%%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_chapter.cgi?bookId=ob6&chapter=1&lang=marathi %%%%% CS671A : "jsanket@iitk.ac.in" 20150804 शून्य महाभारत दुर्योधन कृष्णाच्या दालनात प्रवेशला. मंचकावर भगवान श्रीकृष्ण निद्रिस्त पहुडलेले होते. दुर्योधन उत्तरीय सावरत कृष्णाशेजारच्या उच्चासनावर विराजमान झाला आणि भगवंत जागे होण्याची शांतपणे वाट पाहात बसला. काही क्षण गेले आणि अर्जुन घाईने आत प्रवेशला. प्रथम दुर्योधनावर दृष्टी जाताच अर्जुन गोंधळून थबकला. मग त्याची दृष्टी कृष्णावर गेली. कृष्ण अजूनही प्रगाढ निद्रेत होते. आपल्याला उशीर झाला आहे याची त्याला जाणीव होऊन अर्जुन काही क्षण विचार करत तसाच उभा राहिला. मग आपल्याला योग्य असे दुसरे आसन दिसते काय हे पाहण्यासाठी त्याने कक्षावर नजर फिरवली, पण त्याला एकही आसन दिसले नाही. मग काही विचार करून तो पुढे झाला आणि दुर्योधनाच्या छद्मी हास्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत कृष्णाच्या पावलांशी गुडघे टेकून बसला आणि रात्रीने प्रभातेची वाट पाहावी त्या अधीरतेने कृष्ण जागृत होण्याची वाट पाहू लागला. काही क्षण गेले. बाहेर प्रभातेचा पदचाप कानी पडताच मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. भगवंत जागे झाले. त्यांची नजर प्रथम आपल्या पायाशी विनमरपणे बसलेल्या अर्जुनावर पडली. मग त्यांनी दुर्योधनाकडे पाहिले. मंद हास्य करीत त्यांनी विचारले, "एवढ्या लवकर आपण उभयता येथे कसे आलात? आपल्याला येऊन फार वेळ तर झाला नाही ना?" "कृष्णा, तुला माहीतच आहे, की आम्हा कौरवांत आणि पांडवांत सख्य नाही. आमच्यामध्ये रीतसर समेट होणे असंभव आहे. त्यामुळे आम्ही युद्ध करून आर्यावर्तावर कोणी राज्य करावे याचा निर्णय करावा असे ठरवले आहे. तू आम्हा उभयतांचा नातेसंबंधी आहेस. या युद्धात तू आमचा पक्ष घेऊन युद्ध करावे अशी माझी इच्छा आहे." दुर्योधन म्हणाला. "मी तुला मदत करावी असे तुला का वाटते दुर्योधना? मी पूर्वीपासून पांडवांचा पक्षपाती आहे असे सारे म्हणत असतानाही, आणि तू माझी त्यासाठी नेहमीच निंदा करत असतानाही, माझी मदत मागायला यावे याचे मला आश्चर्य वाटते आहे" दुर्योधन यावर मंद हसला. "कृष्णा, मी क्षत्रिय आहे आणि उच्चकुलीन आहे. राजनीतीचा मी चांगला अभ्यास केला आहे. राजनीतीत कोणीही कायमचा मित्र नसतो की शत्रू नसतो. त्यामुळे मी तुला मुळीच शत्रू मानत नाही. शिवाय तू माझा नातेसंबंधी असल्याने माझा तुझ्यावर काही अधिकार आहेच. तू मला मदत केल्याने तुझ्यावरचा पक्षपातीपणाचा आरोप दूर होईल आणि तुझी कीर्ती अधिक धवल होईल, असे मात्र खात्रीने वाटते. शिवाय तुझ्यासारखा ज्ञानी मनुष्य आमच्या बाजूला असला तर आमचा मोठाच नैतिक विजय होईल. केवळ तुझ्यामुळे, पांडवांची बाजू लंगडी असली तरी त्यांना जे मदत करायला उभे राहिले आहेत तेही माघार घेतील. त्यामुळे मी तुझी मदत मागायला आलो आहे." "दुर्योधना, केवळ एवढ्यामुळेच मी तुला मदत करायला तयार होईन असे तुला वाटले तरी कसे? तू माझा नातेसंबंधी आहेस हे खरे, पण तेवढे पुरेसे नाही. ज्या कंसाला मी ठार मारले तोही माझा नातेवाईकच होता, हा इतिहास तुला माहीतच आहे." "होय कृष्णा, मला इतिहास चांगलाच माहीत आहे. पण ती वेळ वेगळी होती. कारणे वेगळी होती. येथे परिस्थिती वेगळी आहे. वेळ वेगळी आहे. आपण आर्यावर्ताचे भवितव्य ठरविण्यासाठी येथे बसलो आहोत. तू नसलास तर आम्हाला विजयच मिळणार नाही असे नाही. तू स्वत:सुद्धा अनेक युद्धे हरला आहेस, हाही एक इतिहासच आहे. पण तू स्वत:ला धर्मनिष्ठ समजतोस, म्हणून धर्माची बाजू घ्यायला का होईना तू माझ्या बाजूने युद्ध करावेस असे मला वाटते." कृष्णाच्या चेहर्‍यावरचे हास्य अधिक विस्तारले. मग त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि मृदू स्वरात विचारले, "यावर तुझे काय म्हणणे आहे, अर्जुना?" आपली बाजू पटवून देण्यासाठी शब्द खर्चण्यापेक्षा नम्रता स्वीकारणे अनेकदा हितावह ठरते हे माहीत असलेला अर्जुन शिर झुकवून म्हणाला, "भगवंता, तू माझा मित्रच नव्हेस तर सखा आहेस. तू जे ठरवशील ते मला मान्य आहे." "तुम्ही माझ्यासमोर मोठा बिकट प्रश्न उभा केला आहे." कृष्ण म्हणाला. ""तुम्ही दोघेही माझे आप्त आहात हे खरे. त्यामुळे मला पक्षपाती धोरण स्वीकारणे योग्य वाटत नाही. जेव्हा दोन्ही बाजू धर्म आणि न्याय आपल्याच बाजूला आहेत असे गृहीत धरतात तेव्हा फक्त युद्धानेच धर्म आणि न्याय कोणाच्या बाजूने आहे हे ठरवावे लागते हेही खरे. त्यामुळे युद्ध होणार आणि मला कोणाचीतरी बाजू घ्यावी लागणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे आणि मी एकाच वेळी सर्वांची बाजू घेऊ शकत नाही हेही उघड आहे. तेव्हा मला यावर थोडा विचार करावा लागेल." "कृष्णा, मी तुझ्याकडे सर्वप्रथम आलो आहे आणि जो प्रथम मदत मागायला येतो त्यालाच मदत करणे ही पुरातन रीत आहे. तुझ्यासारखा सज्जन हा परिपाठ तोडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे तू मलाच मदत करायला हवीस." "दुर्योधना, तू प्रथम आला आहेस हे खरे आहे. पण मी अर्जुनास प्रथम पाहिले हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे माझ्यापुढचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. पण मी यावर एक तोडगा सुचवतो. जर तो तुम्हा उभयतांना मान्य झाला तर मी उभयतांना मदत केल्यासारखीच होईल." "सांग कृष्णा." अर्जुन अधीरतेने म्हणाला. "एकीकडे मी आहे आणि दुसरीकडे माझी दोन अक्षौहिणी सेना आहे. या युद्धात मी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही. कारण माझ्याच हस्ते माझ्या आप्तांवर वार व्हावा हे मला योग्य वाटत नाही. माझी सेना मात्र कोणाचीही आप्त नसल्याने ती मात्र युद्ध करेल. "आता युद्ध न करणारा मी हवा, की शस्त्रास्त्राने सिद्ध अशी अक्षौहिणी सेना हवी याचा निर्णय तुम्ही मला द्यायला हवा. हे दुर्योधना, तू प्रथम आलास म्हणून आणि ज्येष्ठ आहेस म्हणून तू मला प्रथम सांग, तुला काय हवे आहे?" दुर्योधन काही क्षण स्तब्ध बसला. अर्जुन अनिवार उत्कंठेने दुर्योधन काय उत्तर देतो याची वाट पाहू लागला. "हे जनार्दना, तू माझा आप्त आहेस, आणि तरीही आजवर तूच माझा विरोध केला आहेस. पण मी फक्त तुझी आणि फक्त तुझी मदत मागायला आलो होतो, त्यामुळे मला फक्त तूच हवा आहेस." दुर्योधन उत्तरला. कृष्णाचा चेहरा आश्चर्याने विस्फारला गेला. जणू दुर्योधन त्याची मागणी करेल अशी त्याची अपेक्षाच नव्हती. पण आता त्याने शब्द दिला होता आणि त्याच्यासारखा धर्मवेत्ता दिलेला शब्दलणे शक्य नव्हते. "तथास्तु! अर्जुना, तुझ्या वाटयाला आता माझी सेना आली आहे. तिचा योग्य विनियोग कर आणि युद्धात जय मिळव" कृष्ण म्हणाला. अर्जुनाच्या नेत्रांत अश्रू उभे राहिले. सर्व आशा संपलेल्या मनुष्यासारखा तो प्रतिमावत बसून राहिला. नंतर रुद्ध कंठाने तो म्हणाला, "जनार्दना...का एवढा तू निष्ठूर झालास? का तू माझा असा त्याग केलास? मी आता द्रौपदीला काय सांगू? तिची तुझ्यावर अनन्यसाधारण भक्ती आहे. तुझ्या आशेवर तिने वनवासातील दु:सह्य कष्ट सहन केले. केवळ तुझ्यावर श्रद्धा ठेवून अपमानांच्या अगणित राशी तिने भोगल्या. मी धर्मराजास काय सांगू? आमच्या हृदयात सदैव वसणार्‍या परमात्म्याने आमचा त्याग केला आहे असे सांगू? तो धीरगंभीर ज्ञानी मनुष्य ही वेदना कशी सहन करेल? हा आघात त्याला कोलमडून टाकण्यास पुरेसा आहे. हे भगवंता, जर तू आमच्या बाजूस नसशील तर हे युद्ध करण्यात तरी काय अर्थ आहे? जा दुर्योधना, तुझे राज्य तुला लखलाभ असो. आम्ही पाच बंधू द्रौपदीसह या आर्यावर्तात कोठेही जाऊन राहू." कृष्णाची मुद्रा गंभीर झाली होती. "हे अर्जुना, जर तुला तुझी बाजू न्यायाची वाटत असेल तर तुझी बाजू सिद्ध करण्यासाठी तुला युद्ध करणे भाग आहे. जर तू खरेच धर्मनिष्ठ आहेस तर मी तुझ्या बाजूने आहे की नाही यामुळे तुझ्या युद्धाच्या निर्णयावर फरक पडता कामा नये. धर्म आणि न्याय भावनांच्या तुलेत तोलता येत नाहीत. धर्म सूक्ष्म आहे आणि त्याचे अनंत पैलू आहेत. धर्म हा सामान्य बुद्धीच्या मनुष्यांच्या पकडीबाहेरचा आहे. हे अर्जुना, धर्माला कोणतीच बाजू नसते. धर्म सर्वत्र आहे आणि शाश्वत आहे. एका भूमीच्या तुकडयावर उभे राहून एका पर्वताकडे पाहात असता तो पर्वत वेगळाच भासतो तर अन्य ठिकाणावरून पाहिले असता तो अजून वेगळा दिसतो. हे नरपुंगवा, धर्म हा असाच आहे. मी आजवर धर्माकडे तुझ्यावरील प्रेमापोटी, तुझ्या हिताच्या दृष्टीने पाहात होतो. आता माझी बाजूलली आहे. आणि मी ज्या नव्या बाजूने आहे त्याच बाजूने धर्माकडे पाहीन, हे आता उघड आहे. "हे पांडवा, केवळ मी तुझ्या बाजूने आहे म्हणून धर्मही तुझ्या बाजूने आहे किंवा मी तुझ्या बाजूने नाही म्हणून धर्म तुझ्या बाजूने नाही, असे काही नाही, धर्म केव्हाही कोणाच्याच बाजूने नसतो. तो आपल्या बाजूने असल्याचा भरम मात्र निश्चयाने असतो. या भरमापार जर तू जाशील, तर तुझे हेतू धर्मनिष्ठ नाहीत हे सुद्धा तुझ्या लक्षात येईल." "कृष्णा, तू परस्परविरुद्ध लढतो आहेस. हे परमात्मस्वरूपा, केवळ बाजू बदलताक्षणी शब्दलणे हे केवळ सामान्य प्रतीच्या मनुष्यासच शक्य आहे. आजवर मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली. कारण तू पुरुषश्रेष्ठ आहेस, आत्मस्वरूप आहेस अशी माझी भावना होती. परंतु आता असे वाटते आहे की मी काहीतरी चूक केली आहे. तू माझ्या बाजूने नाहीस तर ठीक आहे. आम्ही तरीही हे युद्ध करू आणि या युद्धात जय मिळवू." एवढे बोलून अर्जुन उठून उभा राहिला. आता त्याच्या मुद्रेवर निश्चयाची आभा झळकत होती. ही सृष्टी एक विजात्र खेळ असल्याची पूर्ण जाणीव असलेला कृष्ण मंद हास्य करीत म्हणाला, "अर्जुना, सारे मानव सामान्य आहेत. सारे मानव स्वार्थी आहेत. आपल्या श्रद्धेशी ठाम नसणे हे त्याच्या क्षुद्रपणाचेच लक्षण आहे. असो. तू माझा सैन्यसंभार घेऊन परत जा. द्रौपदी आणि युधिष्ठिरास माझे अभीष्ट कळव." अर्जुन किंचित वाकून, दुर्योधनावर एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत वळाला आणि त्या दालनातून निघून गेला. "दुर्योधना, तू माझे एवढे बलाढ्य सैन्य न मागता युद्ध न करणार्‍या, नि:शस्त्र अशा मला का मागितलेस?" कृष्णाने काही क्षणानंतर विचारले. आपल्या मुद्रेवर नेहमीच आपल्या श्रेष्ठत्वाची प्रौढी मिरवणारा दुर्योधन म्हणाला, "हे कृष्णा, केवळ सैन्यबलाने युद्धे जिंकली जात असती तर अनार्यांचा विनाश अल्पसंख्य आर्यांना कसा करता आला असता? विजयाची दुंदुभी संख्येने अधिक असलेले नव्हे तर श्रेष्ठ नेतृत्व असलेले लोकच फुंकू शकतात. हे जनार्दना, सैन्य तर मजजवळ पुष्कळ आहे. रथी आणि महारथींचीही मजजवळ कमतरता नाही. कमतरता होती ती फक्त तुझी. केवळ तू माझ्या बाजूस आहेस हे समजले तर माझा सामान्य सैनिकही महारथीच्या आत्मबलाने लढेल. आणि आता तू माझ्या बाजूस आहेस. हे कृष्णा, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे." "दुर्योधना, तू बुद्धिवंत आहेस यात शंका नाही. पण मी तुझ्या बाजूने येऊन तुझे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करून पांडवांचा विजय सुकर करणार नाही असा विश्वास तुला का वाटतो? मी पांडवांना नेहमीच आपला स्नेही मानले आहे. तू त्यांच्यावर अनंतदा अन्याय केला आहेस. कपटाचरण करून त्यांना वनवासी केले आहेस. तू मलाही मी शिष्टाई करण्यास आलो असता बंदी बनवण्याचा अधम प्रयत्न केला आहेस. याबद्दल माझ्या मनात राग नसेल हा विश्वास तुला का वाटतो?" दुर्योधन म्हणाला, "हे कृष्णा, तू तसे करणार नाहीस याबद्दल मला विश्वास आहे; पण समजा, जरी तू माझ्यावर राग धरून बिभीषणाप्रमाणे माझ्या पराजयासाठी पांडवांना मदत केलीस तरीही तो माझाच विजय आहे, हे निश्चयाने समजून अस. "हे पंडिता, तू स्वत:स नारायणाचा अवतार समजतोस. तू सर्वत्र व्यापून राहिला असून केवळ मानवाच्या हितासाठी हा नरजन्म घेतला आहेस असे म्हणतोस. "भीष्म व द्रोणही तुला परमात्मस्वरूप मानून भजतात. असा तू, जर अधर्माचरणी झालास तर तुझ्या चेहर्‍यावरील हा भगवत्तेचा मुखवटा गळून पडेल. या जगात अढळ श्रद्धा ठेवावी असे काहीही नाही हे सर्व मानवजातीस कळून येईल आणि सारे अधर्म करू लागतील. तू परमात्मा नसलास, तरी सारे तुला परमात्मा मानतात आणि तशी श्रद्धा ठेवतात. तुझ्यावरची ही श्रद्धा भंगली तर हे कृष्णा, या पृथ्वीतलावर पुन्हा कोणी कोणावर श्रद्धा ठेवणार नाही. पती पत्नीवर विश्वास ठेवणार नाही, की पिता पुत्रावर. सार्‍या जगात संशयाचे बीज रोवले जाईल व त्याचा फोफावणारा वृक्ष सारे जीवन व्यापून उरेल. ही भूमी वीराण बनेल. "हे कृष्णा, हे युद्ध झाले तर मोठी हानी होईल असे नाही. यात माझा पराजय झाला तर फार तर माझी बाजूच अन्यायाची होती असे जग समजेल आणि माझा द्वेष करेल. आणि जर मी विजयी झालो तर मग पांडव अधम होते याचा साक्षात्कार जगाला होईल. जेत्यांची तळी उचलणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे विजयाने माझ्यावर काही विशेष फरक पडेल असे नाही. पण जर तू बदललास तर मग ही पृथ्वी नि:शेष होईल. "हे कृष्णा, मी माझे जीवन पूर्ण सामर्थ्यासह जगलो आहे. मी क्षत्रियास शोभेल अशाच पुरुषार्थाने जगलो आहे. मी कधीही कोणासमोर शिर झुकवले नाही. पण मी कोणावर अन्यायही केला नाही. हे कृष्णा, हे राज्य माझे आहे अशी माझी श्रद्धा आहे, आणि ज्यावर माझी श्रद्धा आहे, त्यासाठी मी माझे प्राणही देऊन टाकीन. माझ्या श्रद्धा या परिस्थिती पाहून पाठ वळवणार्‍या क्षुद्र मानवाच्या श्रद्धा नव्हेत. या दुर्योधनाच्या श्रद्धा आहेत. त्या मेरुपर्वताइतयाच अचल आणि दृढ आहेत. "हे कृष्णा, तू ज्ञानी आहेस. तुला सारे कळते; पण तू मानव आहेस आणि मानवास शोभेलसे रागद्वेषही तुझ्यात आहेत. पण सर्वांनी तुझ्यावर देवत्व लादले आहे आणि तू आता त्या देवत्वाचा गुलाम आहेस. तुला देवासारखेच वागावे लागेल आणि माझी दृढ बाजू घ्यावी लागेल. कारण तू तुझ्या शब्दांनी आता माझ्याशी बांधला गेला आहेस. "हे कृष्णा, काय सांगावे, तरीही कदाजात तूलशील. माझ्याबद्दल उरात द्वेष ठेवून माझ्या पराजयाचा मार्ग उघडशील. पण मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या बाजूने असतानाही जर माझा पराभव झाला तर मी तो दुर्दैव म्हणून स्वीकारेनही; पण मग या जगात तुझी नालस्ती होईल. आणि तोच माझा खरा विजय असेल. "हे कृष्णा, ही भूमी तशी कोणाचीही नव्हे, आम्ही केवळ प्रजेचे प्रतिपालक. मी प्रतिपाल केला नाही तर अन्य कोणी करेल. मला राज्याची हाव आहे असे सर्वांना वाटते; पण जनार्दना, तसे असते तर एका सुतपुत्रास मी एखादे राज्य दान दिले नसते. जे दान मी एखाद्या अपरिजातास देऊ शकतो ते पांडवांस देऊ शकत नाही असे तुला वाटते तरी कसे? पण दान घेणारा विनमरच असला पाहिजे. दान घेणार्‍याला कोणताही अधिकार नसतो. कोणी नमरपणे प्राणदान मागितले तर मी प्राणही देईन, पण जर अधिकाराने कोणी मजजवळ तृणपाते मागितले तर ते मी काही केल्या देणार नाही, हे नीट समजावून घे. कारण ज्यावर माझाही अधिकार नाही, त्यावर अन्य कोण अधिकार सांगणार? "प्रत्येक प्राणी स्वभावाने बांधला आहे. आणि त्याचा स्वभाव हाच त्याचा धर्म आहे. माझा स्वभाव असा आहे आणि त्या स्वभावानेच मी जगणे यातच माझा धर्म सामावला आहे. "कृष्णा, तू माझ्या बाजूने आहेस, एवढेच मला पुरेसे आहे. पण तू मुक्त आहेस. तू शस्त्र हाती घेण्याचीही मला गरज नाही. मी राजा म्हणून, माझ्याशी एकनिष्ठच राहिले पाहिजे याचेही तुजवर बंधन नाही. तू या मुक्त वायूप्रमाणेच स्वतंत्र आहेस" कृष्ण मंचकावर उठून बसला आणि म्हणाला. "हे वीरा, नि:शंक रहा. तुझा विजय निश्चित आहे. सारेच विजय रणभूमीवर मिळत नसतात. काही विजय श्रेष्ठ मनुष्यांच्या ंतरातच असतात. सुखाने जा दुर्योधना, मी तुझ्याबरोबर आहे." दुर्योधन उठला. श्रीकृष्णास वंदन केले आणि गजराजाच्या डौलाने बाहेर पडला. अर्जुन खिन्न मुद्रेने युधिष्ठिराच्या शिबिरात आला तेव्हा तेथे युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव द्रौपदीसह बसलेले होते. अर्जुनाची खिन्न्ता पाहून युधिष्ठिराने विचारले, "अर्जुना, असे काय अशुभ घडले आहे की ज्यामुळे तू निराश आहेस?" अर्जुनाच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले व तो सद्गदित कंठाने म्हणाला, ""हे महाबली, कपटी दुर्योधनाची अखेरची चालही यशस्वी झाली. कृष्णास त्याने शब्दात पकडून आपल्या बाजूला वळवले. आपल्याला मिळाली ती फक्त श्रीकृष्णाची सेना. पण या सैन्याचा आपल्याला काय उपयोग? आपल्याला हवा होता तो आपला सखा कृष्ण. केवळ तोच आपल्या चातुर्याच्या बळावर आपल्याला विजयश्री आणून देऊ शकला असता." हे वृत्त कळताच सार्‍यांवरच खिन्न्तेचे मळभ दाटून आले. मग युधिष्ठिर म्हणाला, ""ठीक आहे. जसे परमेश्वराच्या मनात आहे तसे होईल." यावर भीम संतप्त होऊन, नेत्रांतून अग्निज्वाला ओकत म्हणाला, "या कपटी दुर्योधनाला मी रणांगणात माझ्या गदेने ठेचून ठार मारेन." द्रौपदीच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता. ती म्हणाली, "माझा सखा माझ्यापासून का दुरावला? असे आम्ही कसले घोर पातक केले होते की त्याची आम्हाला अशी शिक्षा मिळावी?" नकुल आणि सहदेव भयभीत सशांप्रमाणे भीमार्जुनाकडे पाहात बसले. अर्जुन म्हणाला, "आता आपल्याला स्वबलानेच हे युद्ध करावे लागेल हे निश्चित! कृष्ण किमान हाती शस्त्र घेणार नाही ही आपल्या लाभाचीच बाब आहे. आता आपणाकडे एकूण नऊ अक्षौहिणी सेना आहे तर द्रुपद, युयुधान, विराट, धृष्टकेतूसारखे महावीरही आहेत. कौरवांकडे भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तासारखे वीर आहेत. कौरवांकडील भीष्म आणि द्रोण आपलेच हितचिंतक आहेत. त्यामुळे हे महावीर संपूर्ण सामर्थ्याने आपल्याशी काही केल्या लढणार नाहीत. आपल्याला खरी भीती आहे ती कर्ण आणि अश्वत्थाम्याची. कर्ण पहिल्यापासून माझा द्वेष करतो, त्यामुळे कर्ण आपल्याला जड जाणार आहे हे निश्चित. परंतु मी माझे सारे सामर्थ्य पणाला लावून त्याचा पाडाव करेन. अश्वत्थाम्यासही आपणास रणात पाडता आले तरच आपला विजय सुकर होईल." युधिष्ठिर म्हणाला, "तू म्हणतो ते खरे आहे अर्जुना, पण कृष्ण जर त्यांच्या बाजूने असेल तर तो सर्वांना अग्निस्फुल्लिंगाप्रमाणे प्रदीप्त करेल. त्याचे भाषण ऐकले की नेभळटांना सुद्धा स्फुरण चढते. नद्याही मार्ग सोडून धावू लागतील असे शब्दसामर्थ्य त्याला लाभले आहे. नाही अर्जुना, आपला विजय सुकर नाही." भीम काडकन शड्डू ठोकत, आरत नेत्र करत म्हणाला, "हे बंधो, असे भयभीत भाषण फक्त तूच करू शकतोस. तुझ्यामध्ये पुरुषार्थ असा नाहीच. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे तुला काहीच वाटत नाही. आपल्याला भोगाव्या लागलेल्या यमयातनांचे तुला विस्मरण झालेले दिसते. स्वत:ला धर्म संबोधतोस तू, परंतु धर्माचे गूढ तुला माहीत नाही. आम्हाला वडीलपणाचा धाक दाखवत आमच्या पुरुषार्थास दडपणे तेवढे तुला चांगले मिते. द्यूतगृहात तू माझ्या करोधावर आवरण घातले नसतेस तर त्या नीच दुर्योधनाचे मस्तक मी माझ्या गदेने तेथेच छिन्न-भिन्न केले असते." युधिष्ठिराच्या काळजीयुत चेहर्‍यावर प्रथमच हास्य जवळुरले. "भीमा, तुम्हाला मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. जर यापूर्वी कृष्ण आपल्या बाजूने नसता तर आपण युद्धाचा कदापि विचार केला नसता, याची तुला जाणीव आहे. कृष्णानेच आपल्या ंत:करणात सूडाचा वन्ही प्रदीप्त केला हे तू विसरतो आहेस. आता आपण युद्धाची घोषणा केली आहे आणि नेमकी त्यावेळीस कृष्णाने बाजूलली आहे. आपण आता माघारही घेऊ शकत नाही, याची मला चांगलीच जाणीव आहे. आता आपण या परिस्थितीतून चांगला मार्ग कसा काढायचा हे पाहायला हवे," "कसला मार्ग?" द्रौपदीने आशेने विचारले. "द्रौपदी, तुझी कृष्णावर अनन्यसाधारण भती आहे. तो तुझ्या शब्दांबाहेर जाणार नाही असा विश्वास मला वाटतो. कृष्ण काही स्वखुशीने दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेला नाही. केवळ दिल्या शब्दाच्या पेचात सापडून त्याला कौरवांची बाजू घ्यावी लागली आहे. याचाच आपण चांगला फायदा करून घेऊ शकतो. कृष्णाला तू जर खाजगीत भेटलीस आणि कौरवांचा भेद सांगण्याचे किंवा त्यांचा पराजय कसा करता येईल, याचे रहस्य विचारलेस तर तो तुला निश्चितपणे सांगेल. शिवाय कौरवांकडची विदूर-संजयासारखी माणसेही आपल्या बाजूला आहेत. ते आपल्याला मदत करू शकतील. तेच आपल्याला विजयाचा मार्ग दाखवू शकतील." "कृष्ण माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, याची मला खात्री आहे." द्रौपदी प्रसन्न होत म्हणाली. या नव्या कल्पनेने पांडवांच्या मनात आनंद दाटून आला. भीम तेवढा तटस्थ होता. तो म्हणाला, "कृष्ण कसाही असला तरी तो दुटप्पी नाही. तो श्रेष्ठ राजकारणी आहे हे खरे, पण तो वचनभंग करणार नाही. त्याला आता जर दुर्योधनाची बाजू घ्यावी लागली असेल तर तो काहीही झाले तरी ती बाजू सोडणार नाही. शिवाय आपण पराकरमी आहोत आणि आपल्या बुद्धिचातुर्यावर आपला विश्वास आहे. आपण छलकपटाने दुर्योधनाचा घात करण्यापेक्षा मग आत्मघात का करून घेऊ नये? आपण आजवर अनंत यातना भोगल्या आहेत. आपण राज्यभरष्ट होऊन चौदा वर्षे वण-वण करत भटकलो आहोत. आता आपण पुन्हा राज्य प्राप्त करण्यासाठी युद्धाचा पट ंथरला आहे. युद्धात बाहुबल महत्त्वाचे आहे, बंधो! छलकपट अधर्माचे लक्षण आहे आणि त्याला तुझ्यासारख्या धर्मपंडिताने त्यास समर्थन द्यावे, हे आश्चर्य आहे." "भीमा, धर्म सूक्ष्म आहे. भल्या-भल्यांना त्याचे नीटपणे आकलन झाले नाही. सामान्य व्यती सरधोपट धर्मतत्त्व हेच आदर्श ठेवतात आणि त्याप्रमाणे जगतात. आपण येथे युद्ध फक्त राज्यप्राप्तीसाठी करतो आहोत काय याचा विचार करायला हवा. कौरवांनी आपल्याला प्रथमपासून द्वेषबुद्धीने अलग ठेवले. त्यांनी द्वेषबुद्धीने आपल्या वधाचे प्रयत्न केले. कधी तुला विष खाऊ घातले, तर कधी जविंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारंवार कपट केले असूनही आपण कधीही आजवर असत्याचा मार्ग धरला नाही. परंतु आता युद्धाची दुंदुभी फुंकली गेली आहे. आपली बाजू सत्याची की असत्याची हे युद्धातील विजय-पराजय ठरवणारआहे. "या जगतातील व्यवहारधर्म असा आहे की जो जिंकतो त्याचीच बाजू सत्य आहे असे मानले जाते. पराजिताचे सत्यही असत्य ठरते. त्याला अनंत दूषणे दिली जातात आणि अधम कोटीत ढकलले जाते. जर आपला पराजय झाला तर आपल्या यातनांचे सारे संदर्भलतील. सत्तेसाठी हपापलेल्या भावांनी सुबुद्ध कौरवांशी रक्तरंजति युद्ध केले आणि त्यात त्यांचा विनाश झाला असेच लोक म्हणतील. लोकोतीत फार मोठे सामर्थ्य आहे. लोक जेत्यांना डोयावर घेतात आणि पराजितांना पापी मानतात. आपणही हरलो तर पापी ठरू. मग या आपल्या धर्माचरणाची आणि सत्याची किंमत ती काय? लोक ते कधीच जाणू शकणार नाहीत आणि लोक जे जाणत नाहीत त्याचे काही एक मूल्य नाही. हिरा जोवर मातीत गाडला गेला आहे, तोवर त्याचे कुणाला आकर्षण असणार? तो जेव्हा बाहेर काढला जातो आणि तो जेव्हा सर्वांचे नेत्र दिपवतो तेव्हाच त्याला मूल्य येते." भीम यावर म्हणाला, "आपण आपल्या ंतरात्म्याला पटणार्‍या सत्याचा मार्ग धरून चालणार आहोत की लोक काय म्हणतील याचा विचार करून चालणार आहोत हे आपण प्रथम ठरवायला हवे. जी गोष्ट आपल्या ंतरात्म्याला मान्य नाही, ती शब्दांचे मधुर अवगुंठण घालून लोकांसमोर ठेवून कितीही प्राप्त यियिकार होऊन झाली तरी माझ्या मते त्याची काही एक किंमत नाही. शेवटी सत्य आणि धर्म याची मर्यादा ही आपल्या-आपल्यापुरती घालून घ्यावी लागते आणि त्या मर्यादेतच जीवन जगावे लागते. आपण आपल्या मर्यादा सोडून धर्माचा उपमर्दच करत नाही काय? "जर आपण व्यवहारधर्माचा विचार करत असू, तर आपल्याला दुर्योधनालाष देण्याचा तरी काय अधिकार आहे? मला वाटतेआ, आपण आता कृष्णाबद्दल सारे काही विसरावे आणि स्वबलावर युद्धाची सिद्धता करावी." द्रौपदी यावर अग्निप्रलयाप्रमाणे संतप्त होत उद्गारली, "याचा अर्थ तुम्हाला माझ्या मानभंगाची काहीच पर्वा नाही असा होतो. तुमच्या प्रतिज्ञांचे काय झाले? की एका दुर्बल स्त्रीला तेवढ्यापुरते सांत्वन लाभावे म्हणून त्या केल्या होत्या?" भीम यावर व्यथित होत म्हणाला, "द्रौपदी, मला माझ्या प्रतिज्ञांचे एक क्षणही विस्मरण झालेले नाही. देहात प्राण आहे तोवर मी त्या प्रतिज्ञा पार पाडणारच." "मग आपण आपल्यातच का विवाद घालतो आहोत? आपल्याला विजय हवा आहे आणि त्या अधमांचा विनाश. मी कृष्णाची अवश्य भेट घेईन." भीम सोडून इतरांच्या मुखावर समाधान पसरले. द्रौपदी कृष्णाच्या शिबिरासमोर थांबली. द्वारावरील रक्षकांनी द्रौपदीस ओळखून आदबीने अभिवादन केले आणि आत कृष्णाला वृत्त द्यायला गेले. कृष्ण तेव्हा मंचकावर बसून चिंतन करण्यात निमग्न झाले होते. "द्रौपदीदेवी आल्या आहेत." कृष्ण भानावर आले आणि द्रौपदीला आत आणण्याची आज्ञा दिली. द्रौपदी साध्या वेषात होती पण तरीही ती एखाद्या विद्युल्लतेसारखी तेजस्वी दिसत होती. तिचा करोध जणू तिच्या नेत्रांत साकळला होता. कृष्णाने तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि जणू काही क्षणार्धात त्याला सारे काही कळून चुकले. "बोल कृष्णे... का आली आहेस तू?" द्रौपदीने त्याच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहिले. मग ती म्हणाली, "हे कृष्णा, तू असा का रुष्ट झालास आमच्यावर की ज्यामुळे तू त्या पापी कौरवांची बाजू घ्यावीस? अरे, तूच तर नेहमी आम्हांला धीर दिलास, आमच्यावरील संकटे सुसह्य व्हावीत म्हणून उपदेश केलास. या युद्धाच्या कगारावर तूच आम्हांला आणून ठेवलेस... आणि तूच आमचा शेवटी त्याग केलास? असे कोणते प्रलोभन तुला पडले पुरुषोत्तमा! का तू सुद्धा आपल्या दिल्या वचनांना जागू नयेस..." "हे कृष्णे, मला तुझा उद्वेग समजतो आहे. मला समजते आहे की तू एवढी का संतप्त झाली आहेस. तुला द्यूतगृहातील तुझ्या अपमानाचा सूड घ्यायचा होता. तुला तुझ्या पाचही पतींवर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा होता. तुझी फक्त माझ्यावर श्रद्धा होती. मी तुझ्याबरोबर असलो तरच तुझ्यावरील अन्यायाचाला घेतला जाईल याची तुला जाण होती," "होय कृष्णा, तू अगदी माझ्या मनातीलच बोलतो आहेस. पण तुझे वागणे मात्र त्याच्या अगदी उलट आहे. का पुरुषोत्तमा, का तू असा वागलास?" कमल उमलावे तसे हास्य कृष्णाच्या मुखावर उमलले. "हे कृष्णे," कृष्ण मृदुलतम तृणांकुरांसारख्या कोमल शब्दात म्हणाला, ""धर्म फार सूक्ष्म आहे. तुला त्याची जाणीव कशी असेल? मी परमात्मा असूनही अद्यापही धर्म मला नीट समजला आहे असे मला वाटत नाही. मी अन्य प्राणिजगताबद्दल अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की ते अगदी मी दाखवलेल्या मार्गाने जात आहेत. पण मनुष्यप्राण्याचे काही वेगळेच आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म सा आहे त्यापेक्षा जास्ति गुंतागुंतीचा बनलेला आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म जास्त कुटिल आणि जटिल बनला आहे. कृष्णे, मी धर्माचा निर्माता आहे, म्हणून मलाच धर्म एवढा जटिल-कुटिल का आहे, हे समजावून घ्यायचे आहे." कृष्णाचेलणे ऐकूण द्रौपदी जास्तच गोंधळात पडली. कृष्ण , आपला सखा , आज एवढा अलिप्त आणि कोड्यात का पडतो आहे हे द्रौपदीला समजेनासे झाले. ती म्हणाली, "हे कृष्णा, हे सख्या, तुला काय हवे आणि काय नको हे तुलाच जास्त माहीत. मी अज्ञ आहे, सामान्य आहे. मला एवढेच माहीत आहे की तू न्यायाची बाजू सोडून अन्यायाची बाजू घेतली आहेस!" कृष्ण यावर म्हणाला, "कृष्णे, मला एका प्रश्नाचे उत्तर देशील?" "विचार कृष्णा... कोणताही प्रश्न विचार." "तुला अर्जुनाने पणात जिंकले होते. नियमाप्रमाणे तोच तुझा पती होता. पण युधिष्ठिराने जेव्हा माता कुंतीची आज्ञा म्हणून तुला पाचही बंधूंशी विवाह करावा लागेल असे सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" द्रौपदीच्या चेहर्‍यावर कृष्णमेघ दाटी करून आले. तिची मुद्रा सुकल्या पुष्पाप्रमाणे म्लान झाली. तिच्या कंठातून शब्द फुटेनासा झाला. "बोल कृष्णे, माझ्यापासून काही लपवू नकोस." कृष्ण जरा मोठयाने म्हणाला. त्याची मुद्रा गंभीर झाली होती. त्याच्या चेहर्‍यावरचे तेज उगवत्या सूर्याप्रमाणे वाढले होते. "कृष्णे, मी या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून कधीतरी मिळेल याची अनेक वर्षे वाट पाहात होतो. सांग कृष्णे, तुला एकाशी नव्हे तर पाच बंधूंशी विवाह करावा लागणार आहे, हे सांगण्यात आल्यावर तुला काय वाटले?" द्रौपदीच्या चेहर्‍यावरील आभा, रात्र होताच प्रकाशाने विरून जावे तशी विरली होती. तिच्या नेत्रांत अश्रू दाटी करून आले. ती खाली बसली. मस्तक झुकवले. अश्रूंचा महापूर वाहू लागला. रात्रीने पहाट होण्याची वाट पाहावी तेवढ्याच आतुरतेने द्रौपदी काही बोलेल याची कृष्ण वाट पाहात होता. "का हा प्रश्न विचारलास कृष्णा? का?" कृष्णाने प्रत्युत्तर दिले नाही. तो शांतपणे आपल्या आसनावर बसून राहिला. द्रौपदीलालावे लागेलच हे जणू त्याला माहीतच होते! "का माझ्या हृदयावर आता ओरखडे काढतो आहेस कृष्णा? का? अरे, तूच तो होतास ना... जो म्हणाला होता... धर्माने हा विवाह मान्य केला आहे म्हणून... अरे, तूच म्हणाला होतास ना की मी... मी पूर्वजन्मात धर्मकार्यात काही चूक केली म्हणून मला हे पाचही पतींशी विवाह मान्य करावे लागतीलच म्हणून, आणि तूच मला हा प्रश्न विचारतो आहेस?" कृष्ण उद्विगत झाला. "कृष्णे, तू साधी आहेस आणि मूर्खही! तू अयाजिन आहेस. तुझा जन्म यज्ञातून झाला. तुला कसला आला पूर्वजन्म? तुला जर कधी पूर्वजन्म असताच तर तू विद्रोह केला असतास... प्राणार्पण केले असतेस... पण तू तसे केले नाहीस. कारण माझ्या प्रिय द्रौपदी, तू अयाजिन होतीस. तुला कसले आले पूर्वकार्य? पण केवळ व्यास म्हणाले आणि तू ते मान्य केलेस. तू मान्य केलेस द्रौपदी, कारण तुला पूर्वसंस्कार नव्हते. मला खरे सांग द्रौपदी, तुला तेव्हा नेमके काय वाटले? खरे उत्तर दे... मला सत्य जाणायचे आहे." द्रौपदी जरा सावरून बसली. तिला असे वाटले जणू ती या अवघ्या जन्मात एकदम बावळट ठरली आहे. "कृष्णा, खरे सांगू?" "होय द्रौपदी... मला सत्यच ऐकायचे आहे..." "मी या पाचही पतींपासून संतुष्ट आहे!" "तू संतुष्ट आहेस द्रौपदी. तू का संतुष्ट आहेस हे सुद्धा मला माहीत आहे पण कृष्णे, जेव्हा तुला फक्त अर्जुनाशी नव्हेतर सर्व बंधंूशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" द्रौपदी काही क्षण विचार करत राहिली. मग म्हणाली, "मला तेव्हा काय वाटले? कृष्णा, अरे तेव्हा मला कळत तरी काय होते? मला एवढेच माहीत होते की, जसे मला वागायला सांगितले गेले आहे तसेच मी वागले पाहिजे. हे खरे की मला अर्जुनाचे आकर्षण वाटले होते. पण तेही जेव्हा त्याला प्रथम पाहिले तेव्हा! मुळातच माझ्या पित्याने माझ्यासाठी एवढा अवघड पण का ठेवला होता हेच मला समजले नव्हते." "मग?" द्रौपदी बोलायची थांबली तेव्हा कृष्णाने विचारले. "मला विवाह म्हणजे काय, स्त्री-पुरुष संबंध नेमके काय असतात हेच माहीत नव्हते. मी वयात आले आहे आणि आता स्वयंवरात मला योग्य असा पती मी निवडायला हवा असेच मला सांगण्यात आले होते." "मग कृष्णे, जेव्हा कर्णाने धनुष्य उचलले तेव्हा "मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही.' असे तू का म्हणालीस?" कृष्णाने विचारले. "मला तसे सांगण्यात आले होते." द्रौपदी मळभावून आलेल्या स्वरातम्हणाली, "म्हणजे?" कृष्णाने ंमळ आश्चर्याने विचारले. "मला तसे तातांनी सांगितले होते. या जगात हा पण पूर्ण करू शकतील असे दोनच पुरुष आहेत. पण या दोहोंत एक मला योग्य नाही. तो खालच्या जातीचा आहे. तुला त्याला नाकारावे लागेल असे तात म्हणाले. मी तातांची आज्ञा अव्हेरू शकत नव्हते. त्यांची शी इच्छा होती तिसेच मी वागले." कृष्णाच्या मुखावर पुन्हा स्मित उमलले. "म्हणजे, तुला अर्जुनाशी का विवाह करायचा आहे हे सांगण्यात आले नव्हते." "नाही पुरुषोत्तमा, एक पुरुष कर्ण आहे हे सांगण्यात आले होते, परंतु दुसरा कोण आहे याची मला मुळीच माहिती नव्हती. हे दयाघना, तुम्हीही स्वयंवरास उपस्थित होतात. अर्जुन बराह्मणवेषात होता. त्याची वस्त्रे मलिन होती आणि तो अतिसामान्य दिसत होता. परंतु मला माझ्या तातांनी शी आज्ञा |इ|दिली होती त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात वरमाला घालण्याखेरी मिला गत्यंतरच नव्हते. मी आज्ञाधारक कन्येप्रमाणे वागले. मी माझा धर्म पाळला." "परंतु द्रौपदी जेव्हा तुला पाच बंधूंशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?" "मला काय वाटले ते मला कोणी विचारलेच नाही कृष्णा. धृष्टद्युम्न अशा विवाहाच्या विरोधात होता. तात गोंधळून गेले होते. पण व्यासांनी या विवाहाचे समर्थन केले. असा विवाह धर्मसंगत आहे असे सांगितले. मला धर्मज्ञांच्या इच्छा डावलता येणे कसे शक्य होते?" कृष्ण आसनावरून उठून उभा राहिला आणि द्रौपदीजवळ आला. तिचा चेहेरा वर उचलला आणि तिच्या कमलनयनांत दाटून आलेले अश्रू उत्तपरयानेटिपले. "हे सखे, तुझी वेदना मला समजली." " आणि तरीही कृष्णा तू दुर्योधनाची बाजू घेत आहेस! तू माझ्या अपमानांचा मुळीच विचार करीत नाहीस. तू एवढा निष्ठूर का झाला आहेस?" कृष्णाच्या चेहर्‍यावर गांभीर्य व्याप्त झाले. तो म्हणाला, "द्रौपदी, व्यासांनी तुझ्यावर अन्याय केला. पांडवांनी तुझ्यावर अन्याय केला. जो धर्म तुला सांगण्यात आला तो कोठला धर्म? जर युधिष्ठिरासारखा धर्मज्ञ स्वत:च "मातेची आज्ञा' प्रमाण मानून तुझ्याशी विवाहाची इच्छा प्रदर्शित करतो तर त्याच युधिष्ठिराने पतिधर्म विसरून तुला पणावर कसे लावले? नाही सुभगे, धर्म असा नव्हे. जो धर्म व्यक्तीच्या इच्छेचा आणि भावनांचा आदर करीत नाही तो धर्म नव्हे." द्रौपदीने कृष्णाकडे विस्मित मुद्रेने पाहिले. "म्हणजे कृष्णा..., हा विवाह धर्मसंगत नाही?" "नाही द्रौपदी. हा विवाह धर्मसंगत नाही." मग काही वेळ शांत राहिल्यावर कृष्णाने विचारले, ""द्रौपदी, ज्या कर्णाने आधी पण जिंकला, तो तुझा खरा पती असताना त्याला अवमानित करण्यास तुला सांगण्यात आले. तो कर्ण कोण आहे हे तुला माहीत आहे?" द्रौपदीच्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नजान्ह होते. "कर्ण हा पहिला पांडव आहे सुभगे. तो कुंतीचा प्रथम पुत्र आहे." "नाही कृष्णा..." द्रौपदी गोंधळून गेली होती. "होय द्रौपदी... कर्ण हा कुंतीपुत्र आहे, सूतपुत्र नव्हे. आणि द्रौपदी, जरी कर्ण सूतपुत्र असता तरी धर्माप्रमाणे तुला त्याचाच पती म्हणून स्वीकार करावा लागला असता. कारण स्वयंवराचा पण घाजेषत करताना हे स्वयंवर फक्त क्षत्रियांसाठीच आहे असे सांगण्यात आले नव्हते. अर्जुन तर बराह्मण म्हणून या स्वयंवरात सामील झाला होता." "म्हणजे माझा फक्त वापरच करण्यात आला तर!" द्रौपदी क्षणार्धात सारे काही समजून उद्गारली. ""अरे कृष्णा, पण तूही याबद्दल मला काहीच का म्हणाला नाहीस? जर पांडव एवढे अनीतिमान होते तर तू तरी का त्यांची बाजू घेतलीस? का त्यांची बाजू घेऊन कुरु-सभेत संधीचा प्रस्ताव घेऊन गेलास? का कृष्णा तू हा अन्याय उघडया डोळ्यांनी पाहिलास?" कृष्णाने द्रौपदीचे आकरंदन सहानुभूतीने ऐकून घेतले. "द्रौपदी तुझा जन्म यज्ञातून झाला. ज्या यज्ञातून तुझा जन्म झाला तो यज्ञच मुळात द्रोणाचार्यांच्या वधासाठी योग्य पुत्रास जन्म देण्यासाठी झाला होता. त्या यज्ञातून तुझाही जन्म झाला. अगदीच अनपजेक्षतपणे पण द्रुपदाने तुझाही स्वीकार केला, कारण त्याला तूही एखाद्या दिव्य शस्त्रासारखीच प्राप्त झाली होतीस. हे मंगले, द्रुपदाने तुझा विवाह अर्जुनाशी व्हावा असा निश्चय केला कारण पांडव आणि कौरवांतील हाडवैर एकदिवस युद्धातलणार याची त्याला खात्री होती. जर तुझा विवाह कर्णाशी होता तर एकटा द्रुपद कौरवांशी लढून द्रोणाचार्यास कसा वधू शकला असता? त्यामुळे तुझा विवाह एखाद्या पांडवाशी होणेच आवश्यक होते. द्रुपदाला बळ हवे होते आणि ते बळ फक्त पांडव देऊ शकत होते. त्यात तुझा विवाह पाचही भावांशी झाला तर ऊनिच उत्तम! त्यामुळे द्रुपदाने त्यासही, या अनैतिक कर्मासही, विरोध केला नाही. "कारण हे द्रौपदी, मुळात तू त्याच्या रक्ताची कन्या नव्हतीस. "आपल्या रक्ताच्या कन्येला वेश्यावृत्ती करायला कोण भाग पाडेल? तू त्यांच्या रक्ताची नव्हतीस. हे सखे, म्हणून त्यांनी तुझा विवाह पाच बंधूंशी लावला. आणि स्वत:स धर्मज्ञ म्हणवणारा युधिष्ठिरही तुझ्या मोहात गुरफटल्यामुळे त्यानेही हा अन्याय होऊ दिला. " आणि हे सखे, मला तुझा विवाह पाच बंधूंशी झाला आहे हे वृत्त मिळाले तेव्हा मी द्वारकेस होतो. "स्वयंवरानंतर मी लगोलग परतलो होतो. तू कोणा पुरुषोत्तमास वरलेस हे जाणण्याची मला तिळमात्र इच्छा नव्हती. मी तेथे आलो होतो तो एक निमंत्रित म्हणून! मला सत्य घटना कळली तोवर तुझा पाचही बंधूंशी विवाह झालेला होता. "हे याज्ञसेनी..द्रुपद हाच खरा बुद्धिमान मनुष्य. मनुष्यस्वभावाचे ज्ञान त्याच्याएवढे कोणास असेल? ज्याने द्रोणासारख्या विद्वान बराह्मण मित्रास बालपणी दिलेले वचन टाळले. त्याला ओळखसुद्धा दाखवण्याचे सौजन्य दाखवले नाही. बराह्मण द्रोणास त्याने क्षात्रधर्म स्वीकारण्यास भाग पाडले. एका शांत ज्योतीस दावानलात रूपांतपरत केले. पांडव-कौरव द्रोणाचे शिष्य बनले. पांडवांनी द्रुपदास केवळ द्रोणांची आज्ञा म्हणून पराजित केले. आणि द्रुपदाने या द्रोणाचा सूड घेण्यासाठी केवढा अघोरी यज्ञ आरंभावा? द्रौपदी, धृष्टद्युम्न तर जन्माला आलाच... पण त्या बरोबर तूही जन्माला आलीस. एखाद्या लवलवत्या तेजाळ शस्त्राच्या पात्यासारखी! "याज्ञसेनी, हे संुदरी, हे कमलनयने, तुझे अश्रू आवर. असा शोक तुला शोभत नाही. हे सागराएवढे अथांग हृदय असलेल्या सहृदये, सारे मानवी जीवनच दंभ आणि सूडाने व्यापलेले असेल तर तुझ्यासारख्या अयाजिन मानवी जीवाचे दुसरे काय होणार आहे बरे? "ज्यांनी इतिहास घडवला आहे असे वाटते त्या व्यक्ती अनेकदा क्षुद्र असतात. खरे इतिहास घडवणारे अज्ञातच राहतात. त्यांचे कर्तह्रित्व जगाला नेहमीच अज्ञात राहाते. द्रुपदाचे तसेच झाले आहे द्रौपदी. त्याचे कर्तह्रित्व अज्ञात राहिले आहे. तुझ्याही दृष्टीने, पांडवांच्या दृष्टीने आणि कौरवांच्या दृष्टीने. पांडव आणि कौरव परस्पर द्वेषाने ंधळे झाले आहेत. त्यांना हवे आहे विनाशक, एक सर्वसंहारक युद्ध. होईलही हे युद्ध; पण हे सुभगे, कोणास मिळणार आहे ंतिम विजय? कोण भोगणार आहे या पृथ्वीचे राज्य? धर्मराज की दुर्योधन? कोण?" कृष्ण या प्रश्नांवर शांत झाले. त्यांच्या कमलनयनांतच काय तेवढे तेजाळ प्रश्नजान्ह उरले. द्रौपदी अश्रुपात करत होती. जीवनातील नग्न सत्य जणू तिने प्रथमच पाहिले होते आणि त्या दर्शनाने ती भेदरून गेली होती. स्वत:चे ंत:करण उकलण्याची आवश्यकता तिला कधी भासलीच नव्हती. ती समराट द्रुपदाची कन्या होती. विश्वात सर्वात बलशाली असलेल्या पाच पुरुषांची ती पत्नी होती, कधीकाळी ती समराज्ञीही होती आणि ती पणावरही लावली गेली होती आणि अरण्यवासातील भयंकर वर्षेही तिने भोगली होती. एखाद्या क्षुद्र दासीप्रमाणे वर्षभर सैरंधरीची भूमिका निभावताना ती कामलोलुप कीचकाच्या जवळारी नरेने होरपळून गेली होती. आपण एखाद्या श्रेष्ठ पतिवरतेप्रमाणे आचरण करीत आहोत या ंध विश्वासाने ती आजवर जगत आली होती. पाचही पतींच्या भावनांची कदर करण्यात रात्रीची कृष्णस्वप्ने धवलतेत परिवर्तित करण्याचा कसोशीने यत्न केला होता. पाचही भावांतील सुप्त असूया आणि जवळाराची तीच एकमेव साक्षीदार होती. कारण ती पाचही भावांची शय्यासोबतीण होती! आणि तरीही ती श्रेष्ठ पतिवरता होती. कारण तिने या पाचही बंधूंना एकाच व्यक्तीत रूपांतपरत करून टाकले होते. एकच व्यक्ती नाही हररात्री वेगवेगळा पुरुष भासत? वेगवेगळे वर्तन करत? वेगवेगळ्या मागण्या करत? मग येथे ते पाच बंधू असले म्हणून काय झाले होते बरे? नियतीने तिला या विलक्षण कगारावर आणून ठेवले होते आणि तिने तिचे हे भाग्य स्वीकारले होते. तिचा चेहरा अविरत अश्रुपाताने भिऊनि गेला होता. तिने आपल्या वस्त्राच्या शेमल्याने स्वत:चा चेहरा पुसला. ंत:करणात जारवेदनेने दाटून आलेला हुंदका गिळण्याचा असमर्थ प्रयत्न करीत तिने कृष्णाकडे अनिवार आशेने पाहिले. जणू तिच्या सार्‍या समस्यांचा ंत करणारा देव-पुरुष तिच्यासमोर बसला होता आणि तो एका तेजाळ कटाक्षाने तिच्या अनंत समस्यांचा ंत करणार होता. कृष्णाला जणू तिचे हृद्गत कळले. अपार करुणेने त्या दयाघनाचे ंत:करण व्याकुळ झाले. तो आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या अपार अलिप्ततेस क्षणभर तिलांली देऊनि त्याने द्रौपदीस जवळ घेतले आणि घनकाळोखाच्या लाटांप्रमाणे हेलकावे घेणार्‍या केशकलापावरून हात फिरवत तो म्हणाला, "हे कृष्णे, हे सायंकाळची आभा शी, तिशी काया असलेल्या लाडया भगिनी, अशी व्यथित होऊ नकोस. या विश्वात पराकोटीचा अन्याय झाला अशी तू एकमेव स्त्री नाहीस. गोठलेले अनंत अश्रू आजही माझ्या काळजात एका कोपर्‍यात थिजलेले आहेत. अनंत वेडयापिशा वेदनांना मी अलिप्तपणे आपल्या ंगा-खांद्यावर वागवले आहे. हे लाडके, मुनष्यास जर कधी आपण मनुष्य असण्याचा अर्थ समजला असता तर कदाजात या वेदनांना कधीच विराम मिळाला असता. पण अद्यापही केवढा अज्ञात आहे हा गहन आणि तेवढाच सोपा अर्थ बरे? हे याज्ञसेनी, फक्त थोडी ऊनि साहसी हो. थोडे दूर कर गं भरमांचे पडदे आणि पाहा तू श्रेष्ठच आहेस. कारण तू पचवले आहेस मानवी दंभाचे विष. तू सहन केला आहेस पराकोटीचा अन्याय आणि प्रिय भगिनी, तू आहेस एखाद्या अनिवार जज्ञासेने जीविन जगणार्‍या तृणांकुराएवढीच जीवनोत्सुक!" कृष्णलायचा थांबला. त्याचा वीणोत्सुक स्वर तरीही जणू चराचराच्या कणाकणांत ओथंबून साचून राहिला आणि स्तब्धपणे वातावरणात स्पंदित होत राहिला. द्रौपदीने मूकपणे आपले अश्रू पुसले. स्वत:तल्या विकराल खाईत ती एवढी खोल उतरली होती की वर्तमानाचा क्षण गाठण्यासाठी तिला अलांघ्य कडा चढावा लागणार होता. कृष्ण समंसिपणे स्तब्ध उभा होता. वाट पाहात होता. द्रौपदी अधोवदनाने बसली होती. जीवन एवढे करूर असते हे तिला माहीतच नव्हते. पुरुषांच्या विश्वात तिने पुरुषांचे द्वेष-मत्सर आपल्या हृदयात रुविले होते, पण स्वत: स्त्री असली तरीही स्त्रीच्या दृष्टीने तिने कधी विगताकडे पाहिलेच नव्हते. परंतु आता व्हायचे ते होऊन गेले होते. तिने कृष्णाकडे मान वर करून पाहिले. भावनांच्या मायावी हातात शब्द येता येत नव्हते. पण धीर वाढला तशी ती म्हणाली, "हे करुणाकरा, जे घडले ते सत्य आहे. पण माझ्या जीवनाची ती एकच बाजू नव्हती. मी पतींशी नेहमीच प्रामाणिक राहिले. त्यांची सुख-दु:खे मी काळजाच्या कणगीघरात दडवून ठेवली आहेत. परंतु मी समराज्ञी होते. प्रजा माझी देवतेप्रमाणे पूजा बांधत होती. आणि माझी मानखंडना पापी दुर्योधनाने भरसभेत केली. हे देवा, जर तू धावला नसतास तर मला प्राणत्याग करावा लागला असता. अन्यायाने द्यूत खेळून आम्हांला वनवासात पाठवले त्या दुष्टांनी. आताचे होणारे युद्ध अपरिहार्य झाले ते केवळ दुर्योधनामुळेच. आमचा अधिकार आम्हास न देता आम्हांला लुबाडू पाहणार्‍या अधार्मिकांच्या संगतीत हे दयाघना, तू गेलासच कसा? "हे न्यायी परोपकारी कृष्णा, तू सुद्धा कुरुसभेत स्वत: संधि-प्रस्ताव घेऊन गेला होतास. हे युद्ध टळावे यासाठी तू स्वत:चीही मानखंडना सहन केलीस. त्या घमेंडी दुर्योधनाने तुलासुद्धा बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. पाच गावेच काय पण सुईच्या अगरावर बसेल एवढीही मीनि देणार नाही अशी दर्पोक्ती त्याने केली. आणि त्याचा तुला जरा देखील करोध येत नाही की अपमान वाटत नाही? खुशाल त्याच्या बाजूस जाऊन मिळाला आहेस? आमचा असा त्याग करताना तुला थोडेही वाईट वाटले नाही? "हे पुरुषोत्तमा, हे बघ, माझी व्यथा उकरून अखेर साध्य काय होणार आहे? आम्ही बेवारस झालो आहोत. आम्हांला तुझ्याखेरी कोणाचा आधारि नाही. आम्ही वारंवार अपमानित झालो आहोत. दु:ख आणि वेदनांच्या अपार राशी आम्ही पचवल्या आहेत ही वस्तुस्थिती तर बदलत नाही? हे दयाघना, किमान तू एक गोष्ट तर निश्चयाने करू शकतोस आणि ती म्हणजे आम्हांला आमचे राज्य मिळवून दे. आम्हांला युद्ध नको. नरसंहार नको. आता तू कौरवांच्या बाजूने आहेस आणि कौरव तुझे ऐकतील." कृष्ण मानवाच्या आवर्तनी स्वभावाकडे दिग्मूढ होऊन पाहात राहिला. पण क्षणभरातच, हेही एक अपजेक्षत आहे, ते लक्षात येऊन म्हणाला, "हे कृष्णे, युद्ध करणे वा टाळणे माझ्या हाती नाही. मी माझी संपूर्ण सेना पांडवांच्या हवाली केली आहे आणि मी कौरवांच्या हवाली आहे. मी स्वत: युद्धात भाग घेणार नाही हेही प्रसिद्धच आहे. कौरव आणि पांडव उभयता माझे नातेवाईक आहेत. मी कोणताही पक्षपात करू शकत नाही." "पण हे कृष्णा, न्यायाची बाजू घेणे यात कोणता पक्षपात आला?" "हे कृष्णे, मुळातच न्याय आणि अन्याय यातील सीमारेषा संदिग्ध आहे. मी पांडवाची बाजू संपूर्णपणे घेतली म्हणून पांडव न्यायी ठरत नाहीत. खरे तर न्यायाची बाजू कोणाचीही कधीही असू शकत नाही. हे सुभगे, ही पृथ्वी परमात्मतत्त्वाने ओथंबून ओसंडते आहे. या भूमीवर मानवापेक्षा प्राचीन आणि मानवापेक्षा संख्येने अधिक असणारे प्राणी जर मालकी सांगत नाहीत तर मानवासारख्या क्षुद्र भावनाशील प्राण्यास हा अधिकार कोणी दिला? हे सुलक्षणे, यच्चयावत बरह्मांडातील एका कणावरही कोणाचीही सत्ता नाही तरीही त्यावर सत्ता सांगत न्याय-अन्यायाच्या रीती-भाती आपण ठरविण्याचा प्रयत्न करतो यापेक्षा मोठा विनोद कोणता असेल हे सांग बरे मला? तेव्हा तुमची बाजू न्यायाची आणि कौरवांची अन्यायाची असे काही तुला म्हणता येणार नाही. कारण हा झगडाच-जो कोणाचेही असूच शकत नाही अशा-क्षुद्र कारणांकपरता आहे. परंतु, ही मानवाची सवयच आहे त्याला तुम्ही पांडव किंवा हे कौरव तरी काय करणार बरे? आणि जर अखेर मानवाच्याच नियमाने जायचे तर मग युद्धास पर्याय तरी काय आहे? जे ठरायचे ते रणभूमीवरच ठरेल. जर पांडव न्यायी आहेत तर मी त्यांच्याबरोबर आहे की नाही याने कोणता फरक पडणार आहे? कारण मी तर हाती शस्त्र घेणार नाही. मी कोणाचा वध करणार नाही. माझ्यामुळे कोणाच्याही जयापराजयात काही फरक पडणार नाही ही तर वस्तुस्थिती आहे! हे सुभगे, तुझे पती बलशाली आहेत. शस्त्रास्त्रविद्या पारंगत आहेत, तेव्हा तुला चिंता तरी कसली?" "म्हणजे, तू आम्हास कसलीही मदत करणार नाहीस तर!" "हे द्रौपदी, मी आता कौरव आहे असे समज. मी तुला मदत तरी काय करणार! आणि ती अपेक्षा तू ठेवूही नकोस. पांडवांनी तरी तुला माझ्याकडे का बरे पाठवावे? स्वत: अर्जुन काय माझ्याकडे येऊ शकत नव्हता? किंवा स्वत: धर्मराज तरी? पण तू आलीस. कारण हे लाडके, तू आता राजकारणात पडली आहेस. तू नेहमीच पांडवांचे शस्त्र होतीस. आजही आहेस. पण, त्यापेक्षा तू त्यांचे ंत:करण चेतवशील तर कदाजात ते त्यांच्यात आहे त्यापेक्षा अधिक पराकरम गाजवू शकतील!" द्रौपदीने असहायपणे कृष्णाकडे अखेरचे पाहिले. अखेर ती मानी स्त्री होती. कोठपर्यंत झुकायचे ते तिला चांगले माहीत होते. आणि ती पुरेशी झुकली होती. आता आपल्या हाती मातीखेरीज काही लागणार नाही याची जाणीव तिला झाली. ती म्हणाली, "रि तसेच होणार असेल तर त्याला इला तिरी काय आहे? माझे पती पराकरमी आहेत. ते समरांगणावर निश्चयाने पराकरम गावितील आणि यशश्री प्राप्त करतील. हे कृष्णा, तो तुझा पराभव असेल याच्याच मला अधिक यातना होत आहेत." "हरकत नाही द्रौपदी. मलाही तोच तर अनुभव घ्यायचा आहे. जय किंवा पराजय, जीवन किंवा मृत्यू, लाभ किंवा तोटा, कीर्ती किंवा अपकीर्ती याने जो संतुष्ट किंवा असंतुष्ट होतो त्यासारखा अज्ञानी जीव या विश्वात असू शकत नाही. अपकीर्ती किंवा पराजयाने मला असा कोणता फरक पडणार आहे बरे? मी अलिप्तपणे या खेळाकडे पाहतो आहे. या खेळात मी आहेही आणि नाहीही. खरे तर जे काही ठरणार आहे ते तुम्हा कौरव-पांडवांत ठरणार आहे. माझा मुळी त्याच्याशी संबंधच काय! " आणि द्रौपदी, जर पराजयच झाला तर पराजित होणारे पहिले कौरवच नसतील. माझी बाजू न्यायाची असूनही जरा संधाने मला पराजित केलेच नव्हते की काय? म्हणून मी काय अपकीर्त झालो? मी नाही द्वारका वसवली? मग पांडव का नाही मग स्वत:चे राज्य निर्मऊ शकत? जे गमावले त्याची खंत करीत सूडाने प्रज्वलित राहणारे मानव कधीही श्रेष्ठ श्रेय प्राप्त करू शकत नाहीत, हे काय पाडवांना, माझा एवढा सन्मान करूनही कळत नाही? जर अन्यायच घडला तर अन्याय होणारे पांडवच पहिले नसतील. काय यापूर्वी कधी कोणावर अन्यायच झालेला नाही? म्हणून काय प्रत्येकाने शस्त्र उभारून एकमेकांवर तुटून पडायचे? आणि त्यातही जो जिंकतो तो काय न्यायीच असतो? आणि मृत्यू-हे याज्ञसेनी, जन्माला जो आला त्याला मृत्यू अटळ आहे. जर या युद्धात माझा मृत्यू झाला तर कदाजात मी प्रसिद्ध होईन; पण जर हाच मृत्यू अन्य कोठेतरी एखाद्या य:कश्चित मनुष्याच्या हातून झाला तर? अपघाताने झाला तर? वृद्धापकाळाने मी मेलो तर? नाही, कृष्णे, जे अटळच आहे त्याची चिंता क्षुद्र मुनष्य करतात आणि जे टाळता येते ते टाळण्यासाठी मात्र कोणीच प्रयत्न करीत नाही. पांडवांनी युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केला पण कौरवांना हे खरे, आता युद्धच हवे आहे. कारण हे याज्ञसेनी, संपूर्ण विनाश एकवेळ परवडला, पण चिंतित, भयभीत जीवन नको असे कोणा मनुष्यप्राण्याला आज वाटत नाही बरे? कौरवांनाही तीच भीती वाटते. जोवर पांडव आहेत तोवर कौरव चिंतेतून मुक्त नाहीत आणि जोवर कौरव आहेत तोवर पांडवही चिंतेतून मुक्त नाहीत. त्यामुळे आता भूतलावरहोंपैकी कोणीतरी एकच राहणार हे निश्चित आहे. यातून केवढाही भीषण विनाश घडू दे! सारा समा उद्धवस्त होऊ दे! संस्कृती नष्ट होऊ दे! पण किमान जो कोणी उरेल तो स्वत:ला यशस्वी नाही तर स्वत:स धर्मज्ञ तर म्हणवून घेईल? "हे सुभगे, युद्ध अटळ आहे हे तू समजून चल. मी तुमच्या बाजूने असतो तर युद्ध अधिकच निश्चित होते. विनाश निश्चित होता. आताही असे समज की विनाश निश्चित आहे. "मग जर विनाशच होणार आहे तर उरणार तरी कोण शेवटी? कौरव किंवा पांडव. परंतु हे याज्ञसेनी, जर राज्य करायला प्रजाच उरली नाही तर? फक्त वृद्ध स्त्रिया आणि बालकेच या पृथ्वीतलावर उरली तर? कोणत्या श्रेयाच्या प्राप्तीची महती तुम्ही गाल? किंवा कौरव गातील? "हे प्रिय भगिनी, प्रजा असेल तर राज्य करण्यात मौ आहे, काही अर्थि आहे. प्रजेएशवाय राज्य कधी अस्तित्वात येऊ तरी शकते काय? आणि समजा कौरव न्यायी तर कौरव जिंकणार, पांडव न्यायी तर पांडव जिंकणार हे मान्य केले तरी सुलक्षणे, सांग मला एक, या युद्धात जे सैनिक मरणार आहेत, त्यांच्या आत्म्यांवर, प्राणांवर तुझा किंवा कौरवांचा काय अधिकार आहे बरे? "कारण या युध्दात जे सामान्य सैनिक सामील आहेत ते काही आत्म्याशी चर्चा करून नव्हे की, कोण प्रामाणिक, कोण न्यायी आणि कोण अप्रमाणिक आणि कोण अन्यायी आहेत ते त्यांनी ठरवावे! ते तर पोटार्थी सैनिक. फक्त पोट भरले की संपले. पण हे सुभगे, ते अखेर तुझ्यासारखेच हाडा-मांसाचे मुनष्य-जीव आहेत. हे खरे, की कदाजात त्यांना तुझ्याएवढी बुद्धी नसेल. ते भीम-अर्जुनाएवढे पराकरमी नसतील. पण शेवटी भीमार्जुनही अशाच सैनिकांच्या जीवांवर प्रबळ होतात. पण जेवढा भीमात प्राण आहे, जेवढा अर्जुनात प्राण आहे, तेवढाच प्राण काय सामान्य सैनिकात नाही? त्यांच्या निष्ठा काही नाण्यांच्या मोबदल्यात खरीदल्या म्हणजे त्यांचे प्राण काय तुमचे झाले? "नाही द्रौपदी. हा अन्याय शतकानुशतके झाला आहे. पुढेही होईल. मनुष्य निर्बउद्ध असला म्हणून काय त्याच्या प्राणांचे मूल्य संपले? हे द्रौपदी, त्यांच्या प्राणांचे तेवढेच मूल्य आहे जेवढे तुझे आहे, माझे आहे. हे आकरंदणार्‍या हृदया, का आकरंदन करते आहेस बरे? का तुझ्या नेत्रांतून सतत अश्रुधार वाहते आहे बरे? "रडू नकोस. हे पांचाली आकरंदू नकोस." द्रौपदी अनंत काळ आपल्या हृदयावर साकळून आलेल्या शोकाच्या समुद्रास दूर हटवण्याचा प्रत्यन करीत वर पाहात अश्रुथिजल्या स्वरात म्हणाली, "ठीक आहे कृष्णा, जसे तुझ्या मनात असेल तसे होईल. मी अज्ञ आहे. मला काही केल्या काही कळत नाही. सारे जीवनच शेणामातीचे झाल्यासारखे वाटते आहे. "हे करुणाकरा, मी परत जाते आता. माझे पती माझी वाट पाहात असतील." द्रौपदी उठून उभी राहिली. कृष्णास नमरपणे प्रणिपात केला आणि शिबिरातून बाहेर पडली. सर्वज्ञ श्रीकृष्णाच्या शांत मुखावरील वेदना अधिकच गहिरी झाली. कृष्ण भीष्माचार्यांच्या शिबिरात आला तेव्हा स्वत: तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसणारे भीष्माचार्य श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा करून त्यास उच्चासनावर बसविले व स्वत: हात जोडून साध्या आसनावर बसले. "हे देवकीनंदना, तुझे क्षेम तर आहे ना?" "होय कुरुकुलश्रेष्ठा. माझे क्षेम आहे. परंतु आपण आज प्रसन्न्दिसत नाही." प्रदीर्घ सुस्कारा सोडून भीष्म म्हणाले, "हे कृष्णा, तू आमच्या बाजूला येऊन मिळाला आहेस याबद्दल आनंद व्यक्त करावा की खेद याबद्दल माझ्या मनाचा काही केल्या निश्चय होत नाही." "का बरे असे?" कृष्णाने कोमल स्वरात विचारले. "मी कौरव असलो, मला दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल हे खरे असले तरी पांडवांबद्दल माझ्या मनात किती अपार ममता आहे हे सारे जाणतात. यासाठी मी दुर्योधनाची बालबुद्धी, दुरुत्तरेही ऐकून घेत असतो. तू पांडवांचा नेहमीच सखा राहिला आहेस. असे असताना पापी दुर्योधनाच्या पक्षास, हे कृष्णा, तूही येऊन मिळालास याचे मला नवल वाटते आहे." कृष्णाच्या श्यामल चेहर्‍यावर मंद हास्य पसरले. जणू काही महन्मंगल प्रभेने प्राचीवर आपले शुभचिन्ह अंकित केले असावे असे तेज कृष्णाच्या चेहर्‍यावर झळकले. "हे कुरुकुलश्रेष्ठा, ज्याच्या ज्ञानाला अनंत आकाशही सीमा घालू शकत नाही अशा श्रेष्ठ तापसा आणि पराकरमात प्रत्यक्ष परशुरामही बरोबरी करू शकत नाही अशा श्रेष्ठ महावीरा, तुमच्या मनात संभरम निर्माण व्हावा हे खचितच आश्चर्यदायी आहे. असो. "हे भीष्मा, आपणास दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल असे आपण आगरहाने म्हणत आहात. आपल्या अंत:करणात पांडवांबद्दल अपार ममता आहे हे सर्व आर्यावर्तात विख्यात आहे. असे असताना आणि आपल्यावर कुरूंचे कसलेही बंधन नसताना आपण दुर्योधनाचीच बाजू घ्यावी लागेल असे का म्हणत आहात? खरे तर आपण अवश्य पांडवांना जाऊन मिळायला हवे. पांडवांनाही यामुळे केवढा आधार मिळेल." श्रीकृष्णाच्या तोंडून अनपजेक्षत वाय ऐकायला मिळाल्याने क्षणभर स्तंभित झालेले भीष्माचार्य स्वत:स सावरून म्हणाले, "हे कृष्णा, प्रत्येक पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुला माहीत नाही असे दिसते. काहीही झाले तरी धृतराष्टाचे मीठ खाल्ले आहे मी. त्याच्याशी द्रोह करून पांडवांच्या बाजूने जाऊन युद्ध करू शकत नाही हे उघड आहे. पण जनार्दना, तुला तर माझ्यासारखे कसले बंधन नव्हते. का रे तू पांडवांचा त्याग केलास?" श्रीकृष्णाने आर्द्र दृष्टीने त्या वयोवृद्ध तपस्व्याकडे पाहिले आणि तो मौन राहिला. "हे कृष्णिकुलवंतस, मला पांडवाची काळजी वाटते. या युद्धात सर्वसंहार होणार हे निश्चितच आहे. पांडवांचा पराजय झाला तर मला यातना होतील." श्रीकृष्ण तरीही मौन राहिला. जरा शाने श्रीकृष्णाने विचारले, "हे भीष्मा, युद्धात तुम्ही पांडवांना अभयदान दिले आहे, हे खरे काय?" "होय. मी एकाही पांडवास रणात वधणार नाही पण आजच दशसहस्र पांडवसेना वधेन असे मी दुर्योधनास सांगितले आहे." "असे का भीष्माचार्य?" "असे का म्हणजे? पाचही पांडव मला प्रिय आहेत. धर्म, क्षात्रतेज आणि त्यांची विनम्रता विश्वप्रसिद्ध आहे. त्यांच्यावर पातकी दुर्योधनाने अनंत अत्याचार केले आहेत. पांडवांचा राज्याधिकार त्याने हिरावून घेतला आहे. मी कसा पांडवांना वधू?" श्रीकृष्णाच्या श्यामल मुखावरील आभा अधिकच दीप्तिमान झाली. "मग तुम्ही पांडवांच्या पक्षालाच जाऊन का मिळत नाही? तेच अधिक धर्मसंगत आणि न्याय्य ठरणार नाही का? तुमची पांडवांवर प्रीती आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यांना रणात वधणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यात लाभ तो कोणता? तुम्ही अर्थाचे दास आहात म्हणून कौरवांच्याच बाजूने राहावे लागेल असे म्हणता ते पूर्ण खरे नाही हे तुम्हासही माहीत आहे. तुम्ही स्वत: ज्येष्ठ कौरव आहात. या राज्याचे विभानि होऊ नये म्हणूनच तुम्ही आजन्म बरह्मचर्यवरताची शपथ घेतलीत हेही खरे आहे. "मग तुम्हीच या राज्याचे कौरव-पांडवांत विभानि व्हावे असेही म्हणत आहात. तुमची पांडवांवर प्रीती आहे आणि त्या प्रीतीस्तव युद्धात त्यांचा वध करणार नाही असेही म्हणता आहात. तुम्ही अर्थाचे दास आहात आणि म्हणून कौरवांच्या बाजूने युद्ध करावे लागेल असे आताच तुम्ही मला सांगितलेत. "हे महावीरा, आपले भाषण असंबद्ध आहे असे आपणास वाटत नाही? या राज्यावर पांडवांचाच अधिकार आहे असे आपणास मनोमन वाटते. मग हे महाश्रेष्ठ, आपण मीठ खाल्लेत कोणाचे? पांडवांचेच ना? मग आपण अवश्य पांडवांकडे जायला हवे. त्यांच्या पक्षास मिळून सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला जे दुष्ट वाटतात त्यांच्याशी युद्ध करायला हवे. हाच धर्म आहे कुरुश्रेष्ठ!" "कृष्णा, तूही असंबद्ध बोलतो आहेस असे नाही तुला वाटत? तू आता कौरवांचा पक्ष घेतला आहेस आणि माझ्यासारख्या वीराला शत्रुपक्षास जाऊन मिळायला सांगतो आहेस, काय हा धर्म आहे?" "होय. हाच धर्म आहे." कृष्ण पूर्ववत शांत स्वरात म्हणाला, ""दिग्भरमित योद्धे कधीही विजयश्री खेचून आणत नाहीत. युद्ध सुरू व्हायच्या आधीच जे शत्रुपक्षाची भलावण करतात ते योद्धे मित्र नव्हे तर शत्रू आहेत असेच कोणीही समराटाने धरून चालायला हवे. हीच राजनीती आहे. हे कुरुकुलभूषणा आणि ती आपणास माहीत नाही असे मी तरी कसे म्हणू? आणि त्यात दुर्योधनाने तुम्हाला प्रथम सेनापती बनवण्याचा निर्धार केला आहे. मग या युद्धात कौरवांचा विजय कसा होईल?" भीष्माचार्य काही क्षण अधोवदनाने मौन राहिले. "हे कृष्णा, तू नारायण आहेस. आपल्या दिव्य दृष्टीने तू सारे काही जाणतोस. मग मला प्रश्न का विचारतो आहेस?" कृष्णाच्या मुखावर कमलदले उमलावीत तसे प्रशांत हास्य उमलले. "मला तुमच्याकडूनच ऐकायचे आहे." तो म्हणाला. "दुर्योधन किंवा पांडव... हे खरे कारण नव्हेच. हे दयाघना, मी दुर्योधनाचा पक्ष घेतला तो त्याचे मीठ खातो म्हणून नाही हे सुद्धा सत्य आहे. मी पांडवांशी युद्ध करणार नाही ते सुद्धा खरे आहे. हे परमेश्वरा... हे युद्ध माझ्या नियतीशीअहे." "कोणती नियती?" "मी सांगायलाच हवे? हे नारायणा, तुला सर्व विदित आहेच." "होय... तुम्हीच सांगायला हवे." "पण का?" "हे नरश्रेष्ठा, या भूतलावर प्रत्येक णि आपल्या नियतीशीच युद्ध करीत असतो. जन्मो-जन्मीची इष्ट-अनिष्ट कर्मे आपली नियती अधाजेलखित करीत असते. त्यातून कोणाचीही सुटका नाही. माझीसुद्धा नाही. तुमची नियती मला माहीत आहे. पण तुम्ही तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहात आहात हे जाणून घ्यायचे आहे मला." आपल्या शोकात साकळून गेलेले भीष्माचार्य नेत्र मिटून आपल्याशीच काही क्षण द्वंद्व करीत राहिले. "हे मधुसूदना, मला ंबेचा शाप आहे. ती या जन्मी शिखंडीच्या रूपाने द्रुपदाघरी अवतरली आहे. शिखंडी माझा मृत्यू आहे. त्याच्याकरवी माझा वध व्हावा ही माझी नियती आहे आणि द्रुपद पांडवांचा श्वशुर असल्यानेशिखंडी या युद्धात पांडवांच्याच बाजूने युद्ध करणार याबद्दल माझ्या मनात संशय नाही. "मग मला काही झाले तरी कौरवांच्याच बाजूने लढावे लागेल. तरच शिखंडी मला रणात वधू शकेल. युद्धभूमीवर मृत्यू आला तर मला स्वर्ग मिळेल. एरवी शिखंडी मला वधू शकणार नाही, हे तर प्रसिद्ध आहे. हे युद्ध कौरव-पांडवांसाठी नाही, माझ्या वधासाठी आहे. आणि मी ंबेवर अन्याय केला याचा सल काही केल्या माझ्या ंत:करणातून जात नाही. "याचसाठी मी कौरवांच्या बाजूने युद्ध करणार आहे. पांडवांना मी वधावे हा काही माझ्या या युद्धाचा हेतू नाही. आता माझे पुष्कळ आयुष्य झाले आहे आणि जगण्याची विजजगीषा कधीच मरून गेली आहे." श्रीकृष्णाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच रुंदावले. तो वीणेने रुणझुणावे तशा ंत:करणास वेड लावणार्‍या स्वरात म्हणाला, "कुरुपुंगवा, मला तुमचे उत्तर मिळाले. पण तुम्ही अद्यापही दिग्मूढ आहात हे सत्य आपण जाणून घ्यायला हवे. तुम्ही हे युद्ध स्वत:च्या नियतीसाठी करीत आहात असे तुम्ही म्हणता. तुमची नियती खरीही आहे. पण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे. हे सनातन सत्य आहे. त्याला तुम्हीही अपवाद नाही. मग मृत्यू कोणाच्या हस्ते येतो की आपसूक यालाही काही महत्त्व नाही. "मृत्यू' हा फक्त "मृत्यू' आहे, जो जीवनाचा प्रकाशमान मार्ग बंद करून ंधारकडयावरून मनुष्यास फेकून देतो. मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार की नरक याची चिंता जविंत असताना केल्याने फार मोठे पुण्य लाभणार आहे, असा भरम कोणी करून घेऊनये. "समजा हे युद्ध घडणारच नसते, तर शिखंडीने आपली प्रतिज्ञा कोणत्या तरी मार्गाने पूर्ण केली असतीच ना! तुमचा नियत मृत्यू झाला असताच ना! पण त्यासाठी पांडवांना वधायचे नाही किंवा कौरवांचीही बाजू सोडायची नाही, असा अट्टागरह का? पांडवांना वधणार नाही पण पांडवांची दशसहस्र सेना आजच वधेन असे विधान तरी मग तुम्ही का केलेत? केवळ पांडव तुमचे