीने गोंधळ केलाच . मित्रमंडळींच्याबरोबर झालेल्या एका ' ओल्या ' पार्टीत डॉक्टरांनी जाहीर करून टाकले की , कांचनवर त्यांचे प्रेम आहे , आणि तिच्याबरोबर ते लग्न करणार आहेत . दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला फोन करून आदल्या रात्रीचा सर्व किस्सा सांगून स्वत : ची चूक झाल्याचे कबूल केले . पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि ओठांतून निघालेला शब्द कधीच परत येत नाही . शिवाय दारूची पार्टी असली तरी , इतकी खळबळजनक बातमी विसरून जाण्याइतकी कुणाचीच शुद्ध हरपलेली नसणार . निदान पार्टीत अनोळखी माणसं असतील ह्या आशेने तिथे कोण कोण होते विचारताच डॉक्टरांनी पहिलेच नाव सांगितले - - नाटककार मधुसूदन कालेलकर . पान नं . - 216 नाव ऐकूनच मला धस्स झालं . कारण आता ही बातमी नाटय - चित्रपट व्यवसायात वणव्यापेक्षाही अधिक वेगाने पसरणार होती , आणि वणवाच तो . होरपळ अटळ होती . मी माझ्या लग्नाचे स्वत : सांगून जेवढी आत्ती चिडली असती त्याच्या दुप्पट ही अशी बाहेरून बातमी आल्यामुळे आत्ती चिडली . तिची झालेली बेअब्रु आणि मी तिचा केला विश्वासघात ह्यामुळे एखाद्या नागिणीसारखी ती चवताळून उठली . ही बातमी मात्र मुंबईतून तिला कळली नाही . ती सांगण्याचे परमकर्तव्य पुण्याच्या भरत नाटय संशोधन मंदिरचे श्रीकांत भिडे यांनी अगदी रातोरात तातडीने पुण्याहून मुंबईला येऊन केले . श्रीकांत भिडे हे अगदी आमच्या कुटुंबि यांतील एक असल्यासारखे होते . त्यांची आत्तीवर अगदी अतोनात श्रद्धा आणि भक्ती होती . त्या दिवसापासून आत्तीची श्रीकांत भिडे यांच्याबद्दलची आपुलकी अधिकच वाढली . कारण हे सत्कर्म त्याने एकटयानेच केले होते . पण त्याचबरोबर माझ्या घरची सर्व मंडळी , चारूकाका . यांच्याबद्दल आत्तीच्या मनात एक प्रकारची अढीच बसली . ह्या सर्व मंडळींची साथ मला असल्याचे तिला निश्चितपणे वाटायला लागले . त्यामुळे ह्या सर्व मंडळींची तिने न भूतो न भविष्यति निर्भर्त्सना केली . त्याचे मुख्य कारण म्हणजे ही बातमी समजूनही एक श्रीकांत भिडे वगळता ही सर्व मंडळी चूपचाप बसली . त्यांनी ती बातमी आत्तीपर्यंत जाऊच दिली नाही . कारण या मंडळींचे आत्तीइतकेच माझ्यावरही प्रेम होते . आत्तीच्या क्षोमापासून मला वाचविण्यासाठी ही मंडळी गप्प बसली . तर ते सर्व मला साथ करणारे समजून एक श्रीकांत भिडे वगळता सर्वांच्यावर आत्तीने दीर्घकाळ रोष धरला . ही बातमी समजल्यानंतर जेव्हा चारूकाका प्रत्यक्ष भेटले तेव्हा ते वेतागून म्हणाले , "" मालाबाई ( माझ्या कांचनमाला या पूर्ण नावाचे चारूकाका छोटे नाव करीत ) तुम्ही चारूकाकाच्या टाळक्यावर आता केस राहू देत नाही . "" डॉक्टरांच्या चाहती म्हणून प्रेम करणारी मी , त्यांच्यावर प्रेयसी म्हणून प्रेम करते हे कळल्यावर चारुकाकांना धक्का बसला असणारच . पान नं . - 217 94 मी मात्र डॉक्टरांच्यावर मनोमन चडपडत होते . काय करून ठेवले होते हे त्यांनी ? सगळ्या गोष्टींना आता निराळीच कलाटणी लागणार होती . आत्तीच्या नजरेला नजर देणेही मला मुश्किल होऊन बसले होते . डॉक्टरांनी जी गोष्ट आधी तिला विचारायला पाहिजे होती , तिची त्या बाबतीत संमती घ्यायला पाहिजे होती त्याऐवजी ती गोष्ट अशी चव्हाटयावर मांडली गेली यामुळे तर आत्ती अधिकच दुखावली गेली होती . डॉक्टरांच्यावर तिचा याबाबतीत कायम रोष राहिला . आजही मला वाटतं की , डॉक्टरांनी पार्टीत चार लोकांसमोर हा जो शूर - पण गाजविला त्याऐवजी ते स्वतः सरळ आत्तीलाच येऊन भेटला असते तर नक्कीच तिने काही मार्ग काढला असता , आणि पुढची सगळी परवड तरी थांबली असती . आत्ती आमच्या ह्या विवाहाला सहजासहजी संमती देईल ह्या गेरसमजुती - मध्ये मी कधीच नव्हते . पण काही अटींवर ती तयरा होईल आता मात्र वाटत होते , आणि समजा तिने पूर्णपणे नकार दिलाच , नव्हे देईलच अशी शक्यता असली तरी ती माझ्यावर निदान दुसऱ्या कुणाशी विवाह करण्याची सक्ती करणार नाही याची खात्री वाटत होती . कारण मनाविरूद्ध असलेल्या पुरूषांशी संसार आणि संबंध किती क्लेशकारक असतो याचा तिने माझ्या वडिलांच्या सहवासात अनुभव घेतला होता . त्यामुळे असा मनाविरूद्धचा संबंध आणि संसार ती माझ्यावर लादणार नाही याची मला खात्री वाटत होती . एरवी तशी जबरदस्ती तिने माझ्यावर केलीही नसती . पण ही गोष्ट घराच्या चार भिंतीमध्ये न राहता डॉक्टरांच्यामुळे दवंडी पिटवल्यासारखी सर्वतोमुखी झाली होती . त्यामुळेही आत्ती अधिक बिथरली होती . मला मात्र खरी भीती वाटत होती ती बाबांची . त्यांची प्रतिक्रिया खूप तिखट होणार असं वाटायचं . पण झालं उलटंच . ते माझ्याशी आईच्या मृदुतेने वागले तर आत्ती पित्याच्या कठोरतेने वागली . पण बाबांनी मला डॉक्टरांच्यापासून जास्तीत जास्ती दूर करण्याचा प्रयत्न मात्र केला . मात्र माझ्या डॉक्टरांच्यावरील निष्ठेला धक्का लागू नये , ती डागाळू नये म्हणून संरक्षणही दिले . आत्मविश्वासाचं सामर्थ्य दिलं . प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याची हिंमत दिली . शब्दसृष्टीच्या पान नं . 218 ईश्वराची - ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीही मनोबल देऊन गेली . कोल्हापूरला बाबांच्यासमोर जाण्याची वेळ नोव्हेंबरमध्ये उगवली . आमची बातमी समजल्यापासून आत्ती खूपच अस्वस्थ होती . पणतिने हा विषय घरात काढला नाही , की मला कसलाही जाब विचारला नाही . ह्या सर्व प्रकाराची नेहमीचीच पध्दत होती . कुठलीही अडचण असो , संकट असो , काही ठरवायचे असो , ती ते बाबांच्याच समोर मांडायची आणि ते जसा सल्ला देतील त्याप्रमाणे ती वागायची . हे सर्व मलाही मान्य असले तरी आजही राहून राहून मला वाटते , आत्तीने माझ्याशी या विषयावर खडसावून , रागावून , प्रेमाने कसेही पण एकदा बोलायला हवे होते . पण आमच्या दोघींचा संवादच होऊ शकला नाही . याचे कारण म्हणजे लहानपणापासून आत्तीशी माझी जवळीक कधीच निर्माण होऊ शकली नाही . शिवाय तिने माझ्या दोन मामांची आठ मुले आणि मी यांत कधी भेदभाव केला नाही . आपली मुलगी म्हणून काही खास वागणे तिचे माझ्याशी नसायचे . माझी जवळीक राहिली ती माझ्या वडिलांशी , माझ्या आजीशी आणि आत्तीच्या जिवलग मेत्रिणींशी - पुण्याच्या माणिक बेहरेचे कायम वास्तव्य पुण्यात असायचे . तिलाही तिच्या घराचे व्याप होतेच की ! ती किती वेळा धावून येणार ? आणि खरं सांगायाचं म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी उबे राहणे म्हणजे आत्तीशी शत्रुत्व घेणे होते . आत्ती नाही बोलली तरी मी तिच्याशी का नाही बोलले असेही काहीजण म्हणतील , मी तोही प्रयत्न आत्तीबरोबर कोल्हापूरला ट्रेनने जाताना केला . ट्रेनच्या फर्स्टक्लास कूपेमध्ये जवळ जवळ चौदा तास आम्ही बरोबर होतो . आणि दोघीच होतो . आत्तीशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला . अक्षरशः जिभेवर मणामणाच्या बेडया पडाव्यात असे झाले . जीभच उचलेना . वाचा अक्षरशः दगड होऊन गेली . घसा कुणीतरी आवळून धरल्यासारखं वाटत होतं . अतिशय विल - क्षण अनुभव होता . पण आत्तीशी समोरासमोर बोलण्याची मी फार मोठी संधी गमावली . आणि दुदेवाच्या दशावतारांना सामोरी गेले . पान नं . 219 95 आम्ही कोल्हापूरला गेलो तेव्हा आत्तीचे ` घर गंगेच्या काठी ' चे शूटिंग होते . ती शूटिंग करत होती . पण तत्पूर्वी तिचे व बाबांचे बोलणे झाले असावे . कारण ती नसताना , आणि मी एकटी असताना बाबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो असताना मला प्रश्न विचारायला सुरूवत केली - "" तुझ्या व काशिनाथाबद्दल जे ऐकतो ते खरं का ? "" आत्तीने विचार - रावासा वाटणारा प्रश्न बाबा विचारीत होते . विषयाला तोंड तरी फुटले म्हणून बरं वाटलं . मान खाली घालून बसलेली , मी बाबांना मानेनेच होकार दिला , आणि बाबांचा मानेनेच होकार दिला , आणि बाबांचा स्वर तीव्र झाला . कडाडतच ते म्हणाले - "" मला वाटलं होतं तू हे सगळं झूठ आहे म्हणून सांगशील . तू माझा फार मोठा अपेक्षाभंग केला आहेस . तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती . इरावती - काशिनाथ चा सोन्यासारखा संसार का मोडतेस ? "" बाबांच्या शेवटच्या वाक्याने मात्र माझी खाली झालेली उठली . आता मला तोंड उघडणे भागच होते . आत्तापर्यंतचा आमचा सगळा प्रवास मी बाबांच्या समोर एकही शब्द राखून ठेवता उलगडून दाखविला . टाळी एका हाताने वाजत नाही हे जरी खरं असलं , विवाहित पुरुषावर प्रेम कऱण्याचा अपराध माझ्याकडून घडला असला तरी डॉक्टरांचा हात पुढे आल्याशिवाय मी माझा हात पुढे केला नव्हता हे अगदी पूर्ण सत्य होते . इरावतीबाईंचीही हे सर्व करण्याला संमती आहे हे मी सांगताच , बाबा आणखीनच उखडले . आपल्या प्रत्येक शब्दावर जोर देत ते म्हणाले , "" माझा मनुष्य - स्वभावाचा अभ्यास तुझ्याकडून कितीतरी अधिक आहे . कुठलीही स्त्री स्व - खुषीने सवत पत्करणार नाही . आणि तसं जर असेल तर ती स्त्री मनुष्य असणार नाही . देवता असेल . "" माझ्या द्दष्टीने तर त्या वेळी इरावतीबाई देवताच होत्या . बाबांनी त्या वेळी माझे बराच वेळ बौद्धिक घेतले . डॉक्टरांच्याबद्दलचे माझे प्रेम , ओढ म्हणजे अपरिपक्कता अनुभवाचा अभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे असे ते म्हणाले . माझ्या आयु ष्यात प्रथमच प्रेमी पुरुष म्हणून आलेल्या डॉक्टरांचा माझ्या मनावर खोलवर पान नं . - 220 उमटलेला ठसा हा त्यांच्या मते अजाणत्या वयातील माझे दिपून जाणे होते . डॉक्टर विवाहित असणे , शिवाय त्यांच्या माझ्यामधील पंधरा - सोळा वर्षांचे अंतर ह्या सर्वच गोष्टी बाबांना खटकत होत्या . बाबा हरप्रकारे मला डॉक्टरांच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते . अनेक उदाहरणे देऊन हे लग्न करणे अयोग्य आहे असे ते पटवीत होते . पण माझा निर्धार अभंग होता . मी माझ्या निश्चयापसून तसूभरही ढळायला तयार नव्हते . बाबांनी माझे पाणी ओळखले असावे , आणि एकच नवाच डाव त्यांनी माझ्यासमोर टाकला . ते मला म्हणाले - - - "" हा नोव्हेंबर महिना आहे . आजपासून बरोबर एक वर्ष तू आणि काशिनाथ एकमेकांशी न बोलता , न भेटता , न पत्र लिहिता राहून दाखवा . एक वर्षानंतर तुमची एकमेकांविषयीची ओढ आता आहे तशीच कायम राहिली आहे असं दिसलं तर मी तुझं काशिनाथाशी लग्न लावून देईन . पण या काळात फोनसुद्धा करायचा नाही . "" मी हसून मान डोलावली . बाबांचे म्हणणे मी मान्य एवढयासाठी केले की , माझा त्यांच्या शब्दावर आणि माझ्या संयमावर , निर्धारावर विश्वास होता . आणि मी हसले एवढयासाठी की , काही वर्षांपूवी बाबांनी आपल्या मित्राच्या मुलीवर केलेला प्रयोग ते माझ्यावर करू पाहात होते . त्यांच्या मित्राच्या मुलीच्या बाबतीत जसे घडले तसे माझ्याही बाबतीत घडेल याची त्यांना खात्री होती . बाबांच्या मित्राची मुलगीसुद्धा एका विवाहित माणसावर प्रेम करीत होती . आणि त्याच्याशी विवाह करू इच्छीत होती . अर्थातच ते कुणालाही पसंत नव्हते . तेव्हा त्या मुलीलाही बाबांनी त्या विवाहित व्यक्तीशी सहा महिने न बोलण्याची , न भेटण्याची अट घातली होती . पण बाबाच्या अंदाजाप्रमाणे सहा महिनेच काय एका महिन्यातच ती मुलगी त्या व्यक्तीला विसरून गेली , आणि तिने आईवडिलांनी ठरविलेल्या तरुणाशी विवाह केला , आणि सुखाने संसाराला लागली . आम्ही कोल्हापूरहून मुंबईला यायला निघालो त्या दिवशी बाबा आणि आत्ती बाबांच्या ऑफिसमध्ये बराच वेळ बोलत बसले होते . बाबांचा निरोप घेऊन , त्यांना नमस्कार करावा म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये शिरत होते त्या वेळी बाबा आत्तीला सांगत होते . - - - - "" तरुण वयातील वेडाचार आहे हा . पण जबरदस्ती , सक्ती करून पान नं . - 221 चालणार नाही . त्यामुळे चिडून ती अधिकच आपल्या विचारांना चिकटून राहील . कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो . काळ जाणे हे सर्वावर उत्तम औषध आहे . कुठलीही गोष्ट दीर्घकाळ एका ठिकाणी राहात नाही . ती वाढते तरी किंवा कमी तरी होते . आपल्याला दोन्हीही दिसेल . पण मला वाटतं तरुणापणातील हा आवेग फार काळ टिकणार नाही . "" मी अचानक ऑफिसमध्ये येईन असे बाबांना वाटले नव्हते . त्यामुळे तेही क्षणभर गोंधळून थांबले . पण ते भालजी पेंढारकर होते . त्यांनी क्षणात संभाषण पुन्हा सावरून घेतले . आम्हा दोघींना एकमेकीविषयी अढी न धरता राहण्याविषयी बजावले . 96 मुंबईला आल्यावर डॉक्टरांना फोन करणे भागच होते . तसे मी बाबांनाही सांगून आले होते . कोल्हापूरचा सर्व वृत्तान्त ऐकायला डॉक्टर खूपच अधीर झालेले होते . एखाद्या चातकासारखी ते माझी वाट पाहात होते . पण सर्व हकीकत ऐकून डॉक्टर हिरमुसले झाले . त्यांना निश्चित पण त्वरीत निर्णय हवा होता . नाही म्हटले तरी ते जला रेंगाळणेच होते . डॉक्टरांच्या द्दष्टीने ही फार कंटाळवाणी पद्धत होती . डॉक्टरांनी मला पेचात टाकणारा प्रश्न विचारला - - "" मला न भेटता , माझ्याशी न बोलता राहू शकशीस ? "" "" कठीण आहे . पण पुढे दीर्घकाल एकत्र राहण्यासाठी एवढा विरह सोसायला माझी तयारी आहे . किमत मोजल्याशिवाय कुठली गोष्ट मिळते ? आणि तुम्हाल मिळवण्यासाठी कितीही मोठी किंमत द्यावी लागली तरी आता माघार नाही . "" डॉक्टरांना हे सर्व फारसं पसंत नव्हतं . पण बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची त्यांचीही प्राज्ञा नव्हती . त्या दिवशी आता वर्षभर बोलता येणार नाही म्हणून आम्ही बराच वेळ फोनवर बोलत राहिलो . त्यावेळी डॉक्टरांनी जे दोन किस्से सांगितले ते ऐकून खूपच गंमत वाटली . डॉक्टरांच्या पिण्याच्या वाढत्या सवयीमुळे दौऱ्यावर बऱ्याचदा अनवस्था प्रसंग पान नं . - 222 उद्भवायचे . डॉक्टरांनाही ते योग्य घडत नाही हे जाणावायचं . पण वळायचं नाही . शिवाय मित्रमंडळी या मोहात ओढायला हजर व्हायचीच . अर्थात डॉक्टरांनाही ते अगदीच नको होते अशातला काही भाग नव्हता . पण त्याला आळा घालण्यासाठी मात्र डॉक्टरांनी एक उपाय शोधून काढला होता . तो म्हणजे आमच्या लग्नानंतर डॉक्टर आपल्याबरोबर मला दौऱ्यासाठी घेऊन जाणार होते . म्हणजे प्रयोगाच्या आधीचा व नंतरचा मित्रमंडळींचा होणारा ' आग्रह ' माझे कारण सांगूण ते टाळणार होते . आपली ही कल्पना बोलता बोलता त्यांनी इरावतीबाईंना सांगितली होती . त्यावर त्यांनी आपणही महिन्यातून एकदा दवाखाना बंद ठेवून दौऱ्यावर येऊ असे डॉक्टरांना सांगितले होते . तीच गोष्ट बिनबाह्यांच ब्लाऊज घालण्याविषयी घडली होती . मी सुरुवाती पासून तसे ब्लाऊज घालायची . डॉक्टरांनाही ती फॅशन खूप आवडायची . त्यांनी इरावतीबाईंनाही तसे ब्लाऊज घालण्याविषयी सुचविले होते . पण इरावतीबाईंनी ते फारसे मनावर घेतले नव्हते . पण आता मात्रा त्या तसे ब्लाऊज घालायला तयारही झाल्या होत्या . तसे ब्लाऊज त्यांनी शिवूनही आणले होते . डॉक्टर मला सांगत होते - - - - - "" तुझं - माझं हे कळल्यापासून इरावती मध्ये हा बदल झाला आहे . पूर्वी कितीदा सांगूनही ती ह्या गोष्टींना तयार झाली नव्हती . "" "" बरं झालं की , कधी कधी वाईटातून असं चांगलंही घडतं . "" मी डॉक्टरांची नाराजी दूर करावी म्हणून म्हणाले . दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन पुन्हा एकदा आलाच . मी त्यांना विचारलं - - "" अहो बाबांनी काय सांगितलंय ? कशाला फोन केलात ? "" "" बाबांनी तुला सांगितलंय की मला फोन करू नकोस अथवा भेटू नकोस मला कुठं तसं सांगितलंय की तुला फोन करायचा नाही किंवा भेटायचं नाही म्हणून ! "" आपलं वकिली डोक वापरीत डॉक्टर म्हणाले , "" विनोद म्हणून ठीक आहे . पण मी तुम्हाला सांगते की , तुम्हीसुद्धा मला फोन करायचा नाही . अगदी समोर आला त तरी बोलू नका . तोंड फिरवून चालायला लागा . "" मी दम भरत म्हणाले . "" मला माहीत आहे गं सगळं . आज तुला फोन केला आहे तो इरावतीचा तुला निरोप द्यायला . तुमचं कोल्हापूरला ठरलेलं मी सर्व तिला पान नं . - 223 सांगितलं तर ती म्हणाली , आता तिला घरी तुमच्याशी बोलता येणार नसेल आणि तुम्हाला तिला काही निरोप द्यायचा असेल तर तिला माझ्या दवाखान्यात फोन करून माझ्याकडे तो द्यायला सांगा . तरी तुझं यावर काय म्हणणं आहे ? "" डॉक्टरांनी विचारले . ? मी काय म्हणणार ? इरावतीबाईंना आता आणखी किती चांगलं माझ्याशी वागणार आहेत याच्याच विचारात मी गढून गेले . 