आप्त आणि इष्ट आहेत म्हणून? त्या निष्पाप-पोटार्थीसाठी युद्ध करणार्‍या सैनिकांशी तरी मग तुमचे काय वैर आहे? आणि तुम्हाला वाटते, दुर्योधनाची बाजू अन्याय्य आहे. ती न्याय्य आहे की अन्याय्य असा निरपेक्ष निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही भावनाशील पुरुष आहात. भावनाशील पुरुष निरपेक्ष न्याय-अन्याय ठरवू शकणार नाही हे उघड आहे. पण प्रत्येक पुरुष आपल्या सद-सद्विवेक बुद्धीच्या जोरावर न्याय आणि अन्यायाच्या चर्चा करतो. आणि ंबेशी नेमका न्याय झाला की अन्याय हे तरीही तुम्ही ठरवू शकत नाही, पण तिच्या हातून, या जन्मी वध होणार हे मात्र तुम्ही निश्चयाने समजून चालला आहात. या भूमीचे नेमके शासक कौरव असावेत की पांडव याबद्दलही तुमचा निर्णय निश्चयाने झालेला नाही, अन्यथा पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुम्ही मला सांगितली नसती. " आणि कौरवांच्या बाजूने लढेन परंतु पांडवांना युद्धात ठार मारणार नाही असे विधानही तुम्ही केले नसते. "हे नरपुंगवा, मग तुम्ही युद्धात भागच का घ्यावा? बलराम ज्याप्रमाणे कौरव-पांडवांना समान मानून युद्धात भाग न घेता तीर्थयात्रेस निघून गेला त्याप्रमाणे तुम्हीही का शस्त्रसंन्यास घेत नाही? तुमच्यामुळे कौरवांचा विजय होणार नाही की तुम्ही जोवर सेनापती राहाणार आहात तोवर पांडवांचाही विजय होणार नाही. मग ज्यामुळे कोणाचाही जय-पराजय अधोरएखित होणार नाही, अशा युद्धाचे सेनापत्य आपण का स्वीकारीत आहात? केवळ शिखंडीला तुम्हाला युद्धात ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून? पण तरीही शिखंडीसारखी कापुरुष तुम्हाला युद्धात मारू शकत नाही... त्यासाठी तुम्हाला शस्त्र खाली ठेवण्याचाच पर्याय निवडावा लागेल, हे काय तुम्हाला माहीत नाही? " आणि हे नरश्रेष्ठा, पांडवांचे जेवढे हित तुम्ही पाहता तेवढेच जर पांडव तुमचेही हित पाहात असतील तर सा तुम्ही पांडिवांना युद्धात न वधण्याचा निर्णय घेतला आहे तसा पांडवांनी घेतला आहे का? जर तुम्ही एकमेकांचे आप्त आहात तर मग ही निष्ठा एकेरी कशी? ती दुहेरी का नाही? आणि खरे तर युद्धात कोणी आप्त नसतो की इष्ट नसतो. समोर फक्त शत्रू असतो आणि युद्ध फक्त शत्रूंशी होऊ शकते, आप्तांशी नाही. " आणि आपण सारे मेलेलेच आहोत. आज आपण जिवंत दिसतो आहोत ते काळाच्या अनंत धाग्यावर आपण थोडे अलीकडे आहोत म्हणून. क्षणाक्षणाने मृत्यू आपल्या दिशेने चालत येतोच आहे. हे पुन: पुन्हा जन्मणे आणि मरणे अहोरात्रीच्या नियत कृत्यासारखे आहे. "पण मग त्यासाठी असा सर्वविनाशी संकल्प का करावा? "नियती आपण घडवतो. आपल्या कर्मानी घडवतो. जेव्हा आपली विवेक बुद्धी स्थिर असते, शाश्वत असते तेव्हा नियतीसुद्धा तेवढीच उज्ज्वल धवल असते. जेव्हा आपली कर्मे आपला विवेक सोडून होतात तेव्हा नियतीही तेवढीच करूर फळे आपल्या ओटीत टाकते. "नियती अजरा मर नाही. ती नियती मनुष्य घडवतो. नियती मनुष्य घडवत नाही..." "हे महाबाहो, युद्धाने आपण कोणती नियती घडवत आहोत याची थोडीतरी कल्पना कधी करून पाहिली आहे काय? युद्धात जय मिळाला किंवा पराजय जरी झाला, तो कर्मफल लाभाची आशा ठेवल्याने लाभला की कर्मफल अपेक्षा न ठेवता लाभला यामुळे युद्धाचा परिणामलणार आहे काय? "ज्या शाश्वत धर्माची आपण कामना करतो, जो धर्म हा या धपरत्रीवरील सर्व सजीवसृष्टीस आपल्या हातात-हात घालून चालायला सांगून सर्व मंगलदायी मोक्षाची आपण कामना करतो तो धर्म या जया-पराजयाने मलिन होईल हे आपणास का वाटत नाही? "प्रत्येक कर्मास फल अटळपणे जाकटलेले असते. मग त्याची कामना असो की नसो, धुळीतून चाललो की धुळीवर पदजान्हे आपसूक बनतात. युद्ध केले की निसंहार होणार, मग स्वत: मेलो की अन्य मेलेत याची अपेक्षा असो किंवा नसो. "हे ज्ञानवंता, तुझी नियती तू स्वत: घडवली आहेस आणि आता युद्ध हे कर्म आहे. त्यामध्ये तुझा वध होणे ही तुझी नियती आहे, पण हा वध युद्धातच व्हावा ही काही तुझी नियती नाही. म्हणजेच युद्धाचे हे कर्म करावयाचे की टाळायचे हे सर्वस्वी तुझ्या विवेकावर अवलंबून आहे. कौरवांचा द्वेष वाटतो, पांडवांबद्दल प्रीती वाटते, जरा या भावनांच्याही पार जाण्याचा प्रयत्न करून पाहा. कौरव व पांडव आपापल्या व्यतिगत पातळीवर आपापली कर्मे करीत आहेत. पण तुम्ही ज्ञानी आहात. कर्माची निवड डोळसपणाने करणे हे ज्ञानवंताचे इष्ट कर्तव्य नाही काय? "परंतु हे महाबाहो, तुम्ही पूर्वी विजात्रवीर्यांच्या पत्नीस अपत्यदान देण्याची सत्यवर्तीदेवींची आज्ञा अव्हेरली होती. सत्यवतीदेवींनी तुम्हाला राज्यासनावर बसून कुरुकुलाची वंशवृद्धी करण्याविषयी सांगूनही आपण आपल्या दृढप्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहायचे ठरवून मातेचीच समकालीन धर्मसंगत आज्ञा पाळली नाही. जेव्हा इष्टानिष्टतेच्या निर्णयाचा क्षण येतो तेव्हा विगत काळात विशिष्ट परिस्थितीत केलेली प्रतिज्ञा याही विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात कायम ठेवायची की नूतन परिस्थिती पाहून विवेकाने निर्णय घ्यायचा याचे स्वातंत्र्य मानवास आहे, असे असूनही कुरुवंशाचे वर्धन अन्य बरह्मर्षीकरवी करावे, असा सल्ला आपण सत्यवतीदेवीस दिला आणि आपला प्रतिज्ञेचा निर्णय कायम ठेवला. कदाजात आपण प्रतिज्ञाभंगाचा दोष घेऊन का होईना पण धर्माज्ञा पाळली असती तर इतिहास काही वेगळा घडला असता. असो. "नियती स्वत: मनुष्य घडवतो ती अशी. प्रत्येक कर्मास अटळपणे फळ जाकटलेले असते ते असे. ंबेच्या संदर्भातही तुम्ही अन्याय केला हे सांगणे आवश्यक आहे. विजात्रवीर्य युवा व विवाहयोग्य असतानाही काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरास तुम्ही विजात्रवीर्यास समवेत न नेता स्वत: स्वयंवरास गेलात. आपण या तीनही कन्यांचे अपहरण करताना आर्यविवाहांचे आठ प्रकार सभेस सांगितले. त्यानुसार स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा व लोकांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वश्रेष्ठ आहे, असे आपण स्वत:च म्हणालात. म्हणजे ंबा, ंबिका आणि ंबालिका या तीनही, तुम्ही सर्व क्षत्रियांचा पराजय करून त्यांचे हरण केले असल्याने, विधिवत तुमच्या ंगना होत्या. परंतु तुम्ही त्यांना तुमच्या धाकटया भावास अर्पण केले. परंतु ंबेने शाल्वास मनाने वरले होते! हे खरे की ते तुम्हास माहीत नव्हते व जेव्हा माहीत झाले तेव्हा तुम्ही तिला शाल्वाकडे परतही पाठवले,पण शाल्वाने तिचे पाणिगरहण केले नाही. शाल्वाने तिचे पाणिगरहण करावे यासाठी तुम्हीही कोणता प्रयत्न केला नाही. उलट तुम्ही आपले गुरू परशुरामांशी युद्धाचा पवित्रा घेतलात. म्हणजे तुम्ही गुरूची आज्ञाही पाळली नाहीत. ंबेला शेवटी अग्निकाष्ठे भक्षण करावी लागली. "हे नीतिशास्त्रविदा, तुमच्या ज्ञानाबद्दल आणि पराकरमाबद्दल आकाशातील देवताही गुणगान गातात. परंतु आपल्या भरात्यासाठी धर्माज्ञा अव्हेरून कन्यांचे अपहरण करणे धर्मसंगत होते काय या प्रश्नाचा विचार तुमच्या मनी कधी आला नाही. तुम्ही धर्मज्ञ आहात आणि सारे विश्व तुमच्या धार्मिक आचरणाची प्रशंसा करते. तुमचे अनुकरण करते. एक आजन्म बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा तुमच्या किती धार्मिक निर्णयांच्या आड आली आहे, याचाही विचार, हे नरवृषभा, तुम्ही करायला हवा होतात. " आणि ही प्रतिज्ञा आपण का केली होती बरे? असे काय घडले होते की ज्यामुळे तुम्हाला एवढी कठोर प्रतिज्ञा करावी लागली? कारण तुम्ही विवाह केल्याने पुत्रोत्पत्ती झाली तर तुम्ही ज्येष्ठ राजपुत्र असल्याने तुमच्या संततीस राज्याधिकार मिळेल अशी आशंका धीवरकन्या सत्यवतीस होती. सत्यवतीस ते भय वाटू नये म्हणून तुम्ही बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा केली आणि "भीष्म' हे नामाभिधान प्राप्त केले आणि ज्या राज्याच्या अखंड अस्तित्वासाठी आपण ही प्रतिज्ञा केली त्याच राज्याचे कौरव आणि पांडवांत विभानि व्हावे असा अधार्मिक सल्ला आपण धृतराष्ट्रास का दिलात? जर धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ असल्याने त्याचाच राज्यावर अधिकार आहे, असे आपणास वाटत होते व ते सिद्धही होते तर सर्वच राज्य, युधिष्ठिरास राज्याभिषेक करून, त्याच्या स्वाधीन करावे असा निर्णय आपण का दिला नाही? की राज्याचे खरे वारस कोण यासंबंधी तुमच्या मनात संभरम होता? "हे उदारहृदया, सत्य आणि असत्य अशा दोनच बाजू सत्य असतात. अर्धे असत्य आणि अर्धे सत्य मिळून ना असत्य बनते ना सत्य बनते. "हे धर्मश्रेष्ठा एकतर पांडवांचा या राज्यावर अधिकार आहे किंवा फक्त कौरवांचा आहे. अर्धा पांडवांचाही अधिकार आहे आणि अर्धा कौरवांचाही अधिकार आहे म्हणून राज्याचे विभानि करा ही कोणती राजनीती? याचे उत्तर गतकालाचे परिशीलन करूनही मला काही केल्या मिळत नाही. तुम्ही ज्येष्ठ कौरव आहात आणि कितीही त्याग केला असला तरीही त्याच राज्याच्या हिताची बाबिदारीही तुम्हीच घेतली आहे आणि म्हणूनच संन्यास न घेता तुम्ही कर्मशील आहात. तुमच्या पराकरमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हीच पुरुष अर्थाचे दास असतात असे तुम्हालाच न शोभणारे उद्गार कसे काढता? "कारण हे ज्ञानवंता, पुरुष अर्थाचा नव्हे तर धर्माचा दास असतो आणि धर्म सूक्ष्म आहे. अतींद्रिय आहे. त्याचे अस्तित्व अर्थाएवढे स्पष्ट आणि ढोबळ नाही. अर्थ हा धर्माचा भाग आहे. धर्म हा अर्थाचा भाग नाही, हे सर्वविदित आहे. अर्थ शोक देतो तर धर्म स्वानंद देतो, कारण धर्म काळ घडवतो. अर्थ काळ घडवत नाही. हे पुरुषश्रेष्ठा, मनुष्य जन्माने, कर्माने आणि मृत्यूने धर्माचा दास असतो, कारण हाच धर्म मनुष्याच्या मोक्षाचे कारण बनतो. ज्याचे जीवन अर्थाच्या दास्यत्वात आहे त्याला निर्णयस्वातंत्र्य नाही की मोक्षही नाही. "तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, खरे तर ज्येष्ठ कुरू या नात्याने तुम्ही आजच्या या समरप्रसंगास जबाबदार आहात आणि ही बाबिदारी आल्यानंतरही "मी अमुक एक कृत्य करीन, तमूक करणार नाही.' अशी निर्णायकता दाखवण्याचेही साहस करत आहात. आणि शिखंडीच्या हस्ते तुमचा मृत्यू व्हावा ही नियती सत्य व्हावी, यासाठी एवढा निसंहार तरी का? जर ती नियती आहे, तर हे महायुद्ध न होताही सत्य होईल." श्रीकृष्णांचे भाषण ऐकून भीष्माचार्य सद्गदित झाले होते. त्यांच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता. जणू काही त्यांच्या छातीवर कोटयवधी नाराच बाणांचा वर्षाव झाला होता. ते म्हणाले, "हे परमेश्वरा, विगत कोणालाही शेवटपर्यंत सोडीत नाही. काल हा सर्वांना आपल्या मायावी पाशात घेऊन चाललेला असतो. मी अर्थाचा दास आहे की नाही याविषयी माझ्या मनात संभरम असला तरी मृत्यू माझ्या निकट आला आहे याचे ज्ञान मला झाले आहे आणि मृत्यू समरांगणावर आला तरच स्वर्गाची महाद्वारे माझ्यासाठी उघडतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंकानाही. "हे मधुसूदना, मी बरह्मचर्याची प्रतिज्ञा केली तेव्हा मी तरुण होतो आणि मला त्यावेळीस वाटले तेवढे काही माझे धर्मज्ञान नव्हते हे सत्य आहे. कारण धर्म कणाकणाने आपले शाश्वत स्वरूप मनुष्यास दाखवीत जातो. काही लोकांपेक्षा मी अधिक बुद्धिमान होतो आणि तातांची इच्छा पूर्ण करणे व त्यासाठी काय वाटेल ते बलिदान देणे हा मी माझा त्याक्षणीचा धर्म मानला. मी त्याक्षणी कळालेल्या धर्माप्रमाणे वागलो. परंतु माझे बलिदान पाहून ना तातमहाराजांनी द्रवून सत्यवतीमातेचा त्याग केला ना सत्यवतीमातेने मला या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी स्वत: काही त्याग केला. कारण तिच्या दृष्टीने राज्यभोग महत्त्वाचे होते. तिची आणि तिच्या होणार्‍या पुत्रांची सुरक्षितता महत्त्वाची होती. हे दयाघना, मी विजात्रवीर्यासाठी कन्या आणल्या कारण ती माझ्याच मातेची आज्ञा होती. अन्यथा विजात्रवीर्य स्वयंवरात उभा राहता तर त्याच्या गळ्यात शूद्र स्त्रीसुद्धा वरमाला घालती ना! पण कुरुवंश चालायला तर हवा होता. विजात्रवीर्याचा विवाह आवश्यक तर होता. त्याचसाठी तर मी स्वयंवरात गेलो. विजात्रवीर्यासाठी तीन कन्या तर घेऊन आलो, पण हे पुरुषोत्तमा, ंबेने जेव्हा शाल्वाविषयीची तिची भावना प्रकट केली तेव्हा मीच तर तिला कुरुकुलाच्या बंधनातून मुत केले! "मी.... तिचा स्वीकार कसा करू शकत होतो? मी तिला माझ्यासाठी नव्हते हरण करून आणलेले. मी शाश्वत निर्विकार होतो. ंबाच काय, या विश्वातील कोणतीही रमणी माझ्या हृदयावर अधिराज्य करू शकत नव्हती. माझी प्रतिज्ञा हीच माझी प्रिय पत्नी होती. " आणि गुरू परशुरामांची आज्ञा तरी मी का ऐकावी? शाल्वाने तिचा पुन्हा स्वीकार केला नाही यात माझा कायष होता? ती अभुता होती. मनाने वरलेल्या पतीशी प्रामाणिक होती. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही, मग परशुरामांनी मलाच तिचा स्वीकार करण्याची आज्ञा का करावी? ती आज्ञा त्यांनी शाल्वाला का केली नाही. ंबेचे माझ्यावर प्रेम असते आणि तिने मलाच पती म्हणून वरले असते आणि माझी प्रतिज्ञा तळपत्या सूर्याएवढी सत्य असतानाही गुरूंनी आज्ञा केली असती तर कदाजात मी माझी प्रतिज्ञा विसरूनही गेलो असतो. "पण ंबेला माझा सूड हवा होता. तिला शाल्व हवा होता. पण शाल्वाने तिला अव्हेरले. तिला मी नकोच होतो आणि गुरूंची आज्ञा मानून मी तिला आपली अर्धांगी बनवली असती तरी ती माझी नाही हे वास्तव काय मला विसरता आले असते? "नाही, वृष्णिकुलवंतस, नाही. पण अजाणतेपणे का होईना मी ंबेचा वध करणारा बनलो. तिला शाल्व मिळाला नाही. तिला विजात्रवीर्य नको होता आणि मी गुरूंची आज्ञा जाणतेपणे अव्हेरली. "सारीच पातके मनुष्याच्याच स्वेच्छेने होत नाहीत. हे यादवा, अगदी धर्मानेच वागत असतानाही मनुष्याच्या हातून पातके होतात. धर्म अतिसूक्ष्म आहे, असे ज्ञानीनि म्हणतात ते याचमुळे. कारण काळ हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आज जी गोष्ट धर्मनियत वाटते ती उद्या तशी असेलच याची खात्री कोण देणार? आज जे कर्म शुभ वाटते ते उद्या अशुभ ठरणार नाही याचा कोणाला विश्वास आहे? त्यामुळे मी गतकाळात केलेली कर्मे शुभ होती की अशुभ हे आजच्या काळासंदर्भात ठरण्यात काय अर्थ आहे? परंतु हे धर्मश्रेष्ठा, तू म्हणालास त्याप्रमाणे कर्मे शुभ ठरोत की अशुभ, मनुष्य आपल्या कर्मांनीच नियती घडवीत असतो आणि मी ंबेचा वधकर्ता ठरल्याने तिच्या हातून माझा या जन्मी का होईना वध व्हावा ही माझी नियती आहे आणि ही नियती मी स्वत:च घडवली आहे. "हे सव्यसाची, सर्व भूते आपल्या ठायी आणि आपण सर्व भूतांठायी असतो हा बरह्मभाव तर तू जाणतोसच आणि हे जाणूनही संपूर्ण बरह्माचे ज्ञान मानवास कधीच होत नाही. कारण मनुष्यास जोवर तो स्वत:च अज्ञात आहे तोवर त्याला इतर चराचर कसे ज्ञात होणार आहे? माझी पांडवांवर प्रीती आहे हे सत्य आहे. राज्याधिकार त्यांनाच मिळायला हवा असे मला वाटते तेही सत्य आहे. राज्य ही कोणाची व्यतिगत मालमत्ता नसून जो प्रजेचे धर्माने प्रतिपालन करू शकतो त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे असेच शास्त्रे सांगत नाहीत का? जन्माने नियुत झालेला राजा दुष्ट असेल तर प्रजेने खुशाल त्याला हटवून योग्य व्यतीस राजा म्हणून नेमावे असे शास्त्र सांगत नाही काय? मग दुर्योधनाचा पराजय व्हावा आणि पांडवांना यशश्री मिळून त्यांना हे कुरूंचे पवित्र राज्य मिळावे असे मला वाटणे स्वाभाविकच आहे. त्यासाठीच मी युद्धात पांडवांना वधणार नाही असा निर्णय घेतला आहे आणि मला तो योग्य वाटतो. "तरीही हे करुणाघना, मला तुझ्याही वर्तनाचे नवल वाटते आहे. तू सुद्धा आयुष्यभर पांडवांना साह्य केले आहेस. पांडवांविषयी तुला प्रीती आहे, हे सारे आर्यावर्त जाणते. तू आणि अर्जुनाची जोडी म्हणजे नर-नारायणाची जोडी आणि तू त्याचा त्याग करून दुष्टांशी गाठ बांधलीस हे काही केल्या माझ्या मनाला पटत नाही." एवढे बोलून भीष्माचार्य दीर्घ सुस्कारे सोडीत अर्धोन्मीलित नेत्रांनी स्वस्थ बसले. गोपालाने आपल्या स्निग्ध दृष्टीने थकलेल्या भीष्माचार्यांचे अवलोकन केले आणि म्हणाला, "भावना जेव्हा मनुष्याच्या विवेकावर अधिष्ठान गावू लागिते तेव्हा प्रत्येक मनुष्य धर्माचाच आधार घेत आपल्या चुकीचे समर्थन करू लागतो हे अजरा मर शास्त्र आहे, सत्य आहे! तुम्ही आता वृद्ध झाला आहात आणि विवेकाची जागा भावनांनी घेतली आहे. भावनांच्या आवेगात घेतला जाणारा निर्णय कितीही धर्मसंगत वाटला तरी तो अधर्मीच मानला जायला हवा, असे माझे नित्य सांगणे आहे. "कारण विवेक शाश्वत आहे तर भावना क्षणिक आहेत. विवेक मनुष्यास परमात्मतत्त्वाच्या निकट नेतो तर भावना मनुष्यास त्याच्या कर्मात कायमच्या खिडून टाकतात. तुमचे पांडवांवर प्रेम आहे व त्यासाठीच राज्यावर त्यांचा अधिकार आहे असे तुमचे कथन आहे. आणि तरीही तुम्ही द्रोण, विदुरादि धर्मश्रेष्ठ पांडवांचे हितचिंतक असूनही आजवर राज्याधिकार धृतराष्ट्राकडून काढून पांडवांच्या हाती देण्यात असमर्थ ठरला आहात. जे खांडव प्रस्थाचे राज्य पांडवांना मिळाले तेच राज्य, खरे असो की खोटे, पण जुगारात हरून आपले स्वातंत्र्यही पांडवांनी गमावले याकडे कोणीही धर्मज्ञ डोळसपणे पाहात नाही ही विसंगती नाही काय? आणि प्रत्येक वेळी युद्धाचा विकल्प उपलब्ध असूनही पांडवांनी युद्धाचा ंगीकार केला नाही कारण त्यांना भावंडांशी युद्ध नको होते, हा सत्याचा अपमान नाही काय? अन्यथा आज तरी पांडव युद्धाच्या तयारीत का आलेअसते? "हे तुम्हासही माहीत आहे कुरुकुलभूषणा, की या क्षणी या राज्याचे अधिपती महाराज धृतराष्ट्र आहेत, दुर्योधनादी कौरव नव्हेत. युधिष्ठिरास तरी राजा होण्याचे समाधान मिळाले, दुर्योधनास यौवराज्याभिषेकही कधी झाला नाही हे वास्तव तरी आहे की नाही? म्हणजे फक्त दुर्योधनास राज्यलोभ आहे हे विधान करण्यासाठी कोणता सबळ पुरावा आपल्याकडे आहे? दुसरे असे की, दुर्योधन दुष्ट आहे, हे विधान करताना प्रजेवर अत्याचार करण्यासाठी त्याच्याकडे काही राज्याधिकार तरी हवेत की नकोत? खरे तर पांडवांचे आव्हान दुर्योधनास नसून महा राज धृतराष्ट्रांना आहे, असाच या घटनांचा अर्थ होत नाही काय? कारण दुर्योधन ना राजा आहे ना युवराज आहे. तो धृतराष्ट्राचा पुत्र आहे, एवढीच काय ती वस्तुस्थिती. "पण हे महाबाहो, या धरत्रीचे समराट धृतराष्ट्र आहेत. ते ंध आहेत आणि ते पुत्रप्रेमाने गरस्त आहेत. त्यामुळेच तर या युद्धास त्यांनी संमती दिली आहे. पण दुर्योधनावर आगपाखड करीत असताना आपण धृतराष्ट्रांना का बरे सोडतो आहोत? कारण ते ंध आहेत आणि ंधास राज्य करण्याचा अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे आणि म्हणूनच धृतराष्ट्र ज्येष्ठ असतानाही ते ंध आहेत म्हणून पांडूस राज्याधिकार दिला गेला. तो कनिष्ठ असतानाही. "मग ज्येष्ठ धृतराष्ट्राला पांडूच्या निधनानंतर राज्याधिकार न देता,ज्याप्रमाणे इतिहासात घडले आहे की विजात्रवीर्य जात्रांगदाच्या मृत्यूनंतर लहान असल्याने तुम्ही स्वत:च माता सत्यवतीच्या आदेशाने कारभार चालवायला सुरुवात केली तशी पांडूच्या मृत्यूनंतर त्याचे ज्येष्ठ पुत्र हस्तिनापुरी आल्यानंतर,तुम्ही किंवा अन्य कोणी युधिष्ठिरास राजा बनवून तो मोठा होईपर्यंत राज्यकारभार का हाकला नाही? धृतराष्ट्रास तो ंध आहे म्हणून पुन्हा पदच्युत करणे तुम्हाला सहशिय होते. कारण एकदा ज्या नियमाने एखाद्याला अपात्र ठरवले त्यालाच दुसर्‍या नियमाने जर पात्र ठरवता येते तर त्यालाच मूळ नियमाने पुन्हा अपात्र ठरवणे तुम्हाला कोठे अशक्य होते? " आणि तरीही जर पांडवांचाच राज्यावर खरा अधिकार आहे या धर्मवंतां-वर तुमचा विश्वास होता आणि आजही आहे, तर कौरवांचे, धृतराष्ट्राचे तुम्ही मीठ खाल्ले नाही हे उघड आहे. जर तुम्ही अर्थाचे दास असाल तर पांडूच्या अर्थाचे दास आहात आणि म्हणूनच पांडवांना युद्धात जिंकण्याचा मार्ग सहसाध्यि करण्यासाठीच तुम्ही कौरवांची बाजू सोडायला तयार नाही आहात. "हे कुरुकुलश्रेष्ठा, तुमचे हे वर्तन अधर्माचे आहे. शास्त्राने सांगितले आहे की, आपल्या विवेकबुद्धीस जी गोष्ट श्रेष्ठ वाटते ती प्राप्त करण्यासाठी धर्मसंगत मार्गाने प्रयत्न करायला हवा. तुम्ही कौरवांच्या बाजूने युद्ध करून एकाही पांडवास न वधता त्यांची दशसहस्र सेना वधेन अशी अट घालून सेनापतिपदाची वस्त्रे नेसण्यापेक्षा, पांडवांच्या पक्षास मिळून, त्यांच्या बाजूने युद्ध करून, प्रसंगी धार्तराष्ट्रांना वधूनही तुमचा धर्म जास्त उज्ज्वल-धवल व सयुतिक होईल. कारण तुम्ही तुमच्या विवेकाने वागला असाल! परंतु ज्याच्यावर विश्वास नाही अशा पक्षाचे सेनापत्य स्वीकारणे हे निश्चयाने अधर्माचे होईल. " आणि हे उदारहृदया, हे लक्षात घ्या की या युद्धात जर तुमचा मृत्यू यावा असे तुम्हाला वाटत असेल तर ते जे तुमच्यावर प्रीती करतात असे तुम्हाला वाटते त्यांचे हित करीत असताना जर असा मृत्यू आला तर, तुम्ही इच्छामरणी असलात आणि स्वर्गाचे द्वार उघडेपर्यंत जरी आपले प्राण स्तंभन करून थांबलात, तरीही स्वर्गाची द्वारे निमिषार्धात बंद होतील. तुम्हाल अनंतकाळ आकरोश करीत त्या द्वाराबाहेर थांबावे लागेल हे निश्चित. "तेव्हा हे पुरुषश्रेष्ठा, अद्यापही वेळ गेली नाही. कौरव या युद्धात जिंकोत की पांडव, तुम्ही नि:संशयपणे ज्या पक्षास मिळायला हवे त्या पक्षास समर्पण हृदयाने मिळा. कारण हे आत्मस्वरूप बरह्म अविनाशी आहे. या अव्यय तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. हे श्रेष्ठपुरुषा, नित्य अविनाशी व अचिंत्य असा शरीराचा मालक, तो आत्मा, त्याला प्राप्त होणारे हे देह नाशवंत व अनित्य होत. सत्य हे आत्म्याएवढेच नित्य आणि सर्वव्यापक आहे. तुला जे सत्य पटले आहे, त्या सत्यासाठी तू यज्ञ कर. तुझा कोणी नाश करू शकत नाही, की ज्यांनी तुझा नाश करावा अशी तुझ्या कर्मांची नियती आहे, तेही तुझा नाश करू शकत नाहीत. "हे महाभागा, मनुष्य नेहमीच युद्धरत असतो आणि प्रत्येक युद्धरत जीव हा क्षत्रिय असतो. कारण आल्या प्रसंगी युद्ध करणे हे प्रत्येक जन्म घेणार्‍या जीवास करमप्राप्त असते. विजय-पराजय हे प्रत्येक क्षणाच्या युद्धाशी निगडित असतो आणि जो तटस्थ बुद्धीने या विजय-पराजयाकडे पाहतो त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार हे नेहमीच उघडे असते. "तेव्हा हे भरतवंशश्रेष्ठा, दु:खी होऊ नकोस, असे अश्रू वाहवू नकोस. मी कौरवांचा पक्ष घेतला आहे म्हणजे मी कौरवांचा असा भरम तू बाळगू नकोस. मी तटस्थ आहे. मी कोणाचाही नाही. मला कोणतीही कर्मे जाकटत नाहीत. मी याक्षणी कोणाच्याही बाजूने नाही. कारण जेव्हा मनुष्य बाजू घेतो तेव्हा त्या बाजूनेच घटनांकडे पाहातो. त्यातून शाश्वत सत्य हाती लागत नाही. तुम्हाला पांडवांबद्दल प्रीती आहे, तर त्या प्रीतीस्तव अवश्य तुम्ही पांडवांच्याच पक्षाला जाऊन मिळायला हवे आणि तेच शास्त्र सांगते." यावर वयोवृद्ध तापस भीष्माचार्य काहीहीलले नाहीत. ते मौन राहिले. अश्रू ढाळीत राहिले. श्रीकृष्णाने जीवनभर आपली साथ दिली, परंतु नेमक्या अटी-तटीच्या क्षणाला त्याने बाजू बदलल्याने भीम कृद्ध झाला असला तरी आपल्या नितांत पराक्रमावर त्याचा विश्वास होता. कृष्णाला भेटून आल्यापासून द्रौपदीही अस्वस्थ होती. युधिष्ठिराने तर या स्थितीत आपण युद्ध न करता पुन्हा वनवासात निघून जावे असे विधान करून भीमाच्या क्रोधात अधिकच भर पाडली होती. अर्जुनाचे श्रीकृष्णावर नितांत प्रेम होते. श्रीकृष्णाच्या ऐवजी त्याची सेना आपल्या वाटयाला यावी याच्या दु:खात तो मग्न होता. नकुल आणि सहदेवाची अवस्था निराळी नव्हती. शांत होती ती माता कुंती. कुंती आपल्या पुत्रांस भेटण्यासाठी शिबिरात आली तेव्हा द्रौपदी धर्मराज युधिष्ठिरासमवेत आणि अन्य पतींसमवेत एका आसनावर बसली होती. कुंतीस पाहताच उभयतांनी उठून धर्मनिष्ठ कुंतीस प्रणाम केला. पुत्रास अमरत्वाचा आशीर्वाद देऊन कुंती आसनावर बसली. मातेस खिन्न पाहून युधिष्ठिराने त्या खिन्न्तेचे कारण विचारले असता कुंती म्हणाली, "पुत्रा, तुम्हा पाचही मुलांसाठी माझा आत्मा किती तिळ-तिळ तुटत असतो याची तुला जाणीव आहे. या सामराज्याची खरी समराज्ञी मी. मीच खरे तर तुला सोबत घेऊन राज्यशकट हाकावा अशी खरी राजनीती, परंतु पाहा,दुर्भाग्याने असे काही दान पदरात टाकले आहे की तुम्हा भावंडांना आपल्याच अधिकारांसाठी प्राणांना पणावर लावावे लागत आहे. कृष्ण खरे तर माझा निकट संबंधी, परंतु आज तोही विरुद्ध पक्षास जाऊन मिळाला आहे. गांधारीपुत्राने त्याच्यावर अशी कोणती माजेहनी टाकिली की ज्या योगे अर्जुनरूपी नराचा स्नेही कृष्णरूपी नारायणाने त्याग करावा? "माझ्या धर्मनिष्ठ मुला, शेवटी मी आई आहे. माझा तुम्हा सर्वांच्या पराक्रमावर दृढ विश्वास आहे. देवेंद्र जरी युद्धास समोर ठाकला तरी त्याला पराजित करण्याचे सामर्थ्य तुम्हा पाच भावंडांत आहे. परंतु हे धार्तराष्ट्र महापातकी आणि दुष्ट आहेत. त्यांच्यासमोर युद्धात तुमचा निभाव कसा लागणार हे मला काही केल्या कळत नाही. त्याचमुळे मी खिन्न आहे. कृष्ण तुम्हासोबत असता तर त्या महाचतुर पुरुषाने अशक्यप्राय यशही तुम्हाला खेचून आणून दिले असते. "हे माझ्या धर्मनिष्ठ यमपुत्रा, तू म्हणजे धर्म. धर्माने तुझ्या रूपाने अवतार घेतला असावा असे तुझे आचरण पाहून वाटते. धर्म आणि अधर्मातील हे युद्ध आहे असे माझे मातृहृदय मला कळवळून सांगते आहे आणि या युद्धात तुझा जय होईल असाच माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु माझे मातृहृदय मात्र अनामिक आशंकेने व्याप्त झाले आहे. हे युद्ध करावे काय? की काही काळ वाट पाहून आपली स्थिती अधिक सक्षम झाल्यानंतर युद्ध करावे याबद्दल माझ्या मनात द्वंद्व आहे." "तू अगदी माझ्या मनातीलच बोललीस." युधिष्ठिर म्हणाला, ""माते, युद्ध हे एक अनिष्ट कर्म आहे असे माझे मन मला नेहमीच सांगत आले आहे. ज्या युद्धात अनंत जीवांचा संहार होऊन पृथ्वी रतात भिते ते युद्धि अमानवीच होय. कृष्ण हा स्वत: नारायणाचा अवतार आहे, असे मलाही वाटत होते. माझी त्यावर पराकोटीची श्रद्धा होती. पण त्याने अजाणतेपणे का होईना अधर्माची बाजू घेतली आहे. धार्तराष्ट्रांनी आजतागायत आमच्या नाशासाठी एवढी पातके केली आहेत की नरकातच त्यांना स्थान मिळेल असे मला नि:श्चयाने वाटते. परंतु हा युद्धाचा प्रसंग समोर येऊन ठाकला आहे. माझी इच्छा नसतानाही हा प्रसंग यावा हे खजातच दुर्दैव. परंतु माते, हे माझे अन्य बंधूही मला सहमत नाहीत. भीम तर नेहमीच युद्धज्वराने पछाडलेला असतो." भीमाने हे विधान ऐकताच विकट हास्य केले आणि म्हणाला, "सबलांनी सबल नीतीचा आणि दुर्बलांनी दुर्बल नीतीचा स्वीकार करावा हे अटळच आहे. समरप्रसंग समोर ठाकता युद्ध करणे ही सबळ नीती तर तेयुद्ध टाळून कर्मसंन्याशाच्या गप्पा माराव्यात ही दुर्बल नीती. हे माते, युधिष्ठिर हा क्षात्रवेषातील बराह्मण आहे असे मी जे सदैव सांगत आलो आहे ते त्याचमुळे. आपण राज्याधिपती व्हावे असे जर या माझ्या धर्मज्ञ ज्येष्ठ बंधूस वाटत नाही तर त्याने इंद्रप्रस्थीचा राजमुकुट तरी का परिधान केला होता म्हणतो मी? या राज्यावर आम्हा पांडवांचा अधिकार आहे आणि ज्यावर आपला अधिकार आहे, त्यावर कोणी उपटसुंभ स्वत:ची सत्ता चालवत असेल तर ते स्वस्थ संन्यासीमनाने पाहात राहणे हे भेकडपणाचे नाही तर मग अन्य कशाचे लक्षण आहे? "माते, युधिष्ठिर तेवढा धर्मज्ञ! मग आम्ही कोण आहोत? द्यूत टाळ असे यास वारंवार सांगूनही द्यूताचा हट्ट करणारा हा माझा ज्येष्ठ बंधू काय धार्तराष्ट्रांेवढाच दुष्ट नाही? द्रौपदी ही आम्हा पाचही बंधूंची पत्नी. तिला द्यूतात पणावर लावायचा स्वामित्व अधिकार कोणी या ज्येष्ठ बंधूस दिला होता? एकवस्त्रा असतानाही मानिनी याज्ञसेनीचा भीषण अपमान झाला. त्यांचा सूड घ्यायच्या गप्पा सोडून केवळ कृष्ण कौरवांच्या पक्षाला मिळाला म्हणून त्या आधी युद्धोत्सुक असलेला युधिष्ठिर आता संन्यासाच्या गप्पा मारू लागला आहे, हे अनिष्ट आहे. दुर्दैव आहे. "माते, पण हे युद्ध होणारच. आणि मी तुला खरे सांगतो, कोणत्याही युद्धात आपल्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही, आपली शती कमी आहे की अधिक, यास काही अर्थ नाही. माते, विजय फक्त मनात असतो आणि विजयाचा दृढ संकल्प असेल तर विपरीत स्थितीतही विजय मिळू शकतो. इतिहासातही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. " आणि मी म्हणतो, कोण हा श्रीकृष्ण, ज्याच्या सोबत असल्या-नसल्याने आम्हा पांडवांना फरक पडणार आहे? हे खरे की तो कालपर्यंत आम्हा पांडवांचा समर्थक होता. पण श्रीकृष्ण समर्थक होता म्हणून आम्ही यशस्वी झालो असे आजवर काय घडले आहे बरे? शेवटी त्याचाच कट्टर शत्रू, जो जरा संध, त्याचा काटा मीच काढला ना? श्रीकृष्णास ज्याने अनेक वेळा पराभूत केले त्याचा वध जर मला करावा लागला तर श्रीकृष्ण नारायणाचा अवतार असे आम्ही पांडव का म्हणतो बरे? "केवळ तो चतुर आहे म्हणून? शिशुपालाने श्रीकृष्णाच्या अगरपूजेस विरोध केला ते योग्यच होते असे मी म्हणेन. ज्याला कोणतीही नीती नाही, सोयीप्रमाणे पक्ष घेतो तो परमात्म्याचा अवतार होऊ शकणार नाही, हे तर शाश्वत सत्य आहे. "तेव्हा हे माते, तू संशयी होण्याचे काही कारण नाही. धर्मराजाचे मन नेहमीच अस्थिर असते आणि त्याला इतिहास साक्षी आहे. अधिक विचार करणार्‍या कोणत्याही पुरुषाला शेवटी कर्मनिश्चिती करता येत नाही, हे जेवढे शाश्वत सत्य आहे तेवढेच ते या माझ्या ज्येष्ठ बंधूस लागू पडते. "हे माते, या युद्धात आमचा विजय होणार याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही आणि हा केवळ अंध आत्मविश्वास नाही. त्यासाठी अर्जुन, नकुल-सहदेव आणि ज्येष्ठ बंधो, जरा थोडा कौरवांच्या बाजूचा विचार करा. "संख्येचा विचार केला तर आपल्या बाजूने आधी सात अक्षौहिणी सेना होती, तर आता श्रीकृष्णाची सेना येऊन मिळाल्याने आपली संख्या नऊ अक्षौहिणी एवढी झाली आहे आणि संख्येने जवळपास तेवढीच, म्हणजे नऊ अक्षौहिणी सेना कौरवांच्या बाजूने आहे म्हणजेच संख्येने दोघांचे बलाबल समान आहे. "आपल्याकडे द्रुपद, धृष्टद्युम्नासारखे महावीर आहेत. तसेच सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुराज, कुंतिभोज आणि शौढ्यासारखे महारथी आहेत. कौरवांचा विचार करता भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कृप, विकर्ण, अश्वत्थामा, भूपरश्रवा आदी महारथी आहेत. आपले सारे महारथी, हे मनोदुर्बल धर्मराजा, तुझ्यावर सर्वस्वी निष्ठा ठेवून आहेत. परंतु सुदैवाने कौरवांचे तसे नाही. "भीष्माचार्यांचेच म्हणशील तर त्यांनी आपणा सर्व भावांवरील प्रीतीमुळे युद्धात एकाही पांडवास वधणार नाही असा दृढनिश्चय केला आहे आणि भीष्माचार्य ही प्रतिज्ञा पाळणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र संशय नाही, कारण ते सत्यवचनी आहेत. खरे तर त्यांनी अशी काही प्रतिज्ञा केली नसती तर आपण या युद्धाचा विचार करण्यातही अर्थ नव्हता, कारण जेथे त्यांना परशुराम पराजित करू शकले नाहीत, त्या इच्छामरणी महापुरुषास कोण वधणार? हेही खरे की शिखंडी आपल्याच बाजूने आहे आणि शिखंडीवर शस्त्र चालवणार नाही अशीही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे; एरवी शिखंडी भीष्माचार्यांना ठार मारू शकणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण आता भीष्माचार्य पांडवांना वधणार नाहीत आणि ते शिखंडीवर शस्त्र चालवणार नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे भीष्माचार्यांच्या जविंत असेपर्यंत आम्ही सारेच पांडव सुरक्षित आहोत. "तेव्हा अधिकात अधिक दिवस त्यांनीच सेनापती म्हणून राहावे आणि त्या काळात कौरवांचे अधिकाधिक रथी-महारथी यांचे आपण उच्चाटन करावे असे मला वाटते आणि महाबाहू अर्जुनास ते अशक्य नाही. "द्रोणाचार्यांचेच म्हणशील माते, तर त्यांचेही आमच्यावर पुत्रवत प्रेम आहे. जेवढे त्यांचे प्रेम या सव्यसाचीवर आहे, तेवढे स्वत:चा पुत्र, जो अश्वत्थामा त्याच्यावरही नाही, त्यामुळे तेसुद्धा कोणाही पांडवांस वधणार नाहीत; पण ते तरीही आपल्या अनंत बाहूबलाने आमचा नाश करू शकतात हे वास्तव आहे, कारण ते अखेर आमचे गुरू आहेत आणि आम्हापेक्षा ते युद्धशास्त्रात अधिक प्रवीण आहेत हे तर सत्य आहे. परंतु हे माते, तरीही पांडवांची बाजू वरचढ आहे. कारण ज्या द्रुपदाने त्यांचा वारंवार अपमान केला आणि ज्याचा सूड या महागुरूने आमच्याच करवी उगविला तो द्रुपद आमच्याकडे आहे आणि त्याच द्रुपदाने याच द्रोणाचार्यांच्या नाशासाठी भयंकर यज्ञ रजाला. त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांची उत्पत्ती झाली. ज्या द्रोणाच्या नाशासाठी यज्ञ झाला, त्या यज्ञातून उत्पन्न झालेला धृष्टद्युम्न आमचा आहे आणि त्याच यज्ञातून उत्पन्न झालेली द्रौपदीही आम्हां बंधूची पत्नी आहे. तेव्हा या युद्धात द्रोणाचार्यांचा वध नियत नियतीमुळे महारथी धृष्टद्युम्न करणार हे सुद्धा निश्चित. " आणि माते, कृपाचार्यांची तर गोष्टच वेगळी आहे. ते आमचे सर्वप्रथम गुरू होते आणि ते अमर आहेत. त्यांना कोण वधू शकणार? कळीकाळातही ते सामर्थ्य नाही; पण ना ते आमचे द्वेष्टे आहेत ना मित्र आहेत. द्रोणाचार्यांच्या वधानंतर, द्रोणाचार्य त्यांचे मेहुणे असल्याने कदाजात ते काजेपष्ट होतील हे खरे; पण दुर्योधनाची त्यांच्यावरही प्रीत नाही. त्यामुळे मला कृपाचार्यांची काळजी करावी वाटली तरी ती एवढी गंभीर नाही. "विकर्ण हा धार्तराष्ट्र महारथी खरा; पण खुद्द कौरवांत तो दुय्यम समजला जातो. त्यामुळे या महापुरुषाचा अहंकार अगदीच दुखावला गेला आहे आणि मी असे ऐकतो की तो दुर्योधनासही दुरुत्तरे करतो. हा महारथी विकर्ण दुर्योधनाच्या विजयौवजी पराजयासाठीच अधिक प्रयत्न करेल असा माझा दृढ विश्वास आहे आणि तेही आमच्याच फायद्याचे आहे. "अश्वत्थामा मात्र सर्वांत अधिक घातकी आहे. तो अखेर द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि कर्णाप्रमाणे किंवा अन्य कोणाही कुरू महायोद्धयांप्रमाणे शापित नाही. मी असे ऐकतो की तो दुर्योधनावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याच्याच यशासाठी झटतो. परंतु खुद्द त्याचा पिता त्याच्यावर प्रेम करीत नाही. अश्वत्थामा शीघरकोपी आणि अविचारी आहे, असे सारे म्हणतात. त्यामुळे आपण त्याच्याबद्दलच फक्त सावध राहिले पाहिजे. "फक्त कर्ण तेवढा महत्त्वाचा कारण तो आम्हा पांडवांचा पुरेपूर द्वेष करतो. तो शापित आहे हे खरे. पर तरीही त्याला आपण गांभीर्याने घ्यायला हवे. भीष्माचार्यांनी त्याला अर्धरथी म्हटल्याने आपला तात्पुरता फायदा झाला असला तरी तो कायम टिकणार नाही. अर्जुनास तर तो वधण्यास आतुर झाला आहे. सर्व शस्त्रे आणि अस्त्रांचे ज्ञान असणारा आणि पांडवांच्या नाशासाठी टपलेला तोच एक महाधनुर्धर कौरवांच्या बाजूने आहे आणि मला फक्त त्याचीच काळजी वाटते. परंतु जर भीष्माचार्य अधिक काळ जविंत राहून सेनापती राहिले तर तोवर कर्ण हाती शस्त्र घेणार नाही, ही आपल्याच लाभाची गोष्ट आहे. " आणि कर्णाच्या काही अहंगंडाच्या समस्या आहेत. तो क्षत्रिय नाही. सामान्य सूतपुत्र आहे. द्रोणाचार्यांनीही त्याला अव्हेरले आणि महागुरू परशुरामांनी तर त्यास शापिले आहे. कर्ण अर्जुनासही जड जाईल हे खरे. कदाजात दोघांचे युद्ध या दोघांसाठीही अखेरचे असेल. परंतु कर्ण शापित आहे आणि जरी त्याच्या निष्ठा सर्वस्वाने दुर्योधनाच्या चरणी असल्या तरीही कदाजात आपण त्यालाही दूर करू शकतो. तेव्हा कर्ण आणि अश्वत्थाम्याचीच आपण काळजी करायला हवी. "स्वत: दुर्योधन रणात महापराक्रमी आहे, हे कालत्रयी सत्य आहे; पण तो गदाधर आणि मीही गदाधर. जे काही अंती होईल ते त्याच्यात आणि माझ्यात आणि त्याची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा मी केली आहेच, त्याने नाही. मी अवश्य दुर्योधनाची मांडी फोडेन... कारण त्याच मांडीवर थाप मारून त्याने माझ्या लाडया पत्नीस,... द्रौपदीस दुष्ट खुणा केल्या होत्या! युद्धात हे पातक आहे हे खरे; पण मी माझी प्रतिज्ञा नक्की पार पाडणार हेच अटळ विधिलिखित आहे आणि त्या योगेच माझा विजयही सुकर होणार आहे. " आणि हे माते, मी जे सांगितले त्यावरून एक गोष्ट ध्यानी घे. आमच्या बाजूचे वीर अभंग आहेत. त्यांच्या या माझ्या ज्येष्ठ भरात्यावरील निष्ठा अटळ आहेत आणि ते किंचितही शापित नाहीत. माझ्याकडे असा एकही वीर नाही ज्याने "एकाही कौरवाला ठार मारणार नाही.' अशी प्रतिज्ञा केली असेल! "दुर्योधनाचा पक्ष दुभंगलेला आहे. खुद्द त्याच्या पित्यास, महाराज धृतराष्ट्रास, या युद्धाबद्दल ममत्व नाही. त्याचे मनही दुंभगलेले आहे आणि हे प्रिय ज्येष्ठ भरात्या, ज्यांचे नेते दुंभगलेले असतात अशा नेत्यांच्या प्रजेस कधीही यश मिळत नाही, हे समजावून घे. आपल्याला, कृष्ण आपल्या बाजूने नसतानाही, जय मिळणार हे निश्चित आहे. कारण आपल्या बाजूने कोणीही दुभंग मनाचा नाही, "फक्त तू सोडून. " आणि हे ज्येष्ठ पांडवा, मन स्थिर ठेव, संतुलित ठेव. कारण पुन्हा लक्षात घे, विजय मनात असतो. रणभूमीवर नसतो. युद्धात मृत्यू पावूनही अजरा मर झालेले कितीतरी योद्धे आहेत; पण त्या वीरांच्या मृत्यूने राजास यश दिले आहे. तू आमचा ज्येष्ठ भराता या नात्याने आमचा राजा आहेस आणि हे पृथ्वीपालका, या रणात तुला किंचितही क्षती होणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. "हे माते, कृष्णास विस्मरूयात आपण, कारण तो हाती शस्त्र घेणार नाही. तो बोलतो खूप चतुर आणि कधी असेही वाटते की त्याच्या ओठांवर देवी सरस्वतीचे अधिष्ठान आहे. होताही तो आमचा सखा कधीतरी, परंतु शत्रूचे मित्रत्व होणे आणि मित्रांशीही शत्रुत्व होणे ही निरीत आहे. अन्यथा ज्या द्रुपदास बांधून अर्जुनाने गुरू द्रोणांसमोर उपस्थित केले, तोच द्रुपद आज आपल्या पुत्रांसह आमच्याबरोबर या संगरात सारी सेना घेऊन का आला असता? "का द्रौपदी आमची भार्या झाली असती? "नियती आमच्या बाजूने आहे. कौरवांच्या नव्हे आणि म्हणूनच हे युद्ध केलेच पाहिजे. आपला जय निश्चित आहे." यावर पंडुपत्नी कुंतीने समाधान व्यत करीत धर्मराज युधिष्ठिराकडे पाहिले आणि म्हणाली... "तुम्हाला कर्णाचेही भय बाळगण्याचे कारण नाही." द्रौपदीने चमकून माता कुंतीकडे पाहिले. कमलनयन परमात्मस्वरूप भगवान श्रीकृष्णाने आपले नेत्र उघडले आणि या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या अद्भुत सृष्टीकडे अनिवार जिज्ञासेने पाहिले. द्रोणाचार्य श्रीकृष्णाच्या तेजोमय मुखाकडे भक्तिभावाने पाहात होते. "श्रीकृष्णा, तुझी लीला अपार आहे, परंतु तरीही माझ्या मनातील शंका काही केल्या दूर झाली नाही. पांडवांची बाजू सत्य की कौरवांची, हे समज की विवाद्य आहे. परंतु हे नारायणस्वरूपा, तू कशी बाजू बदललीस? ज्या बाजूने तू सदैव राहिलास, ज्यांचे नेहमीच क्षेम चिंतिले, ज्यांच्या हितासाठी तू सदैव तत्पर राहिलास, ज्यांच्या हितासाठी तू नीतीलाही कधी-कधी दूर ठेवले आहेस, आता त्यांची बाजू सोडणे हे तुला शोभते काय? श्रीकृष्णा, जसे गंगेने उलटे वाहू लागावे, पृथ्वीने स्थानच्युत व्हावे असेच तुझे वर्तन नाही काय? धर्म खूप सूक्ष्म आहे आणि ज्ञानवंतांनाही अनेकदा धर्म समजत नाही असे म्हणतात. परंतु तू तर धर्माचा संस्थापक आहेस. तुझ्यातूनच, यज्ञातून ज्वाला उत्पन्न व्हाव्यात, तसा धर्म निघाला आहे. धर्म स्थिर, अविचल आणि निर्विकार असतो असे ज्ञानीनि म्हणतात. परंतु तुझ्या वर्तनाने धर्म हा अस्थिर, चंचल आणि कसाही वाकवता येईल असे सर्व जगतास वाटू लागेल आणि मग देवताही आपले वर्तनलतील. ब्रह्मदेवही स्थानच्युत होईल पण तुझ्या या वर्तनामागे काहीतरी गूढ असेल असे मला वाटते आणि ते समजावून घेण्याची अनावर जज्ञासा मिला झाली आहे. "हे श्रीकृष्णा, कदाचित दुर्योधनाच्या पक्षास मिळाल्यासारखे दाखवून पांडवांचे अंती हित करावे असे तुझ्या मनात असेलर्‍आजनीतीशास्त्रातील भेदाची नीती पूर्वीच्या अनेक राजांनी अमलात आणली आहे, असे मी जाणतो. परंतु अशा राजांना इतिहासात नेहमीच अधम कोटीचे स्थान लाभले आहे. त्यांचा भेदनीतीने झालेला जय शुद्ध नाही, असे पूर्वाचार्यांचे मत आहे आणि तरीही असे कृत्य सामान्य व्यतीने केले तर ते क्षम्य आहे असे आपणास म्हणता येईल. परंतु ते स्वत: श्रीकृष्णाने केले तर मग श्रीकृष्णचारित्र्याबद्दल संदेह उत्पन्न होईल या विषयी माझ्या मनात शंका नाही. "तेव्हा तूच माझ्या संशयाचे निराकरण करावे, असे मला वाटते." एवढे वयोवृद्ध, तपस्वी शोभतील असे द्रोणाचार्य स्वस्थ उभे राहिले आणि अनिवार जज्ञासेने श्रीकृष्णाकिडे पाहू लागले. श्रीकृष्णाच्या मुखावर नेहमी असते तशी नीरव शांती होती आणि त्या शांतीचे तेज सर्व चराचरास गंभीर बनवत होते. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांकडे पाहिले आणि विचारले, "आचार्य, हे युद्ध आता होणार हे निश्चितच आहे. तेव्हा या युद्धात कोणाचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते?" आपल्या प्रश्नाचे उत्तर न देता श्रीकृष्णाने अन्य प्रश्न केला आहे हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आले. परंतु उत्तर देण्याच्या निश्चयाने ते म्हणाले, "श्रीकृष्णा, हा फार मोठा अवघड प्रश्न तू विचारला आहेस यात संशय नाही. पाचही पांडव, द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, शिखंडीसह सारे कौरव माझे शिष्य आहेत. कर्ण आणि एकलव्यही माझे अप्रत्यक्ष शिष्य आहेत आणि तू हे जाणतोस. "हे करुणाकरा, शिष्य हा गुरूस पुत्रासमान असतो हे शास्त्रवचन तू जाणतोसच. त्यामुळे धृतराष्टाचे जसे कौरवांवरच प्रेम आहे किंवा प्रिय म्हणून भीष्माचार्यांचे आणि पुत्र म्हणून कुंतीचे पांडवांवरच प्रेम आहे तसे काही माझे नाही. कौरव आणि पांडव हे एका अर्थाने माझे पुत्रच होत आणि उभयतांवर मी प्रेम करतो ही वस्तुस्थिती आहे आणि माझे शिष्य आपापसात युद्ध करायला निघाले असता गुरूचे मन भावनाकल्लोळाने गबिलेले असिणार हेही निश्चित. "हे द्वारकाधीशा, पुत्राने आशीर्वाद मागितला तर "विजयी भव' असे म्हणणे शास्त्रसंमत आहे, हे तूही जाणतोसच. परंतु येथे शिष्यरूपी पुत्रांतच संघर्ष असल्याने आणि युद्धात कोणा एकाचाच जय संभव असल्याने उभयतांना "विजयी भव' असा आशीर्वाद दिला तर एकाला तरी दिलेला आशीर्वाद असत्य ठरणार आहे हेही निश्चित. अशा अवस्थेत आशीर्वाद खोटा ठरणे हेही गुरूस अहितकारी आणि कीर्ती कलंकित करणारे ठरेल हेही तेवढेच सत्य वचन. "म्हणूनच या युद्धात कोणाचा जय व्हावा असे मला वाटते, हा जो प्रश्न तू मला विचारला आहेस, त्याचे उत्तर निश्चितच अवघड आहे आणि हे सुद्धा तू जाणतोसच. "बरे मी सा सिर्व शिष्यांवर प्रीत करतो तेवढीच प्रीत माझे शिष्य माझ्यावर करतात की काय हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जर एखादा शिष्य माझ्यावर प्रीत करीत नसतानाही माझा आशीर्वाद मागत असेल आणि मी फक्त द्यायचा म्हणून "विजयी भव' आशीर्वाद देऊनही तो शिष्य पराजित झाला तर माझ्याकडे खोटा आशीर्वाद दिल्याचे पातक येणार नाही. "आता हे पाहा करुणाकरा, दुर्योधन माझा द्वेष्टा असता तर त्याने मला या युद्धात, पांडव माझेही प्रिय शिष्य आहेत हे ज्ञात असतानाही, सहभागी करून घेण्याचे ठरविले नसते. कारण हे दयामय प्रभू, जी व्यती आपले अहित चिंतिते, शत्रुपक्षाचे यश अपजेक्षते अशा व्यक्तीने आपल्या पक्षाने लढावे असे अपजेक्षणारा एकतर मूर्ख तरी असला पाहिजे किंवा स्वत:च्या नाशास तो निमंत्रण देतो आहे, असे तरी म्हणावयास हवे. किंवा याहीपुढे जाऊन त्या व्यक्तीवर राजाचे निरातिशय प्रेम तरी असले पाहिजे, असे मला वाटते. "दुर्योधन मूर्ख नाही हे तू जाणतोसच. कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही ज्याने सूतपुत्र कर्णास राजा बनवले, आपल्या धाकटया भावांना एका मुठीत ठेवले, राजा धृतराष्ट्रावर प्रभाव कायम ठजेवण्यात यश मिळवले त्याला मूर्ख कसे म्हणता येईल? बरे त्याला आत्मनाशाची आस आहे, असेही मला म्हणता येत नाही. कारण उलटपक्षी दुर्योधन लोभी आहे असाच प्रचार आजवर झाला आहे, हेही तू जाणतोसच. आणि सारे कळूनही आत्मनाशाची आस बाळगणारा मग अति-ज्ञानीच म्हणायला हवा, आणि दुर्योधन तर तसाही नाही, अन्यथा पांडवांना राज्याचा हिस्सा मिळू नये यासाठी त्याने आजवर एवढ्या कलृप्त्या का लढविल्या असत्या? तेव्हा तो सुज्ञ आहे आणि असे असूनही जर मी पांडवांचे हित चिंतित आलो आहे हे ज्ञात असतानाही जर तो स्वत:च्याच पक्षात राहून मी युद्ध करावे हे जर अपजेक्षत असेल तर त्याचेही माझ्यावर प्रेम असायला हवे आणि मी त्याच्या पक्षाने जर युद्ध करणार असेल तर मी त्याला जय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करीन हा विश्वास त्याच्यात असला पाहिजे, हेही तेवढेच खरे. "पांडवांचे मविर प्रेम आहे, हे तर सर्वविख्यात आहे. अर्जुनानेच माझा वैरी जो द्रुपद, यास बंदी बनवून माझ्यासमोर आणून माझ्या वैराग्नीचे शमन केले आणि या य:कश्चित द्रोणास पांचालाधिपती बनवून द्रुपदाच्या बरोबरीस आणून बसविले, हेही सारे जाणतात. शिवाय अर्जुन हा माझा सर्वात प्रिय शिष्य आहे, कारण धनुर्वेदातील सार्‍या कला तो माझ्याकडून शिकला आणि त्यात निष्णात बनला. त्यामुळे गुरू म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो, हेही खरे. "धर्म, भीम, नकुल आणि सहदेवही माझे तेवढेच प्रिय शिष्य आहेत. आणि त्यांना ज्ञानदान करण्यात मी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. "शिष्य म्हणून मला जेवढा अRउनाचा अभिमान आहे, तेवढाच सूतपुत्र कर्णाचा सुद्धा आहे. जेवढा अभिमान मला गदायुद्धात प्रवीण असल्याबद्दल भीमाचा आहे तेवढाच दुर्योधनाचाही आहे. त्यामुळे हे युद्ध यान पक्षात होत असल्याने विजयी कोण झाला यास महत्त्व नाही. हे दयाघना, जो हरेल, तोही माझाच शिष्य असल्याने कारण अंतत: माझ्या गुरुपदास काळिमा लागणार आहे, हे निश्चित! " आणि या युद्धात कोणा एका पक्षाकडून तरी माझाही सहभाग असल्याने मी ज्या पक्षाकडून युद्ध करेन त्या पक्षाचा जर पराजय झाला तर माझे गुरुत्व अपयशी होईल हेही तेवढेच खरे नाही काय? " आणि हे गोपाला, माझी समस्या याहूनही अधिकच गहन आहे. द्रुपदाने माझ्या संहारासाठी यज्ञ मांडिला होता हे तू जाणतोसच. त्यातून धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला आहे, हे सर्वविख्यात आहे. धृष्टद्युम्न माझ्या मृत्यूसाठीच यज्ञातून अवतरला आहे आणि नियतीची शोकांतिका म्हण किंवा माझा नियतीवरील अटळ विश्वास म्हण, जो माझ्याच मृत्यूसाठी जन्मास आला आहे त्याच धृष्टद्युम्नास मीच सारे शस्त्रास्त्र विद्येचे ज्ञान दिले आहे. धृष्टद्युम्नही, जो माझा मृत्यू आहे तो माझा शिष्यच आहे आणि त्याच यज्ञातून निर्माण झालेली याज्ञसेनी द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी आहे. द्रुपदाने आपले सामर्थ्य पांडवांच्या मागे उभे केले आहे हे तू जाणतोसच. या सार्‍यामुळे माझ्यापुढची समस्या अधिकच जटिल झालीअहे! "धृष्टद्युम्न माझा शिष्य आहे आणि त्याला वधण्यास मी समर्थ असलो तरी त्याच्या हातून म मृत्यू यावा ही माझी नियती असल्याने मी त्यास कसा वधू? आणि शिष्यास वधणे हे पुत्रहत्येएवढेच पातकी कर्म असल्याने मी ते कसे करू? आणि जोवर माझ्या हाती शस्त्र आहे, तोवर मला वधण्यास या यच्चयावत विश्वात कोणी समर्थ नाही, हेही वास्तव आहे, हे तू जाणतोसच. "परंतु अखेर धृष्टद्युम्न आणि माझ्यातील ही व्यतिगत गोष्ट आहे. युद्ध हे कोणा एका व्यक्तीसाठी नसते. ते राजाच्या हेतूच्या यशासाठी असते हे शास्त्राचे गुह्य आहे आणि जर मला दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करायचे असेल तर ते माझ्या व्यतिगत यशापयशासाठी किंवा भाग्याने लिहिलेल्या नियतीसाठी नसून दुर्योधनाच्या हितासाठी करावे लागेल हेही तेवढेच शास्त्रमान्य सत्य. आणि समज मी पांडवांच्या पक्षास जाऊन मिळालो तर मला पांडवांच्याच यशासाठी प्रयत्न करावा लागेल तेही निश्चित. परंतु त्यामुळे ऊनि एक विजात्र परिस्थिती निर्माण होईल आणि ती मला विषद करायलाच हवी. "मी पांडवांच्या पक्षास का मिळावे हा प्रथम प्रश्न आहे. पांडव माझे प्रिय शिष्य आहेत आणि ते नेहमीच माझे इष्ट चिंतितात, हे सत्य आहे. परंतु कोणत्याही पक्षास मिळताना, जर मी उभय पक्षांचा गुरू असेन तर, माझ्याकडे तेवढेच समर्थनीय कारण हवे. एकतर मला कौरवांचा पक्ष सत्य वाटायला हवा किंवा पांडवांचा पक्ष सत्य वाटायला हवा. आणि सत्य एकाच बाजूने असू शकत नाही, ते कधी-कधी दोन्ही बाजूंनी असू शकते. परंतु आपण मनुष्यांच्या जगात जगत असल्याने सत्य हे पूर्ण सत्य असू शकत नाही. माणसाचे सत्य हे नेहमीच थोडयातरी असत्याने परिष्कृत असते. तेव्हा अधिक सत्य की कमी सत्य एवढाच फरक मानवासंदर्भात करता येतो. तेव्हा अधिक सत्य कौरवांच्या बाजूने आहे की अधिक सत्य पांडवांच्या बाजूने आहे, याचा निर्णय एका मनुष्यानेच घेणेसुद्धा त्यामुळे तेवढेच अनिर्णायक असू शकेल. " आणि मी सुद्धा मनुष्य आहे. तेव्हा माझा विवेक, तो मला कितीही योग्य सल्ला देत असला तरी, शास्त्रार्थाने योग्य असेलच असे काही मी निश्चयाने सांगू शकत नाही. हे युद्ध सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे, असेही मला निश्चयाने म्हणता येत नाही, कारण जर या युद्धात जय मिळावा म्हणूनन अक्षौहिणी सेना तू पांडवांच्या साहाय्यार्थ दिली असेल आणि फक्त तू एकटा कौरवांच्या बाजूने असशील, तर तुलाही नेमकी कोणती बाजू सत्य वाटत आहे हे नक्की करता आलेले नाही हे निश्चित. "रि कौरव असत्य आहेत आणि जर हे युद्ध फक्त सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी असेल तर कौरवांच्या बाजूने मग एकाही सैनिकाने युद्ध करता कामा नये, नाही तर नऊ अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्या बाजूने युद्ध करू इच्छिणारे एवढे रथी-महारथी असत्य आहेत हे सिद्ध होईल. किंवा सत्यासंदर्भात त्यांचा काहीतरी भरम झाला आहे, असे म्हणावे लागेल! त्यांची कीर्तीही यामुळे कलंकित होईल. त्यांची संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या असार्थकी होईल. "तेव्हा या युद्धाचा आणि शाश्वत सत्याचा संबंध नाही असे मला निश्चयाने वाटते. धर्म हा सत्य असतो आणि जेथे सत्य नाही तेथे धर्म नाही आणि येथे तर धर्म निश्चयानेन्ही पक्षांच्या बाजूने नाही, असे मला म्हणावेसे वाटते. "मग हे युद्ध कशासाठी आहे? राज्यलक्ष्मीसाठी! कौरवांकडून राज्य कूनिं घ्यावे या अनिवार आकांक्षेने पांडव युद्धास सज्जा आहेत तर पांडवांस आपल्या राज्याचा कणमात्र हिस्सा द्यायचा नाही या निश्चयाने कौरव युद्धास सज्जा आहेत. हे युद्ध राज्यासाठी आहे. भूमीसाठी आहे आणि या भूमीवर आपलाच अधिकार आहे हे उभयपक्षास वाटते आहे. " आणि एखाद्या सीमित वस्तूवरन किंवा अधिक पक्ष अधिकार सांगू लागतात तेव्हा त्याचा निर्णय संहारक युद्धानेच होणार हेही तेवढेच सत्य. आणि "अधिकार' ही मानवी संकल्पना आहे असे मला वाटते. कारण सत्य धर्म पाहिला तर या यच्चयावत विश्वात कोणाचाही अगदी तृणपात्यावरही अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे. "तेव्हा हे युद्ध धर्म किंवा सत्यासाठी नसून अधिकारासाठी आहे आणि राज्यावर, अगदीच राजनीतिशास्त्राने पाहिले तर, कौरवांचा अधिकार आहे की पांडवांचा हे सुद्धा सांगता येणे अनिश्चित आहे. कारण हे ज्ञानवंता, हे तू सुद्धा जाणतोसच की जो ज्येष्ठ त्याला राज्याधिकार मिळायला हवा. "त्या अर्थाने पाहिले तर युधिष्ठिराचा जन्म आधी झाला. म्हणून त्याचा या राज्यावर अधिकार आहे. परंतु धर्म सूक्ष्म आहे. आधी संकल्प होतो, मग सिद्धी. संकल्प आणि सिद्धीत केवढेही अंतर असले तरी संकल्प आधी होणे ही खरी निर्णायक स्थिती असेही पूर्वाचार्य म्हणतात. जन्म केव्हा झाला अथवा गर्भधारणा केव्हा झाली यावर ज्येष्ठत्व माजेअयचे ठरविले तर या प्राप्त प्रश्नात गंभीर समस्या निर्माण होते. गांधारीची गर्भधारणा कुंतीअधी झाली होती हे तर सर्व जाणतात. म्हणजे संकल्प आधी झाला होता पण कौरवांचा जन्म पांडवांनंतर झाला. या दृष्टीने पाहायला गेले तर जन्म उशिरा होऊनही कौरव ज्येष्ठ ठरतात. " आणि नीतिशास्त्रातील दुसरी समस्या अशी, की केवळ ज्येष्ठ आणि कनिष्ठ या भेदावर अवलंबून राहून अधिकार फक्त ज्येष्ठांच्या हाती द्यावा हे कसे ठरवणार? भीष्म ज्येष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार मिळाला नाही हे तर खरे आहे ना? आणि बलराम ज्येष्ठ असतानाही द्वारकाधीश तू आहेस हे सुद्धा तेवढेच सत्य ना? माझ्या मते ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भेद या प्रसंगी लावता कामा नये. कोण योग्य आणि कोण अयोग्य एवढाच माझ्या मते खरा प्रश्न असला पाहिजे. "आता हा प्रश्न कोणामागे किती समर्थक आहे या न्यायाने सोडवायला गेल्यास, उभय पक्षांमागे समान बलाबल असल्याने निश्चित निर्णय अशक्य आहे. समजा एखाद्या पक्षामागे कमी बल असले म्हणून तो पक्ष अयोग्य आहे असेही काही केल्या म्हणता आले नसते. कारण संख्येच्या बलावर जर योग्यायोग्य निर्णय होऊ लागला तर खंडीभर अज्ञ लोक मूठभर सुज्ञ लोकांस सह पिराजित करू शकतील आणि मग योग्यायोग्यतेच्या व्याख्याच बदलून जातील. "म्हणजेच, कौरव योग्य आहेत की पांडव याचा निर्णय शास्त्रांच्या अर्थाने लागणे शक्य नाही. कोण नेमका योग्य आहे, हे काही केल्या आपल्याला ठरविता येणार नाही. "तेव्हा या दोन पक्षांमध्ये युद्ध होणे आणि या युद्धात कोणाचा तरी पराजय होणे अपरिहार्य आहे. बहुसंख्य प्रश्न ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या बलाने सुटत नसून बाहुबलानेच सुटू शकतात हेही कटू सत्य आहे आणि हे एवढे करूनही जो जिंकतो त्याचीच बाजू सत्याची होती असेही काही केल्या निश्चयाने म्हणता येत नाही, कारण आजवरच्या सर्वच जेत्यांची बाजू सत्याची होती असे काही म्हणता येत नाही आणि जे हरले ते पातकी होते असेही विधान करता येत नाही. हे परमात्म्या, तू स्वत:ही जरा संधाकरवी सव्वीस वेळा पराजित झाला असला तरीही तुला कोणी असत्य म्हटल्याचे माझ्या ऐकिवात नाही. "त्यामुळे कोणाचा विजय व्हावा असे तू जे मला विचारलेस हा खरेच अवघड प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर शास्त्रार्थाने देणेही अशक्य आहे हे उघडच आहे. मग येथे आता उरते "द्रोण' नामक व्यक्ती आणि तिच्या भावना. या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन आणि परिस्थितीने निर्माण केलेल्या वंचना. "शास्त्र कितीही ज्ञात असले तरी व्यती नेहमीच आपल्या अनुभवांनी आलेल्या समजुतींनुसार वर्तन करते आणि त्याचे शास्त्रार्थाने त्याचे समर्थन करीत असते. "तेव्हा सत्य काय आहे, यापेक्षा मला काय वाटते तेवढेच खरे तरमहत्त्वाचे आहे. माझ्यावर माझ्या परिस्थितीची काय बंधने आहेत, तीही महत्त्वाची आहेत. "मी उभय पक्षांचा गुरू आहे ही आता माझ्या दृष्टीने दुय्यम गोष्ट आहे. पांडवांनी माझा दृढ शत्रू जो द्रुपद, त्याच्या कन्येशी विवाह केला आणि माझ्या शत्रूशी सख्य केले याचे मला नेहमीच वाईट वाटत आले आहे. द्रुपदाने माझ्या नाशासाठी घोर यज्ञ केला आणि त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला हे घोर सत्य ज्ञात असूनही त्यांनी द्रौपदीशी जाणीवपूर्वक विवाह केला आणि धृष्टद्युम्नास आपल्या पक्षाकडे ओढून घेतले हेही सत्य आहे. धृष्टद्युम्न माझा शिष्य. मी, तो माझ्या वधाकपरता जन्मास आला आहे हे ज्ञात असतानाही, त्याला मी सर्व ज्ञान देऊन पुत्रसमान केले, तोही शिष्य आज पांडवांच्या बाजूने आहे, हे सुद्धा सत्य. ज्या पक्षाला माझ्या वधासाठी आतुर व्यती आहेत, त्यांच्या पक्षास काही झाले तरी माझ्यासारखा कठोर निश्चयी मनुष्य जाणार नाही हे अटळ सत्य आहे. "कारण मानवी विकारांनी भरलेल्या मानवी जगतात सत्य काय आहे, यापेक्षा काय सत्य वाटते हे महत्त्वाचे असते हे खरोखर दुर्दैव होय. " आणि मी आधी बराह्मण असल्याने स्वत: युद्ध न कपरता द्रुपदाची खोडी शिष्यांकरवी मोडली होती. आता मी मात्र स्वत:च क्षात्रधर्माचा अंगीकार करून द्रुपदाची आणि धृष्टद्युम्नाची खोडी जरिवायचे ठरविले आहे." एवढे प्रदीर्घ भाषण करून श्रांत झालेल्या द्रोणाचार्यांनी भूमीवर बसकण मारली आणि ते नेत्र मिटून आत्मचिंतनात मग्न होऊन गेले. श्रीकृष्णानेही द्रोणाचार्यांच्या बाजूस बसून त्यांचे प्रदीर्घ अवलोकन केले आणि म्हणाला, "हे ज्ञानश्रेष्ठा, हे महागुरू, तुमच्या भावना मला समजल्या." यावर द्रोणाचार्यांनी नेत्र उघडून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि म्लान हास्य करण्याचा यत्न केला. "हे ज्ञानवंता, तुमच्या प्रश्नांचे बरचसे उत्तर तुम्हीच दिले आहे. हे खरे आहे की धर्म सूक्ष्म आहे, असे सारेच म्हणतात. परंतु अधिक सूक्ष्मात गेलो आपण, तर धर्म नावाची कोणतीच गोष्ट या मानवी जगतात अस्तित्वात नाही हे तुमच्या लक्षात येईल. अंधार आणि प्रकाश यात आपण सा भेदि करतो तसा भेद अधर्म आणि धर्मात करता येत नाही आणि तीच मानवाची मोठी शोकांतिका आहे. "सनातन सत्य आणि धर्म अविचल आहे, परंतु मानवाचा धर्म मात्र परिवर्तनीय आहे. श्वेतकेतूच्या पूर्वी पुरुष आपल्या कन्यांशीही संबंध ठेवीत असत असे इतिहास सांगतो आणि त्याकाळी अशा संबंधास कोणी अधर्म मानीत नव्हते. फार काय, यमाच्या कालापूर्वी भगिनीगमन कोणी अधर्म मानीत नव्हते. परंतु भगिनीगमन यमाने निषिद्ध ठरविले. तेव्हा मानवी धर्म परिवर्तनीय आहे, हे निश्चितपणे दिसून येते. " आणि जेही काही परिवर्तनीय आहे ते नित्य असू शकत नाही. आणि जे काही अनित्य आहे त्याला धर्म म्हणता येणार नाही. "म्हणजेच मनुष्याच्या जगतात ज्याला शाश्वत अर्थाने धर्म म्हणतात, तसा धर्म नसतोच. खरे तर मनुष्यास धर्म जेव्हा क बोलतो तेव्हा तो संघर्ष करू शकणार नाही. कारण ज्यावर आपली सत्ता असूच शकत नाही, त्यावर सत्ता मिळवण्याचा यत्न करणे किंवा सत्ता आहे असे समजणे हे मूर्खपणाचे लक्षण नाही काय? "तेव्हा हे ब्रह्मर्षी, हे युद्ध हे सत्यार्थ नाही. युद्ध हे विकारार्थ आहे आणि मानवी विकारांना अंत नाही. मानवी आकाक्षांना अंत नाही. कितीही प्राप्ती झाली तरी अधिकाची प्राप्ती करण्यासाठी सारेच मानव आपले यत्न करीत असतात. "केवळ मी आजवर पांडवांची बाजू घेतली की नाही याला काही महत्त्व नाही कारण खरे तर मी बाजू घेतली म्हणून पांडवांची बाजू सत्याची ठरत नाही, तसेच मी आज कौरवांची बाजू घेतली आहे, म्हणून त्यांचीही बाजू सत्याची ठरत नाही. "खरे तर कोणाचीच बाजू सत्याची नाही आणि कोणाचीच बाजू असत्याची नाही. आणि असे असूनही तुम्ही आणि मी मानव असल्याने, मानवी विकारांचे सारेच बळी पडत आहोत हेही तेवढेच सत्य! परंतु माझ्या मनात मात्र कोणाचेही काहीही सत्य नाही. कारण हे सारे मानवी जीवन एक मोठा व्यामिश्र खेळ आहे, हे मला पटलेले आहे. पांडवांनी अधर्म वर्तन करूनही स्वत:ला धर्मज्ञ म्हणावे, त्यातील विरोधाभास अनुभवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर होतोच. त्याचप्रमाणे दुर्योधन अधर्मी आहे असे सारे जग म्हणते तेव्हा त्याचे अधर्मत्व आहे तरी काय हे कळावे यासाठी मी त्याच्याबरोबर आहे. "कारण धर्म म्हणजे नेमके काय यासंबंधी माझ्याच मनात आता संभरम निर्माण झाला आहे. "कारण हे ब्रह्मर्षी, धर्म मी निर्माण केला, असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा धर्म म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते हे मी सांगणे करमप्राप्त आहे. "धर्म खरे तर खूप साधा आणि सरळ आहे. त्याची तत्त्वेही तेवढीच साधी आणि सोपी आहेत. सत्याने वागा असे मी सांगितले, पण मानवी सत्य हे मानवी विकारांनी व्यापलेले सत्य असते. त्यामुळे साधे-सरळ सत्य दूर राहते. आणि मानवी सत्य हे केवढे विरोधाभासाने भरलेले आहे, हे तुम्हीच मला आताच स्पष्ट केलेत. तेव्हा धर्माची अन्य तत्त्वे स्पष्ट करण्यात तरी काय अर्थ आहे? "तेव्हा मला अभिप्रेत असलेला धर्म आणि आचरणात असलेला धर्म यात जर महदंतर असेल तर ज्या यच्चयावत सृष्टीसाठी मी धर्म निर्माण केला त्या धर्मात काहीष तर नाही ना असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे. "पण हे ब्रह्मर्षी, यच्चयावत विश्व मी निर्माण केलेल्या धर्माने चालते, दृश्य आणि अदृश्य अशी सृष्टीही माझ्या तत्त्वांनी चालते. प्रकाश आणि अंधार हे स्पष्ट वास्तव सारीच सृष्टी रोजच अनुभवते. कारण ते सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे वास्तव यच्चयावत सृष्टी रोजच अनुभवते. कारण दोन्हीही सत्य आहेत. "आहे आणि नाही' यातील फरकही सारीच सृष्टी नित्य अनुभव करते, कारण तेही शाश्वत सत्य आहे, आणि जे आहे ते "आहे' असे मानून चालणारी सृष्टी जे नाही ते "नाही' हेही गृहीत धरते. "पण मनुष्याची गोष्टच वेगळी. तो जे आहे ते "आहे' हे मान्य करूनही जे "नाही' ते "आहे' कसे बनवायचे यासाठी जीवापाड कर्म करीत असतो आणि नाही ते "आहे' बनवण्यासाठी अनंत यातना सहन करीत असतो. त्यासाठी शत्रू बनवीत असतो. त्यासाठी मित्र बनवीत असतो. "धर्म फार साधा आणि सरळ आहे; पण त्यासाठी तेवढेच सरळ मन हवे आणि मन ही केवढी व्यामिश्र गोष्ट बनली आहे. मनुष्यास, अन्य प्राण्यांस अप्राप्य जे मन, ते आहे आणि मनाने मनुष्य आकाशात भरार्‍या घेत असतो. प्राप्त स्थितीत असंतुष्ट राहणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच त्याचा शाश्वत अधर्म आहे. "कारण जेव्हा आकाशातील तारका प्रकाशतात तेव्हा कोणास सुख मिळते आणि कोणास यातना होतात याचा विचार तारका कधी करत नाहीत. मनुष्य मात्र प्रत्येक कर्म करीत असता स्वत:स सुख होते की इतरांस याचा विचार करीत असतो. ही धपरत्री जेव्हा अन्न प्रसवते तेव्हा ते अन्य सृष्ट भक्षण करणार आहे की दृष्ट याचा विचार करीत नाही. कारण तो सृष्टीचा शाश्वत धर्म आहे; पण मनुष्य मात्र आपल्या कर्माचे फल कोणास मिळणार आहे, याचा विचार करत असतो आणि केवळ विचारांनीही तो सुखी किंवा दु:खी होत असतो. "खरे तर मी निर्माण केलेला धर्म या मानवी परिप्रेक्ष्यात कसा लागू पडतो हे अनुभवण्यासाठी मी हा खेळ रचला आहे. "हे ब्रह्मर्षी, तू महाज्ञानी आहेस, परंतु मानवाचे ज्ञान हे शून्य कसे ठरते हे तुम्हीच मला दाखविले आहे आणि हा मलाच एक धडा आहे. "या होणार्‍या युद्धात कोण जिंकणार हा खरा प्रश्न नाहीच. खरा प्रश्न आहे, शाश्वत धर्म अस्तित्वात आहे की नाही, एवढाच! "त्यासाठी मी निरामय मनाने सर्वांशीलतो आहे. "श्रवतो आहे. "बस! हे ब्रह्मर्षी... अधिक काय सांगू?" कृष्णसखा पार्थ, अर्जुन, दीनवदनाने श्रीकृष्णासमोर उभा होता. अमावास्येच्या आदल्या दिवसाची रात्र असल्याने आकाशात तारकांनी गच्च दाटी केली होती आणि हवा संथ गतीने वाहात यच्चयावत सृष्टीस परमात्मस्पर्शाने आशीर्वाद देत होती. अर्जुन म्हणाला हे कृष्णा, माझे मन मोहाने ग्रस्त झाले आहे. उद्या सकाळी युद्ध सुरू होणार आहे आणि हे युद्ध माझ्याच आप्तांशी असल्याने मी हे युद्ध का करावे, माझ्याच भ्रात्यांच्या वधास कारणीभूत होऊन पातकांचा असह्य भार का घ्यावा हा प्रश्न मला व्यथित करतो आहे. आता तूही आमच्या बाजूस नाहीस त्यामुळे धर्मानेही आमची साथ सोडली आहे की काय असे मला तीव्रतेने वाटते आहे. हे मधुसूदना, युद्ध हे भीषण कर्म आहे आणि त्यामुळे असंख्य जीवांचा संहार होणार आहे. केवळ राज्यलाभासाठी जर माझ्याच आप्तेष्टांची हत्या झाली तर माझी कीर्ती कलंकित होईल, हे तर निश्चित. त्यामुळे शस्त्रसंन्यास घेऊन पुन्हा अरण्याची वाट चालावी असे मला वाटते आहे. युधिष्ठिराचेही असेच मत आहे. धृतराष्ट्रपुत्रांस खुशाल राज्यलक्ष्मीचा भोग घेऊ देत. आमचे त्याबद्दल आता काहीही म्हणणे नाही. तू हे माझे मत दुर्योधनापर्यंत पोहोचव आणि या युद्धास टाळ. तसे केल्याने आमचीही कीर्ती अक्षय राहील आणि आम्ही धर्माने वागलो असेच इतिहास सांगेल. क्षणिक लाभापेक्षा अजेय कीर्ती ही फार लाभाची ठरेल असे मला निश्चयाने वाटते. श्रीकृष्ण म्हणाला हे पार्था, धर्म सूक्ष्म आहे आणि मानवी व्यवहार हे एवढे गुंतागुंतीचे आहेत की, प्रसंगी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरविण्यात ज्ञानवंतही कमी पडत असतात. उद्या सुरू होणारे युद्ध हे तुम्हा आप्तेष्टांत आहे, असे जे काही तू समजतो आहेस ते केवळ मायेमुळे. हे पार्था, मानवी जीवनच मुळात मायेने व्यापलेले आहे. मायेमुळेच कोणी मित्र वाटतो तर कोणी शत्रू. कोणी प्रिय वाटतो तर कोणी अप्रिय. दुर्योधन-भीष्मादी व्यती तुला आप्त वाटतात कारण ही माया.