97 एका वर्षाने येणाऱ्या नोव्हेंबरची वाट मी अक्षरश : डोळ्यात प्राण आणून पाहात होते . एक एक कमी होणार दिवस माझी उमेद वाढवत होता . घरात मात्र वातावरण वरवर शांत असलं तरी त्याखाली अस्वस्थता दबलेली होती . त्यातच सर्व कळलेली काही खवचट मंडळी मुद्दाम आत्तीला कांचनचे लाडू कधी असा प्रश्न विचारायची . ज्या दिवशी बातमी पसरली त्याच्या जवळपासच कधीतरी ह्दयनाथ मंगेशकर यांनी मात्र सरळ मलाच फोन करून विचारले की माझे लग्न ठरले आहे का म्हणून . काहीतरी अफवा पसरविण्यापेक्षाकिंवा किंवा टोमणे मारण्यापेक्षा ह्दयनाथ यांचे सरळ फोन करणे मला अधिक आवडले . पण त्यांच्या सरळ प्रश्नांना मात्र मी आडवळणाची उत्तरं दिली . मी त्यांनाच विचारले की , तुम्हाला माझे कुणाशी लग्न ठरेल आहे त्याचे नाव माहीत असेल तर सांगा . ह्दयनाथ यांनी सभ्यता पाळून आणखी काही वेडेवाकडे प्रश्न विचारले नाहीत . मात्र एवढेच म्हणाले की - - - "" आज जो भेटतोय तो तुमच्या लग्नाची बातमी सांगतोय . मी त्यांना म्हणालो ती मुलगी आमच्या घरातील असल्यासारखी आहे . तेव्हा तुम्हालाच विचारून शहानिशा करून घ्यावी म्हणून सरळ तुम्हालाच फोन केला . "" "" तुम्ही हे फार बरं केलंत . अजून काही माझं लग्न ठरलं किंवा झालेलं नाही . ज्या दिवशी ते ठरेल किंवा होईल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळवीन . "" पान नं . - 224 नशीब हा फोन झाला तेव्हा आत्ती घरी नव्हती . नाहीतर तिने संतापाने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं . """" पंढरपूरसारख्या आडगावचा मुलगा सिनेमाची स्टोरी लिहितो आणि . . """" """" साहेब , त्याला उद्या यायला सांगितलं असतं . पण त्याची इथे राहण्याची सोय नाही . """" कोल्हटकर नुसते बघत , ऐकत होते . हा त्रासला . """" लिमये वलाटेल तो येतो . सिनेमास्टोरी आहे म्हणतो . आणि तुम्ही मला त्याला भेटायला सांगता ? कधी सिनेमा स्टडिओ पाहिला नाही . कॅमेऱ्याचं तोंड कुणीकडचं हे ठाऊक नाही . आणि सिनेमासाठी स्टोरी लिहितो ? जा , त्याला जायला सांगा """" बिचारा लिमये त्या पोराच्या विचाराने खिन्न होऊन परत गेला . कोल्हटकर शांतपणे बसले होते . थोडया वेळाने स्वतःशी बोलल्यासारखे म्हणाले , """" भांगेतसुध्दा तुळस उगवते . हरिपूरचे देवलमास्तर नाही का नाटककार झाले ! """" हा एकदम जागा झाला . धावत लिमयाच्या खोलीकडे गेला . पण तो मुलगा निघून गेला होता . याने सांगितले , """" शोधायला पाठवा . सांगली गाव केवढसं ? सहज सापडेल . मी थांबतो . """" त्या तरूण मुलाचा शोध लागला नाही . हे शल्य अधूनमधून याच्या मनात अजूनही एखादे वेळी सलते . पण हे कसगळे पुढे घडायचे होते . आज उज्जयिनिला याच्या समोरचा रोख सवाल होता कोल्हटकरांच्या तारेचा . याने उज्जियिनी सोडली . * * * * कारवाराचा समुद्र किनारा , सुंदर म्हणून गाजलेला . तिथे हा बसला होता . नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत ! अमरकोशात शब्द धुंडीत ! हा वऱ्हाडचा . समुद्रकिनारे याला सगळे सारखेच . समुद्र आणि वाळू . त्यात कमी जास्त सुंदर काय असायचे ? पण एकेका माणसाला प्रसिध्दीचे नशीब असते , तसे काही समुद्रकिनाऱ्यांचेही असावे ! मराठी माणसाला इंग्लंडातल्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्याचे नाव कळले , ते तिथे सावरकरांनी आपली प्रसिध्द कविता ` सागरा प्राण तळमळला ' ही लिहिली म्हणून . कारवारला बऱ्याच वर्षापूर्वी तरूण रवीन्द्रनाथ टागोर आपल्या कलेक्टर बंधूकडे आले होते . त्यावेळी त्यांनी याच किनाऱ्यावर बसून काही सुंदर गीते लिहिली . मग हा किनारा प्रसिध्द झाला . सुंदर ठरला . पण जिथे रवींद्रांनी आपल्या गीतांची शिंपले मोती वेचली , तिथे आज हा अमरकोशाची हातोडी घेऊन शब्दांची खडी फोडीत बसला होता ! उज्जयिनीहून येऊन हा कोल्हटकरांना अकोल्याला भेटला , त्याला सव्वा वर्ष झाले होते . भेटल्याबरोबर ते तोंड भरून म्हणाले """" अहो काय हे ? तुमचा माझा . इतका परिचय आणि तुम्ही हरीभाऊ मोटयांच्या मार्फत माझ्या पुतण्याच्या हाती माझ्याकडं नाटक धाडलंत ? """" दिनानाथने याला उराशी धरले आणि म्हटले , """" अरे हा भास - भवभूती सापडला आपल्याला ! """" पान नं . 56 त्यानंतर दोन महिन्यांनी हा नाटक बसवण्यासाठी पुण्याला गेला , त्याच प्रिंटिंग प्रेसच्या वाडयात . मनात मांडे खात . वामनरावदादांना यांनी नाटकाचे तीन हजार रूपये दिले . आपल्याला हजार दोन हजारांना मरण नाही ! नाटक संगीत . तेव्हा पदे हवीत . म्हणून याने यवतमाळहून आपले स्नेही वामन नारायण देशपांडे यांना बोलावून घेतले . त्यांना नाटक आवडले होते , पण म्हणाले होते , """" अरे , तुम्ही सगळे संस्कृत कवी दोन्ही हातांनी लुटले आहेत ! """" याला संस्कृत येत नाही हे त्यांना कळले तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना . पण नाटकातील पदे रचताना वामनपंडित कवींची दमछाक होऊन गेली ! मूळ हिंदी उर्दू चीज घ्यायची . तिचे मराठीत धर्मांतर करायचे ! ते गोडीगुलाबीने जमायचे नाही . मग इतिहासकालीन मुसलमानासारखी हातात त्यासाठी तलवार घ्याची ! मूळच्या ओळीतल्या मात्रा मोजायच्या . तेवढयाच तशाच मात्रा मराठी पंक्तीत ठासून ठोकूनठोकून भरायच्या . ऱ्हस्व असेल तिथे ऱ्हस्व , दीर्घ असेल तिथे दीर्घ . या सगळ्यातून अर्थ निघाला तर कवीचे नशीब साहजिकच नाटयाचार्य खाडिकरांसारख्या मातबरांनीसुध्दा ` धष्टपुष्ट नवरडा ' असल्या पद्यपंक्तीचा आडदांडपणा करून या बंधनातून सुटका करून घेतली होती ! एवढे वाङ्मय - सम्राट तात्यासाहेब केळकर . त्यांनी ` पानी भरेली ! कौन अलबेली नार ! छमाछम ! ' या मंजुळ हिंदि चीजेचे भाषांतर केले : ` गारा भरारा ! उडविति चहुकडे पसारा ! तडातड ! ' हे भंयकर कुपथ्य वामनरावांच्या जातिवंत कवित्वाला बाधले असावे . कारण सात आठ पदे तयार होताच ते आजारी पडले . त्यावर ऱ्हस्व किंवा दीर्घ कोणतीच मात्रा लागू पडेना ! शेवटी ते परत गेले नंतर काही कारणामुंळे कंपनीचे मालक आपसात बोलेनासे झाले . याने काहीही विचारले , की एकजण दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा होई . ! हा कंपनीत आला तेव्हा याची कोण बडदास्त ! कंपन्यांच्या लेखी नाटककार म्हणजे ` कवी ' सगळे ` या कवी ' म्हणून बसायला गादी द्यायचे . गडी होते ते म्हणायचे . ` कवीबुवा ' ! विठू गडी सकाळी चहा आणायचा . पिऊन झाल्यावर म्हणायचा ` कवीबुवा , शौचाला चला ! """" आणि टमरेल घेऊन पुढे चालायचा ! मग चिंतामणराव कोल्हटकरांनी एक दिवस याचे नाटकच बाजूला टाकले आणि ` गेरसमज ' नावाचे दुसरेच नाटक बसवायला घेतले ! शेवटी प्रातर्विधीसाठी , स्वतः टमरेल उचलावे लागण्याचा दिवस उगवला , तेव्हा हा काय ते समजला आणि तेथून निघाला . जिकडे तिकडे जाहिरातीत नाव झळकणार , हजार दोन हजार रूपये मिळणार , असली स्वप्ने एकदम जमीनदोस्त झाली आणि हा खिन्न होऊन गेला . सुटीनंतर नागपूरला परतला ते मनाशी म्हणत , की आता पुण्या - मुंबईकडे आपले काही उरले नाही . एल्एल् . बी . चा अभ्यास करायचा . परीक्षा द्यायची . उमरावतीला वकिली करायची . पण याची परीक्षा संपली आणि पान नं . 57 कोल्हटकरांचे याला पत्रे आले , """" आता मात्र नाटक ताबडतोब बसवायचंच आहे . कंपनी कारवारला आहे . तिथं या . """" हा पुन्हा नाटकाच्यया भवचक्रात अडकला . आता वामनरावांना बोलावण्याचा प्रश्नच नव्हता . दिनानाथरावांनी साफ सांगितले , """" अहो , तुम्ही सगळं नाटक लिहिलंत आणि पदं करता येत नाहीत ? कंपनीतले नट हसतील तुम्हाला . तुम्हीच लिहायची पदं . मी मदत करीन """" पान नं. 57 शब्द :-5097 पण दिनानाथराव मिस्किलही होते. त्यांनी सुरवातीच्या चालीतच याला कठीण शब्दांची कोडी घातली. जसे काही खोल पाण्यात बुडविले म्हणजे याची भीती जाईल ! पहिल्याच चालीत शब्द होता `अर्रर्र भलाई.' आता मराठीत शब्द कुठून काढायचा ? चालीचे तोंड होते :`पितनकी !जिये !कुमितासो ! दिनघटत !जात तनते !' याने अक्षरे,मात्रा,ऱ्हस्व, दीर्घ सगळ्यांची विटाळी बांधली. अमरकोशातल्या शब्दांचा काला केला. आणि त्या विटाळ्यात ओतून दिला.! मग मराठी शब्दांच्या विटा पाडल्या. त्या वाळवून एकापुढे एक ठेवल्या आणि मराठी चिजेचे तोंड रचले ! `सुफलिता ! येथ !विधिलेखा !अवतरत खास गमते !' पहिल्या तीन शब्दांत दोन अस्सल संस्कृत शब्द- नेटकाय कॉलर सारखे ! आणि शेवटचे खास मराठी `खास गमते' देशी धोतर सदऱ्यासारखे ! पण पुढचा शब्द `अर्रर्र भलाई !' या एका शब्दासाठी दोन दिवस हा त्या समुद्र किनाऱ्यावर फिरला, उभा राहिला, बसला, आडवा पडला ! पण `अर्रर्र भलाई' ला शब्द सापडेना ! या अनुभवामुळे पुढे याची पद्यरचनेची भीती पार गेली. पण पदे लिहिता आली तरी याला त्याची मुळीच हौस नसे. संधी आली तरी तो दुसऱ्यांना मुद्दाम आणून ते काम देई. तेही शक्य तर नव्या कवींचा परिचय करून देण्यासाठी. `पहिला पाळणा' बोलपटात याने हट्टाने नागपूरच्या श्रीनिवाल रामचंद्र बोबडे यांच्या दोन सुंदर कविता घातल्या. `वासुदेव बळवंत' या बोलपटासाठी नागपूरच्याच शंकरराव शास्त्रींना आणले. `चूल आणि मूल' साठी मनमोहन नातूंना मुद्दाम मुंबईला नेले. नातू खरे म्हणजे लहरी आणि मनस्वी.त्यांच्या गुणांचे पेशाच्या रूपातसुध्दा चीज व्हावे ही याची इच्छा. पण नातू जातिवंत कवी. ते स्फूर्तीची वाट बघत. दिवसन् दिवस पदे होईनात. स्टुडिओ आणि संगीत दिग्दर्शक चितळकर रिकामे बसलेले. मग एक दिवस याने नातूंना निकडीचा तगादा लावला. पण काव्य किती कष्टाचे, योगायोगाचे फळ असते, याबद्दल ते बोलू लागले ! तेव्हा याने म्हटले, """"हे बघा, आता अर्ध्या एक तासात पद होऊ शकेल."""" नातूंना साहजिकच राग आला. मग हा म्हणाला, """"करून तर बघू या. चित्रपटातला प्रसंग काय आहे ? एका वाडयात एक मोठं सधन घर आहे. घरात गाईम्हशी आहेत. तिथं रोज सकाळी पुष्कळसं ताक होतं. ते न्यायला बिऱ्हाडकरूंच्या बायकामुली येतात. त्या घरातली वयस्क बाई त्या मुलींच्या वेण्या पान नं. 58 घालून देते. सगळ्या महाराष्ट्रात ही पध्दत प्रचलित आहे. आता आपण तो देखावा डोळ्यापुढे आणू. मागच्या ओसरीवर ताक घुसळलं जातं आहे. ओसरीच्या पलीकडे अंगण. त्यात तुळस. जवळ एक पारिजाताचं झाड.पलीकडं गोठयात गायवासरू. मला वाटतं या सगळ्याचं वर्णन केल तरी छान गाणं होईल."""" याने कागद पेन्सिल घेतली आणि ओळी लिहायला सुरवात केली. गुंफा वेणी ! वेणी गुंफा ग साजणी ! बारा घरच्या बारा जणी आई, आलो तुमच्या अंगणी घेऊनि करंडाफणी ! गुंफा वेणी.. मागिल दारी तुळसमंजरी डुले रांगोळी घालिती प्राजक्ताची फुले सुटले पाडस, गाईकडे धावले आई आलो तशा अंगणी गुंफुनि द्या वेणी !गुंफा वेणी.... दोन तासांत पुढची कडवीं तयार झाली. नातू त्याच दिवशी निराश होऊन परत गेले. मग याने पुढची सगळी गाणी स्वतःच लिहिण्याचा पत्कर घेतला. चितळकरांना हे गाणे पसंत पडले. पण याच्याकडून पुढची गाणी चांगली होतील असा त्यांना भरवंसा वाटेना. एक दिवस ते म्हणाले, """"बेडेकरसाहेब, आता या प्रेमाच्या गाण्यासाठी तरी दुसऱ्या कुणाला बोलवा !"""" """"का बरं ?"""" याने विचारले """"अहो, हे गाणं नाजुक असायला हवं. नाजुक प्रसंगातलं. नायिका नायकाला पहिल्यांदा भेटते. तो गेल्यावर, तिला हुरहुर लागते. तुमच्या चेहऱ्याकडं बघितलं तर नाजुकपणाशी तुमचा काही संबंध असेल असं कुणाला वाटायचं नाही ! त्यात तुम्ही थोडे विद्वान आणि बरेचसे रूक्ष ! असलं गाणं हवं सहज, आगदी सोप्या शब्दांचं !"""" त्यांनी हसून उत्तर दिले. """"बघू. मी लिहून बघतो. नाही जमलं तर दुसऱ्याला बोलावू"""" आणि संध्याकाळपर्यंत एक गाणे याने लिहून काढले ! भर दिवसा फुलले चांदणे रंगले ह्दयाचे गाणे !! धृ !! गडे, त्या शब्दांची माधुरी मिस्किल नजर हासरी करिते सगळिच दुनिया न्यारी त्या बघण्याने ! हसण्याने ! स्पर्शाने फुलले ग चांदणे ! रंगले ह्दयाचे गाणे !! धृ !! पान नं. 59 ते आले, बसले गेले ! मी नाही बोलले ते क्षण पहिल्या प्रीतीचे गवसले ! हरपले ! अन् वेडे मन माझे हे राहिले भुकेले ! आठवणीने !रंगवि स्वप्ने ! फुलले ग चांदणे !! धृ !! चितळकरांच्या बरोबरच्या या सहकार्यात याला आपल्या घमेंडखोर स्वभावाविषयी एक धडा मिळाला. पण तो याच्या ध्यानात राहिला नाही. गाणी झाल्यावर चितळकरांनी आग्रह धरला. गाणी म्हणण्यासाठी लता मंगेशकरलाच आणयला हवे. चितळकर त्यावेळी अप्रसिध्द होते. याने आधी `नारदनारदी' नावाचा चित्रपट काढला होता. त्यावेळी एक वाद्यवादक म्हणून त्यांनी काम केले होते. मुख्य म्हणजे या चित्रपटाची नायिका-नटी स्वतः गाणारी होती. तिचा साहजिकच फार हिरमोड झाला. तिचे हे पडद्यावरचे पहिलेच काम. तिचे मन खट्टू होऊ नये म्हणून याने तिची बाजू घेतली. तेव्हा चितळकर म्हणून गेले,""""गाणी छान आहेत पण लताने म्हटली नाहीत तर लोकप्रिय होणार नाहीत !"""" हा एकदम बोलायला नको ते बोलून गेला. """"चित्रपट तुमच्या गाण्यामुळे नव्हे माझ्या लिहिण्यामुळे लोकप्रिय होईल !"""" पुढे चित्रपट चांगला चालला खरा. पण चितळकरांचे पुढचे संगीत भारतभर गाजले. याचे सिनेमातले लिहिणे मात्र सुकत गेले. `चूल आणि मूल' चित्रपटाची सगळी गाणी याने लिहिली. पण त्यातही लक्ष्मीबाई टिळकांचे एक सुंदर गाणे घालायला हा विसरला नाही. अशा तऱ्हेची गाणी लिहायला फार कसब लागते,असा याचा अनुभव नाही. अर्थात् अशा रचनेला ती मूळ पोलादी चौकटीत ठोकून बसविण्याचे बंधन नसते. म्हणून ती सोपी जाते. `अर्रर्र भलाई' सारख्या खोडयात अडकला तर महाकवीसुध्दा नामोहरम होऊन जातो !अखेर याने `अर्रर्र भलाई' ला शब्द शोधून काढला : वल्लकीनाद ! त्यावर दिनानाथरावांनी सुचविले, """"इतका कठीण शब्द कशाला ? सरळ वीणानाद म्हणून या की !"""" अशी दोन चार पदे झाल्यावर दिनानाथरावांनी याला पद्यरचनेच्या वरच्या वर्गात ढकलले. एक नवी चाल दिली,`शबे मोहबाद (मुहब्बत)! एनाब हो !' या चालीवरची रचना थोडी कलाकुसरीची होती. `शबे' म्हणजे एक ऱ्हस्व व एक दीर्घ अक्षर. एक एका मात्रेचे आणि दुसरे दोन मात्रांचे. पण `बे' या दीर्घ अक्षरात थोडी खुबी होती. गरज पडली तर गाणाऱ्याला ते ऱ्हस्वही म्हणतो यावे आणि तिथे गाताना थांबावेसे वाटले तर किंचित दीर्घही करता यावे. म्हणजे `तुझे', पान नं. 60 `सखे' यांच्या मात्रा `शबे' सारख्याच तीन असल्या तरी ते शब्द चालायचे नाहीत. `झे' आणि `खे' ऱ्हस्व कसे गाणार ? या हिशेबाने `सखी', `वेणी',`रति' हे शब्द चालतील. मग याने शब्द काढला. `मधु' `मोहेबाद' म्हणजे दीर्घ ऱ्हस्व पुन्हा दीर्घ ऱ्हस्व अक्षर `काननात' ,`आननात', `बोलण्यात'- अरे !