आरे, मायेमुळे मानवात वास करणारा आत्मा झाकलेला असतो. ती माया मनुष्यास सत्य काय ते कदापि कळू देत नाही. मायेचे आवरण दूर कर. मायेचे आवरण योगाने दूर केलेस, तर तुझ्या लक्षात येईल की, तुझा येथे कोणीही आप्त नाही. तसाच तुझा कोणी शत्रूही नाही. त्यामुळे हे पार्था, तू का मोहग्रस्त होतो आहेस? शोक हा अनित्य आहे, म्हणूनच शोक त्याज्य आहे. आनंद शाश्वत आहे म्हणून आनंद प्रेय आहे. आणि हेही लक्षात घे पार्था, की जन्म आणि मृत्यू या घटनाही अनित्य आहेत. म्हणून जन्माबद्दल आनंद व्यक्त करणे आणि मृत्यूबद्दल शोक करणे, त्याज्य आहे. हा शाश्वत धर्म मी तुला सांगत आहे. आप्तांशी युद्ध करावे की नाही हा मोह तुझ्या मनात निर्माण झाला आहे; पण "आप्त' हे आप्त नाहीत हे तुला मायेचे आवरण दूर केल्याखेरी किळणार नाही. तेव्हा या भूतलावर तुझे युधिष्ठिर, द्रौपदीसह कोणी आप्त नाहीत हे शाश्वत सत्य तू ध्यानी घे. कारण हे धनंजया, प्रिय वाटणे हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव बनतो तेव्हा त्याला काही अप्रियही वाटणार हे निश्चित आहे आणि प्रिय आणि अप्रियतेमधील सीमारेषा मानवी भावनांनी घातलेल्या असतात. भावनांचा त्याग केलास तर कोणी प्रिय वाटणार नाही की कोणी अप्रिय. आणि साधू हा भावनाहीन असला पाहिजे. आणि ज्याला भावना नाहीत त्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसते. त्याचे मन निर्विकार आणि अलिप्त असते. अशा व्यतीस कोणतेही कर्म षिद्ध नसते की निषिद्ध. तेव्हा हे शत्रुतापना, तुला हा जो शोक होत आहे, त्याचे मला काही एक कारण दिसत नाही. कारण हे पार्था, तू या युद्धाच्या दिशेने स्वत:हून चालत आला आहेस आणि हे तुझे वर्तन अंती युद्धातच परिणत होणे हे अधिक इष्ट असे मला वाटते. हे धनंजया, जर कौरव तुझे आप्त आहेत तर तेवढेच पांडवही तुझे आप्त आहेत. एवढेच नव्हे तर पांडवांवर श्रद्धा ठेवून या संगरात तुझ्या बाजूने जे कोणी उतरले आहेत तेही तुझे आप्तच आहेत. आता हे युद्ध करावयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ टळून चुकली आहे. मनुष्य आपल्याच कर्मांनी आपले भवितव्य नित्य घडवीत असतो. परन्तु जे काही घडते ती आपली नियती असते या विरोधाभासाने मानवी मन व्याप्त असल्याने, हे पार्था, मनुष्य आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवीत नाही. उद्या घडणारे युद्ध हे एकाकी घडते आहे असे नसून त्याची बीजे सर्वांनीच इतिहासात पेरून ठेवली आहेत आणि त्यास खतपाणी घातलेले आहे. तेव्हा आता एकाएकी त्या कर्माचे फल म्हणून हे, जे युद्ध ते, तुला अव्हेरता येणार नाही. कारण ते आता तुझ्या एकटयाच्या हातीही नाही. फार तर तू एकटा संन्यस्त होऊ शकशील. परंतु मग तुला जे वाटते की तुझी कीर्ती अक्शक्य होईल ते काही खरे नाही. बाबारे, एक भित्रा मनुष्य अशीच तुझी त्रैलोयात कीर्ती होईल. सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मानवी धर्म यात भेद आहे तो यामुळेच. कारण अमुक एक कर्म करावे की नाही याचे सर्वदा मनुष्यास स्वातंत्र्य असते असे नाही. मनुष्य जन्मास येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो. आणि ज्या परिस्थितीत त्याची वृद्धी होते, त्या परिस्थितीचे पारतंत्र्य आपसूक त्याच्या गळ्यात पडत असते. मी तुला सांगितलेच आहे हे सव्यसाची, की या जगात काही प्रिय नसतानाही मनुष्यास काही गोष्टी प्रिय वाटतात. कारण त्याची परिस्थिती. तसेच या जगात काही एक अप्रिय नसताही त्या गोष्टी अप्रिय वाटतात कारण मनुष्याची परिस्थिती. मनुष्य खर्‍या अर्थाने परिस्थितीचे अपत्य असतो. परिस्थिती मनुष्यास घडविते, यश देते किंवा अपयश देते. परंतु हे प्रिय कुंतिपुत्रा, परिस्थितीच मुळात अनित्य असल्याने मनुष्याचे यश आणि अपयशही तेवढेच अनित्य असणार हे उघड आहे. तेव्हा उद्या जी परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीचा तू दास आहेस आणि हे माया-मोहाने भरलेले संभाषण विसरून तुला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करावा लागणार आहे. परंतु उद्याची परिस्थिती ही अनित्य आहे कारण परवाची परिस्थिती कशी असेल ते उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा अनित्य स्थितीत विजय लाभतो की पराजय, मृत्यू लाभतो की जीवन हे सुद्धा ठरवणे तेवढेच अनित्य आहे. म्हणून हे कौंतेया, असा शोकमग्न होऊ नकोस.' अर्जुन म्हणाला हे नारायणा, मी मनुष्य आहे आणि मी विकारांनी ग्रस्त आहे हे तर सत्य आहे परंतु तू आताच म्हणालास की सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मनुष्याचा धर्म यात भेद आहे. मला हे सांग की असे का? धर्म हा एकच असला पाहिजे आणि तो सर्वांना सारखाच लागू पडला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा हे उदारहृदया, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. कृष्ण म्हणाला हे पार्था, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात खचितच मला आनंद वाटेल. कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो. धर्म ही मूलत: मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा स्पर्श मानवी धर्मास होणे सहशिय आहे. पण मनुष्य हाही सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो. मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य बराह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असे समजून मानवी धर्माचे विभानि करीत धर्माचा संकोच करीत असतो. शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वत: मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शिवाय धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूपलू शकते. आणि जे बलहीन आहेत त्यांच्यावर धर्म लादला जातो तर जे शक्तिशाली आहेत तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात हा इतिहास आहे. याचाच अर्थ असा की, मानवी धर्म अनिश्चित असून तो अक्शक्य नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल? म्हणजेच, मानवी धर्म शाश्वत नाही आणि जे शाश्वत नाही त्याप्रमाणेच आचरण करण्याचा आगरह कोणी का धरावाबरे? आता हे पार्था, मी तुला चिरंतन धर्माची गुह्ये सांगतो. हा धर्म सृष्टीच्या उत्पत्तीकाली ब्रह्मदेवाने केला आणि त्याच धर्माने सारे चराचर चालत असून ज्या योगे आकाशीच्या तारका भूमंडळावर कोसळत नाहीत किंवा तेजोमय सूर्य पृथ्वीच्या निकट येऊन पृथ्वीस दग्ध करीत नाही किंवा ज्या योगे अरण्यातील समस्त हिंस्र प्राणिजगत एकत्र येऊन मानवांवर सामूहिक हल्ले करीत नाहीत, तो धर्म मी तुला सांगतो. पार्था, लक्षपूर्वक ऐक. सर्व सृष्टी ही अवकाशात उत्पन्न होते आणि अवकाशातच लय पावते. अवकाश हेच सृष्टीचे निर्मितीकारण आहे आणि अवकाश हेच सृष्टीचे संहाराचे कारण आहे. याच परम अवकाशास आपण ब्रह्मदेव म्हणतो आणि सर्व चराचरात ब्रह्माचे आस्तित्व आहे, असे म्हणतो. आणि हे तत्त्व फार गूढ आहे, जे तत्त्व यापूर्वी कोणी एजेकलेले नाही, ते तत्त्व मी तुला सांगत आहे. अवकाशरूपी ब्रह्म हेच सृष्टीचे राजकारण आहे आणि यातूनच दिव्य अद्भुत गोष्टींची निर्मिती झाली आहे, हे निश्चयाने सत्य आहे. या निर्मितीसाठीच सर्व राजतत्त्वांबरोबरच धर्माचीही निर्मिती झाली. हा धर्म हाच विश्वाचा नियमनकर्ता प्राण आहे. त्याच योगे सर्व सृष्टीचे व्यवहार नित्य होत असतात. ज्याप्रमाणे राज सूर्य ज्या समयी उगवतो त्याच समयी तो नित्य उगवत असतो. ऋतुचकर आपल्याला कळूही न देता अब्जावधी वर्षे अव्याहत चालू राहते. जो प्राणी आज जन्माला आला तो युवा होऊन वृद्ध होताना आणि एक दिवस मृत्युमुखात जाऊन स्थिर होताना आपल्याला दिसतो. हे धनंजया, सृष्टीच्या या नियमात कधीही बाधा येत नाही, हे शाश्वत सत्य आहे. दक्षिणायनाचे उत्तरायणात परिवर्तन होणे, हे आपण निश्चयाने सांगू शकतो. त्याचयोगे आपण आपलेही जीवन या अव्याहत ऋतुचकराशी जुळवून घेत असतो. हे पार्था, ऋतुचकर शाश्वत आहे. नभोमंडपी नक्षत्रांनी आपले स्थान कधीलायचे हे सुद्धा शाश्वत आहे, परंतु मनुष्य कधी आणि कसे वागेल याचे भाकीत कोणीही ज्ञानी मनुष्य करू शकत नाही, हे तेवढेच सत्य नाही काय? पार्था, धर्माचे ऊनि एक गुह्य तुला मी सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. सृष्टी जड, अर्धचेतन आणि चैतन्य या तीन तत्त्वांत वाटली गेली आहे. जड सृष्टी ही अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे, याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. अर्धचेतन सृष्टी म्हणजे सकल चराचरात वास करणारी जीवसृष्टी. यात डोळ्यांनीही दिसणार नाहीत अशा अंतूंपासूनि ते समुद्रतलात विहार करणारे, हजार माणसांचे वनि जेवढे भरेल, एवढे अवाढव्य जीव वास करत असतात आणि मी असे ऐकतो की त्यातील अनेक जीव मनुष्याच्या निर्मितीपेक्षाही प्राचीन आहेत आणि त्यांचे सामर्थ्य एवढे आहे की, ते कोणत्याही धैर्यशाली पुरुषासही भयभीत करू शकतील. परंतु हे पार्था, ही जीवसृष्टी एवढी पुरातन आणि समर्थ असताही, या सृष्टीने कधी या भूमीच्या एका कणावरही अधिकार सांगितल्याचा इतिहास नाही. ही सृष्टी जन्मास येते, नियत कर्मे करत असते आणि एक दिवस मृत्यूही पावत असते. जन्म आणि मरणाबाबत या सृष्टीने कधी हर्ष किंवा खेद व्यत करत असताना मी पाहिलेले नाही किंवा क्षणिक हर्ष-खेदासच जीवनाचा आधार मानत भविष्यामध्ये कसे वर्तन करावयाचे याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, असे माझ्या पाहण्यात नाही. कारण हे पार्था, चिरंतन धर्माचे पालन करण्यात मानवेतर जीवसृष्टीच श्रेष्ठ आहे आणि चैतन्याचेच म्हणशील तर, चैतन्य कोणत्याही दुर्तत्त्वाहून अबाधित आहे. अग्नी हे चैतन्य आहे आणि अग्नी हा शुद्ध असतो हे सारे ज्ञानीनि जाणतात. प्रकाशही चैतन्य आहे आणि तो निर्विकार आणि सनातन असून सार्‍या जीवसृष्टीचे कारण असूनही कधी अहंग्रस्त झाल्याचे ऐकिवात नाही. नियमानेया धरेवर र्पन्यि वर्षत असतो आणि त्यायोगे ही पृथ्वी सुफलाम होत असतानाही र्पन्याने किधी अहंभाव बाळगून "मी अमुक जीकाणी वर्षेन, अमुक जीकाणी नाही' असे ठरवल्याचे एजेकवातनाही. हे धनंजया, चैतन्य हेच मूळ ब्रह्मस्वरूप आहे. या चैतन्याने अर्धचेतन आणि जड सृष्टीची निर्मिती केली आहे. असे असूनही सर्व जीवमात्र, जड आणि अदृष्ट सृष्टीस चैतन्य सारख्या प्रमाणात आप-पर भाव न ठेवताही आपला भाग देत असते. आणि हे पार्था, हाच शाश्वत-सनातन आणि चिरंतन धर्म आहे. परंतु मानवी धर्माचे काही वेगळेच आहे. मानवी धर्म स्थिर नाही. मानव स्थिर नाही. सृष्टीविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य कष्ट घेतो हे खरे, परंतु हे ज्ञान तो स्वत:च्या स्वार्थासाठी आणि अभ्युदयासाठी वापरीत असतो आणि एवढे करूनही त्याचा स्वार्थही शाश्वत नाही. मानवाचा स्वार्थ शाश्वत नाही, म्हणून त्याचा परमार्थही शाश्वत नाही. म्हणूनच मानवाचे जग हे अनित्य आहे आणि त्याचा धर्मही अनित्य आहे. तेव्हा मनुष्य आपल्या स्वनिर्मित धर्माने वागणार हे जर सत्य आहे, तर त्याला शाश्वत धर्माचा तरी काय उपाय? शाश्वत धर्माने पाहू जाता हे पार्था, तुझे कोणी आप्त नाहीत. कोणी इष्ट नाहीत. तू तुझाच आहेस आणि तू जर तुझाच असशील तर मायेचे आवरण नष्ट करून तथागत दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहावयास हवे. मग भूमीसाठी युद्ध का करायचे हा प्रश्न तुला पडणे स्वाभाविक आहे. कारण पार्था, भूमी ही मनुष्याच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, कारण ती फक्त मानवासाठी निर्माण झालेलीनाही. दुसरे असे की, हे शत्रुतापना, इतर वाईट आहेत हे समजून त्या वाइटाचे निराकरण करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, असे जे समजतात. तेही अज्ञानी होत. तुझा संघर्ष कौरवांशी आहे. ते तुझे आप्त आहेत असेच तू म्हणतो आहेस आणि आप्तांशी संघर्ष नको अशी उपरतीही तुला झाली आहे. परंतु त्यामुळे तुला जो संदेह झाला आहे, त्याचे काही निराकरण होत नाही. कारण तू संन्यास घेण्याच्या गप्पा मारीत असताना दुर्योधनाचा दावा बरोबर आहे, असेही काही केल्या म्हणत नाहीस. आणि जर तुझ्या मते दुर्योधनाचा दावा बरोबर नाही, असे असेल तर तो दावा खोटा करण्यासाठी तरी तुला युद्ध करावे लागेल, नाही तर दुर्योधनाचा दावा खरा आहे, असे मान्य करून तरी तुला युद्ध टाळावे लागेल. आता, युद्ध करायचे की नाही, याचा निर्णय तुला घ्यावाच लागेल. या युद्धात जय मिळेल की पराजय, आप्तांची हत्या होईलकी तुझी, याचा विचार करण्यात काही एक अर्थ नाही, असे मला निश्चयाने वाटते. तेव्हा शोक सोड आणि युद्धास दृढनिश्चयाने तयार हो, असेच माझे तुला सांगणे आहे. अर्जुन म्हणाला हे नारायणा, तू मला शाश्वत धर्म आणि मानवी धर्मातील फरक सांगितलास. हे खरे की, मानवी धर्म हा शाश्वत नाही. परंतु मीही मनुष्यच आहे आणि मनुष्य असल्याने मला मनुष्यांचा धर्म लागू पडतो, हे तर सत्य आहे. मी मनुष्य असल्याने मला विकार आहेत. ते असल्यानेच कौरव हेही माझे आप्तच आहेत, भीष्म माझे पितामह आहेत आणि द्रोणाचार्य माझे गुरू आहेत, हे मी कसे विसरू? हे परमात्मना, स्मृती मनुष्यास असतात आणि त्या अन्य जीवसृष्टीपेक्षा तीव्रतर असतात हे तर तुला ज्ञात आहे. आणि स्मृतीया मनुष्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांचे संगरह करतात आणि मनुष्याचे कोणाही व्यतीशी असणारे वर्तन हे त्याच्या त्या-त्या व्यतिसंदर्भात साचलेल्या स्मृतींशी संबंधित असेल हेही तर सत्यआहे. परंतु हे कृष्णा, अन्य सजीव वा अजीव सृष्टीस स्मृती आहेत की नाहीत हा प्रश्नच आहे. परंतु ज्याअर्थी अन्य पशू सूड घेण्यास तत्पर झाल्याचे पाहण्यात नाही, त्याअर्थी पशूंस स्मृती नसाव्यात किंवा असल्या तरी अत्यल्प असाव्यात, असे मला वाटते. परंतु हे करुणाकरा, मनुष्याच्या स्मृती तीव्रतर असून अगदी बालपणीही घडलेल्या घटना त्याच्या लक्षात राहातात आणि त्या स्मृतींवर आधापरत त्याचे भविष्यातील वर्तन होत असते. मनुष्यास स्मृतीच नसत्या तर आम्हीही येथे युद्धासाठी का मिलो असतो? आणि त्यामुळेच मनुष्यधर्म हा वेगळा असणार आहे, हे निश्चितच आहे. प्रत्येक घटनाच्या स्मृती मानवावर संस्कार करीत जाणार असल्याने मानवी व्यवहार अनित्य राहणार आहे हे तेवढेचखरे. परंतु हे श्रीकृष्णा, मनुष्यास उपरती होऊन त्याने कधी ज्ञानवंतांनीसांगितलेल्या मार्गाकडे पाहून मोक्षासाठी प्रयत्न करू नये असे थोडेच आहे? युद्ध हे नि:संशय भीषण कर्म होय आणि हे कर्म करण्यापेक्षा ते न केलेले बरे असे मला वाटते, तेव्हा तू मला योग्य ते दिग्दर्शनकर. श्रीकृष्ण म्हणाला हे पार्था, मी तुला कर्मविषयक सिद्धांत विस्ताराने विषद करतो. तो तू लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुझा मोह दूर होईल. मनुष्यच काय परंतु ही चराचर सृष्टी प्रतिक्षणी कर्म करीत असते. कर्म केल्यावाचून सजीव काय, अजीव सृष्टीही पळभर राहात नाही. मनुष्यास नकळतही मनुष्य अनेक कर्मे करीत असतो किंवा काही कर्मे करावीत की न करावीत याचे स्वातंत्र्यही मनुष्यास नसते. परंतु ही निसर्गाची शाश्वत कर्मे आहेत आणि या कर्माची कोणतीहीहा मनुष्यास होत नाही. परंतु संकल्प करून त्यानुसार जी कर्मे मनुष्य करीत असतो, त्या कर्मांची इष्टानिष्टता कशी आहे, यापेक्षा त्या कर्माचा संकल्प इष्ट आहे की अनिष्ट यावर कर्माचे इष्टानिष्टत्व ठरत असते. कर्माची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आहे. प्राणिमात्र अन्नपासून होतात. अन्न र्पन्यापासूनि उद्भवते तर र्पन्यि यज्ञापासून होते आणि सारी सृष्टी म्हणजेच यज्ञ होय असेही तू समजावून घे. कर्म अनंत आहे आणि अक्षय आहे. कर्माखेरी जिगाचे रहाटगाडगे पळभरही चालणार नाही, हे तू समजून अस. परंतु संकल्पाने केलेले कर्म हे शुभ आहे की अशुभ, ते सर्वांच्या हितार्थ आहे की त्यातून सर्वांचेच अहित होणार आहे, असे कोणतेही संकल्पधारी कर्म सर्वथा त्याज्य होय. कारण हे शत्रुतापना, असे पाहा की, माझे म्हणून या त्रिभुवनात काही एक कर्तव्य उरलेले नाही. नियत कर्मे करीत असूनही मी नैष्कर्म्य वरत धारण केले आहे, कारण माझ्या मनात या कोणत्याही कर्माचा संकल्प नाही. संकल्प नसता केलेल्या कोणत्याही कर्माचे पातक मनुष्यास जाकटत नाही, असे "कर्म' असूनही कर्म नसते हे समजून अस. कारण मी संकल्पित कर्म करू लागलो तर मीच उत्पन्न केलेले लोक नष्ट करणारा होईन आणि मग सृष्टीचा घात होईल. संकल्पाने जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा तो संकल्प करणारा कर्माचा कर्ता होतो. त्यामुळे कर्त्यास कर्माचा शुभाशुभ दोष लागतो. एवढे नव्हे तर ज्यांच्यावर कर्त्याच्या कर्मांचा परिणाम होतो, त्यांचीही फळे कर्मकर्त्यास जाकटत असतात. प्रत्येक कर्मास कर्मफळ अटळपणे जाकटलेले असते आणि त्याचा भोग प्रत्येक मनुष्यास घ्यावा लागतो. आणि असे पाहा की, ज्ञानी मनुष्यही आपल्या प्रकृतिस्वभावाने वागत असतो. त्यामुळे इंद्रियनिगरह करून कर्म केले असता कर्मफल जाकटत नाही, असे जे मानतात ते मूढ होत. आणि हे कौंतेया, मनुष्य सृष्ट किंवा दृष्ट असे जे काही कर्म करतो ते कामामुळे. काम हा मनुष्याचा मोठाच शत्रू होय. परंतु त्याने मनुष्याच्या आत्म्यास आच्छादिले आहे. त्यामुळे मनुष्यास सत्य आणि शाश्वत ज्ञानाचे कधीही दर्शन होत नाही. त्यामुळे युद्ध हे भीषण कर्म होय, हे जे तू म्हणतो आहेस ते यथार्थच आहे. कारण या कर्मामागे संकल्प आहे आणि एकाच्या संकल्पसिद्धीसाठी अन्य जीवांस अपाय व्हावा असे कर्म शाश्वत धर्माने त्याज्य असायला हवे. परंतु हे पार्था, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझा जो नियत धर्म आहे, त्याचे काय याचाही तू विचार केला पाहिजेस. कारण असे पाहा की, स्वधर्माने वागत असता मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर होय, असे पूर्वज्ञानवंतांनी म्हणून ठेवले आहे. स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार केल्यानेही तुझा नाश होईल, असे मला वाटते. अर्जुन म्हणाला हे ज्ञानवंता, तू असा कोड्यातल बोऊन मला संभरमित का करतो आहेस? एकीकडे युद्ध हे त्याज्य आहे, असे तू म्हणतो आहेस आणि तूच मला माझ्या धर्माने वाग असेही सांगतो आहेस, असे का याचा उलगडा तू कर. श्रीकृष्ण म्हणाला जे काही आपोआप प्राप्त होते, त्याचा संतुष्ट मनाने स्वीकार करणारा मनुष्य हा त्रैलोयातही श्रेष्ठ असतो, परंतु जे प्राप्त होत नाही ते प्राप्त करण्याचा संकल्प करून जो कोणी कर्म करीत असतो तो नि:संशय अधम कोटीत जातो. युधिष्ठिरास राज्यश्री प्राप्त व्हावी या संकल्पाने तू युद्धायमान झाला आहेस आणि म्हणूनच हे युद्ध त्याज्य आहे, असे मला म्हणावेसे वाटते. परंतु ज्या संकल्पाने तू युद्धरत झाला आहेस, त्याच संकल्पाने प्रतिपक्षही युद्धास सज्जा असल्याने शाश्वत धर्म काय आहे आणि आपण आप्तांशी युद्ध का करावे हा तुझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न निरर्थक आहे. आणि तुझा संकल्प प्राचीन असल्याने आणि काळाचे रहाटगाडगे उलटे फिरविता येत नसल्याने तुला तुझ्याच संकल्पापासून हटता येणे शक्य नाही आणि म्हणूनच आता संकल्प कसाही असो, त्या संकल्पार्थ एवढी सिद्धता केल्यानंतर तुला हा कर्मयज्ञ करणे करमप्राप्त आहे. कारण हे शत्रुंया, जिन्माने तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियास योग्य असेच संस्कार तुझ्यावर झाले आहेत. युद्ध करणे हा क्षत्रियाचा विहित धर्म आहे आणि त्या धर्माने युद्ध हे कर्म तुला प्रेय असणे स्वाभाविक आहे. तू युद्ध कर असे जे मी म्हणालो ते तुझ्या धर्मावर आणि संकल्पावर दृष्टी ठेवून. तू या युद्धातून दूर झालास तरीही हे युद्ध होणारच नाही, असेही आता नाही. कारण हे युद्ध फक्त तुझ्या व्यतिगत संकल्पनासाठी होते आहे, असे म्हणणे अर्धसत्य आहे. द्रुपद, धृष्टद्युम्न, भीम, द्रौपदीसह अनेकांचे या युद्धासाठी संकल्प सिद्ध आहेत, कारण त्यांचे व्यतिगत संकल्पही हे युद्ध होण्यासाठी बाबिदार आहेत. तेव्हा हे युद्ध केवळ तुझ्यासाठी होत आहे, असे अहंभावी विधान तू करू नयेस हे उत्तम. त्यामुळे या यज्ञाचा संकल्प झालाच आहे. यज्ञासाठी समिधाही आयत्या तयार आहेत आणि होताही मंत्रध्वनी करीत आहे, असे असता हा यज्ञ होणे हेच श्रेयस्कर. बरे, हे युद्ध केल्याने तुला स्वर्गप्राप्ती होणार की नाही किंवा युद्ध न केल्याने स्वर्गप्राप्ती होईल की नाही याचे तरी ज्ञान तुला कोठे आहे? तुला समजलेला भूतकाळ तेवढा तुला ज्ञात आहे, वर्तमान अत्यंत अस्थिर असून प्रचंड गतीने तो भूतकाळाच्या महापात्रात विलीन होत आहे आणि भविष्य गडद अंधाराने व्याप्त आहे. आणि हे पाहा, संकल्प कसाही असो, तो नेटाने सिद्धीस नेणारा मनुष्य हा संभरमित मनुष्यापेक्षा कधीही श्रेष्ठ होय. तेव्हा हे पार्था, हा संभरम सोड आणि नेटाने संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नकर. अर्जुन म्हणाला तू जे म्हणालास ते ठीकच आहे, परंतु हे श्रीकृष्णा, माझ्या मनाचे समाधान काही केल्या अद्याप होत नाही. युद्ध म्हटले की हत्या अटळ आहे आणि ज्याची हत्या होते तो मृत्यूनंतर कोठे जातो, कसा वागतो, कसा राहतो हे जाणण्याची इच्छा मला झाली आहे. कारण तू सारे जाणतोस. श्रीकृष्ण म्हणाला पार्था, हासुद्धा तुझा नियत मोह आहे. हे शुभंकरा, जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकास अटळ आहे. जो जन्माला आला, त्याला मृत्यू येणारच हे तुला माहीतच आहे आणि असे पाहा की, प्रत्येक जीव सतत मृत्यूस सोबत वागवीत चालत असतो, असे सारे म्हणतात. जो जन्मताना दिसतो, तो जन्मताच मेलेला असतो. फक्त कालरूपी मायेमुळे मनुष्यास जीवन आणि मृत्यू यामध्ये अंतर दिसते आणि केवळ या मधल्या काळातील यश आणि अपयशासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. ज्यांना ही काळाची माया कळली आहे, त्यांच्या दृष्टीने मुळात कोणतीही घटना घडत नाही. कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात असते आणि स्वत: काळ हा मायारूपी आहे. म्हणूनच जे म्हणतात की, सृष्टीची उत्पत्ती झाली, ते मूढ होत किंवा या सृष्टीचा लय होणार आहे असे जे मानतात तेही अज्ञ होत. अवकाश जसे निर्गुण आणि निराकार असते, जे या सृष्टीला जन्म देते असे वरकरणी दिसते तशीच सृष्टी ही खरे तर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु ती असल्याचा भास होतो तो काळामुळे आणि हे लक्षात घे की, खरे तर काळ मागे गेल्यासारखा फक्त भासत असतो. परंतु जर काळनामक तत्त्व आहे, तर ते येते कोठून आणि जाते कोठे, कशात लय पावते हे कोण सांगणार? आणि जर काळच मुळात भरामक आहे, तर ज्या काळामुळे सृष्टीचा किंवा मनुष्याचा जन्म झाल्यासारखे वाटते तो जन्मही खरा नव्हे किंवा मृत्यूही खरा नव्हे. त्यामुळे खर्‍या अर्थाने पाहाशील तर जन्मातच मृत्यू आहे आणि मृत्यूतच जन्म आहे. जीवन हे एका स्थिर, अविचल कालजेयी बिंदूप्रमाणे आहे. ज्याला भरमांतील भरामक जीवन जगायचे आहे, त्याला त्याच जगण्याच्या नियमांनी वागणे इष्ट होय, हे मी तुला सांगतो. परंतु ज्याला हा भरम नष्ट करण्याची विजजगीषा आहे, जो कमबद्रियांचे व्यापार आवरू शकतो, त्याला जन्म नसतो की मृत्यू. त्याला सुख नसते की दु:ख, त्याला भावना नसतात की विचार. तोच कालातीत होतो आणि अवकाशात विलीन होतो. हे पार्था, तुला जे वाटते आहे की, तुझ्याकडून हत्या होणार आहेत, त्या कोणाच्या? येथे मारण्यासाठीच कोणी नाही तर मरणारा कोण असेल? आणि ज्यांना मारशील असे तुला वाटते ते पूर्वीच मेलेले आहेत. आणि त्यात तुझाही समावेश आहे. जे आज घडते आहे, ते पूर्वीही अनंत वेळी घडले आहे आणि पुढेही घडत राहणार आहे. प्रत्येक वेळी हेच संभरम, हेच शोक, याच आकांक्षा आणि त्याच त्या सुखाची कल्पना असते. पार्था हे कधी विस्मरू नकोस. त्यामुळे या लोकानंतर अन्य कोणता लोक मिळेल आणि तेथे सुखे मिळतील की यातना, याचा विचार पार्था, फक्त अज्ञ लोक करीत असतात. हे पार्था, येथे तुला मी समोर दिसतो आहे आणि कृष्ण नामक ही व्यती आहे, असे तू म्हणतोस. त्याचप्रमाणे येथे भीष्माचे, कर्णाचे, दुर्योधनाचे आणि अन्यांचे वास्तव्य आहे. या सर्वांपेक्षा तू स्वत:स वेगळा समजतोस. परंतु हे धनंजया, खरे पाहता सारे एकाकार आहेत. एकाच अस्रि भरमांची रूपे आहेत. मी आणि तू एकच आहोत. खरे तर कोणी शत्रू नाही की कोणी मित्र. मग एकास पुण्य मिळेल आणि दुसर्‍यास पाप असे कोणतेही कर्म अस्तित्वात नाही. एकास मोक्ष मिळेल, तर दुसर्‍यास नरक असेही काही नाही. परंतु मनुष्य आपल्या प्रत्येक कर्मास समर्थन देण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आश्रय धरीत असतो आणि हेच त्याच्या अध:पतनाचे खरे कारण आहे. कारण जर मनुष्य हाच एक भरम आहे, तर त्या भरमाला आधार देणारे तत्त्वज्ञानही एक भरमच नाही काय? परंतु मनुष्य नुसत्या भरमात नसतो, तर संभरमातही असतो. तो भरममय असल्याने तो स्वत:विषयीही भरम निर्माण करीत कर्तव्य आणि अकर्तव्याच्या द्वंद्वात सापडलेला असतो. अमुक एक कर्तव्य केल्याने मला सुख मिळेल की ते कर्तव्य न करण्याने सुख मिळेल असे द्वंद्व त्याला सामोरे येत असते आणि कोणीही महापुरुष असला आणि त्याने कोणतेही कर्तव्य इष्ट समजून जाणतेपणे पार पाडिले तरीही त्याला दोष देणारे ऊनिच भरमित लोक या पृथ्वीतलावर नसतीलच असे नाही. तेव्हा जे ज्ञानी आहेत त्यांनी कर्म केले काय आणि न केले काय, अज्ञ लोकांनीही कर्म केले काय आणि न केले काय,कोणाचेही शाश्वत कल्याण किंवा शाश्वत अकल्याण होऊ शकत नाही. तेव्हा कर्मसंबंधाने अभिमान बाळगणे सर्वथा गैर होय. तेव्हा हे युद्धरूपी कर्म त्वां केल्याने जे मृत्यू पावणार आहेत, त्यांचे काय होईल किंवा तुझे काय होईल ह्या विचारांमध्ये काहीएक अर्थ नाही. कारण जो स्वत:च मृत आहे, अशास कोण कायमारणार? अर्जुन म्हणाला हे गोपाळा, तू तर मला हे अतिभयंकर तत्त्वज्ञान सांगितलेस. तू म्हणतोस त्याप्रमाणे जर सत्य असेल, तर जे मला दिसते, अनुभवास येते आणि ज्या ज्ञानाने अनुभवांचे विश्लेषणही करता येते ते सारेच असत्य होऊन जाईल. मग जर काही सारेच भरम आहेत, तर हे सारे का आणि कशासाठीहोते? मी जन्माला आलो, हा मी तुझ्यासमोर असल्याने सत्य अनुभव आहे, तद्वतच आम्हा पांडवांना राज्याधिकारापासून वंजात करण्यासाठी धार्तराष्ट्रांनी ज्या ज्या लृप्त्या लढवल्यात याचाही अनुभव असल्याने तेही सत्य आहे. आता यद्वत तू माझ्यासमोर आहेस, आकाशात अनंत तारकामंडळ तेजाने प्रेपरत आहे, तद्वत हे सारे अनुभव घेणारा मी सुद्धा तुझ्यासमोर असल्याने हे सारे सत्य असलेचपाहिजे. आणि जे सनातन सत्य, तूही एक मानव सांगतो आहेस, तर तुझ्या सत्यातही काहीतरी खोट असली पाहिजे. शिवाय तू म्हणतोस तसेच खरे मानले तर मग या सृष्टीचा नियंता म्हणजे तूच तो अत्यंत करूर आणि जीवघेणे खेळ करणारा आहेस, असेच मला म्हणावे लागेल. तेव्हा हे मधुसूदना, खरे सत्य तेवढेच मला सांग. असे खेळ माझ्याशी करून मला अधिकच दिशाहीन करू नकोस. श्रीकृष्ण म्हणाला हे कौंतेया, सत्य मानवास नेहमीच भयभीत करते. म्हणूनच जे सत्य प्रिय वाटते तेच तो स्वीकारतो आणि आनंदात लीन होतो. सूर्य जोवर लोभस दिसतो तोवर त्याकिडे दुरून पाहण्यास महात्म्यांनाही आनंद होतो. परंतु जेव्हा सूर्याचे लोभस तेज हे भरम असून खरा सूर्य पाहताच येत नाही हे लक्षात येते तेव्हा मात्र मनुष्याचा भरमनिरास होतो आणि सूर्याचेही भय वाटू लागते. प्रत्येक मनुष्यमात्रास वाटते की, या सृष्टीचा रचनाकर्ता दयाळू आहे आणि त्याची मनोभावे अर्चना केली की आपल्याला सुख मिळेल. परमात्मा दयाळू नाही, हे सत्य मनुष्याच्या कधीही लक्षात येत नाही. यापेक्षा मनुष्याचे अधिक दुर्दैव ते काय असणार? हे परंतपा, लक्षपूर्वक ऐक, मी दयाळू नाही की निर्दय नाही. मी कोणावर कृपा करीत नाही, की अवकृपा करीत नाही. जो मला भतो त्याला मी निकटतम मानेन आणि जो भणारि नाही त्याला अन्य लोक मिळेल असेही काही नाही. कारण जर भरममय का होईना सारे लोक माझ्यातच वास करीत असतात तर कोणाहीबद्दल आपरि भाव मी कसा ठेवीन? हे पार्था, मला तूही प्रिय नाहीस, की दुर्योधनही प्रिय नाही. मला हे विश्व प्रियही नाही की अप्रियही नाही. या विश्वात काहीही त्याज्यही नाही की प्रेयही नाही. खरे तर मी याही बाजूस नाही की त्याही बाजूस नाही. मग मला तू भलेसि की नाही हे महत्त्वाचे नाही. कारण मला भजावे की अन्य कोणास हा तुझा प्रश्न आहे आणि कधी कधी भरमही भरमाला शांती देऊ शकतो, तद्वत कोणाचीही पूजा ही कोणासही शांती देऊ शकेल; पण म्हणून माझी कृपा झाली किंवा अवकृपा झाली, असे जे समजतात, ते मूढ-अज्ञ नि होत. तू म्हणतोस की तू जन्माला आलास आणि माझ्यासमोर आहेस म्हणून तुझे आस्तित्व सत्य आहे. धृतराष्ट्रांनी तुम्हा पांडवांना यातना दिल्या हा तुझा अनुभव तुझ्या दृष्टीने सत्य आहे. आणि जर तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझा अनुभव सत्य असेल तर दुर्योधनाचाही जन्म झाला आहे, हे सुद्धा सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हा पांडवांचा राज्यावर अधिकार नाही, असे त्याला जे वाटते तेही सत्य आहे आणि जर तुझेही सत्य आणि त्याचेही सत्य तर मग "सत्य' विषयक अनेक प्रवाद निर्माण होऊ शकतील. आणि दुर्योधन तेवढा दुष्ट आणि तुम्हीच धर्मशील असे ठरवायला तरी नेमका कोणता आधार आहे बरे? हे कौंतेया, या भरमाचा पडदा तरी मी दूर करू इच्छितो. असे पाहा की, एका स्त्रीशी पाच बंधू मिळून विवाह करणारे आणि त्या स्त्रीची अनुज्ञाही न घेणारे तुम्ही, या धरतीवरील या भरामक काळातील कोणता नियम पाळलात बरे? ज्या द्रुपदाचा पूर्वी पराभव करून तो आपल्या गुरूचा शत्रू आहे, हे विदित असताही नंतर त्याच्याशी सख्य साधणारे तुम्ही पांडव कोणत्या नियमाने चालले आहात बरे? ज्या कुंतीस, कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे हे, सत्यज्ञान असताही अद्यापही तुम्हा पांडवांस सांगत नाही, त्यामागील गूढार्थ काय बरे? मी अशी अनेक उदाहरणे, हे पार्था तुला सांगू शकतो आणि असे असूनही आपण धर्मशील आहोत अशी वल्गना तू कशी करू शकतोस? जे अधर्माने वागत असतात त्यांनी, इतरांनी मात्र धर्माने वागले पाहिजे किंवा तुम्ही स्वत: ज्या तत्त्वास धर्म मानता त्याच धर्माने इतर सर्वांनी वागायला हवे, असे समजण्यात किंवा आगरह धरण्यात कोणता अर्थ आहे बरे? एखाद्या धीवराने जाळे फेकले आहे, हे ज्ञात असता त्या जाळ्यात जे मासे अडकतात तेषी की धीवरषी? धर्म फार सूक्ष्म आहे. हे पार्था, तुम्ही म्हणता की जुगार हा अन्यायी होता आणि त्यात तुमचे राज्य हिरावले गेले. जुगार अन्यायी होता तर तुम्ही स्वतंत्र राजे असल्याने, जसे आज युद्धोत्सुक आहात, तसेच तेव्हाच युद्ध करण्याचा मार्ग तुमच्याकडे खुला होता. परंतु तुम्ही तेव्हा युद्ध टाळलेत आणि द्यूत न्याय्य होते हे अप्रत्यक्षपणे मान्य केलेत. मग दुर्योधनास त्याचा दोष कसा लागतो? शिवाय आपली या सृष्टीच्या कणावरही, अगदी स्वत:च्या देहावरही, सत्ता नाही हे मान्य असतानाही स्वत:स आणि पत्नीस डावावर कसे लाविलेत? जे कर्म तुम्ही स्वत:च्या इच्छेने केलेत, स्वत:स व पत्नीस डावावर लावण्याचा अधिकार नाही हे माहीत असताही स्वत:स व पत्नीस डावावर लाविलेत त्याबद्दल अन्य कोणाकडेही कोणता दोष येतो बरे? आणि एवढे असताही आज तुम्ही पांडव युद्धास तयार झाला आहात. आपण तेवढे धर्मशील आहोत असे म्हणत आहात. उद्या युद्ध सुरू होणार आहे, हेही तुला ज्ञात आहे आणि तरीही युद्धसंन्यासाबाबत तू बोलतो आहेस. म्हणजे तुझा संकल्पही दृढ नाही, हेच यातून प्रतीत होत नाही काय? तेव्हा तुझा संकल्प सत्य नाही. हे पांडवा, म्हणूनच तूही सत्य नाहीस आणि तू जेवढा सत्य नाहीस हे सत्य आहे तद्वतच आज आणि उद्या हे अंतरही सत्य नाही. युद्धही सत्य नाही आणि ज्यांच्याशी तू युद्ध करेन म्हणतोस किंवा ज्यांच्याशी युद्ध करणार आहेस, असे म्हणतोस तेही सत्य नाही. कारण ज्यास शाश्वत धर्म म्हणतात, असा धर्म मानवी जगतात कधीही अस्तित्वात नव्हता. मुंग्यांना वारुळ मेरुपर्वत वाटतो आणि छोटा तलाव महासागर वाटतो. त्याचप्रमाणे मनुष्याचे आहे. परंतु हे विश्व अतिविराट असूनही शून्य आहे, याचे ज्ञान त्यास कधी होत नाही. हे अर्जुना, तू संभरमित आहेस, कारण तुझा संकल्प संभरमित आहे. तुझे अस्तित्व हे सुद्धा संभरमित आहे. तू म्हणतोस की नभोमंडपीच्या तारका हे सत्य आहे. परंतु तेही सत्य नाही. हे कौंतेया, काल हा केवढा भरामक आहे, हे तुला माहीत नाही. तू ज्या तारकांना शा या क्षणी पाहात आहेस, तशाच त्या या क्षणी नाहीत आणि याक्षणी त्या कशा आहेत, हे ज्ञात होण्याचे मानवाकडे कोणतेही साधन नाही, हे तुला माहीत नाही. हे परंतपा, जेव्हा तू आकाशाकडे पाहतोस तेव्हा तो आकाशाचा वर्तमान नसतो, तर तू अतिदूरच्या भूतकालाकडे पाहात असतोस. कदाजात या क्षणी अनेक तारका पतन पावलेल्या असतील तर त्यांची जागा नव्या तारकांनी घेतलेली असेल. आणि भवितव्याकडे पाहण्याचे तर मनुष्याकडे कोणतेही साधन नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भरामक आहेत. कारण खरे तर कोणी द्रष्टा नाही आणि कोणतेही दृश्य नाही. परन्तु कालनामक राशीमुळे द्रष्टा आणि दृश्य हा विभेद निर्माण होतो. तेव्हा मी तुझ्यासमोर उभा आहे हे सुद्धा खरे नाही, कारण "मी' म्हणजे नेमके काय याचे ज्ञानही तुला नाही. मी तुला कधी द्वारकाधीश वाटतो, तर कधी परमात्मा. मी कधी सखा वाटतो, तर कधी शत्रू. "मी' म्हणजे काय याचे तुझे ज्ञान जर अपूर्ण असेल तर मी "मी' आहे हे तुझे ज्ञानही भरामक होय. आणि तू तुझ्या जीवनात जे अनुभव घेतलेस आणि तो जो तू माझ्यासमोर उभा आहेस असे जे काही तू म्हणालास, तेही सत्य नाही. कारण तुझे अनुभव जे तुला तुझे वाटतात आणि त्या अनुभवांचा अन्वयार्थ जो तू काढला आहेस, तोही सत्य नाही. तुझा अनुभव तू तुझ्या परिप्रेक्ष्यातून पाहतो आहेस म्हणून तू शाश्वत अर्थाने माझ्यासमोर उभा आहेस असेही नाही. नदीमध्ये त्याच पाण्यात हात घालता येत नाही. तो हातही तोच नसतो. आणि त्याहीपुढे जाऊन खरे तर पाणीही नसते आणि हातही नसतो. हे पार्था, मनुष्यास कधीही ज्ञान होत नाही. ज्ञानाचा समज होत असतो. आणि समज सिसेलितात तसतसे मानवाचे ज्ञानहीलत असते आणि जे परिवर्तनीय आहे आणि परिवर्तनीय म्हणून काळासह आहे ते ज्ञान हे सत्य ज्ञान असू शकत नाही. कारण पार्था, असे ज्ञानीनि म्हणतात की चराचर सृष्टी भूताकडून भविष्याकडे जात असते आणि काळ मात्र भविष्यातून येवून भूतकाळात विलीन होत असतो. त्यामुळे मनुष्य जगत असतो असे म्हणणेही तर्कदुष्ट आहे. खरे तर तो भविष्यातून वर्तमानात येणार्‍या काळात जगत असतो आणि काळ मात्र भूतकाळात विलीन होत असतो. आणि मनुष्य मात्र भूतकाळातून वर्तमानात आणि नंतर भविष्यकाळात प्रवेश करीत असतो. असा परस्पराजविरोध प्रवाह, आणि असा प्रवाह की जो मनुष्यास जिवंत असल्याचे समाधान देतो तो काळ, एवढा भरामक आहे. आणि याच काळाची गंमत अशी की, वर्तमान क्षणिक असतो. भूतकाळ सीमित असतो आणि भविष्यकाळ प्रदीर्घ असतो. आणि तरीही मनुष्यास वाटते की तो धर्मशील आहे आणि त्याला मोक्षाचा अधिकार आहे. परंतु काळ हाच भरामक असल्याने कोणासही इतिहास नाही आणि कोणासही भविष्यकाळ नाही. मग वर्तमानाची तर गोष्टच सोड. मग मोक्ष कोठे आहे? आणि अनुभवास येते ते सारे सत्यच असे विधानही काही केल्या करता येत नाही. सूर्यराज उगवतो असे सत्य आपल्याला अनुभवयाला मिळते. परंतु सूर्य उगवत नसून पृथ्वीच स्वत:भोवती फिरत असल्याने सूर्य स्थिर असूनही चर वाटतो असे असूच शकणार नाही काय? तेव्हा तुला माझा अनुभव येतो आहे हे विधानही जर सत्य नसेल तर तुला कौरवांच्या संदर्भात काय अनुभव आला तोही असत्य असू शकेल. किंवा कौरवांना तुमच्या संदर्भात जो अनुभव आला तोही असत्य असू शकेल. तेव्हा जरन्ही बाजू सत्य नाहीत तर सत्याचा जय होईल हे विधानही असत्य आहे. परंतु तुला तुझे भरम आहेत आणि कौरवांना त्यांचे भरम आहेत. या युद्धात पराजित झाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतीलच असेही नाही किंवा जय मिळाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतील असेही नाही. आणि जो नंतर याचा इतिहास सांगितला जाईल तोही सत्य असेलच असेही नाही. तेव्हा एवढ्या असत्य इतिहासात आणि भरामक वर्तमानात आपण जगत असताना आणि आपणच उद्या एक नवा असत्य इतिहास घडवीत असताना धर्म आणि सत्याच्या वल्गना करण्यात अर्थ तरी काय बरे? आपण नेहमीच भरामक इतिहासात जगत असतो आणि भरामक इतिहासाला जन्म देत असतो. पण असे असूनही जी सत्यसृष्टी या कालापासून किंवा आपल्या तथाकथित अनुभवांपासून अलिप्त असल्याने, आणि जी स्वत:तच शून्य असल्याने ज्याला आपण इतिहास म्हणतो तो इतिहास नसून आपल्या साजेयस्कर स्मृतींचा एक हिस्सा असतो. आणि या स्मृतीही खर्‍या नसतात कारण जो स्मृतींचा अर्थ देतात तो कधी खरा नसतो. आणि इतिहास कधीही वर्तमानातलता येत नाही. आणि इतिहासाचा अन्वयार्थ मग स्वाभाविकपणेच असत्य असतो. कारण जे नसतेच ते प्रदीर्घ वाटत असताही अल्प असते. हे सारेच जसे नाही तसे वाटत असल्याने तो एक भरमच होय. तेव्हा हे पार्था, तू जविंत आहेस असे तुला वाटते परंतु तू जविंत नाहीस, तसेच हे यच्चयावत विश्वही जविंत नाही. असे असताही तुला तू जविंत मानतोस आणि मलाही तू तुझ्या परिप्रेक्ष्यात का होईना अनुभवतो आहेस ते काळामुळे आणि हा काळ भूतकाळाकडून भविष्याकडे जात नसून भविष्याकडून भूतकाळाकडे जात असतो. आणि हा विरोधाभास असल्याने तुझेही अनुभव विरोधाभासी आहेत हे निश्चित समजून अस. आणि या भरमात का होईना, पण एक जीवन आहे. ते जीवन आकलनात येत नसताही ते आकलनात आले आहे असे वाटते, तोही एक भरम होय. आणि जो आकलन करीत असतो, तो आकलनकर्ता यथार्थ आकलन करून आपले वर्तन करेल असे काही निश्चयाने सांगता येत नाही. तेव्हा आकलन आणि आकलनकर्ता यांतही विरोधाभास आहे असे दिसते तर मग आकलनही खरे नाही आणि आकलनकर्ताही खरा नाही. कारण घटना जर एकच असेल तर तिचे आकलन भिन्न कसे हा प्रश्न निर्माण होईल आणि आकलन भिन्न असेल तर घटना ही पुन्हा निरपवाद आणि अगम्य होऊन जाईल. तेव्हा हे पार्था, मायेस दूर कर आणि माझ्याप्रमाणेच समजावून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुझे आकलन आणि माझे आकलन यात फरक पडणार आहेच आणि जर असेच असेल तर ज्ञानाच्या आणि परमार्थाच्या बाता मारण्यात अर्थ तरी काय बरे? उद्या युद्ध सुरू होणार आहे. तू युद्ध करणार की नाही हा खरा प्रश्न नाही; पण संन्यास घेऊनही तुझ्या मनातील युद्ध संपणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे. आणि युद्ध मनात असो की प्रत्यक्षात, तेही कर्मच आहे. आणि कर्म म्हटले की त्याला फळ हे अटळपणे जाकटलेले असते. मग ते भरामक का होईना आणि भरमातच जगणार्‍या मानवास कर्मफलत्वे सुख मिळणे किंवा दु:ख होणे हेही अटळच आहे. तेव्हा तुला मानसिक युद्ध करायचे की प्रत्यक्ष याचा निर्णय, हे पार्था घे. असा हताश आणि निराश होऊ नकोस. कारण सत्य फार दूर आहे. पण तुला जे सत्य वाटते, त्यासाठी का होईना शोक सोड. एवढे बोलून श्रीकृष्ण स्वस्थ उभे राहिले. पदचरणांशी बसलेला अर्जुन अश्रू ढाळीत होता. आपला हा सखा आज एवढा परका का झाला हेच त्याला कळत नव्हते. त्याने श्रीकृष्णाचा चरणस्पर्श केला आणि म्हणाला, हे श्रीकृष्णा, दयाघना, तू आज केवळ बाजूललीस म्हणून माझ्या आत्म्याच्या एवढ्या चिंध्या केल्या आहेस. या जगात काहीही, अगदी तू सुद्धा स्थिर नाहीस याचा आता मला साक्षात्कार झाला आहे. असो, मी योग्य वाटेल तसे करेन. आणि एवढे बोलून, पाठ वळवून, कौंतेय अर्जुन निघून गेला. परमात्मस्वरूप श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि आपल्या शिबिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. यानंतर नेमके काय झाले हे महत्त्वाचे नाही. कौरव आणि पांडव या मातब्बर पक्षांत युद्ध झाले की नाही, झाले असल्यास त्यात नेमका कोणाचा जय झाला आणि जे पराजित झाले त्यांचे काय झाले यात रस घेण्यात फारसा अर्थ नाही. कारण इतिहास नावाची कोणतीही गोष्ट सत्य नाही. आणि जे काही सत्य नाही ते जाणण्यात अर्थ नाही असेच नाही का श्रीकृष्णाने सांगितले? तेव्हा इतिहास अज्ञात असण्याएवढे सुख नाही. वर्तमान नाहीच असे मानण्याएवढे निरपेक्ष सत्य नाही आणि जर इतिहास नाही आणि वर्तमानही नाही तर भविष्य आहे असे मानणे मूढपणाचेच लक्षण नाही काय? म्हणून कौरव-पांडवांचे नेमके काय झाले, कोणाचा पक्ष सत्य होता आणि कोणाचा असत्य हे जाणण्यात तरी काय अर्थ आहे, जेव्हा काहीच सत्य नाही? काल शून्य आहे. हे जाणणे हेच खरे सत्यधर्माचे ज्ञान होय. %%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_chapter.cgi?bookId=ob2&chapter=1&lang=marathi %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 सोनसाखळी एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई. आपल्या जवळ निजायला घेई. तिच्या जवळ कितीतरी खेळ किती बाहुल्या किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी. छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते. सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे "बाबा मला भरवा. मी मोठी झाले, म्हणून काय झाले ?" मग प्रेमाने बाप तिला घास देई. सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला "हे बघ मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको मारू नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर." सावत्र आई म्हणाली "हे मला सांगायला हवे ? तुम्ही काळजी नका करू. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुटया भात जेवायला वाढीन कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन वणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरूप परत या." सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे. एक दिवशी तर तिच्या कोवळया हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईनं डाळिंबाचे झाड लावले. काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळयांत पाणी आणून म्हणाली "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा तेथे कोणाचे काय चालणार ?" बाप दु:खी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना झोपताना डाळयांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे. त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले ! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी. शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळिंब. कलिंगडाएवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणार तोच आतून गोडसा आवाज आला "हळूच चिरा मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले. बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा बाबा पुन्हा मला साडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीकत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही असत्य छपत नाही मला कळले. मी नीट वागेन." पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीनं वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची. कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही. सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते . असा तो डुबा. परंतु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला. सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना; कृष्ण दिसेना; गाई-गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्रापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. देवा तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवल नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे;लोभी आहे देवा. कृष्णा ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.' इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे का तारे ? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार;तिच्या मानेचा घोट घेणार;तोच बहुला करुणवाणीने त्याला म्हणाली;वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही;कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते, परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असले. त्याला शेवटचा पान्हा पाजून; त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन. वाघ म्हणाला; 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मुर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल; मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहात असेल.' बहुला म्हणाली; 'वाघोबा तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलांची तुला दया येऊ दे. मी खरंच परत येईन; मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल; सागर कोरडे होतील अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा दाखव; जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येंते.' व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला;'बरं आज परीक्षाच घेतो. जा लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बासून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे;तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.' बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही; कोणास ठाऊक ! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दुधाने थरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला; वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभीषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या; काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्ह्ते. घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही; ह्याचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुव्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना. डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला; आई का ग रडतेस ? तुला काय झालं ? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय ? त्यानं तुला मारलं होय ? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं ?' बहुला म्हणाली; बाळ मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.' डुबा : मग तू का रडतेस ? कृष्णदेव तुझ्यावर रागावला ? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही ? त्यानं तुला हाकलून दिलं होय ? तुला यायला इतका उशीर का झाला ? बहुला : कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये. डुबा : तू का निघून गेलीस ? तू माझ्यावर रागावलीस वाटतं ? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो; म्हणून रागावलीस ? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस ? आई मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही. आई माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे ? बहुला गहिवरून म्हणाली; ' बाळ; तुला कोण वाईट म्हणेल ? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन ? अरे; पिताना मला ढुश्या देतोस; त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.' डुबा : मग तू का रडतेस ? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस ? मी का फक्त तुझं दूधच पिऊ ? तुझं दु:ख नको ऐकू ? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू ? बहुला : बाळ; सारं सांगत्ये; ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये; तो जवळ ना यमुना; ना गाई; ना गोपाळ; ना कृष्ण; सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार; तोच मी त्याला म्हटलं; ' वाघोबा; माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते; मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या ! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्वापासून च्युत कशी होऊ ? तू एकटा जगात राहाणार; अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ; आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जात नकोस; चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो.' असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला; 'आई; मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन' बहुला सदगदित होऊन बोलली; 'बाळ; तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील ? तू मोठा हो. एक दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.' डुबा म्हणाला; 'आई; तुझं दुसरं सारं ऐकेन; परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन; 'मला खा.' तू सांग; 'मला खा.' बाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.' बहुला व डुबा रानात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते . हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते; त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सांपाकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरुवेलीवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता ! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती. बहुला व डूबा कोणी बोलत नव्हते; बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने; भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली; 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला; 'मी भ्यायलो नाही काही; हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला. डुबा : तू का रे तो वाघोबा ? माझ्या आईला खाणारा तूच ना ? वाघोबा; माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक. बहुला : नको रे वाघोबा. त्याचं काय ऐकतोस ? तू आपला मला खा हो. वाघ : बहुले; इतका उशीर का झाला ? मी म्हटलं; तू येतेस की नाही ? न येण्याचं ठरवीत होतीस ना ? बहुला : नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुद्धा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे; 'मलाच जाउ दे. त्याची समजूत घालण्यात वेळ गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस काही. फसवण्याचं स्वप्नातसुद्धा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण; तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.' डुबा : वाघोबा; नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे माझं अंग तुला आवडेल; तुझ्या पिलांना आवडेल. बहुला : त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार ? वाघोबा; तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे; तुम्हा सर्वांचं पोट भरेल. वाघ : मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता; आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस - कोवळं कोवळं - माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला; तयार व्हा. आता उशीर नको. बहुला; डुबा; माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा. मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला; 'वाघोबा; खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.' द्यघ : गप्प बस. बालणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे. डुबा : मला मरणाची भीती थोडीच आहे. बहुला : बाळ; आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको. मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात; त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात; ह्याची वाट पाहू लागली; परंतु छे:; ह्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा ह्यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याएवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली; तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली; तो त्यांना समोर कोण दिसले ? पालनवाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | मोरमुकुट तो माथ्यावरती मंजुळ मुरली धरली ओठी गळयात डोले सु-वैजयंती प्रभुवर आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | रक्षण भक्तांचे करणारा भक्षण असुरांचे करणारा श्यामसावळा गिरी धरणारा धावत आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | उभा राहिला देव येउनी हृदयी गेला उचंबळोनी बहुलेच्या सत्वास पाहुनी अतिशय धाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला | कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने दुब्याला थोपटले. देव म्हणाला; 'बहुले; बाई कष्टी होउ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढे चालवशील. बहुले तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली; देवा; हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळुन दूर जाण्याचा मोह मला कधीही न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू ? एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगीतला. "आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर !" ती रडत म्हणाली. "तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला. राणी काय करणार काय बोलणार ? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये !" "तुमची आज्ञा प्रमाण " असे म्हणून पित्याच्या पाय पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले. "हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू. " ती म्हणाली. आईचां आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली. "कोण तुम्ही कुठल्या ? या रानावनातून एकटया कुठे जाता ? " "मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली. "ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला. दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडुक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची ? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उडया मारीत गेला. सापाची भूक शमली ; बेडकाचेही प्राण वाचले. भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरूण येत होता. "कोण रे तू ? कुठला ? रानावनात एकटा का ?" राजपुत्राने विचारले. "मला तुमचा भाऊ होऊ दे. " तो म्हणाला. "ठीक हरकत नाही. " राजपुत्र म्हणाला. तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला. "मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका. " तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू; त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने ? जवळच एक शहर दिसत होते. प्रसादांचे; मंदिराचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला "त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती; घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाचे मिरवत नेण्यासाठी या !" दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला; नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते; ठायी ठायी आसने; फुलांचे गुच्छ होते; पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह; त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले. आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोडयांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाडयात उतरला. तेथील जीवन सुरू झाले. "तू रे कोण ?" राजपुत्राने विचारले. राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्कर्‍या होता. राजाने त्याला विचारले. "कोण आला आहे राजपुत्र ?" "मी बातमी काढून आणतो." तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजपुत्राकडे गेला. पहारेकर्‍यांनी त्याला हटकले. तो म्हणाला; "मी येथल्या राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे." नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले. "पाठवा त्याला." राजपुत्र म्हणाला. खुशमस्कर्‍या आला. राजपुत्राची तो करमणुक करू लागला. तो तेथील हास्यविनोद एकून त्याची बहीणही आली. थोडया वेळाने खुशमस्कर्‍या जायला निघाला. "येत जा !" राजपुत्र म्हणाला. "राजाने येऊ दिले तर !" तो म्हणाला. खुशमस्कर्‍या राजाकडे गेला व म्हणाला; "राजा; राजा; त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा !" "ठीक आहे." राजा म्हणाला. दुसर्‍या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला; आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला; "तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो." "ती माझी बहीण !" "ती माझी राणी होऊ दे !" "मी तिला विचारीन !" "कळवा मला काय ते !" राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली. "राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही !" राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्कर्‍या आला. " काय उपाय ? " राजाने विचारले. " त्याला म्हणावे; तुझी बहीण तरी दे; नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधार्‍या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो; नाहीतर डोके उडवण्यात येईल ! " राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली; " दादा का रडतोस ? " त्याने तो वृतांत सांगितला. ती म्हणाली; " गावाबाहेर जाऊन दो कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस ! " राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावर ती हरिणी बनली. वार्‍याप्रमाणे ती पळत सुटली. अंधार्‍या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले येऊन ती म्हणाली; " जा; राजाला ही नेऊन दे ! " राजपुत्राने तार्‍याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्कर्‍याला म्हणाला; " आता कोणता उपाय ? " " त्याला सांगा की; बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे; नाही तर डोके उडवीन ! '' खुशमस्कर्‍याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला; " दादा का रडतोस ? " राजपुत्राने वृज्ञल्तलृांत निवेदिला. " रडू नकोस; दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस !" राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डरांव; डरांव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडुक जमा झाले. तो त्यांना म्हणाला; " त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन: पुन्हा बुडया मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू; राजाच्या अंगणात ढीग घालू ! " सार्‍या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणार्‍या मोत्यांचे ढीग पडले. भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला " राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीची मोती निवडुन घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून ! " राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाडयात परत आला. राजाने खुशमस्कर्‍याला विचारले " आता काय ? " " त्या राजपुत्राला म्हणावे; बहीण दे; नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून येते." खुशमस्कर्‍याने सुचविले. " तो स्वर्गात कसा जाणार ? " " तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू ! " राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला " दादा; का दु:खी ? " राजपुत्राने सारी कथा सांगितली. " रडू नका. मी देतो तो रस अंगाला लावा नि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा; की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा ! " राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी द्या असे त्याने सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आला. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला. " महाराज; या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या." सर्प म्हणाला. " हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल." शेष म्हणाला. एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले ने तो निघुन गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला; " दादा जा व राजाला सांगा की; त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुशमस्कर्‍याची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या !" राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाडयासमोर ही गर्दी ! राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुशमस्कर्‍यास बोलावले व सांगितले; "अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे ! " "मी कसा जाऊ ?" "या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा !" लोकांनी टाळया पिटल्या. " दुष्टाची बरी जिरली!" कोणी म्हणाले. राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाडयात आला व भावंडांना म्हणाला; "हा राजा लहरी दिसतो. वेडपट दिसतो. येथे राहण्यात अर्थ नाही. चला आपण जाऊ." रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फारळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला; "दादा; मला निरोप दे! मी जातो!" "मला कंटाळलास?" "दादा; मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा; सुखी व्हा!" असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोडया अंतरावर फण फण करीत निघून गेला. थोडया अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला; "दादा; मलाही निरोप दे!" "का रे जातोस ?" "दादा; मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!" असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुन उडया मारीत निघून गेला. पुन्हा थोडया अंतरावर बहीण म्हणाली; "दादा; मलाही निरोप दे!" "तूही चाललीस ?" "होय दादा. पादसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मयाळू हो!" बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वार्‍याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली. राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी ! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे; असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थीत होती. "कोण आहे ? " पहारेकर्‍यांनी दरडावले. "मी राजपुत्र." " माझा बाळ ! माझा बाळ ! " म्हणत राणी घावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला. " शहाणा होऊन आलास ? " राजाने विचारले. " होय तात ! " तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊ या. गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली. %%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob10&lang=marathi %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 केरळ भारतातला एक निसर्गरम्य प्रांत. निसर्गाने जणू आपला सर्व खजिना या प्रांतावर अगदी मुक्तहस्ते उधळलाय. बर्‍याच वर्षांपासून दक्षिण भारतात जाण्याची त्यातल्या त्यात केरळ बघण्याची अगदी मनापासून इच्छा होती. पण या ना त्या कारणाने तो योग येतच नव्हता.कुठलीही गोष्ट घड्यची एक ठराविक वेळ असते म्हणतात ते अगदी खरंय. अन्यथा केरळला जाणं एवढं लांबलं नसतं. केरळ बघण्याची इच्छापूर्ती आमचा मित्र संजीव पिल्ले याच्या सहकार्यानेच व्हायची होती. त्याचं असं झालं. एक दिवस सकाळी सकाळी ऑफिसमधला टेलिफोन खणखणला. तो फोन होता संजीव पिल्लेचा, जो टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतो. त्यानं अचानक जाहीर केलं. हम सब केरला जाएंगे, तुम सिर्फ जाने आने का खर्चा करना, बाकी उधरका सब बंदोबस्त मैं करूंगा. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशातली आमची अवस्था झाली. एवढी वर्ष सुप्त असलेली इच्छा पूर्ण होण्याची संधी अशी सहजासहजी चालून येईल असं वाटलं नव्हतं. मग काय, भराभर वेगवेगळ्या सेक्शनमधले फोन घणघणले आणि इच्छुकांची म्हणण्यापेक्षा अपेक्षितांची यादी तयार झाली. संजीव पिल्ले स्वत:, सुनील मुळे, मी, लोखंडे, टुल्ली (राजेश सरमळकर), बंड्या (प्रसाद मटकर), मुकेश फणसेकर, नरेन्द्र खराडे, वीरघट, चिलप आणि बेलेकर अशी अकरा जणांची क्रिकेट टीमच तयार झाली आणि एक उत्साहाची लाट सर्वत्र पसरली. मीटिंग्जवर मीटिंग्ज, प्रेक्षणीय स्थळांची यादी, अपेक्षित खर्चाची वारंवार बदलणारी रक्कम, आणि मग रिझर्वेशन. ऐन वेळी जर कुणी येणं कॅन्सल केलं तर जबरदस्त पेनल्टी पण ठरविण्यात आली. एवढया लांबचा प्रवास आणि दोन-तीन वेळा मुक्काम म्हणजे रात्री एकदमच कोरड्या जायला नकोत म्हणून खंबा स्पॉन्सरर्स पुढे आले. दोन-तीन खंबे उत्स्फूर्तपणे स्पॉन्सर झाले. (त्यातले दोन नंतर कॅन्सल झाले) ७ जानेवारी २००२ ला नेत्रावती एक्सप्रेसने निघण्यावर शिक्कामोर्तब झालं. सर्वांची पॅकिंगला सुरुवात झाली. संजीवनं सांगितलं होतं़ आरे, उधर बहोत ठंडी है, तुम आपने साथ स्वेटर्स, मफलर्स, चद्दर, ब्लॅंकेट सब कुछ ले लेना, बाद में बोलने का नै, मै बताया नै| ऑर्गनायझर का हुकूम सर ऑंखोपर, सर्वांनी बॅगा गरम कपड्यांनी भरल्या. पण निघण्याच्या दोन दिवस आधी एक दुर्घटना घडली. राजेश सरमळकरच्या वडिलांचं दु:खद निधन झालं. आम्हा सर्वांना अतिशय दु:ख झालं. राजेश उर्फ टुल्ली म्हणजे फुल टाईमपास. कलाकार माणूस. उत्कृष्ट ब्रेकडान्सर आणि बेस्ट कॉमोडियन. अशी दुर्घटना घडल्यावर सर्वांचाच उत्साह गळून पडला. न जावं तर रिझर्व्हेशन्स झालेली आणि जावं तर मनाला प्रशस्त वाटत नव्हतं. परंतु टुल्लीने आमची मनोवस्था ओळखली आणि सांगितलं़ माझ्या एकटयासाठी तुम्ही तुमची ट्रिप कॅन्सल करू नका. इथं टुल्लीच्या मनातला मोठा माणूस दिसला. शेवटी जावं की न जावं अशा द्विधा मन:अस्थितीतच जड अंत:करणाने आम्ही सर्वानी जायचं नक्की केलं. आमचा एक मेंबर कमी झाला आणि ऐन वेळी बंड्यानं पण (लंबी) टांग दिली. ए, मै नही आ सकता यार, साला मेरेको गेट एक्झाम का काम है, मै नही निकल सकता| बंड्या म्हणजे एक जबरदस्त व्याक्तिमत्व. बघितलं की कुणालाही आदरयुक्त भीती वाटावी, कुणीही नडण्यापूर्वी चार वेळा विचार करावा असं. तो येणार नाही म्हटल्यावर आमच्या उत्साहावर पाणी पडलं. दोन मेंबर कमी झाले, आता काय करायचं़ दोन रिझर्वेशन्स वाया जाणार, पण हाही प्रश्न आपोआपच सुटला. आमची गॅंग केरळात जाणार ही बातमी एव्हाना सर्व आयआयटीभर गुपचुप गुपचुप पसरली होती.त्यामुळे कॅन्सल झालेल्या दोन जागा भरायला वेळ लागला नाही. आमच्या स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष जयचंद्रन यांना आय्यप्पा दर्शनासाठी शबरी मलायी इथे जायचं होतं़ पण त्यांना तिकिट मिळाले नव्हते.त्यांचं नाव यादीत बदली खेळाडू म्हणून टाकण्यात आलं आणि टुल्लीच्या ऐवजी वीरघट यांची निवड करण्यात आली. पाहता पाहता सात जानेवारी उजाडली. लोखंडे, सुनील, पिल्ले, वीरघट आणि जयचंद्रन कुर्ल्याला जाऊन नेत्रावती एक्स्प्रेस पकडणार होतो. एवढया सगळ्यांनी सामानासहित एकत्र जायचं तर मोठं काही तरी वाहन हवं म्हणून जयचंद्रन यांनी मांजरेकर यांची कार आरेंज केली. ते सर्व कुर्ल्याला कारने गेले. मी, मुकेश, बेलेकर, चिलप ठाण्याहून गाडीत चढणार होतो. रिझर्वेशन्स एकत्र मिळाली नव्हती, काही जणांचे सीटस एस-६ मध्ये तर काही जणांचे एस-१ मध्ये. त्यामुळे ठाण्यात गाडीत शिरताना काही जण एस-१ च्या दारात तर काही जण एस-६ च्या दारात उभे होते. लोखंडे एस-१च्या दरवाजात उभे होते. बेलेकर, चिलप व वीरघट यांना एस वन मध्ये जागा मिळाली होती.लोखंडेंचं सीट एस-६मध्ये होतं. चिलप आणि बेलेकर गाडीत चढल्यावर ते आपले सरळ खाली उतरून सरळ एस-६च्या दिशेने धावत सुटले. धापा टाकत डब्यात शिरले तर सगळे त्यांच्याकडे बघून खो-खो हसत सुटले. त्यांना कळेचना सर्वांना हसायला काय झाले ते? त्यांनी पटकन आपल्या पॅंटकडे बाघितलं. चेन वगैरे तर व्यवस्थित होती. मग झालं तरी काय? शेवटी आम्ही सांगितलं़ आरे बाबा, सगळे डबे एकमेकाला जोडलेले आहेत, खाली उतरून धावपळ करायची काय गरज होती तुला.आतूनच येऊ शकला आसतास तू. आपल्या डब्यात पटकन शिरायचं या विचाराने ते त्याच्या लक्षातच आलं नाही. त्यानं ते हसण्यावारी नेलं. काय करणार, अशा वेळी कुणी तरी बकरा पाहिजेच असतो ना! तो लोखंडेचा बनला. लोखंडे म्हणजे अगदी साधासुधे आणि विसरभोळे. अगदी माझ्यावर ताण. दुसर्‍यांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवणारे. पण बोलण्याची स्टाईल एकदम फर्मास. कुणालाही पटकन आकर्षित करून घेणारी. त्यांना बकरा बनवणं एकदम सोप्पं आणि नकळत बनले पण बिचारे ! ठाण्याहून गाडी सुटली आणि मग सीटसची ऍडजस्टमेंट सुरू झाली, विखुरलेले सगळे पक्षी एकाच घरटयात आणण्याची. सगळा ग्रूप एकत्र असेल तरच प्रवासाची मजा येणार होती. सहा जणांचा ग्रूप जिथे होता तिथे एकटे एकटे प्रवास करणारे दोघे प्रवासी होते त्यांना मस्का मारायला सुरूवात केली. आम्ही तुमचं सामान उचलून नेतो फक्त तुम्ही आमच्या दुसर्‍या डब्यातल्या सीटवर बसा आणि हे सीट आम्हाला द्या. त्या दोघांवर मार्केटमध्ये मिळणार्‍या सगळ्या ब्रॅंडचा मस्का चोपडून झाला. पण दोघंही लई बेरके होते. आम्ही मराठी, हिंदी, विंग्रजी या आम्हाला येणार्‍या सगळ्या भाषांचा प्रयोग करून पाहिला. त्यांना आम्ही बोलतो ते कळत होतं पण काहीच कळत नाही असा आविर्भाव करून ते अगदी मख्खपणे बसले होते. सगळ्यांनाच त्यांच्या या नॉन को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंटचा भयंकर राग आला होता. असं वाटत होतं दोघांची उचलबांगडी करावी अन दुसर्‍या डब्यात नेऊन आदळावं. पण प्रॅक्टिकली ते शक्य नव्हतं. म्हणून मग मनातल्या मनात दोघांचीही मुटकुळी बांधून गाडीतून बाहेर फेकून दिली अन दात ओठ खात गप्प बसून राहिलो. सगळे जण बरोबर जेवणाचे डबे घेऊन आलेले. म्हणजे तसं ठरलेलंच होतं. सगळे फक्त नाश्ता करून निघालेले. दुपार झाली तशी सगळ्यांना जेवणाची आठवण झाली. प्रत्येकाने आपआपला डबा उघडला आणि डब्यात पक्वान्नांचा संमिश्र सुवास दरवळू लागला. जिरापुरी, भाजी, आलू-पराठा, चपाती भाजी, अंडाकरी, धपाटे(ज्वारी आणि डाळीच्या पिठापासून बनवलेली तिखट भाकरी हा खास मराठवाडी पदार्थ, माझ्या डब्यातला) व हिरव्या मिरच्यांचा ठेचा, उडिदाच्या पिठाच्या आंबोळ्या व लसणाची चटणी, शंकरपाळी, इडल्या आणि दोसा विथ चटनी, साधा भात, खाकरा, शेंगदाण्याची चटणी अशा विविध पदार्थांनी नटलेल्या त्या बहुरंगी बहुढंगी जेवणावर सगळे तुटून पडले. नंतर मग पत्यांचा डाव बसला. दोन राउंड होतात न होतात तोच दोन खाकी गणवेशधारी यमदूतासारखे आमच्या समोर येऊन उभे राहिले रंग में भंग डालनेके लिये, त्यांनी नो कार्डस प्लीज अशा मृदु शब्दांत आम्हाला दरडावले आणि पत्ते गोळा करून ते बॅगेत भरले जात नाहीत तोवर समोर उभे राहिले. नाइलाज को क्या इलाज है या म्हणीप्रमाणे आम्ही चुपचाप पत्त्यांना त्यांची जागा दाखवली. एव्हाना सर्वांच्या डोळ्यांवर सुस्तीचा आमल चढला होताच. ज्यांना अनावर झालं ते आडवे झाले. काही जणांनी वॉकमनचे स्पीकर कानाला लावून गाण्याच्या तालावर डोलणं पसंत केलं तर काही जणांनी आतील बाहेरील सौंदर्याचे नेत्रसुख उपभोगण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला. गाडीने कोकणात एंट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा आपोआपच बाहेरच्या सृष्टिसौंदर्याकडे वेधल्या गेल्या. दोन्ही बाजूला हिरव्या गार शाली पांघरलेले डोंगर डोळ्यांना सुखावत होते. त्यांना दृष्ट लागू नये म्हणून अधून मधून झोपड्यांचे तीट लावल्यासारखे दिसत होते. एरवी नुसती इमारतींची जंगलं बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना ही हिरवी नवलाई एक वेगळाच आनंद देऊन जात होती. डोंगराच्या पाठीवरून पळता पळता अचानक गाडी डोंगरांच्या पोटात शिरली. काळाकुट्ट अंधार कापीत आणि प्रचंड आवाज करीत जेव्हा गाडी बोगद्यांतून प्रवास करू लागली तेव्हा मनात कुठे तरी भीतीची अनामिक कळ उठायची. जर बोगद्यातील दगड या पहाडी आवाजाने आणि गाडीच्या धडधडाटाने अचानक कोसळले तर काय होईल? पण दुसरीकडे, ज्यांनी अपार मेहनत घेऊन कोकण रेल्वेचं स्वप्न साकार केलं़ दर्‍याखोर्‍यातून वळणं घेत जाणारा, मार्गात येणार्‍या पहाडाचं पोट कापून लाखो प्रवाशांना अतिशय सुरक्षितपणे कोकणपार नेणारे हे बोगदे तयार केले, आणि जगाच्या नकाशावर एक अतिशय कठीण मार्ग तयार करण्याचं श्रेय भारताला मिळवून दिलं़ त्यांच्याबद्दलचं कौतुक या भीतीवर मात करायचं. रंगात आलेल्या गप्पांच्या नादात आशियातील सर्वात उंच असलेला पूल बघण्याचं राहूनच गेलं. आमचा प्रवास तसा दुपारी सुरू झाला होता. त्यामुळे रत्नागिरीला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. त्यामुळे संपूर्ण कोकणाचं सौंदर्य न्याहाळता आलं नाही. नेत्रावती एक्सप्रेस कोकण, गोवा आणि कर्नाटकातील काही भाग पार करून करळात शिरली हे आम्हाला कळलं़ तेव्हा आठ तारखेची सकाळ उगवली होती. गाडीच्या दोन्ही बाजूला नारळाची बनं. जिथे दृष्टी जाईल तिथे नारळाची उंचच उंच झाडं. आकाशाशी स्पर्धा करणारी. काही ठिकाणी तर नारळाच्या झावळ्यांचं छतच तयार झालेलं. त्यातून आकाशांचं दर्शन मोठया प्रयासानं घडत होतं. झाडांच्या या गर्दीतनं सूर्याच्या कोवळ्या किरणांना मोठया मुश्किलीनं जमिनीपर्यंत पोहोचता येत होतं. या नारळाच्या बनांत अधूनमधून एखादं घर दिसायचं. चहूबाजूंनी झाडांनी वेढलेलं. सगळं केरळ जमिनीच्या तुकड्यातुकड्यांनी तयार झालेलं आहे. कारण थोड्या थोड्या अंतरानंतर गाडी खाडीवरील पुलावरनं धडधडत जायची हे सारं बघून नकळत मनात शब्द उमटले, समुद्राच्या खाड्या अन नारळाच्या वाड्या अधनंमधनं पेरलेली टुमदार घरं दिसत नव्हतं कुठेही बसक्या घरांचं गाव दिसली नाही कुठेही गावाची वेस नजरेच्या टप्प्यात फक्त नारळांची वस्ती झावळ्या-झावळ्यांत खेळणार्‍या वार्‍याची मस्ती निसर्गाची किमया आगाध आहे म्हणतात ते खरंच आहे. कोकणाचं सौंदर्य वेगळं़ सारा कोकण दर्‍या-खोर्‍यांनी अन आंबा, फणस, काजू आदी वृक्षराजींनी वेढलेला तर केरळाची ही न्यारीच तर्‍हा. गाडीत चॉय, चॉय करीत हिंडणार्‍या चहा, कॉफीवाल्यांकडून घेतलेल्या गरमगरम चहाचा आस्वाद घेत घेत, गप्पा-टप्पा करीत मधेच आलेल्या एखाद्या स्टेशनवर उतरून कोवळ्या उन्हाची लज्जत चाखत कसा वेळ गेला कळलंच नाही. दुपारी पोटात कावळे ओरड्याला लागले आणि ऑर्डर दिलेल्या जेवणावर सगळ्यांनी ताव मारला. सायंकाळी तीन-साडेतीनच्या सुमारास जयचंद्रन यांचे मुलुकातले हरिपाठ गाव आले. मल्याळी गावांचे उच्चार म्हणजे एक गंमतच आहे. कारण स्टेशनवरील पाटीवर लिहिलेलं नाव आणि प्रत्यक्ष उच्चारले जाणारे नाव यात खूपच तफावत असायची. उदाहरणार्थ, 'Quilon' असे स्पेलिंग असलेल्या नावाचा उच्चार कोल्लम, कोईलम, कोलम अशा विविध प्रकारे व्हायचा. जयचंद्रन ज्या गावाला उतरले त्या गावाचा उच्चार मी हारिपद, हारिपाद, हारिपाठ, हारिपट्ट आसा वेगवेगळ्या प्रकारे ऐकला, आणि आपण शक्यतो कुठल्याही गावाचं नाव निदान केरळी माणसासमोर तरी उच्चारायचे नाही असे ठरवले. त्याला कारणही तसेच घडले, मी केरळच्या एस.टी.तून प्रवास करताना कंडक्टरशेजारी बसलो होतो. तुम किदरको जाता है आसे त्याने मला शुद्ध हिंदीत विचारले, मी आपला सहजच बोलून गेलो, हारिपाद जाता है, तेव्हा त्याने माझ्याकडे अशा काही नजरेने पाहिले की, मी जणू त्याला एखादी आस्सल शिवी हासडली आसावी. माझा कावराबावरा चेहरा बघून त्याला माझी कीव आली आसावी, त्याने माझा उच्चार सुधारण्याचा प्रयत्न करीत हारिपद्द की हारिपाट्ट असं काहीतरी सांगितलं आणि मी देखील "मैने वोइच तो बोला था" अशा साळसूद आविर्भावात त्याच्या हो ला हो केलं. तर सांगत काय होतो, जयचंद्रन यांचे ते गाव आले आणि त्यांनी आम्हा सर्वांना इथे येण्याचे आमंत्रण देऊन आमची पुढच्या प्रवासासाठी बोळवण केली. सायंकाळी सहा वाजता पिल्ले यांनी पुकारा केला, ए, सब आपना आपना सामान बांधो, आभी आपुनको आगले स्टेशनपर उतरनेका हैऽ बस, पाच मिनटमें आपना घर आएगाऽ पिल्लेंचं बोलणं ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण प्रत्येक जण प्रवासाला कंटाळला होता. आमचा संपूर्ण ग्रूप ट्रेनमधून खाली उतरला ते स्टेशन होतं़ कोलम रूफ कोळ्ळम रूफ कोईलम वगैरे वगैरे. आम्हा सर्वांना वाटत होतं आता बाहेर पड्याचं आणि सरळ पिल्लेचं घर गाठायचं़ पण ते नशिबी नव्हतं. अजून एक ट्रेनचा प्रवास शिल्लक होता. कोलमहून दुसरी ट्रेन पकडून पेरावूर किंवा पेररावूरला जायचं होतं. दुसरी ट्रेन स्टेशनवर उभीच होती. प्रवासाचा भरपूर शीण आलेला, सगळ्यांचे मरगळल्यासारखे चेहरे आजूनच केविलवाणे झाले. पाय ढकलत ढकलत कसेबसे दुसर्‍या ट्रेनमध्ये घुसलो आणि आर्धा तास प्रवास करून एकदाचे साऊथ परव्वूरला पोहोचलो. अपिल्लेनं पुन्हा सांगितले, बस, आभी थोडासा चलनेका, मेरा घर स्टेशनके एकदम नजदीक हैऽ आम्हाला वाटलं आसेल जवळच. पाठीवर, हातात, बॅगांचे ओझे सांभाळत सांभाळत आमचा बेनूर चेहर्‍यांचा ताफा पेरावूर गावातून मिरवत अमिरवत निघाला तो तब्बल पंधरा ते वीस मिआनिटांनी (आत्ता समजलं़ ही पिल्लेंची पाच मिआनिटे) एका लॉजसमोर पोहोचला. नल्लुकेत्तू लॉज. इथे येईपर्यंत आमची मिरवणूक बघायला रस्त्यावर, नाक्यानाक्यावर माणसं जमा झाली होती. सर्कशीतले प्राणी बघावेत तसे आमच्याकडे खालपासून वरपर्यंत न्याहाळून बघत होते. एवढया मोठया संख्येनं एखादा ग्रूप आसा प्रथमच पेरूवेरच्या रस्त्यावरून हिंडताना दिसत आसावा. तरुणींनी असं न्याहाळून बाघितलं आसतं तर अगदी बरं झालं आसतं़ आसा विचार प्रत्येकाच्याच मनात त्यावेळी डोकावून गेला आसणार. जाऊ द्या. लॉजवर गेलो, रूम्सचा ताबा घेतला, आंघोळी करून फ्रेश वगैरे झालो, त्या हॉटेलमध्ये बहुधा एवढया संख्येनं उतरणारे आम्हीच आसणार, आणि बहुधा बर्‍यात वर्षात कुणी मुक्काम पण केलं नसणार, कारण एकंदरीत रूम्सची हालत आतिशय केविलवाणी होती. आंघोळ केल्यानंतर मोरीतनं पाणी बाहेर जाण्याऐवजी बाथरूमभर पसरलं़ शेवटी हॉटेलच्या मालकाला बोलावून त्याला ते दाखवलं़ तेव्हा त्याची प्रातिआइया आतिशय गमतीची होती. उसमें क्या हो गया साब, बाहर कचरा आटक गया होगा. आब्बी निकाल के देता हूऑं. त्यानं एका माणसाला बोलावून रूमचा बाहेरील भाग साफ करायला लावला. तो बाघितल्यावर जाणवलं की गेल्या कित्येक माहिन्यात त्याने तो कचरा उचललाच नसणार. पण बाकी हॉटेल तसं चांगलं होतं. चक्क ए.सी. रूम्सची वगैरे व्यवस्था होती. खैर! रात्री प्रवासाचा शीण घालवण्यासाठी मैफल बसली. मग काय! धमालच. गाणीबिणी,पत्ते वगैरे. मध्येच कुणाला तरी संध्याकाळच्या मिरवणुकीची आठवण झाली. आजूबाजूला बघायला कुणी खास असं दिसलं नाही त्यामुळे एक कॉमेंट आली. ती मुकेशची होती. मुकेश म्हणजे एक हरहुन्नरी मुलगा. मुलगाच कारण आमच्या गॅंगमध्ये सर्वात तरूण आणि स्मार्ट. संपूर्ण प्रवासांत तोच भाव खाऊन गेला. तो सहजच म्हणाला, हॉं यार, आपलं बॅडलकच खराब होतं संध्याकाळची वेळ आसल्यामुळे आपल्याकडे बघायला कुणीच नव्हतं. त्या वाक्यावरून सर्वत्र हशा पिकला. सकाळी हारिपादला जायचं होतं त्यामुळे पिल्लेंनी सर्वांना वॉर्निंग देऊन ठेवली. ए, सकाली सकाली लौकर उटायचं़ आपनेको जयचंद्रन के गॉंव जानेका है. मग काय, लगेच सगळे आडवे झाले. सकाळी आम्ही सगळे लवकर उठलो. काही जणांना लवकर उठण्याचं फारच जिवावर आलं होतं कारण एरवी त्यांची सकाळ आठ-साडेआठला उगवायची कारण आयआयटी क्वार्टर्स मध्ये राहात होते ना. त्यामुळे त्यांना लवकर उठणं जरा जडच गेलं तरी पण नाइलाजास्तव उठावंच लागलं. (यह सुनील के लिए है) सुनील पण एकदम बोल बच्चन. किशोरचा फॅन. गाणी पाठ आसण्याच्या बाबतीत नंबर एक. जबरदस्त मेमरी. कुठलंही आणि कुणाचंही गाणं त्याला सार्‍या कडव्यांसाहित पाठ. आपण तर त्याला याबाबतीत मानलं. सकाळी सकाळी कुणाची आंघोळ, कुणाचं दात घासणं तर कुणाचे प्रातार्विधी चालले होते. मी दाढी करीत दरवाजात उभा होतो, सुनील मुळे आणि मुकेश यांच्याशी गप्पा मारीत. एका हातात आरसा आणि एका हातात टिवन ब्लेडचा रेझर. गप्पा मारता मारता अचानक माझा हात डोक्याच्या मागच्या बाजूला गेला आणि समोर आला तेव्हा माझ्या हाताकडे बघून सुनील आणि मुकेश जोरजोरात हसायला लागले. मी सहजच हाताकडे बाघितलं आणि माझा चेहरा आगदी फोटो काढण्यासारखा झाला. मला नेहमी केसांवरून कंगवा फिरवायची सवय. हातातला रेझर वंण्व्यासारखा मागच्या केसांवरून फिरला आणि केसांचा एक पुंजका त्याला आडकून समोर आला. झालं़ आमच्या गॅंगला माझी टांग खेचायला एक विषय मिळाला. (बकरा अ.३) सर्वांची तयारी झाली आणि आम्ही बस स्टॅंडवर गेलो. आमचे लीडर पिल्लेसाहेब यांच्यावर आमची सारी भिस्त. ते जे सांगतील ते आम्हाला प्रमाण. कारण मल्याळी भाषा बोलता येणारे ते एकटेच होते. पण त्यांचीही एक गंमत होती त्यांना मल्याळी फक्त बोलता येत होते. वाचता येत नव्हते. कारण पिल्ले जरी मल्याळी आसले तरी त्यांचं बालपण सगळं मुंबीतच गेलेलं़ शिक्षण सेंट्रल स्कूलमध्ये झालेलं़ मीडियम विंग्रजी. त्यामुळे बसच्या नावाची पाटी मल्याळी भाषेतली वाचण्यासाठी तेही आमच्याइतकेच कोरे होते. त्यांच्या या गावाचं नाव न वाचता येण्याचा फटका आम्हाला बसलाच. हारिपदला जाणार्‍या बसमध्ये बसण्याऐवजी आम्ही सर्वजण विरुद्ध दिशेला जाणार्‍या एका बसमध्ये बसलो. एका माणसाला त्यांनी नाव विचारलंही होतं. पण नवख्यांना चुकीचे मार्गदर्शन करणारे सर्वत्रच आसतात. केरळही त्याला आपवाद नाही. गाडीत बसल्याबरोबर आमची जाम धांदल उडाली. कारण केरळच्या एस.टी.त माहिलांसाठी राखीव आसलेल्या सीटसवर पुरुषांना बसायला आजिबात परवानगी नाही. बरं़ माहिलांसाठी राखीव असं लिआहिलेलं वाचण्याच्या बाबतीतही बोंबाबोंब. मल्याळी आक्षर भैंस बराबर. मग काय, या सीटवरून त्या सीटवर आणि त्या सीटवरून या सीटवर आशी आमची सीटरेस चालू झाली आणि सर्व प्रवासी आमची ही पळापळ एंजॉय करू लागले. हळूच तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसणार्‍या बायका कुठे दिसतात का ते मी चोरून बाघितलं. पण बहुधा केरळी बायकांना असं हसण्यातली गंमत माहीत नसावी. आमच्या संपूर्ण प्रवासात जेव्हा जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो तेव्हा कधीच योग्य सीटवर बसणं कुणालाच जमलं नाही. कधी प्रत्यक्ष लेडीजनी तर कधी कंडक्टरसाहेबांनी कुणाला न कुणाला तरी सीटवरून उठवलंच. एक मात्र मानावंच लागेल, केरळचे रस्ते डांबरीच पण कसे अगदी पॉश, गुळगुळीत. प्रवास करताना पोटातलं पाणी देखील हलत नाही. बसेस सुध्दा अगदी चांगल्या अवस्थेतील. आपल्याकडील एसटीचे हॉर्न सोडून सगळे पार्टस वाजतात. पण केरळच्या बसेसचं तसं नाही. कळत सुध्दा नाही मागनं बस आलीय म्हणून. कंडिशन एकदम बेस्ट. जय हो केटी (केरला ट्रान्सपोर्ट). चुकीची बस सोडून आम्ही हारिपदलाच जाणार्‍या बसमध्ये बसलो आणि दोन तासांचा प्रवास करून हारिपदला पोचलो. जयचंद्रन आमच्या स्वागतासाठी बसस्टॅण्डवर उभेच होते. आमचा ताफा त्यांच्या घराकडे निघाला आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्कशीच्या रिंगणात प्रवेश केल्याचा भास झाला. कारण इथेही आम्हाला तोच आनुभव आला. चारी बाजूंनी शेकडो डोळे आमच्यावर रोखलेले. बरं तसे काही आम्ही चित्राविआचित्र कपडे घातलेले नव्हते किंवा अगदीच दिगंबरावस्थेतही चालत नव्हतो. चांगले सभ्य माणसांसारखे कपडे आमच्या आंगावर होते. जाऊ द्या, बघणार्‍यांच्या डोळ्यांवर थोडाच हात ठेवता येतो, असं म्हणत आम्ही जयचंद्रन यांच्या सासुरवाडीला पोहोचलो. घराच्या प्रांगणात प्रवेश केला आणि मन आतिशय प्रसन्न झालं. जणू आपण आपल्या स्वप्नात आनेक वेळा बाघितलेल्या घरातच प्रवेश करीत आहोत आसा भास झाला. कारण प्रत्येकाचं विशेषत: आपणा मुंबीकरांचं एक स्वप्न आसतं.(जे मुंबीत कधीच पूर्ण होऊ शकत नाही. एक टुमदार घर आसावं़ ज्याच्या चारी बाजूंनी सुंदर फुलाफळांनी बहरलेली बाग आसावी. सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांची (कावळ्यांची नाही) मधुर किलाबिल ऐकू यावी. चांदण्या रात्री गच्चीवर झोपल्याझोपल्या मस्त दुधाळ चांदण्यांचा आस्वाद घेता यावा. अगदी असं सुंदर स्वप्न मी लहानपणापासून बघत आलो. मराठवाड्यात राहणार्‍या माझ्यासारख्याला अशा घराचं फार आप्रूप. कारण आमचा भाग सदैव दुष्काळी. मैलोन मैल तिथे माळरानं. आसलीच तर खुरटी झुडपं आणि झाडं कसली तर कडुनिंबाची, बाभळीची, तीही तुरळक. दाट वनराई आभावानंच बघायला मिळते. कोकणात राहणार्‍यांना तसं या गोष्टीचं तसं आप्रूप नाही. ते केरळवासीयांसारखेच सुदैवी. तरीही जे मुंबीत येऊन स्थायिक झाले आहेत त्यांना अशा घरांची स्वप्नं नक्कीच पडत आसतील. आसो. जयचंद्रन यांच्या घरी जाताना मी हरवणारच होतो. (सर्वांच्या मते). त्याचं काय झालं़ मी सिगारेटच्या स्टॉलवर सिगारेट घेण्यासाठी थांबलो. बाकी सगळे पुढे निघाले लोखंडेंना कॅप घ्यायची होती म्हणून. ते एका दुकानात शिरले. माझं लक्ष इकडे नव्हतं. सिगारेट घेऊन झाल्यावर मी समोर नजर टाकली तर कुणीच दिसेना. मी भरभर पुढे चालायला सुरुवात केली आणि बाकीचे जिथे शिरले होते त्या दुकानाकडे लक्ष न जाताच पुढे गेलो. न जाणो चुकामूक झाली तर? कारण जयचंद्रन यांचं घर माहीत नव्हतं़ ज्यांच्याकडे जायचं त्यांचं नाव माहीत नव्हतं़ आणि जरी माहीत आसतं तरी फायदा झाला नसता. कारण मीओ काय विचारतोय ते कुणाला कळायला तर हवं! कळपातून चुकलेल्या वासरासारखी माझी पारिआस्थिती झाली. मागे,पुढे, आजूबाजूला वळून बघत बघत मी चालत जात होतो. फक्त वासरासारखा हम्मा .स.स.स आसा आवाज काढायचाच बाकी होता. बाकी सगळे दुकानातून बाहेर पडले आणि माझी ही धावपळ बघून पोट धरधरून हसायला लागले. अचानक मी सहजच मागे बाघितलं आणि माझ्या जिवात जीव आला. मी थांबलो आणि आमच्या ग्रूपमध्ये सामील झालो. कुणाचीही खेचण्यात अगदी एक्सपर्ट आसलेल्या सुनील मुळे यांना माझी खेचायला आणखी एक विषय मिळाला. भाषेच्या गमतीवरून आठवलं़ लोखंडे चॉकलेट घेण्यासाठी एका दुकानात शिरले. १०ची नोट दुकानात आसलेल्या माणसाच्या हातात दिली आणि दोन बोटं वर करून दोन रुपयांची चॉकलेटस द्यायला सांगितली. त्याने मान हलवून काहीतरी विचारल. लोखंडेंना वाटल, आपण त्याला सांगितलेलंच तो पुन्हा आपल्याला विचारतोय. त्यांनीही मान हलवून हो,हो केलं. त्यानं चांगली दोन्ही हातांच्या ओंजळीत बसतील एवढी चॉकलेटस लोखंडेंच्या हातात ठेवली. लोखंडेंना फारच अश्चार्य वाटलं आणि आनंदही झाला.त्यांना वाटलं़ आरे वा, केरळात चॉकलेट बरीच स्वस्त आहेत. त्या खुशीतच त्यांनी उरलेले पैसे परत घेतले तेव्हा लक्षात आलं़ त्यानं पाच रुपयांचं नाणं त्यांच्या हातावर टेकवलं होतं. म्हणजे स्वस्त बिस्त काही नाही, दोन ऐवजी चक्क पाच रुपयांची चॉकलेटस त्यानं लोखंडेंना दिली होती. ते उगीचच खुशीची गाजरं खात होते. तसाच प्रकार वीरघट यांच्या बाबतीतही घडला. त्यांना सिगारेट हवी होती. त्यांनी पाच रुपये दिले आणि विल्स सिगारेट मागितली. स्टॉलवर आसलेल्या वयस्कर बाईला काही कळलंच नाही. तीन चार मिआनिटे दोघं जण खाणाखुणा करून एकमेकाला काहीतरी सांगत होते. शेवटी वैतागून वीरघट यांनी नोट परत घेतली आणि तिथून पुढे चालू लागले. वीरघट यांचा स्वभाव म्हणजे एकदम साधा सरळ. सगळ्यात मिळून मिसळून वागण्याची त्यांची वृत्ती. कधी कुणाला आपशद्ब बोलणे नाही की कुणाचे मन दुखावणे नाही. गाण्यात मात्र त्यांना जबरदस्त इंटरेस्ट. मुकेश म्हणजे त्यांचा आवडता गायक. गाण्याच्या भेंड्यात ते अगदी मनापासून भाग घेत. आसो. जयचंद्रन यांच्या घरी आमचं अगदी जोरदार आगतस्वागत झालं. त्यांच्या पाहुणचारानं आम्ही सर्व अगदी भारावून गेलो. पुट्टु हा खास केरळी पदार्थ त्यांनी आमच्यासाठी बनवून ठेवला होता. तांदळाच्या पिठापासून बनवलेला हा पदार्थ त्यावर केळं कुस्करून आणि वर साखर पेरून खायचा आसतो. आतिशय स्वादिष्ट आसा पदार्थ खाऊन आम्ही तृप्त झालो. त्यानंतर परसातल्या नारळाच्या झाडांवरून आमच्यासमोरच काढलेल्या नारळाचं आमृतमधुर पाणी आणि कितीही खाल्ली तरीही हवीहवीशी वाटणारी ताजी ताजी गोड मली, पोट अगदी तुडुंब भरलं़ पण त्यांच्या स्नेहमधुर वागणुकीनं आम्ही आधिकच तृप्त झालो होतो. पुन्हा याल तेव्हा आपल्या कुटुंबासाहित आवश्य या, असं अगदी आग्रहाचं निमंत्रण घेऊन भारावलेल्या अवस्थेतच आम्ही त्या सर्वांचा निरोप घेतला. जयचंद्रन यांनी आमच्याबरोबर गाईड म्हणून हिंदी बोलता येऊ शकणार्‍या, मुरली नावाच्या त्यांच्या मेव्हण्याला आमच्याबरोबर दिले. आता भाषेचा काही प्रश्नच येणार नव्हता. तिथनं निघून आम्ही एका मांदिरात शिरलो. त्या मांदिराचं आणि जयचंद्रन यांचं खास आतूट असं नातं होतं. त्या मांदिरात एक सोन्याचा खांब होता, तो रोवला गेला त्याच दिवशी जयचंद्रन यांचा जन्म झाला होता आणि दुसरं म्हणजे त्यांचं शुभमंगल देखील याच मांदिरात झालं होतं. त्यामुळे मांदिरात आणि त्यांच्यात एक स्नेहबंध निर्माण झाला होता. तो त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होता. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा आतिशय सुप्रासिध्द अशा नागमांदिराकडे वळाविला. हे एक जागृत देवस्थान आहे. त्या मांदिरातील नागदेवतेकडे संतातिप्राप्तीसाठी साकडं घातल्यास ती देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. याची प्राचिती आयआयटीतील एक निवृत्त कर्मचारी श्री. नाईक यांना आल्याची माहितीही जयचंद्रन यांनी पुराविली. श्री. नाईक यांना वयाच्या ५८व्या वषार या नागदेवतेच्या कृपेनं संतातिप्राप्ती झाली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव देखील नागराजच ठेवलं. मांदिर बघून झाले आणि आम्ही एका हटमेंट रिसॉर्टकडे जायला निघालो. पुन्हा एकदा ती बसची सुप्रासिद्ध धावपळ झाली. किमान दोघांना तरी स्थानभ्रष्ट व्हावं लागलं. ते रिसॉर्ट आतिशय चांगलं आहे, तिथे राहण्या- खाण्याअपिण्याची सर्व व्यवस्था आहे असं कळालं होतं त्यामुळे श्रमपारिहार करायला यासारखी दुसरी जागा नाही असं सर्वांनाच वाटत होतं. मोठया उत्सुकतेने आम्ही बसमधून उतरलो आणि रिसॉर्टच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आम्हाला त्याबाजूला येताना बघून गेटवर उभ्या आसलेल्या वॉचमनची जी हालचाल झाली ती बघून माझ्या मनात पाल चुकचुकली. मोर्चा आल्यानंतर तो आडवण्यासाठी पोलिस जशी पोझिशन घेतात अगदी तशाच पद्धतीने तो वॉचमन पुढे सरसावला होता. आम्ही त्याच्याजवळ गेलो आणि आमच्या दुभाष्याला पुढे केले. वॉचमनने जे सांगितले ते ऐकून सर्वांची तोंडं अगदी कडू औषध प्यायल्यावर व्हावी तशी कडवट झाली. त्या रिसॉर्टचं पाजण्याचं लायसन्स अगदी नुकतंच रद्द झालं होतं. पार्टनर्सच्या भांडणातून आमच्यासारख्यांचा मात्र तोटा झाला होता. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ असं म्हणतात. पण इथं मात्र तोटाच झाला होता. त्या भांडणार्‍यांना आणि वॉचमनला शिव्यांची लाखोली वाहात आम्ही पुन्हा बसस्टॉपच्या दिशेने निघालो. रणरणती दुपार झाली होती, सगळ्यांच्या पोटांत भूक पण धगधगत होती. ए, आभी खानेपीनेका बंदोबस्त करो भाई, भौत भूक लगेला है यार, सगळ्यांनी एकसुरात भूकगाणं गायला सुरुवात केली. बस यायला वेळ होता म्हणून आम्ही एका टुरिस्ट टेम्पोला हात दाखवला. आम्ही एकंदर दहा जण होतो. सर्व जण टेम्पोमध्ये घुसलो आणि टेम्पो अगदी खचाखच भरला. टेम्पोत सुध्दा मागचे सीट फक्त माहिलांसाठी राखीव होतं. आम्हाला या गोष्टीचं फार कौतुक वाटलं आणि केरळी लोकांबद्दल आदर देखील. कारण बसमध्ये सुध्दा माहिलांसाठी राखीव आसलेल्या आसनांवर केरळातले पुरुष चुकूनसुध्दा बसत नव्हतं आणि बसलेच तर आमच्यासारखे चुकलेमाकलेले परप्रांतीय. मला आपली मुंबीतली बेस्ट आठवली, माहिलांसाठी राखीव जागांवर पुरुष हमखास बसतात आणि एखाद्या माहिलेनं जर त्यांना उठायला सांगितलं तर बसलेल्या दोघांपैकी प्रत्येक जण दुसर्‍याकडे बघत ढिम्म बसून राहतो. शेवटी कुणीच उठत नाही आणि ती गरीब बिचारी माहिला ताटकळून शेवटी बसण्याचा नाद सोडून देते आणि गदार्चे धक्के खात उभी राहते. जाऊ द्या. तर सांगत काय होतो, जिथे माणसे दिसतील तिथे टेम्पो थांबत होता आणि दरवाजात लोंबकळणारा किन्नर आरिप्प्पड, आरिप्प्पड असं ओरडून आत माणसं कोंबीत होता. आतल्यांची अवस्था अगदी केविलवाणी झालेली होती. माणसं एकमेकांवर ओणवी होऊन उभी होती. कुणाची मान मागे वाकलेली तर कुणाची पुढे, कुणी कंबरेत डाव्या बाजूला झुकलेला तर कुणी उजव्या बाजूला. सीटवर बसलेल्यांच्या माना कायम खाली वळलेल्या कारण त्यांना मान वर करून बघायला चान्सच नव्हता. वर मान केलीच तर त्यांच्यावर झुकून उभे राहिलेल्याच्या छातीच्या फासळ्या डोक्यावर घासायच्या. देवनारला जाणार्‍या ट्रकमध्ये जनावरं जशी कोंबतात तशी ही अवस्था होती. एवढा गच्च टेम्पो भरलेला आसून सुध्दा तो किन्नर प्रत्येक स्टॉपवर दरवाजा उघडून ओरडून लोकांना आत बोलावत होता. शेवटी आम्हालाच त्याच्यावर ओरडावं लागलं तेव्हा कुठं त्याची कोंबाकोंबी थांबली आणि आम्ही कसेबसे हारिप्प्प्पडला एका रेस्टॉरंटसमोर उतरलो. मस्त खाणांपिणं करून सगळे सुस्तावले. संध्याकाळचे साडेपाच झाले होते. आता दुसरी कुठली स्थळं पाहायला जाणं शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही पेरूवेरला परत फिरलो. पेरूवेरला संध्याकाळी लॉजवर जाऊन आंघोळी वगैरे करून फ्रेश झालो कारण भरपूर ऊन आणि घामाच्या धारांनी आम्ही दिवसभर न्हाऊन निघालो होतो. त्यामुळे कधी एकदा आंघोळी करतो असं सर्वांना झालं होतं. पिल्लेंनी मुंबीहून निघताना आम्हाला जो थंडीचा इशारा दिला होता तो बहुधा हवामानखात्याचा आंदाज ऐकून दिला आसावा त्यामुळे केरळात त्यावेळी मुंबीसारखाच घामाचा चिकाचिकाट होता त्याला ते तरी काय करणार! सगळ्यांनी या त्यांच्या इशार्‍यावरून त्यांना चांगलंच पिडलं. संध्याकाळी टाईमपास म्हणून साऊथ परव्वूरच्या (हेच खरे नाव) मार्केटमध्ये चक्कर मारायचं ठरलं. सगळ्यांनी आपापले ठेवणीतले कपडे बाहेर काढले. सगळ्यांत आकर्षक ड्रेस होता नरेंद्र खराडे यांचा. आम्ही मार्केटमधून फिरायला सुरुवात केली आणि सर्वांचं आकर्षण तेच बनले. हाफपॅंटमध्ये शर्ट खोचलेला, पायात बूट आणि मोजे, सडपातळ देहयष्टी, गोरा रंग आणि डोक्यावर इकेटचे मैदान त्यामुळे ते फारच गंमतशीर दिसत होते. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच वळत होत्या आणि प्रत्येकाच्या ओठावर नकळत हसू फुटत होतं. माना वळून वळून या आनाहूत प्राण्याला न्याहाळत होत्या. त्यामुळे इतर सर्वांना त्यांचा हेवा वाटत होतं. आमच्याबरोबर जे हीरो लोक नटूनथटून आले होते ते नरेंद्रवर जाम जळायला लागले होते. कारण त्यांच्याकडे बघणार्‍यांत केरळी सुंदरींचाही समावेश होता. बिचार्‍या हीरोंची सगळी मेहनत बेकार गेली होती. त्यांच्याकडे कुणी ढुंकूनसुद्धा बघत नव्हतं. नरेंद्र खराडे अगदी खुशीत चालत होते. आपल्याला सगळे हसतायत हे माहीत आसून सुध्दा ते अगदी बिनधास्त चालत होते. त्यांना कपडे धुण्यासाठी साबण हवा होता म्हणून ते एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये घुसले. मी त्यांच्याबरोबरच होतो. खराडे दुकानात शिरले आणि जंगलात वाघाची चाहूल लागल्यावर किंवा त्याचा वास आल्याबरोबर जशी हारिणींची पळापळ सुरू होते अगदी तसाच प्रकार त्या स्टोअरमध्ये घडला. तिथे काम करणार्‍या सुंदर सुंदर तरुणी भराभर आपल्या जागेवरून हलल्या आणि दुकानाच्या दुसर्‍या भागात जाऊन ज्या आदृश्य झाल्या ते नरेंद्रजी दुकानाच्या बाहेर पडल्यावरच आपआपल्या जागी आल्या. दुकानातले बाकीचे कामगार देखील नरेंद्रकडे बघून बोट दाखवून दाखवून हसू लागले. दुकानात सुंदर तरुणी आहेत ही गोष्ट कळाल्यानंतर आमच्यातली काही शौकीन मंडळी मुद्दाम दुकानात टेहळणी करून नेत्रसुख घेऊन आली. रात्री लॉजवर आल्यावर तोच विषय चघळत व खास केरळी माश्यांची चव घेत घेत जेवणं झाली आणि सर्वांनी पथारी पसरायची तयारी झाली. काही जणांना पत्त्यांचा डाव मांड्याची लहर आली. पण सकाळी लवकर उठायचे आहे तेव्हा लवकर झोपायला पाहिजे असं सांगितलं तरी कुणी ऐकायला तयार नव्हतं. तेव्हा एक हुकमी एक्का बाहेर आला. ठीक आहे, जागायचं असेल तर जागा, पण मग रात्री चिलप यांच्याजवळ झोपावं लागेल, असं म्हटल्याबरोबर सगळे पटकन आडवे झाले. त्याचं कारणही तसेच आहे. आमचे चिलप यांना घोरण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेलं. त्यामुळे त्यांच्या घोरण्याचा सर्वांनीच धसका घेतला होता. मुंबीहून येताना ट्रेनमध्ये त्यांनी सर्वांना त्यांचं सुरेल घोरणं ऐकवलं होतं. दुसर्‍या एका प्रवाशाला त्यांनी चॅलेंज देऊन घोरण्यात हरवलं देखील होतं. आम्ही सर्व जेव्हा गाण्याच्या भेंड्या खेळायचो तेव्हा ते गाण्यांना लगेच पार्श्वासंगीत देणं सुरू करायचं कारण त्यांना गाण्याच्या भेंड्यांची ऑलजार होती. तसे स्वत: गाणे वगैरे चांगले गुणगुणतात पण भेंड्या म्हटलं की त्यांना कोण चावायचं माहीत नाही. त्यामुळे रात्री त्यांच्याजवळ झोपण्याची धमकी दिल्याबरोबर सर्व चुपचाप लहान मुलांसारखे आंथरुणात घुसले. १० तारखेला सकाळी सर्वाच्या अंघोळी वगैरे अगदी फटाफट आवरल्या. सामानाची बांधाबांध रात्रीच करून ठेवली होती. परूव्वरच्या लॉजचा मुक्काम आज हलणार होता. कन्याकुमारी, त्रिवेंद्रम वगैरे वगैरे ठिकाणी हिंडायचं होतं. पाठीवर सामानाची बोचकी बांधून रेल्वे आणि बसमधून सगळा प्रवास करणं त्रासदायक ठरणार होतं म्हणून आमचे संयोजक पिल्ले यांनी एक टोयोटा कॅलिस बुक केली. अगदी एअरकंडिशन्ड. त्यामुळे आमचा पिल्लेसाहेबांबद्दलचा आदर एकदम शतगुणित झाला. कारण पाहुण्यांना एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांनी ऑफर केली होती. पेरुव्वेर सोडण्याआधी संजीव पिल्ले यांनी आम्हाला त्यांची सासुरवाडी दाखवायचं ठरवलं. सगळे ऑटोरिक्षातून त्यांच्या सासुरवाडीला गेलो. त्यांची सासुरवाडी म्हणजे एक अतिशय सुंदर रिसॉर्टच होता. तीन बाजूंनी गर्द वनराई. त्यात केळी,सुपार्‍या, नारळ आदी झाडे, मिरीची वेल, मागच्या बाजूला निळंशार पाणी असलेला मोठा प्रचंड तलाव. निसर्गाचं अतिशय नयनरम्य दर्शन घडवणारा. त्याच्या काठाशी असलेली नारळाची उंचच उंच बनं. कितीही बघितलं तरी समाधानच होत नव्हतं. पिल्लेंच्या सासूबाईंनी सुध्दा आमचं मन:पूर्वक आदरातिथ्य केलं. ताज्या नारळांचं पाणी प्यायला दिलं. आपल्याकडे मैसूरपाक नावाची जी मिठाई असते साधारण तशीच चव असलेली एक मिठाई सर्वांना खायला दिली. त्यांचं घर अतिशय मोठं होतं. पिल्लेंनी आमची व्यवस्था इथे न करता लॉजवर का केली असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. पण सगळी खाणारी पिणारी मंडळी, त्यामुळे त्यांना आम्हाला तिथे नेणं प्रशस्त वाटलं नसेल. तसं वाटणं साहाजिक पण आहे. ते असलं तरी मनाला चुटपुट मात्र लागून राहिली. असो. बाहेर पडल्यावर आमचं लक्ष वेधून घेतलं ते काथ्याच्या (नारळाच्या) दोर्‍या वळणार्‍या स्त्रियांनी. एका बाजूला सूत कातायच्या (गांधीजींचा) चरख्यासारखे चरखे होते. दोन महिला तिथे बसून तो चरखा अतिशय वेगाने फिरवीत होत्या. त्यांच्या समोर साधारण ५०-६० फुटांवर दोन महिला काथ्याला पीळ देण्यासाठी उभ्या होत्या. जसाजसा दोर वळला जात होता तसा त्याला पीळ बसत होता. त्या दोघी जणी दोर हातात घेऊन पुढे पुढे येत होत्या. अतिशय भराभर वळला जाणारा तो दोर बघून आम्हाला खरोखरच त्यांच्या कौशल्याचं कौतुक वाटत होतं. बेलेकरांना ते बघून स्फूर्ती आली आणि त्यांनीही ते चाक हातात घेऊन वेगानं फिरवायला सुरूवात केली. एखादं उदघाटन करताना मंत्री जशी पोझ देतात तशी पोझ त्यांनी ते चाक हातात धरून फोटो काढण्यासाठी दिली. फोटो काढताना त्यांच्या शेजारच्या चाकावर काम करणारी बाई लाजून चूर झाली होती. कारण काम करताना त्यांचा फोटो आयुष्यात पाहिल्यांदाच कुणी काढला असेल. त्यामुळे ही रिऑक्शन अगदी नैसर्गिकच होती. इतर बायका या गोष्टीचं नवल वाटून गालातल्या गालात हसायला होत्या. तिचा हेवा पण करीत असतील मनातल्या मनात. मग त्यांचेही फोटो काढून आम्ही पुढे सरकलो. आमच्याबरोबर पिल्लेंचा मेव्हणा गोपी गाईड म्हणून आला होता. त्यानं आम्हाला मध्येच एका सुंदर टुमदार बंगल्यात नेलं. बंगल्यात शिरल्याबरोबर समोर काचेच्या भल्या मोठया शोकेसमध्ये बक्षीस मिळालेले कप, ढाली, सुंदर सुंदर चित्ताकर्षक ट्रॉफीज व्यवस्थितरीत्या मांडून ठेवलेल्या दिसल्या. पिल्लेंच्या मेव्हण्यानं सांगितलं. आपण मल्याळी, तामीळ चित्रपटांतून काम करणार्‍या एका बालनटाच्या बंगल्यात आलो आहोत. हा मुलगा अतिशय प्रवीण कथ्थकली नर्तक आहे. विविध चित्रपटांतून दिग्गज कलावंतांबरोबर त्याने भूमिका केलेल्या आहेत. एखाद्या चित्रपट कलावंताच्या घरी जाण्याची ही आमची पाहिलीच वेळ होती. तिथे आम्ही जाऊन बसलो. थोड्याच वेळात एक बालमूर्ती समोर आली. बालपणी सचिन हा बालनट जसा गोंडस दिसायचा (साचिन मोठा झाला तरी गोंडसच दिसायचा, त्यामुळेच त्याला टीनेजर हीरोपलीकडे जाता आलं नाही.) तशीच ही वामनमूर्ती. नर्तक असल्यामुळे त्याच्या कमावलेल्या शरीराचे कटस स्पष्टपणे दिसत होते. अतिशय आकर्षक आणि प्रसन्न चेहरा. चेहर्‍यावर एक गोड स्मितहास्य. सगळ्यांशी त्याने हात वगैरे मिळवला. मला तर वाटलं होतं तो येतानाच नृत्य करीत येईल आणि सर्वांना नृत्यातल्या नमस्कार मुद्रेने प्रणाम वगैरे करील. आपण आपलं पेंटल, मेहमूद वगैरे कॉमोडियन्सना नर्तकाच्या भूमिका करताना अशाच पद्धतीने नमस्कार करताना बाघितलेलं. पण तसं काहीच झालं नव्हतं. प्रत्यक्षातले नर्तक असं काही करीत नाहीत हे आत्ता कळालं. हा बालकलाकार नृत्यकलेबरोबरच जादूगारही होता. त्याने उभ्या उभ्या दोनचार हातचलाखीच्या जादू करून दाखवल्या. त्या अभिजात कलावंताबरोबर थोडा वेळ घालवून आम्ही लॉजवर परतलो तर पिल्ले यांची टोयोटा कॅलिस आमची वाट बघत होती. भराभर सगळ्यांनी आपआपल्या बॅगा टोयोटाच्या पाठीवर बांधल्या आणि लॉजला रामराम केला. आमची गाडी परव्वूरमधून बाहेर पडली आणि एका गेटसमोर जाऊन धडकली. गेटमधून आत गेल्यावर कळालं की सुप्रसिध्द (?) जयललिता यांच्या मालकीच्या एका रिसॉर्टला आपण आता भेट देणार आहोत. याच जयललिता बाईंनी धर्मेंद्रच्या इज्जत या चित्रपटात हिरॉईन म्हणून काम केलेलं होतं. त्यातली काळीसावळी, खास दक्षिणी छाप असलेली हिरॉईन चांगली वाटली होती. त्यामुळे आता ती प्रत्यक्षात कुठे दिसते का ही एक इच्छा मनात नकळत निर्माण झाली होती. पण आपल्याच विचारांचं हसूही आलं. तामीळनाडूचं मुख्यमांत्रिपद गाजवलेली ती महान बाई इथे कशाला कडमडायला येईल. तिने बांधलेला आणि तिन्ही बाजूंनी तलावाने वेढलेला तो रिसॉर्ट म्हणजे एक प्रेक्षणीय पर्यटनस्थळच होतं. तिथे राहण्यासाठी अतिशय सुसज्ज असे बंगले बांधलेले होते. आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करण्यासाठी खास कॉटेजेस बांधण्यात आले होते. आयुर्वेदिक मसाज सेंटर होतं.(हे सगळे हायफाय लोकांसाठी) मी सहजच तेथील रेटसची चौकशी कली आणि तलावातून पडता पडता मला एकानं सावरलं कारण एका दिवसाचे साडेपाच हजार रुपये म्हटल्याबरोबर मला घेरीच आली. तिथनं आम्ही लगेच काढता पाय घेतला. आमची टोयोटा मग वरकला बीचच्या दिशेने भरधाव सुटली. गाडी जेव्हा थांबली तेव्हा आम्ही एका उंच टेकडीच्या टोकावर उभे होतो. जवळजवल दीडदोनशे फूट खाली बीच होता आणि समोर निळाशार समुद्र. बीचवर आमच्यासारखे अनेक पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेत होते. काही परदेशी पर्यटक देखील रंगीबेरंगी छत्र्या वाळूत रोवून पहुडलेले दिसत होते. आम्ही टेकडीवरून खाली उतरलो आणि कपडे काढून (सगळे नाही, आवश्यक ते अंगावर ठेवून) समुद्रात उतरलो. खार्‍या पाण्यात, उसळणार्‍या लाटा अंगावर घेत समुद्रस्नान करण्यातली मजा काही औरच होती. तेही केरळातल्या बीचवर. आपल्या मुंबीतले बीच म्हणजे घाणींचे आगारच. उसळणार्‍या लाटांबरोबर प्लॉस्टिकच्या पिशव्या, फाटके कपडे आणि अजून काय काय अंगावर येईल ते तो समुद्रदेवच जाणे. बीचवर रंगीबेरंगी स्वीमिंग कॉस्च्यूम्स घालून वावरणारे परदेशी पर्यटक विशेषत: अंगावर नावालाच कपडा असलेल्या फऑरिनच्या तरुणी म्हणजे सर्व आंबटशौकिनांचे खास आकर्षण होते. त्या तरुणी जिथे जिथे सूर्यस्नान घेत पहुडल्या होत्या त्यांच्या आजूबाजूने मुद्दामच आंबटशौकिनांचे घोळके येत जात होते. बीचवर वेगवेगळ्या पोझेसमधले फोटो (आपले आपलेच) काढण्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे सरसावले. फोटोसेशन वगैरे झाले. नंतरचा स्पॉट होता तलावसागरचा. आपल्या पवई तलावापेक्षाही जास्त विस्तार असलेल्या जागेत सागराचे पाणी एकात्रित झाल्याने त्याला तलावाचे स्वरूप आले होते. जागा तलावाची पण पाणी मात्र सागराचे. या नैसर्गिक रचनेमुळेच त्या जागेचं नाव तलावसागर असं ठेवण्यात आलं असावं. तलावात बोटिंगची सोय होती. ५० रुपयांत एक तासभर तलावाची लॉंचमधून सफर घडणार होती. सर्वांनी लॉंचमध्ये प्रवेश केला. नारळ-पोफळीच्या झाडांनी वेढलेला तो तलाव म्हणजे निसर्गाच्या करणीचा एक उत्कष्ट नमुना होता. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत आम्ही तलावसागराचा विहार केला. अधूनमधून दुसर्‍या लॉंचमधून प्रवास करणार्‍या आमच्यासारख्यांना हात दाखवीत तर तलावाच्या काठावर असणार्‍यांचे लक्ष शिटया वगैरे मारून वेधून घेत आमचा नौकाविहार झाला. एवढया मोठया जलाशयात जर बोट समजा उलटली तर काय होईल असे विचार माझ्या मनात डोकावून गेले. पण संकोचामुळे बोललो नाही. एवढंच. कारण आपण बोललो तर सगळे आपल्याला भित्रा समजून आपली टिंगल उडवतील. त्यामुळे जीव मुठीत धरून गप्प बसणेच श्रेयस्कर. लॉंच काठाला लागली आणि जीव भांड्यात पडला.(कुणाचा ते अजीबात सांगणार नाही) एव्हाना संध्याकाळ झाली होती. त्यामुळे लॉजवर परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अकरा तारीख उजाडली. तीन दिवस कसे गेले ते कळलेच नाही. सकाळी पुन्हा कॅलीस मधून आमचा प्रवास सुरू झाला. मधेच रस्त्यात एक धरण बघायला आम्ही एका ठिकाणी उतरलो. ते धरण आहे असे आम्हाला सांगण्यात आले. आम्हीही सर्वानी धरणच समजून त्याची पाहणी केली आणि एकमताने त्याला मंजुरी देऊन टाकली. खरं तर तिन्ही बाजूंनी जमिनीने पाणी आडवलेले ते एक स्थान होते. पण तिथला एक माहितगार माणूस आम्हाला सांगत होता हे धरणच आहे. म्हटलं असेल बुवा, केरळातलं धरण असंच बांधत असतील. आपल्याला काय करायचंय? तिथनं पुढं निघालो आणि पुन्हा एके ठिकाणी धरणाची भिंत वगैरे दिसली आणि मग त्या माहितगारानं सांगितलं़ ये मेन डॅम है आम्ही कपाळावर हात मारून घेतला. तर असो. धरणाला मागे टाकून आमची गाडी पोचली दुधाच्या धबधब्याजवळ. खूप उंचावरून खाली कोसळणारं पांढरं शुभ्र फेसाळणारं पाणी दुधासारखं दिसायचं म्हणून तो मिल्की वॉटरफॉल. अतिशय निसर्गरमणीय असे ते स्थान होते. दाट वनराईत लपलेले. पावसाळा संपून गेल्यामुळे धबधब्याच्या कोसळणार्‍या पाण्याला तसा फारसा जोर नव्हता त्यामुळे आपेक्षाभंगच झाला. तरीही साधारण १५० फूट उंचावरून पडणारा पाण्याचा प्रचंड स्रोत, खडकावर आदळत येणार्‍या पाण्यामुळे उडणारे शीतल सुखद तुषार, उन्हाच्या तिआरिपेतून निर्माण होणारे इंद्रधनुष्य, आजूबाजूचा निसर्ग, मनाला भावणारी शांतता यामुळे ते स्थळ तसं तिथं खिळवून ठेवणारंच होतं. असं वाटायचं इथेच मुक्काम ठोकावा आणि या निसर्गसान्निध्याचा मनसोक्त आनंद अनुभवावा. धबधब्याच्या समोर उजव्या हाताला उंचावर एक छत्रीवजा दगडी बांधकाम केलेलं दिसलं. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या छत्रीसारखं. तिथे नक्कीच पूवार कुणीतरी साधू महात्मा तपश्चर्या करीत बसलेले असणार. तपश्चर्येला यापेक्षा सुंदर शांत ठिकाण कुठले असणार! हे ठिकाण बघितल्यावर मला रामदासस्वामींच्या कोकणातील शिवथर घळीची आठवण झाली. रामदास स्वामींनी तिथे तपश्चार्या केली होती. खरोखरच या महान संतांनी या जागा कशा शोधून काढल्या असतील आणि त्याकाळी अतिशय निआबिड घनदाट आरण्यात असणार्‍या अशा ठिकाणी साधना तरी कशी केली असेल? त्यांना जंगलातल्या सर्प, लांडगे, वाघ, सिंह आदि हिंस्र श्वापदांचा त्रास झाला नसेल का? या नैसर्गिक आपत्तींवर मात करून हे लोक कशी साधना करीत असतील? वेळ आधिक नसल्यामुळे त्या उंचावर असलेल्या तपश्चार्येच्या जागी जाता आलं नाही. नाहीतर तिथे जाऊन तो फील घ्यायची इच्छा नक्कीच झाली होती. ती इच्छा अर्धवटच टाकून आम्ही कन्याकुमारीच्या दिशेने कूच केले. रस्त्यात एके ठिकाणी नारियलपानी बेचनेवाला दिसला. जो आम्हाला आतापर्यंत कुठेही दिसला नव्हता. पिकतं तिथं विकत नाही म्हणतात ते हेच. केरळात कुणाला नारळाचं पाणी प्यावं वाटलंच तर तो विकत कशाला घेईल?. काढ नारळ की पी पाणी आणि खा मली त्यामुळे नारियलपानी-वाला बघितल्यावर आश्चर्यच वाटलं होतं. पण नंतर लक्षात आलं की आपण आता केरळात नसून तामीळनाडूत आहोत. नारळपाणी पिऊन सर्वांनी मली वगैरे खाल्ली. पुढे एके ठिकाणी खास केरळी पद्धतीचे जेवण घेतले. केळीच्या पानावर वाढलेला गरम गरम भात, सांबार, एका वाटीत रसम, दुसर्‍या वाटीत ताकाची कढी, वा! मजा आया! अगदी तृप्तीचे ढेकर देत देतच गाडीत बसलो. संध्याकाळी पाच वाजता आम्ही कन्या-कुमारीत प्रवेश केला. आपण आता भारताच्या दक्षिण टोकावर आलो आहोत ही अनुभूतीच विलक्षण होती. इथे भारत देशाच्या जमिनीच्या सीमारेषा संपल्या होत्या. पुढे बघावे तिथवर आपार सागरच सागर. एका वेगळ्याच मूडमध्ये आम्ही लॉजच्या शोधात निघालो. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने मीनाक्षी मांदिरासमोरच एका हॉटेलसमोर गाडी उभी केली. रेटस खूप जास्त असल्यामुळे तिथे मुक्काम करणं आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं. पण या हॉटेलचे स्वत:चे कार पार्किंग आहे आणि गाडी पार्क करायला दुसरी चांगली सुराक्षित जागा नाही त्यामुळे तुम्ही इथेच मुक्काम करा, असा हेका गाडीच्या ड्रायव्हरने धरला. आम्हाला तर हे कमिशनचं प्रकरण वाटलं. हॉटेलला गिर्‍हाइकं आणून दे, आम्ही तुला कमिशन देऊ, असे प्रकार बर्‍याच ठिकाणी चालतात. आमच्यापैकी बेलेकर, मी आणि पिल्ले आपल्या बजेटमध्ये बसणारी दुसरी लॉज मिळते का ते बघायला गेलो. एक लॉज मिळाली देखील. पण तिथे पार्किंगला जागा नव्हती, आणि कॉमन पार्किंगमध्ये कार पार्क करायला आमचे ड्रायव्हरसाहेब तयार नव्हते, शेवटी पिल्ले आणि आमच्याबरोबर आलेला त्यांचा मुलगा (हो, हे सांगायचंच राहिलं होतं. परव्वूरला पिल्लेंचा मुलगा शाळेत शिकतो, तो आमच्याबरोबर या प्रवासात होता) यांनी त्या हॉटेलमध्ये राहावे आणि बाकीच्यांनी दुसर्‍या लॉजमध्ये उतरावे, असा मार्ग काढून शेवटी आम्ही लॉजमध्ये गेलो. कन्याकुमारीला सर्व प्रकारचे जेवण मिळण्याची सोय आहे. गुजराती, राजस्थानी, मराठी,पंजाबी वगैरे वगैरे. त्यामुळे रात्रीचा जेवणाचा प्रश्न सुटला. सर्वांनी राजस्थानी जेवण घ्यायचं ठरवलं. जेवणं वगैरे करून रात्री सगळे लवकर झोपलो. कारण कन्याकुमारीचा सुप्रसिध्द सूर्योदय बघायचा होता. आजपर्यंत खूप काही ऐकलं होतं त्याबद्दल. त्यामुळे सूर्योदय बघायची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सकाळी ६:१०चा सूर्योदय होता. त्यामुळे साडेपाचपासूनच तयार होऊन, कॅमेरे सरसावून लॉजच्या गच्चीवर सगळे पोझिशन घेऊन बसलो होतो. केव्हा एकदा तो सूर्य क्षितिजातून वर डोकं काढतोय असं सगळ्यांना झालं होतं. तांबडं फुटायला सुरुवात झाली. पण जसजशी क्षितिजरेषा प्रकाशमान होऊ लागली तसतशा आमच्या सूर्य बघण्याच्या इच्छा क्षितिजावरच मावळू लागल्या. कारण क्षितिजापासून चांगला हातभर वरपर्यंत खटयाळ ढगांचा एक लांबरुंद पट्टा आम्हाला वाकुल्या दाखवत होता. ढगांच्या आड आम्हाला लालबुंद गोळा दिसायला सुरुवात झाली होती. आमच्या मनावर सुद्धा निराशेच्या काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. ढगांना शिव्या घालत समोर दिसणार्‍या विवेकानंदांच्या स्मारकाचे येतील तसे फोटो आम्ही काढत होतो. सात-सव्वासात नंतर सूर्याचं आम्हाला दर्शन झालं. तेव्हा तो चांगला कासराभर वर आलेला होता. ते सूर्यदर्शन पाहून मला शाळेत शिकत असतानाची एक कविता आठवली, बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी मोतियांच्या लावियेल्या आत झालरी कावितेचे कवी आता आठवत नाहीत पण सूर्योदयाचं इतक सुंदर वर्णन त्यात केलेलं होतं की त्यांनी बहुधा ही कविता इथे उगवणार्‍या सूर्याला बघूनच लिहीली असावी. शेवटी निराश मनाने आम्ही लॉजमधून खाली उतरलो. चहापान वगैरे करून आणि मीनाक्षी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही सगळे विवेकानंदांच्या स्मारकाकडे जाण्यासाठी असलेल्या बोटीच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. रांगेत सर्वत्र काळे कपडे घातलेले आय्यप्पा भक्त दिसत होते. १४ तारखेला आय्यप्पाचा मुख्य उत्सव असल्यामुळे शबरी मलीला जाणार्‍या आणि येणार्‍या भक्तांची प्रचंड गर्दी आम्हाला संपूर्ण प्रवासभर जाणवली. रांगेत उभे असताना स्वामी शरणम आय्यप्पो चा सर्वत्र गजर चालू होता. आपल्याकडे आषाढी कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या नावाच्या जसा गजर चालू असतो त्याचीच आठवण झाली. आमच्या ग्रूपनेही एकदा स्वामी शरणंच्या गजरात आपला आवाज मिसळला आणि मग उत्स्फूर्तपणे बोला पुंडलिक वरदा हाऽऽरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराऽऽम चा गजर केला. तिथलं सगळं वातावरणच भाक्तिमय होऊन गेलं. बोटीत चढण्यासाठी आमचा नंबर लागला आणि आम्ही सर्व जण एका विलक्षण उत्सुकतेने भारलेल्या अवस्थेत बोटीत पाय टाकला. जगतिक सर्वधर्माय परिषदेत आपल्या भाषणाची ब्रदर्स ऍण्ड सिस्टर्स अशी सुरुवात करून सार्‍या जगाला विस्मयचकित करून सोडणार्‍या स्वामी विवेकानंद या महान तेजस्वी व्यक्तिमत्वाचे तपश्चर्यास्थान बघण्याची प्रचंड उत्सुकता मनात होती. कन्याकुमारी ते स्मारकस्थान हा बोटीतला प्रवास केवळ ७ ते १० मिनिटांचा. समुद्रात उठणार्‍या प्रचंड लाटांनी आमची बोट सारखी हेलकावत होती, कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला, अशा प्रवासाचा अनुभव नसलेल्या बोटीतील सर्वच प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. एका बाजूला बोट कलंडली की, सर्वच भीतीमिश्रित आवाज काढीत. त्या आवाजाला जबरदस्तीच्या हसण्याची (भीती लपवायचा केविलवाणा प्रयत्न) एक किनार पण असायची. एकदाची बोट स्मारकाच्या खडकाला लागली आणि सर्वांनी हुश्श केलं. विवेकानंदांच्या स्मारकाच्या ठिकाणी प्रवेश केला आणि एक वेगळंच चैतन्य अंगात संचारलं. त्याची अनुभूती केवळ शब्दातीत होती. नि:शब्द अवस्थेत आम्ही विवेकानंदांचा पुतळा असलेल्या गाभार्‍यात प्रवेश केला. एकटक अवस्थेत त्या तेजस्वी मूर्तीकडे बघतच राहिलो. धीरगंभीर दृढनिश्चयी मुद्रा,पाणीदार डोळे बघणार्‍याला अक्षरश: जागच्या जागी खिळवून टाकीत होते. किनार्‍यापासून दूर, समुद्रात एकाकी असलेल्या या खडकाची जागा विवेकानंदांनी आपल्या तपश्चर्येसाठी का निवडली असेल? हिंदी महासागराच्या उसळणार्‍या लाटांवर स्वार होऊन ते इथे जेव्हा पोहून आले असतील तेव्हा त्या काळी त्या खडकावर काय असेल? तुफान लाटांशी आणि भणाणणार्‍या वार्‍याशी वर्षानुवर्षे झुंज देत असलेला तो एकाकी,काळाकाभिन्न खडक, न प्यायला पाणी, न आन्न ना निवारा, अशा ठिकाणी ४० दिवस त्यांनी कशी ध्यानधारणा केली असेल? आणि ती सुद्धा कशासाठी तर मानवतेच्या कल्याणासाठी, सत्याच्या शोधासाठी. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी. असे महान योगी पुरुष म्हणजे भारताला लाभलेलं एक वरदानच. त्यांच्या दृढ निश्चयापुढे, प्रखर ध्येयापुढे आणि रामकृष्ण परमहंसांवरील अपार श्रध्देपुढे सागर देखील नतमस्तक झाला असेल. त्या महान योगीराजाला शतश: प्रणाम करून आम्ही त्यांच्या ध्यानधारणेच्या जागी गेलो. ती खोली एका अपार शांततेने काठोकाठ भरलेली अन भारलेली होती. प्रवेशद्वारासमोरील भिंतीवरच प्रकाशमान ओंकाराचं दर्शन होत होतं.त्यासमोर बसण्यासाठी सतरंज्या टाकल्या होत्या. सर्वत्र मंद काळोख आणि समोर फक्त ओंकार! आम्ही केव्हा खाली मांडी घालून बसलो, केव्हा आमचे डोळे मिटले गेले, केव्हा मन ओंकारमय झालं ते आमचं आम्हालाच कळलं नाही. त्या मंतरलेल्या अवस्थेत १०-१५ मिनिटे कशी निघून गेली ते कळलंच नाही. बाहेर पडलो तेव्हा एक अवर्णनीय आनंद शरीरभर पसरला होता. त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर बाजूला नजर गेली तेव्हा थोड्या अंतरावर अजून एक प्रचंड पुतळारूपी स्मारकाचं बांधकाम होताना दिसलं. ते स्मारक होतं सुप्रसिद्ध तामीळ कवीचं. आंदाजे ५० ते ६० फूट उंचीचा तो पुतळा म्हणजे त्या महान कवीच्या भव्यतेचंच प्रतीक होतं. बांधकाम आद्याप चालू असल्यामुळे तिथे जायला परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा बोट पकडली आणि कन्याकुमारीला आमच्या लॉजवर परत आलो. सामानाची बांधाबांध आधीच करून ठेवली होती. आदल्या रात्री प्रत्येकाने काही ना काही खरेदी केली असल्यामुळे सामानाचे डाग वाढले होते. पण कॅलिस जिंदाबाद असल्यामुळे तिच्या पाठीवर ओझं लादून आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही कन्याकुमारीहून त्रिवेंद्रमला जायला निघालो. रस्त्यातच शुचिंद्रमच्या मंदिराला आम्ही भेट दिली. इथे एका भव्य मंदिराचं बांधकाम चालू होतं. केरळातल्या मंदिरांचं एक वैशिष्ट्य आहे. मंदिरांची भव्यता आणि एक सारखी, एक छापाची पद्धत. सगळी मंदिरं जोडलेल्या अनेक शिखरांची किंवा गोपुरांची. हेमाडपंथी बांधणीची. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आम्हाला आमचे शर्टस व बनियन्स काढावे लागले. केरळच्या बहुतेक मंदिरातून ही प्रथा आहे. देवाचं दर्शन घ्यायला जाताना शक्य तेवढया नैसर्गिक अवस्थेत जायचं, ही सक्ती कशासाठी ते आमच्या काही लक्षात आलं नाही. बरं, शर्ट तर काढायचा पण तो हातात घेऊन जायचा. हातात नेलेला चालत असेल तर मग काढायचा तरी कशासाठी? मी एका मंदिरात एका पुजार्‍याला तसं विचारायचा प्रयत्न केला देखील. पण तो काय म्हणाला हे मला कळालं नाही आणि मी काय म्हणालो ते त्याला कळालं नाही त्यामुळे मी नाद सोडून दिला आणि चुपचाप शर्ट काढून दर्शन घ्यायला पळालो. ज्या मंदिरात आम्ही गेलो ते मंदिर बजरंगबलीचे होते. आपल्याकडील बजरंग बलीला रस्त्यावरून चालताचालता नमस्कार केला तरी चालतो. पण तामीळ बजरंगबली फारच कडक असावेत. तेच काय, एकूणच सार्‍याच देवांना पुरुषांच्या शर्टांचे वावडे असावे. कदाचित एखाद्या पुजार्‍याने आथवा कुणा भक्ताने आठवडाभर अंघोळ न करता मंदिरात प्रवेश केला असावा आणि त्याच्या घामेजलेल्या शर्टाचा वास देवाला असह्य झाला असावा. त्यामुळे सार्‍या देवांनी सरसकट एक कायदाच तयार केला असणार. असो. त्या बजरंगबलींची एक आख्यायिका आहे. तिथली जी आताची २० फुटी मूर्ती आहे ती पूर्वी म्हणे खूपच लहान होती. पण गेल्या काही वर्षांपासून तिची उंची म्हणे हळू हळू वाढते आहे. त्यामुळे तिथे बिचार्‍या हनुमानरायांना एका लोखंडी पिंजर्‍यात बंदिस्त करून ठेवण्यात आलं आहे आणि त्यांचे हातपाय देखील साखळदंडाने जखडून ठेवण्यात आले आहेत. तेव्हापासून त्यांची उंची वाढायची थांबली की नाही हे कळलं नाही. पण या मानवी प्रयत्नांची मात्र कीव आली. खरोखरच जर हनुमानरायांनी ठरवलं तर साखळदंड तोडण्यापासून त्यांना कुणी आडवू शकणार आहे का? ते सुध्दा गालातल्या गालात या प्रकाराला हसत असतील. हनुमानस्तोत्रात म्हटल्याप्रमाणे, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा अशी ख्याती असणार्‍या शाक्तिदेवतेचे या मंदिरात चक्क बॉनसायचे रोपटे करून टाकण्यात आले आहे. हनुमानमूर्तीची भव्यता आणि उंची मात्र अगदी डोळ्यात भरण्यासारखी होती. शानिवारचा दिवस असल्यामुळे भक्तांची भरपूर गर्दी होती. सर्वांप्रमाणेच आम्हीही हनुमानरायांना एकशे आठ पानांची माळ आर्पण केली म्हणजे पुजार्‍याच्या हातात दिली. कारण आपल्या हातांनी बजरंगबलींच्या गळ्यात माळ घालणं प्रत्यक्षात अशक्यच होतं. पुन्हा बडवे पध्दती तिकडेही आहे. आपल्याकडे वाहण्यात येणार्‍या रुईच्या पानांपेक्षा वेगळी असणारी ही पाने होती. बिचार्‍या पिंजर्‍यातल्या बजरंगांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तिथे मंदिराच्या बाहेरच जगन्नाथपुरीला जसे भव्य रथ भक्त ओढतात तसे दोन रथ दिसले. ते बघून आमची यात्रा पुढे निघाली. एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते. त्यामुळे पोटपूजेसाठी एक हॉटेल गाठून व्यवस्थित पूजा केली आणि संध्याकाळी साधारण पाच वाजता त्रिवेंद्रम (अथिरुवनंतपूरम) ला पोचलो. तेथील एनटीसीच्या जनरल मॅनेजरांच्या नावाने बेलेकरांनी एक चिठ्ठी आणली होती. एनटीसीतील गेस्ट हाऊसमध्येच मुक्काम करायला मिळावा या उद्देशाने. पण तिथे गेल्यावर कळालं की ते आता बंद करण्यात आले आहे. तरीही जनरल मॅनेजरसाहेबांनी एक चांगले हॉटेल त्यांच्या वशिल्याने बुक करून दिले. हे सगळं झालं बेलेकरांच्या प्रयत्नांमुळे. बेलेकर या बाबतीत अतिशय हुशार. ऑर्गनायाझिंग त्यांच्या अंगांगात भिनलेले. कुठेही बिनधास्त भिडायची तयारी. त्यामुळे सगळी कामं कशी व्यवस्थित होत गेली. प्रवासात अशी माणसं बरोबर असावीच लागतात. असो. सामान हॉटेलमधील खोल्यांमध्ये टाकून फ्रेश होऊन आम्ही कोईलम बीच पाहण्यासाठी निघालो. केरळात येऊन जर तो बीच बाघितला नाही तर मग सर्व व्यर्थ आहे, असं त्याबद्दल ऐकलं होतं. पण थिरूवनंतपुरातच एक प्रसिध्द मंदिर आहे. शेषशायी भगवान विष्णूंचे पद्मनाभ मंदिर. ते पाहून मग कोईलमला जाऊ असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. त्यामुळे मोर्चा भगवान विष्णूंच्या दारी वळला. अतिशय भव्य आणि केरळच्या परंपरेला साजेसे सुंदर मंदिर होते ते. त्याहून भव्य होती तिथली भगवान विष्णूंची मूर्ती. नागावर पहुडलेली ती मूर्ती एकसंध बघताच येत नव्हती. तीन वेगवेगळ्या दरवाजांतनं मूर्ती बघावी लागते. एका दरवाजातून फक्त चेहर्‍याचा भाग दिसतो तर दुसर्‍या दरवाजातनं पोटाच्या भागाचे दर्शन होते. तिसर्‍या दरवाजातनं चरणकमलांचे दर्शन होते. त्या मूर्तीची लांबी आंदाजे २५ ते ३० फूट असावी. या मूर्तीबद्दलची विशेष अशी माहिती आम्हाला परतीच्या प्रवासात रेल्वेत कळाली. ती म्हणजे सदर मूर्ती गेल्या आठवड्यापर्यंत पाषाणाची वाटत होती, पण एक दिवस मूर्तीला अंघोळ घालता घालता एका पुजार्‍याच्या हातनं मूर्तीचा हाताचा भाग घासला गेला तेव्हा त्याला तिथला रंग बदलतोय असं लक्षात आलं. त्यानं थोडं काळजीपूर्वक घासलं तेव्हा तो भाग चक्क सोन्याचा असल्याचं कळालं. त्यामुळे संपूर्ण मूर्ती त्याच पध्दतीने स्वच्छ केली गेली आणि सर्वांना अश्चर्याचा धक्काच बसला. संपूर्ण मूर्तीच सोन्याची होती. पूर्वी एका राजानं त्या मूर्तीला चोरीपासून वाचाविण्यासाठी काळ्या रंगाचा, दीर्घकाळ टिकणारा एखादा लेप देऊन ठेवला असावा त्यामुळेच ती सोन्याची आहे हे आतापर्यंत लक्षात आलं नसावं. वर्तमानपत्रांतनं ही बातमी छापून आली आणि त्या मंदिरात भाविकांची तोबा गर्दी व्हायला सुरुवात झाली. आम्ही त्या दृष्टीने भाग्यवानच ठरलो. कारण हे लक्षात आलं त्याला केवळ आठ दहा दिवसच होऊन गेले होते. आर्थात आम्ही दर्शन घ्यायला गेलो त्यावेळी आम्हाला ही कल्पनाही नव्हती. आन्यथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला ती मूर्ती बघता आली असती. प्रचंड गर्दी असल्यामुळे जे दर्शन आम्हाला झालं ते अगदीच ओझरतं होतं. अगदी धक्काबुक्की करीतच आम्ही ती मूर्ती बाघितली होती. मंदिरात शिरल्यावर अर्धविवस्त्र होण्याची पाळी इथेही आली. एका वेगळ्या रूममध्ये शर्ट बनियन्स काढायचे आणि त्यांनी दिलेली लुंगी पॅंटच्या वरून गुंडाळायची मग मंदिरात प्रवेश करायचा. त्या रूममध्ये रॅकच्या एकेका खणात कपड्यांचा ढीग लावायचा आणि मग आल्यावर त्या कपड्यांच्या समुद्रात आपले कपडे शोधायचे. एक दिव्यच होते ते. या गडबडीत माझे बनियन गायब झाले. मंदिरातून निघून कोईलम बीचला जाईपर्यंत चक्क रात्र झाली होती. आता काय बीच बघणार कप्पाळ? पण आलोच आहोत तर जाऊया, असे म्हणून आम्ही बीचवर गेलो. आंधारातच उगीचच नुसते इकडे तिकडे हिंडलो. एके ठिकाणी परदेशी पर्यटकांच्या करमणुकीसाठी खास केरळचे विविध कलाप्रकार सादर केले जात होते. त्यात नृत्य, तलवारबाजी, दांडपट्टा यांची प्रात्याक्षिके दाखाविणे चालू होते. ते पाहिले, आंधारात गोर्‍या तरुणी बाघितल्या. आणि सरळ हॉटेलची वाट धरली. पिल्लेंनी सांगितले होते त्रिवेंद्रमला साड्या-बिड्या (सिगारेट-बिडीतल्या नव्हेत) स्वस्त मिळतात. इतरही बर्‍याच वस्तू चांगल्या आणि स्वस्त दरात मिळतात म्हणून सगळी खरेदी सगळ्यांनी बाकी ठेवली होती. लॉजवर पोचलो तेव्हा चक्क साडेआठ-पावणेनऊ वाजले होते. आता काय खरेदी करणार होतो आम्ही. तरीही बरेच फिरून बंद झालेल्या मार्केटमधे एकमेव उघडे असलेले दुकान गाठले आणि काही जणांनी साड्या खरेदी केल्या, मिठाई (केरळचा प्रसिध्द हलवा) खरेदी केली आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था म्हणून पार्सल बांधून घेतले. लॉजवर केरळातला शेवटचा दिवस साजरा केला. तो साजरा करण्यासाठी सुध्दा एका शासकीय वाईन शॉपमध्ये रांगेत उभे राहावे लागले. बरेच उपद्व्याप करून पुरेसा स्टॉक घेतला तेव्हा कुठे शेवटचा दिवस सिलेब्रेट करता आला. परतीसाठी आम्हाला नेत्रावतीचे रिझर्वेशन मिळाले नव्हते. जयंती-जनता (कन्याकुमारी एक्सप्रेस) गाडीचे मिळाले होते. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, पालथा घालून दोन रात्री आणि दोन दिवस आम्हाला प्रवासात घालवायचे होते. एवढा वेळ प्रवासात घालवायचा या कल्पनेनेच आमच्या अंगावर काटा आला होता. पण नाईलाज को क्या इलाज है, प्रवास तर करावाच लागणार होता. कारण मुंबईतल्या लोकल्स, बेस्ट आणि गर्दी आमची वाट बघत होती. आमच्याबरोबर असलेले नरेंद्र खराडे यांना आयआयटीतील एक निवृत्त कर्मचारी मेनन यांच्या गावी रेनाकुलमला जायचे होते कारण तिथून जवळच असलेल्या एका मंदिरात जाऊन आयआयटीतल्या काही जणांनी देवाला आर्पण करण्यासाठी दिलेले पैसे आर्पण करून मग पुन्हा आमच्या ग्रूपला जॉईन व्हायचे होते. त्यामुळे ते आमच्याबरोबर कोईलम बीचला न येता संध्याकाळीच रेनाकुलमला निघून गेले होते. श्री. मेनन यांच्याशी तसे त्यांचे बोलणे झाले होते आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे श्री. मेनन त्यांना स्टेशनवर घेण्यासाठी येणार होते. आम्ही केरळात येताना सुध्दा ते खास आम्हाला भेटायला म्हणून रेनाकुलम स्टेशनवर आले होते. तसं पाहिलं तर रेनाकुलम त्यांच्या गावापासून सहा किलोमीटर लांब होते. तरीसुद्धा ते गाडी येण्याच्या दोन तास आधीपासून स्टेशनवर आमची वाट पाहात होते. आयआयटीत नोकरी करणार्‍या प्रत्येकाची अशीच अवस्था होते. ३०-३५ वर्षे एकाच ठिकाणी नोकरी, कम्पसमध्ये राहणं यामुळे इथल्या वातावरणाशी, पूर्ण कॅम्पसशी, सर्व राहिवाशांशी एक आतूट असं नातं निर्माण होतं. सर्व एका कुटुंबाचे घटक बनून जातात. गाढ स्नेहाचा एक घट्ट धागा आपसूकच एकमेकांत विणला जातो. जेव्हा निवृत्त होऊन नोकरी सोडायची, कॅम्पस सोडून बाहेर जाण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकालाच फार जड जातं. आंत:करण भरून येतं. सोडून जावंसंच वाटत नाही. मग हे सगळं सोडून मुंबईपासून दूर केरळात आलेल्या कर्मचार्‍यांना कुणी आपल्याकडे येतंय म्हटलं की आनंदाच्या ऊमार उसळून येणारच. श्री. मेनन यांच्या बाबतीतही असंच झालं होतं. त्यांनी आमच्यासाठी येताना भरपूर नाश्ता बनवून आणला होता. जाताना माझ्या गावाला सर्वांनी अगदी न विसरता यायचं असं आग्रहाचं, स्नेहाचं निमंत्रण दिलं होतं पण वेळ कमी आणि सोंगं फार असल्यामुळे आम्हा सर्वांना तिथे जाणं शक्य झालं नाही. त्यांच्या प्रेमळ आमंत्रणाचा स्वीकार करता येत नाही याचं सर्वानाच वाईट वाटलं. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आमचा एक प्रातिनिधी म्हणून नरेंद्र तिथे जात होता.त्याला बेलेकर यांनी संध्याकाळीच गाडीत बसवून दिले होते. सकाळी उठून सर्वांची घाईगर्दी सुरू झाली. पटापट सामानाची बांधाबांध करून गाडीच्या टपावर सामान चढवलं गेलं. आम्ही ज्या लॉजमध्ये उतरलो होतो त्या लॉजची आठवण म्हणून प्रवेशद्वारासमोर फोटो काढून झाले. हो, फोटोवरून आठवलं, लोखंडे आपल्या कॅमेर्‍यातनं फोटो काढत गेले, ३०,३५, ४० पर्यंत रोल सरकतच होता. ते आनंदी झाले होते आपल्या रोलमधून ४० फोटो निघाले म्हणून. पण जेव्हा कॅमेरा जेव्हा ४२ चा आकडा दाखवायला लागला तेव्हा त्यांना जाणवलं, काही तरी गडबड आहे. आमच्यापैकी एकानं कॅमेरा उघडला तर काय, रोल आपल्या जागीच होता आणि नुसता रोल वाईंडर मात्र फिरत होता. बिचार्‍या लोखंडेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कारण अनेक वेगवेगळ्या पोझेस देऊन काढलेले, वेगवेगळ्या ठिकाणची चांगली चांगली दृष्ये टिपलेले सगळे फोटो कॅमेर्‍यात आलेच नव्हते. रोल व्यवस्थित लोड झालाच नव्हता. सभी स्नॅप्स बेकार गये थे| आम्ही सर्वांनी त्यांची समजूत काढली आणि तोच रोल पुन्हा लोड करून दिला. हॉटेल सोडून आमची कॅलिस स्टेशनवर आली. सर्व सामान उतरवले आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हर आनिल यांचे सर्वांनी आभार मानले कारण आम्ही आजपर्यंत ज्या कॅलिसमधून प्रवास करीत होतो ती चालवणारा चालक म्हणजे मराठीत ड्रायव्हर, ज्याचं नाव आनिल,खरोखरच अतिशय कुशल चालक होता. कुठलीही रिस्क न घेता, ओव्हरटेकिंग न करता तो अतिशय सेफ ड्रायाव्हिंग करीत होता त्यामुळे आमचा ग्रूप मुंबईपर्यंत परत येऊ शकला. त्याचे मानावे तेवढे आभार थोडेच. आमची जयंती जनता एक्सप्रेस स्टेशनवर आमची वाट पाहात उभीच होती. येतानाच्या आमच्या रिझर्वेशनचे थोडे वांधेच झाले होते. आम्ही नऊ जण होतो आणि कन्फर्म तिकिटे फक्त सहा मिळाली होती. बाकीची आरोसी होती. अर्थात जोपर्यंत दिवसाचा प्रवास होता तोपर्यंत प्रश्न नव्हता, सगळे एकत्रच बसणार होतो. रात्रीच्या प्रवासातच प्रॉब्लेम येणार होता. पण आय्यप्पा कृपेने रात्रीपर्यंत सर्वांचीच तिकिटे कन्फर्म झाली. परत येतानाच्या प्रवासात एक धमालच झाली. दोन रेल्वे पोलिस आले आणि सांगू लागले, खिडकीचे शटर्स वगैरे लावून घ्या. आता दरोडेखोरांचा एरिया सुरू होणार आहे. ते खिडकीतून हात घालून जे मिळेल ते ओढून घेतात. नाही दिलं तर सरळ सुरे-बिरे गळ्याला लावतात. तेव्हा खिडक्या आजीबात उघड्या टाकू नका. आमच्या लोखंडे साहेबांची ते ऐकून पाचावर धारण बसली. त्यांनी एकूण चारपाच बर्थ बदलून बाघितले. कुठल्या बर्थवर कुठपर्यंत दरोडेखोराचे हात सुरीसह पोचू शकतील याचे आंदाज घेतले आणि त्यातल्या त्यात जिथं सुराक्षित वाटलं त्या बर्थवर ते डोक्यावरून घट्ट पांघरूण घेऊन झोपले. एवढी सगळी काळजी घेतली पण ती दरोडेखोरांना कळायला हवी ना? बिचार्‍या लोखंडेंची सारी सुराक्षिततेची काळजी वाया गेली. ते आले असते तर किती बरं झालं असतं असं आम्हाला सगळ्यांना वाटून गेलं. कारण दरोडेखोर आलेच नाहीत. त्यामुळे त्या रात्री झोपेचं मात्र खोबरं झालं. आमच्या गाडीनं तामीळनाडू सोडून कर्नाटकात प्रवेश केला तेव्हा दिवस उजाडला होता. आमची गाडी आता सूर्यफुलांच्या प्रदेशातून प्रवास करीत होती. असं वाटत होतं, आवतीभवती सूर्यफुलांचे जणू आंथरले कुणी गालिचे पदर जणू हे वसुंधरेच्या पिवळ्या गर्भरेशमी साडीचे त्या दृश्यावरून नजर हटतच नव्हती. असं वाटत होतं हे गालिचे असे मुंबईपर्यंत संपूच नयेत. पण तसं होणार नव्हतं. कारण गाडीने आंध्रात प्रवेश केला आणि दोन्ही बाजूंनी मोठमोठे काळे भोर खडकांचे डोंगर दिसायला लागले. कुठे सूर्यफुलांच्या बागा आणि कुठे हे नजर संपेपर्यंत दिसणारे दगडी डोंगर. निसर्गाची किमया ही अशीच आहे. त्यानं आपली सारी संपत्ती दो हातांनी नुसती उधळून दिलीय. कुणाच्या नशिबी फुलं आली तर कुणाच्या नशिबी दगड! चाय, चाय, काफी असे आवाज आले आणि लक्षात आलं आपल्याला आता चहाची गरज आहे. या गाडीत या चहा कॉफीवाल्यांचा अगदी सतत वावर असतो. एक गेला की दुसरा की तिसरा, त्यांची रांग संपतच नाही. नाश्ता आणि चहा, कॉफी अगदी रात्री बारा वाजता पाहिजे असेल तरी मिळू शकेल. रेल्वेची ही या गाडीतली सेवा म्हटलं तर अतिशय चांगली आणि म्हटलं तर त्रासदायक देखील. कारण रात्री अक्षरश: या लोकांना सांगावं लागतं, आरे बाबांनो, आता आम्हाला झोपू द्या. चहा, कॉफी घेऊन झाली आणि मग गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. पत्ते खेळणं गाडीतील पोलिसांना मान्य नव्हतं त्यांनी दोन वेळा आमचं खेळणं अगदी नम्र भाषेत सांगून बंद करायला सांगितलं होतं. त्यांच्या या नम्रपणामुळे भारावून जाऊनच आम्ही पत्ते खेळणं बंद करून टाकलं होतं. दोन दिवस आणि दोन रात्री अशाच संपल्या आणि तिसर्‍या दिवशी सकाळी सकाळी नाकात कारखान्यांचा धूर नाकात शिरला. मुंबईत शिरल्याची जाणीव त्या वासानं आम्हाला करून दिली. संपला आमचा प्रवास एकदाचा! जयंती जनताला रामराम करून कुणी कल्याणला उतरले तर बाकीचे ठाण्याला. केरळच्या निसर्गाची सुंदर दृश्ये आपल्या मन:पटलावर कोरून घेऊनच! %%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob1&lang=marathi %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 डिसेंबर १९७६ मध्ये सौ. सुषमाचे (सुनेचे) पत्र आले की 'तुम्ही आता आजी आजोबा होणार, तेव्हा इकडे येण्याचा बेत आता ठरवायला हवा'. पत्र वाचून आनंदाला सीमा नव्हती. मुलगा सून अमेरिकेत आहेत, तेव्हा एक ना एक वेळ आपण तिकडे जाणार हें नक्की होतेच, तथापि आता आपण अगदी लौकरच अमेरिकेस जाणार हे निश्चित झाले. नातवाचे आगमन हा जीवनांतील मोठा आनंदाचा क्षण. मग आमचे पुढील दौर्‍याचे बेत सुरू झाले. आणि तो दौरा सुद्धा परदेशचा, तेव्हा सर्वानाच त्याचे कौतुक; मग बेत करणे काय विचारता. रोज कांहींना कांहीं विनोद, गप्पा, गोष्टी चालायच्या. ठरलेल्या कामाला अगोदर पासून सुरुवात करावी, उद्याचे काम आज करावे त्याप्रमाणे आमचा पासपोर्ट एक वर्ष अगोदर काढून ठेवला होताच. नंतर दोन महिन्यांनी रविचे (मुलाचे) पत्र आले कीं 'आता व्हिसा मिळवण्याच्या मागे लागा' कारण व्हिसा मिळवणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम; ते लौकर होणे कठीण. मग तेव्हा पासून व्हिसा मिळवण्याकरता 'ह्यां'ची जोरांत खटपट सुरू झाली. आता अमुक माहिती पाहिजे, आता तमुक माहिती पाहिजे; मग ती रविकडून मागवायची, ते सर्व मिळवायला आणखी दिवस खर्ची पडायचे. अमेरिकन कॉन्सुलेटमध्यें 'ह्यां'ना खेपा घालाव्या लागायच्या. असे होता होता त्यांना पाहिजे तो सर्व मसाला रविनी पुरवला व सर्व सव्यापसव्य होऊन दि. २० एप्रिल १९७७ रोजी एकदाचा व्हिसा पदरांत पडला. मग आमची अमेरिकेच्या प्रवासाच्या तयारीची खरीखुरी सुरवात झाली. सुनेच्या बाळंतपणासाठी जायचे मग चार पथ्याचे, खाण्याचे जिन्नस घ्यायला पाहिजेत. डिंक, हाळीव; कुठे सुंठ, ओवा, शोपा; आणखी कांहीं कांहीं; सर्व तयारी घेतली. बाळासाठी बाळलेणें बाळंतविडा म्हणून कपडे-दुपटी वगैरे तयारी झाली. हे सर्व करण्यास बाळाच्या दोन्ही आत्यांची धावपळ; पण हे सगळे न्यायचे म्हणजे सतत वजनाचा काटा डोळयापुढे. कारण माणसी वीस किलोपेक्षा जास्त वजन होता कामा नये. सुनेला चार रुचकर पदार्थ खाऊ घालण्याची मनापासूनची इच्छा (लांब असल्यानें तिचे डोहाळे कांहींच पुरवले गेले नाहीत). तेव्हा थोडे लोणचे-पापड वगैरे घेतले. सामानाची बॅग सतत काटयाला लावून कायद्यात बसेल असे सर्व व्यवस्थित झाले. 'ह्यां'ची सतत सांगी कीं 'सामान जास्त वाढवू नका.' जर का वजन जास्त झाले तर पंचाईत; जिन्नस वाया जातील व पुन्हा आपल्यावर बोल येईल ही भीती. चि. रविने आम्हा दोघांच्या मुंबई ते सॅन होजे व परत अशा इकॉनामी क्लासच्या परतीच्या तिकिटांसाठीं एअर इअंडियाकडे अमेरिकेंतच डॉलर्स २१३० (रु. १९१७०) भरले होते. त्यामुळें इकडील त्या विमानकंपनीच्या कचेरींतून सदरील विमानांत दोन जागा रिझर्व करून घेतल्या. त्यासाठी त्या कचेरीकडे 'ह्यां'ना बरेच खेटे घालावे लागले. पण सर्व व्यवस्थित होऊन आम्ही दोघे दि. १८ मे रोजी रात्रीच्या बोईंग ७४७ विमानाने रात्री १२|| वाजतां मुंबईहून अमेरिकेच्या प्रवासाला निघालो. प्रथमच विमानांत बसलेली मी. मला झोपाळयावर बसणेंसुद्धा परवडत नाही. तेव्हां कसे होईल, काय होईल असे वाटत होते. पण विमान निघतांना कळलेसुद्धा नाहीं. आपण विमानांत अधांतरीं आहोत कीं जमिनीवर आहोत! वाटले, काय माणसाची अजब युक्ति! मग प्रवासांत खाणें पिणें सुरू झाले. विमानसुंदरी सेवेला हजर होत्या. त्यांचे वागणे व बोलणे फार गोड असते. असा मजेत प्रवास करीत करीत रात्रीं २ वाजता दिल्लीला पोहोंचलो. पण नंतर बराच वेळ झाला तरी विमान सुटण्याची चिन्हे दिसेनात! काय झाले हे कळेना. शेवटी सकाळीं चांगले उजाडल्यावर सात वाजतां विमानाच्या इंजिनांत बिघाड झाल्याचे सांगण्यात येऊन आम्हा सर्व प्रवाश्यांना खाली उतरण्यास सांगितले. पुन्हा पुढचा प्रवास केव्हा सुरू होणार हे माहीत नव्हते. दिल्लीला विमानतळावरील एका हॉटेलांत चहा-कॉफीसाठी ही झुंबड उडाली! इतकी माणसे एकदम आल्यावर सर्वांना चहा-कॉफी कशी पुरी पडणार. पण आम्ही मुंबई नुकतीच सोडली असल्यानें रांगेंत उभे रहाणें व प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपडणे हें विसरायला झाले नव्हते. तेव्हां धडपड करून एक कप चहा मिळवला. तेवढयांत विमान तयार असल्याचें कळले. मग पुन्हा जवळच्या सामानाच्या चेकिंगचे दिव्य करावे लागले. माझी नऊवारी साडी; कांहीं लपवायचे असले तर लपवायला जागा पुष्कळ. तेव्हा कसून तपासणी झाली. क्यूत उभे रहाणे झाले. सर्वांची तपासणी होऊन सर्वजण पुन्हा विमानांत बसलो. बरोबर 8|| वाजतां विमान सुटले. अर्धा प्रवास झाल्यावर कळलें कीं विमान पुन्हा मुंबईस चालले आहे! मोठी गंमत वाटली. 11|| वाजतां (मुंबईस) सांताक्रूझ विमानतळावर आलो. एकदा वाटलें घरीं मुलींना फोन करावा गंमत म्हणून; मुली भेटतील पुन्हा; पण बाहेर सोडीनात व जवळ भारतीय नाणे पण नव्हते; मग मार्गच खुंटला. मुंबई विमानतळावर दोन तास बसून राहिल्यावर पुन्हा एकदा जवळच्या सामानाच्या चेकिंगचे दिव्य करून नवीन विमानांत बसलो व हायसें वाटले. विमानांत बसल्यावर मनांत विचार आला कीं महाराष्ट्रांतील एस. टी. असो किंवा परदेशी जाणारे विमान असो, गोंधळ व धावपळ सारखीच. अर्थात विमानाचा प्रवास शतपटीनें आरामाचा हें निर्विवाद. मग मात्र आमचा पुढील प्रवास सुरळीतपणें व आरामांत सुरू झाला. नवीन विमानानें दुपारी १ वाजतां सांताक्रूझ विमानतळ सोडल्यावर आमचा पुढील प्रवास झपाटयाने झाला. विमानास अगोदरच सुमारे बारा तास उशीर झाला असल्यानें आमच्या विमानाने थेट रोमकडे कूच केले. रोमला सयंकाळी ९ वाजण्याचे सुमारास विमान पोहोंचले. थोडा वेळ तेथे थांबून विमानाने फ्रकफुर्टचा टप्पा रद्द केला व विमान थेट लंडनकडे निघाले ते रात्री १० वाजतां लंडनला आले. तेथे आम्ही इतर प्रवाशां- बरोबर तेथिल विमानतळावरील कांहीं विभागांत हिंडून आलो. विमानाच्या बाहेर गेलो असल्यामुळें तेथील सेक्युरिटी ऑफिसरनीं आमची आंगझडती घेतल्यावरच आम्हास विमानात पुन्हा प्रवेश करू दिला. लंडनहून आमचे विमान न्यूयॉर्क (जे.एफ. केनेडी) विमानतळावर रात्री १२ वाजता म्हणजे दि.१९ मे रोजीं (गुरुवारीं दुपारचे ३ ऐवजी गुरुवारीं रात्रीं अथवा) शुक्रवारीं अगदी सकाळी पोहोचले. एवढी रात्र झाली असूनही सौ.सुषमाची मावशी सौ.मंगला व श्री.मोघे आम्हास उतरवून घेण्यासाठी व आमच्या स्वागतार्थ विमानतळावर आले होते. अर्थात आमचे विमान मुंबईहून उशीरा सुटले; ते न्यूयॉर्कला रात्रीं येईल याबद्दलची सूचना रविकडे व श्री.मोघे यांना एअर इंडियाच्या ऑफिसकडून अगोदर मिळाली असल्यानें आम्ही श्री. व सौ.मोघे यांच्याकडे दोन दिवस मुक्काम करायचा वगैरे बेत त्यांनीं अगोदरच ठरवून रविबरोबर फोनवर सर्व निश्चित केले होते. त्याप्रमाणे आम्ही रात्रीं त्यांच्याबरोबर ३० मैलावरील न्यूजर्सीमधील एअलिझाबेथ या शहरांतील त्यांच्या घरीं गेलो. सौ. मंगला मोघे व श्री. भाल (उर्फ भय्यासाहेब) मोघे यांनीं त्यांच्याकडील दोन दिवसांच्या मुक्कामांत आमचा पाहुणचार फार प्रेमाने व उत्तम केला;जणू कांहीं आम्ही आपल्या मुलीकडेच आलो आहोत असे वाटले. शुक्रवारीं संध्याकाळीं श्री. मोघे ऑफिसांतून घरी परत आल्यावर उभयता पतीपत्नीसमवेत आम्ही एअलिझाबेथ येथील सुंदर व भव्य उद्यान पाहिले. दुसर्‍या दिवशीं शनिवारीं सुट्ठी असल्यानें सकाळीच त्यांच्याबरोबर न्यूयॉर्क शहर पहाण्यास त्यांच्या गाडींतून आम्ही दोघे गेलो. वेळ फार थोडा होता तेव्हां खूपसा भाग गाडींतून हिंडताना पाहिला; तथापि न्यूयॉर्क शहरांतील मोठमोठया रस्त्यांची व गगनचुंबी इमारतींची कल्पना आली. सगळेच भव्य-दिव्य! जातांना प्रथम न्यूजर्सीतील स्टीव्हन इंस्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीकडे आलो. तेथे विद्याथ्यांसाठी काय नव्हते, सर्व सोईंनी सुसज्ज इमारती होत्या. नंतर एकशेदोन मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग वगैरे सुप्रसिद्ध इमारती बाहेरून पाहिल्या. हा सर्व भाग मुंबईच्या फोर्ट भागासारखा भासला. इमारती वगैरे पाहात पाहात शेवटी स्वातंत्र्य देवीच्या पुतळयाकडे आलो. हा पुतळा समुद्रांत आहे. तेथे बोटीनें जावे लागते. बोट तरी किती मोठी; फार मजा वाटली. बोटींतून पाऊणएक तासाच्या प्रवासानंतर समुद्रांतील एका बेटावर उतरलो. तेथे मोठा बगीचा आहे जिकडे तिकडे सर्व स्वच्छ. स्वातंत्र्य देवीचा पुतळा फारच उंच व भव्य आहे. पुतळयाची उंची चौदा मजल्याइतकी आहे. एका विस्तृत चौथर्‍यावर हा पुतळा बसवला आहे. पुतळा तांब्याचा बनवला आहे. पुतळयासाठी किती तांबे लागले व पुतळा बनवण्यास किती दिवस लागले, कोणी तो बनवला वगैरे सर्व तपशील चौथर्‍यावरील पुतळयाखालील इमारतीच्या भिंतीवर लिहिला आहे. तेथे प्रथम आम्ही एक सिनेमा-शो पाहिला. पुतळा केव्हा व कसा बांधून झाला तो सर्व इतिहास एक तास सिनेमा रूपाने दाखवतात. पुतळा आंतून पोकळ असल्यानें सर्व पुतळा आंतून-बाहेरून हिंडून पाहाता येतो. चौदा मजल्याइतक्या उंचीपैकीं पहिल्या सहा मजल्यापर्यअंत लिफ्टने वर जाता येते. मजल्या मजल्यावर खूप कलाकुसर केली आहे. तेथे मुख्य म्हणजे म्यूझियम आहे. त्यांत अनेक प्रकारचे ऐतिहासिक प्रसंग दाखवले आहेत. पाहून डोळे दिपून जातात; असे वाटते कीं एवढे सगळे पुतळयांत तयार केले कसे! पुतळयाचा वरील सर्व डोक्यापर्यंतचा भाग शिडयांवरून चढून जाऊनच पाहावा लागतो. तेथून न्यूयॉर्क शहराची व आसमंत भागाची शोभा पाहाता येते. शिडयांवरून खालीं उतरल्यावर व लिफ्टने खाली परत आल्यावर बागेत बसून थोडें खाऊन व पाणी पिऊन घेतले. तेथे प्रथमच एक गोष्ट मजेदार व नवीनच पाहाण्यास मिळाली. एका यंत्रांत निरनिराळया पेयांचे कप्पे केलेले असतात. यंत्रावर त्या त्या पेयाचे नांव व त्याची किंमत लिहिलेली असते. जे पेय पाहिजे असेल त्या कप्प्यांत पेयाच्या किंमतीचे अमेरिकन नाणे टाकले कीं लगेच खालच्या अंगास चटकन एक ग्लास आपोआप येतो व त्यांत ते पेय पडते. पेला भरल्यावर आपोआप यंत्र बंद होते व आपण तो काढून घेऊन पेय प्यायचे. पेला अर्थात कागदाचा असतो. तो तेथील कचर्‍याच्या पिंपात टाकायचा असतो. कचर्‍याची पिंपे जागोजागी ठेवलेली असतात. सगळीकडे अगदी स्वच्छता असते. कचर्‍याची पेटी पण अगदी स्वच्छ दिसते. ही कचरा पेटी आहे असे वाटत सुद्धा नाही. किंमतीबद्दल घासाघीस नको, की वेळ जायला नको. आणखी गंमतीची गोष्ट म्हणजे पेयाच्या किंमतीपेक्षा मोठे नाणे असले तरी तें नाणें यंत्रांत टाकल्यावर जादा दिलेले पैसे यंत्रांतून आपोआप बाहेर येतात. फारच आश्चर्य वाटले. असो. पुतळा पाहाण्यासाठी लोक येत असतात व पाहून झाल्यावर जात असतात. या सर्व लोकांची ने आण समुद्रांतून बोट करीत असते. आम्ही परतणार्‍या बोटींतून समुद्रावरून धक्क्यावर परत आलो. मोटारींतून परत जातांना वाटेंत दोन नवीन गगनचुंबी पण एकसारख्या जोडीनें जवळ उभ्या असलेल्या शंभराहून जास्त मजल्याच्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या इमारती मोटारींतून खाली उभे राहून पाहिल्या. कारण वेळे-अभावी इमारती चढून बघणे शक्य नव्हते. असे सर्व भव्य व दिव्य वाटणारे बघून रात्रीं ९ वाजतां आम्ही घरी परत आलो. एअलिझाबेथ कडून न्यूयॉर्ककडे जातांना व एअलिझाबेथला दुसर्‍या रस्त्यानें परत येतांना अनुक्रमे लिंकन टनेल व हडसन टनेल मार्गे नदीखालून जाणार्‍या बोगद्यातून मोटार जाते. हे बोगदे फारच लांबीचे असून विजेच्या दिव्यांनीं सुशोभित व प्रकाशित केलेले आहेत. दुसरे दिवशी रविवारीं दि. २२ मे १९७७ रोजीं पाहुणचाराचे गोड जेवण करून मोघे मंडळींचा प्रेमाचा निरोप घेऊन एलिझाबेथहून न्यूजर्सी स्टेटमधील 'न्यूअर्क' नावच्या विमानतळावर आलो. श्री. मोघे यांनीं तेथून निघणार्‍या टी. डबल्यू. ए. विमानांत सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यतच्या आमच्या विमानाचे आरक्षण केले होतेच. म्हणजे मुंबईहून अगोदर निश्चित केलेल्या अमेरिकन एअ-अर लाईन्स कंपनीच्या विमानानें जे. एफ. केनेडी विमानतळावरून सॅन होजेला चि. रविच्या गांवीं तडक जाण्याएएवजीं तेवढयाच भाडयांत न्यूअर्क पासून सॅन फरॅसिस्कोला टी. डबल्यू. एअ. विमानानें आमचा पुढील प्रवास मुक्रर करण्यांत आला होता. त्या विमानानें आम्ही दुपारी १२ वाजतां रविकडे निघालो. चि. रविला त्याप्रमाणें फोनकरून कळवलेले होतेच. आमचे विमान सॅन फ्रॅन्सिस्कोला ६ तासानें पोहोंचले; तथापि न्यूयॉर्कच्या घडयाळाप्रमाणें संध्याकाळचे ६ वाजता सॅन फ्रॅन्सिस्कोला आलो असे असण्याएएवजीं सॅन फ्रॅन्सिस्कोच्या घडयाळांतील वेळेप्रमाणे दुपारचे ३ वाजले होते. विमानतळावर रवि-सुषमा आले होतेच. त्या दोघांना पाहून एवढा आनंद झाला कीं तो सांगता येणे शक्य नाही. आई असूनसुद्धा मी त्यांना अमेरिकन रिवाजाप्रमाणें मिठींत घेतले नाहीं पण आपल्या नजरेनेच त्यांच्यावर खरी मायेची पाखर घातली. विमानातील आमचे सर्व सामान ताब्यांत मिळाल्यावर रविच्या मोटारींतून आम्ही सर्वजण सॅन होजेला त्याच्या घरीं संध्याकाळीं साडेचार वाजता आलो. तेथे आल्यावर मुलगा व सून तैनातीत असत. आठ दिवस भरपूर विश्रांति झाली. आम्हाला विमानाच्या प्रवासाचा किंवा तेथील बदललेल्या हवामानाचा त्रास जाणवला नाहीं. यावेळीं वसंत ऋतु संपत आला होता व उन्हाळा आठवडयाभरांत सुरू होणार होता. हवा फारच छान होती. येथील रविची जागा मोठी व फारच सुंदर आहे. घराभोवती हिरवळ व बगीचा मोठा व छान आहे. घरांत सर्व ठिकाणीं गालिचे अंथरलेले आहेत. मागील जागेत स्विमिंग पूल आहे. दाराशी मोठी मोटारगाडी आहे. घर सर्व सोईंनी सुसज्ज आहे. सुषमानें घर फार सुंदर सजवले आहे. सर्व ऐश्वर्य पाहून आनंद व समाधान वाटलें. सून परदेशांत असल्यामुळे तिची हौस मौज काहींच करतां आली नव्हती. त्यांतल्या त्यांत येथें आल्यावर लगेच तिचे एक डोहाळजेवण केले. घरच्या बागेंत खूप फुले होती. पानाफुलांचा साज बनवून तिची वाडी भरली. एका सायंकाळी रविच्या गाडीतून बाहेर जाऊन ग्रीन ड्रॅगन नांवाच्या चिनी हॉटेलमधें तिच्या आवडीचे जेवण घेतले. दि. ३१ मे पर्यंत सॅन होजे येथील मोठया दुकानीं अधून मधून आम्ही जात असू व थोडी खरेदी करत असू. रविवारी दि. २९ मे रोजीं पालो आल्टो येथील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी पाहून आलो. जातांना लेव्हिटझ नावाचे भव्य फर्निचरचे दुकान पाहिले. सुषमाचा प्रसूतिकाळ आता जवळ आला होता. दि. ३१ मे रोजीं सायंकाळी ती डॉक्टरांस भेटून आली. त्यानंतर रात्रीं थोडा अस्वस्थपणा वाटू लागल्यामुळे चि. रविने तिला डॉक्टरकडे पुन्हा दाखवण्यासाठी नेली. डॉक्टरनी तिला हॉस्पिटलमधेंच ठेऊन घेतले. ती बुधवार दि. १ जूनची पहाट होती. त्या दिवशीं दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी सुषमा सदर हॉस्पिटलमधें (दी गुड समॅरिटन हॉस्पिटलमधे) सुखरूप प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. आम्हाला नातू झाला. फार फार आनंद झाला. सुषमा बुधवारी भल्या पहाटे हॉस्पिटलमधे गेली तेव्हांपासून रवि तिच्याबरोबर सतत होता. इकडे प्रसवोन्मुख स्त्रीजवळ तिच्या नवर्‍याने रहायला पाहिजे असा नियमच आहे, पद्धत आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये नसले तरी कांहीं हॉस्पिटल्स मध्यें तिच्याजवळ आई, सासू वगैरे पैकीं कोणी इतर असण्यास हरकत नसते. त्यामुळें सकाळी रवि घरी परत आला तेव्हा मीही त्याचे बरोबर हॉस्पिटलमध्ये गेले. येथील प्रसूतिगृहे सुसज्ज अशी असतात व डॉक्टरी व्यवस्थाही उत्तम असते त्यामुळें काळजीचे कारण नव्हतेच; तथापि सर्व कांहीं सुखरूप होईपर्यंत काळजी वाटते इतकेच. इकडे बाळाचे नाव लगेच नोंदवावे लागते म्हणून बाळाचे नाव अगोदरच योजून ठेवावे लागते. रवि-सुषमानें बाळाचे नांव 'अमित' असे नोंदवले. बाळ-बाळंतीण चौथ्या दिवशी घरी आले. बाराव्या दिवशी बारसे समारंभ केला. त्यावेळीं मी माझ्या आवडीचे 'श्रीकर' हें पाळण्यांतील नांव ठेवले. यामुळें बाळाचें 'अमितश्री' असे सुटसुटीत जोडनाव झालें. सर्व बाळलेणें घातले होते. बाळ गोजिरवाणा व सुंदर दिसत होता. बाळाची व त्याच्या आईची दृष्ट काढली. इकडे बाळ-बाळंतीण लौकर हिंडूफिरू लागते. अधून मधून ठराविक वेळेला बाळाला तपासणीसाठी डॉक्टरकडे नेले. एक महिन्यानें बाळ डॉक्टरांना भेट देऊन आला त्याच दिवशी - दि. १ जुलै रोजीं - त्याचा महिन्याचा वाढदिवस साजरा केला. डॉक्टरांनीं बाळाला बाहेर हिंडण्याची परवानगी दिल्यानें बाळाला घेऊन हिंडायला जायचे ठरवले. आतां उन्हाळयाचे दिवस होते. तथापि येथील उष्णतामान २७ ते ३० डिग्री सेंटिग्रेड इतके जास्तीत जास्त होत असे, त्यामुळे नेहमी छान हवा असे व उन्हाचा त्रास नसे. शिवाय मोटार गाडीतून हिंडणे फिरणे होत असल्याने मोटारगाडींतील हवामान मोटारींतील यंत्राद्वारें सुसह्य असे ठेवता येत असे. त्यामुळे अमितबाळाला २ जुलै रोजी बाहेर हिंडण्यासाठी नेण्याचे ठरवले.त्याप्रमाणें रविच्या मोटारींतून आम्ही सर्वजण बाळासह सॅन फ्रॅन्सिस्को येथील सुप्रसिद्ध 'गोल्डन गेट ब्रिज' पहाण्यासाठी गेलो. जातांना वाटेंत प्रथम हिंदु रिवाजाप्रमाणें बाळ-बाळंतीणीस बर्कलेमधील 'हरे राम हरे कृष्ण' पंथाच्या श्रीजगन्नाथ मंदिरांत देवदर्शनास नेले. मंदिर फारच मोठे व सुंदर असून जिकडे तिकडे स्वच्छ ठेवले आहे. येथील लोकांचा वास्तू स्वच्छ ठेवणे हा मोठा गुण वाटला. मंदिर पाहून प्रसन्न वाटले व एका वेगळया धर्माच्या लोकांनीं भारतीय संस्कृति अनुसरावी, आमच्या देवाची - कृष्णाची सेवा करावी, त्यांत रंगून जावे याबद्दल मोठे नवल वाटले. येथील भजनही मोठे छान वाटले. मी घटकाभर त्यांत रंगून गेले. देवदर्शन-प्रसाद घेऊन सॅन फ्रॅन्सिस्कोमधील रस्ते पार करून गोल्डन-गेट ब्रिजवर गेलो. हा पूल पॅसिफिक समुद्रामुळें अलग झालेल्या दोन भूभागांना जोडतो. समुद्रावरील हा पूल खूपच रुंद, खूप उंच, तीन मैल लांब व फारच भव्य असा हा लोखंडी पूल आहे. हा पूल फक्त दोन्ही बाजूस उभारलेल्या लोखंडी खांबांच्या व लोखंडी दोरखंडांच्या आधारावर उभा केलेला आहे. पाहून फार आश्चर्य वाटलें. नंतर सॅन फ्रॅन्सिस्को शहरांतील समांतर अशा चढ उताराच्या रस्त्यांवरून मोटारींतून हिंडून तेथील गगनचुंबी इमारती व मोठी मोठी दुकाने गाडीत बसूनच पाहात पाहात घरी परत जाण्यास निघालो. आमची मोटार विलक्षण चढ असलेल्या 'लोंबार्ड स्ट्रीट' वरून रविने एका उंच जागी आणली व नंतर अत्यंत वक्र (नागमोडी) उतार असलेल्या रस्त्यावरून मोठया कौशल्यानें चालवून खाली फिशरमेन वार्फला आणली. तेथील लहानमोठी असंख्य हॉटेले, चायना टाउनची शोभा, केबल कार वगैरे नाविन्यपूर्ण गोष्टी पाहून आम्ही रात्रीं ९ वाजता घरी परत आलो. सर्व वेळ अमितबाळ शांत राहिला होता. सुषमाने त्याची उत्तम तैनात ठेवली होती; त्यामुळे बाळाचा या जगांतील पहिलाच दूरचा असा मोटारगाडीनें केलेला प्रवास फार सुखाचा झाला. दुसरे दिवशी संध्याकाळीं अमित बाळासह जवळच्या ऍलम रॉक पार्कला गेलो. पार्कमध्यें थोडावेळ हिंडून फिरून घेतले व येतांना वाटेंतील 'ईस्ट्रीज शॉपिंग सेंटर' नावाचे भव्य (डिपार्टमेंटल) दुकान हिंडून पाहिले. अशा दुकानास मजले असतात व इमारत फारच विस्तृत असते व त्यांत असंख्य वस्तूंनीं भरपूर असलेले निरनिराळे स्टॉल्स निरनिराळया दुकानदार कंपन्यांनी इमारतीतील जागा भाडयानें घेऊन भरविलेले असतात. अशा शॉपिंग सेन्टर्सना इकडे 'मॉल' अशी संद्न्या आहे. सॅन होजेला अशा प्रकारची तीन शॉपिंग सेंटर्स आहेत, त्यापैकीं 'ईस्ट्रीज' हा सर्वात मोठा मॉल आहे. या इमारतींत ठिकठिकाणी खाद्यपदार्थानी व पेयांनी भरपूर भरलेली अशी हॉटेल्स अथवा कॅटीन्स असतात. त्यामुळे खरेदीसाठी पायपीट झाल्यावर खाद्य-पेयांचा आस्वाद घेऊन श्रमपरिहार करता येतो. ही सर्व मजा पाहून रात्रीं घरी परत आलो. दि. ४ जुलै रोजीं अमेरिकेचा २०१ वा स्वातंत्र्यदिन असल्यामुळे सर्वत्र सुट्टीचा दिवस अमेरिकन मुलांनीं व स्त्री-पुरुषांनी मोठया आनंदांत घालवला. दिव्यांची रोषणाई ठिकठिकाणी केली होती व मुले फटाके वाजवत होती. रात्री सॅन होजेच्या स्पार्टन स्टेडियमवर सार्वजनिक फायरवर्कस साजरा झाला. हे ठिकाण लांब असल्यामुळें व गर्दी फार होईल व त्यामुळे अमितबाळास त्रास होईल ह्या भितीनें आम्ही घरींच राहून आकाशांत उडविलेले दारूकाम दुरूनच पाहिले. लोकांचा स्वातंत्र्यदिनाचा उत्साह मात्र दांडगा वाटला. त्यानंतरच्या शनिवारीं १०-१५ मैल अंतरावरील 'रेडवुड सिटी'मधील 'मरीन वर्ल्ड आफ्रिका यु.एस.ए.' नांवाचा झू पाहिला. अमित बाळ बरोबर होताच. हा झू फारच मोठा व प्रेक्षणीय आहे. मुख्यत्वे येथील सील व डॉल्फिन जातीच्या मोठया माशांची कसरतीची कामें फारच प्रेक्षणीय व आर्श्चयकारक आहेत. येथे वाघ, सिंह वगैरे प्राणी आहेत तसेंच रंगीबेरंगी पोपट, काकाकुवा वगैरे मोठे सुरेख पक्षी आहेत. रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांची गर्दी विचारूच नका. या झूमधील प्राणी पक्षी नुसते बघायचे नसतात. त्यांचे खेळ पहायचे असतात. सिंहांची कामे, रंगीत पोपटांची सायकल फिरवण्याची कामें व इतर प्राण्यांचे खेळ पहाण्यासारखे असतात. एक एक खेळ अर्ध्या-पाउण तासाचा दाखवतात. वेळेच्या थोडयाफार फरकानें हे खेळ त्या त्या ठिकाणीं चालू असतात. त्यामुळें जमेल तेवढे वेळापत्रक साधून हे खेळ पहावे लागतात. तेथील मत्स्यालय तर फारच मोठया काचांच्या भिंती असलेल्या दालनांत उभारले आहे. काचेची घरेंच म्हणाना. त्यांत नाना प्रकारचे मासे, कासवे वगैरे जलचर प्राणी ठेवलेले पाहिले. सील व डॉल्फिन माशांची कसरतीची कामें प्रेक्षणीय व अदभूत खरीच. तथापि मनुष्य प्राण्याची ही सरोवरांतील कसरतीची कामे सुद्धा धारिष्टयाची व प्रेक्षणीय असतात. त्या खेळास 'वॉटर स्कीईंग' असे म्हणतात. ही कसरतीची कामे करणारे स्त्रीपुरूष पट्टीचे पोहणारे असून पाण्यावरून मोठया वेगानें चालविलेल्या छोटया पॉवरलॉचच्या मागील बाजूस अडकवलेल्या दोरास बांधलेल्या पायफळीवर एक पाय ठेवून लॉचच्या वेगाने धावणें, उडया मारणें, वगैरे धारिष्टयाची कामें करतात. याप्रमाणे थक्क करणारी कसरतीची कामें दिवसभर ठिकठिकाणी चालू असतात; ती पाहून रात्रीं आम्ही घरी परत आलो. अशाप्रकारे अधूनमधून निरनिराळी प्रेक्षणीय स्थळें पाहाण्यास नातवासह रविच्या मोटरींतून जात असल्यानें आमचे तेथील वास्तव्य मोठया सुखाचे व आनंदाचे जात होते. माझे मोठे बंधु - ती. आप्पा - सांगलीस असतात. त्यांचा नातू कुमार हा तिकडील शिक्षण पुरे करून लॉस एअंजेलिसला नोकरीस असतो. त्याच्याकडे दि. १६ ते १९ जुलैपर्यंतचे चार दिवस राहाण्याचे फोनवरून निश्चित करून दि. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजतां सॅन होजेच्या विमानतळावरून सुटणार्‍या 'पी.एस.ए.'च्या विमानाने आम्ही दोघे लॉस एअंजेलिसला गेलो. सॅन होजेपासून ते शहर सुमारे ४५० मैल दूर आहे. विमानाचे जाण्या-येण्याचे भाडे प्रत्येकी डॉलर्स ५१ पडले. विमानाने फक्त १ तासांत आम्ही तेथील विमानतळावर पोहोंचलो. चि. कुमार (हेमंत) आम्हाला उतरवून घेण्यासाठी आला होता. आम्ही त्याच्याकडे गेल्यानें त्याला फार आनंद वाटला व आम्हालाही तो भेटल्यानें फार आनंद झाला. तो आज ७ वषांनीं आम्हास भेटला. त्याच्या मोटारीतून आम्ही प्रथम त्याच्या टॉरन्स येथील अपार्टमेंटवर जाऊन त्याच्याबरोबर जेवण घेतले व मग त्याच्या मोटारीतून बाहेर पडलो. त्यानें तेथील प्रेक्षणीय ठिकाणें मोठया आस्थेवाईकपणे आम्हास फारशी दगदग होणार नाही अशा प्रकारें सोयिस्करपणें दाखवली. आम्ही रोज सकाळी ९ वाजतां बाहेर पडून निरनिराळी प्रेक्षणीय स्थळे पाहून व हिंडून फिरून रात्री ९ वाजता घरीं परत येत असू. लॉस एअंजेलिस व त्याच्या जवळपास पहाण्यासारखे खूपच आहे. चार दिवसांत सर्व कांहीं पाहू शकलो नसतो, त्यामुळे त्यानें आम्हास मुख्य मुख्य अशी ठिकाणें दाखवली. प्रथम आम्ही तेथील वॅक्स म्यूझियम पाहिली. त्या म्यूझियममधें ५ ते ६ फूट उंचीचे मेणाचे सुंदर २०० पेक्षां अधिक पुतळे आहेत. पुतळे इतके हुबेहूब बनवले आहेत कीं पुतळयाजवळ त्या त्या व्यक्तींचे मूळ फोटो ठेवले आहेत त्यावरून कल्पना येते. एका दालनात बायबलमधींल कांहीं प्रसंग दाखवले आहेत. सिनेमातील व नाटकांतील प्रसिद्ध नटनटयांचे पुतळे व नाना तर्‍हेचे प्रसंग पुतळे ठेवून दाखवले आहेत. तेथे वरील मजल्यावर असंख्य कार्टून्सची चित्रे ठेवलेली गॅलरीही पाहिली. हे सर्व पहाण्यासाठी आम्ही पाच तास फिरत होतो. वेळ केव्हां गेला तें कळलेच नाहीं. सर्व पाहून मन थक्क्क होऊन जाते. नंतर तेथून जवळच असलेली फिलाडेल्फिया हॉलची प्रतिकृति पाहिली. तेथे फिलाडेल्फिया येथील मूळ वास्तूची व तेथील गोष्टींची सहीसही नक्कल केली आहे. मोठा हॉल बांधला असून त्यात बाहेर भली मोठी घंटा ठेवली आहे. (आपल्याकडे नाशिकला नारोशंकरी घंटा अशीच मोठी आहे.) ही घंटा वाजवून अमेरिकेनें आपले स्वातंत्र्य घोषित केले होते. तसेंच स्वातंत्र्य मिळवण्याच्या वेळचे ठराव ज्या एका सभेंत मांडले व मंजूर करण्यांत आले त्या सभेचे दृष्य तेथें चित्रित केले आहे. म्हणजे त्या सभेचे त्यावेळी जे सभासद होते त्या सभासदांचे पुतळे हॉलमध्यें खुर्च्यांवर ठेवले आहेत. प्रत्येक खुर्चीपुढे टेबल ठेवले असून त्यावर मंदसे दिवे लावले आहेत. उच्चस्थानीं अध्यक्षाचा पुतळा खुर्चीवर ठेवला असून त्या टेबलावर एक हातोडाही ठेवला आहे. त्यावेळी ठरावाच्या बाजूनें ज्या सभासदांनीं भाषणें केली त्या प्रत्येक सभासदाच्या भाषणाची टेप ऐकवण्यांत येते व ते भाषण तो तो पुतळा त्या त्या वेळी उभा राहून करीत असल्याचा भास निर्माण केला आहे. प्रथम हॉलमध्ये एका अंगास मांडलेल्या खुर्च्यांवर आम्ही व इतर प्रेक्षक बसल्यावर हॉलमधील दिवे मालवून अंधार करण्यांत आला व पुतळयासमोरील टेबलावरील मंदसे मेणबत्ती सद्दृश असलेले दिवे लावण्यांत येऊन सभेचे काम सुरू झाले. वातावरण गंभीर असे असते. आपण स्वातंत्र्यपूर्व काळात गेल्यासारखे वाटू लागते व सभेचे कामकाज श्रवण करीत असतो. ४-५ सभासद एकावेळी बोलू लागल्यानें गडबड होते; त्यावेळी अध्यक्ष टेबलावर हातोडा मारून एकावेळेस एकानें बोलावे असे फर्मावतो व शांतता प्रस्थापित करतो. अशा प्रकारे सभेचे कामकाज तासभर चालते. ते सर्व दृष्य पाहून मोठी मजा वाटते. सभा एकमतानें स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करते, सभा संपते व आपण हॉलबाहेर पडतो. बाहेरच्या दालनांत त्या सभेचा व ठरावाचा वृतांत देणारी त्या काळची वर्तमानपत्रें काचपेटींत ठेवलेली आहेत. ती पाहून आम्ही ते ठिकाण सोडले. त्यानंतर आम्ही मोटारींत बसून लॉस एंजेलिस शहर हिंडून पाहिले. आमच्या मोटारीने मुख्य रस्त्यावरून सुमारे १२ समांतर रस्ते ओलांडले. आजूबाजूस उंच-उंच इमारती असलेली अनेक हॉटेल्स. बॅकांची ऑफिसे व दुकाने लागली. विलशायर बुलाव्हर्डमध्यें फारच उंच व भव्य इमारती आहेत. सिटी हॉलची इमारत सर्वाहून उंच असावी असे वाटले. एक गोलाकृती, काचेच्या भिंती असलेले गोल हॉटेल पाहून फार विस्मय वाटला. अशा प्रकारें शहर पाहून झाल्यावर शहराबाहेरील डोंगरावरील पठारावर आमची मोटार चढून आली. तेथे एका भव्य इमारतींत असलेली 'ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी व प्लॅइटेरीयम' पहावी असा आमचा विचार होता; तथापि वेळ संपल्यामुळें पाहू शकलो नाहीं. तेवढया उंचीवरील दुर्बीणीतून आम्ही लॉस एअंजेलिस शहराचा संपूर्ण देखावा फक्त पाहिला व तेथून खाली उतरून घरी परतलो. येतांना पायथ्याकडील सुप्रसिद्ध हॉलिवुडचा सर्व भाग व नटनटींच्या निवासाची भव्य व विस्तृत निवास स्थानें पाहून समुद्रकिनार्‍यावरून घरी परत आलो. दुसरे दिवशीं दीडशे मैलावरील सॅन डीगो येथील झू (प्राणी-संग्रहालय) पाहिला. हा झू तर फारच अवाढव्य आहे. येथें काय नाही व काय आहे ते सर्व सांगता येत नाहीं इतके आहे. तेथे वाघ, सिंह वगैरे वन्य पशु, नाना प्रकारचे प्राणी, तसेच रंगीबेरंगी असंख्य पक्षी आहेत. एक फार मोठे सर्पालय आहे. त्यांत अनेक जातींचे विषारी-बिनविषारी, लहान-मोठे सर्प ठेवले आहेत. अर्थात मोठी अजगरे व नाग पण आहेत. लहान मुलांसाठी वेगळा झू आहे, त्यांत अगदी छोटे-चिमुकले पक्षी व इतर प्राणी ठेवले आहेत. लहान मुलांसाठी वेगळा बगिचा सुद्धा आहे. तेथे मुलांसाठी मनमोहक अशी नाना प्रकारची खेळणी ठेवली आहेत. हा झू हिंडून पाहायला फारच विस्तीर्ण आहे.तरूण मंडळी पायीं भटकतात. तथापि बस सर्विस असल्यानें बहुतेकजण बसमध्यें बसून झूमधील बराचसा भाग पाहातात. बसमधून फिरण्यास व पाहाण्यास २ तास लागले. नंतर झू मधील मुख्य मुख्य ठिकाणें आम्ही पायीं फिरून पाहिली. येथे स्काय सर्विस सुद्धा आहे. चारजण बसतील असे पाळणे तारेवरून उंच आकाशांत सरकवले जातात व त्या पाळण्यांत बसून उंचीवरून खालील वन्य पशू व इतर प्राणी वगैरे व इतर देखावे पाहाता येतात. झू पाहून घरी परत जातांना वाटेंत पॅसिफिक समुद्राचा किनारा पाहिला. येथील किनारा (बीचेस) मैलचे मैल लांबीचा आहे व वाळवंट फार छान आहे. सर्व किनारा रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांनीं फुलून गेला होता व सर्वजण समुद्रांत डुंबण्यासाठी व सुट्टीचा आनंद लुटण्याच्या तयारीने आले होते. राहुटया ठोकल्या होत्या. तसेच कॉटस, खुर्च्यासुद्धा मांडून त्यावर बसले-पहुडले होते व खाणेपिणे करत होते. दिवसभर पाण्यांत पोहून व डुंबून सर्वजण मौज करीत होते. छोटी चड्डी घातलेले पुरूष आणि किंचित चड्डी व किंचित बॉडी घातलेल्या बायका एकत्र बसून अथवा वाळूत लोळत पडून गप्पा गोष्टी करत होत्या. असे दृश्य आपल्या संस्कृतींत बसत नसल्यानें ते पाहातांना संकोच वाटला. पण विचार केला कीं, माणसांनी बनवलेल्या पुतळयांसारखी कलाकृति आवडीने - कौतुकाने पाहिली, मग देवानें बनवलेली माणसांची कलाकृति पाहाण्यास संकोच कसला. पाहातांना मजा वाटली. अशाप्रकारे माणसांनी फुलून गेलेला समुद्र किनारा पाहून आम्ही घरी परत आलो. तिसर्‍या दिवशी आम्ही सुप्रसिद्ध 'डिस्ने लॅंड्स'नावाचे प्रेक्षणीय ठिकाण पाहिले. मोटार पार्क करण्याच्या मैदानापासून प्रवेशद्वारापर्यंत येण्यास ट्रामबस ठेवली आहे.त्यातून प्रवेशद्वाराशी येऊन अ, ब, क, ड अशी विभागवार अनेक तिकिटे असलेले पुस्तक प्रत्येकी साडे-आठ डॉलर्सला विकत घेतले. तेथे तेरा देखावे पाहाण्यास मिळतात व तेवढी तिकिटे त्या त्या ठिकाणच्या प्रवेशद्वारीं द्यावी लागतात. देखावे कोणत्या क्रमानें पाहायचे हे अगोदर ठरवून कार्यक्रम आखल्यास सोईचे पडते. म्हणजे उगीच मागेपुढे होऊन व्यर्थ पायपीट होत नाही व वेळही गमावत नाहीं. कुमारनें असा कार्यक्रम अगोदर आंखून ठेवला होता; त्यामुळें आम्ही सर्व देखावे कमी श्रम घेऊन पाहू शकलो. एकूण सहा विभागांत निरनिराळे देखावे पाहायचे असतात. ऍडव्हेंचर लॅंड, फॅंटसी लॅंड, फ्रॉन्टिअर लॅंड, हॉन्टेड मॅन्शन, न्यू ऑर्लीन्स स्क्वेअर व टुमॉरो लॅड याप्रमाणे सहा विभागांतील देखावे पहाण्यास सबंध दिवस पुरत नाहीं.प्रत्येक ठिकाणी ठराविक वेळेप्रमाणें प्रवेश मिळतो. येथे पर्‍यांच्या राज्यांत जायला मिळते, तसेच भुतांच्या राज्यांत, वेताळांच्या राज्यांत, डाकूंच्या राज्यांत अशा अदभुत ठिकाणी भ्रमण करायला मिळते. त्यासाठी पाच एकर क्षेत्राच्या पाण्यांतून (जमिनीखालून) ट्राममधून व कांहीं ठिकाणी लहान बोटीमधून भ्रमण करीत करीत हे देखावे पाहायचे असतात. ट्रामला अगर नावेला कांहीं कांहीं वेळ जोराची गति दिल्यामुळें आपला डबा अगर नाव पाण्यांत पडेल व उलटेल अशी भीति वाटते. आंत प्रवेश केल्यावर बाहेरील जगाचा संबंध सुटतो. आंत सर्वत्र अंधार व पाण्यांतूनच आपण प्रवास करत असतो व भोवती सर्व देखावे असतात. भुताखेतांच्या व डाकूंच्या राज्यांत सर्व भयानक वाटते. त्यांचा आरडाओरडा, किंचाळया ऐकून आपला थरकांप होतो व फार भीति वाटते. पर्‍यांच्या राज्यांत मात्र देशोदेशींच्या रंगीबेरंगी पोषाख केलेल्या बाहुल्या नाचगाणे करीत असतात. त्यांचे ते सुंदर पोषाख, वाद्यसंगीतावरील गोड गाणे, नाच वगैरे पाहून मन अगदी रंगून जाते व इथून बाहेर जाऊच नये असे वाटत रहाते. या पाण्यातील सफरी पाऊण तासाच्या असतात. दुसर्‍या एका ठिकाणीं एका हॉलमध्यें रंगीबेरंगी विविध प्रकारचे पक्षी - सुंदर पोषाख केलेले; रंगीत सोनेरी पिसे लावलेले; खर्‍यासारखे वाटणारे पण पेंढा भरलेले पक्षी हॉलच्या वरच्या भागांत रिंगमध्यें दोनदोन - चारचार - आठआठ - दहादहा (कांहीं ठिकाणी पंधरा सुद्धा) असे गटागटानें बसवले आहेत. त्यांचे पिंजरे खालीवर होतात; त्यांची भाषणे चालतात; गोड वाद्य संगीत चालू असते; गोड गाणी गात असतात; नाचतांना तालबद्ध माना डोलावतात. ते सर्व पाहातांना, ऐकतांना भान हरपून जाते. हा कार्यक्रम खास मुलांसाठी असतो. हा देखावा पहातांना माझी नात प्रियम हिची आठवण मला फार झाली. नंतर एका ठिकाणी सर्करामा पाहिला. एक खूप मोठा हॉल आहे. त्यांत खूपच मोठा गोल स्टॅण्ड केला आहे. त्यांत जाऊन उभे रहायचे. शो ठराविक वेळेला सुरू होतो. हा शो पहातांना आपण एके जागी बसून सिनेमा पाहात आहोत असे वाटत नाहीं तर सिनेमांतील त्या त्या प्रत्येक दृश्यांतील ठिकाणीं आपण स्वत: उपस्थित आहोत असा भास होतो. सिनेमाची चित्रे सभोंवती हॉलमध्ये गोल फिरत असतात; त्यांत न्यूयॉर्कपासून ते अमेरिकेतील मोठीमोठी शहरे पहायला मिळतात. आम्ही याप्रमाणे सर्व अमेरिका एके जागी उभे राहून पण सर्व ठिकाणी जणु कांहीं स्वत: हिंडून फिरून पाहिली. तेथे आम्ही डोंगर, दर्‍या, मोठे धबधबे, समुद्र किनारे, समुद्रांतील संपत्ति, जलचर प्राणी, बर्फमय प्रदेश, गगनचुंबी इमारती, प्रत्येक शहरांतील मोठे मोठे रस्ते, त्यावरून चालणारी वाहने, विमानतळ, सैनिकांची-घोडेस्वारांची संचलने असे सर्व देखावे पाहिले. हे सर्व पहातांना डोळे गरगर फिरतात. मागेपुढे सर्व ठिकाणी एकच दृश्य दिसते व ते सरकत जात असते. हा शो एक तासाचा असतो. सर्व बघून झाल्यावर एकदम आपले पाय जमिनीला लागल्यासारखे वाटते; मग आपण आपल्या जागेवरूनच सर्व देखावे पाहिले हें लक्षांत येतें. पहातांना भानहरपून गेलेले असते. सर्व पाहून मजा वाटली. नंतर एका ठिकाणी अमेरिकेचे भूतपूर्व सुप्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे भाषण त्यांच्या पुतळयानें केलेले ऐकले. मोठी मजा वाटली. दुसर्‍या एका ठिकाणीं अस्वलांच्या वाद्यवृंदांतील अस्वलांनी वाद्ये वाजवून केलेली करमणूक फारच रम्य वाटली. तेथून डिस्ने लॅड भोंवतीं ये जा करणार्‍या व प्रेक्षकांची निरनिराळया ठिकाणी ने आण करणार्‍या आगगाडींत बसून ठिकठिकाणी थव्यांनीं हौसमौज करीत असलेले असंख्य प्रेक्षक (रंगीबेरंगी कपडे घालून आलेले) पाहून आनंद वाटला व इतके लोक एकत्र आलेले असतांना कोठेंही धावपळ, घुसाघुसी, गडबड, गोंधळ कसा होत नाहीं याचे आर्श्च्य वाटले. सर्वजण शिस्तीनें व रांगांत उभे राहून त्या त्या ठिकाणचे देखावे पहाण्यात दंग होते. तेथे ठिकठिकाणीं असंख्य खाद्यपेयांची दुकानें होती. इकडील लोकांना अशा हॉटेल्स मध्यें खाणेपिणे फार आवडते, यामुळें या हॉटेल्सच्या बाहेरील खुर्च्यांवर बसून असंख्य लोक खाण्यापिण्याचीही मजा करीत होते. आणखी एका ठिकाणी आम्ही लोखंडी दोरावरून सरकत जाण्यार्‍या होडीसदृश पाळण्यांत बसून डोंगरांवरील बोगद्यांतून हिंडून आलो व हिंडत असताना तेथे अमेरिकेतील प्रसिद्ध गाणीं निरनिराळया मनुष्याकृती पुतळयाकडून सुस्वर वाद्यांच्या साथीसह एएकवून करमणूक करण्यांत आल्यामुळें बोगद्यामधील अंधारांतून जातांना भीती वाटली नाहीं. टुमॉरो लॅंड विभागांतील एकच देखावा आम्ही पाहिला तो म्हणजे स्पेसशिपमधून निरनिराळया ग्रहांचे दर्शन कसे होते ते दाखवले होते. या विभागांतील इतर देखावे आकाशांत उडडाण करून पहायचे असल्यानें भीती वाटल्यामुळें आम्ही टाळले. अशा प्रकारे तेरा देखाव्यापैकीं अकरा देखावे पाहून आम्ही रात्री १० वाजता घरी परत आलो. दि. १९ जुलै रोजीं आम्ही हांलिवुडमधील युनिव्हर्सल स्टूडिओ पाहिला. तेथे तर दुसरी जादुनगरी आहे. सिनेमा व टी.व्ही. यांतील शो कसे तयार केले जातात त्याचे प्रात्यक्षिक येथे पहायला मिळते. वेगवेगळे शो दाखवतात. आम्ही एक स्टंट शो पाहिला. सिनेमांत जी हाणामारी, गुद्दागुद्दी चालते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. ते पाहून भीती वाटते, पण ते सर्व किती खोटेखोटे असते याची कल्पना येते. फोटोग्राफीच्या तंत्राचे कौतूक करावेसे वाटते. त्याचप्रमाणे टी.व्ही. वर दाखवतात त्या मूव्हीमधील छोटासा शूटिंगचा भाग पाहिला व लगेच तो कार्यक्रम टी.व्ही. वर दाखवला. तेव्हा शूटिंगमध्यें सर्व खोटा खोटा मामला पाहूनही गंमत वाटली. सिनेमांतील चित्रण कशा पद्धतीनें करतात याची कल्पना आली व त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात व खर्चही कसा अफाट करावा लागतो याची कल्पना आली. असे येथे बरेच छोटेछोटे शो दाखवतात. प्रत्येक शो अर्ध्या तासाचा असतो. ह्या स्टूडिओचा परिसर जवळ जवळ वीस मैलांचा आहे. हे सर्व पायीं हिंडणे शक्यच नसते. येथेही बससर्व्हिस आहे. ट्रामबसमधून सबंध स्टूडिओच्या आवारांत डोंगरमाथ्यावर व नंतर डोंगरावरून खाली उतरून पायथ्याकडील सपाटीवर असलेल्या निरनिराळया इमारतींतील शो दाखवून फिरवून परत डोंगर माथ्यावर आणून सोडतात. स्टूडिओ पहाण्यासाठी त्या दिवशी अफाट गर्दी लोटली होती. बसला मोठया रांगा लागल्या होत्या, पण सर्व शिस्तबद्ध काम. गडबड नाहीं़ गोंधळ नाहीं; रांगेत घुसाघुसी नाहीं; धक्काबुक्की नाहीं. लोक शांतपणे पुढे सरकत होते. त्यामुळे जागाही लवकर मिळते असे वाटते. बसमधें पुढील बाजूस टूर गाईड बसलेली असते. ठिकठिकाणची सर्व माहिती ती लाऊडस्पीकरवर सांगत असते. सर्व ऐकतांना, ठिकठिकाणची दृश्यें पहातांना आपण हरवून जातो. सिनेमांसाठी लागणार्‍या दर्‍या, खोरी, डोंगर, ओढे, नाले, समुद्रकिनारा, लहान मोठी घरे, वाडे, कचेर्‍या, दुकाने, पडके वाडे, जळके वाडे, नवी घरे, मोडकी घरे, बागा, इमारती, मोठे पूल, अशा सर्व गोष्टी तयार करून ठेवलेल्या जागोजागीं पहायला मिळतात. बसमधून जातांना मध्येच एका ठिकाणी नदीला पूर आल्याचे दाखवले व पुरातून झाडे वाहून जात असलेली दाखवली. आपण ह्या पुरांत वाहून जातो कीं काय असे वाटते.मधेंच एका पुलावरून बस जातांना तो पूल ढासळतो; आपण पुलाखाली गेलो असे वाटते, पण थोडे पुढे जातांच पुन्हा पूल एकसंध होतो. एके ठिकाणी बर्फाच्या दरीमधून बस जाते. आवाज होतात, गडगडाट होतो, बर्फाचे कडे कोसळतात व आपली बस अधांतरी आहे असे वाटते. आपण बर्फाच्या ढिगार्‍याखालीं गेलो कीं काय असे वाटते. अंगाचा थरकांप होतो. हे सर्व खोटे आहे हें कळत असूनही आपण त्या जादूनगरींत हरवलेले असतो. पंधरा मिनिटांचा गडगडाट संपून आपली बस मोकळया हवेंत येते तेव्हां हायसे वाटते. मधेंच आपली बस एका खाडींतून जात असते त्यावेळी एक देवमासा डोके वर काढतो व माणसांना गिळण्यासाठीं बसवर धावून येतो. हा देवमासा इतका मोठा व हुबेहूब बनवला आहे कीं त्यावेळी आपल्यापुढे यमपुरी उभी रहाते. बस दोन तीन मिनिटे पाण्यांत असते. मग एकदम जमिनीवर येते व हायसे वाटते. ही सर्व दृश्यें विजेच्या सहाय्यानें कळ दाबून दाखवतात. बसची सफर दोन तासांची असते. सर्व स्टूडिओ पहाण्यास आम्हाला सहा तास लागले. पण वेळ अगदी क्षणासारखा वाटला. स्टूडिओ पहाण्यास प्रत्येकी सात डॉलर्सचे तिकिट आहे. हे सर्व पाहून मन हरखून गेले. चार दिवसांत लहान मोठी प्रेक्षणीय स्थळें पाहून घेतली व मोटारींत बसून इमारती, दुकाने वगैरे सर्व पाहिले. एवढया थोडक्या वेळांत इकडील सर्व प्रेक्षणीय स्थळें पहाणे शक्य नव्हते. लॉस एंजेलिसमधील कुमारकडील चार दिवसांचा मुक्काम संपवून दि. १९ जुलै रोजीं सायंकाळीं ७ वाजतां विमानानें निघून आठ वाजतां सॅन होजेच्या विमानतळावर परत आलो. रवि, सुषमा व नातू अमितश्री आम्हाला घेण्यासाठी आले होतेच. मग मोटारीतून रात्रीं ९ वाजतां घरी येऊन पोहोंचलो. नंतरच्या एका शनिवारीं जेवण झाल्यावर ३ वाजतां आम्ही रविच्या मोटारीनें सुषमा व अमितश्री यांसह 'मॉन्टेरे पेनिन्सुला' या सृष्टिसौंदर्ययुक्त, समुद्राजवळील डोंगरांत असलेल्या प्रेक्षणीय स्थळाकडे गेलो. पॅसिफिक समुद्रकिनार्‍यावरून जाणार्‍या 'सेव्हेंटीन माईल्स ड्राइव्ह' या नांवाच्या रस्त्यानें आमची मोटार जात होती. या रस्त्यावर २६ नयनरम्य ठिकाणें पहायला मिळतात. सील व सीबर्ड रॉक, सायप्रस पॉईन्ट, पेबल बीच वगैरे नांवांची ठिकाणे मोटारीतून खाली उतरून समुद्राजवळ जाऊन आम्ही पाहिली. सील मासे समुद्रांतून बाहेर येऊन डोंगरावर ऊन खात पडले होते ते पहायला मिळाले. फार मजा वाटली. बाकीची ठिकाणे मोटारीत बसून व त्या त्या ठिकाणी थांबून पाहिली. ही स्थळें पाहून मग समुद्रकिनार्‍यावरील खालील बाजूस असलेले सांताक्रूझ हे आणखी एक रम्य ठिकाण आम्ही पाहिले. येथें समुद्रावरील चौपाटी (वालुकामय किनारा) मोठा व विस्तृत लांबीचा असल्यानें समुद्रकिनार्‍याची शोभा अवर्णनीय वाटली. असंख्य लोक हे रम्य ठिकाण पहाण्यासाठी जमले होते. मोटार पार्क करून आम्ही पायीं फिरून वाळू तुडवली व समुद्राच्या पाण्यांत उभे राहून मौज मजा पाहिली. चौपाटी शेजारील किनार्‍यावरील एका मोठया इमारतींत मनोरंजनासाठीं विविध खेळ व पाळणे (राईडस) ठेवले आहेत. आम्ही तेथे थोडावेळ चेंडूफेकीचा खेळ खेळलो. त्यासाठी १० सेंटस फी असते. नंतर तेथील विजेच्या पाळण्यांत बसलो. पाळणा रुळावरून पळवतात. तो इतक्या वेगानें खाली येऊन वर चढतो कीं आपण पाळण्यांतून बाहेर फेकले जाऊ अशी भीती वाटते. अर्थात पाळण्यांत अमितश्रीला घेऊन बसणे शक्यच नव्हते. मला या पाळण्याची फार भीती वाटते म्हणून मी नातवाला घेऊन खाली बाकावर बसून पाळण्याची मजा पाहिली. अशी ही पॅसिफिक समुद्रावरील रम्य ठिकाणे पाहून आम्ही रात्री ९ऽऽ वाजतां घरी परतलो. त्यानंतर रविने सोमवारची रजा घेऊन शनिवार ते सोमवार (दि. ६ ते ८ ऑगष्ट) अशा तीन दिवसांची 'लेक टाहो' नांवाच्या दुसर्‍या एका सौंदर्ययुक्त स्थळाची ट्रिप ठरवली. त्या सहलीस आम्ही रविच्या मोटारीनें सुषमा व अमितश्री यांच्यासह गेलो. 'लेक टाहो' हे रम्य सरोवर सॅन होजे पासून २०० मैलावरील कॅलिफोर्निया स्टेट व नेवाडा स्टेट या दोन राज्यांच्या हद्दीवरील ७ हजार फूट उंचीच्या डोंगरात आहे. हे सरोवर २२ मैल लांबीचे व १२ मैल रुंदीचे असे विस्तृत क्षेत्र असलेले म्हणजे एक नयनरम्य व भव्य असा सृष्टिसौंदर्याचा आविष्कार आहे. रम्य ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध अशा या ठिकाणास असंख्य लोक सवड सापडेल त्याप्रमाणे वर्षभर भेट देत असतात. त्यामुळें तेथे अनेक हॉटेल्स, दुकाने, उतरण्यासाठी मोटेल्स, वगैरे सर्वप्रकारच्या सोयी उपलब्ध असतात. आमचा तेथे २-३ दिवसांचा मुक्काम असल्यानें रविने आपल्या ऑफिसमधून फोनवरून तेथील 'आगटे बे लॉज' नांवाच्या एका मोटेलमध्यें एक ब्लॉक राखून ठेवला होता. चार तासांचा डोंगरामधील प्रवास करून आमची मोटार 'लेक टाहो'च्या उत्तर भागांतील या मोटेलवर आली. तेथे जवळचे सामान काढून ठेवून आम्ही बाहेर जाऊन एका फराळाच्या दुकानांत पोटपूजा केली व तेथून कॅलिफोर्निया स्टेटच्या हद्दीबाहेर नेवाडा स्टेटच्या हद्दींत एका मोठया इमारतीत कॅसिनोचा जुगार चालतो तेथे जाऊन ५ सेंटस व १० सेंटस किंमतीची नाणी घेणार्‍या यंत्रांवर थोडा वेळ जुगार खेळून आमचे नशीब अजमावलें. खेळाअंतीं आम्ही जेवढे भांडवल घातले तेवढे परत मिळवले व मोह आवरून परत मोटेलवर येऊन विश्रांति घेतली. 'कॅसिनो' नांवाच्या या जुगारास नेवाडा राज्यात परवानगी आहे, इतरत्र नाहीं. त्यामुळें पैसा एकदम मिळाल्यास पहावे अशा आशेनें अनेक लोक (पुरूष तशा स्त्रियाही) अशा यंत्रांवर जुगार खेळण्यांत दंग असतात. नशिबाचा खेळ म्हणून आपल्याजवळचे पैसे हरवून बसतात. क्वचित कुणाला नशिबाने हात दिला असे दृष्टोत्पत्तीस येईल. असो. आम्ही मात्र मोह आवरून खेळ आवरता घेतला. संध्याकाळी आम्ही नेवाडा हद्दींतील या सरोवराच्या काठावरील भागांत दोन तासांचा मोटारचा प्रवास करून गेलो. तेथे मोठमोठया इमारती व त्यांत मोठे हॉल होते. त्यांत असंख्य जुगाराची यंत्रे बसवली होती व त्यावर असंख्य लोक जुगार खेळून आपले नशीब अजमावत होते. आमच्या बरोबर आमचा नातू होताच. त्याचे नशीब अजमावण्याची लहर त्याच्या आईस (सुषमास) आली म्हणून तिने त्याच्या हातीं १ डॉलरचे नाणे देऊन ते १ डॉलर किंमतीच्या यंत्रांत टाकले. चमत्कार म्हणजे दांडा फिरवल्याबरोबर यंत्रातून खालील भांडयांत बदाबद मोठा आवाज करीत २० पट म्हणजे २० डॉलर्सची नाणी पडली. ती गोळा करून घेतली व अमितश्रीच्या नशिबास नांवाजत आम्ही 'लेक टाहो' पासून ३०-४० मैलावर असलेल्या 'व्हर्जिनिया सिटी' व 'रीनो' या दोन शहरांची ट्रिप केली. दोन्ही शहरे नेवाडा स्टेट मधीलच. त्यामुळें तेथे कॅसिनोचा जुगार फार मोठया प्रमाणावर चाललेला दिसला. येथेही मोठेमोठे हॉल बांधले असून त्यात हजारोंनी कॅसिनो जुगाराची यंत्रें बसवली आहेत. एक डॉलरपासून ते लाख डॉलर्सपर्यअंत व्यवहार चालतो. नशिबाप्रमाणे डॉलर्सचा पाऊस पडेल, नाहींतर कांहींच मिळणार नाहीं. यंत्रातून खाली डॉलर्स पडतात तेव्हा मजा वाटते. आम्ही तेथे थोडा भाग घेऊन कांहीं डॉलर्स मिळवले व मोह आवरला. आशा मोठी वाईट असते. जुगार खेळण्याच्या मागे शहाणेसुर्ते लोक का लागतात याचा अनुभव दहा मिनिटांत आला व आम्ही काढता पाय घेतला. व्हर्जिनिया सिटीमध्यें 'सिल्व्हर क्वीनचा' सहा फूट उंचीचा एक 'बस्ट' (पुतळा) एका इमारतीत ठेवला आहे. ह्या क्वीनचे कपडयावर चांदीचे डॉलर्स मढवले आहेत. सर्वत्र झगझगीत विजेच्या दिव्यांची रोषणाई केलेल्या अनेक इमारती आहेत. दोन्ही शहरांत मोटारीतून फिरून आलो व आम्ही परत 'लेक टाहो' वरील आमच्या मोटेलांत आलो. मोटेल्स फारच स्वच्छ व सुखसोईंनी युक्त अशी असतात. बाहेरील हॉटेलांत जेवणखाण करायचे नसल्यास दुकानांतून खाद्यपेय पदार्थांची खरेदी करून मोटेलमधील स्वयंपाकघरांत विजेच्या शेगडयावर जेवणखाण करून घेण्याची सर्व सोय असते. आम्ही घेतलेल्या ब्लॉकमध्यें अशी सर्व सोय होती. त्यामुळे एक दिवस आम्ही पिठलंभाताचा बेत करून मोटेलवरच जेवणखाण उरकले. आम्हास रोजीं ३० डॉलर्स भाडे पडले. सोमवारीं दि. ७ ऑगष्ट रोजीं आम्ही सकाळी न्याहारी करून १०|| च्या सुमारास 'लेक टाहो' वरील आमचा निवास सोडला व निराळया रस्त्यानें सॅन होजेला सायंकाळी ६|| वाजतां परत आलो. या सफरींत आमच्या नातवानें कांहींसुद्धा त्रास दिला नाहीं व सुखरूप प्रवास झाला. 'लेक टाहो' सरोवर डोंगरांत समुद्रसपाटीपासून ५,००० ते ६,००० फूट उंचीवर आहे. बाजूचे डोंगर ७,००० ते ८,००० हजार फूट उंचीचे आहेत. परत येतांना आमचा प्रवास सृष्टिसौंदर्ययुक्त अशा डोंगराळ भागांतून, घनदाट व उंच अशा वृक्षराजींनीं समृद्ध असलेल्या वनांतून झाल्याने कॅलिफोर्नियांतील सृष्टीसौंदर्य भरपूर पहायला मिळाले. नंतरच्या शनिवारी म्हणजे दि. १३ ऑगष्ट रोजीं आम्ही रविच्या मोटारींतून सॅन होजे जवळच्या 'माउंट हॅमिल्टन' नांवाच्या डोंगरावरील 'लिक ऑब्झरव्हेटरी' पाहिली. ही वेधशाळा अनेक डोंगरराजीमधून ३००-३५० वळणे असलेल्या चढाच्या रस्त्याने चढून गेल्यावर सर्वांत उंच असलेल्या 'माउंट हॅमिल्टन' या डोंगरावरील पठारावर उभारली आहे. तेथे दोन भव्य इमारती आहेत. त्यांतील एका इमारतींत ३६ इंची रिफ्रॅक्टर असलेला टेलिस्कोप आहे व दुसरींत १२० इंची रिफ्रॅक्टर असलेला टेलिस्कोप बसवला आहे. 'लिक' नांवाच्या इंग्लिश माणसानें मोठी देणगी देऊन ही वेधशाळा ह्या डोंगरावर बांधवली. या डोंगरावर अनेक टेकडया ओलांडून मोटार चढत वर जाते. वर जाण्यास दोन तास लागले. आम्ही ३६ इंच टेलिस्कोप असलेल्या इमारतीत त्या दिवशीचा प्रोग्रॅम असल्यानें त्या इमारतीत जाऊन तेथील गोलाकृती हॉलमधील प्रोग्रॅमला उपस्थित राहिलो. तेथे अंधार करून आकाशांतील ग्रहांची व अमेरिकेंतील सूर्योदयाची वगैरे दृश्ये दाखवून जुनी माहिती सांगण्यात आली. टेलिस्कोपच्या सहाय्यानें द्यावयाच्या माहितीसाठी पुढील तारीख दिली होती. त्यामुळें वरीलप्रमाणें प्रोग्रॅम संपल्यावर आम्ही बाहेर आलो. तेथे एका दालनांत निरनिराळया ग्रहांचे फोटो देऊन संपूर्ण वर्णनाचे मोठेमोठे फलक भिंतीवर टांगले होते; तसेच अलिकडे चंद्रावर स्पेसशिप जाऊन आले, ती माहितीही चित्ररूपानें एका काचपेटींत ठेवली होती व चंद्रावरून पृथ्वीवर आणलेले दगडही ठेवले होते. ती सर्व माहिती व तक्ते वगैरे पाहून झाल्यावर आम्ही घरी परत आलो. एका रविवारीं आम्ही 'साराटोगा' येथील एक वाइनरी पाहिली. ही वाइनरी 'पॉल मसॉन' नांवाच्या एका इसमानें बांधली आहे. तेथे द्राक्षापासून वाइन, शाम्पेन वगैरे मद्यें बनवतात. द्राक्षें झाडांवरून काढतात येथपासून ते तयार दारू बाटल्यांत भरून विक्रीस पाठवण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांची माहिती तेथे त्या त्या विभागांत नेऊन कारखान्याचा एक गाईड उपस्थित प्रेक्षकांना सांगतो. दिवसभर असे प्रेक्षक हा कारखाना पहाण्यासाठीं ठिकठिकाणाहून येतात व जातांना कारखान्यांतील तळमजल्यांतील दुकानांतून निरनिराळया मद्यांच्या बाटल्या विकत घेऊन घरी परततात. दिनांक १४ ऑगष्ट रोजीं रविवारीं आम्ही सॅन होजे डाऊनटाऊन कडील एक प्लॅनेटेरियम व म्यूझियम पहाण्यास गेलो होतो. 