`मीलनात' चांगलं जमेल की ! `शबे मोहबाद' म्हणजे `मधु मीलनात'! आणि `ऐना बहो' च्या जागी `विलोपले.' सध्याच्या गाण्यातला `या' हा शब्द गाणे बसवता बसवता सोयीसाठी आत घुसला. गाण्याची चाल चांगली. तोंड बरे साधलेले.मग याने पुढची रचना भरताडून काढली. वामनराव देशपांडयानी ती पुढची धेडगुजरी, थोडीशी गावठी रचना बघून याला मनात म्हटले असेल,""""लेढेहो, असं काव्य रचताना जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज धरा !"""" पदे संपत आली. मंडळीचा मुक्काम बेळगावला हलला. पात्रांची निवड झाली. तालमी जोरात सुरू झाल्या. त्यातच हा एल्एल्. बी. पास झाल्याची तारही आली. हा तालमीच्या भरात आणि पुढच्या स्वप्नात दंग होऊन गेला. मग एक दिवस बळवंतराव पेठे सहज बोलले, """"नाटक बंद होणार !"""" """"म्हणजे ?"""" """"म्हणजे नुसतं नाटकच नाही, बलवंत संगीत मंडळीच बंद करायची असं घाटत आहे !"""" बळवंतराव पेठे म्हणजे बलवंत मंडळीचे मॅनेजर, व्यवस्थापक. कंपनीच्या ऑफिसातल्या गादीचे रखवालदार गावातल्या प्रतिष्ठितांची या गादीवर वर्दी असे. कंपनीच्या बिऱ्हाडावरून जाता येता कित्येक जण आत डोकावत, चार गप्पा मारून,पानसुपारी खाऊन पुढे होत. गादीवर रोज शुभ्र नवी चादर. पाठीशी तसाच शुभ्र लोड. पानसुपारीने व्यवस्थित भरलेले तबक. आजूबाजूला केस मोकळे सोडलेले, गालावर हात देऊन निमूटपणे गोष्टी ऐकत बसलेले स्त्रीपाटी नट. गादीवर वर्तमानपत्रे. त्यात मुख्य म्हणजे `टाइम्स ऑफ इंडिया.' हा इंग्रजी `टाइम्स' हे कंपनीतले एक बारीकसे गूढ होते. तो कोण वाचीत असे हे याला शेवटपर्यंत कळले नाही ! पुष्कळदा तो कोल्हटकरांच्या हातात दिसे. पण एखाद्या मिनिटातच ते आपले वाचन संपवीत कंपनीत सुशिक्षित समजली जाणारी माणसे म्हणजे दोन. एक कोल्हटकर आणि दुसरे त्यांच्या स्वतःच्या समजुतीप्रमाणे बळवंतराव पेठे ! त्यांचा लांब काळा कोट, डोक्यावरची लाल पगडी यांच्या- प्रमाणेच `टाइम्स ऑफ इंडिया' ही बळवंतराव आपली खास निशाणी समजत. पान नं. 61 दिवसभर त्यांना तो जवळ लागे. कोल्हटकरांनी `टाइम्स' उचलला तर बळवंतराव एकदम गंभीर होत. जणू काही कोल्हटकर त्यातला मजकूर काढून घेऊन खिशात घालून घरी नेणार आहेत ! जगातले सगळे प्राणी `टाइम्स' घेण्यासाठी, वाचण्यासाठी टपले आहेत, अशी बळवंतरावांची खात्री होती. एकदा कंपनीच मुक्काम मुंबईला गिरगावातल्या बनाम हॉल लेनमध्ये होता. याची आणि बळवंतरावांची खोली शेजारी शेजारी. नट मंडळी नाटकासाठी जायची. हा रात्री एकटा असायचा. अर्धे नाटक झाल्यावर बळवंतराव घरी यायचे ते व्हिस्की सोडयाच्या फसफसाटावर तरंगत. एकदा असे आले. याने दार उघडले. डोक्यावरची पगडी तिरपी, कोटाची बटणे मोकळी, चालणे, डावा पाय कुठला नि उजवा कोणचा याची भ्रांत पडल्यासारखे. डुलत डुलत आपल्या दारासमोर थरथर कापत असलेले बळवंतराव उभे होते. ते म्हणाले,""""मा.. माझ्या खोलीत एक भला मोठा उंदीर टा..टा..टाइम्स वाचतो आहे !"""" याने दारातून बघितले. समोर एक कापडी आरामखुर्ची होती. तीवर `टाइम्सचा' अंक पडला होता. एक गलेलठ्ठ उंदीर एकदम दिवा लागल्यामुळे बिचकून जाऊन, उडी मारून `टाइम्सवर' बसला होता ! खुर्चीच्या कापडाच्या -`टाइम्स' च्या पलीकडे उडी मारण्यासाठी जागा बघत होता ! पण मराठी वर्तमानपत्रांचे बळवंतरावांना वावडे. ते मिस्किलपणे म्हणत, """"या मराठी वर्तमानपत्रांनी आमच्या नट मंडळीची नीती बिघडते. त्यात सगळ्या गुप्तरोगांच्या जाहिराती ! जाता येता हे-नट या जाहिराती ओलांडतात. त्यामुळे त्यांनाही हे रोग जडतात !एरवी सगळे फार सद््वर्तनी !"""" सद््वर्तनी असतील नसतील. पण नटमंडळी बेरकी होती खास. उत्तमोत्तम लेखकांची भाषणे पाठ करून त्यांच्या जिभा भाषाप्रभू झालेल्या असत. बारा गावचे पाणी प्यायलेले. त्यामुळे दुसऱ्याचे पाणी जोखण्यात अगदी तरबेज ! परशुराम सामंत होता.तो याच्याशी पुष्कळ बोलायचा. नेहमी म्हणे, """"बेडेकरसाहेब, हे असं सुंदर नाटक तुमच्या हातून एकदा लिहून झालं ते झालं. पुन्हा असं व्हायचं नाही."""" याला वाटे,`अरे एकदा लिहिलं तसं दहादा लिहीन.' पण परशुरामचे म्हणणे शेवटी खरे झाले. ! बाळकोबा गोखले होते. ते वाईचे. पाणी कुठे मुरते आहे हे चटकन् ओळखीत. नेमके वर्मावर बोट ठेवीत. हळू आवाजात नाटकातल्या जागांबद्दल शंका काढीत. त्या बहुधा मार्मिक असत. नवे नाटक वाचण्यासाठी आले की ते जोखण्यात ही सगळी मंडळी वाकबगार. आणि हे साहजिक होते. याने `प्रेमसंन्यास' नाटकात एकदाच काम केले. तेव्हा त्यातले रचनादोष एकदम याच्या लक्षात आले. त्यातला पान नं. 62 खलनायक कमलाकर दरोडेखोराच्या हातात शंभराची नोट म्हणून चुकून एक महत्वाचा कागद देतो. दरोडेखोराचे काम करणाऱ्या मुलाने एकदम विचारले, """"अरे साधा कागद आणि नेटेचा कागद डोळे मिटले तरी हाताला कळतो !"""" मग या नि अशाच गोष्टीवर `प्रेमसंन्यास' नाटकाचे परीक्षण याने लिहिले होते.`ब्रम्हकुमारी' नाटक तात्यासाहेब कोल्हटकर, केळकर, खाडिलकर यांनी वाचले होते. काही सूचना केल्या, काही दोष काढले. पुढेही त्याच्यावर काही परीक्षणे आली. पण ते सगळे याला जुजबी वाटले होते. मात्र महाराष्ट्र नाटक मंडळीतले प्रख्यात नट आणि `बेबंदशाही' नाचकाचे कर्ते विष्णूपंत औधकर यांनी नाटक बारकाईने नाचून ज्या शंका काढल्या आणि प्रश्न विचारले त्यांची उत्तरे याला सहज सुचली नाहीत ! पण असल्या मुरब्बी बनलेल्या नटांचीही गाळण उडेल असे प्रसंग त्यांच्यावर गावोगाव येत. एकदा कंपनीत जेवणाची पंगत बसली होती. पाचपन्नास माणसे पंक्तीत. तेवढयात एक बाहेरचा मुलगा हातात जेवणाचा डबा घेऊन आला आणि म्हणाला,""""रामचंद्रबुवांना मटण पाठवलं आहे रखमाबाईंनी!"""" """"रखमाबाई ? रखमाबाई कोण ?"""" """"अथंच पलीकडं राहत्यात भोगारवेशीतच."""" ती वेस नायकिणींच्या वस्तींची ! रामचंद्रबुवांनी आपण त्या गावचे नाही म्हणून कानावर हात ठेवले. त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ? सगळ्यांनी त्यांना भंडावून सोडले. तीन चार दिवस रोज मुलगा जेवणाचा डबा घेऊन येई. बुवा जीव तोडून सांगत,""""अहो मला कोण, कुठली, गोरी की काळी माहीत नाही."""" पण बुवांचे दर गावापुरते एकपत्निव्रत पाळण्याचे कौतुक सगळ्यांच्या तोंडी गाजू लागले ! मग रामचंद्रबुवा वेतागले. हा रामचंद्र पुषकळदा याच्याबरोबर फिरायला येई. नाटकी जीवनाच्या सुरस कथा सांगे. चवथ्या दिवशी रामचंद्राने याला मध्येच सोडले. म्हणाला,""""आज त्या रखमाबाईला चांगली सरळ करतो. काय चावटपणा चालवला आहे रोज ! पण आधी तिचा पत्ता शोधायला हवा."""" """"म्हणजे?"""" याने आश्चर्याने विचारले. """"ती खरंच तुझ्या माहितीची नाही ?"""" """"देवाशपथ नाही."""" """"खोटया शपथा घेऊ नकोस. ओळख नसताना कुणी बाई असा पुरूषाच्या बाबतीत आगाऊपणा करील होय ?"""" """"आता काय सांगू ? तुम्ही अजून लहान आहात. तुम्हाला पुष्कळ बघायचं आहे."""" """"अरे पण कंपनीत पाचपंचवीस नट. नेमका तुझ्यावरच डोळा का ?"""" """"अहो, या बायका नाटकं बघतात. तिथं स्टेजवर मी सरदारदरकदार, राजे यांची कामं करताना दिसतो. रंगीबेरंगी अंगरखे, गळ्यात खोटया मोत्यांचे दागिने, पान नं. 63 डोक्यावर शिरपेचांच्या कंगणीदार पगडया आणि हातात तलवार. मोठमोठी वीरश्रीची भाषणं करतो आणि शेवटी तलवार उपसून विंगेतल्या फौजांवर जाऊन तुटून पडतो ! यांचे डोळे दिपून जातात. यांना वाटतं आपल्या स्वप्नातले कर्ण,अर्जुन,शिवाजी,शहाजी सगळे हाच ! मग खुणावीत बसतात मटण-मासे पाठवून !"""" तो गेला. हा त्याच्याकडे बघत पुढे निघाला. `छे ! हे काही तरीच. बायका आगाऊ असतात ? धीटपणाने या खेळात पुढाकार घेतात ? शक्य नाही. रखमाबाई नायकीण. तेव्हा ती करील फार तर असं. पण इतर घरगुती बायका ? तसं असतं तर मराठी कादंबऱ्यांतून जी बायकांची चित्रं दिसतात, ती अशी नेहमीच लाजाळूच्या झाडासारखी संकोची, शालीन कशी दिसली असती ?' पण लहानपणी काशीच्या वागण्यामुळे, आपण बुजून गेलो होतो. चकित झालो होतो हे खरे. काशी एका हरदासाची मुलगी. गोरीपान,गोंडस,टपोऱ्या भिरभिर डोळ्यांची. सारखी लवलव.