'रोसिक्रूशिन पार्क' मधील कांहीं इमारतींत 'अमॉर्क' या नांवाच्या एका संस्थेने ही प्रेक्षणीय व वैज्ञानिक स्थळें निर्माण केली आहेत. याशिवाय याच संस्थेची तेथे एक आर्ट गॅलेरी पण आहे. या म्यूझियमला 'इजिप्शियन म्यूझियम' असे नांव दिले असून त्यांत तीन हजार वर्षापूर्वीची इजिप्शियन राजांची व इतरांची प्रेतशरीरें (ममी) असलेल्या पेटया ठेवल्या आहेत. इजिप्त देशांतील पिरॅमिडमध्यें असलेल्या या 'ममी' या संस्थेने मिळवून या ठिकाणी पहाण्यासाठीं ठेवल्या आहेत. ती प्रेतशरीरे अद्याप शाबूत आहेत. फक्त मांस विरहित पण त्वचायुक्त अशी ही प्रेतशरीरें वस्त्रांत गुंडाळून ठेवली आहेत. वस्त्रेही पूर्वीचीच आहेत. त्याकाळीं मृताच्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचे मलम चोपडून लाऊन त्यावरून वस्त्र गुंडाळून ठेवल्यानें ती तशीच टिकली आहेत. या 'ममी' म्हणजे जगांतील दहावे आश्चर्यच म्हणावे लागेल. तोंडातील दातांची कवळी, हातापायांच्या बोटांवरील नखें जशीच्या तशी दिसत आहेत. प्रत्येक पेटीवर मृताची प्रतिकृती तयार करून निद्रितावस्थेत ठेवली आहे. त्यावरून पेटींत कुणाचे प्रेतशरीर आहे हे समजते. मेलेले माणूस जणू कांहीं पुढील प्रवासाला जाणार आहे अशी कल्पना करून त्याला लागणारी साधनें - होडी, सोने वगैरे वस्तू - या 'ममी' जवळ ठेवल्या आहेत. या सर्वांवर पिरॅमिड बांधत असत - म्हणजे कोणासही या वस्तूंचा अपहार करणें शक्य होणार नाहीं अशी एक विशिष्ट प्रकारची दगडी इमारत बांधत असत. अशा पिरॅमिडची एक प्रतिकृती तयार करून काचेच्या पेटींत पहाण्यासाठी ठेवली आहे. हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटते. या म्यूझियममध्यें 'ममी' खेरीज जुन्या काळांतील इजिप्त, असीरिया व इराण या तीन देशांतील जुनी देवळे, देवतांच्या मूर्ती, बागा, त्या काळांतील तेथील पशुपक्षी, बांधकामाची व शेतीची साधने, हत्यारे, भांडीकुंडी वगैरे वस्तूही काचांच्या कपाटांतून मांडून ठेवल्या आहेत. जवळच्या निराळया इमारतींत 'प्लॅनिटेरियम' आहे. तेथे एका हॉलमध्यें अंधार करून आकाशांतील सूर्य, चंद्र, ग्रह व तारांगणें दाखवून माहिती सांगण्यात आली. त्यानंतरच्या शनिवारीं आम्ही पुन्हा सॅन फ्रॅन्सिस्कोची ट्रिप केली. यावेळीं मेक्सिकन आंब्यांची एक पेटी व इतर वाणसौदा, तसेच सेलवर असलेल्या थोडया रेशमी वगैरे साडया खरेदी करण्याचा हेतू असल्यानें प्रथम ती खरेदी केली व नंतर सॅन फ्रॅन्सिस्को शहरांतील मुख्य हमरस्त्यावरून मोटारींतून त्या शहरांतील मोठी दुकानें़ बॅकांच्या व इतर इमारती, तसेच चिनी लोकांची रंगीबेरंगी मालाची व खाद्यपेयादि पदार्थांची दुकाने हिंडून पाहिली व नंतर गोल्डन गेट पार्ककडे गेलो. तेथे प्रथम एअशियाटिक म्यूझियम पाहिली. त्यांत पूर्वेकडील देशांतील म्हणजे हिंदुस्तान, चीन, जपान, कोरिया, काम्बोडिया वगैरे आशिया खंडांतील देशांतील देव-देवतांचे असंख्य दगडी वा धातूंचे पुतळे जसे सापडले त्या स्थितींतील आणून ठेवले आहेत. जुन्या काळांतील शिल्पकलेच्या वस्तू व पुतळे पहाण्यासाठी दोन तास लागले. सर्व गोष्टी पाहून फार आनंद वाटला. नंतर पार्कमध्यें जाऊन त्यांतील मत्स्यालय पाहिले. तेथे असंख्य प्रकारचे लहानमोठे मासे, समुद्रांतील नानाप्रकारचे इतर जीवजीवाणू कांचेच्या एकमजली दालनांत पाणी भरून त्यांत ठेवले आहेत. एकमजली कांचघरांत सर्वत्र विजेच्या दिव्यांनी सुंदर डेकोरेशनही केले आहे. त्यामुळे नजरेला आल्हाद वाटतो. मत्स्यालय फारच सुंदर व विस्तृत आहे. दुसर्‍या, जवळच्या एका इमारतींत निरनिराळया देशांतील पशू, पक्षी वगैरे प्राणी पेंढा भरून ठेवले आहेत. ती दालने पाहिली. हे पशूपक्षी जणू जिवंत आहेत असे वाटते. ही दालने सुद्धा अनेक व मोठी आहेत. तेथेच दुसर्‍या ठिकाणीं दालनांतून निरनिराळया वनस्पती मोठयामोठया काचेच्या पेटयांतून पाण्यांत ठेवल्या आहेत. तसेच तेथे जुन्या वृक्षांची खोडे ठेवली आहेत व खोडे कापून त्यांतल्या रेषांवरून वृक्ष किती वयाचा असावा ते दाखवून माहिती दिली आहे. या पार्कमध्येंही एक प्लॅनिटेरियम आहे. पण ते वेळेअभावी पाहू शकलो नाही. जवळच एका दालनांत जुन्या काळापासूनची वेळ दाखवणारी साधनें आजच्या घडयाळांच्या युगापर्यंतची कांचेच्या कपाटांतून मांडून ठेवली आहेत ती पाहिली. फार मजा वाटली. नंतर शहरातील मोठया रस्त्यांनी फिरून रात्री घरी परत आलो. अमितबाळही सकाळपासून आमच्याबरोबर होताच. आतापर्यंत सर्व जे कांहीं पाहिले ते रविच्या मोटारींतून हिंडून पाहिल्यानें सर्व आरामांत पाहू शकलो व बरोबर आमचा गोजिरवाणा नातू असल्यानें फार आनंद वाटत होता. घरी असतांना त्याच्याशी बोलण्यांत व खेळण्यांत वेळ मजेंत जात होता. मुलाशी व सुनेशी गप्पागोष्टी सारख्या सुरू असतच. तसेंच मधून मधून कुठे ना कुठे रविच्या मित्रमंडळीकडे जात होतो. सत्यनारायणाची पूजा, पार्टी वगैरे कांहीं ना कांहीं निमित्तानें तेथील महाराष्ट्रीय कुटुंबांत आम्ही मिसळत असू. सर्वांना स्वत:चेच आईवडीलच आपल्या घरी आल्यासारखा आनंद वाटे व आदर सत्कार केला जाई. रविच्या घरास मागेपुढें मोकळी जागा असल्यानें मागील जागेंत फुलझाडें़ भाजीपाला, विस्तृत लॉन व स्विमिंग पूल आहे. पुढील जागेंत थोडी फुलझाडें व शोभेची झाडे व मोठे लॉन आहे. लॉनची यंत्रानें कापणी करण्याचे काम रवि दर आठवडयास करत असे. कापलेले गवत केर-कचर्‍याबरोबर दर आठवडयात शुक्रवारीं म्युनिसिपालटीची गाडी येई त्यांतून नेले जाई. तसेच दर गुरुवारी अगर रविवारी सकाळी घरांतील दालनें यंत्राने साफ करण्याचे काम असे. लॉनला व बागेला अशा दोन्ही ठिकाणी रबरी नळीनें पाणी घालणें; नवीन भाजीपाला-फुलझाडे लावणे व त्यांची निगा राखणे; वगैरे कामे चालू असत. या सर्व कामांत रविला 'हे' मदत करत असत. त्यामुळें 'ह्यां'चा वेळ छान जाई. मी सुषमाला स्वैपाकघरांतील कामांत मदत करीत असे. स्वयंपाक, भांडी घासणे, कपडे धुणे ही सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने विजेवर चालत. त्यामुळें सर्व कामे झटपट उरकत व फार श्रम होत नसत. ही विजेची उपकरणें एकदा चालू केली म्हणजे ठराविक वेळेला आपोआप बंद होत. यामुळें त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागत नसे. स्वयंपाकघरांत विजेवर चालणार्‍या शेगडया, ओव्हन, टोस्टर, मिक्सर, डिशवॉशर वगैरे विविध विजेची उपकरणे आहेत. कपडे धुण्यासाठी व वाळवण्यासाठी भलामोठा वॉशर व द्रायर असल्यामुळे एकदम अनेक कपडे स्वच्छ धुवून व वाळवून तयार मिळायचे. या सर्व कामांची ही सोय पाहून फार मजा वाटे. पाणी, वीज व गॅस यांचा पुरवठा चोवीस तास होत असल्यानें सर्व कामें बिनधोकपणें करता येत असत. किचनमधील सिंक मध्यें़ ठिकठिकाणच्या वॉशबेसिन्समध्यें व बाथरूममध्यें गरम आणि थंड पाणी एकत्र असल्यानें फार सोईचे होत असे. बागेंत फुले भरपूर असल्यानें 'ह्यां'ची रोजची देवपूजा यथासांग चाले. आमचे कुलदैवत श्रीदत्तात्रय आहे. श्रावणाचे सुरुवातीपासून मी श्रीगुरुचरित्र पारायण केले. नंतर सांगता म्हणून दि. २७ ऑगष्टला सत्यनारायण पूजा केली. त्यानिमित्त (व अमितश्री निमित्त) रवि-सुषमा यांनी तेथील सर्व स्नेहमंडळींना मोठी पार्टी दिली. श्रीखंड-पुरी व इतर महाराष्ट्रीय पद्धतीप्रमाणें जेवणाचा बेत होता. सगळा दिवस अगदी गडबडींत गेला. पार्टी संध्याकाळी होती. सायंकाळी सात वाजल्यापासून स्नेहीमंडळी येऊ लागली. सर्वाकडे मोटारी असल्यानें व लांबलांब रहात असल्यानें सर्वजण मोटारीनें आले होते. सर्वजण गप्पागोष्टी करीत, बुफे पद्धतीनें स्वत:च आवडेल ते व तेवढे पदार्थ घेऊन खाणेपिणे करीत होते. रात्रीं १२ पर्यंत मजा मजा चालली होती. या सर्व गडबडीत नातू अमित खेळत होता. सर्व आवराआवर करून झोपण्यास रात्रीचे दोन वाजले. असे आमचे सॅन होजे येथील वास्तव्य मोठया आनंदांत व समाधानांत चालले होते. आता आमची परदेशांत रहाण्याची मुदत पण संपत आली होती. चार-आठ दिवस वॉशिंग्टनला आमचा पुतण्या चि. आनंद, सून चि. सौ. ललिता व नातू अमोल यांच्याकडे जायचे मनांत होतेच. एवढयात ऑगष्ट अखेरीस आनंदचा फोन आला. आनंद, ललिता व आणखी कांहीं मंडळी मिळून 'नायगरा' धबधबा पहाण्यासाठी दि. ३ सप्टेंबरला जाणार होती. त्यांच्याबरोबर आम्ही दोघांनी नायगराच्या सहलीला यावे असा आनंदचा आग्रह पडला. आम्ही नायगरा पाहून घ्यावा असे सर्वानुमतें ठरल्यानें आम्ही चारआठ दिवस अगोदर वॉशिंग्टनला जाण्याचे ठरवले.मुलाच्या, सुनेच्या व नातवाच्या सहवासांत आमचे साडेतीन महिने फार मजेंत गेले. आम्ही सॅन होजेला आल्यापासून मुंबई, पुणे, सातारा, सांगली वगैरे सर्व ठिकठिकाणच्या नातेवाईकांना आमची खुशाली वरचेवर पत्रानें कळवत असू. आमच्या थोरल्या मुलीचे यजमान मुंबईबाहेर नोकरीस असल्यामुळें आम्हास आमच्या दोन्ही मुलींच्या व नातीच्या खुशालीची पत्रें मुंबईहून वरचेवर मिळावीत असे वाटे. त्यांची पत्रें कधींकधीं फार उशीरा मिळत किंवा उभयतांकडील पत्रांची चुकामूक होई. अशावेळीं आम्हास त्यांच्याबद्दल फारच काळजी लागून राही व पत्रें मिळाली म्हणजे आमची काळजी दूर होत असे. पत्रें लिहिण्याचे काम बहुधा मीच करत असे. हे काम मी मोठया हौसेने करीत असे. इकडील पोस्टाबद्दल विशेष सांगण्यासारखी गोष्ट ही कीं इकडील पोस्टमन आपणांस आलेली पत्रें घराबाहेरील पेटींत टाकीत असे व तोच आपण बाहेर पाठवण्यासाठी लिहिलेली पत्रे पेटीवर ठेवल्यास पोस्टांत पोचवण्याचे काम करीत असे. त्यामुळे पत्र पोस्टांत टाकण्यासाठी आपणास पोस्टऑफिसकडे वा एकाद्या पोस्टाची पेटी असणार्‍या ठिकाणाकडे जाण्याची जरूरी नसते, ही सोय अमेरिकेंत सर्वत्र दिसली. दि. २९ ऑगष्ट रोजीं सकाळी आम्ही अमेरिकन एअ-अरलाईन्सच्या विमानानें (लक्झरी जेटनें) वॉशिंग्टनला जाण्यास निघालो. विमानाचे न्यूयॉर्क पर्यंतचे भाडे आमच्या परतीच्या तिकिटांत दिलेलेच होते; फक्त न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन पर्यंतचे भाडे प्रत्येकी डॉलर्स ३५ पडले. विमानतळावर आम्हास पोचवावयास रवि, सुषमा, नातू अमितश्री; सर्वजण आले होते. त्या सर्वांना सोडून निघतांना मन फार जड झाले होते. पण सॅन होजेमधील आमचे वास्तव्य अमेरिकेंतील वास्तव्याची मुदत संपल्यानें संपुष्टात येणे भाग होते. दि. २९ ऑगष्टला सकाळी ७ वाजतां सर्वांचा निरोप घेऊन आम्ही सॅन होजे सोडले. सायंकाळी 'लग्वाडिया' नांवाच्या न्यूयॉर्कमधील विमानतळावर आल्यावर तेथील 'ओझार्क' कंपनीच्या विमानांत बसून सुमारे एक तासानें म्हणजे सायंकाळी सात वाजतां आम्ही वॉशिंग्टन येथील 'डल्लस' विमानतळावर पोहोचलो. विमानतळावर आनंद आलाच होता. त्याच्या मोटारींतून वॉशिंग्टन जवळील 'मेरीलॅड' मधील त्याच्या घरी गेलो. सूनबाई ललिता व नातू अमोल भेटले. फार आनंद वाटला. न्यूऑर्लिन्सला रहाणारे ललिताचे आतेभाऊ श्री. श्री गोंधळेकर, सौ. गोंधळेकर, श्री चे सासूसासरे (पुण्याचे श्री. व सौ. शिधये) व श्रीचे आईवडील (मुंबईचे) अशी सर्व मंडळी नायगर्‍याच्या सहलीसाठी आनंदकडे अगोदरच आली होती. त्यामुळे घरांत गडबड होती. सर्वांबरोबर आम्ही चार दिवसांच्या मुक्कामांत वॉशिंग्टन शहर पाहिले. पहिल्या दिवशीं टूर बसची तिकिटे काढून सकाळच्या १० पासून सायंकाळच्या ६ वाजेपर्यंत प्रेक्षणीय स्थळें पाहात खूप हिंडलो. प्रथम 'जेफरसन मेमोरिल' पाहिले. जेफरसन हे अमेरिकन स्वातंतर्‍याचा ठराव मांडणारे एक प्रमुख अमेरिकन व्यक्तित्व होते. एका सुंदर व भव्य इमारतींत जेफरसन यांचा पंधरा फूट उंचीचा भव्य पुतळा एका शुभ्र संगमरवरी दगडांच्या चौथर्‍यावर उभा केला आहे. समोर मोठा सुंदर जलाशय आहे. स्थान मोठे रमणीय वाटले. नंतर 'लिंकन मेमोरिल' पाहिले. तेथेंही एका मोठया इमारतींत बसलेल्या 'अब्राहम लिंकन' या सुप्रसिद्ध अमेरिकेच्या अध्यक्षांचा मोठा पुतळा आहे व भोवतालच्या भिंतीवर लिंकनची महत्वाची भाषणें कोरली आहेत. हे सर्व पाहून नंतर राष्ट्राध्यक्ष जे.एफ. केनेडी यांच्या स्मरणार्थ बांधलेले कलाभवन - 'सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस' पाहिले. आधुनिक बांधणीची मोठी इमारत असून त्यांत अनेक दालने आहेत व रंगमंच आहेत. प्रत्येक दालनांत कोणती कला जोपासली जाते त्याबद्दलची माहिती मार्गदर्शिका प्रेक्षकसमूहांस सांगत होत्या. येथे जगांतील निरनिराळया देशांनी बक्षीस दिलेल्या कलाकृती ठिकठिकाणी ठेवल्या आहेत त्या फारच प्रेक्षणीय आहेत. त्यानंतर तेथून पुढील भागांत 'कॅपिटॉल' नांवाची भव्य व जुन्या बांधणीची दगडी इमारत आहे. तेथे अनेक हॉल्समध्यें अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे व इतर मोठमोठया प्रसिद्ध लोकांचे असंख्य पुतळे ठेवले असून एका मोठया हॉलमध्यें अमेरिकेच्या स्वातंतर्‍ययुद्धाची भव्य रंगीत तैलचित्रे भिंतीवर काढली आहेत. ती फारच सुरेख आहेत व ती पाहून गेल्या वर्षी अमेरिकेनें साजरा केलेल्या द्वितीय शताब्दि स्वातंतर्‍यमहोत्सवानिमित्त त्या चित्रांच्या प्रतिकृती छापून प्रसिद्ध केल्या होत्या त्याचे स्मरण झाले. दुसरे दिवशी सकाळी लौकर बाहेर पडलो व प्रथम आम्ही वॉशिंग्टन येथील सुप्रसिद्ध 'व्हाईट हाऊस' हे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान पाहिले. त्यासाठींची प्रवेशपत्रिका पहिल्या प्रेक्षकसमूहांत समाविष्ट होण्यासाठी त्वरा करून मिळवावी लागली व प्रेक्षकांनीं गटागटानीं व्हाईट हाऊस पहाण्यासाठी जायचे असल्यानें आम्ही पहिल्या प्रेक्षकगटांत सामिल होऊन १० वाजेपर्यंत एका मोठया मैदानांतील फळयांच्या पीटावर बसून राहिलो कारण व्हाईट हाऊस सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतच पहाण्यास मोकळे असते. व्हाईट हाऊसमध्यें अनेक हॉल्स आहेत व त्यांत जुन्या काळापासूनच्या अध्यक्षांनी वेळोवेळी उपयोगांत आणलेलें उंची फर्निचर ठेवले आहे ते दाखवतात. तसेच अध्यक्ष इतरांबरोबर बातचीत जेथे करतात तो हॉल पाहिला. तेथे अध्यक्ष व इतर प्रमुख लोकांचे (जे तेथील दोन्ही सभागृहांत निवडून दिलेले जनतेचे प्रतिनिधि म्हणून बसतात त्यांचे) फोटो लावले आहेत. व्हाईट हाऊस पहाण्यास अर्धा तास लागला. राष्ट्राध्यक्ष या इमारतीच्या मागील भागांतील दालनांत रहातात, त्यामुळें त्यांना पहाण्याची संधि मिळत नाही. व्हाईट हाऊस पाहून मग आम्ही तेथील सुप्रसिद्ध 'जॉर्ज वॉशिंग्टन'च्या स्मरणार्थ उभारलेली ६५० फूट उंचीची कुतुबमिनारासारखी उंच इमारत आंतल्या पोकळींत असलेल्या लिफ्टमधून जाऊन पाहिली. वरच्या मजल्यावरून सबंध वॉशिंग्टन शहराचा देखावा चांगला दिसतो. या मजल्यावर हें स्मारक केव्हा बांधले वगैरे माहिती लिहिली आहे. हे स्मारक पहाण्यास अर्ध्यार्ध्या तासानें प्रेक्षकांचे निरनिराळे गट सकाळी ८ पासून दुपारी ४ पर्यंत आंत सोडण्यांत येतात व त्यासाठी प्रवेशतिकिट काढून ठेवून त्या त्या गटांत बसून रहावे लागते. अर्थात व्हाईट हाऊस अथवा वॉशिंग्टन स्मरणगृह पाहाण्यासाठी कांहीं फी द्यावी लागत नाहीं. पासेस अगोदर मिळवून ठेवले म्हणजे आपला गट असेल त्यांत बसून राहिल्यास इतरांबरोबर ही प्रेक्षणीय ठिकाणें सुलभतेनें पहाता येतात. तिसरे दिवशीं वॉशिंग्टन येथील प्रख्यात 'नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट' नांवाची म्यूझियम पाहिली. ही फार अवाढव्य व मोठी इमारत असून त्यांतील तळमजल्यावर तसेच इतर मजल्यांवर असंख्य दालनांतून निरनिराळे अप्रतिम देखावे, वैज्ञानिक माहितीच्या तक्तयांसह खनिज पदार्थ, वगैरे प्रदर्शनांतील वस्तू ठेवल्या आहेत. मुख्य विभाग म्हणजे रत्ने, माणिकमोती वगैरे खनिज व सागरोत्पन्न पदार्थ - हिरे, माणके, प्रवाळ, सोने वगैरे असंख्य मौल्यवान वस्तू व धातू ठेवलेला विभाग हे या म्यूझियमचे वैशिष्ठय समजावे लागेल. येथे रत्ने कशी अस्तित्वांत येतात, त्यासाठी काय प्रक्रिया करण्यांत येतात वगैरे वैज्ञानिक माहितींचे तक्ते ठेवले आहेत व तयार वस्तू म्हणजे हार, बांगडया वगैरे जिन्नस, शुद्ध सोन्याचा गोळा वा चिपा, चांदीचे पाट, तेराशे हिरे लावून सोन्यांत मढवलेला एक सुंदर पेला वगैरे पहायला मिळतात. सोन्यांत हिरे मढवलेला हा पेला एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिला आहे. सोन्याचांदीचे व इतर अनेक मौल्यवान धातूंचे नमुनेही ठेवले आहेत, अगोदर नुसते दगड वाटणारे खनिज पदार्थ, पण त्यावर पैलू पाडणे वगैरे प्रक्रिया केल्यावर त्यातून निर्माण होणारे चमकदार हिरे वगैरे मौल्यवान जिन्नस पाहून फार गंमत व आश्चर्य वाटले. प्रत्येकाला कांहीं ना कांहीं पैलू असावा हे खरे; तरच त्याची जगांत किंमत असते. हा म्यूझियम पहाण्यास सबंध दिवस पुरणार नाही. आम्ही हिरेमाणकांचा विभाग पाहिल्यावर तळमजल्यातील एका दालनांत निरनिराळया देशांतील तंतू वाद्ये ठेवली आहेत तो विभाग पाहून बाहेर पडलो व तेथून दुसर्‍या एका ठिकाणी चंद्रादि ग्रहांवर जाण्यासाठी तयार करण्यांत आलेली आकाशयाने (स्पेसशिप्स) कशी बनवतात व वैमानिकास काय तयारीनें त्यांत बसून उडडाण करावे लागते वगैरे माहिती देणारी ' नॅशनल एअ-अर एऍन्ड स्पेस एजंसी' नांवाची एक म्यूझियम पाहिली व उशीर झाल्यामुळे घरी परत आलो. त्यानंतरच्या दिवशी आम्ही वॉशिंग्टनच्या परिसरांतील व्हर्जिनिया स्टेटमधील 'ल्यूरे' नांवाच्या गांवातील 'ल्यूरे कॅव्हर्न' या नांवाची निसर्गनिर्मित भव्य व विस्तीर्ण भुयारी गुहा पाहिली. पृथ्वीचा तप्त गोल थंड होतांना ही गुहा तयार झाली असावी असे वाटते. या गुहेचा शोध लागल्यावर एका संस्थेनें ही गुहा साफसूफ करून आंत लांबवर जाऊन पहाण्यास सुलभ होईल अशी सोय केली आहे. गुहेंत विटा बसवून (विटांची फरसबंदी करून) सुंदर रस्ते केले आहेत व विजेचे दिवे लावून उजेड केला असल्यानें आंतील सर्व निसर्गनिर्मित गोष्टी हिंडून पाहाता येतात. ही गुहा २ मैल लांबीची आहे. जमिनीच्या पोटांत उतरत जाणार्‍या आंतील वाटांवर पृथ्वीच्या पोटांतील रस थिजून निरनिराळया रंगांत ठिकठिकाणी स्थिर झालेल्या खडक स्वरूपांत लोंबत असून त्यांचे नानाविध आकार दिसत होते. खांबासारखे-तुळईसारखे आडवे-उभे पसरले होते. अशाच खडकांमुळें पृथ्वीच्या पोटांत खनिज पदार्थ बनले असावेत. या लोंबत असलेल्या, थिजलेल्या रसांची (खडकांची) एके ठिकाणी अशी रचना निसर्गरित्या झाली आहे की त्या दगडांतून वाद्यसंगीत निर्माणकेले आहे - म्हणजे या खडकांवर आदळणार्‍या कृत्रिम हवेच्या झोतामुळें खडकांमधून होणारा आवाज एका वाद्यांत पकडून घेतला आहे व संगीत निर्माण केले आहे. ही गुहा व त्यांतील रंगीबेरंगी रसांचे लोंबणारे खडक पाहून मती गुंग झाली. पृथ्वीच्या पोटांत काय खळबळ चालते याची चुणुक जाणवते व भीतीयुक्त आश्चर्य वाटते. बाहेर आल्यावर जवळच्या इमारतींत वरील संस्थेनें चालवलेले जुन्या काळापासून आजपर्यंत उत्क्रांत होत गेलेल्या मोटार या वाहनाचे प्रदर्शन पाहिले. पाहून फार मजा वाटली. 'माऊंट व्हर्नान'च्या डोंगराळ प्रदेशांतील वरील गुहा;नंतर मोटारींचे प्रदर्शन पाहून परत येतांना 'स्काय लाईन' असे संबोधण्यांत येणार्‍या डोंगर माथ्यावरील रस्त्यावरून मोटारीनें जातांना निसर्गशोभा पाहात पाहात आम्ही सर्वजण वॉशिंग्टनकडे आलो व 'आर्लिग्टन' येथीलस्मशानभूमींत टूर बसमध्यें बसून मृतसैनिकांचे स्मारक म्हणून रोवलेले चित्राकृती दगड व इतर मोठया, सुप्रसिद्ध व्यक्तींची थडगी हिंडून पाहिली. जे.एफ. केनेडी व त्यांचे बंधू रॉबर्ट केनेडी यांची थडगी तेथे होती, त्यापैकी जे. एफ. केनेडी यांच्या थडग्यावर जळत्या गॅसची एक ज्योत कायमची तेवत ठेवली आहे. त्यांच्या स्मृतीस आम्ही मनातल्या मनांत त्यांना आदरांजली वाहून आम्ही घरी परत आलो. रॉबर्ट केनेडींच्या थडग्यावर पुष्पचक्र सतत ठेवलेले आढळले. याप्रमाणे पुतण्याकडे चार दिवस राहून येण्याचा आमचा संकल्प उत्तमरीतीनें सिद्धीस गेलाच व वॉशिंग्टनमधील बरीचशी प्रेक्षणीय स्थळेंही पाहून झाली. चार दिवस खूप मजा केली. आनंदचे घर रविसारखे एकमजली आहे पण थोडे लहान आहे. कमी जागेची भरपाई मात्र घराखाली संपूर्ण क्षेत्राइतके तळघर असल्यानें झाली आहे. या तळघरांत जेवणखाण वगैरेसाठी विस्तृत जागा आहे व त्यापैकीं एका खोलींत कपडे धुण्याची यंत्रे ठेवता येऊन स्टोअररूमची सोय झाली आहे. नायगरासहल हा मुख्य कार्यक्रम आखला असल्यामुळें आम्हास आनंदकडे जास्त दिवस रहाता आले नाहीं. दि. ३ सप्टेंबरला सकाळी नायगराच्या सहलीला निघायचे ठरले होते त्याची तयारी करून घेतली. आमचे सर्व सामानही आम्ही वॉशिंग्टनला परत येणार नसल्यामुळें बरोबर मोटारींत घेतले. दि. ३ ला सकाळी ७|| वाजता आमच्या दोन्ही मोटारी - एक आनंदची व दुसरी श्रीने भाडयानें सहलीसाठी घेतलेली (श्री ची गाडी लहान असल्यामुळें जास्त माणसें मावतील अशी मोठी गाडी भाडयानें घेतली होती ती) - मेरिलॅडपासून न्यूजर्सीकडे निघाल्या. श्री. भाल मोघे यांच्याकडे आमचे सामान टाकून पुढें कॅनडातील मॉट्रीयल मार्गे नायगराकडे जाण्याचे ठरवले असल्यानें आमच्या मोटारी न्यूजर्सीतील एलिझाबेथ येथील श्री. मोघे यांच्या निवासस्थानीं आल्या. श्री. मोघे यांच्याकडील पाहुणचार घेऊन आमच्या मोटारी 'व्हर्मॉन्ट' कडे निघाल्या. पहिला मुक्काम व्हर्मॉन्टला 'रॉयल मोटेल' मध्यें रात्रीसाठी करून आम्ही जवळपासच्या डोंगरावरील सृष्टिसौंदर्य पहाण्यासाठी सकाळी मोटेल सोडले व 'किलिंग्टन' येथील 'स्काय रिझॉर्ट'ला आलो. तेथे डोंगरमाथ्यावर जाण्यासाठीं खुर्चीचे पाळणे, तसेच चार माणसे बसतील असे 'गोंडोला' (पाळणा) ठेवले आहेत. त्यात बसून आकाशांतून आम्ही ३|| मैल लांबीचा चढ पार करून डोंगरमाथ्यावर आलो. हे पाळणे विजेच्या सहाय्यानें लोखंडी दोरावरून सरकत वर जातात व तसेच खाली येतात. स्काय रिझॉर्टमधील हॉटेलांत खाद्यपेयांचा आस्वाद घेऊन व तेथील गॅलरींतून सभोवतालच्या डोंगराळ प्रदेशांतील सृष्टिसौंदर्य पाहून आम्ही पाळण्यांतून सरकत खाली आलो. दुसर्‍या अशाच एका ठिकाणीं खाली परतण्यासाठी खुर्चीचा पाळणा न घेता आम्ही घसरगुंडीवरून चाके असलेल्या पाटावर बसून घसरत खाली आलो. या घसरगुंडीची फार मजा वाटली. त्या पाटावर ब्रेक लावले असल्यामुळें त्यावर ताबा ठेवून आपणास जेवढया वेगानें खाली घसरणे सुसह्य होईल तेवढया वेगानें खाली येता येते. लहान मुलांना मात्र या घसरगुंडीवरून मोठया वेगानें खाली येण्यांतच आनंद वाटतो. पाटासकट घसरगुंडीच्या बाहेर फेकले गेल्यास त्यांतच त्यांना मजा वाटते. पाटासकट पुन्हा घसरगुंडींत बसून पुन्हा पुढील प्रवास करता येत असल्यानें मुलांना हा खेळच होतो. पाळण्यांतून आकाशांत उंचीवरून जातांना-येतांना भीती वाटते. एखादा अपघाताचा प्रसंग आल्यास ताबडतोब इलाज करता यावा म्हणून आकाशांतून हेलिकॉप्टर उडत असते. 'गोंडोला' हा पाळणा मेण्यासारख्या बंदिस्त वाहनासारखा असतो. खुर्चीच्या पाळण्यांत फक्त दोन माणसे बसू शकतात व आधारासाठी त्यांनी आपल्या हातांनी धरून ठेवण्यासाठी लोखंडी सळईचे असते. खुर्चीभोवती या सळईचे एक कडे पाडले जाते त्यामुळे पाळण्यांतून बाहेर पडण्याची भीती नसते. या पाळण्यांतील सफर १|| तासांची असते. ञ आनंद लुटून आम्ही एका हॉटेलांत जेवण करून दुपारी ३ वांजता कॅनडा देशांतील मॉट्रीयल शहराकडे निघालो. मॉट्रीयल शहर कॅनडांतील 'क्विबेक' प्रांताची राजधानी आहे. मॉट्रीयलमध्यें श्री. गोंधळेकरांची आतेबहीण सौ. हेर्लेकर असते, तिच्याकडे गोंधळेकर व शिधये मंडळींचा मुक्काम ठरविला होता. आनंद-ललिता-अमोलबरोबर आमचा मुक्काम शहरांतील 'टाउन स्क्वायर मोटर इन' नांवाच्या मोटेलमध्यें अगोदर राखून ठेवला होता. मॉट्रीयलला आमच्या मोटारी रात्री १०चे सुमारास पोहोंचल्या. कॅनडाच्या हद्दींत शिरतांना कस्टमनें आमचा पासपोर्ट, व्हिसा तपासून व त्यावर आपल्या देशाचा शिक्का मारून मान्यता दिल्यावरच आम्ही शहरांत शिरलो. मॉट्रीयलला आम्ही तीन दिवस राहिलो. दि. ५ रोजी सोमवारी सकाळी आम्ही सर्वजण तेथे भरविण्यांत आलेल्या जागतिक राष्ट्रांचे प्रदर्शन पहाण्यास गेलो. तो त्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. तेथे सबंध दिवस निरनिराळया राष्ट्रांनीं भरवलेले हे प्रदर्शन पहाण्यात गेला. प्रत्येक राष्ट्रानें आपल्या राष्ट्राचे महत्व वस्तूरूपाने दाखवले होते. भारतानें दक्षिणेतील गोपुरांची देवळे, राजस्थानकडील कलाकृतींच्या प्रतिकृती, तसेच श्रीकृष्ण व गोपी यांची नृत्यादि भावदर्शक प्रतिकृती ठेवल्या होत्या. प्रदर्शनाबरोबर इतर करमणुकींचे कार्टून वगैरे शो ठेवले होते. तसा एक शो पाहिला. एक शो वीस ते तीस मिनिटांचा होता. त्याचप्रमाणे तेथे सर्करामा अर्थात ३६० डिग्री सिनेमा होता, तो शो पाहिला. या सर्करामामध्यें सबंध कॅनडा देश दाखवला. एका मोठया हॉलमध्यें अनेक प्रेक्षकासह उभे राहून फिरत्या सिनेमारूपानें आम्ही कॅनडा देशभर फिरून आलो. समुद्रातून बोटीमधून, डोंगर, दर्‍या, अरण्ये, मोठीमोठी शहरे, सैनिकांची व घोडेस्वारांची संचलने असे सर्व पाहिले. हे पहातांना तिकडील भव्यता पाहून डोळे दिपून गेले. सर्करामा पाहात असतांना आपण स्वत:च कॅनडादेश फिरून आलो असे भासले. माझे डोके गरगरायला लागले व मला या शोचा त्रास झाला. रात्री मोटेलवर परतल्यावर, रात्रभर विश्रांति झाल्यावरच सकाळी पुन्हा हिंडण्यास हुशारी वाटली. आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो. प्रथम मॉट्रीयलमधील सुप्रसिद्ध चर्च पाहिले. हे चर्च फारच मोठे व भव्य आहे. चर्चमध्यें डेकोरेशन फार सुंदर केले आहेर्‍अंगसंगती फारच उत्तम साधली आहे. नक्षीकाम नानातर्‍हेचे रंग व सोनेरी रंग वापरल्यानें फारच सुंदर दिसले. येशू ख्रिस्ताबद्दलची बायबलमध्यें वर्णन केल्याप्रमाणे येशूच्या अंताचे प्रसंग दाखवणारी पेंटिंग्ज भिंतीवर जागोजागी टांगली आहेत. चर्च बघतांना डोळे दिपून जावेत अशी कलाकुसर केली आहे. चर्च पाहिल्यावर शहराबाहेरील ऑलिंपिक सामन्यांचे मैदानाकडे गेलो. ऑलिंपिक स्पर्धेत निरनिराळी राष्टेऋ भाग घेतात व स्पर्धेत बक्षिसे मिळवतात. सबंध मैदानाचे त्यांतील इमारतीसह एक मॉडेल तेथे तयार करून ठेवले आहे. मोठया मोठया इमारतींत असंख्य प्रेक्षकांची बसण्याची सोय केली असून मध्यभागी सायकलिंग, बॉक्सिंग, रनिंग, स्विमिंग, रेसलींग, फुटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे खेळांच्या स्पर्धा होतात. प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र विभाग आहेत. गेल्या वर्षी, म्हणजे १९७६ साली, कॅनडांत ऑलिंपिकचे सामने झाले. त्या सामन्यांचे हे ठिकाण शाबूत ठेवले आहे. त्या सामन्यांची स्थळें निरनिराळया इमारतींत नेऊन गाईडने आम्हास माहितीपूर्वक दाखवली. हे सर्व पहाण्यास आम्हास चार तास लागले. परत शहरांत येऊन 'मेटोऋ'ला जाऊन आम्ही भुयारी रेल्वेने पाचसात स्टेशने प्रवास केला व वेगळया रेल्वे मार्गानें भुयारी रेल्वेनेंच परत मेटोऋला आलो. रेल्वेत जाण्यास सरकत्या जिन्यावर चढून जमिनीखाली भुयारांत जावे लागते. तिकिटे गेटमधील पेटींत टाकल्यावरच प्रवेश करता येतो. त्यामुळे बिनतिकिटाने रेल्वे प्रवास होऊच शकत नाही. कोणी तिकिट चेकर लागत नाही. रेल्वेत बसल्यावर फार मजा वाटली. आपल्यासारखी डब्यामध्यें गर्दी नसते. तसेच रेल्वेचा डबा व प्लटफोर्म एका लेव्हलवर असल्यानें गाडींत चढण्यास-उतरण्यास सुलभ होते. गाडी सुटण्याची वेळ होताक्षणीच दरवाजे आपोआप बंद होतात. त्यामुळे गडबड, घुसाघुसी, गाडीबाहेर लोंबकळत जाणे वगैरे गोष्टींना वावच मिळत नाही. डब्यांत फारशी गर्दी होत नसल्यामुळें बसायला जागा मिळतेच. स्टेशने व गाडीचे डबे सर्व काही स्वच्छ असते. गाडी दर दोनचार मिनिटांनी मिळत असल्यानें गर्दी व धक्काबुक्की होतच नाही. भुयारी रेल्वेला 'टयूब' रेल्वे म्हणतात. अशा भुयारी रेल्वे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन नगैरे मोठया शहरांतून आहेत. त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, कारण त्या जमिनीखाली फार खोल असलेल्या बोगद्यांतून नेल्या आहेत. रस्त्यावरून जातांना जेव्हा माणसांचा एखादा थवा विवरातून वर आल्यासारखा दिसतो तेव्हा ही माणसे भुयारी रेल्वेने प्रवास करून वर आल्याचे समजते. रेल्वेच्या वरच्या बाजूस व बाजूच्या रस्त्यांवर असंख्य दुकाने आहेत. मॉन्ट्रियलमधील या टयूब रेल्वेवरील अशी दुकाने आम्ही हिंडुन पाहिली. त्यास शॉपिंग सेंटर म्हणतात व अशा असंख्य दुकानांतून विविध प्रकारचा माल विक्रीस ठेवला होता. बहुतेक दुकानांतील वस्तूंची किंमत प्रत्येकी तीन डॉलर्सपासून जास्त होती. असा शॉपिंग सेन्टर आम्ही दोन तास हिंडून पाहिला. आणखी कितीही फिरलो असतो तरी पुरे पडले नसते व पहाणे संपले नसते. पण पायांतील बळच संपले. ही भव्य विविध वस्तूंनी भरलेली दुकाने पाहून मन तृप्त झाले. दिवसभर फिरून कंटाळा आला होता व दमल्यासारखे झाले होते. तेव्हा मेटोऋवर परत येऊन आम्ही सर्वजण श्री. व सौ. हेर्लेकर यांच्या बिर्‍हाडी गेलो. आम्हांस त्यांनी त्या दिवशी जेवायला बोलावले होते. जेवणाचा बेत आपल्या पद्धतीचा पण छान होता. जेवणानंतर खूप गप्पागोष्टी झाल्या. परदेशांत रहात असलेल्या महाराष्ट्रीय मंडळींना कोणाचे आईवडील व इतर कोणी आपल्याकडील मंडळी भेटल्यास फार आनंद वाटतो. जणू आपलेच आईवडील भेटल्याप्रमाणें ही मंडळी आदरातिथ्य करतात. हेर्लेकरांचेकडून आम्ही आमच्या मोटेलवर रात्री बारा वाजता आलो. दुसर्‍या दिवशी नायगरा धबधबा पहाण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो. जातांना वाटेंत प्रथम सेंट लॉरेंस नदीवर नैसर्गिक एक हजार बेटे निर्माण झाली आहेत, ती बेटे पहाण्यास पॉवर लॉन्चमध्यें बसून हिंडलो. हा प्रवास तीन तासांचा आहे. ती बेटे पाहून निसर्गाची लीला अगाध आहे असे वाटले. अर्थात त्या ठिकाणी माणसांनी आपल्या बुद्धीची व कल्पकतेची जोड दिल्यानें़ सर्व सोयी उपलब्ध केल्यानें निसर्गाची आश्चर्ये सहजपणे पाहाता येतात. बेटे पाहिल्यावर किनार्‍यावरील हाटेलांत जेवण केले व आमच्या मोटारी पुढील प्रवासास निघाल्या. चार तासांनी रात्री आठ वाजतां आम्ही सर्वजण नायगरा येथे 'कनुक' नांवाच्या मोटेलवर आलो. आमचा हा प्रवास कॅनडामधील ऑन्टेरिओ प्रांतातून टोरॅटो शहराबाहेरून होता. मोटेलजवळ एक चिनी रेस्टॉरंट आहे त्यात जेवण करून आम्ही सर्वजण लगेच धबधब्याकडे गेलो. तेथे रात्री ८ वाजल्यापासून ११ पर्यंत धबधब्यावर रंगीबेरंगी लाइट सोडतात. त्यामुळे धबधब्यांची शोभा फारच सुंदर दिसते. ते बघतांना तेथून हलुच नये असे वाटते. प्रवासामुळे दमलो होतो तरी धबधब्याची अप्रतिम शोभा पाहून मन रंगून गेले. ती शोभा पाहून रात्री ११|| वाजतां मोटेलवर परत आलो. सकाळी ताजेतवाने होऊन सकाळचा नाष्टा करून परत धबधबा पहाण्यास गेलो. धबधबा कॅनडाच्या हद्दींत घोडयाच्या नालाच्या आकाराचा आहे. तो पाण्याच्या प्रवाहाच्या एका विभागामुळें बनला आहे. पाण्याच्या प्रवाहाचा दुसरा विभाग अमेरिकेच्या हद्दींत वाहात येऊन उंच कडयाकपार्‍यांवरून खाली पडतो त्यामुळें दुसरा धबधबा बनला आहे. पाण्याचा प्रवाह वाहात येतांना दुभंग पावून दोन ठिकाणी उंच कडयांवरून खाली कोसळल्यामुळें असे दोन धबधबे तयार झाले आहेत. या दोन्ही धबधब्यांची पाण्याजवळ तळाशीं जाऊन शोभा पाहाता येण्याची सोय केली आहे. तेथे विजेच्या बसमधून खाली उतरून बोटीपर्यंत (पॉवरलॉन्चपर्यंत) जावे लागते. खाली उतरून जाण्यास उतरंड मोठी असल्याने बस खाली उतरत असतांना जरा घाबरल्यासारखे वाटते. बससाठी व बोटींत बसण्यास तिकिट काढावे लागते. बोटींत उभे राहून धबधब्याजवळून जातांना धबधब्याचे पाणी-तुषार अंगावर उडून माणूस सचैल न्हाऊन निघतो म्हणून शिरतांना प्रथम प्रवाश्यांना काळे रबरी रेनकोट अंगावर घालण्यासाठी देतात. त्याला टोपीही असते. असा कोट चढवून बोटींतून धबधब्यांजवळून फिरवून आणतात. धबधब्याचे खाली जातांना अंगाचा थरकाप होतो कारण धबधब्याचे पाणी वरून खाली धो धो आवाज करीत प्रचंड वेगाने कोसळत असते. पाण्याचा प्रवाहही फार मोठा असतो. कोसळत्या पाण्याचे अनंत तुषार आपल्याला न्हाऊ घालतात. तुषाराचे जणु ढगच बनून आकाशांत जात आहेत असे वाटते व बर्फाचा कडाच आपल्या अंगावर कोसळतो आहे असे वाटते. वरून सूर्यकिरण पडल्यानें आकाशांतील इंद्रधनुष्याप्रमाणें खालीही इंद्रधनुष्य दिसते. ती शोभा अवर्णनीय आहे. ही बोटीची सफर एक तासाची आहे. दोन्ही धबधब्याजवळून आपण हिंडून परत काठावर येतो. तेथून वर आल्यावर टूरबसमध्यें बसून आम्ही धबधब्याच्या वरच्या अंगास गेलो. जातांना नायगरा नदी कुठे संथ तर कुठे जोरांत वाहात असलेली दिसते. पाण्याचा भला मोठा लोट 'लेक ईरी' मधून खाली वाहात येतो त्या पाण्याच्या प्रवाहाची नदी बनली आहे. नदीचे पात्र फार रुंद आहे. तो पाण्याचा प्रवाह वाहात येतांना धबधब्याच्या वरच्या पण लांब दूरवरच्या अंतरावर दुभंगतो व त्याचे दोन मोठे पाण्याचे प्रवाह बनतात व ते खाली वाहात येऊन उंच कडयावरून कोसळल्यामुळें दोन ठिकाणी धबधबे बनून सर्व पाणी पुन्हा एकत्र होऊन तो पाण्याचा प्रवाह खाली उतारावरून वाहात जाऊन 'लेक ऑटेरिओ' या दुसर्‍या सरोवरांत जाऊन मिळतो. त्यावरून नदी नेहमी डोंगरातून उगम पाऊन सागराला मिळते असे नाही असे म्हणावे लागते. अशा प्रकारे हा धबधबा अमेरिका व कॅनडा या दोन देशांच्या सीमारेषेवर आहे. वरील बाजूकडून खालचे दृश्य मोठे छान दिसते. तेथे आनंदने धबधब्याचे व आमचे ललिता-अमोलसह बरेच फोटो काढले. कांही ठिकाणी टूरबसमधून व कांही ठिकाणी पायी जाऊन आम्ही चारी बाजूंनी धबधब्यांची शोभा पाहिली. एके ठिकाणी लिफ्टनें तळाशी जाऊन धबधब्याचे कोसळणारे पाणी जवळ जाऊन पहाता येते. तीही शोभा पाहिली. वरील बाजूस कॅनडाच्या हद्दींत एक सुंदर बाग आहे. तेथे एक 'स्कूल आंफ हॉर्टीकल्चर' म्हणून संस्था आहे. त्या संस्थेनें या बागेंत खूप प्रकारचे गुलाब व अनेक रंगांची फुलझाडे तयार केली आहेत, तसेच विविध प्रकारच्या वृक्षवेलीही लावल्या आहेत. त्या फुलझाडांच्या निरनिराळया आकृती बनवल्या आहेत व विविध आकारांची कारंजी केली आहेत. त्यांची शोभा फारच रमणीय व सुंदर दिसते. त्याचप्रमाणे एके ठिकाणीं फ्लॉवर क्लॉक तयार केले आहे व त्या घडयाळाच्या सभोवती फुले लावून कॅनडामधील वेगवेगळे प्रांत दाखवले आहेत. हे घडयाळ फारच छान दिसते. धबधब्याच्या संगतीत आम्ही बराच वेळ हिंडलो. कितीही वेळ घालवला व रमलो तरी अपुरेच वाटले. नायगर्‍याचे दृश्य फारच मनोवेधक आहे. दिवसभर हिंडून सायंकाळीं मोटेलकडील काठावरील 'स्कायलॉन' नांवाच्या टॉवरवरून धबधब्यांची व परिसराची शोभा पाहिली. दिवेलागणी झाली असल्यानें सभोवतालच्या परिसरातील दिव्यांची रोषणाई फारच सुंदर दिसते. हा टॉवर अतिशय उंच आहे. त्याच्या वरील गॅलरीत जाण्यास लिफ्ट आहे. त्या लिफ्टमधून वर जाण्यास 'टु राइड दी यलो बल्ब' असे संबोधतात. वर गेल्यावर आतील मजल्यावर मोठे हॉटेल असून बाहुल्या वगैरे शोभेच्या वस्तूंची अनेक दुकाने आहेत व बाहेरच्या अंगास सभोंवती गॅलरी आहे त्यांत उभे राहून सभोंवतालची रमणीय शोभा पाहावयाची. याप्रमाणे धबधब्यांची शोभा निरनिराळया ठिकाणांहून पुन्हा पुन्हा पाहून आम्ही सर्वजण रात्री १० वाजता मोटेलवर परत आलो. दुसर्‍या दिवशी दि. ९ रोजी नायगर्‍याची सहल संपवून तेथून सकाळी चहापाणी करून आम्ही आमच्या मोटारींनी निघून वाटेंत जरूरीप्रमाणें जेवणखाण, चहापाणी व विश्रांति घेत घेत ५०० मैलांचा प्रवास करून 'बफेलो' वरून जाणार्‍या मार्गानें न्यूयॉर्ककडे आलो. आम्ही आनंद, ललिता, अमोलसह रात्री ८ वाजतां न्यूजर्सीतील एअलिझाबेथ शहरांतील मंगला मोघे यांच्याकडे येऊन उतरलो. बाकीची (गोंधळेकर व शिधये) मंडळी त्यांच्या मोटारीने न्यूयॉर्कला त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी उतरली. सकाळी उठून श्री. मोघे यांच्याबरोबर त्यांच्या गाडींतून आम्ही न्यूयॉर्क शहरातील यूनोची सुप्रसिद्ध इमारत व इतर प्रेक्षणीय स्थळें पहाण्यास गेलो. आनंद बरोबर होता. यूनोची भव्य व विस्तीर्ण इमारत आंत जाऊन पाहिली. यूनोचे सहा विभाग आहेत व त्या त्या विभागांत जगांतील यूनोच्या सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र बसून नाना तर्‍हेची कामे करतात. ते विभाग गाईडने आम्हास माहितीसह प्रत्येक ठिकाणी नेऊन व हॉलमध्यें बसवून दाखवले. बोलणार्‍याचे भाषण चांगले ऐकू यावे म्हणून हॉलमधील प्रतिनिधी बसण्याच्या खुर्चीला 'इ-अर फोन' बसवले आहेत. अर्थात बोलणारे आपआपल्या राष्ट्रभाषेंतून बोलतात, त्याचे भाषांतर केले जाते व ते सभासदांना ऐकवले जाते. त्यामुळें भाषेची अडचण भासत नाही. जगांत सुखसमृद्धी व्हावी यासाठी व राष्ट्राराष्ट्रामधील वाद लढाया न करतां एकत्र येऊन विचार विनिमय करून सोडवले जावे यासाठी यूनोच्या या सहा विभागांत कामें चालतात. यूनोची इमारत पहाण्यास दोन तास लागले. त्यानंतर शहरांतून हिंडून बराचसा भाग पाहिला व सर्व पाहून दुपारी २ वाजतां घरी परत आलो. चहा-पाणी-फराळ करून लगेच ललिता, अमोल व मंगला यांच्यासह न्यूजर्सीतील 'ग्लेनमॉट' येथील 'एअडिसन नॅशनल हिस्टॉरिक साइट' ही संस्था पहाण्यासाठी तीन वाजता निघालो. या ठिकाणी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ 'थॉमस अल्वा एअडिसन' याच्या शोधांची म्यूझियम, लॅबोरेटरी व स्टूडियो पाहायला मिळतात. हे सर्व पाहाण्यास दीड तास लागला. तेथे जमलेल्या प्रवाशांना गाईडबरोबर निरनिराळया इमारतींत जाऊन सर्व कांहीं दाखवले जातें. म्यूझियममध्यें एअडिसनने बनवलेला पहिला फोनोग्राफ वाजवून दाखवला. त्याला एअडिफोन असे म्हणत असत. त्या फोनोग्राफच्या यंत्रांत दुरुस्त्या, प्रगती होत गेलेली माहिती सांगून व वाजवून दाखवतात. त्याचप्रमाणे दुसर्‍या ठिकाणी लॅबॉरेटरीत एअडिसननें विजेचा दिवा कसा निर्माण केला त्याची माहिती सांगतात व प्रात्यक्षिक दाखवतात. तसेच पडद्यावर हालचालींची दृश्यें कशी दाखवता येतील तो शोध एअडिसनने कसा लावला ती माहिती सांगून एअडिसनने तयार करून पडद्यावर दाखवलेला मूक चित्रपट (मूव्ही) पडद्यावर दाखवला. मग एअडिसनचा मूव्ही स्टूडियो (मूळचा जळल्यामुळें त्याच ठिकाणी स्टूडियोची नवीन रचना केली आहे) दाखवला. एअडिसनची प्रयोगशाळाही पाहिली. हे सर्व पाहून सायंकाळी ५|| वाजतां आम्ही सर्वजण श्री. मोघे यांच्या घरी परत आलो. रात्री श्री.मोघे यांनी टेप केलेला 'विच्छा माझी पुरी करा' हा दादा कोंडके यांचा वग ऐकून गप्पागोष्टी करीत उशिरा जेवण करून झोपीं गेलो. सकाळी उठल्यावर चहापाणी फराळ करून श्री. मोघे यांच्या टी.व्ही.वर न्यूजर्सी येथील दूरदर्शनकेंद्रावरून प्रक्षेपित केलेला एक हिंदी चित्रपट पाहून ललिता व अमोल यांच्यासह आनंद आपल्या मोटारीनें आमचा निरोप घेऊन वॉशिंग्टनकडे निघून गेला. याप्रमाणें आनंदकडे आल्यापासूनचा आमचा सहलीचा व हिंडण्याचा कार्यक्रम संपला. आनंद-ललिता-अमोल यांच्या सहवासांतील आमचे हे दिवस फार आनंदांत गेले व त्यांच्या नातेवाईकांबरोबर केलेली सहल फार सुखाची झाली. सॅन होजे सोडण्यापूर्वीच रविने आमच्या भारतास परत जाण्याच्या प्रवासाची दि. ११ सप्टेंबरच्या रात्रीं ९ वाजतां जे. एफ. केनेडी (न्यूयॉर्क) विमानतळावरून निघणार्‍या विमानाची तिकिटे (सीटस) रिझर्व करून ठेवली होतीच. आमचे अमेरिकेंतील वास्तव्याचे चार महिने मुलगा, सून व नातू यांच्या सहवासांत केव्हा संपले ते कळलेच नाही. दि. ११ रोजी सायंकाळी न्यूयॉर्क विमानतळावर जाण्यास निघण्यापूर्वी रविला श्री. मोघे यांच्या घरून आम्ही फोन केला. कारण ती मंडळी आतां भारतांत प्रत्यक्ष आल्याशिवाय त्यांच्याशी बोलता येणार नाहीं व त्यांचा आवाजही ऐकायला मिळायचा नाही असे वाटले. फोनवर मुलाचे-सुनेचे बोलणे व नातवाचे हुंकाराचे आवाज ऐकले व फार आनंद व समाधान वाटले. पण तितकेच मन जड झाले. पण सर्वाला बांध घातला. मन आवरले. सामानाची बांधाबांध केलीच होती. तथापि श्री. भय्यासाहेब मोघे यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे व आम्हास नीटप्रमाणे प्रवास करता यावा या हेतूनें आमच्या सामानाची पुन्हा व्यवस्थित बांधाबांध केली. त्याचा आम्हास सांताक्रूझ विमानतळावर आल्यावर फार उपयोग झाला. आम्ही अमेरिकेत आलो तेव्हा प्रथम आमचे स्वागत सौ. व श्री. मोघे यांनीच केले होते. भारतांत परत निघतांनाही त्यांच्यासह त्यांच्या मोटारीनें न्यूजर्सीपासून ३० मैल दूर असलेल्या न्यूयॉर्क (जे. एफ. केनेडी) विमानतळावर येऊन तेथे त्यांचाच निरोप घेऊन आम्ही दि. ११ सप्टेंबर रोजीं रात्री ९ वाजताच्या एअ-अर इंडियाच्या ७३७ बोईंग विमानानें अमेरिका सोडून भारताकडे प्रयाण केले व परतीचा प्रवास सुरू केला. येतांना आमचे विमान प्रथम लंडनच्या विमानतळावर तसेंच पॅरिसच्या विमानतळावर व नंतर फ्रॅन्कफुर्ट (जर्मनी) विमानतळावर कांहीं वेळ थांबले. प्रत्येक वेळी आम्ही विमानाबाहेर जाऊन ट्रान्झिट पॅसेंजरांसाठी असलेल्या दालनांतून हिंडून व विमानांत परत येण्यापूर्वी त्या त्या ठिकाणी सेक्यूरिटी पोलिसांनी आमची आंगझडती घेतल्यावर आम्ही विमानांतील आमच्या जागेवर येऊन बसलो व पुढील प्रवास केला. लंडन व पॅरिस येथे आमचे आंगावरून हात फिरवून तपासणी झाली पण फ्रॅन्कफुर्ट विमानतळावर दुर्बिणीसारख्या छोटया यंत्राच्या सहाय्यानें सेक्युरिटी पोलिसांनी आमची इतरांबरोबर आंगझडती घेतली. त्यामुळें फार आश्चर्य वाटले व शास्त्रज्ञांनीं वेळोवेळी लावलेल्या शोधांबद्दल औत्सुक्य वाटले. रोमला विमानाबाहेर जाता आले नाहीं. तसेच कुवेतला रात्र असल्याने कोणासही विमानतळावर उतरू दिले नाही. कुवेतहून आमचे विमान तडक मुंबईस सान्ताक्रूझ विमानतळावर मंगळवार दि. १३ रोजी सकाळी ५|| वाजतां येऊन पोहोंचले. विमानतळावर आमचे सामान मिळण्यास थोडा विलंब लागला; पण नंतरची कस्टमकडील सामानाची तपासणी फार थोडया वेळांत संपल्यावर (कारण आम्ही बरोबर अमेरिकेहून आक्षेपार्ह अशी कांहीं वस्तू आणली नसल्यानें सामान उघडून दाखवण्याची थोडी तालीम करावी लागली इतकेच) तपासणीचा त्रास न होता आम्ही बाहेर लवकर आलो. याचे सर्व श्रेय 'ह्यां'नाच आहे कारण सामानाबद्दल व वजनाबद्दल 'ह्यां'ची करडी नजर असल्याने सर्व कांहीं विनासायास पार पडले. विमानतळावर आम्हास घेण्यासाठीं आमच्या दोन्ही मुली, जावई, आमची लाडकी नात प्रियम, पुतणे मंडळी व कांहीं मित्रमंडळी वगैरे सर्व आले होते. त्यांना पाहून अपार आनंद वाटला. असा चार महिन्यांचा सुखसमृद्धिच्या अमेरिकेचा (परदेशाचा) प्रवास संपवून आम्ही आमच्या घरीं सकाळीं ७ वाजतां परत आलो. लगेचच दि. १६ सप्टेंबर रोजी श्रीगणेशजयंतीला श्रीगणरायाचे आगमन होणार असल्यामुळें श्रीगणरायाच्या स्वागतास आम्ही तयार झालो व त्याच्या सेवेंत रंगून गेलो. इति. %%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob4&lang=marathi %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 सायकियास्ट्रिस्ट डॉ. मर्चंटांच्या खोलीत डॉ. वैशाली पेंढार कर पोचल्या त्यादिवशी अगदी उध्वस्त मन:स्थितीत. त्यांचा उतरलेला चेहरा, जाग्रणाने आणि रडण्याने सुजल्यासारखे दिसणारे डोळे आणि हातांच्या बोटांची अस्वस्थ हालचाल त्यांच्या मन:स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवीत होती. डॉ. मर्चंटांच्या भव्य, हसतमुख मुद्रेकडे पाहताच डॉ. वैशालींच्या मनाचा बांध जणु फुटला आणि त्या आवेगाने म्हणाल्या,'डॉक्टर, काय करावे ते कळत नाहीसे झाले आहे हो मला! अगदी वेडयासारखी अवस्था झालीय.' डॉक्टरसाहेबांनी त्यांच्या आवेगाला मृदु शब्दांचे बांध घालीत हळुहळु सारी हकिगत कढून घेतली. डॉ. वैशाली आणि त्यांचे पती श्री. मधुकर पेंढारकर - इंजीनीयर यांचा एकुलता एक मुलगा किशोर चोर्‍या करू लागला होता. 'त्याला मी रोज दहा रुपये पॉकेटमनी देते डॉक्टर', वैशाली कळवळून म्हणत होत्या. 'खेळ, पुस्तकं, खाणं-पिणं म्हणेल ते त्याला देण्याचं सामर्थ्य आमच्याजवळ आहे. आणि हा मुलगा - काय सांगू डॉक्टर, मला स्वत:लासुद्धा खरं वाटत नाही - हा मुलगा घरातल्या किंमती वस्तू विकतो आणि ते पैसे मित्रांबरोबर उडवून टाकतो. तो म्हणेल तेवढे पैसे मी त्याला देते. तरी त्याचे हे उद्योग! आणि मी बोलले तर निमूटपणे ऐकत राहतो, अक्षर बोलत नाही. मला तर अगदी वेड लागायची वेळ आली आहे.' डॉक्टर शांतपणे ऐकत होते. नंतर कित्येक तास डॉक्टर ऐकतच होते. वैशालीचे, मधुकररावांचे, बाळचे - सार्‍यांचे हृदगत ऐकता ऐकता डॉक्टरांच्या दीर्घ अनुभवातून त्यांचा बुद्धिमान मेंदू धागे जुळवीत होता - एक सलग चित्र तयार होत होते. श्री. मधुकर पेंढारकर, एम. ई. आणि कु. वैशाली तळवळकर, एम. डी. (गायन्याक.) यांचे लग्न झाले. दुधात साखर पडली. सोन्याला सुगंध आला. नव्या नवलाईत वैशाली आपली डॉक्टरकी विसरून संसारात दंग होऊन गेली. नवा संसार सजवण्यात, नवर्‍याला तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ बनवून खाऊ घालण्यात, रोज नवनवीन ठिकाणी हिंडण्याफिरण्यात दिवस फुलपाखरांच्या पंखांनी उडून जाऊ लागले. वैशालीच्या पायगुणानेच की काय, मधुकररावांच्या फर्मची एकदम भरभराट होऊ लागली. रोज नवनव्या कामामध्ये गुंतल्यामुळे नव्या संसाराकडे लक्ष पुरवण्यास त्यांना तेवढा वेळ पुरेनासा झाला. पण आता वैशाली पण नव्या बाळाच्या आगमनामुळे मोकळी उरली नव्हती. त्यामुळे मधुकररावांचा सहवास कमी लाभत असल्याचे तिला तेव्हडे जाणवत नव्हते. 'अहो, एकदा बाळाला घेऊन त्या नव्या लायन्स पार्कमध्ये जाऊयाना'. वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन मधुकररावांना त्याच्या चिमुकल्या हाताने टा टा करीत वैशाली म्हणाली. 'जरूर, ह्या रविवारी जाऊया'. मधुकररावही बाळाचा पापा घेत म्हणाले. आणि पुढल्याच क्षणी चटकन गाडीत शिरून गेले सुद्धा. पण दुसर्‍या दिवशी मधुकररावांना दिल्लीला जावे लागले. कामच तसे महत्वाचे निघाले. काय करणार! दिलगिरीने मधुकरराव म्हणाले, 'वैशू, तूच बाळाला नेऊन आण ना! फार सुंदर झालाय म्हणे पार्क. मला एकदम जावं लागतंय. काय करणार?' 'असू दे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी नेईन बाळाला.' हिरमुसल्या मुद्रेवर प्रयत्नाने स्मित आणीत वैशाली म्हणाली. पण मग असे प्रसंग वरचेवर येऊ लागले. बाळ बोबडया सुरात विचारी, 'आई, बाबा येनाल पिक्चलला?' नकळत वैशालीच्या तोंडून सुस्कारा उमटे. 'छे, त्यांना कुठलं जमतांय!' बाळ तीन वर्षाचा झाला त्या मेमध्ये फर्मच्या वाढदिवसानिमित्य मोठा समारंभ मधुकररावांनी योजला. ऑफिसचे रेनोव्हेशन, पार्टी - होस्टेस म्हणून सारी जबाबदारी पाड पाडतांना चार दिवस वैशाली कामात बुदून गेली. समारंभ उत्तम झाल्याबद्दल सर्वानी अभिनंदन केले. मधुकररावांच्या नजरेने शाबासकीची पावती दिली. समारंभ संपला आणि मधुकरराव पुन्हा कामात बुडून गेले. जून महिना आला आणि बाळ के. जी. मध्ये दाखल झाला. रोज दोनतीन तास वैशाली एकटीच राहू लागली. आणि त्या मोकळया वेळानेच तिच्या मनात सार्‍या आनंदात, नवलाईत कुठेतरी खुपणारी अतृप्ती जागी केली. तिचे मन तिला डिवचू लागले. एखादे काम उत्तम पार पडल्यावर अभिमानाने उजळणारा मधुकररावांचा चेहरा पाहिला की त्यांच्याबद्दलच्या अभिमानाने मनाला आनंद वाटत असतानाच , एखादी कठीण केस पार पाडल्यानंतर श्रांत पण समाधानानी उजळलेला डॉक्टर वैशालीचा चेहरा कुठून तरी डोकावू लागला. पूर्वीचे, अभ्यासात आणि कामात रंगणारे उत्साही मन, रोजची संसारातील कामे करतांना हिरमसू लागले, तिला टोचू लागले - 'मधुकरराव आपल्या व्यवसायात पुढेपुढे जातहेत. मुलगा उद्या मोठा होईल.तू मात्र आपले डॉक्टरकीचे ज्ञान गंजू देते आहेस!' मन स्वथ बसू देईना तेव्हा वैशालीने हळूच मधुकररावांना म्हटले, 'बाळ आता शाळेत जातो. एखादी हॉस्पिटलची अटॅचमेंट घेऊ का हो? घरी कंटाळा येतो एकटीला.' 'हो घे ना.' मधुकरराव मनापासून म्हणाले, 'बाळ लहान होता म्हणून मी म्हणालो नव्हतो. पण आता तू खरंच काहीतरी काम सुरू करावंस असं मलाही वाटतं.' विरोध नव्हताच. उलट मदतच होती. वैशालीने एक चांगली आया शोधली आणि दोन तासांची एका हॉस्पिटलची अटॅचमेंट घेतली. काम सुरू झाले. मनाला खाद्य मिळाले. कुशल हातांना रोज आव्हान मिळू लागले. आणि वैशालीचे मन प्रफुल्लित झाले. काम कधी वाढले आणि हळूहळू सारा दिवस कधी व्यापून टाकू लागले ते कळलेच नाही. पुन्हा घराकडे दुर्लक्ष होत नव्हतेच. आया चांगली होती. बाळाची तब्बेत अगदी चांगली होती. वैशालीचे पूर्ण लक्ष होते बाळाकडे. संसार आणि करियर यांचा समन्वय साधल्याच्या आनंदात वैशाली होती. आयाचे बोट धरून घरात पाऊल टाकल्याटाकल्या बाळाने आरोळी दिली, 'आई!' आणि आयाचे बोट सोडून तो आईला शोधत धावला. 'आई घरी नाही बाबा. चला बघू, कपडे बदलूया.' आया त्याच्या मागेमागे जात म्हणाली. बाळ एकदम जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावर क्षणभर संभ्रम उमटला. पण पुढल्या क्षणी सारे लक्षात येऊन त्याचे तोंड उतरले. 'कुठे गेली आई?' बाळने माहित असून उगीचच विचारले. 'आता बाई मोठया हॉस्पिटलात असतात.' आयाने उत्तर दिले. बाळ हिरमुसला. कोचावर अंग टाकून देऊन पायातले बूट काढु बघणार्‍या आयाला लाथा देत राहिला. रोज हे असेच होत होते. आई नसण्याची सवय अजून होतच नव्हती. आतापर्यंत तो शाळेतून आल्यावर उचलून कडेवर घेणारी, गोष्ट सांगत भरवणारी आणि संध्याकाळी बागेत फिरायला नेणारी आई आता सारखी कामातच असू लागली होती. सकाळी उठले की घाईघाईने 'टा टा' करून आई हॉस्पिटलला जायला निघे, ती केंव्हातरी दीडदोनला जेवायला येई. पुन्हा जाई ती संध्याकाळी उशिरा येई. आल्याआल्या दमून कोचावर अंग टाकी. बाळाला जवळ बोलावून त्याचे गाल कुस्करलेन, दिवसातल्या गमती विचारल्यान तरी सार्‍यातून तिचा थकवा जाणवत न्राही. बाळाचा हिरमुसला चेहरा पाहून एखादे वेळी वैशालीचे मातृहृदय कळवळे. कधी वाटे, द्यावे सोडून सारे - ते हॉस्पिटल नको, ते पेशंट नकोत. सारे सोडावे आणि बाळाच्या सहवासाचा आनंद लुटत रहावे. पण ..... "छे, छे" तिचे मन म्हणे, "वेडयासारखं काय!" मधुकररावांची कन्सल्टींग इंजिनीयर्सची फर्म भरभराटीला येत होती, तसतसे त्यांचे दौरे, त्यांची कामे वाढत होती. बाळ आता लहान असला तरी बघताबघता मोठा होणार होता. शाळा-कॉलेजात गुंतणार होता. आपल्या मित्रांत रंगणार होता. आणि ती आपले डॉक्टरीचे गंजलेले ज्ञान संभाळीत घरी एकटीच रहाणार होती. छे छे, भलत्या भावनांच्या भरीला पडून सारे आयुष्य फुकट गेले असते. वैशाली मग बाळाला घेऊन दुकानात जाई. खाऊची, खेळण्यांची पुडकीच्या पुडकी त्याला घेऊन देई आणि त्याच्या आनंदात मनातला सल विसरून जाई. नंबर एकचा सर्वात मोठा मेकॅनो मित्रांच्या अगोदर बाळाला मिळाला होता. मधुकररावांचे काम वाढल्यापासून अलिकडे परदेशी दौरेही वाढले होते. परदेशातून परत येतांना महागातली महाग नवी खेळणी बाळासाठी येत होती. वैशालीची प्रॅक्टिस अलिकडे बरीच वाढली होती. एक कुशल डॉक्टर म्हणून तिचे नाव सार्‍या शहरात माहित होऊ लागले होते. वैशाली घाईघाईने हॉस्पिटलला निघाली तेव्हा आठनऊ वर्षांचा बाळ आपला नवा मेकॅनो जुळवण्यात अगदी दंग होऊन गेला होता. ड्रायव्हरने गाडी केव्हाची आणून खाली पोर्चमध्ये उभी केली होती. वैशालीने घडयाळाकडे नजर टाकीत घाईघाईने कुकला जेवणाबद्दलच्या सूचना दिल्या आणि जाताजाता हाक दिली, 'बाळ, बेटा, टाटा.' बाळाने वर न पाहताच हातानेच आईला टाटा केला. वैशाली समाधानाने हसली. अलिकडे बाळ पूर्वीसारखा आई निघाली की रडून गोंधळ करीत नव्हता, 'जाऊ नको' म्हणून हट्ट करीत नव्हता की 'लौकर ये' म्हणून हटून बसत नव्हता. करियर न सोडण्याचा आपला निर्णय बरोबर असल्याचे समाधान वैशालीला झाले. गाडीत बसून गाडी सुरू झाल्याबरोबर मनातून घराचा विषय केव्हा गेला आणि ती दिवसाच्या कामाच्या विचारात केव्हा गुंतली ते तिलाही कळले नाही. मेकॅनोचा भला मोठा पूल बांधून झाल्याच्या आनंदात बाळाने टाळी वाजवून आरोळी दिली. 'आआआईईई' .... पण तेव्हडयात त्याच्या ध्यानात आले की आई मघाशीच टाटा करून गेली. पूल तसाच सोडून बाळ मग बराच वेळ खिडकीशी एकटाच उभा होता. बाळ दहा वर्षाचा असतांना डॉक्टर वैशालीला एका कॉन्फरन्ससाठी परदेशी जाण्याची संधी आली, तेव्हा तिला बाळाला सोडून जाणे म्हणजे मोठा प्रश्न वाटला नाही. बाळ आता सर्वच बाबतीत स्वतंत्र झाला होता. अभ्यास त्याचा तोच करत होता. मदत लागलीच तर एक टयूशन टीचर आठवडयातून तीनदा येत होते. स्वयंपाकाला कुक होता. बाळची बाकी सारी व्यवस्था बघायला आया होतीच, आई नसण्यामुळे बाळाचे काहीच अडणार नव्हते. आई परदेशातून परत आली तोपर्यंत बाळाने खूप नवे मित्र गोळा केले होते. त्याचे पाऊल सहसा घरात नसेच. असलेच तर त्याच्या सुंदर महागाईच्या खेळण्याबरोबर खेळण्यासाठी मित्रांचा घोळका त्याच्याकडे असे. आई नसेल तेव्हा बाळ मागेल तेव्हडा पॉकेटमनी आईने मंजूर करून ठेवला होता. मित्रांना हॉटेलात "ट्रीट" देण्यात बाळचा बराच पैसा खर्च होत असे. आईने येतांना बाळसाठी ढीगभर कपडे, खेळ आणला होता. श्रीमंताच्या एकुलत्या एक मुलाला शोभेल असे वैभव बाळच्या पुढे हात जोडून उभे होते. बाळची तब्बेत चांगली होती. शाळेतील प्रगती समाधानकारक होती. बाळ आपल्या उद्योगात दंग होता. डॉ. वैशालीची प्रॅक्टिस तिचा सारा वेळ खाऊन टाकून उरतच होती. मधुकररावांना फर्मच्या प्रचंड व्यापातून मान वर काढायला फुरसतच नव्हती. तरी पण वैशाली बाळाला रोज दहा रुपये पॉकेटमनी नियमित देत होती. तो सकाळी शाळेत निघतांना खिडकीतून टा टा करीत होती.वाढदिवसाला न विसरता मोठे प्रेझेंट देत होती. स्वत: हजर रहाता आले नाही तरी मोठी पार्टी एऍरेंज करीत होती. 'बाळने मारामारी करून एका मुलाच्या नाकाचा घुणा फोडला' अशी शाळेतून चिठ्ठी आली आणि वैशालीला धक्काच बसला. आजवर बाळाबद्दल तक्रार येण्याची सवयच नव्हती. वैशालीने त्या दिवशी काम बाजूला ठेवले. ती स्वत: बाळला घेऊन शाळेत गेली. सारी चौकशी करून तिने त्या मुलाच्या मात्यापित्यांची समजून घातली आणि मग बाळला जवळ घेऊन , मारामारी करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगितले. तो सारा दिवस सारे व्यवस्थित करण्यात गेला. त्या दिवशीचा आईचा स्पर्श आणि समजुतीचे बोलणे बाळच्या मनात बरेच दिवस घोळत होते. एक महिनाच गेला असेल आणि मास्तरांची चिठ्ठी आली की बाळने दुसर्‍या मुलाचे पेन उचलले. वैशाली अस्वस्थ झाली. बाळचे स्वत:चे पार्कर पेन होते. बॉलपॉईंटस तर किती होती कोण जाणे. पहिलाच गुन्हा खरा पण असे पुन्हा होऊ नये म्हणून वैशालीने बाळला कधी नव्हे ती एक चापटी दिली. त्याला समोर उभा करून अर्धा तास 'चोरी करणे किती वाईट आहे' ते सांगितले. बाळच्या उतरलेल्या तोंडाकडे आणि पाणावलेल्या डोळयांकडे पाहून तिने मग त्याला पोटाशीही धरले आणि आईस्क्रीम खायला दहाची एक नोट दिली. गुन्हा केल्यावर रागावण्यासाठी का होईना, पण बराच वेळ आई मिळते हा नवा धडा बाळचे अंतर्मन शिकले. शिवाय रागावून झाल्यानंतर काहीतरी बक्षीशीही मिळत होतीच. त्याच्यापुढच्या वेळी बाळने आईच्या पर्समधली शंभराची नोट घेतली. वैशाली चिडली, गोंधळलीही. आई तो मागेल तेव्हडे पैसे देत असतांना बाळने असे पैसे चोरावेत? ... का? ह्या वेळेला शिक्षा वाढली, आणि शिक्षेनंतरच्या मातृहृदयाचा कळवळाही. बाळने पुन्हा असे करू नये म्हणून वैशालीने त्या शंभर रुपयात आणखी दोनशे घालून बाळला स्वतंत्र टॅऋन्सिस्टर घेऊन दिला. पुढच्याच महिन्यात बाळने तो ट्रन्सिस्टर विकला आणि ते पैसे उडवून टाकले - कशात ते खोदूनखोदून विचारल्यावर सांगितले की, मित्रांना पिक्चरला नेण्यात आणि हॉटेलात नेण्यात. वैशालीने पुन्हापुन्हा म्हटले, 'अरे पण बाळ, तू पाहिजे तेव्हा मित्रांना पिक्चरला नेत जा ना. तुला कोणी नको म्हटले का? पण हे असं का केलंस?' बाळने उत्तर दिले नाही. त्याला जर आपण असे का करतो ते माहितच नव्हते तर तो उत्तर तरी काय देणार? मनात जुळवलेले हे चित्र डॉ. मर्चंटनी मोजक्या शब्दात वैशाली आणि मधुकररावांपुढे उभे केले. लहानपणी आईच्या सहवासाची सवय झालेला, त्यावर वाढलेला बाळ अचानक त्या सहवासाला मुकला. करीयरची त्याच्या आईला असलेली गरज त्याला कशी कळणार? एकटा पडलेला बाळ एकलकोंडा झाला. त्यातून बाबाही आपल्या उद्योगापुढे त्याला सहवास देऊ शकत नव्हते. बाळने ही उणीव मित्रांचा कंपू करून भरून काढण्याच प्रयत्न केला. आणि अवचित त्याला म्हणजे त्याच्या अंतर्मनाला एक इलम सापडला. जादूच्या गुहेची, 'तिळा उघड'ची किल्लीच त्याला जणु गवसली. नीट वागले तर मिळू न शकणारी आई, गुन्हा केला की मिळते हे त्याच्या अंतर्मनाला कळले आणि पैशांची गरज नसतांनासुद्धा बाळ चोर्‍या करू लागला. 'या बाळाच्या चोर्‍या नाहीत, डॉ. पेंढारकर,' डॉ. मर्चंट म्हणाले. 'आई मला तू हवीस,' अशी हाक आहे.' हताश झालेल्या वैशालीच्या मनात एकदम आशेचा किरण चमकला. एकदम आवेगाने पुढे झुकत ती म्हणाली, 'मग मी माझं काम सोडून देऊन घरी राहिले तर बाळ सुधारेल?' डॉक्टरांनी मंदपणे मान हलवली. 'इतकं सोपं नाही ते, डॉ. पेंढारकर. जे बिघडायला इतकी वर्षे लागली ते एकदम कसं सुधारेल? त्यातून तुम्ही काम सोडलंत तर रिकामपणामुळे तुम्हाला जे फ्रस्टेऋशन येईल त्याचं काय? तुम्ही आता घरात रमणारी समाधानी गृहिणी थोडयाच होऊ शकणार आहात?' वैशालीने मान वळवून हताशपणे मधुकररावांकडे पाहिले. सदा स्वत:च्या व्यापात गुंतून पडल्यामुळे एकमेकांपासून दूर झालेल्या त्या दोघांची आज या दु:खामुळे प्रथमच एका पातळीवर नजरभेट होत होती. त्या नाजुक धाग्यातूनच कदाचित प्रेमाच्या मजबूत भिंतींनी बांधलेलं सुखी घरकुल उभे राहणार होते. बाळ वाकडया मार्गावरून परतणार होता. तो भाग्यवान क्षण जतन करण्यासाठी आपल्या नजरेनेसुद्धा तो क्षण भंगू नये म्हणून डॉक्टरांनी आपली नजर वळवली. "का बरं, आज बोलत नाहीस?" इतका वेळ आवरून धरलेले अश्रू आता बांध फुटल्यासारखे अविरत वाहू लागले. हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. मालतीबाईंची ती अवस्था पाहून यशवंतराव मुकाटयाने जवळच्या खुर्चीवर टेकले. नेहमीचाच प्रकार झाला होता एकूण! यशवंतरावांनी दीर्घ सुस्कारा सोडला. "काय झालं आज?" त्यांनी विचारले. "आज अमोलला नेहमीसारखा शेजारून आणला होता." हुंदके आवरण्याचा प्रयत्न करत मालतीबाई म्हणाल्या, "तो इथेच झोपला म्हणून त्याला घेऊन जा म्हणून त्याच्या आईला सांगायला गेले." "तर त्या काहीतरी म्हणाल्या. हो ना? पण तू आणतेसच कशाला लोकांची मुलं?" मालतीबाईंचा चेहरा केविलवाणा झाला. "घर खायला येतं हो एकटीला," त्या ओशाळलेल्या आवाजात पुटपुटल्या. यशवंतरावाना मालतीबाईंचा तो केविलवाणा चेहरा बघवेना. "बरं. मग तू अमोलच्या आईकडे गेलीस; मग काय म्हणाली त्याची आई?" "ती बापडी काही सुद्धा म्हणत नाही. हो, उलट 'तुम्ही अमोलला संभाळता म्हणून माझी कामे तरी उरकतात' असं म्हणत असते." "बरं, मग आज काय झालं?" "तिची सासू आली आहे गावाहून. खूप बोलत होती तिला. म्हणाली, सारखा अमोल आपला तिच्याकडे. वांझोटी नजर कशी असते कळू नये तुला? आणि शुक्रवारची सवाष्णही तिलाच घातलीस म्हणे. बाकी कुणी लेकुरवाळी मिळाली नाही का तुला?" "आणि मग?" "मग तरातरा येऊन घेऊन गेली अमोलला आणि आत्ता संध्याकाळी मोठयाने म्हणत होती, 'बघ आज पोर सारखा रडरड करतोय. तरी मी म्हणत होते ... " मालतीबाईंना पुन्हा हुंदका फुटला. एखाद्या जखमेला पुन्हा पुन्हा धक्का लागावा आणि जीवघेण्या कळांनी जीव व्याकूळ व्हावा अशी त्यांची अवस्था झाली होती. कळवळून मालतीबाई म्हणत होत्या, "पोटी पोर नाही हे दु:ख कसंबसं सोसते मी. पण ह्या सगळयांच्या डागण्या सोसत नाही हो." यशवंतराव हताश होऊन बसले होते. बायकोचे दु:ख त्यांना कळत होते. अपत्यहीनतेचे दु:ख तर तेही भोगत होते. पण त्यांच्या पुरुषी जगात न येणार्‍या या प्रश्नावरचा उपाय मात्र सापडत नव्हता. "काय गर्दी जमली आहे पाहिलीत का? कुणी मूल टाकलयं म्हणे हो." मालतीबाई म्हणत होत्या. समोरच्या कचर्‍याच्या पेटीभोवती ही गर्दी जमली होती. पोलीस आले होते. "हो का? असेल काहीतरी," पेपर वाचता वाचता यशवंतराव म्हणाले. पण मालतीबाईंचा जीव रहात नव्हता. उकिरडयावर पडलेले, असहाय्यतेने रडणारे ते चिमुकले बालक मन:चक्षूंसमोर येऊन त्यांचा जीव कळवळत होता. शेवटी न राहवून त्या हळूच उठल्या. गर्दीत एका बाजूला उभ्या राहून बघू लागल्या. कसल्या तरी पटकुरात गुंडाळलेला तो लालसर जीव निपचित पडला होता. त्याच्याकडे पाहता पाहता एक विलक्षण ओढ मालतीबाईंच्या हृदयात जागी झाली. अपत्याविना तळमळणार्‍या त्या स्वत: आणि कुणा हतभागी मातेने टाकून दिलेले ते दुर्भागी लेकरू --- कसला तरी निश्चय करून त्या घराकडे परतल्या. मालतीबाईंनी एकदा निश्चय केल्यावर यशवंतरावांचे मन वळवण्यापासून ते चिमुकल्या प्रकाशला आपला म्हणून घरी आणण्यापर्यंत सारी चक्रे भराभरा फिरली. उजाड घरात पहिल्यांदाच मुलाच्या रडण्याचा-हसण्याचा आवाज आला. अंधार्‍या घरात प्रकाश आला. मालतीबाईंच्या मनात आता वेगळीच आशा उत्पन्न झाली. प्रकाशमुळे त्या आता आई झाल्या होत्या. पण समाजाने आपल्याला पुत्रवती म्हणून ओळखावे, वांझपणाचा कलंक धुवून टाकावा अशी ओढ त्यांना लागली. पण वर्षानुवर्षे त्यांना ओळखणार्‍या इथल्या शेजारात कसे शक्य होते ते? मालतीबाईंनी यशवंतरावांपाशी हट्ट घेतला. - आपण बेळगावहून कुठेतरी लांब बदली करून घेऊ या. मुंबईला बदली झाली आणि एका छोटयाशा फ्लॅटमध्ये बिर्‍हाड थाटले. शेजार चांगला होता. प्रकाश काकू, मामीचे नाते जोडत आसपासच्या घरांतून दुडदुडू लागला. मालतीबाईंना नवी पदवी मिळाली. - "प्रकाशच्या आई". मालतीबाईंना धन्यधन्य झाले. जीवनात सुखाला जणू भरती आली होती. हळूहळू प्रकाश मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. मित्रांत रमला. आईच्या पदरापासून दूर झाला. ते नैसर्गिकच होते. मालतीबाईंना त्याचेही कौतुकच होते. खरे म्हणजे, 'आणि ते सारे सुखाने राहिले!' असे म्हणून त्या सुखी कुटुंबाची कहाणी इथे संपायला हवी होती. पण तसे झाले नाही. कहाणी खरी इथेच सुरु झाली. दहा वर्षाच्या प्रकाशची टेबलाशी काहीतरी खुडबूड चालली होती. मालतीबाईंनी पदराला हात पुसत घडयाळाकडे नजर टाकली. त्या म्हणाल्या, "प्रकाश, नीघ रे. शाळेची वेळ झाली." "हं." प्रकाशने मुकाटयाने खुंटीवरचे दप्तर गळयात अडकवले. आईने हातात दिलेला डबा घेतला; आणि तो निघाला. त्याचे पाय जड पडत होते. "प्रकाश!" आईने हाक मारली. प्रकाश थबकला. "बर नाही का रे बाळा? चेहरा का उतरलेला दिसतोय?" प्रकाशने गळयाशी दाटून आलेला हुंदका परतवला. आईच्या कमरेला मिठी घालण्यासाठी पुढे होणार्‍या हातांच्या मुठी घट्ट वळल्या. आईला काही-काही सांगणार नव्हता तो. लुच्चे होते आई-बाबा. लुच्चे, खोटारडे. नकारार्थी मान हलवून प्रकाश आईकडे पाठ फिरवून चालू लागला. मालतीबाई त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे काळजीयुक्त नजरेने पहात होत्या. शाळा दिसू लागली तसे प्रकाशचे पाय लटपटू लागले. डोळे भरून येऊ लागले. तोंड रडवेले झाले. शाळेच्या फाटकाशी त्याच्यासाठी टपून उभा असलेला घोळका डोळयापुढे दिसू लागला. अगदी पहिल्यांदा असा घोळका फाटकाशी जमलेला दिसला तेव्हा कुतुहलाने प्रकाश तिकडे वळला होता. लालू घोळक्याच्या मध्यभागी होता. भोवती जमलेल्या मुलांना काहीतरी सांगत होता. प्रकाशला पाहताच लालूने आरोळी ठोकली होती, "आला रे आला." 