समोरचा परकर थोडा उचलून धावत असायची. रामाच्या देवळात बुवांचा मुक्काम होता. चांगला दोन महिने हा आठदहा वर्षाचा असेल. काशी सहा वर्षांची. वाडयातल्या मुलांत तीही खेळे. एकदा सपंडाव सुरू झाला. देवळाच्याजुन्या माडीत अडगळ खूप. तिथे एक लाकडी पेटी होती. जेमतेम एक माणूस मावेल अशी. याने पेटीत झाकण उघडले आणि आत लपून बसला. काशी पण धावत लपून बसण्यासाठी आली ती झाकण उघडून आत उडी टाकीत ! हा ओरडला, """"अग पण !"""" तिने याच्या तोंडावर हात ठेवती म्हटले, """" चूप ! आपण सापडू"""" पण इथं एकापुरतीच जागा आहे."""" तिने चटकन म्हटले.""""मी तुझ्या मांडीवर बसते ना !म्हणजे एकाची जागा दोघांना पुरेल !"""" पुढे बरेच दिवस काशीचा नवरा म्हणून याला सगळे चिडवीत. काशीही याच्यासमोर वारंवार येई. लचके.मुरडे.पळून जाई. आणि पुन्हा हा असेल तिथे दाराआड येऊन उभी राही ! मोठेपणी एकदा प्रख्यात तत्त्तवेत्ते लेखक वामन मल्हार जोशी याच्या घरी बाळूताईंना भेटायला आले. विभावरी शिरूरकरांच्या कखाकादंबऱ्यावरून गोष्टी निघाल्या. त्यावेळी ते सहज म्हणाले, """"सगळं ठीक आहे. पण या कथांतल्या बायका प्रेमाच्या खेळात पुरूषाच्या आधी पुढचं पाऊल टाकतात, हे फार अनेसर्गिक वाटतं !"""" ते ऐकून त्या कादंबऱ्यांच्या लेखिका बाळूताई नुसत्या हसल्या. ! रामचंद्रबुवा रखमाबाईंना सरळ करायला गेले ते तिथे स्वतःच पाऊल वाकडे टाकून परतले ! मग मुक्काम असे तोवर संधी मिळेल तेव्हा सकाळी संध्याकाळी तिथेच मटण खात राहिले ! पान नं. 64 रामचंद्रबुवांच्या सारख्यांची नाटकी सरदारी आणि वीरश्री अशी बायकी वेढयात गारद होते, तर दिनानाथरावांच्या तीन चांदांचा मानकरी असलेल्या धेर्यधराचे काय होत असेल ? त्यांचे रूप देखणे,डोळे पाणीदार,आवाज पल्लेदार. गाणे अत्यंत सुरेल आणि स्वतंत्र. पुरूषसुध्दा मोहित होत. मग बायकांची काय कथा !कधी कधी दिनानाथराव म्हणत, """"चला तुम्हाला गाव दाखवतो."""" मग याला बरोबर घेऊन गावातल्या प्रख्यात गाणाऱ्या कलावंतिणींना भेटी देत. हेतू हा की कुठे काय नवीन ऐकायला मिळते आहे ते बघावे. एकदा बेळगावला त्यांनी याला तिथल्या प्रसिध्द गायिका. बाळाबाई यांच्या घरी नेले. त्या काळी बेळगावात आणि भोवताली आकुबाई आणि बाळाबाई या बहिंणीचे गाण्यासाठी फार नाव होते. घर मोठे,दुमजली. आतली राहणी सामान उंची,श्रीमंताचे. या कलावंतिणी एखाद्या यजमानाच्या आश्रयाने राहत. लग्नमुंजीच्या कार्यात यजमानांच्या घरी घरच्या बायकांसारखा भाग घेत. दिनानाथराव गेले तेव्हा बाळाबाईना फार आनंद झाला. बाई खूप सुस्वरूप. वर्णाने सुवर्ण गोऱ्या. बाकदार नाकात हिऱ्यांची मोरणी होती. गळ्यातले हातातले दागिने थोडेच पण मोत्याचे होते. बोटात एक दोन अंगठया. त्यात हिरकण्या आणि नीळमणी. बाळाबाईच्या बोलण्यातसुध्दा त्यांच्या गाण्यासाठी कमावलेल्या आवाजाच गोडवा ऐकू येई. वागण्यातली तहबीज याच्या पांढरपेशा नजरेला अगदी अनोखी वाटली. थोडे बोलणे, थोडे गाणे नंतर थोडे खाणे झाले. हा हात धुवायला उठला. तेव्हा बाई, `चला मी दाखवते' म्हणून याला आत घेऊन गेल्या. पण त्या याला पाण्याची तपेलीसुध्दा उचलू देईनात ! """"असं कसं ? तुम्ही एवढे मोठे कवी. आज आमच्या घरी पहिल्यांदा आलात."""" असे म्हणत त्यांनी तपेली उचलली, याच्या हातावर पाणी ओतले,तपेली ठेवली आणि आपल्या हाताने याच्या दोन्ही हातांना चांगला साबण चोळला. पुन्हा पाणी ओतून स्वतः ते हात धुतले ! खांद्यावरच्या टॉवेलना ते स्वच्छ घासून पुसून काढले ! हा बघतच राहिला. त्यांचे सौदंर्य आणि हातावर चोळलेल्या साबणाचे बुडबुडे बघून याला वाटून गेले, आपले जवान मन हलकेच आपल्या दोन तळहातांमध्ये काही वेळ जाऊन बसले आहे ! आणि त्या साबणाच्या लहान लहान फुग्यांप्रमाणे रंगीबेरंगी होऊन जाते आहे ! याला दिनानाथरावांचे आश्चर्य वाटले. तास दोन तास तिथे होते. पण त्या दोघांच्या बोलण्यात,थट्टामस्करीत कुठलाही अनुसूचित श्लेष,सूचना दूरन्वयानेही उमटली नव्हती. सगळे वागणे शिष्टाचाराला, रीतीभातींना अगदी खेटून चाललेले. इतके कसे यांचे मन निर्लेप राहू शकते ? """"अरे, हे नरडं संभाळायचं आहे ना ?"""" रस्त्यावर आल्यावर दिनानाथराव म्हणाले. """"गेर वागण्याचं कुपथ्य केलं तर या गळ्याचं केव्हाच मडकं होऊन जाईल. म्हणून हे जबरदस्तीचं पान नं. 65 एकपत्नीव्रत सोसावं लागतं !"""" दिनानाथांचे व्यक्तित्व लोभस होते. लहानपणीच या व्यक्तिमत्वात गाण्याचे आणि अभिनयाचे गुण मिसळले गेले आणि ऐन तारूण्यातच त्यांना रंगभूमीवर अपार यश मिळाले. त्यांची त्यावेळची कामे याने पाहिली होती. किर्लोस्कर मंडळीच्या `पुण्यप्रभाव' नाटकातील किंकिणी, पुढे बलवंतराच्या `वीरविडंबना' तली उत्तरा आणि `भावबंधनातील लतिका रंगभूमीवर वावरत, तेव्हा एखादी भरघोस फुलझडी नाचते आहे असे वाटे. ऐन विशीतच त्यांनी चिंतामणराव कोल्हटकांच्या बरोबर स्वतःची नाटकमंडळी काढली आणि अनेक वर्षे सगळा महाराष्ट्र आपल्या गुणांनी गाजविला. वऱ्हाडातल्या प्रेक्षकांचे त्यांच्यावर खास प्रेम. त्यांच्या स्वतंत्र, बुध्दिमान गाण्याचे विशेष चीज झाले ते तिथेच. पण या दिवसांत दिनानाथ- रावांचे गाणे पूर्वीसारखेच असले तरी त्यांचा अभिनय ओसरला होता. निदान रंगभूमीवर तरी त्यांचे अभिनयाकडे लक्ष कमी असे. उलट रोजच्या व्यवहारात ते पट्टीचे अभिनयपटू आहेत याची नेहमी साक्ष मिळे. माणसांना वश करण्यात त्यांचा हातखंडा. त्यासाठी ते अभिनयाच्या सगळ्या कला निःशंकपणे स्वतः- वापरीत. दुसऱ्याला -यालाही शिकवीत. पुढे सांगलीला याच्याकडे स्टुडिओ आला तेव्हा पुष्कळदा दिनानाथरावांना याच्याकडून पेसे घ्यावे लागत. पेशांची नेहमीच चणचण असायची. त्यामुळे थोडे पेसे आले की ते याला जतावून बजावून त्यांच्यासाठी पेसे बाजूला ठेवायला सांगत. विशेषतः संध्याकाळी भेटले तर हा तगादा अत्यंत निकडीचा. एकदा याच्याजवळ पन्नास रूपये उरले होते. `ते माझ्यासाठी ठेव' म्हणून ते बजावून गेले. त्यानंतर स्टुडिओतल्या एक नटी अनसूयाबाई पेसे मागायला आल्या. अनसूयाबाई महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव पेंटरांच्या हाताखाली अनेक मूकपटात काम केलेल्या. दीनानाथ एक कसबी नट तर बाई दहा कसबी नटी. त्यांनी अजीजी आर्जवाची अस्खलित भाषणे केली. शेवटी, `विष खायला तरी पेसे द्या ' म्हटले. पण हा दिनानाथरावांच्या आठवणीमुळे अगदी मख्खपणे बघत बसला. बोलता बोलता अनसूयाबाई बाजूच्या खिडकीपाशी गेल्या. एक दोन ह्दयद्रावक वाक्ये बोलल्या आणि वळल्या. तो काय ! बाईंच्या दोन्ही डोळ्यांतून घळघळ अश्रूंचा पूर ! तो काही केल्या थांबेना ! चेहरा अत्यंत केविलवाणा, सर्वनाश होतो आहे असा हताश ! घाबरला, द्रवला. याने ते पन्नास रूपये बाईंना देऊन टाकले. मग दिनानाथराव आल्यावर काय विचारता !त्यांनी याला धारेवर धरले. याने म्हटले, """"अरे त्या बाईवर प्रसंग केवढा आलेला ! पाहता पहाता घळघला रडायला लागली. मग काय करू ?"""" त्यांनी म्हटले, """"अस्सं होय ?रडली म्हणून दिलेस पेसे ?"""" आणि तेही पान नं. 66 खिडकीकडे गेले. त्यांनी तोंडावरून एकदा हात फिरवला आणि अर्ध्या मिनिटातच वळले तो काय ! बाईच्या डोळ्यांतून नुसत्याच गंगायमुना निघाल्या होत्या तर यांच्या डोळ्यातून सिंधू आणि ब्रम्हपुत्रा !मग याच्यापुढे हात करून म्हणाले,""""दे आता पेसे. अरे, असं रडणाऱ्या भेकणाऱ्याला पेसे द्यायला लागलास तर या नट नटी दोन महिन्यातच तुझं दिवाळ काढतील."""" मग त्यांनी याला डोळ्यांतून हुकमी पाणी काढण्याची विद्या शिकवली ! यानेही चारआठ दिवस घरी आरशासमोर ती घटवली ! आणि अनसूयाबाई पुन्हा आल्या तेव्हा त्यांच्यावरच तिचा प्रयोग केला ! त्या स्तंभित होऊन म्हणाल्या, """"नाही, नाही !