'कचर्‍याच्या पेटीतून' बरोबरच्या घोळक्याने कोरस धरला होता. ती पोरे जे ओरडत होती त्याचा अर्थ त्यांना कळत नव्हता. ती सारी अक्कल होती लालूची. दहा-अकरा वर्षांच्या मुलांच्या ह्या वर्गात दोन वेळा आपटया खाल्लेला चौदा-पंधरा वर्षांचा लालू दादा होता. त्यानेच सार्‍या घोळक्याला एकत्र करून ही बातमी ऐकवली होती. "अरे, प्रकाश त्याच्या आईबापाचा नाही म्हणे." "मग?" "अरे, कचर्‍याच्या पेटीत सापडला म्हणे तो!" "कचर्‍याच्या पेटीत? तिथे कसा गेला तो?" मोठया शहाणपणाचा आव आणून लालू उत्तरला, "बिन बापाची पोरं टाकतात तिथं." बाकीच्या मुलांना काही कळलां नाही. पण लालूच्या सुरात सूर मिळवीत ते म्हणू लागले, "प्रकाश बिन बापाचा" प्रकाश ग्राऊंडवर गोटया खेळण्यात दंग होता. त्याला ह्या सार्‍याची काहीच कल्पना नव्हती. मुलांच्या त्या घोळक्यातून बाजूला होऊन मधू हळूच प्रकाशकडे गेला. मधू प्रकाशचा दोस्त होता. हळूच प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, "प्रकाश ते काय म्हणताहेत ते खरं आहे?" "काय म्हणताहेत?" प्रकाशने विचारले. तोच लालूच्या पाठोपाठ सारा घोळका त्यांच्याभोवती जमा झाला. पोरे ओरडत होती, "प्रकाश बिन बापाचा. कचर्‍याच्या पेटीत सापडला." लालूने पुढे होऊन प्रकाशच्या शर्टाची बाही खेचत म्हटले, "ती बघ कचर्‍याच्या पेटीतली घाण लागलीय." "प्रकाश, सांग ना रे खोटं आहे म्हणून." मधू काकुळतीनं म्हणाला. प्रकाशने लालूकडे पाहिले. लालूचे डोळे क्रूरपणे लखलखत होते. प्रकाशच्या मनात चीड उफाळून आली. "खोटं बोलतोस साल्या," तो ओरडला आणि लालूच्या अंगावर धावून गेला. 'घण, घण-घण' - सार्‍या वादाचा शेवट करणारी घंटा वाजली आणि सारी पोरे तोकडे पळाली. स्वयंपाकात मग्न असलेल्या आईला प्रकाश हळूच विचारीत होता, "आई, बाळं कुठून यतात गं?" "हॉस्पिटलातून. का रे?" "मी पण हॉस्पिटलातून आलो?" "हो, का रे?" "मग मुलं असं का म्हणतात?" "काय म्हणतात?" आईने हातातले काम थांबवत म्हटले. "मुलं म्हणतात मी कचर्‍याच्या पेटीत होतो." मालतीबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. आज दहा वर्षे प्रकाशपासून लपलेले गुपित त्याला कळले होते की काय? मालतीबाईंनी लगबगीने उठून हात धुतले. प्रकाशच्या पाठीवर हात फिरवीत त्या म्हणाल्या, "वेडपट आहेत ती मुलं. मुलं हॉस्पिटलधूनच येतात. तसाच तुला आणला आम्ही." "मी तुमचाच आहे मग?" "हो तर. आमचाच आहेस." प्रकाशने समाधानाने आईच्या कुशीत तोंड लपवले. रात्री मालतीबाई यशवंतरावाना सारी हकिगत सांगून काळजीने म्हणाल्या, "काय करावं मला प्रश्नच पडलाय." यशवंतराव म्हणाले, "तू उगीच काळजी करतेस. आज नक्कीच त्याची समजूत पटली असेल. त्यातून पुन्हा विचारलन तर बघूया. लहान आहे. त्याला काय समजतय अजून!" मालतीबाई आणि यशवंतराव यांच्या दृष्टीने प्रश्न तात्पुरता मिटला होता. पण प्रश्न खरोखरचा मिटला होता का? "लाल्या, तू खोटं बोलतोस. चल मारामारी कर," प्रकाश ओरडत होता. "चल. पण खोटं बोलत नाही मी. तू बिन आई-बापाचा आहेस. तुझ्या आई-बापानी पाळलाय तुला." "खोटं. कोण म्हणतं?" प्रकाशने लालूच्या अंगावर झेप घेतली. लालूने सहज दिलेल्या ठोशाने प्रकाश लांब धुळीत फेकला गेला. त्याच्याकडे तुच्छतेने पहात लालू म्हणाला, "आमच्याकडे नवीन सानेकाकू रहायला आल्यात, त्यांनी माझ्या आईला सांगितलं. तुमच्या शेजारी बेळगावला रहात होत्या त्या. आमच्या सगळया आळीला माहित आहे, कुणालाही विचार." प्रकाशचे शिवशिवणारे हात थंड पडले. भोवताली "बू, बू" करीत नाचणार्‍या मुलांचा आवाज त्याला ऐकू येईना. डोक्यात शब्द घुमत होते - "आईनं मला खोटं सांगितलं, आई खोटारडी." हातांनी कान झाकून घेत प्रकाश पळत सुटला. पोरांपासून, शाळेपासून दूर दूर. घरापासून, आईपासून, दूर दूर. आईवरच्या अढळ विश्वासाला कुठेतरी तडा गेला जोता. "अहो, प्रकाश हल्ली शाळेत रोज जात नाही. कुठे भटकतो कुणास ठाऊक. हल्ली नीट बोलतही नाही, नीट जेवतही नाही." मालतीबाई यशवंतरावाना सांगत होत्या, "एकदा त्याच्या शाळेत तरी चौकशी करा. एकदा विचारून बघा त्याला." रात्री यशवंतरावांनी प्रकाशला समोर उभा केला. "प्रकाश, तू हल्ली शाळेत जात नाहीस नेमानं?" प्रकाशने नकारार्थी मान हलवली. "का रे?" पण प्रकाशने ओठ घट्ट मिटून घेतले. तो बोलणार नव्हता. आईने त्याला खोटे सांगितले होते. आई-बाबा खोटारडे होते. "तुझी तब्बेत बरोबर आहे ना?" उत्तर नाही. "अभ्यास कठीण वाटतो का?" प्रकाश गप्पच. "बोल ना काटर्या" तोल जाऊन यशवंतराव ओरडले आणि त्यांनी हात उगारला. मालतीबाई पुढे धावल्या. प्रकाशला पाठीशी घालीत म्हणाल्या, "काय हे! कधी नाही तो पोराच्या अंगावर हात उगारायचा!" प्रकाश मागच्या मागे दारातून बाहेर पडला होता. पण मालतीबाईंचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. त्या म्हणत होत्या, " इतकं सोसल्यावर देवानं हे मूल दिलं. आणि आज त्याच्यावर हात उगारलात!" ओशाळल्या आवाजात यशवंतराव म्हणाले, "रागाच्या भरात भानच राहिलं नाही. तो काही उत्तरच देईना." "अहो, पण जरा समजुतीनं घ्यायचं. आता बघा घाबरून, रुसून निघून गेला. जरा बघून घेऊन तरी या." "कुठे गेला असेल?" "मधूकडे असेल. त्याचा मित्र आहे तो." "अरे मधू, आमचा प्रकाश तुमच्याकडे आलाय?" "नाही." "काय रे, हल्ली प्रकाश शाळेत येत नाही रोज?" "नाही." "का रे?" "शाळेत पोरं त्याला त्रास देतात. बिनबापाचा म्हणतात." "बिनपापाचा?" यशवंतरावांचे हृदय क्षणभर धडधडले. "कुणी सांगितलं त्याला?" त्यांनी विचारले. "लालूच्या गल्लीत सानेकाकू आहेत, त्यांनी. बेळगावला तुमच्या शेजारी होत्या म्हणे त्या. सगळयांना माहित आहे म्हणे."" यशवंतरावांचे शरीर क्रोधाने कापू लागले. "ते खरं नाही ना हो काका?" मधू भीत भीत विचारत होता. त्याला उत्तर न देता यशवंतराव मागे फिरले. प्रकाशला शोधून घरी न्यायचे आहे ह्याचे भान त्यांना त्यांना उरले नाही. पावले सवयीने एकापुढे एक पडत होती. शरीर थरथरत होते. मुठी त्वेषाने वळल्या होत्या. घर नजरेस पडले आणि यशवंतरावांचे पाय थांबले. कापणार्‍या ओठांनी ते म्हणाले, "कावळे! कावळे आहेत सारे. दुसर्‍याचा व्रण पाहून त्यावर टोचा मारणारे. काव काव करून इतरांना बोलावणारे. आम्हाला मूल नव्हतं तेव्हा सार्‍या बायकांनी हिला टोचून खाल्लं. हा मिळाला तेव्हा बोभाटा नको म्हणून इथं निघून आले. पण इथेही .... आता त्या आईला काय सांगू?" आणि तो शोकसंतापाचा आवेग सहन न होऊन यशवंतरावांच्या डोळयातून घळघळा पाणी वाहू लागले. खिडकीशी उभ्या राहून अंधाराकडे डोळे ताणून मालतीबाई बाहेरच्या अंधारात बाप-लेकांच्या आकृतीचा शोध घेऊ पहात होत्या. अंधार्‍या गॅलरीच्या गार भिंतीला डोके टेकवून प्रकाश शून्य नजरेने कुठेतरी पहात होता. व्रण शोधणार्‍या धारदार चोचींनी एक चिमुकले घरटे विस्कळीत करून टाकले होते. %%%%% http://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob11&lang=marathi %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 अल्बेनियाच्या 'मदर तेरेसा' विमानतळावर उतरेपर्यन्त 'मदर तेरेसा' या देशाची होती याची काही खात्री नव्हती. आता पर्यंत 'मदर तेरेसा' म्हणजे 'कलकत्ता' हेच समिकरण डोक्यात बसलं होतं (आणि 'ओ कलकत्ता' नांवाच्या 'ब्रॉडवे शो' बद्दल ऐकल्यावऱ या पाश्चात्यांचे कलकत्त्याबद्दलचे विचार म्हणजे 'शिव शिव शिव राम राम राम' हे ही लक्षात आलं होतं). अल्बेनियाची एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर मदरने हा देश सोडून कलकत्याला राहणे का पसंत केलं हे लक्षात येतं. बाकी या देशाचा भारताची सबंध एवढ्या एका व्यक्तीत संपवता येईल. युरोपात कुठेही गेलं तरी पंजाबी, गुजराथ्यांनी उघडलेलं एखादं तरी 'करी हौस' नक्की सापडतं. पण अल्बेनियात अजून मसाल्याचा वास पोचलेला नाही. उद्योग धंद्याच्या निमित्त जगभर कुठेही राहणार्‍या आणि धंदा करणार्‍या अर्थातच अमराठी भारतीय माणसाला इथे उतरावंसं वाटलं नाही यावरूनही या देशाच्या एकंदरीत परीस्थितीची कल्पना यावी. राजधानी 'तिराना'ला जवळ असलेला 'रिनास' एअरपोर्ट हा आपल्या गोव्याचा एअरपोर्ट एवढाच असावा. इथल्या सोई पण काही वेगळ्या असल्या तर गोव्यापेक्षाही कमीच असतील. बहुक इथे येणारी विमानं म्हणजे 'टर्बो प्रॉप' प्रकारची, म्हणजे बाहेर दोन मोठे पंखे असलेली. या प्रकारची विमानं अजून वापरली जातात यावर माझा विश्वास नव्हता. 'केल्याने देशाटन' ज्ञानात भर पडते ती अशी. गम्मत म्हणजे इथे येताना आमच्यापैकी प्रत्येकाला विमानाचा काही वेगळाच अनुभव आला होता. मी आलो त्या विमानाने एकदा 'रन्वे मिस' केला आणि साधारण दहा फुटाच्या अंतरावर असताना पायलटची ट्युब पेटली आणि त्याने उतरता उतरता पुन्हा 'टेकऑफ' घेतला. माझ्या अजून एका सहकार्‍याचं विमान धावपट्टीच्या आधीच चार सहा फुट उतरलं आणि मग कसंतरी धडपडत धावपट्टीवर पोहोचलं. अजून एका विमानाचं पुढचं चाक उतरताना उघडलचं नाही आणि हे वेळीच लक्षात आल्यावर परत 'टेकऑफ लंडिंग'चे सोपस्कार करावे लागले. तोपर्यंत आत बसलेल्या पासिंजरांचे जीव टांगणीला लागलेले असतात हे ओघानेच आलं. तेव्हा इथे तळावर उतरताना 'अल्लावर' सहज विश्वास बसावा अशी आपोआपच व्यवस्था केली जाते असं म्हणायला हरकत नाही ('अल्ला' भक्तानी आपल्या अस्तित्वाची जाणीव देण्यासाठी दिवसातून पाच वेळा 'बांगेची' सोय केली आहे). हल्ली कुणीही नवीन आलं की 'आज तू कशातून वाचलास?' हा प्रश्न सगळे विचारतात. एकामेकांची चौकशी करायची सवय लागते ती अशी. परवा मी याच विषयावर बोलत असताना एका मित्राने 'अरे टर्बो-प्रॉप हवेत बंद पडलं तरी जास्त वेळ तरंगत राहतं' अशी माहिती पुरवूऩ 'जीव टांगणीला लावण्याची सोय त्यात असते' अशी पुस्ती जोडली. विमानतळ तसा अगदी सर्वसाधारण आहे. एक धावपट्टी आणि तीन चार विमानं एकावेळी दाटीवाटीने उभी राहू शकतील एवढी जागा. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तर विमानापासून टर्मिनल पर्यन्त नेणार्‍या बसेस पाहून 'कुडाळ-निवती' बसची आठवण झाली. टपावर ठेवलेल्या टोपल्यांमधून गळणारे माशाचे पाणी (निवतीला), बर्‍याचच्या शिटा फटलेल्या, काही शिटा कोणाला तरी एस.टी. लागल्यामुळे निकामी झालेल्या. असं असूनही आपली मासे वाहणारी एस.टी. बस देखील किती स्वच्छ असते असं वाटू लगलं. जनावरं भरण्यासाठी वापरायची गाडी असं या बसचं वर्णन करता येईल. सीटचे तुकडे फडून त्यातल्या स्पंज पळवलेला बघून आपल्या जुन्या सिनेमा थेटरांची आठवण होते. सीटमधला स्पंज फाडून नेण्यात लोकाना नक्की काय आनंद मिळतो हे मला आता कुणा अल्बेनियन माणसाला विचारायला हवं. आता मात्र नवीन बसेस घेतलेल्या दिसतात. प्रवाशांकडून जमा केलेल्या दहा यूरोचा काही तरी उपयोग केला जातोय म्हणजे इथे आलेले कंसल्टंट्स मुम्बई एअरपोर्टच्या सेवेतून आलेले नसावेत. तळावर काही 'अल्बेनिअन एअर्लाइन्स'ची विमाने उभी असतात. पण ती गेले सहा महिने तिथेच उभी आहेत तेव्हा ती ही 'ऍटमॉसफेर क्रिएट' करायला ठेवली असावीत हे लक्षात येतं. गेल्या खेपेला मी या एअरलाईनने प्रवास करण्याचं धाडस केलं होतं (तसा मी धाडसी आहे) पण ते विमान बल्गेरियाच्या 'हुमास कंपनी' कडून भाड्यावर घेतलेलं होतं हे ऐकून यात मी आनंद मानावा की नाही हेच कळेना. त्या विमानाच्या मध्यावरून शेपटी पर्यंत एक धुणी वाळत घालायच्या दोरी सारखं काहीतरी बांधलेलं पाहून माझे हातपाय गळाले होते हे आता सांगत नाही. अल्बेनियात धुणी वाळत घालायची प्रथा असली तरी विमानावर काय वाळवत असतील हे माझ्या लक्षात येईना. हा प्रकार शेपटीला आधार देण्यासाठी होता की विमानाला याचा विचार करत मी विमानात बसलो. यापुर्वी रशियन विमानाच्या मॅकॅनिकने 'प्लॅस्टिक टॅग' वापरून विमानाचा पंखा दुरूस्त केल्याचं मी 'सिक्स्टी मिनिट' या कार्यक्रमात पाहिलं होतं. तेव्हा पासून जर्मनी पलिकडील एकाही युरोपीय देशाच्या एअरलाईनचा वापर करायचा नाही असा संकल्पही केला होता. पण माझं नांव 'पितामह भीष्म' नसल्यामुळे मोडावा लागला. हा प्रकार म्हणजे 'रेडीयो ऍन्टिना' होती हे नंतर कळलं व्हिसाची रांग फार नसली तरी 'परदेशी' नागरिकांसाठी एकच रांग उघडून अल्बेनियाने बचत केली होती. त्यातही कामापुरतं इंग्रजी न जाणणारा अधिकारी ठेऊन न बोलता व्हिसा घेण्याची सोयही केली होती. व्हिसाचे दहा यूरो घेणारा अधिकारी मात्र तत्पर होता. व्हिसा, इमिग्रेशनची कागदपत्रं पूर्ण करून मी सामानाच्या रांगेत उभा राहिलो. रांग असली तरी रांगेचे नियम न पाळणे हा इथल्या लोकांचा स्वभाव दिसतो. 'इटली' मधेही मला हा अनुभव आला होता, त्यामुळे मीही निर्ढावलो होतो आणि मुळचे भारतीय रक्त असल्यामुळे या प्रकाराची सवयही होती. सामान ताब्यात घेतल्यानंतर सगळं सामान एक्स-रे मशीनमध्ये टाकून तपासणी करण्यासाठी वेगळी लाईन होती. एकीकडे सामान तपासणीसाठी टाकून मी 'मेटल-डिटेक्टर' मधून पलिकडे बाहेर पडलो. माझं सामानही सुखरूपपणे बाहेर पडलं. 'एक्स-रे मशीन' वर तपासणी करणारा कारकून अगर पोलीस कुठे चहा प्यायला गायब झाला होता कोण जाणे? सामान 'एक्स-रे' मध्ये टाकण्याची जबाबदारी पार पडली जात होती, पुढे त्यात काय आहे हे 'अल्ला'वर सोडून देण्यात आलं होतं. अतिरेक्यांच्या या जमान्यात 'अल्लाचिया सेवका वक्र पाहे' असा कुणी भूमंडळी नसल्यामुळे त्याना चिंता नसावी.'मेटल-डिटेक्टर'च्या शेजारी उभा असलेला पोलीसही 'निष्काम कर्मयोगी' असल्याचं पाहून मलाही समाधान वाटलं. बाहेर टॅक्सीवाल्यांनी पुन्हा 'इंदिरा गांधी' हवाई अड्याची आठवण करून दिली. 'साहेब टॅक्सी', 'साहेब टॅक्सी' करत लहान लहान मुलं मागे लागत होती. परदेशी प्रवाश्यांचे सामान खेचून घेण्यात टॅक्सीवाल्यांची झटापट चालली होती. कसलेतरी अगम्य भाषेतले 'बॅच' दाखवून आपली टॅक्सी ही अधिकर्‍इत आहे हे पटवण्याचा प्रयत्न चालला होता. रांग लावायची पध्दत नाही हे मला आधीच कळलं होतं तेव्हा रांगेत उभं राहून टॅक्सी घेण्याचा प्रश्न नव्हता. टॅक्सीला सर्वसाधारणपणे वीस डॉलर लागतात याची आगामी कल्पना असल्याने मी घासाघीस करून तो भाव पक्का केला आणि मग गाडीत बसलो. परीस्थितीने गरीब असलेया या देशात टॅक्सी मात्र सगळ्या मर्सिडीज. या लोकाना मर्सिडीजचं वेड असावं. कारण रस्त्यावर जाताना नव्वद टक्के गाड्या मर्सिडीज दिसत होत्या. फक्त गाड्यांची कंडीशन विचारात नाही घेतली तर बरी. बहुतेक गाड्या तीस चाळीस वर्षं जुन्या. त्यामुळेच की काय हे बेंझचे वेड वाढले असावे (इथे या गाड्याना बेंझ म्हणूनच ओळखतात). या गाड्या पन्नास वर्षं देखील टिकतात अशी माझ्या ज्ञानात भर पडली (म्हणजे 'बापभी वापरेगा, बच्चाभी वापरेगा'). अजून एका स्थानिक तरुणीशी चर्चा करता यातल्या बहुतेक गाड्या जर्मनी आणि आसपासच्या देशातून चोरून आणलेल्या असतात अशीही मौलिक माहिती मिळाली. 'इटाली' प्रमाणे इथेही माफियाचे राज्य असून बेंझ गाड्या आणि त्यांचे सुटे पार्ट पुरवण्याचे घाउक कंत्राट माफियाकडे आहे असं माझ्या टॅक्सीवाल्याचं म्हणणं पडलं. रिनास पासून तिराना कडे जाणारा या देशातला एकमेव हायवे हा विमानतळापासून आठ दहा किलोमीटरवर सूरू होतो. तोपर्यन्त एका छोट्या रस्त्याने जावं लागतं. या रस्त्याकडे पाहिल्यावर बेंझची गरज पटते. तुरळक असणार्‍या बस आणि ट्रकच्या रहदारीला शह देत या गाड्या सुसाट सुटतात. रस्त्याच्या दुतर्फा अगदी तुरळक पण श्रीमंत लोकांची घरं असावी हे पाहताच लक्षात येतं. आजूबाजूची माणसं फाटकी असली की बंगल्याला फाटक आपोआप येतं. घरांची बांधणी मात्र एकाद्या गरीब देशाच्या नियमांप्रमाणे होत असणार हे उघड आहे. गरीब देशांमध्ये आधी घर बांधलं जातं. मग रस्त्यापासून घरापर्यंत पाउलवाट निघते. मग घर बांधणार्‍याकडे मोटारगाडी असेल तर रस्ता केला जातो. पाश्चात्य देशात याचा उलटा प्रकार असतो. तिथे आधी रस्ता आणि इतर प्लॅनिंग आणि मग घर बांधणे असा क्रम असतो. 'हाय-वे'ला लागल्या नंतर दुतर्फा 'बॉम्ब शेल्टर' दिसतात. पहिल्या भेटीला मला ही बांधकामं पाहून जरा आश्चर्य वाटलं होतं तेव्हा तिथल्या एका माणसाने ती कुठल्यातरी युध्दाची देणगी आहे हे मला सांगितलं होतं. आता मात्र बहुतेक ठिकाणी नव-नवीन इमारती उह्या राहत असल्यामुळे ही 'बॉम्ब शेल्टर' हळू हळू दृष्टीआड होत आहेत. आता परदेशी पर्यटकांसाठी तयार केलेले 'बॉम्ब शेल्टर'च्या आकाराचे 'ऍश-ट्रे' मिळतात. जवळपास अर्ध्या तासाने मी तिराना शहरात पोहोचलो. रस्त्यावर जेताना बर्‍याच ठिकाणी पोलीस तपासणी चालली होती. ठिकठिकाणी पोलिसानी गाड्या अडवलेल्या दिसत होत्या. पण ही तपासणी म्हणजे नुसती चौकशी असावी. १९९३ साली कम्युनिस्टांपासून स्वतन्त्र झालेल्या या देशात फारसे रस्ते नाहीत. फारश्या गाड्या पण नव्हत्या आणि त्यामुळे ट्रॅफिकचे नियमही नाहीत. बहुतेक चालकांकडे 'लायसेन' असेल की नाही याची मला शंका आहे. अपूरे रस्ते आणि भरपूर (बेंझ) गाड्या त्यामुळे शहरात 'ट्रॅफिक ज्याम' हा नेहमीच असतो. त्यात पुर्ण शहरात मिळून आठ दहा सिग्नल असावेत. अर्थात हे सिग्नल बर्‍याचदा बंद असतात आणि चालू असले तरी नियम पाळून गाडी चालवणे इथल्या संस्कर्‍इतीत बसत नसावं. मग सिग्नल असो वा नसो, चार रस्ते एकत्र आले की तिथे पोलीसांची नेमणूक असते. अजून या पोलीसांनी मुंबईला ट्रेनिन्ग घेतलं नसावं. मुंबईचा पोलीस हा सिग्नल सोडून पुढे पंधरा वीस कदमावर लपून बसतो. ऍक्षिडेण झाला तरी त्याला पर्वा नसते. फक्त सिग्नल तोडून कुणी आला की लगेच 'अरे चोरा, बरा सापडलास़ आता कापतो तुला' अशी त्याची पॉलीसी असते. इथे नियम तोडून घुसणार्‍या डायव्हरला पोलीस शिव्या देताना मी पाहिला आहे पण त्यातून खिसे भरायची कल्पना त्याना आली नसावी. किंवा मग 'ट्रॅफिकचे नियम' नसल्यामुळे 'आमाला पावर नाय' हे पण कारण असेल. मी आता तिराना शहरात स्थिरावलो आहे. मी काम करतो ती 'बॅन्क शिप्रीस' या देशाची रिसर्व बॅन्क आहे. या बॅन्केची इमारत ही पहिल्या महायुध्दाअगोदर बांधली असावी. त्या नंतर त्यात फारश्या सुधारणा करणं या लोकाना नामंजूर असावं. बॅन्केची इतकी गचाळ इमारत मी यापूर्वी फक्त हंगेरीत पाहिली होती ( त्याबद्दल पुन्हा केव्हातरी). आम्ही काम करतो त्या खोलीला 'एयर कंडीशनर'ची सोय असली तरी इतर खोल्यांमध्ये ती ही सोय नाही. 'स्वच्छतागृह' तर उत्तर भारतातून जश्याच्या तसं इम्पोर्ट केलेलं असावं. तिथे कधी पाणी असतं़ कधी नाही. टॉयलेट आहे सीट नाही, दरवाज्याला कडी आहे पण ती नीट लागत नाही. मध्ये मध्ये कसल्यातरी छापील सूचना लावलेल्या असतात पण त्याही फक्त अगम्य भाषेत. बहुधा 'आज पाणी येणार नाही' असं लिहीत असावेत. 'वापरू नका, त्याने जिवास धोका आहे' अशी सूचना असली तरी वाचता आली तर उपयोग. एकंदरीत तुम्ही जीवावर उदार होऊन तिथे जाणारच असाल तर जा बापडे अशी अवस्था. त्यामुळे नैसर्गिक व्यवहार हॉटेल वर असताना पूर्ण करणे आणि घाई लागली असल्यास परत हॉटेलवर जाणे अशा काही सवयी आपोआप लागतात. एकदा तर आम्ही बसतो त्या लायब्ररी बाहेऱ जिन्यावर बदाबदा पाणी गळू लागलं. चौकशी अंती ते वरच्या कुठल्याश्या मजल्यावर 'फॉल्ट' आहे असं उत्तर मिळालं. त्या पाण्याच्या उगामाची धास्ती घेतल्याने आम्ही आमची चौकशी आवरती घेतली. तिराना शहरात पहाण्यासारखं काहीही नाही असं खुद्द इथे रहणार्‍या लोकांचं मत आहे. अगदी तुम्हाला राहवत नसेल तर चाळीस मजली ऊंच 'स्काय-टॉवर' वर जा म्हणजे तिराना दिसेल अशी एक सूचना आली. इथे 'अल्बेनियन' अशी कोणती गोष्ट मिळेल या प्रश्नाला देखील 'काहीही नाही' हेच उत्तर मिळालं. त्यामुळे रस्त्यावर खाली मान घालून चालणं हा एकमेव पर्याय उरतो. म्हणजे इकडे तिकडे बघणं मला आवडत नाही असं नव्हे. पण रस्त्यावरचे खड्डे आणि उघडे टाकलेले 'मॅनहोल' चुकवून चालताना समोर बघून चालणं शक्य होत नाही. काही ठिकाणी भर रस्त्यावर एवढे मोठे खड्डे आहेत की 'स्मार्ट' सारखी एखादी गाडी पूर्णपणे आत जाउ शकेल (युरोपात बेंझ आणि स्वाच या दोन कंपन्यानी एकत्र येऊन स्मार्ट नावाची छोटीशी गाडी काढली आहे). दुकान साफ करून घाण झालेल्या पाण्याच्या बादल्या रस्त्यावर ओतणारे दुकानदार आणि रस्त्यावर नोटा विकणार्‍यांपासून सावध राहिलं की झालं. मुम्बईला जसे पावभाजीच्या गाड्या चौपाटीवर दिसतात तशा प्रमाणात इथे पैसे बदलून देणारी माणसं नाक्या नाक्यावर उभी असतात. पहिले काही दिवस मी हा सगळा प्रकार बघून चक्रावलो होतो. पण हा सगळा प्रकार बॅन्केच्या दारातच चालतो आणि पोलीसही शांतपणे बघत उभे असतात तेव्हा त्यात बेकायदेशीर काही नसावं. अल्बेनियन माणसांची संख्या जगभर मिळून साठ लाख आहे असं म्हणतात. त्यातले तीस लाख म्हणजे निम्मे लोक हे देशाच्या बाहेऱ म्हणजेच युरोप़ अमेरिकेत आहेत. अजून बरेचसे मॅसाडोनिया या शेजारी राष्ट्रात रहात असून तिथे त्यांची स्थानिक लोकांशी बरीच मारामारी चालू आहे. उरलेल्या तीस लाख लोकांमधले पंधरा लाख लोक हे एकट्या तिराना शहरात राहतात. बाहेर राहणार्‍या तीस लाख लोकसंख्येकडून इथे राहणार्‍या लोकाना सतत पैशाचा ओघ असतो. हा सगळा पैसा हा बहुतेकवेळा काळा पैसा म्हणूनच देशात येतो, त्यामुळे इथे श्रीमंत माणसं बरीच असली तरी सरकारला टॅक्स रूपाने फारच कमी पैसा मिळतो. त्यामुळेच की काय रस्त्यावर बहुटेक बेंझ या जुन्या, खटारा असल्या तरी बर्‍याच नवीन आणि कोर्‍या पण असतात. अल्बेनिया हा युरोपात मध्यभागी आणि छोटा देश असल्याने आतापर्यंत इतर बर्‍याच देशानी वार्‍या करून या देशाला गुलामगिरीत ठेवलं होती ही पण माहिती मिळते. त्यात पश्चिमेला इटली, दक्षिणेला ग्रीस आणि त्यापूर्वीही 'हूण' आणि 'तुर्की' लोकांच्या स्वार्‍या या देशावर झालेल्या आहेत. त्यात 'मेडिटरेनियन' समुद्रापलिकडील इटालीचा यांच्यावर खूपच प्रभाव अजूनही आहे. खाण्यापिण्यात पिझ्झा, पास्टा सर्वत्र मिळतो आणि त्याव्यतिरिक्त फारसं काही मिळत नसावं. समुद्र जवळ असल्याने 'मत्स्यप्रेमी' मंडळीना पण चंगळ करता येईल एवढे मासे मिळतात. पण रस्त्याकाठच्या या छोट्या पिझ्झेवाल्यानी 'इटालीयन' खाण्याच्या नक्कली बरोबर शिस्तही 'इटली'कडून घेतली असावी. असाच एकदा मी एका खाद्यगृहामध्ये पिझ्झा मागवला. मला अल्बेनियन आणि वेटरला त्याव्यतिरिक्त कोणतीच भाषा येत नसल्याने मी त्यातल्या त्यात मागवायला सोपा म्हणून 'व्हेज पिझ्झा' मागवला. काही वेळाने माझ्या समोर आलेल्या पिझ्झामधल्या 'सलामी'ने मला सलाम मारला. वेटरचं लक्ष वेधून घेईपर्यन्त तो माझा पिझ्झा दुसर्‍या कुणालातरी टेकवून आला होता. मी ही चूक त्याच्या लक्षात आणून देईपर्यन्त (माझं अल्बेनियन काय वर्णावं) त्या दुसर्‍या गिर्‍हाईकाने माझ्या 'वेज पिझ्झा'चा एक लचका तोडला होता. वेटरने माझी तक्रार शांतपणे ऐकून घेतली आणि 'सलामी' पिझ्झा आणि वेजी पिझ्झाची लगेच अदलाबदल केली. आता 'उष्टा' पिझ्झा मला नको हे त्याला समजावणं भाग होतं. उष्टा म्हणजे नक्की काय हा प्रकाश त्याच्या डोक्यात पडणं अशक्य होतं ( उष्टं म्हणजे काय हे पाश्चात्य लोकांना का कळत नाही कोण जाणे? अमेरिकन टी.व्ही.वर कोणतीही सिरियल बघा; किचनमध्ये शिजत्या भांड्यातला चमचा तोंडात घालून लोक चव बघतात. आपल्या आज्या स्वयंपाक पूर्ण होऊन देवाला नैवेद्य ठेवेपर्यंत तिकडे पाउलही ठेवू देत नसत). तो लचका तोडलेला पिझ्झा, हाच मी मागवलेला पिझ्झा आहे असं त्याचं म्हणणं असावं. आणि जरी मी तो पिझ्झा मागवलेला असला तरी मला उष्टा पिझ्झा नको आहे हे त्याला पटवायला मी ऍक्टिंगची पराकाष्ठा केली. शेवटी मी उठून चालायला लागलो आणि त्याची ट्युब पेटली. 'ह्या भाडला नवीन पिझ्झा हवा असणार' असं काहीतरी बडबडत तो आत गेला आणि मी 'बसा, साहेब. तुमच्या साठी नवीन पिझ्झा आणतो,' असं तो म्हणाला असावा अशी मनाची समजूत करून घेतली. त्या नंतर त्या किंवा तत्सम कुठल्याही खाद्यगृहात न जाण्याचं मी स्वत:शी ठरवून टाकलं. पर्यटनाला काही विशेष नसलं तरी 'वीक-एण्ड' घालवायला काहीतरी शोधण्याला पर्याय नव्हता. सोबत दोन रोमेनियन पण होते, तेव्हा एखादं अल्बेनियन धाडस करायचं ठरलं. त्यातल्या त्यात तीस किलोमीटरवर असलेल्या 'डेयटी'च्या पॅनोरमा पॉईंट'वर आम्ही जावं अशी एक सूचना आली. तिथे नक्की काय बघता येईल या प्रश्नाला मात्र 'तिथून तिराना स्वच्छ दिसतं' हे उत्तर मिळालं. तेव्हा कॅमेरे वगैरे तयारी घेऊन आम्ही 'डेयटी'कडे प्रयाण करायचे ठरवले. टॅक्सीवाल्याला खाणाखुणाकरून भाव पक्का केला आणि या डेयटीची वाट धरली. अर्धवट बांधलेली कच्ची घर मोकाट कुत्री, डोंगरावरून खाली वाहणारं पाणी बघत आमची ट्रीप निघाली. काही लोक डोंगरावरून येणारं पाणी मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्ये भरून घेत होते. हे पाणी कुठल्या कुठल्या ठिकाणी विकलं जातं हे विचारायचा धीर होईना. त्याठिकाणी जमलेलं हिरवागार शेवाळ तोंड उघडू देईलतर शप्पथ. पण ज्याअर्थी नेणारे लोक हे पाणी छोट्या छोट्या गाड्यांमधून नेतात त्याअर्थी ते घरगुती वापरासाठी असावं असं मनाचं समाधान करून घेतलं. टॅक्सीचालकाला इंग्रजी येत नसल्यामुळे मोडक्या तोडक्या इटालियन मध्ये माहिती मिळत होती. बहूतेक इमारतींकडे बोट दाखवून ही कम्युनिस्टानी लुटली हेच तो सांगत होता. पुढे प्रश्न विचारता येत नव्हते. रस्ता मात्र आपल्याकडच्या एखाद्या घाटासारखा होता. सभोवती भरपूर बर्फ साचलं होतं. गाड्यांची चाकं घसरत होती. आम्हाला पाठवणार्‍यानी स्वत: इथे यायचे कष्ट का घेतले नव्हते हे तेव्हा लक्षात आलं. समोरासमोरून गाड्या आल्या की एकामेकांवर आपटणार की काय असं वाटत होतं. तरी काही बेंझवाल्यांचा उत्साह आणि वेग कमी होत नव्हता. समोर दुसरी गाडी दिसली मी माझे पाय काल्पनिक ब्रेक लावत होते. शेवटी डायवर साहेबानी 'साहेब घाबरू नका, जीव गेला तर मी ब्रेक न लावल्यामुळे जाईल़ तुम्ही उगाच पायानी जोर देऊन माझी बेंझ तोडू नका' असं काहीतरी म्हटलं आणि मी माझा जीव डायवरच्या मुठीत ठेऊन बसलो. जाताना रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी कसले तरी प्राणी सळ्यांवर भाजण्याचं काम चालू होतं. चौकशी करता त्या मेंढ्या आहेत असं कळलं. मला तर ते कुत्र्यासारखे दिसत होते पण इथे कुत्रे खाल्ले जात नाहीत (त्यासाठी व्हिएटनामला जावं लागतं) ही माहिती आणि शेतामध्ये चरणार्‍या मेंढ्या बघून मी पण त्या मेंढ्याच असाव्यात असा विचार पक्का केला. मेंढी पण जीवानिशी जाताना वातड लागते का? हा प्रश्न मला 'इटालियन- अल्बेनियन' येत नसल्यामुळे अनुत्तरित राहिला. बरोबरचे रोमेनियन मागे बसून त्यांच्या भाषेमध्ये 'र.ण्व र.ण्व' करत होते त्यामुळे त्यांनाही विचारता आलं नाही. 'शेळी जाते' ही म्हण त्यांच्या भाषेत नसावी. जागोजागी लहानमोठी 'रेस्टॉरंट' दिसत होती. बहुतेक सगळी आपल्या चहा भज्यांच्या 'हॉटेलांपेक्षा' मोठी नव्हती. रविवार असल्यामुळे गिर्‍हाईकांच्या स्वागताची तयारी चालली होती. तीस किलोमीटरचं हे अंतर पार करायला आम्हाला चांगला दिड तास लागला. चालक मात्र कसली कसली माहिती देत होता. वरती जातानाच त्याने वाटेत आमच्या साठी खाण्याअ-पिण्याचं 'बुकिंग' करून टाकलं. 'कमिशन आहे वाटतं' ही माझी कुजकट शंका मी मनातल्या मनात दाबून टाकली. वरती पोहोचल्यावर आम्ही तिराना शहराचे दर्शन घेतलं. तिथे काहीही बघण्या सारखं नाही हे माहित असून सुध्दा 'आम्ही तिथे जाउन आलो' हे समाधान होतंच. टी.व्ही. टॉवरशिवाय तिथं अजून काहीच नव्हतं. पाच दहा मिनिटं वेळ काढून आम्ही 'रेस्टॉरंट' गाठलं. 'पॅनोरमा व्ह्यू' बघत बघत जेवण आटपलं. तिथेच बर्फात एकामेकांवर बर्फाचे गोळे टाकणार्‍या पोरांबरोबर दोन मिनिटं त्यांचा खेळही खेळून घेतला. बर्फात हात घालायची तयारी नसल्यामुळे त्याना नेमबाजीचं शिक्षण एवढाच माझा सहभाग होता. परतीची वाट समोरचा उघडा घाट़ समोरून येणार्‍या भरधाव गाड्या, आणि आजूबाजूला पसरलेला बर्फ पहाण्यात गेला. पुन्हा कधीतरी वेळ मिळाला तर त्याच डायव्हरला बोलवण्याचं आश्वासन देऊन आम्ही टॅक्सी सोडली. अल्बेनिया आता सुधारतो आहे. सध्याच्या अतिरेकी महापौरानी नियम करून सगळ्या इमारतीना बाहेरून रंग फासण्याचा फतवा काढला आहे. स्थानिक लोक त्याना अतिरेकी समजतात पण त्यामुळे शहराला वेग-वेगळे रंग फासलेले दिसतात. एकाद्या ऊंच इमारतीवरून खाली पाहिलं तर रंगबिरंगी इमारतींचा ताटवा दिसतो (इमारतीला पिवळा अगर गुलाबी रंग लावणार्‍या माणसाने नक्की कुठली दारू चढवली असेल हे मात्र लक्षात येईना). रस्त्यावर सिगरेट विकणार्‍या आणि भीक मागणार्‍यांमध्ये बरीच लहान लहान मुलं असली तरी आपल्या युरोपीयन शेजार्‍यांच्या मदतीने तो प्रगती करू पाहतो आहे. इराक युध्दात अमेरिकेची बाजू घेऊन त्याने अमेरिकेशी मैत्री केली आहेच (माननीय विदुषकरावांना कुणाचाही पाठिंबा चालला असता). त्याचाच परीणाम म्हणून की काय इथलं 'इंफ्रास्ट्रक्चर' सुधारण्यात अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन पैसा आघाडीवर आहे. लवकरच या देशाला युरोपीयन संघात सामील व्हायचं आहे. त्यासाठी त्यानी जय्यत तयरी चालवली आहे. कम्युनिस्ट विचारसरणीची पाठ सोडून लोकशाहीची वाट धरून सुधरू पाहणार्‍या इतर पूर्व-युरोपीयन देशांशी त्याची स्पर्धा चालू आहे. मी केलेल्या प्रत्येक वारीत तिथे होणारे बदल जाणवता आहेत. रस्ते सुधरायला अजून वेळ असला तरी बाकी बर्‍याच यंत्रणा सुधरू लागल्या आहेत. दिवसातून सात आठ वेळा लाईट जातात पण तरी दोन तीन मिनिटात परत येतात. माणसं नियम पाळत नसली तरी ट्रॅफिकचे दिवे धोक्याचा ठिकाणी लावले जात आहेत. मी जे काम करतो आहे ते बॅन्केचे कामही या सुधारणेचाच भाग आहे. तेव्हा येत्या काही वर्षात ह्या देशाचा कायापालट होईल यात मला शंका नाही. भल्या पहाटे निघणार्‍या विमानाने मला आता बाहेर पडायचे आहे. विमान म्हटल्यावर मला पुन्हा विमानाचे किस्से आठवत आहेत. एकही शब्द न समजणारा टॅक्सीचालक आठवतोय. पण इथून निघून घरी जाता येणार याचाही आनंद आहे. एअरपोर्टवर मला काहीच्या काही 'एक्झीट टॅक्स' लावून लुटणारा गेल्या खेपेचा कस्टम ऑफिसर अजून लक्षात आहे. त्यासाठी बरोबर 'चेंज'ची व्यवस्था करून मी निघतो, आणि 'बाय - बाय' अल्बेनिया करूऩ देवाचं नांव घेत विमानात पाय टाकतो. मागच्या खेपेला उतरताना विमानाच्या एका पंखावर दोनदा वीज पडून तो जवळ जवळ निकामी झाल्याची आठवण आत्ताच का बरं यावी? %%%%% http://www.marathinovels.net/2008/04/ch-1-online-marathi-novel-ad-bhut.html %%%%% CS671 : "arvram@iitk.ac.in" 20150804 गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. सारा आसमंतात रातकीडयांच्या किर्र असा आवाज घुमत होता . एका बंगल्याच्या शेजारच्या झाडावर पाण्याने भीजलेले एक घूबड बसले होते . त्याची भिरभीरती भेदक नजर समोरच्या बंगल्याच्या एका आतून प्रकाश येत असलेल्या खिडकीवर खिळून थांबली . घरात त्या खिडकीतून दिसणारा तो एक लाईट सोडून सर्व लाईट्स बंद होते. अचानक तिथे त्या खिडकीजवळ आसऱ्यासाठी बसलेल्या कबुतरांचा झुंड च्या झुंड तिथून फडफड करीत उडून गेला. कदाचित तिथे एखाद्या अदृष्य शक्तीचं अस्तीत्व त्या कबुतरांना जाणवलं असावं. खिडकीचे काच पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे बाहेरुन आतलं काहीच दिसत नव्हतं. खरचं तिथे काही अदृष्य शक्ती पोहोचली होती का? आणि पोहोचली होती तर तिला आत जायचे होते का? पण खिडकीतर आतून बंद होती. बेडरुममध्ये बेडवर कुणीतरी झोपलेले होते. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने कड बदलला आणि त्या आकृतीचा चेहरा दुसऱ्या बाजूला झाला. त्यामुळे कोण होतं ते ओळखनं कठीण होतं. बेडच्या बाजुला एक चष्मा ठेवलेला होता. कदाचीत जे कुणी झोपलेलं होतं त्याने झोपण्याआधी आपला चष्मा काढून बाजुला ठेवला असावा. बेडरुममध्ये सगळीकडे मद्याच्या बाटल्या, मद्याचे ग्लासेस, वर्तमान पत्रे, मासिके इत्यादी सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे पसरलेलं होतं. बेडरुमचे दार आतून बंद होते आणि त्याला आतून लॅच लावलेला होता. बेडरुमची एकुलती एक खिडकी तिही आतून बंद केलेली होती - कारण ती एक एसी रुम होती. जी आकृती बेडवर झोपलेली होती तिने पुन्हा आपला कड बदलला आणि आता त्या आकृतीचा चेहरा दिसायला लागला. स्टीव्हन स्मीथ, वय साधारण पंचविस-सव्वीस, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कुठे कुठे दाढीचे खुंट आलेले, डोळ्याभोवती चश्म्यामुळे तयार झालेली काळी वतृळं. काहीतरी हळू हळू स्टीव्हनपाशी जायला लागलं. अचानक झोपेतही स्टीव्हनला चाहूल लागली आणि तो दचकुन जागा झाला. त्याच्या समोर जे काही होतं ते त्याच्यावर हल्ला करण्याच्या पावित्र्यात असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली, सर्वांगाला घाम फुटला. तो प्रतिकार करण्याच्या उद्देशाने उठू लागला. पण तो प्रतिकार करण्याच्या आधीच त्याने त्याच्यावर, आपल्या सावजावर झडप घातली होती. सगळ्या आसमंतात स्टीव्हनच्या एका मोठ्या आगतीक, भयावह किंकाळीचा आवाज घुमला. आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली .. अगदी पुर्ववत... सकाळी रस्त्यावर लोकांची आपआपल्या कामावर जाण्याची घाई चाललेली होती. त्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ चालू होती. अश्यातच अचानक एक पोलीसांची गाडी त्या ट्रफिकमधून धावायला लागली. सभोवतालच वातावरण पोलीसाच्या गाडीच्या सायरनमुळे गंभीर झालं होतं. रस्त्यातले लोक पटापट त्या गाडीला रस्ता देत होते. जे पैदल जाणारे होते ते भितीयूक्त उत्सुकतेने त्या गाडीकडे वळून वळून पाहात होते. ती गाडी निघून गेल्यावर थोडावेळ वातावरण तंग राहालं आणि मग पुन्हा पूर्ववत झालं. एक पोलीसांचा फोरेन्सीक टीम मेंबर उघड्या बेडरुमच्या दरवाज्याजवळ इन्वेस्टीगेशन करीत होता. तो त्याच्या जवळच्या जाड भिंगातुन जमीनीवर काही सापडते का ते शोधत होता. तेवढ्यात एक शीस्तीत चालणाऱ्या बुटांचा 'टाक टाक' असा आवाज आला. तो इन्व्हेस्टीगेशन करणारा वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला प्रश्न ऐकायला मिळाला '' कुठे आहे बॉडी ? '' '' सर इकडे आत ..'' तो टीम मेंबर आदराने उठून उभा राहत म्हणाला. डिटेक्टीव सॅम व्हाईट, वय साधारण पस्तीस-छत्तीस, कडक शिस्त, उंच पुरा , कसलेलं शरीर, त्या टीममेंबरने दाखविलेल्या दिशेने आत गेला. डिटेक्टीव सॅम जेव्हा बेडरुममध्ये शिरला त्याला स्टीवनचं शव बेडवर पडलेलं दिसलं. त्याचे डोळे बाहेर आलेले आणि मान एका बाजूला वळलेली होती. बेडवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्याचा गळा लोळा तोडल्यागत कापलेला होता. बेडच्या स्थीतीवरुन असं जाणवत होतं की मरण्याच्या आधी स्टीव्हन बराच तडफडला असावा. डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये आजूबाजूला नजर फिरवली. फोरेन्सीक टीम बेडरुममधेही तपास करीत होती. एक जण कोपऱ्यात ब्रशने काहीतरी साफ केल्यागत काहीतरी करीत होता तर अजून एकजण खोलीतले फोटो घेण्यात व्यस्त होता. एका फोरेन्सीक टीमच्या मेंबरने डीटेक्टीव सॅमला माहिती पुरविली - " सर मयताचे नावं स्टीव्हन स्मीथ' ' फिंगरप्रींटस वैगेरे काही मिळालं का?" ' नाही आत्तापर्यंत तरी नाही' डिटेक्टीव सॅमने फोटोग्राफरकडे पाहत म्हटले, '' काही सुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या'' '' यस सर '' फोटोग्राफर आदबीने म्हणाला. अचानक सॅमचं लक्ष एका अनपेक्षीत गोष्टीकडे आकर्षीत झालं. तो बेडरुमच्या दरवाज्याजवळ गेला. दरवाज्याचं लॅच आणि आजुबाजुची जागा तुटलेली होती. '' म्हणजे खुनी हा दरवाजा तोडून आत आला वाटतं'' सॅम म्हणाला. जेफ, साधारणत: पस्तीशीतला, बुटका, जाड, त्यांचा टीम मेंबर पुढे आला, '' नाही सर, खरं म्हणजे हा दरवाजा मी तोडला... कारण आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता.'' '' तु तोडला?'' सॅम आश्चर्याने म्हणाला. '' यस सर'' '' काय पुन्हा आधीचे कामधंदे सुरु केले की काय?'' सॅम गंमतीने पण चेहऱ्यावर तसं न दाखविता म्हणाला. '' हो सर ... म्हणजे नाही सर'' सॅम ने वळून एकदा खोलीत चहुवार आपली दृष्टी फिरवली, विषेशत: खिडक्यांवरुन. बेडरुमला एकच खिडकी होती आणि तीही आतून बंद होती. बंद असणं साहजिकच होतं कारण रुम एसी होती. '' जर दार आतून बंद होतं... आणि खिडकीही आतून बंद होती ... तर मग खुनी खोलीत आलाच कसा...'' सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. '' आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आत आल्यावर बाहेर कसा गेला?'' जेफ म्हणाला. डिटेक्टीव्हने फक्त त्याच्याकडे रोखुन बघितले. अचानक सगळ्यांचं लक्ष एका इन्वेस्टीगेटींग ऑफिसरने आकर्षीत केलं. त्याला बेडच्या आजुबाजुला काही केसांचे तुकडे सापडले होते. '' केस? ... त्यांना व्यवस्थीत सिल करुन पुढच्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवा' सॅमने आदेश दिला. डिटेक्टीव्ह सॅम पोलिस स्टेशनमध्ये आपल्या ऑफीसमध्ये बसला होता. तेवढ्यात एक ऑफीसर तिथे आला. त्याने पोस्टमार्टमचे कागदपत्र सॅमच्या हातात दिले. सॅम ते कागदपत्र चाळीत असता त्याच्या बाजुला बसून तो ऑफिसर सॅमला इन्वेस्टीगेशनची आणि पोस्टमार्टमबद्दल माहिती देवू लागला. " मृत्यू गळा कापल्यामुळे झाला असं यात नमुद केलं आहे आणि गळा जेव्हा कापला तेव्हा स्टीव्हन कदाचित झोपेत असावा किंवा बेसावध असावा असं नमुद केलं आहे पण कोणतं हत्यार वापरण्यात आलं असावं याचा काही पत्ता लागत नाही आहे" तो ऑफिसर माहिती पुरवू लागला. " ऍ़मॅझींग ?" डिटेक्टीव सॅम जसा स्वतःशीच बोलला. '' आणि तिथे सापडलेल्या केसांचं काय झालं?'' '' सर ते आम्ही तपासले ... पण ते माणसाचे केस नाहीत'' '' काय माणसाचे नाहीत? ...'' '' मग कदाचीत भूताचे असतील...'' तिथे येत एक ऑफिसर त्यांच्यामध्ये घुसत गंमतीने म्हणाला. जरी त्याने गमतीने म्हटले असले तरीही ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत दोन तिन क्षण काहीच बोलले नाहीत. खोलीत एक अनैसर्गीक शांतता पसरली होती. '' म्हणजे खुन्याच्या कोटाचे वैगेरे असतील'' सॅमच्या बाजूला बसलेला ऑफिसर सांभाळून घेत म्हणाला. '' आणि त्याच्या मोटीव्हबद्दल काही माहिती?'' '' घरातील सगळ्या वस्तू तर जागच्या जागी होत्या... काहीही चोरी गेलेले दिसत नव्हते... आणि घरात कुठेही स्टीव्हनच्या हाताच्या आणि बोटांच्या ठश्यांशिवाय इतर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. '' ऑफिसरने माहिती पुरवली. '' जर खुनी भूत असेल तर त्याला मोटीव्हची काय गरज'' पुन्हा तो तिथे उभा असलेला ऑफिसर गमतीने म्हणाला. पुन्हा दोन तिन क्षण शांततेत गेले. '' हे बघा ऑफिसर ... इथे हे सिरीयस मॅटर सुरु आहे ... अन कृपा करुन अश्या फालतू गमती करु नका'' सॅमने त्या ऑफिसरला बजावले. '' मी स्टीव्हनची फाईल बघीतली आहे... त्याचा आधीचा रेकॉर्ड काही चांगला नाही ... त्याच्या विरोधात आधी बऱ्याच गुन्ह्याच्या तक्रारी आहेत... काही सिध्द झालेल्या आणि काहींबाबतीत अजुनही केसेस सुरु होत्या.. यावरुन तरी असं वाटतं की आपण जी केस हाताळत आहोत ती एखादी आपआपसातील वितूष्ट किंवा रिव्हेंजसारखी केस असु शकते.'' सॅम पुन्हा मुळ मुद्यावर येत म्हणाला. '' खुन्याने जर गुन्हेगारालाच मारले असेल तर... '' बाजूच्या ऑफिसरने पुन्हा गंमत करण्यासाठी आपले तोंड उघडले तर सॅमने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. '' नाही म्हणजे तसे जर असेल तर ... बरंच आहेना ... तो आपलंच काम करतो आहे ... म्हणजे जे कदाचीत आपणही करु शकत नाही तो ते करतो आहे '' तो गंमत करणारा ऑफिसर आता जरा सांभाळून बोलला. '' हे बघा ऑफिसर ... आपलं काम लोकांची सेवा करणे आणि त्यांचं संरक्षण करणे आहे'' '' गुन्हेगाराचंही?'' त्या ऑफिसरने कडवटपणे विचारले. यावर सॅम काहीच बोलला नाही किंबहुना यावर उत्तर देण्यासाठी कदाचित त्याच्याजवळ शब्द नसावेत. पॉल रॉबर्टस, काळा रंग, पंचविशीच्या आसपास, उंची पाऊने सहा फुटाच्या आसपास, कुरुळे केस, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. त्याची बेडरुम म्हणजे सगळीकडे अस्तव्यस्त पडलेला पसारा होता. वर्तमान पत्रे, मॅगेझीन्स, व्हिस्कीच्या रिकाम्या बॉटल्स इकडे तिकडे विखुरलेल्या. मॅगेझीन्सच्या कव्हर्सवर बायकांची नग्न चित्रे होती. आणि बेडरुमच्या भिंतीवर सर्वत्र त्याच्या आवडत्या हिरोईन्सचे अर्धनग्न, नग्न चित्रे चिटकविलेली होती. स्टीव्हनच्या आणि याच्या बेडरुममध्ये तसं बरच साम्य होतं. फरक एवढाच होता की याच्या रुमला दोन खिडक्या होत्या पण त्या आतून बंद होत्या. आणि बंद होत्या त्या रुम एसी असल्यामुळे नव्हे तर बहूधा खबरदारी म्हणून असाव्यात. तो आपल्या जाड, मऊ, रेशमी गादीवर तशीच जाड, मऊ, रेशमी उशी छातीशी घेवून वारंवार आपला कड बदलवित होता. कदाचित तो डिस्टर्ब्ड असावा असं जाणवत होतं. बराच वेळ त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. शेवटी कड बदलूनही झोप येत नसल्याने तो उठून बेडच्या खाली उतरला. पायात स्लीपर चढवली. काय करावं? ... असा विचार करीत पॉल किचनकडे गेला. किचनमध्ये जावून किचनचा लाईट लावला. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली. एका दमात त्याने मोठमोठे घोट घेत जवळ जवळ सगळी बॉटलच रिकामी केली. आणि मग ती बॉटल तशीच हातात घेवून तो किचनमधून बाहेर सरळ हॉलमध्ये आला. हॉलमध्ये पुर्ण अंधार होता. पॉल अंधारातच एका खुर्चीवर बसला. चला थोडा वेळ टिव्ही तरी बघुया... असा विचार करीत त्याने बाजूचं रिमोट घेवून टिव्ही सुरु केला. जसा त्याने टीव्ही सुरु केला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, डोळे विस्फारले गेले, चेहऱ्यावर घाम फुटला आणि त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याच्या समोर नुकताच सुरु झालेल्या टीव्हीच्या काचावर एक रक्ताचा ओघोळ वरुन खालपर्यंत आला होता. घाई घाईने तो उठून उभा राहाला, गोंधळला आणि त्याने तश्याच घाबरलेल्या स्थीतीत खोलीतला लाईट लावला. खोलीत तर कुणीच नव्हते... त्याने टीव्हीकडे बघीतले. टिव्हीच्यावर एक मासाचा तोडलेला लोळा होता आणि त्यातूनच रक्त खाली ओघळत होतं. अडत अडखळत तो टेलीफोनजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने एक नंबर डायल केला. बाहेर कॉलनीतल्या प्लेग्राऊंडवर लहान मुलं खेळत होती. तेवढ्यात सायरन वाजवित एक पोलीसांची गाडी तिथून बाजूच्या रस्त्यावरुन धावू लागली. सायरनचा कर्कश्य आवाज एकताच काही खेळणारी छोटी मुलं कावरीबावरी होवून आपआपल्या पालकांकडे धावू लागली. पोलिसाची गाडी आली तशी वेगात तिथून निघून गेली आणि समोर एका वळणावर उजवीकडे वळली. पोलिसांची गाडी सायरन वाजवित एका घराजवळ येवून थांबली. गाडी थांबल्याबरोबर डिटेक्टीव्ह सॅमच्या नेतृत्वाखाली एक पोलिसांची तुकडी गाडीतून उतरुन त्या धराकडे धावली. '' जरा घराच्या आजुबाजुबाजुलासुध्दा बघा'' सॅमने त्यातल्या दोघा साथीदारांना बजावले. ते दोघे बाकी साथीदारांना सोडून एकजण घराच्या डाव्या बाजुने आणि दुसरा उजव्या बाजूने पहाणी करीत घराच्या मागच्या बाजूला धावत जावू लागले. बाकीचे पोलिस आणि सॅम धावत येवून घराच्या दरवाजाजवळ जमले. त्यातल्या एकाने, जेफने घराच्या बेलचं बटन दाबलं. बेल तर वाजत होती पण आत काहीच चाहूल दिसत नव्हती. थोडा वेळ वाट पाहून जेफने पुन्हा बेल वाजवली, या वेळेला दारही ठोठावले. '' हॅलो ... दार उघडा'' एका जणाने दार ठोठावत आत आवाज दिला. पण आत काहीच चाहूल नव्हती. शेवटी चिडून सॅम म्हणाला, '' दार तोडा '' जेफ आणि एकदोन जणं मिळून दार अक्षरश: बडवित होते. '' अरे इथे धक्का मारा'' '' नाही आतली कडी इथे असेल.. इथे जोराने धक्का मारा'' '' अजून जोराने'' '' सगळेजण नुसते ढकलू नका ... कोणीतरी आम्हाला गार्ड करा'' सगळ्या गडबडीत शेवटी एकदाचे दार त्यांनी धक्के मारुन मारुन तोडले. दार तोडून उघडताच सगळी टीम घरात घूसली. डिटेक्टीव्ह सॅम हातात बंदूक घेवून काळजीपुर्वक आत जावू लागले. त्यांच्या पाठोपाठ हातात बंदूक घेवून बाकीचे एकमेकांना गार्ड करीत आत घुसू लागले. आपआपली बंदूक रोखत ते सगळेजण पटापट घरात सर्वत्र पसरण्यासाठी सरसावले. पण हॉलमध्येच एक विदारक दृष्य त्यांच्यासाठी वाढून ठेवले होते. जसे त्यांनी ते दृष्य बघितले, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्यांच्यासमोर सोफ्यावर पॉल पडलेला होता, गळा कापलेला, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या, डोळे बाहेर आलेले, आणि डोकं एका बाजूला लूढकलेलं. त्याचाही खुन अगदी त्याच पध्दतीने झालेला होता. वस्तू अस्ताव्यस्त विखूरलेल्या होत्या त्यावरुन असे जाणवत होते की त्यानेही मरायच्या आधी बरीच तडफड केली असली पाहिजे. '' घरात इतरत्र शोधा '' सॅमने आदेश दिला. टीममधले तिनचारजण घरात खुन्याचा शोध घेण्यासाठी इतरत्र विखुरले. '' बेडरुममधेही शोधा '' सॅमने ते जात असतांना त्यांना बजावले. डिटेक्टीव्ह सॅमने खोलीत चहोवार एक नजर फिरवली. सॅमला टिव्हीच्या स्क्रिनवर ओघळलेला रक्ताचा ओघोळ आणि वर असलेला मांसाचा तूकडा दिसला. सॅमने इन्व्हेस्टीगेशन टीम मधल्या एकाला खुनावले. तो लागलीच टिव्हीजवळ जावून तेथील पुरावे गोळा करायला लागला. नंतर सॅमने हॉलच्या खिडक्यांकडे बघीतले. यावेळीही सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. अचानक सोफ्यावर पडलेल्या कशाने तरी सॅमचं लक्ष आकर्षीत केलं गेलं. तो तिथे गेला, जे होतं ते उचलून बघितलं. तो एक केसांचा गुच्छ होता, सोफ्यावर बॉडीच्या शेजारी पडलेला. ते सगळेजण कधी आश्चर्याने त्या केसाच्या गुच्छाकडे पाहत तर कधी एकमेकांकडे. इन्व्हेस्टीगेशन टीममधल्या एकजणाने तो केसांचा गुच्छ घेवून प्लास्टीकच्या पिशवित पुढच्या तपासासाठी सिलबंद केला. जेफ कावरा बावरा होवून कधी त्या केसांच्या गुच्छाकडे पाहत होता तर कधी टिव्हीवरच्या मांसाच्या तुकड्याकडे. त्याच्या डोक्यात... त्याच्याच काय बाकीच्यांच्याही डोक्यात एकाच वेळी बरेच प्रश्न घोंगावत होते. पण विचारणार कुणाला ? डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचा एक साथीदार कॅफेमधे बसलेले होते. त्यांच्यात काहीतरी गहन चर्चा चाललेली होती. त्यांच्या हावभावांवरुन तरी वाटत होते की ते एवढ्यात झालेल्या दोन खुनांबद्दलच चर्चा करीत असावेत. मधे मधे ते दोघेही कॉफीचे छोटे छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमध्ये ठेवलेल्या टिव्हीवर सुरु असलेल्या बातम्यांनी त्यांचे लक्ष आकर्षीत केले. टीव्ही न्यूज रिडर सांगत होता - खुन्याने मारलेल्या अजुन एका ईसमाची बॉडी आज पोलिसांना सापडली. ज्या तऱ्हने आणि जेवढ्या बर्बरतेने पहिला खुन झाला होता त्याच बर्बरतेने किंबहूना जास्त .. याही इसमाला खुन्याने मारले होते. यावरुन कुणीही याच निष्कर्शाप्रत पोहोचेल की या शहरात एक खुला सिरीयल किलर फिरतो आहे... आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही बॉडीज अशा खोलीत सापडल्या की ज्या आतून बंद केलेल्या होत्या. पोलिसांना याबाबत विचारल्यास त्यांनी या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला आहे. आजुबाजुचे लोक अजुनही धक्यातून सावरलेले नाहीत. आणि शहरात तर सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. काही लोकांच्या माहितीनुसार ज्यांचा खुन झालेला आहे त्या दोघांच्याही नावावर गंभीर क्रिमीनल गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असा एक निश्कर्ष काढला जावू शकतो की तो खुनी अशाच गुन्हेगार लोकांना मारु इच्छीतो. '' जर खुन्याला मिडीया अटेंशन पाहिजे होते तर तो त्याच्या उद्देशात सफल झालेला आहे'' डिटेक्टीव्ह सॅम आपल्या साथीदाराला म्हणाला. पण त्याच्या समोर बसलेला अधिकारी काहीच बोलला नाही कारण अजूनही तो बातम्या एकण्यात गुंग होता. शहरात सगळीकडे दशहत पसरली होती . एक सिरीयल किलर शहरात मोकळा फिरतो आहे. पुलिस अजूनही त्याला पकडण्यात यशस्वी झाले नव्हते. तो अजून किती जणांना मारणार ? ...त्याचे पुढचे सावज कोण - कोण असणार ? आणि तो लोकांना का मारतो आहे ? काही कारण की विनाकारण ? उत्तरं कुणाजवळच नव्हती . रोनाल्ड पार्कर साधारण पंचविशीतला, स्टायलीस्ट, रुबाबदार, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तो राहून राहून अस्वस्थतेने आपला कड बदलवित होता. त्यावरुन असे दिसत होते की त्याचं डोकं काही ठिकाणावर नसावं. थोडावेळ कड बदलवून झोपण्याचा प्रयत्न करुनही झोप येत नाही असे पाहून तो बेडमधून उठून बाहेर आला, आजूबाजूला एक नजर फिरविली, आणि पुन्हा बेडवर बसला. त्याने बेडच्या बाजूला ठेवलेले एक मासिक उचलले आणि ते उघडून पुन्हा बेडवर आडवा झाला. तो त्या मासीकाची नग्न चित्रं असलेली पानं चाळू लागला. सेक्स इज द बेस्ट वे टू डायव्हर्ट यूवर माईंन्ड ... त्याने विचार केला. अचानक 'धप्प' असा काहीतरी आवाज त्याला दुसऱ्या खोलीतून ऐकायला आला. त्याने दचकुन उठून बसला, मासिक बाजूला ठेवले आणि आणि तशाच भितीयूक्त गोंधळलेल्या स्थीतीत तो बेडवरुन खाली उतरला. कशाचा हा आवाज असावा... पुर्वी कधी तर कधी असा आवाज आला नव्हता.. पण आवाज आल्यावर आपण एवढे का दचकलो... किंवा होवू शकते की आज आपली मनस्थीती आधीच चांगली नसल्यामुळे तसं झालं असावं .... हळू हळू चाहूल घेत तो बेडरुमच्या दरवाजाजवळ गेला. दरवाज्याची कडी उघडली आणि हळूच दरवाजा तिरका करुन त्याने बाहेर डोकावून पाहिले. सर्व घराची चाहूल घेतल्यानंतर रोनाल्डने हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमधे गडद अंधार होता. हॉलमधला लाईट लावून त्याने भितभितच चहूकडे एक नजर फिरवली. पण कहीच तर नाही ... सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे... त्याने पुन्हा लाईट बंद केला आणि किचनकडे निघाला. किचनमधेही अंधार होता. तिथला लाईट लावून त्याने चहूकडे एक नजर फिरवली. आता बऱ्यापैकी त्याची भिती नाहिशी झालेली दिसत होती. कुठे काहीच तर नाही ... आपण उगीच मुर्खासारखं घाबरलो... तो परत जाण्यासाठी वळणार तोच किचनच्या सिंकमधे कसल्यातरी गोष्टीने त्याचं लक्ष आकर्षित केलं. त्याचे डोळे आश्चर्याने आणि भितीने विस्फारलेले होते. एका क्षणात एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. हातापायात कंप सूटला होता. त्याच्या समोर सिंकमध्ये रक्ताळलेला एक मांसाचा तुकडा पडला होता. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिथून धूम ठोकली होती. काय करावे त्याला काही कळत नव्हते. गोंधळलेल्या स्थितीत सरळ बेडरुममध्ये जावून त्याने आतून कडी लावून घेतली. डिटेक्टीव सॅम गोल्फ खेळत होता. रोजच्या कटकटीतून आणि ताण तणावातून हा त्याला विरंगुळा होता. त्याने एक जोराचा शॉट मारल्यानंतर बॉल छिद्राच्या जेमतेम सहा फुटाच्या अंतरावर घरंगळत थांबला. तो बॉलजवळ गेला. जमीनीच्या चढाचा आणि उताराचा अंदाज घेतला. बॉलवरुन टी फिरवुन किती जोरात मारावी लागेल याचा अंदाज घेतला. आणि काळजीपुर्वक, बरोबर दिशेने, बरोबर जोर लावून त्याने एक हलकेच शॉट मारला आणि बॉल छिद्राकडे घरंगळत जावून बरोबर छिद्रात सामावला. डिटेक्टीवच्या चेहऱ्यावर एक विजयी आनंद पसरला. एवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. डिटेक्टीव्हने डिस्प्ले बघीतला. पण फोन ओळखीचा वाटत नव्हता. त्याने एक बटन दाबून फोन अटेंड केला, ''यस'' '' डिटेक्टीव बेकर डीयर'' तिकडून आवाज आला. '' हं बोला'' सॅम दुसऱ्या गेमची तयारी करीत म्हणाला. '' माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आता चालू असलेल्या सिरीयल किलर केसचे इंचार्च आहात... बरोबर?'' तिकडून बेकरने विचारले. . '' हो '' सॅमने सिरीयल किलरचा उल्लेख होताच पुढच्या गेमचा विचार सोडून बेकर अजून काय बोलतो ते लक्ष देवून ऐकण्याला प्राधान्य दिले. '' तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ... म्हणजे तुम्ही फ्री असाल ...तर तुम्ही इकडे येवू शकता का?... माझ्याकडे या केस संदर्भात काही महत्वाची माहिती आहे.... कदाचीत तुमच्या उपयोगी पडेल'' '' हो ... चालेल'' बाजूने जाणाऱ्या पोराला सामान उचलण्याचा इशारा करीत सॅम म्हणाला. पोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव सॅम डिटेक्टीव बेकरच्या समोर बसला होता. डिटेक्टीव बेकर या पोलिस स्टेशनचा इंचार्ज होता. त्याचा फोन आल्यानंतर गोल्फचा पुढचा गेम खेळण्याची सॅमची इच्छाच नाहीशी झाली होती. सामान गुंडाळून तो ताबडतोब तयारी करुन आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी सरळ इकडे निघून आला होता. त्यांचं हाय हॅलो या सगळ्या फॉरमॅलिटीज पुर्ण झाल्यानंतर आता डिटेक्टीव बेकरकडे त्याच्या केससंदर्भात काय माहिती आहे हे एकण्यासाठी तो त्याच्या समोर बसला होता. डिटेक्टीव बेकरने सॅमला बोलण्याच्या आधी एक मोठा पॉज घेतला. डिटेक्टीव सॅम त्याच्या चेहऱ्यावर जरी दिसू देत नव्हता तरी त्याची उत्सुकता आधीच शिगेला जावून पोहोचली होती. डिटेक्टीव्ह बेकरने सांगण्यास सुरवात केली - '' काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक केस आली होती........ .... एक सुंदर शांत टाऊन. टाऊनमध्ये हिरवंगार गवत आणि हिरवीगार झाडे चहूकडे पसरलेली होती. आणि त्या हिरवळीत रात्री तारे जसे आकाशांत चमकतात तशी पुंजक्यासारखी तुरळक तुरळक शांत घरं इकडे तिकडे विखुरलेली होती. त्याच हिरवळीत गावाच्या अगदी मधे एक पुंजका म्हणजे एक जुनी कॉलेजची बिल्डींग होती. कॉलजमध्ये व्हरंड्यात मुलांची गर्दी जमली होती. कदाचित ब्रेक टाईम असावा. काही मुलं घोळक्यात गप्पा मारत होते तर काही जण इकडे तिकडे मिरवत होते. जॉन कार्टर साधारण बाविशीतला, स्मार्ट हॅंन्डसम कॉलेजचा विद्यार्थी आणि त्याचा मित्र ऍथोनी क्लार्क. दोघे सोबत सोबत बाकीच्या कॉलेच्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून वाट काढीत चालले होते. '' ऍंथोनी चल बरं डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये जावून बसू.. बऱ्याच दिवसांचा आपण त्याचा क्लास अटेंड केला नाही '' जॉन म्हणाला. '' कुणाच्या? डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये? ...तुला आज बरं बिरं तर आहे ना?..'' ऍन्थोनीने आश्चर्याने विचारले. '' अरे नाही ... म्हणजे अजून तो आहे का सोडून गेला ते जावून बघूया '' जॉन म्हणाला. दोघंही एकमेकांना टाळी देत कदाचीत आधीचा एखादा किस्सा आठवत जोराने हसले. मुलांच्या घोळक्यातून चालता चालता अचानक जॉनने ऍन्थोनीला कोपर मारीत बाजूने जाणाऱ्या एका मुलाकडे त्याचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. ऍन्थोनीने प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले. जॉन हळू आवाजात त्याच्या कानाशी पुटपुटला '' हाच तो पोरगा ... जो आपल्या होस्टेलमध्ये आजकाल चोऱ्या करतो आहे'' तोपर्यंत तो पोरगा त्यांना क्रॉस होवून गेला होता. ऍन्थोनीने मागे वळून बघितले. होस्टेलमध्ये ऐन्थोनीच्याही काही वस्तू एवढ्यात चोरी गेल्या होत्या. '' तुला कसं काय माहित?'' ऍन्थोनीने विचारले. '' त्याच्याकडे बघ जरा... कसा भामटा वाटतो तो'' जॉन म्हणाला. '' अरे नुसतं वाटून काय उपयोग ... आपल्याला काही पुरावा तर लागेल ना'' ऍन्थोनी म्हणाला. '' मला ऍलेक्सही म्हणत होता ... रात्री बेरात्री उशीरापर्यंत भूतासारखा तो होस्टेलमध्ये फिरत असतो'' '' असं का ... तर मग चल ... साल्याला धडा शिकवू या'' '' असा की साला कायमचा याद राखेल'' '' नुसतं याद च नाही तर त्याला होस्टेलमधून आणि कॉलेजातूनही बाद करु या.'' पुन्हा दोघांनी काही तरी ठरविल्याप्रमाणे एकमेकांची जोरात टाळी घेतली आणि जोरात हसायला लागले. रात्री होस्टेलच्या व्हरंड्यात गाढ अंधार होता. व्हरंड्यातले लाईट्स एक तर कुणी चोरले असावे किंवा पोरांनी फोडले असावेत. एक काळी आकृती हळू हळू त्या व्हरंड्यात चालत होती. आणि तिथून थोड्याच अंतरावर जॉन, ऍन्थोनी आणि त्यांचे दोन मित्र एका खांबाच्या मागे लपून दबा धरुन बसले होते. त्यांनी मनाशी पक्के केले होते की आज कोणत्याही परिस्थीतीत या चोराला पकडून होस्टेलमध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवायच्या. बऱ्याच वेळापासून ते ताटकळत त्या चोराची वाट पाहत बसले होते. शेवटी ती आकृती त्यांना दिसताच त्यांचे चेहरे आनंदाने एकदम उजळून निघाले. चला इतका वेळ थांबलो...एवढी मेहनत केली ... शेवटी फळाला आली... आनंदाच्या भरात त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. '' ए शांत ... हा सगळ्यात चांगला मौका आहे साल्याला रंगे हात पकडायचा'' जॉनने सगळ्यांना बजावले. ते तिथुन लपत लपत समोर जावून एका दुसऱ्या खांबाच्या आडोशाला लपले. त्यांनी चोराला पकडण्याची पुर्ण प्लॅनींग आणि पुर्वतयारी केली होती. चौघांनी आपापसात आपापलं काम वाटून घेतलं होतं. चौघांपैकी एक मुलागा आपल्या खांद्यावर एक काळं ब्लॅंकेट सांभाळत होता. '' ए.. बघा तो तिथं थांबला...