असं नका करू. माझं ऊर धडधडायला लागलं बघा. मला नकोत पेसे. पण तुम्ही हे थांबवा."""" दिनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते. ते कुठे कसे रंगवायचे हे ते आपल्या सोईप्रमाणे ठरवीत. कोल्हटकरांचे याच्या उलट त्यांचाअभिनय गुण मेहनतीने कमावलेला. रंगभूमीवर तो प्रकर्षाने झळके. वृंदावन,घनःश्याम या खलनायकांच्या भूमिका त्यांनी अनेक वर्षे नुसत्या अभिनय गुणांवर गाजवल्या. काही काळ त्यांनी सुधाकर या `एकच प्याला' तील नायकाची भूमिकाही केली. त्यात सुधाकरच्या स्वभावातला मानी ताठरपणा, शेवटपर्यंत त्याच्या खाचाखोचांसह असा जिवंत ठेवला, की त्याची सर दुसऱ्या कुठल्याही नटाच्या कामाला आली नाही. आवाज गंभीर आणि पल्लेदार. `सन्यस्त खड्ग' नाटकात केवळ एक दुःखोद््गार अशा ताकदीने प्रेक्षागृहात घुमवीत की अंगावर शहारा यावा. कोल्हटकरांचा चेहरा उग्र पण स्वभाव पुष्कळसा सरळ. प्रसंगी भाबडा देखील ! इतकी वर्षे नाटकासारखा उचापतखोर धंदा यश्स्वीपणे करणाऱ्या कोल्हटकरांचा काही वेळचा भाबडेपणा बघून हा चकित होऊन जाई. त्यांच्यावर पुढे एक फौजदारी खटला झाला. त्या खटल्याच्या प्रकरणातले काही कागद अखेर कोल्हटकरांनी याला दाखविले. ते बघून चकित होऊन याने विचारले,""""या असल्या करारावर तुम्ही सही तरी कशी केलीत?"""" त्यानी थंडपणे उत्तर दिले,""""अहो घाईमध्ये त्यातल्या टायपिंगच्या चुका दुरूस्त करायला वेळ मिळाला नाही !"""" या चुका कोणत्या ? तर जिथे `कर्जदार' असे हवे होते तिथे `सावकार' असे शब्द पडले होते ! असे असायला हवे होते तिथे `असा असा सावकाराचा हक्क आहे' असे चुकून पडले होते.! सहज कुणाशी फारसे बोलायचे नाहीत. पण परिचिताशी बोलतील वागतील ते सौजन्याने. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी सांगलीच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. सांगलीला त्यांच्या संस्थेची वाताहत झाली. त्यासंबंधात त्यांनी याच्याविषयी इतके जपून आणि निर्विष लिहिले आहे की त्यांच्या सौजन्याची पान नं. 67 धन्यच म्हणायला हवी. पण बेळगावच्या मुक्कामात कोल्हटकरांच्या चेहऱ्यावरचे हास्य लोपत चालले. होते. कारवारचा मुक्काम चांगला गेला नव्हता. बेळगावचाही यथातथाच चालला होता. प्रभात फिल्म कंपनीने `अयोध्येचा राजा' चित्रपट काढला होता. तो सगळ्या हिंदुस्थानात खोऱ्याने पेसा ओढीत होता. आणखीही यशस्वी हिंदी,मराठी चित्रपट निघाले होते. नाटकांच्या उत्पन्नाला झपाटयाने ओहोटी लागली होती. पुन्हा भरती येईल असा संभव दिसत नव्हता. आता कंपनीच्या गादीवर अगदी निराळी माणसे दिसू लागली. चुडीदार पेजामे,लांब रेशमी कोट, फरच्या तिरप्या टोप्या, पायात नक्षीदार चढाव, मुजऱ्या नाही तर पंपशू, हातात 555 छापाच्या महाग सिगरेटींचे डबे आणि तोंडात गोव्यातून बेळगावात आलेल्या नव्या कलावंतिणींची चर्चा ! ही सिनेमातली निर्माते मंडळी ! कोल्हापूरचे पाहुणे येत, ते सगळे साहेब, सरदार नाही तर सरकार !बेळगाव म्हणजे गोव्यातील कलावंतिणींची मुंबईच्या रस्त्यावरची उतारपेठ. सगळे निर्माते या मीनाबाजारातल्या मालाची गिऱ्हाइके. गोव्यातून येणाऱ्या मुली इथे विठा,म्हाळसा, दुर्गा, अंबू, ठकू या नावांनी येत. या निर्मात्यांबरोबर कोल्हापूर,पुणे,मुंबईकडे जात. आणि तिथे रत्ना, जोत्स्ना, शोभा, हेमा अशा नावांनी रूपेरी पडद्यावर झळकत. इथे असताना एखादी विठा एखादी ठकू एकेकटया यजमानाची लाडकी असे. त्यांच्या रत्ना आणि हेमा झाल्या की त्या तमाम हिंदुस्तानी प्रेक्षकांच्या ह्दयाचे ठोके थांबवीत ! सगळे सिनेमाशौकीम अल्लाउद्दीन खिलजीचे वंशज होऊन गेले होते ! तो चितोडच्या पद्मिनीचे आरशातील प्रतिबिंब बघण्यावर खूष होता. हे प्रेक्षक गोवेकर पद्मिनीचे पडद्यावरची प्रतिबिंबे बघत मिटक्या मारीत होते ! त्या गादीवर वारंवार सिनेमातील लाखो रूपयांच्या खणखणाटाचा नुसता पडसाद उठायचा. प्रभात फिल्म कंपनीच्या `अयोध्येचा राजा' या चित्रपटाने सगळा पंजाब लुटून फस्त केला, सरस्वती सिनेटोनच्या `श्यामसुंदर' चित्रपटाने मद्रास जिंकून टाकला, असल्या बातम्यांची रोज चर्चा. मग एक दिवस कोल्हापूरचे, एक सरदार आले. ते कुठले सरदार हे याला त्यावेळी कळले नाही. पुढे त्यांच्याबरोबर सांगलीला वर्षभर राहूनही कळले नाही. त्यांच्या व कोल्हटकरांच्या बेठकी झडू लागल्या. सरदारांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यामुंबईचे निर्माते केवळ उपरे. एक दोन वर्षात वर आलेले. दीनानाथ,कोल्हटकरांची नावे मोठी. वर्षानुवर्षे महाराष्ट्रात गाजलेली. नट सगळे आयते तयार. कोल्हटकर खलनायक. दिनानाथराव नायक. आणि ते गोव्याचे. म्हणजे नायिकांना तोटा नाही ! सगळ्या महाराष्ट्रातील सिनेमा थिएटरे `आम्हाला चित्रपट द्या आणि त्यासाठी हे हजारो रूपये आधी घ्या' म्हणून मागे लागतील. म्हणजे भांडवलाची अडचण नाही ! पान नं. 68 आणि मग बळवंतराव पेठयांनी याला आतली म्हणून बातमी सांगितली. नाटक थांबणार बलवंत मंडळी बंद होणार... तिची सिनेमा कंपनी करणार ! आता मात्र याचे मन चेकाळून उठले. हवेत तरंगायचे आणि आपटी खायची. किती दिवस हे चालणार ? किती दिवस हे आपण चालू देणार ? या नाटकी जगाला आपण भुललो. हेच चुकले. कशाची एवढी भुरळ पडली ? यश ? प्रसिध्दी ? यासाठी आपण समाजाने ओवाळून टाकलेल्या या माणसांना चिकटलो ? खरे म्हणजे सरकारच्या भटक्या जमातीच्या यादीत नसली तरी ही भटकी जमातच. पोटासाठी गावोगाव फिरणारी. लोक तिकिटे काढून यांना बघतात, पण दुरूनच. यांना बिऱ्हाडे नाहीत. घरगृहस्थीचा पत्ता नाही. यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. असली ही माणसे. या शंभर माणसांत ज्याच्या संगतीसाठी मन लोभावेल असा माणूस एकच. दीनानाथ. नाटक असले की दिनानाथराव रात्री दीडदोन वाजता घरी यायचे. याला उटवून आपल्या बिऱ्हाडात घेऊन जायचे. त्यांचे जेवण होईपर्यंत मद्यपान करायचे. पण गात बसायचे आणि सांगायचे, """"हं,उचल ही हरकर बघू !"""" ती बिचारी डोळ्यांना पाणी लावल्यामुळे भिजलेली झोप, विस्कटलेले केस आणि चुरलेला झगा हे सगळे सावरीत ते गातील त्याबरहुकुम गायची. निदान याच्या अडाणी कानांना तसे वाटे ! पहाटे तीन चार वाजता दोन गवय्ये आणि एक श्रोता यांनी रंगवलेली ही मेफल आटपे. मग हा बिछान्यात पडे. तेव्हा अनेक वेळा याच्या स्वप्नात,त्या मद्यात व मुलीच्या मायेत भिजलेल्या सप्तसुरांच्या रंगीत शलाका आवेशाने फुगडया घालीत. खेळीमेळीने झिम्मा खेळत. टिपऱ्या वाजवीत स्वरमालांचे गोफ विणीत. पुढे बऱ्याच वर्षांनी याने वॉल्ट डिस्नेचा `फॅन्टॅशिआ' बोलपट पाहिला. त्याची सुरवात ध्वनीची एक सूक्ष्म, अत्यंत अचपळ,अतिशय लाजाळू,लपकती आणि भित्री प्रकाशरेषा दाखवून केली होती. कुणी बोलले तरी त्या रेषेचा थरकाप होई. या असीम थरथरणाऱ्या रेषेची विजेसारखी लवलव नृत्यविलासाचे रूप घेई आणि त्यातून पाहता पाहता सुंदर पेले,फुले,भुंगे, फुलपाखरे आकार घेत ! सगळा पडदा ! सौंदर्याच्या लाटांनी उचंबळून जाई ! पण त्यावेळी याला मात्र दिनानाथच्या गाण्यामुळे पहाटे पडलेल्या स्वप्नांची आठवण होई आणि डिन्सेच्या प्रतिभेच्या उगमतीर्थाचा शोध लागल्यासारखे वाटे ! पण पहाटेची स्वप्ने खरी होतात ती इतरांची. आपली नव्हते. नुसते पहाटेचेच नव्हे.पुढच्या आयुष्याच्या उजळ मार्गाचेही स्वप्न पार भंगून गेले ! आता इथे राहण्यात अर्थ नाही. कुणी तरी समक्ष सांगेपर्यंत थांबण्यात शोभा नाही. गेले पान नं. 69 पाहिजे. ताबडतोब निघाले पाहिजे. पण जायचे ते केवळ बळवंतराव पेठयांनी हळू आवाजात काही सांगितले म्हणून ? आपल्याला बोलावले कोल्हटकरांनी आणि हुसकवणार बळवंतराव ?हे नाटक मंडळ्यांचे मॅनेजर महावस्ताद असतात. चहाडया सांगून नाटककंपनीतले नट,नाटककार फोडण्यात यांचा हातखंडा. नाटक बंद होणार ना ? मग अजून रडतखडत का हाईना तालमी कशा चालू आहेत ? रोज गानमहर्षी वझेबुवा येतात. ते आले की आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो. कारण मग एकदोन दिवसांत दीनानाथ म्हणतो,""""हे बघा, त्या पहिल्या चालीपेक्षा ही नवी चाल खूप सुंदर आहे. तिच्यावर पुन्हा गाणं करून द्या."""" म्हणजे पुन्हा नव्या `अर्रर्र भलाई' वर डोके आपटणे आले ! अजून नटमंडळी नाटकाच्या नकलांच्या वहया बाळगीत स्वतःशी पुटपुटत का फिरतात ? हे सोडायचे ?काही तरी संशयाचा धसका घेऊन ? सोडणे सोपे आहे. पण आपण इथपर्यंत पोहोचलो तेच किती कष्टाने ! तरूण लेखकांना आपले नाव उजळावेसे वाटते, पण त्यासाठी आधी त्या नावाला छापखान्यातली काळी शाई लागायला हवी !पण या शाईच्या काळिम्याचेही भाग्य फार थोडयांच्या ललाटी असते. लहानपणी आपण एक कविता लिहिली होती. ती दिवसरात्र डोळ्यासमोर नाचे. `मला छाप.. कसंही करून मला छाप' म्हणत. म्हणून आपण ती `आनंद' मासिकाकडे पाठवायचे ठरवले. पण त्यात फक्त वर्गणीदारांच्याच कविता येत. अनगळ वकिलांचा लक्ष्मण वर्गणीदार. याचा दोस्त. मग आपण त्याला गळ घातली. """"तू माझी कविता पाठव"""" तो म्हणाला, """"तुझ्या बाभळीच्या हॉकी स्टिक्सपेकी एक मला देशील तर धाडतो."""" याने स्टिक दिली. कवितेची सुवाच्य प्रत तयार केली. मग तिढा उभा राहिला. लक्ष्मण वर्गणीदार. तेव्हा त्याचे नाव कवी म्हणून छापून येणार ! मग आपण एक तोड काढली. गडकऱ्यांचे कवी म्हणून नाव गोविंदाग्रज. तर आपण आपल्या भावावरून टोपणनाव घेऊ- विनायकग्रज. कविता पाठवणार लक्ष्मण अनगळ. तीवर कवी म्हणून नाव छापून येणार विनायकग्रज. म्हणजे आपले ! ती छापून आली. आपण लगेच दुसरी कविता लिहिली आणि `आनंद' कडे पाठवून दिली. पण ती परत आली नापसंत म्हणून. कारण मधल्या काळात आनंदाच्या वार्षिक वर्गणीची व्ही.पी. आली ती लक्ष्मणने सोडवून घेतली नव्हती ! आपले एक सोडा. पण यवतमाळचे वामनराव देशपांडे. याच्या दृष्टीने महाकवींच्या कुळीतले. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच आपले एक अप्रतिम खंडकाव्य याच्याकडे पाठवले. त्याचे नाव होते `ललिता'. वामनला फारसा उत्साह नव्हता. तरी कविता आपण त्या वेळच्या सुप्रसिध्द `मनोरंजन' मासिकाकडे धाडली. आठ दिवसांत उत्तर. दिलगीर नापसंत. म्हणजे त्या संपादकांनी ती वाचली तरी केव्हा ? मग आपण मुंबईच्या एका वारीत ती कविता पान नं. 70 `मनोरंजन' च्या ऑफिसात समक्ष घेऊन गेलो. तिथे `कोण हे देशपांडे ?' म्हणून वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या ! शेवटी आपण हट्टाने श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या मार्फत पुन्हा ती `मनोरंजन' कडेच धाडली. पुढच्याच अंकात सुंदर वेलबुट्टीच्या चौकटीत बसून `मनोरंजन'ता ती झळकली. `भारती' या मथळ्याखाली ! छापखान्यातली शाईसुध्दा जिथे नव्या लेखकांना दुर्लभ, तिथे शेकडो हजारो रूपयांच्या सजावटीत दिमाखाने मिरवणाऱ्या रंगभूमीवर नव्या लेखकांना सहजासहजी कोण पोहोटू देणार ? गडकऱ्यांनी किर्लोस्कर मंडळीच्या थिएटरातून डोअरकीपरची कामे केली आणि मग त्यांचे नाट्यगुण चालकांच्या नजरेस आले. गडकऱ्यांचे सोडा. अलौकिक नाटयकर्तुत्वासाठी जगाने डोक्यावर घेतलेला जॉर्ज बर्नाड शॉ ? स्वतःला शेक्सपियरपेक्षा सवाई म्हणवायाचा आणि टीकाकर टवाळी करायचे, `शेक्सपिअरपेक्षा तू एकाच बाबतीत उजवा आहेस. तो मेला आहे आणि तू जिवंत आहेस.: Better a living dog than a dead lion ! शॉने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले. त्याला इंग्लडमध्ये कोणी हात लावीना. अखेर त्याची लेखणी जर्मन भाषेत भुंकली. तेव्हा इंग्रज रसिकांना ते ऐकू आले ! शॉची नाटके योगायोगाने प्रथम जर्मन रंगभूमीवर आली आमि मग तो इंग्लंडात प्रसिध्द होत गेला. असे मोठमोठयांनाही प्रारंभी दुर्लभ ठरलेले फळ तरूणपणीच आपल्या हातातोंडाशी आले. त्याकडे सुखासुखी पाठ फिरवायची आणि परत जायचे ? म्हणजे तिथल्या अनामिकतेच्या कपाशीच्या प्रचंड ढिगात बुडून जायचे ! त्यापेक्षा असे केले तर ? सरळ जाऊन कोल्हटकरांना सांगायचे ! भिता कशाला ? नाटकांचे उत्पन्न ओहटले आहे म्हणून ? माझे नाटक लावून तर बघा. इतक्या जणांनी वाखाणले आहे ! पहिल्या प्रयोगाबरोबरच तव्याएवढा मोठा गरगरीत चांदीचा रूपया चंद्र म्हणून क्षितिजावर उगवेल ! आणि मग तुमच्या आटलेल्या उत्पन्नाचा समुद्र नोटानाण्यांचा लाटा उसळवीत तुमच्या थिएटराच्या दारावर धडका देत बसेल ! पण याचे यालाच ते खरे वाटेना. इथून जावे लागणार हे नक्की दिसत होते. याने खोलीत हताशपणे बघितले. बिछाना, पेटी,पुस्तके,खुंटीवर कपडे आणि कोपऱ्यात फिरायला जायच्या वेळची काठी. याला कळले आता इथे राहणे आपल्या हातातच नाही. मग वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटाप्रमाणे याला वाटू लागले, वळकटी आपोआप गुंडाळली जाते आहे ! कपडे,पुस्तके उडया मारून उघडया पेटीत पडताहेत ! तिचे झाकण मोठा त्राग्याचा आवाज करीत आपटते आहे ! बंद होते आहे !कोपऱ्यातली काठी दाराशी जाऊन इमानी कुत्र्याप्रमाणे `निघू या निघू या ' म्हणून नाचते आहे ! टांगा आला. आपण बसलो. एकटे गाडीत पान नं. 71 चढलो. तेव्हाही एकटेच. मग दोन्ही हातावर चेहरा ठेवून बेळगावला खिडकीशी बसलो. थेट उमरावतीपर्यंत तसेच. मात्र उमरावतीच्या स्टेशनावर उतरलो तेव्हा त्याच दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले ! दुसऱ्या दिवशी सकाळीच दिनानाथराव याच्या खोलीत आले. याच्या खांद्यावर हात ठेवून याच्या शेजारी बसले. """"हे बघा, नाटक मंडळी बंद करून कोल्हापूरच्या सरदारांच्या भागीत एक सिनेमा कंपनी काढायची असं आम्ही ठरवतो आहो."""" याला वाटले बळवंतराव पेठे `ब्रम्हकुमारी' च्या बकरीला मुसलमानासारखे हळूहळू हलाल करीत मारीत होते. दिनानाथरावांनी शिखासारखे एकाच झटक्यात तिचे शिर धडावेगळे केले ! """"पण.. """" ते पुढे म्हणाले,""""आमचं असं ठरलं आहे की तुमचं नाटक काढलं नाही तर तुमचा आता फार हिरमोड होईल. तेव्हा नाटक काढायचं."""" हा बघतच राहिला. याला त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळेना. """"नवी कंपनी सुरू करायला अजून पाच सहा महिने तरी लागतील. पुढच्या महिन्यात सांगलीला मुक्काम आहे. तिथं नाटकाचा पहिला प्रयोग करायचा. मग पुढचे पाचसहा महिने गावोगाव त्याचे प्रयोग होतील."""" तरीही हा काही बोलू शकला नाही. """"तुम्ही एल्एल्.बी.ची परीक्षा पास झाला म्हणून तार आली ना ?"""" """"हं"""" """"मी म्हणतो,या वर्षी आपण नापास झालो आहो असं का नाही धरून चालत तुम्ही?"""" """"ऑ ?म्हणजे?"""" """"म्हणजे असं एक वर्ष तुम्ही आमच्याबरोबर रहा. आम्ही नवीन कंपनीचा प्रयोग करतो आहो. आम्हाला माणसांची गरज लागेल. तुम्ही राहिलात तर आम्हाला मदत होईल. वर्षात काय होतं ते कळेल. आपलं जमलं तर पुढे काय करायचं ते बघू. काय ? पटतो का विचार ?"""" अजून याचे डोके गिरगिरतच होते. """"वकिली काय, आज करायची ती एक वर्षानं पुढे करता येईल. वर्षभर आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू काय मिळेल ते बरोबर खाऊ. पुढचं पुढे."""" याच्या डोक्यात एक विचित्र कल्पना येऊन गेली. यांच्या तोंडाला आज मद्याचा वास अजिबात कसा नाही ?म्हणजे हे सगळे बोलणे मनापासूनचे आहे ? मग ते उठले."""" तेव्हा आजच घरी पत्र लिहून टाका तसं. मोठी कामं उचलायची, म्हणजे फार विचार करू नये."""" आणि याची पाठ थोपटून ते निघून गेले. सकाळी प्रश्न होता येथून जायचे कसे ? आता नवाच प्रश्न उभा राहिला इथे राह्यचे कसे ?