साल्याची घोंगड रपेटच करु'' जॉन हळूच म्हणाला. ती आकृती व्हरंड्यात चालता चालता एका रुमसमोर थांबली होती. '' अरे कोणाची ती रुम ?'' एकाजणाने विचारले. '' मेरीची..'' ऍन्थोनी हळू आवाजात म्हणाला. ती काळी आकृती मेरीच्या दरवाजासमोर थांबली आणि मेरीच्या दरवाजाच्या कीहोल मध्ये आपल्या जवळील चाबी घालून फिरवू लागली. '' ए त्याच्याजवळ चाबीपण आहे'' कुणीतरी कुजबुजला. '' मास्टर की दिसते'' कुणीतरी म्हणालं. '' किंवा डूप्लीकेट करुन घेतली असणार साल्याने'' '' आता तर तो बिलकुल मुकरु शकणार नाही... आपण त्याला आता रेड हॅंन्डेड पकडू शकतो'' जॉन म्हणाला. जॉन आणि ऍन्थोनीने मागे पाहून त्यांच्या दोघा मित्रांना इशारा केला. '' चला ... ही एकदम सही वेळ आहे'' ऍन्थोनी म्हणाला. ती आकृती आता कुलूप उघडण्याचा प्रयत्न करु लागली. सगळ्यांनी एकदम त्या काळ्या आकृतीवर धावा बोलला. ऍन्थोनीने त्या आकृतीच्या अंगावर त्याच्या मित्राच्या खांद्यावरचे ब्लॅंकेट टाकले आणि जॉनने त्या आकृतीला ब्लॅकेटसहित घट्ट आवळून पकडले. '' आधी चांगला झोडा रे साल्याला'' कुणीतरी ओरडले. सगळेजण मिळून आता त्या चोराला लाथा बुक्याने चांगले बदडू लागले. '' कसा सापडला रे.. चोरा'' '' ए साल्या ... दाखव आता कुठं लपवला आहेस तू होस्टेलचा चोरलेला सगळा माल'' ब्लॅंकेटच्या आतून 'आं ऊं' असा दबलेला आवाज येवू लागला. अचानक समोरचा दरवाजा उघडला आणि मेरी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिला तिच्या खोलीसमोर चाललेल्या गोंधळाची चाहूल लागली असावी. खोलीतल्या लाईटचा उजेड आता त्या ब्लॅंकेटमध्ये पकडलेल्या चोराच्या अंगावर पडला. '' ए काय चाललय इथे'' मेरी घाबरलेल्या आवस्थेत हिंमतीने बोलण्याचा आव आणीत म्हणाली,. '' आम्ही चोराला पकडलं आहे'' ऍन्थोनी म्हणाला. '' हा तुझं दार डूप्लीकेट चाबीने उघडत होता'' जॉन म्हणाला. त्या चोराला ब्लॅंकेटसकट पकडलेलं असतांना जॉनला त्या चोराच्या अंगावर काहीतरी वेगळच जाणवलं. गोंधळलेल्या स्थीतीत त्याने ब्लॅंकेटच्या आतून त्याचे हात घातले. जॉनने हात आत घातल्यामुळे त्याची त्या आकृतीवरची पकड ढीली झाली आणि ती आकृती ब्लॅंकेटमधून बाहेर आली. '' ओ माय गॉड नॅन्सी! '' मेरी ओरडली. नॅन्सी कोलीन त्यांच्याच क्लासमधली एक सुंदर लाघवी विद्यार्थीनी होती. ती ब्लॅकेटमधून बाहेर आली होती आणि अजूनही गोंधळलेल्या स्थीतीत जॉनने तिचे दोन्ही उरोज आपल्या हातात पक्के पकडलेले होते. तिने स्वत:ला सोडवून घेतले आणि एक जोरात जॉनच्या कानाखाली ठेवून दिली. जॉनला काय बोलावे काही कळत नव्हते तो म्हणाला, '' आय ऍम सॉरी .. आय ऍम रियली सॉरी '' '' वुई आर सॉरी ...'' ऍन्थोनी म्हणाला. '' पण इतक्या रात्री तु इथे काय करीत आहेस '' मेरी नॅन्सीजवळ जात म्हणाली. '' इडीयट ... आय वॉज ट्राईंग टू सरप्राईज यू... तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते मी'' नॅन्सी तिच्यावर चिडून म्हणाली. '' ओह ... थॅंक यू ... आय मीन सॉरी ... आय मीन आर यू ओके?'' मेरी गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाली. मेरीने नॅन्सीला रुममध्ये नेले. आणि जॉन पुन्हा माफी मागण्यासाठी रुममध्ये जावू लागला तसे दार धाडकन त्याच्या तोंडावर बंद झाले. क्लास सुरु होता. क्लासमध्ये जॉन आणि त्याचे दोन दोस्त साथीदार जवळ जवळ बसले होते. जॉन सारखी चूळबूळ चालली होती आणि तो बेचैन वाटत होता. त्याचं लक्ष क्लासमध्ये नव्हतं. त्याने एकदा क्लासमध्ये सभोवार नजर फिरवली, आणि विषेशत: नॅन्सीकडे बघितलं. पण तिचं लक्ष त्याच्याकडे कुठं होतं?. ती आपली नोट्स घेण्यात मग्न होती. काल रात्रीचा प्रसंग आठवून जॉनला पुन्हा अपराध्यासारखं वाटलं. तिला बिचारीला काय वाटलं असेल... एवढ्या सगळ्या मित्रांच्या समोर आणि मेरीच्या समोर आपण ... नाही आपण असं करायला नको होतं... पण आपण तर चुकीने असं केलं... आपल्याला काय माहित की तो चोर नसून नॅन्सी आहे... नाही आपल्याला तिची माफी मागायला हवी... पण काल तर आपण तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला... तर तिने धाडकण रागाने दार बंद केलं होतं... नाही आपल्याला ती जोपर्यंत माफ करणार नाही तोपर्यंत माफी मागतच राहावं लागणार... त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. तेवढ्यात तासाची घंटा झाली. मधला ब्रेक होता. चला हा चांगला चान्स आहे... तिला माफी मागण्याचा... तो उठून तिच्याजवळ जाणार इतक्यात ती मुलींच्या घोळक्यात नाहीशी झाली होती. ब्रेकमुळे कॉलेजच्या व्हरंड्यात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. छोटे छोटे समूह करुन गप्पा मारत विद्यार्थी सगळीकडे विखूरलेले होते. आणि त्या समुहातून रस्ता काढत जॉन आणि त्याचे दोन मित्र त्या गर्दीत नॅन्सीला शोधत होते. कुठे गेली?... आता तर पोरींच्या घोळक्यात वर्गाच्या बाहेर जातांना आपल्याला दिसली होती... ते तिघे जण इकडे तिकडे पाहत तिला शोधायला लागले. शेवटी त्यांना एकाजागी कोपऱ्यात एका समुहात आपल्या मित्रांसोबत गप्पा करतांना ती दिसली. ''चला रे...'' जॉन आपल्या मित्रांना म्हणाला. '' आम्ही कशाला ... आम्ही इथेच थांबतो... तुच जा'' त्याच्या मित्रापैकी एकजण म्हणाला. '' अबे... सोबत तर चला'' जॉनने त्यांना जवळ जवळ पकडूनच नॅन्सीजवळ नेले. जेव्हा जॉन आणि त्याचे मित्र तिच्या जवळ गेले तेव्हा तीचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. ती आपली गप्पांत रंगून गेली होती. नॅन्सीने गप्पा करता करता एक नजर त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जॉनने तिच्या अजून जवळ जावून तिचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला. पण ती वारंवार दुर्लक्ष करीत होती. दुरुन व्हरंड्यातून जाता जात ऍन्थोनी जॉनकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि अंगठा दाखवून त्याने त्याला बेस्ट लक विश केलं. '' नॅन्सी ... आय ऍम सॉरी'' जॉनला एवढ्या मुला मुलींच्या गर्दीत लाजही वाटत होती पण तो हिम्मत करुन म्हणाला. नॅन्सीने एक कॅजूअल नजर त्याच्यावर टाकली. जॉनचा उडालेला गोंधळ पाहून त्याच्या मित्राने पुढची सुत्र हाती घेतली. '' ऍक्च्यूअली आम्ही एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो'' तो म्हणाला. '' हो ना ... तो रोज होस्टेलमध्ये चोऱ्या करत होता..'' दुसरा मित्र म्हणाला. जॉन आता कसाबसा सावरला होता. त्याने पुन्हा हिम्मत करुन आपले पालूपद सुरु केले, '' नॅन्सी ... आय ऍम सॉरी ... आय रियली डीडन्ट मीन इट... मी तर त्या चोराला पकडण्याचा ...'' जॉन वेगवेगळे हावभाव करुन तिला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. तो काय बोलत होता आणि काय हावभाव करीत होता त्याचे त्याला कळत नव्हते. शेवटी एका हावभावाच्या पोजीशनमध्ये तो थांबला. जेव्हा तो थांबला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जरी स्पर्ष करीत नसले तरी त्याचे दोन्ही हात पुन्हा तिच्या उरोजांच्या वर होते. नॅन्सीच्याही ते लक्षात आले. त्याने पटकन आपले हात मागे घेतले. तिने रागाने एक दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला आणि पुन्हा एक जोरात त्याच्या कानाखाली लगावली. '' डांबरट'' ती चिडून म्हणाली. जॉन पुन्हा सावरुन काही बोलण्याच्या आत ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली होती. जेव्हा तो भानावर आला ती दूर निघून गेली होती आणि जॉन आपला गाल चोळीत उभा होता. संध्याकाळची वेळ होती. आपली शॉपींगची भरलेली बॅग सांभाळत नॅन्सी फुटपाथवरुन चालली होती. तसं आता घेण्यासारखं विषेश काही उरलं नव्हतं. फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या होत्या. त्या घेतल्या की मग घरी परत जायचं ... त्या राहिलेल्या एकदोन वस्तू घेवून जेव्हा ती परत जाण्यासाठी निघाली तोपर्यंत जवळ जवळ अंधारायला आलं होतं आणि रस्त्यावरही फारच तुरळक लोक होते. चालता चालता नॅन्सीच्या अचानक लक्षात आले की बऱ्याच वेळेपासून कुणीतरी तिचा पाठलाग करीत आहे. तिची मागे वळून पाहण्याची हिंम्मत होईना. ती तशीच चालत राहाली. तरीही पाठलाग सुरुच असल्याची तिला जाणीव झाली. आता ती पुरती घाबरली होती. मागे वळून न पाहता ती तशीच जोराने चालायला लागली. तेवढ्यात तिला मागून आवाज आला, '' नॅन्सी '' ती एक क्षण थबकली आणि पुन्हा चालायला लागली. मागून पुन्हा आवाज आला, '' नॅन्सी ...''. आवाजावरुन तरी पाठलाग करणाऱ्याचा काही गैर हेतू वाटत नव्हता. नॅन्सीने चालता चालताच मागे वळून बघितले. मागे जॉनला पाहाताच ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर त्रासीक भाव उमटले. हा इथेही.... आता तर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे... तो एक मोठा फुलाचा गुच्छ घेवून तिच्या जवळ येत होता. ते पाहून तिला एक क्षण वाटलेही की कपाळावर हात मारुन घ्यावा. ती तो जवळ येईपर्यंत थांबली. '' का तु माझा सारखा पाठलाग करतो आहेस?'' नॅन्सी त्रासीक चेहऱ्याने आणि रागाने म्हणाली. '' कृपा कर आणि माझा पाठलाग करणं थांबव '' ती रागाने हात जोडून त्याच्याकडून पिच्छा सोडवून घेण्याच्या अविर्भावात म्हणाली. रागाने ती गर्रकन वळली आणि पुन्हा पुढे तरातरा चालू लागली. जॉनही थोडं अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालू लागला. पुन्हा जॉन पाठलाग करतो आहे हे लक्षात येताच ती रागाने थांबली. जॉनने आपली हिम्मत एकवटून तो फुलाचा गुच्छ तिच्या समोर धरला आणि म्हणाला, '' आय ऍम सॉरी...'' नॅन्सी रागाने नुसती गुरगुरली. तिला काय बोलावे काही कळत नव्हते. त्यालाही पुढे अजुन काय बोलावे काही सुचत नव्हते. '' आय स्वीअर, आय मीन इट'' तो गळ्याला हात लावून म्हणाला. नॅन्सी रागात तर होतीच, तीने झटक्यात आपल्या चेहऱ्यावर येणारी केसाची बट मागे सारली. जॉनला वाटले की ती पुन्हा एक जोरदार चपराक आपल्या गालात ठेवून देणार. भीतीने डोळे बंद करुन पटकन त्याने आपला चेहरा मागे घेतला. तिच्या ते लक्षात आले आणि ती आपलं हसू आवरु शकली नाही. त्याची ती घाबरलेली आणि गोंधळलेली परीस्थीती पाहून ती एकदम खळखळून हसायला लागली. तिचा राग केव्हाच मावळला होता. जॉनने डोळे उघडून बघितले. तोपर्यंत ती पुन्हा समोर चालू लागली होती. थोडं अंतर चालल्यानंतर एका वळणावर वळण्यापुर्वी नॅन्सी थांबली, तीने मागे वळून जॉनकडे एक दृष्टीक्षेप टाकला. एक खोडकर हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. गोंधळलेल्या स्थीतीत उभा असलेला जॉनही तिच्याकडे पाहून मंद मंद हसला. ती पुन्हा पुढे चालत त्या वळणावर वळून नाहीशी झाली. ती नाहीशी झाली होती तरी जॉन उभा राहून तिकडे मंत्रमुग्ध होवून पाहत होता. त्याला राहून राहून तिचं ते हास्य आठवत होतं. ती खरोखर हसली की आपल्याला नुसता भास झाला... नाही नाही भास कसा होणार... ती हसली हे तेवढं खरं... ती हसली म्हणजे तिने आपल्याला माफ केले असं आपण समजायचं का... हो तसं समजायला काही हरकत नाही... पण तीचे ते हसणे म्हणजे साधेसुधे हसणे नव्हते... तिच्या हसण्यात अजुनही काहीतरी गुढ अर्थ दडलेला होता... काय होता तो अर्थ?... जॉन तो अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करु लागला. आणि जसजसा त्याला तो अर्थ उलगडायला लागला त्याच्या चेहऱ्यावरही तेच तसेच हास्य पसरायला लागले होते. हळू हळू जॉन आणि नॅन्सी जवळ येत गेले. त्यांच्या ह्रदयात त्यांच्या नकळत प्रेमांकुर फुटायला लागले होते. भांडणातूनही प्रेम निर्माण होवू शकतं हे त्यांना पटतच नव्हतं तर ते प्रत्यक्ष अनुभवत होते. कॉलेजात एखादा रिकामा तास असला की ते भेटायचे. कॉलेज संपल्यावर भेटायचे. लायब्रीत अभ्यास करण्याच्या निमित्ताने भेटायचे. भेटण्याच्या एकही मौका ते दवडू इच्छीत नव्हते. पण सगळं लपून लपून चालायचं. त्यांनी त्यांचं प्रेम आत्ता पर्यंत कुणाच्याही लक्षात येवू दिलं नव्हतं. पण प्रेमच ते कधी कुणापासून लपतं का? किंवा एक वेळ अशी येते की ते प्रेमीच कुणाला माहित होईल किंवा कुणाची तमा न बाळगता निर्भीडपणे वागू लागतात. लोकांना आपलं प्रेम माहित व्हावं हीही कदाचित त्यामागे त्यांची सुप्त इच्छा असावी. बरीच रात्र झाली होती. आपली पोरगी अजून कशी घरी परतली नाही म्हणून नॅन्सीचे वडील बेचैन होवून हॉलमध्ये येरझारा मारत होते. तशी त्यांनी तिला पुर्णपणे मोकळीक दिली होती. पण अशी बेजबाबदारपणे ती कधीही वागली नव्हती. कधी उशीर होणारच असला तर ती फोन करुन घरी सांगायची. पण आज तिने फोन करण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती. तिच्या वडिलांना इतक्या वर्षाच्या अनुभवावरुन कळत होते की प्रकरण काहीतरी गंभीर आहे. नॅन्सीला कुणाची वाईट संगत तर नाही लागली?... किंवा ती ड्रग्ज वैगेरे अशा प्रकारात तर नाही अडकली ना?... नाना प्रकारचे विचार तिच्या वडिलांच्या डोक्यात घोंगावत होते. तेवढ्यात बाहेर त्यांना कसली तरी चाहूल लागली. एक बाईक येवून नॅन्सीच्या घराच्या कंपाऊंडच्या गेट समोर थांबली. बाईकच्या मागच्या सिटवरुन नॅन्सी उतरली. तिने समोर बसलेल्या जॉनच्या गालाचे चूंबन घेतले आणि ती आपल्या घराच्या गेटकडे निघाली. घराच्या आतून, खिडकीतून हा सगळा प्रकार नॅन्सीचे वडील पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरुन असे दिसत होते की त्यांचा रागाने तिळपापड होत होता. आपल्या मुलीला कुणी बॉय फ्रेंड असावा हे त्यांना राग येण्याचे कारण नव्हते. तर कारण वेगळेच काहितरी होते. हॉलमध्ये सोफ्यावर नॅन्सीचे वडील बसलेले होते आणि त्यांच्या समोर खाली मान घालून नॅन्सी उभी होती. '' या ब्लडी एशीयन लोकांच्या व्यतिरिक्त तुला दुसरा कुणी नाही सापडला का? '' त्यांचा रागीट धीरगंभीर आवाज घुमला. नॅन्सीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ती तिच्या वडिलांना बोलण्यासाठी हिम्मत एकवटण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात नॅन्सीचा भाऊ जॉर्ज कोलीन्स, साधारण तिशीतला, गंभीर व्यक्तीमत्व, नेहमी कुठेतरी विचारात गुरफटलेला, राहाणीमाण गबाळं, घरातून तिथे हॉलमध्ये आला. तो नॅन्सीच्या बाजुला जावून उभा राहाला. नॅन्सीची मान अजूनही खाली होती. तिच्या भाऊ तिच्या शेजारी येवून उभा राहाल्यामुळे तिला हिम्मत आल्यासारखी वाटत होती. ती खालमानेनेच कशीतरी हिम्मत एकवटून एक एक शब्द जुळवित म्हणाली, '' तो एक चांगला मुलगा आहे, ...तुम्ही एकदा त्याला भेटा तर खरं'' '' चूप बस मुर्ख.. मला त्याला भेटायची बिलकुल इच्छा नाही... तुला या घरात राहायचे असल्यास पुन्हा तू मला त्याच्यासोबत दिसली नाही पाहिजेस... समजलं'' तिच्या वडिलाने आपला अंतिम निर्णय सुनावला. नॅन्सीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि ती तिथून आपले अश्रू लपवित धावतच आत निघून गेली. जॉर्ज सहानुभूतीने तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होता. घरात कुणाचीच वडीलांशी वाद घालण्याची हिम्मत नव्हती. जॉर्ज हिम्मत करुनच त्याच्या वडिलांना म्हणाला, '' पप्पा... तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच कठोरपणे वागता आहात.. तुम्ही कमीत कमी ती काय म्हणते ते ऐकुन घ्यायला पाहिजे.. आणि एकदा वेळ काढून त्या पोराला भेटायला काय हरकत आहे?'' '' मी तीचा वडील आहे.. तिचं भलं बुरं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या तऱ्हेने कुणाला कळू शकतं?.. आणि तुमचा शहाणपणा तुमच्या जवळच ठेवा... मला तिचे तुझ्यासारखे झालेले हाल पहायचे नाहीत.. तुही एशीयन पोरीशी लग्न केलं होतं ना? .. शेवटी काय झालं?.. तुझी सगळी संपत्ती हडप करुन तुला दिलं तिनं वाऱ्यावर सोडून'' त्याचे वडील भराभर पावलं टाकीत रागाने खोलीतून बाहेर जायला निघाले. '' पप्पा माणसाचा स्वभाव माणसामाणसात वेगळेपणा आणतो... ना की त्याचा रंग, किंवा त्याचं राष्ट्रीयत्व...'' जॉर्ज त्याच्या वडिलाच्या बाहेर जात असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाला. त्याचे वडील जाता जाता अचानक दरवाजात थांबले आणि तिकडेच तोंड ठेवून कठोर आवाजात म्हणाले, '' आणि तु तिचं बिलकुल समर्थन करायचं नाहीस.. की तिला सपोर्ट करायचा नाहीस'' जॉर्ज काही बोलायच्या आतच त्याचे वडील तिथून निघून गेले होते. इकडे नॅन्सीच्या घराच्या बाहेर अंधारात खिडकीच्या बाजूला उभं राहून एक काळी आकृती आत चाललेला हा सगळा प्रकार पाहात होती आणि ऐकत होती. क्लासमध्ये एक लेडी टीचर शिकवीत होती. वर्गातले कॉलेजचे विद्यार्थी लक्ष देवून ऐकत होते. त्या विद्यार्थ्यातच जॉन आणि नॅन्सी बसलेले होते. '' सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज... काहीही निर्णय न घेता अंधांतरी लटकण्यापेक्षा काहीतरी एक निर्णय घेणं केव्हाही योग्य..'' टीचरने आत्तापर्थंत शिकविलेल्या धड्यातल्या गोष्टीचं सार थोडक्यात सांगितलं. नॅन्सीने एक चोरटी नजर जॉनकडे टाकली. दोघांची नजरा नजर झाली. दोघंही गालातल्या गालात मंद हसले. नॅन्सीने एक नोटबुक जॉनला दाखवली. त्या नोटबुकवर मोठ्या अक्षरात लिहिले होते 'लायब्ररी'. जॉनने होकारात आपली मान डोलवली. तेवढ्यात पिरीयड बेल वाजली. आधी टिचर आणि मग मुलं हळू हळू क्लासमधून बाहेर पडू लागली. जॉन नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये गेला तेव्हा तिथे कुणीही विद्यार्थी दिसत नव्हते. त्याने नॅन्सीला शोधण्यासाठी इकडे तिकडे एक नजर फिरविली. नॅन्सी एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती किंवा किमान पुस्तक वाचत आहे असं भासवित होती. नॅन्सीने चाहूल लागताच पुस्तकातून डोकं वर काढून तिकडे बघितले. दोघांची नजरानजर होताच ती तिच्या जागेवरुन उठून पुस्तकाच्या रॅकच्या मागे जायला लागली. जॉनही तिच्या मागे मागे निघाला. एकमेकांशी काहीही न बोलता किंवा काहीही इशारा न करता सर्व काही घडत होतं. त्यांचा हा जणू रोजचाच परिपाठ असावा. नॅन्सी काही न बोलता रॅकच्या मागे जात होती खरी पण तिच्या डोक्यात विचारांच काहूर माजलं होतं. आज काय तो शेवटचा निर्णय घ्यायचा... अस किती दिवस अधांतरी लटकत रहायचं... टीचरने जे गोष्टीचं सार सांगितलं ते खरंच होतं... आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार... आर किंवा पार ... आता बास झालं... तिच्या मागे मागे जॉन रॅकच्या पलिकडे काहीही न बोलता जात होता पण त्याच्याही डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं. नेहमी नॅन्सी पिरियड झाल्यानंतर लायब्रीत भेटण्याबद्दल त्याला इशारा करायची... पण आज तिने पिरियड सुरु असतांनाच इशारा केला.. तिच्या घरी काही अघटीत तर घडलं नसावं... तिच्या चेहऱ्यावरुनही ती दुविधेत असलेली भासत होती... तिच्या घरच्यांच्या दबावाला बळी पडून ती आपल्याला सोडून तर नाही देणार.. नाना प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते. रॅकच्या मागे एका कोपऱ्यात कुणाला दिसणार नाही अशा जागी नॅन्सी पोहोचली आणि भिंतीला एक पाय लावून उभी राहत ती जॉनची वाट बघू लागली. जॉन तिच्याजवळ जावून पोहोचला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न करीत तिच्या समोरासमोर उभा राहाला. '' तर मग ठरलं... आज रात्री अकरा वाजता तयार रहा..'' नॅन्सी म्हणाली. चला म्हणजे अजुनही नॅन्सी आपल्या घरच्यांच्या प्रभावाखाली आली नव्हती... जॉनला हायसं वाटलं. पण तिने सुचविलेला हा दुसरा मार्ग कितपत योग्य होता?... ही एकदम टोकाची भूमीकातर होत नाही ना? ... '' नॅन्सी तुला नाही वाटत की आपण जरा घाईच करीत आहोत... आपण काही दिवस थांबूया ... बघूया काही बदलते का ते... '' जॉन म्हणाला. '' जॉन गोष्टी आपोआप बदलत नसतात.. आपल्याला त्या बदलाव्या लागतात.'' नॅन्सी दृढतेने म्हणाली. त्यांच्या बऱ्याच वेळ गोष्टी चालल्या. जॉनला अजुनही तिची भूमिका टोकाचीच वाटत होती. पण एका दृष्टीने तिचंही बरोबर होतं. कधी कधी तडकाफडकी निर्णय घेणं योग्य असतं. जॉन विचार करीत होता. पण आपण या निर्णयासाठी अजून पुरते तयार नाही आहोत... आपल्याला आपल्या घरच्यांचाही विचार करावा लागणार आहे... पण नाही आपणही किती दिवस असं अधांतरी लटकून रहायचं... आपल्यालाही काहीतरी दृढ निर्णय घ्यावाच लागणार... जॉन आपला पक्का निश्चय करण्याचा प्रयत्न करीत होता. तिकडे रॅकच्या मागे त्या दोघांची चर्चा चालली होती आणि इकडे दोन रॅक सोडून पलीकडेच एक आकृती लपून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होती. जॉनच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आता तो जे पाऊल उचलणार होता त्यामुळे होणाऱ्या नंतरच्या सगळ्या परिणामाचा तो विचार करु लागला. नॅन्सीसोबत लायब्ररीत झालेल्या चर्चेत त्याला दोन तिन गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या होत्या - की नॅन्सी ही वरुन जरी वाटत नसली तरी मनाने फार पक्की आणि खंबीर आहे... ती कोणत्याही परिस्थीतीत आपल्याला सोडणार नाही... किंवा तसा विचारही करणार नाही... पण आता स्वत:चीच त्याला शाश्वती वाटत नव्हती. आपणही तिच्याइतकेच मनाने खंबीर आणि पक्के आहोत का?... बिकट परिस्थीतीत आपलं तिच्याबद्दलचं प्रेम असंच कायम राहिल का?... का बिकट परिस्थीतीत ते बदलू शकतं?.. तो आता स्वत:लाच आजमावून पाहत होता. वेळच अशी आली होती की त्याचा त्यालाच विश्वास वाटेनासा झाला होता. पण नाही... आपल्याला असं ढीलं राहून चालणार नाही... आपल्याला काहीतरी एका निर्णयाप्रत पोहचावं लागणार आहे... आणि एकदा निर्णय घेतला की, त्याचे मग काहीही परिणाम होवोत, आपल्याला त्या निर्णयावर ठाम रहावं लागणार आहे... जॉनने शेवटी आपल्या मनाचा पक्का निर्णय केला. आपल्या रुमचे दार आतून बंद करुन तो आपल्याला ज्या लागतील त्या सगळ्या वस्तू एका बॅगमध्ये भरु लागला. सगळ व्यवस्थीत तर होईल ना?... आपण आपल्या घरच्यांना सगळं कळवावं का?... विचार करता करता त्याचे सगळे कपडे भरणं झालं. कपडे वैगेर बदलवून त्याने पुन्हा काही राहलं का याचा आढावा घेतला. शेवटची राहलेली एक वस्तू टाकून त्याने बॅगची चैन लावली. चेनचा विशीष्ट असा एक आवाज झाला. त्याने मग उचलून ती बॅग समोर टेबलवर ठेवली आणि तो टेबलच्या समोर असलेल्या खुर्चीवर विसावला. तो एकदोन क्षणच निवांत बसला असेल तेवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने खिशातून मोबाईल काढून त्याचा डीस्प्ले बघितला. डिस्प्लेवर 'नॅन्सी' अशी अक्षरं उमटलेली होती. तो घाईने खुर्चीवरुन उठला. मोबाईल बंद केला, बॅग उचलली आणि हळूच खोलीतून बाहेर पडला. हळूच, इकडे तिकडे बघत जॉन मुख्य दरवाजाच्या बाहेर आला आणि दार ओढून घेतलं. मग जॉगींग केल्यागत तो बॅग खांद्यावर घेवून कंपाऊंडच्या गेटजवळ आला. बाहेर रस्त्यावर त्याला एक टॅक्सी थांबलेली दिसली. समोरच्या कंपाऊंड गेटमधून बाहेर पडून त्याने ते दार लावून घेतलं. टॅक्सीजवळ जाताच त्याची टॅक्सीमध्ये मागच्या सिटवर बसून वाट पाहत असलेल्या नॅन्सीशी नजरा नजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले. पटकन जावून तो बॅगसकट नॅन्सीजवळ घूसला आणि त्याने टॅक्सीचे दार मोठा आवाज होणार नाही याची काळजी घेत हळूच ओढून घेतले. दोघंही एकमेकांच्या मिठीत शिरले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य तरळलं होतं. एव्हाना त्यांची टॅक्सी घरापासून बरीच दूर निघून वेगात धावत होती. ते दोघंही वेगाने जाणाऱ्या टॅक्सीच्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेचा आस्वाद घेत होते. पण त्यांना कुठे कल्पना होती की एक काळी आकृती मागे एका टॅक्सीत बसून त्यांचा पाठलाग करीत होती.... .... डिटेक्टीव्ह बेकर सांगता सांगता थांबला. डिटक्टीव सॅमने तो का थांबला हे जाणन्यासाठी त्याच्याकडे बघितले. डिटेक्टीव्ह बेकरने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून पाण्याचा एक घोट घेतला. तोपर्यंत ऑफिसबॉयने चहा पाणी आणले होते. डिटेक्टीव्हने ते त्याच्या समोर बसलेल्या डिटेक्टीव सॅम आणि त्याच्या सोबत आलेल्या एका ऑफिसरला द्यायला सांगीतले. ऑफिसबॉय चहापाणी घेवून आल्यामुळे बेकर जी हकिकत सांगत होता त्यात खंड पडला. सॅमला आणि त्याच्या साथीदाराला पुढील हकिकत ऐकण्यासाठी उत्सुकता लागुन राहाली होती. सगळ्यांचं चहापाणी आटोपल्यावर डिटेक्टीव्ह बेकर पुन्हा पुढे राहालेली हकीकत सांगू लागला .... ... जॉनची आणि नॅन्सीची टॅक्सी रेल्वे स्टेशनला येवून पोहोचली. दोघंही टॅक्सीतून उतरले. टॅक्सीवाल्याचे पैसे चूकवून ते आपापलं सामान घेवून तिकीट घराजवळ गेले. कुठे जायचं हे अजूनही त्यांनी ठरविलं नव्हतं. बस इथून निघून जायचं एवढंच त्यांनी ठरविलं होतं. एक ट्रेन लागलेलीच होती. जॉनने त्या ट्रेनचंच तिकिट काढलं. प्लॅटफॉर्मवर ते आपलं तिकिट घेवून आपली बोगी शोधायला लागले. बोगी शोधण्यासाठी त्यांना जास्त त्रास घ्यावा लागला नाही. मुख्य दरवाजापासून त्यांची बोगी जवळच होती. ट्रेन निघण्याची वेळ झाली म्हणून पटकन ते आपल्या बोगीत चढले. बोगीत आल्यानंतर त्यांनी आपल्या सिट्स शोधल्या. आपल्या सिटच्या जवळ आपलं सगळं सामान व्यवस्थीत ठेवलं. तेवढ्यात गाडी हलली. गाडी निघण्याची वेळ झाली होती. जशी गाडी निघाली तशी नॅन्सी जॉनला घेवून बोगीच्या दरवाजाजवळ आली. तिला जाण्याच्या पूर्वी आपल्या शहराला एकदा शेवटचं डोळे भरून बघायचं होतं. ट्रेनमध्ये नॅन्सी आणि जॉन अगदी जवळ जवळ बसले होते. त्यांना दोघांनाही एकमेकांचा आधार हवा होता. शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यानंतर त्यांना एकमेकांचाच आधार होता. आपल्या घराचे सगळे बंध, सगळे पाश तोडून ते दूर निघून चालले होते. नॅन्सीने आपलं डोकं जॉनच्या खांद्यावर ठेवलं. '' मग ... आता कसं वाटतं'' जॉनने वातावरण थोडं हलकं करण्याच्या उद्देशाने विचारले. '' एकदम ग्रेट'' नॅन्सीही खोटं खोटं हसत म्हणाली. जॉनला समजत होतं की ती वरुन जरी दाखवित नसली तरी आतून तिला घर सोडून जाण्याचं दु:ख वाटत होत. तिला आधार देण्यासाठी जॉनने तिला घट्ट पकडले. '' तुला काही आठवतं का?'' जॉनने तिला अजून घट्ट पकडीत हसत विचारले. नॅन्सीने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले. '' नाही म्हणजे एखादा प्रसंग ... जेव्हा मी तुला असे घट्ट पकडले होते'' '' मी कसा काय विसरेन तो प्रसंग... '' नॅन्सी त्याने तिला होस्टेलमधे घोंघडी टाकुन पकडले होते तो प्रसंग आठवून म्हणाली. '' आणि तु सुध्दा ... '' नॅन्सी त्याच्या गालावर हात चोळत त्याला मारलेल्या चपराकीची आठवण देत म्हणाली. दोघंही जोरजोराने हसायला लागले. दोघांचं हसणं ओसरल्यावर नॅन्सी त्याला लाडावत म्हणाली, '' आय लव्ह यू'' '' आय लव्ह यू टू'' त्याने अजून तिला जवळ ओढत प्रतिसाद दिला. दोघही करकचून एकमेकाच्या आलिंगणात बद्ध झाले. नॅन्सीने ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघीतले. बाहेर सगळा अंधारच अंधार होता. जॉनने नॅन्सीकडे बघितले. '' तुला माहित आहे की तुझी माफी मागतांना तो फुलाचा गुच्छ मी का आणला होता?'' जॉन पुन्हा तीला माफी मागण्याचा प्रसंग आठवून देत म्हणाला. तो प्रसंग तो कसा विसरु शकत होता? त्याच प्रसंगात तर त्यांच्या प्रेमाचं बिज रोवल्या गेलं होतं. '' अर्थातचं माफी जास्त इफेक्टीव व्हावी म्हणून..." नॅन्सी म्हणाली. '' नाही ... मी सांगीतलं तर तुझा विश्वास बसणार नाही..'' जॉन म्हणाला. '' मग ... का आणला होता?'' '' अग माझ्या हातांनी हावभाव करतांना पुन्हा पहिल्यासारखी काही गडबड करु नये म्हणून ... नाहीतर पुन्हा एखादी चपराक बसली असती'' जॉन म्हणाला. नॅन्सी आणि जॉन पुन्हा खळखळून हसायला लागले. त्यांचं हास्य हळू हळू निवळलं. मग थोडा वेळ अगदी निरव शांतता पसरली. फक्त रेल्वेचा आवाज येत होता. त्या शांततेत नॅन्सीला वाटलं की कुणीतरी या ट्रेनमध्ये आपला पाठलाग तर करत नसावा. नाही कसं शक्य आहे आपण पळून जाणार आहोत हे फक्त जॉन आणि तिच्या व्यतिरिक्त दुसरं कुणालाच माहित नव्हतं. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकांचा लोंढा च्या लोंढा आपआपलं सामान घेवून जात होता. कदाचीत आत्ताच कोणतीतरी ट्रेन आली असावी. तिथेच प्लॅटफार्मवर एका कोपऱ्यात स्टीव्हन, पॉल, रेनॉल्ड आणि क्रिस्तोफर ऍन्डरसन यांचा पत्याचा डाव चांगला रंगला होता. त्या चौघांपैकी क्रिस्तोफर हा, त्याच्या हावभावांवरुन आणि एकूणच त्याचा जो त्या तिघांवर प्रभाव दिसत होता त्यावरुन, त्यांचा म्होरक्या वाटत होता. क्रिस्तोफर म्हणजे एक साधारण पंचविशीतला, कसलेलं शरीर, मजबुत बांधा, उंचपुर्ण तरुण होता. " हे बघ आपली गाडी यायला अजून खुप वेळ आहे अजून कमीत कमी तीन तरी डाव होवू शकतात" क्रिस्तोफर पत्ते वाटतावाटता म्हणाला. " पॉल तु या कागदावर पॉइंट लिही " रोनॉल्डने एका हातानी पत्ते पकडीत आणि दुसऱ्या हाताने खिशातला एक कागदाचा तूकडा काढून पॉलच्या हातात देत म्हटले . " अन, लालटेन जास्त हुशारी नाही करायची" पॉलने ने स्टीव्हनला बजावले. ते स्टीव्हनला त्याच्या चश्म्यामुळे लालटेन म्हणायचे . क्रिस्तोफरचं लक्ष पत्त्ते खेळताखेळता सहजच गर्दीच्या लोंढ्याकडे गेलं . गर्दीत नॅन्सी आणि जॉन एकमेकांचा हात धरुन एखाद्या नवख्यासारखे चालत होते. त्याने नॅन्सीकडे नुसतं बघितलं आणि तो आ वासुन बघतच राहाला. " बाप, क्या माल है " त्याच्या उघडया तोंडातून अनायास निघाले. पॉल, रेनॉल्ड आणि स्टीव्हनसुध्दा आपले पत्ते सोडून बघायला लागले. त्यांचसुद्धा बघतांना उघडलेलं तोंड बंद व्हायला तयार नव्हतं. " कबूतरी कबूतराबरोबर पळून आलेली दिसते" क्रिस्तोफरचे अशा बाबतीत अनुभवी डोळे सांगत होते. ' त्या कबुतरापेक्षा मी तिच्यासोबत असायला पाहिजे होतो' पॉल म्हणाला. क्रिस्तोफरने सगळयांजवळचे पत्ते हिसकुन घेत म्हटले, " हे बघा, आता हा गेम बंद करा... आपण दुसराच एक गेम खेळूया" सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. त्यांच्या लक्षात क्रिस्तोफरच्या बोलण्यातला गुढ अर्थ आला होता. तसे ते तो गेम पहिल्यांदाच खेळत नव्हते. सगळेजण उत्साहाने एकदम उठून उभे राहाले. " अरे, बघा लक्ष ठेवा ... साले कुठं घुसतील तर मग सापडणार नाहीत " रेनॉल्ड उठता उठता म्हणाला. मग ते त्यांच्या लक्षात येणार नाही एवढं अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे जावू लागले. " ऐ , लालटेन तु जरा समोर जा पहिलेच साल्या तुला चश्म्यातून कमी दिसते ." क्रिस्तोफरने स्टीव्हनला ढकलत म्हटले. स्टीव्हन नॅन्सी आणि जॉनच्या लक्षात येणार नाही असा धावतच समोर गेला. दिवसभर इकडेतिकडे भटकण्यात कसा वेळ निघून गेला हे जॉन आणि नॅन्सीला कळलेच नाही. शेवटी संध्याकाळ झाली. जॉन आणि नॅन्सी हातात हात घालून फुटपाथवर मजेत चालत होते. समोर एकाजागी त्यांना रस्त्यावर हार्ट च्या आकाराचे हायड्रोजन भरलेले फुगे विकणारा फेरीवाला दिसला. ते त्याच्याजवळ गेले. जॉनने फुग्यांचा एक मोठा गुच्छ खरेदी करुन नॅन्सीला दिला. पकडण्याच्या धागाच्या मानाने तो गुच्छ मोठा असल्यामुळे धागा तुटला आणि तो गुच्छ आकाशाकडे झेपावला. जॉनने धावत जावून, उंच उंच उड्या मारुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो धागा त्याच्या हातात सापडला नाही. ते लाल फुगे जसे एकमेकांना ढकलत वर आकाशात जात होते. नॅन्सी ती जॉनची धावपळ आणि धडपड पाहून खळवळून हसत होती. आणि त्यांच्या बरंच मागे क्रिस्तोफर , रोनॉल्ड, स्टीव्हन आणि पॉल त्यांच्यावर कुणाच्या लक्षात येणार नाही याची खबरदारी धेत पाळत ठेवून होते. नॅन्सी आणि जॉन एकाजागी आईसक्रीम खाण्यासाठी थांबले. त्यांनी एक कोन घेतला आणि त्यातचे ते दोघेही खावू लागले. आईसक्रीम खाता खाता नॅन्सीचं लक्ष जॉनच्या चेहऱ्याकडे गेलं आणि ती खळखळून हसायला लागली. '' काय झालं?'' जॉनने विचारले. '' आरश्यात बघ'' नॅन्सी जवळच्या एका आरश्याकडे इशारा करुन म्हणाली. जॉनने आरश्यात बघीतले तर त्याच्या नाकाच्या शेंड्याला आइस्क्रीम लागलं होतं. त्यालाही त्याचं हसू येत होतं. त्याने ते पुसलं आणि एक प्रेमळ दृष्टीक्षेप नॅन्सीकडे टाकला. '' खरंच आपल्या दोघांच्याही आवडी निवडी एकदम सारख्या आहेत '' नॅन्सी म्हणाली. '' मग ... राहणारच... कारण... वुई आर द परफेक्ट मॅच"' जॉन अभिमानाने म्हणाला. आईस्क्रीम खाता खाता अचानक नॅन्सीचं लक्ष दुरवर क्रिस्तोफरकडे गेलं. त्यानं पटकन आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं. तिला त्याच्या नजरेत एक विचित्र भाव जाणवला होता. आणि त्याच्या वागण्यातही. '' जॉन मला वाटतं आता आपण इथून निघायला पाहिजे '' नॅन्सी म्हणाली आणि ती पुढे चालायला लागली. जॉन गोंधळलेल्या स्थितीत तिच्या मागे मागे जावू लागला. तिथून पुढे बराच वेळ चालल्यानंतर ते एका कपड्याच्या दुकानात घुसले. आता चांगली रात्र झाली होती. नन्सीला शंका होतीच की कदाचीत मघाचा तो तरुण त्यांचा पिछा करीत असावा. म्हणून तिने दुकानात गेल्यावर एका फटीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर क्रिस्तोफर त्याच्या अजून दोन मित्रांसोबत इकडे तिकडे पाहत चर्चा करीत असतांना दिसला. जॉन त्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात होता. '' जॉन मागे वळून पाहू नको .. मला वाटते ती पोरं आपला पाठलाग करीत आहेत.'' नॅन्सी दबक्या आवाजात जॉनला म्हणाली. '' कोण? .. कुठाय? '' जॉन गोंधळून म्हणाला. '' चल लवकर इथून निघून जावू... आपण त्यांना सापडता कामा नये'' नॅन्सीने त्याला तिथून बाहेर काढले. ते दोघंही भराभरा पावले टाकीत फुटपाथवर असलेल्या लोकांच्या गर्दीतून मार्ग काढीत पुढे जावू लागले. आपला पाठलाग होतो आहे याची आता नॅन्सी आणि जॉनला पूरेपर खात्री पटली होती. ते दोघंही घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शहर त्यांना नविन होतं. ते जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत होते. चालता चालता ते एका अश्या ठिकाणी आले की जिथे लोक जवळ जवळ नव्हतेच. तशी रात्रही बरीच झाली असल्यामुळेही कदाचित लोक नसावेत. तिने मागे वळून पाहाले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र अजूनही त्यांचा पाठलाग करीत होते. नॅन्सीचं हृदय धडधडायला लागलं. जॉनही गोंधळून गेला होता. काय करावं काही त्यांना सुचत नव्हतं. नुसते ते भराभर चालत त्यांच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते. पुढे रस्ता अजूनच अंधारलेला आणि निर्मणूष्य होता. ते दोघे आणि त्यांच्यामागे पाठलाग करणारी ती पोरं यांच्याव्यतिरिक्त त्यांना अजून दूसरं कुणीच दिसत नव्हतं. ''त्यांच्या लक्षात आलेलं दिसतं की आपण त्यांचा पाठलाग करीत आहोत'' स्टीव्हन त्याच्या साथीदारांना म्हणाला. '' येवू देकी... ते केव्हा ना केव्हा येणारंच होतं '' क्रिस्तोफर म्हणाला. '' ते खुप भ्यायलेलेसुध्दा दिसत आहेत '' पॉल म्हणाला. '' भ्यायलाच तर पाहिजेत... आता भितीमुळेच आपलं काम होणार आहे... कधी कधी भितीच माणसाला अधू बनविते'' रेनॉल्ड म्हणाला. जॉननं मागे वळून पहालं तर ते लोक भराभर त्यांच्याजवळ पोहोचत होते. '' नॅन्सी ... चल पळ...'' जॉन तिचा हात पकडत म्हणाला. एकमेकांचा हात पकडून आता ते जोरात धावायला लागले. '' आपण पोलीसात जायला पाहिजे का?'' नॅन्सीने पळता पळता विचारले. '' आता इथे कुठं आहेत पोलीस... आणि जर आपण शोधून गेलोही .. तर तेही आपल्याला शोधत असतील... आतापर्यंत तुझ्या घरच्यांनी पोलिसात रिपोर्ट दिली असेल...'' जॉन धावता धावता कसातरी बोलत होता. धावता धावता मग ते एका अंधाऱ्या अरुंद गल्लीत शिरले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्रसुध्दा त्यांच्या मागेच होते. ते जेव्हा त्या गल्लीत घुसणार एवढ्यात एक मोठा ट्रक रस्त्यावरुन त्यांच्या आणि गल्लीच्या तोंडाच्या मधून गेला. ते ट्रक पास होईपर्यंत थांबले. आणि जेव्हा ट्रक पास झाला होता तेव्हा त्यांना गल्ली रिकामी दिसत होती. ते गल्लीत घुलले. गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत धावत गेले. गल्लीच्या दुसऱ्या तोंडावर थांबले. आजूबाजूला बघितलं पण नॅन्सी आणि जॉनचा कुठेच पत्ता नव्हता. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र इकडे तिकडे पाहात एका छोट्या चौकाच्या मधे उभे राहाले. त्यांना नॅन्सी आणि जॉन कुठेही दिसत नव्हते. '' आपण सगळेजण इकडे तिकडे विखरुन त्यांना शोधू... ते आपल्या तावडीतून सुटता कामा नये'' क्रिस्तोफर म्हणाला. चौघं चार बाजूंना, चौकाच्या चार रस्त्याने जावून विखूरले आणि त्यांना शोधू लागले. नॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. कदाचित ड्रेनेज पाईप्स नवे टाकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तिथे आणून टाकले असावेत. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते काय करु शकणार होते? अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणाऱ्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता. तो त्या चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले. '' साले कुठं गायब झालेत?'' तो स्वत:शीच चिडून म्हणाला. तेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं. नक्कीच साले त्या पाईपमध्ये लपले असतील... त्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात... '' स्टीव... लवकर इकडे ये'' तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला. स्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला. जाणाऱ्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला. हॉटेलच्या एका रुममध्ये नॅन्सी आणि जॉन बेडवर एकमेकांच्या समोर बसले होते. जॉनने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा बाजूला सारल्या. '' मला तर भीतीच वाटली होती की आपण त्यांच्या तावडीत सापडू की काय'' नॅन्सी म्हणाली. ती अजूनही त्या भयानक मनस्थीतीतून बाहेर आलेली दिसत नव्हती. '' अगं मी असतांना तुला काळजी करण्याचं काय कारण?... मी तुला काहीही होवू देणार नाही... आय प्रॉमीस'' तो तिला दिलासा देत म्हणाला. तिने मंद हसत त्याच्याकडे पाहाले. खरंच तिला त्याच्या या शब्दाने किती धीर आला होता... हळूच जॉन तिच्याजवळ सरकला. तिने त्याच्या डोळ्यात बघितले. तोही तिच्या डोळ्यातून डोळे हटविण्यास तयार नव्हता. हळू हळू त्यांच्या श्वासांची गती वाढायला लागली. हळूच जॉनने तिला आपल्या बाहूपाशात ओढून घेतले. तिलाही जणू त्याच्या उबदार बाहूपाशात सुरक्षीत वाटत होते. जॉनने हळूच तिला बेडवर झोपवून तिचा चेहरा आपल्या तळहातात घेवून तो तिच्याकडे निरखुन बघू लागला. हळूच, आपसूकच त्याचे गरम ओठ आता तिच्या थरथरत्या ओठांवर विसावले होते. दोघंही आता आवेगाने एकमेकांवर चूंबनाचा वर्षाव करु लागले. इतक्या आवेगाने की त्या आवेगाच्या भरात ' धाडकन्' ते दोघंही बेडच्या खाली जमीनीवर पडले. नॅन्सी खाली आणि जॉन तिच्या वर पडला होता. वेदनेने ओरडत नॅन्सीने त्याला दूर ढकललं. '' माझे हाडं मोडणार आहेस की काय'' ती वेदनेने कन्हत म्हणाली. जॉन पटकन उठला आणि तिला वर उचलण्याचा प्रयत्न करु लागला. '' आय ऍम सॉरी ... आय ऍम सो सॉरी '' तो म्हणाला. नॅन्सीने त्याला एक चपराक मारण्याचा अविर्भाव केला. त्यानेही भीतीने डोळे बंद करुन आपला चेहरा बाजूला सारला. नॅन्सी गालातल्या गालात हसली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याच्या याच तर निष्पाप भावांवरती ती फिदा झाली होती. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याच्या ओठांचे एक करकचून चूंबन घेतले. तोही तिच्या चुंबनाला तेवढ्याच आवेगाने प्रतिसाद देवू लागला. आता तर त्यांना तिथून गालीच्यावरुन उठून बेडवर जाण्याची सुध्दा उसंत नव्हती. किंबहूना ते एक क्षणही वाया जावू देवू इच्छीत नव्हते. ते खाली गालीच्यावरच आडवे पडून एकमेकांच्या शरीरावर चूंबनाचा वर्षाव करु लागले. चुंबनासोबतच त्यांचे हात एकमेकांचे कपडे काढण्यात व्यस्त होते. जॉन आता तिचे आणि आपले संपुर्ण कपडे काढून तिच्यात सामावून जाण्यास आतूर झाला होता. त्याचा देह हळू हळू तिच्या देहावर झूकु लागला. तेवढ्यात... तेवढ्यात त्यांच्या रुमच्या दरवाजावर थाप पडली. ते जसे जिथल्या तिथे थीजून गेले. गोंधळाने ते एकमेकाकडे पाहू लागले. आपल्याला दरवाजा वाजण्याचा भास तर नाही ना झाला?... तेवढ्यात अजून एक जोरदार थाप दारावर पडली. सर्विस बॉय तर नसावा... '' कोण आहे?'' जॉनने आवाज दिला. '' पोलिस...'' बाहेरुन आवाज आला. दोघंही गालीच्यावरुन उठून कपडे घालू लागले. पोलिस इथपर्यंत कसे काय पोहोचले?... जॉन आणि नॅन्सी विचार करु लागले. त्यांनी आपले कपडे घातल्यानंतर अवसान गळलेल्या स्थीतीत जॉन दरवाजापर्यंत गेला. त्याने पुन्हा एकदा नॅन्सीकडे बघीतले. आता या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याची ते मनोमन तयारी करु लागले. जॉन कीहोलमधून बाहेर डोकावून बघू लागला. पण बाहेर अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते. किंवा त्या कीहोलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा... हळूच त्याने दरवाजा उघडला आणि दार तिरकं करुन खींडीतून तो बाहेर बघण्याचा प्रयत्न करु लागला तोच.. क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल, आणि स्टीव्हन दरवाजा जोरात ढकलून खोलीत घुसले. काय होत आहे हे समजण्याच्या आधीच क्रिस्तोफरने दरवाजाला आतून कडी घातली होती. एखाद्या चित्त्याच्या चपळाईने रोनॉल्डने चाकू काढून नॅन्सीच्या मानेवर ठेवला आणि दूसऱ्या हाताने ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले. क्रिस्तोफरनेही जणू पुर्वनियोजीत ठरविल्याप्रमाणे त्याचा चाकू काढून जॉनच्या मानेवर ठेवला आणि त्याचं तोंड दाबून धरलं. आता सर्व परिस्थीती त्यांच्या आटोक्यात आल्याप्रमाणे ते एकमेकांकडे पाहून वहशीपणे गालातल्या गालात हसले. '' स्टीव्ह याचं तोंड बांध'' क्रिस्तोफरने स्टीव्हनला आदेश दिला. जशी नॅन्सी ओरडण्याचा प्रयत्न करु लागली रोनॉल्डची तिच्या तोंडावरची पकड मजबूत झाली. '' पॉल हिचंही बांध...'' स्टीव्हनने जॉनचं तोंड, हात आणि पाय टेपने बांधले. पॉलने नॅन्सीचं तोंड आणि हात बांधले. त्यांनी ज्या सफाईने ह्या सगळ्या हालचाली केल्या त्यावरुन ते ह्या अशा कामात रुळलेले आणि निर्ढावलेले गिधाडं वाटत होते. आता क्रिस्तोफरच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य लपविल्या लपविले जात नव्हते. '' ए ... त्याच्या डोळ्यावर काहीतरी बांधारे... पाहावल्या जाणार नाही बिचाऱ्याच्यानं'' क्रिस्तोफर म्हणाला. स्टीव्हनने त्यांच्याच सामानातलं एक कापड घेवून जॉनच्या डोळ्यावर बांधलं. आता जॉनला फक्त अंधाराशीवाय काहीच दिसत नव्हतं. आणि ऐकू येत होतं ते त्या गिधाडांचं राक्षसी आणि वहशी हास्य आणि नॅन्सीचा दाबलेला दडपलेला चित्कार. जॉनला एकदम सर्व शांत आणि स्थब्ध झालेंलं जाणवलं. '' ए त्याच्या डोळ्यावरचं कापड काढ रे... '' क्रिस्तोफरचा चिडलेला आवाज आला. जॉनला त्याच्या डोळ्यावरचं कापड काढतांनाचं जाणवत होतं. त्याचा आक्रोश अश्रूंच्या द्वारे बाहेर पडून ते कापड ओलं झालं होतं. जसं त्याच्या डोळ्यावरचं कापड सोडलं, त्याने समोरचं दृष्य बघितलं. त्याचे जबडे आवळल्या गेले, डोळे लाल झाले, सारं अंग रागाने थरथरायला लागलं. तो स्वत:ला सोडवून घेण्यासाठी तडफडू लाग़ला. त्याच्या समोर त्याची नॅन्सी निर्वस्त्र पडलेली होती. तिची मान एका बाजूला लटकत होती. तिचे डोळे उघडे होते आणि पांढरे झाले होते. तिचं शरीर निश्चल झालेलं होतं. तिचे प्राणपाखरु केव्हाच उडून गेलेले होते. अचानक त्याला जाणीव झाली की त्याच्या डोक्यावर कशाचा तरी प्रहार झाला आणि त्याची शुध्द हळू हळू हरपू लागली. जेव्हा जॉन शुद्धीवर आला त्याला जाणवले की त्याला आता बांधलेले नव्हते. पण जिथे मघा नॅन्सीची बॉडी पडलेली होती तीथे आता काहीच नव्हते. तो ताबडतोब उठून उभा राहाला, आजूबाजूला त्याने एक नजर फिरवली. ते आपल्याला पडलेलं भयानक स्वप्न तर नव्हतं... देवा ते स्वप्नच होवो ... त्याला मनोमनी वाटायला लागलं. पण स्वप्न कसं काय असू शकणार... '' नॅन्सी '' त्याने एक आवाज दिला. त्याला कळत होतं की त्या आवाजाला प्रतिसाद येणार नाही. पण एक वेडी आशा... त्याचं डोकं मागच्या बाजूने खुप दुखत होतं. म्हणून त्याने डोक्याला मागे हात लावून पाहाला. त्याच्या हाताला लाल लाल रक्त लागलं होतं. त्या लोकांनी फटका मारुन आपल्याला बेशुध्द केलेल्याची ती जखम होती. आता त्याला पक्की खात्री झाली होती की ते स्वप्न नव्हतं. धावतच तो रुमच्या बाहेर गेला. बाहेर इकडे तिकडे शोधतच तो व्हरंड्यातून धावत होता. तो लिफ्टजवळ गेला आणि त्याने लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टमधे जाण्याच्या आधी त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला शेवटचा दृष्टीक्षेप टाकला. कुठे गेले ते लोक... आणि नॅन्सीची बॉडी कुठं आहे... की लावली त्यांनी ठिकाण्यावर.. तो हॉटलच्या बाहेर येवून अंधारात इकडे तिकडे सैरावैरा वेड्यासारखा धावत होता. सगळीकडे अंधार होता. मध्यरात्र उलटून गेली असावी. रस्त्यावरही रहदारी फारच तुरळक दिसत होती. त्याला कोपऱ्यावर एक टॅक्सीवाला दिसला. याला कदाचीत माहित असेल... तो त्या टॅक्सीजवळ गेला, टॅक्सीवाल्याला विचारलं. त्याने काहीतरी डावीकडे हातवारे करुन सांगीतलं. जॉन टॅक्सीत बसला आणि त्याने टॅक्सीवाल्याला टॅक्सी तिकडे घ्यायला सांगीतली. निराश झालेला जॉन हळू हळू चालत आपल्या रुमजवळ परत आला. रुममध्ये जावून त्याने आतून दरवाजा लावून घेतला. त्याने बेडकडे बघितलं. बेडशीटवर वळ्या पडलेल्या होत्या. तो बेडवर बसला. काय कराव?... बरं पोलिसांकडे जावं तर ते आपल्याला आयतंच पकडतील... आणि तिच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल... आणि आपणच तर आहोत तिच्या खुनाला जबाबदार... नुसता खुनच नाही तर तिच्यावर झालेल्या बलात्कारालासुद्धा... त्याने गुडघे पोटाजवळ घेवून आपलं तोंड गुडघ्यात लपविलं. आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. रडता रडता त्याचं लक्ष तिथेच बाजूला आलमारीच्या खाली पडलेल्या कागदाच्या तुकड्याकडे गेलं. तो उभा राहाला. आपल्या बाह्यांनी आपले अश्रू पुसले. कशाचा तुकडा असावा?... त्याने तो कागदाचा तुकडा उचलला. कागदावर चार अक्षरं लिहिलेली होती - सी, आर, जे, एस. आणि त्या अक्षरांपुढे काहीतरी नंबर्स लिहिलेले होते. कदाचीत एखाद्या पत्याच्या गेमचे पॉईंट असावेत... त्याने तो कागद उलटा करुन बघितला. कागदाच्या मागे एक नंबर होता. कदाचीत मोबाईल नंबर असावा. तो निर्धाराने उठला - ''मी तुम्हाला सोडणार नाही '' त्याने गर्जना केली. डिटेक्टीव्ह सॅम डिटेक्टीव बेकर समोर बसून ऐकत होता. त्याची सर्व हकीकत सांगून केव्हाच झाली होती. पण सगळी हकिकत एकून खोलीतले सगळे जण एवढे भारावून गेले होते की बराचवेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. खोलीमध्ये एक अनैसर्गीक शांतता परसली होती. एका उत्कट प्रेमकहानीचा असा अंत व्हावा?.... कॅबिनमधल्या सगळ्यांनाच ती हकीकत हुर हुर लावून गेली होती. थोड्यावेळाने डिटेक्टीव सॅमने आपल्या भावनांना आवर घालीत विचारले, '' जॉनने पुलिस स्टेशनला रिपोर्ट केला होता?"' '' नाही '' '' मग ... हे सगळ तुला कसं कळलं ?'' '' कारण नॅन्सीचा भाऊ... जॉर्ज कोलीन्सने रिपोर्ट केला होता'' '' पण त्याने रिपोर्ट कसा काय केला? ... म्हणजे त्याला हे सगळं कसं कळलं? ... जॉन त्याला भेटला होता की काय? '' सॅम एकावर एक प्रश्नांचा भडीमार करीत होता. ''नाही जॉन त्याला त्या घटनेनंतर कधीही भेटला नाही....'' बेकर म्हणाला. '' मग त्याला खुनी कोण आहेत हे कसं कळलं?'' सॅमला आता त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याची घाई झाली होती. '' काही महिन्यांपुर्वी जॉनने नॅन्सीच्या भावाला या घटनेबद्दल पत्र लिहिले होते... त्यात त्याने त्या चार जणांचे नावं पत्ते त्याला कळविले होते ...'' '' मग रिपोर्टचा काय निकाल लागला?'' सॅमने पुढचा प्रश्न विचारला. ''... या केसवर आम्हीच तपास केला होता पण नॅन्सीची डेड बॉडी मिळाली नव्हती की जॉन सापडला नाही ... जो की या घटनेचा एकुलता एक अतिशय महत्वाचा आय विटनेस होता... म्हणून केस तशीच खोळंबून राहाली... आणि अजुनही खोळंबून पडलेली आहे... '' '' बरं जॉनचा काही पत्ता?'' सॅमने विचारले. '' त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नाही ... त्या घटनेनंतर तो कधी त्याच्या स्वत:च्या घरी सुध्दा गेला नाही... तो जिवंत आहे का मेला आहे याचाही काही पत्ता लागला नाही ... त्याच्या जॉर्जला आलेल्या पत्रावरुन फक्त तो अजुनही जिवंत असावा असं वाटते... पण तो जर जिवंत असेल तर तो का लपतो आहे हेच कळत नाही...'' '' कारण सरळ आहे...'' इतका वेळ लक्ष देवून ऐकत असलेला सॅमचा साथीदार म्हणाला. '' हो ....त्याचे एकच कारण असू शकते की आता एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्यात जॉनचाच हात असू शकतो ... आणि म्हणूनच मी तुला मुद्दाम बोलावून घेवून ही माहिती दिली...'' बेकर म्हणाला. '' बरोबर आहे तुझं ... या खुनांमध्ये जॉनचा हात आहे असं गृहीत धरण्यास पूरेपूर वाव आहे... पण मला एक गोष्ट समजत नाही ... की जेव्हा की ती खोली किंवा घर आतून आणि सर्व बाजूनी बंद असतं तेव्हा तो खुनाच्या जागी पोहोचतोच कसा? ... तो हे सगळे खुन कसे करतो आहे हे एक न उलगडणारं कोडं होवून बसलं आहे'' '' बरं नॅन्सीच्या भावाला जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्याची प्रतिक्रीया काय होती? ... आणि निकालाला उशीर लागतो आहे या बाबतीत त्याची प्रतिक्रिया कशी आहे?'' '' त्या माणसाला तर वेड लागल्यागत झपाटलेला आहे तो... इथे नेहमी पोलिस स्टेशनला त्याची चक्कर असते आणि केसबाबत काय झालं हे नेहमी तो विचारत असतो... बरं तो फोन करुनसुद्धा विचारु शकतो.. पण नाही तो स्वत: इथे येवून विचारतो... मला तर त्याची खुप किव येते .. पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच आपण करु शकतो'' '' म्हणजे एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्याचा खुनी नॅन्सीचा भाऊ जॉर्जही असू शकतो.. '' सॅम म्हणाला. '' तुम्ही त्याला एकदा बघायला हवं... त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही'' बेकर म्हणाला. '' पण आपल्याला ही शक्यताही नाकारुन चालणार नाही...'' सॅमने प्रतिवाद केला. डिटेक्टीव बेकरने थोडा वेळ विचार केला आणि मग होकारार्थी मान हलविली. रात्री रोनॉल्ड आणि क्रिस्तोफर हॉलमध्ये पीत बसले होते. एका मागे एक त्यांच्या दोन साथीदारांचा खुन झाला होता. सुरवातीला जेव्हा स्टिव्हनचा खुन झाला तेव्हाच त्यांना शंका आली होती की हे प्रकरण नक्कीच नॅन्सीच्या खुनाशी सबंधीत आहे. पण नंतर पॉलच्या खुनानंतर तर त्यांची खात्रीच झाली होती के हे सगळं नॅन्सीच्या खुनाचंच प्रकरण आहे. कितीही घाबरणार नाही म्हटलं तरी आता त्यांना पुढचा नंबर त्यांच्या दोघांपैकीच एकाचा दिसत होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची भिती आणि चिंता हटायला तयार नव्हती. ते व्हिस्कीचे ग्लासवर ग्लास रिचवित होते आणि आपली भिती मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. '' मी म्हटलं नाही तुला ?'' किस्तोफर म्हणाला रोनॉल्डने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहाले. '' त्या साल्याला जिवंत सोडू नको म्हणून... त्याचा काटा आपण तेव्हाच काढायला पाहिजे होता... त्या पोरीबरोबर..'' क्रिस्तोफर व्हिस्कीचा घोट घेत कडवट तोंड करीत म्हणाला. त्यांना शंका ... नाही पक्की खात्री होती की जॉनचाच या दोन खुनांमध्ये हात असावा. '' आपल्याला वाटलं नाही साला एवढा डेंजरस असेल म्हणू...'' रोनॉल्ड म्हणाला. '' बदला ... बदला माणसाला डेंजरस बनवितो'' क्रिस्तोफर म्हणाला. '' पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की तो सारे खुन कशा प्रकारे करतो आहे... पोलिस तिथे पोहोचतात तेव्हा घर आतून बंद केलेलं असतं आणि बॉडी आत पडलेली असते... आणि तेच नाही तर पॉलच्या गळ्याचं तोडलेलं मांस माझ्या किचनमधे कसं काय आलं?.. आणि विशेष म्हणजे तेव्हाही माझं घर ...खिडक्या दारे सर्व मी व्यवस्थित बंद केलं होतं'' रोनॉल्ड आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला. रोनॉल्ड कुठेतरी अधांतरी विचार करीत पाहत म्हणाला, '' हे सगळं पाहता मला एकच गोष्ट शक्य वाटते...'' '' कोणती?'' क्रिस्तोफरने व्हिस्कीचा रिकामा झालेला ग्लास भरीत विचारले. '' तूझा भूतावर विश्वास आहे?'' रोनॉल्डने बोलावं की नाही बोलावं या व्दीधा मनस्थीतीत विचारले. '' काहीतरी मुर्खासारखा बडबडू नकोस.... त्याच्याजवळ काहीतरी ट्रीक आहे की तो अशा तऱ्हेने खुन करीत असावा... '' क्रिस्तोफर म्हणाला. '' मलाही तेच वाटतं... पण कधी कधी भलती सलती शंका येते '' रोनॉल्ड म्हणाला. '' काळजी करु नको ... आपण तो आपल्याला गाठण्याच्या आधीच आपण त्याला गाठून त्याचा काटा काढू'' क्रिस्तोफर त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला. '' आपण पोलीसांचं प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे'' रोनॉल्ड विचार करीत म्हणाला. '' पोलिस प्रोटेक्शन? ... मुर्ख आहेस की काय?... आपण त्यांना काय सांगणार आहोत... की बाबांनो आम्ही त्या पोरीला मारलं... आमच्याच्याने चूक झाली ... सॉरी ... अशी चूक पुन्हा होणार नाही ... कृपा करुन आमचं रक्षण करा ..'' क्रिस्तोफर दारुच्या नशेत माफी मांगण्याचे हावभाव करुन बोलत होता. '' तो नंतरचा प्रश्न झाला... आधी आपलं प्रोटेक्शन महत्वाचं... सर सलामत तो पगडी पचास'' रोनॉल्ड म्हणाला. '' पण पोलीसांकडे जावून त्यांचं प्रोटेक्शन मागणं म्हणजे...'' पोलिस प्रोटेक्शनची कल्पना येताच नाही म्हटलं तरी रोनॉल्डला बरं वाटत होतं. त्याची भिती पुर्णपणे नाही तरी कमी नक्कीच झाली होती. '' त्याची तु काळजी करु नकोस... ते सगळं माझ्यावर सोडून दे'' रोनॉल्ड त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने म्हणाला. डिटेक्टीव्ह सॅम आपल्या ऑफिसमध्ये विचारांच्या तंद्रित बसला होता. जेफ त्याचा ज्यूनिअर टीम मेंबर तिथे आला. '' सर माझ्या डोक्यात एक आयडीया आली आहे... की खुनी कसा खुनाच्या जागी घुसत असेल आणि मग बाहेर पडत असेल'' जेफ उत्साहाने म्हणाला. सॅमने आपलं डोकं वर करुन त्याच्याकडे पाहालं. जेफ दरवाजाच्या बाहेर गेला आणि त्याने दरवाजा बाहेरुन ओढून घेतला. '' सर बघा आता'' तो तिकडून जोरात म्हणाला. डिटेक्टीवने बघीतले की दाराची आतली कडी हळू हळू सरकत बंद झाली होती. सॅम आश्चर्याने बघत होता. '' सर तुम्ही बघितलं का?'' तिकडून जेफचा आवाज आला. मग हळू हळू दाराची कडी दूसऱ्या बाजूला सरकु लागली आणि थोड्या वेळातच कडी उघडल्या गेली. सॅमला आश्चर्य वाटत होतं. जेफ दरवाजा उघडून आत आला, त्याच्या हातात पाठीमागे काहीतरी लपविलेलं होतं. '' तु कसं काय केलं? '' सॅमने आश्चर्याने त्याला विचारले. जेफने एक मोठा मॅग्नेट आपल्या पाठीमागून काढला आणि सॅमच्या समोर धरला. '' ही सगळी या चूंबकाची करामत आहे कारण ती कडी लोखंडाची बनलेली आहे'' जेफ म्हणाला. '' जेफ फॉर यूवर काइंड इन्फॉर्मेशन... घटनास्थळी असलेल्या सगळ्या दाराच्या कड्या ऍल्यूमिनियमच्या होत्या'' सॅम उपरोधाने म्हणाला. '' ओह... ऍल्यूमिनीयमच्या होत्या'' मग अजून काहीतरी डोक्यात आयडीया आल्यासारखा तो म्हणाला, '' काही हरकत नाही ... त्याचं पण सोल्यूशन आहे माझ्याजवळ'' सॅमने अविश्वासाने त्याच्याकडे बघीतले. जेफने आपल्या गळ्यातला एक स्टोन्सचा नेकलेस काढून तोडला, सगळे स्टोन्स एका हातात घेवून त्यातला नायलॉन धागा दुसऱ्या हाताने ओढला. त्याने सगळे स्टोन्स खिशात ठेवले. आता त्याच्या दूसऱ्या हातात तो नॉयलॉनचा धागा होता. डिटेक्टीव सॅम त्याच्याकडे तो काय करतो आहे हे गोंधळलेल्या स्थितीत पाहात होता. '' आता बघा ही दूसरी आयडीया आहे.. तूम्ही फक्त माझ्यासोबत या'' जेफ म्हणाला. सॅम त्याच्या मागे मागे गेला. जेफ दरवाजाजवळ गेला. दरवाज्याच्या कडीत तो नॉयलॉन धागा त्याने अडकविला. धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडीत सॅमला म्हणाला, '' तुम्ही आता दरवाजाच्या बाहेर जा'' सॅम दरवाजाच्या बाहेर गेला. जेफही आता धाग्याचे दोन्ही टोकं एका हातात पकडून दरवाजाच्या बाहेर आला. आणि दार ओढून घेतलं. दार बंद होतं पण तो धागा जो जेफच्या हातात होता दाराच्या फटीतून अजूनही आतल्या कडीला अडकविलेला होता. जेफने हळू हळू त्या धाग्याचे दोन्ही टोकं ओढले आणि मग धाग्याचं एक टोक सोडून दूसऱ्या टोकाने धागा ओढून घेतला. सगळा धागा आता जेफच्या हातात होता. '' आता दार उघडून बघा'' जेफ सॅमला म्हणाला. सॅमने दार ढकलून बघीतलं आणि काय आश्चर्य दार आतून बंद होतं. सॅम अविश्वासाने जेफकडे पहायला लागला. '' आता मला पुर्णपणे खात्री पटायला लागली आहे...'' सॅम म्हणाला. '' कशाची?'' जेफने विचारले. '' की या नोकरीच्या आधी तू कोणते धंधे करीत असला पाहिजेस..'' सॅम गमतीने म्हणाला. दोघही एकमेकांकडे पाहून हसले. '' पण मला एक सांग'' सॅम म्हणाला. जेफने प्रश्नार्थक मुद्रेने सॅमकडे बघीतले. '' की जर दाराला आतून कुलूप लावलेले असेल तर?'' सॅमने विचारले. '' नाही...मग त्या स्थीतीत ...एकच शक्यता आहे'' जेफ म्हणाला. '' कोणती?'' '' की ते दार उघडायला एखादी अघोरी शक्तीच लागेल'' जेफ म्हणाला पोलिस स्टेशनच्या कॉन्फरंन्स रुममध्ये मिटींग चालली होती. समोर भिंतीवर टांगलेल्या पांढऱ्या पडद्यावर प्रोजेक्टरवरुन एक लेआऊट डायग्राम प्रोजेक्ट केली होती. त्या डायग्राममध्ये दोन घरांचे लेआऊट एका शेजारी एक असे काढलेले दिसत होते. लाल लेजर पॉईंटर वापरुन डिटक्टीव सॅम समोर बसलेल्यांना समजावून सांगत होता... '' मि. क्रिस्तोफर ऍन्डरसन आणि मि. रोनॉल्ड पार्कर ...'' सॅमने सुरवात केली. समोर इतर पोलिसांसमवेत क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड बसलेले होते. ते सॅम काय सांगतो ते लक्ष देवून एकत होते. '' .. तुमच्या घरात या जागी आपण कॅमेरे बसविणार आहोत. बेडरुमध्ये तिन आणि घरात इतर जागी तिन असे एकूण सहा कॅमेरे एकएकाच्या घरात बसविले जातील. हे कॅमेरे सर्किट टिव्हीला जोडलेले असतील जिथे आमचे टेहळणी पथक सारखे घरातल्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल. '' तुला वाटते याने काही होणार आहे?'' क्रिस्तोफर रोनॉल्डच्या कानात व्यंगपूर्वक कुजबुजला. रोनॉल्डने क्रिस्तोफरकडे पाहाले आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सॅमला विचारले, '' जर खुनी कॅमेऱ्यांपासून दूर राहाला तर?'' '' जन्टलमन आपण घरात मुव्हीग कॅमेरे लावतो आहोत .. ज्यामुळे तुमचं संपूर्ण घर कॅमेऱ्यांच्या क्षेत्रात राहणार आहे... आणि हो... मी तुम्हाला आश्वासन देतो की हा सगळ्यात चांगला आणि इफेक्टीव्ह उपाय आपण खुन्याला पकडण्यासाठी वापरत आहोत ... खुन्याने जर आत घूसण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही परिस्थीतीत सुटू शकणार नाही... अक्षरश: आमच्या तंत्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत घेवून हा ट्रॅप तयार केला आहे... '' '' बरं ते ठिक आहे... आणि समजा एवढं करुन खुनी तुमच्या हाती लागला तर तुम्ही काय करणार आहात?'' क्रिस्तोफरने विचारले. '' अर्थातच त्याला आम्ही कोर्टापुढे हजर करु...आणि कायद्यानुसार कोणती शिक्षा द्यायची ते कोर्ट ठरविल'' सॅम म्हणाला. '' आणि जर तो सुटून पळून गेला तर?'' क्रिस्तोफरने पुढे विचारले. "" जसे नॅन्सीचे खुनी तिचा खुन करुन पळून गेले तसे'' एक पोलीस उपाहासाने म्हणाला. क्रिस्तोफर आणि रोनॉल्डने त्याच्याकडे रागाने पाहाले. '' तुम्हाला आम्ही काय तीचे खुनी वाटतो? '' रोनॉल्डने त्या पोलिसाला रागाने प्रतिप्रश्न केला. '' लक्षात ठेवा अजून आम्हाला कोर्ट खुनी ठरवू शकलेलं नाही '' क्रिस्तोफर रागाने चिडून म्हणाला. '' मि. रोनॉल्ड पार्कर, मि. क्रिस्तोफर ऍन्डरसन ... इझी ... इझी ... मला वाटते आपण मुळ मुद्यापासून भटकत चाललो आहोत... सद्य:परिस्थीतीत मुळ मुद्दा आहे तुम्हाला कसे संरंक्षण देता येईल हा... तुम्ही नॅन्सीच्या खुनात गुन्हेगार आहात की नाही हा नंतरचा मुद्दा झाला..'' सॅम ने त्यांना शांत करण्याच्या उद्देशाने म्हटले. '' तुम्हीही आधी आमच्या संरक्षणाचं बघा... बाकिच्या गोष्टी नंतरच्या नंतर बघता येतील.'' क्रिस्तोफर रुबाबात, विषेशत: त्या पोलिस अधिकाऱ्याकडे, ज्याने त्यांना डिवचलं होतं, त्याच्याकडे पाहत म्हणाला. त्या पोलिस अधिकाऱ्याला या दोन जणांचं सरंक्षण करणाऱ्या तुकडीत त्याचा समावेश केला होतं हे जिवावर आलं होतं. सॅमनेही त्या पोलिस अधिकाऱ्याला शांत राहण्याबद्दल खुनावले. तो पोलिस अधिकारी रागाने उठून तेथून बाहेर निघून गेला. वातावरण तेवढ्यापुरतं निवळलं आणि सॅम पुन्हा आपली योजना सर्वाना विस्तृत स्वरुपात समजावून देवू लागला. क्रिस्तोफर आणि रोनॉल्ड पोलिस आपलं संरक्षण करु शकतील की नाही या बाबतीत अजूनही शाशंक होते. पण त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पुर्णत: पोलीसांच्या हाती सोपविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव्ह सॅमच्या रिकाम्या खुर्चीसमोर एक माणूस बसला होता. सॅम घाईघाईने आला आणि आपल्या खुर्चीवर बसला. '' हं ... तर तुमच्याकडे या केसच्या संदर्भात माहिती आहे?...'' सॅमने विचारले. '' होय साहेब '' सॅमने एकदा त्या माणसाला नखशिखान्त न्याहाळले आणि तो काय सांगतो याची वाट पाहू लागले. '' साहेब खरं म्हणजे... आमच्या शेजारी ती पोरगी नॅन्सी, जिचा खुन झाला म्हणतात, तिचा भाऊ राहातो...'' त्या माणसाने सुरवात केली आणि तो पुढे माहिती सांगु लागला .... ... एका चाळीत एक घर होतं. त्या घराला जिकडे तिकडे काचेच्या खिडक्याच खिडक्या होत्या. ऐवढ्याकी त्या घरात काय चाललं आहे हे शेजारच्याला कळावं. एका खिडकीतून हॉलमध्ये नॅन्सीचा भाऊ जॉर्ज बसलेला दिसत होता. आता आधीपेक्षा अजूनच तो विक्षीप्त आणि गबाळा दिसत होता. दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो फायरप्लेसच्या समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला होता. कदाचित ते बाहुलं त्यानेच तयार केलं असावं. बाजुला ठेवलेल्या प्लेटमधून त्याने हातात काहीतरी उचलले आणि तो काहीतरी मंत्रासारखे शब्द उच्चारु लागला '' ऍबस थी बा रास केतिन स्तता...'' त्याने ताटातून जे उचलेले होते ते समोरच्या ज्वालेत जोराने फेकल्यागत टाकले. मोठा भडका उडाला. पुन्हा तो तसाच काहीतरी विचित्र मंत्र उच्चारु लागला '' कॅटसी... नतंदी.. वाशंर्पत... रेर्वरात स्तता...'' पुन्हा त्याने त्या ताटातले धान्यासारखे काहीतरी हातात मुठभर घेवून समोरच्या ज्वालेच्या स्वाधीन केले. यावेळी ज्वालेचा अजुनच मोठा भडका उडाला. त्याने हातातलं बाहूलं बाजूला ठेवलं. ज्वालेच्या समोर वाकुन, जमिनीवर कपाळ घासलं. एक माणूस शेजारुन जॉर्जच्या घरात कुतूहलाने डोकावून बघत होता. कपाळ घासल्यानंतर जॉर्ज उठून उभा राहाला आणि त्याने एक विचित्र चित्कार केला. जो शेजारुन डोकावत होता तो सुध्दा दचकला. जॉर्जने वाकुन त्याच्या बाजूला ठेवलेलं ते बाहूलं उचललं आणि पुन्हा एक जोरात विचित्र चित्कार केला. सगळीकडे एक अदभूत शांतता पसरली. '' आता तू मरायला तयार हो स्टीव्हन..'' जॉर्ज त्या बाहूल्याला म्हणाला. '' नाही .. नाही मला मरायचं नाही इतक्यात... जॉर्ज मी तुझी माफी मागतो... मला माफ कर.. आय ऍम सॉरी... मी जे काही केलं ते चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी तुझ्यासाठी तु म्हणशील ते करीन... पण मला माफ कर'' जॉर्ज जणू ते बाहूलं त्याची माफी मागत आहे असे त्या बाहूल्याचे संवाद बोलत होता. '' तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस? ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का?'' जॉर्जने आता त्याचे स्वत:चे संवाद बोलत विचारले. '' नाही ... मी ते कसे काय करु शकेन?... ते माझ्या हातात असतं तर नक्कीच केलं असतं... ते सोडून काहीही माग... मी तुझ्यासाठी करेन...'' जॉर्ज बाहूल्याचे संवाद बोलू लागला. ''असं.... तर मग आता ... मरण्यासाठी तयार हो...'' जॉर्ज त्या बाहुल्याला म्हणाला. तो शेजारचा माणूस अजूनही जॉर्जच्या खिडकीतून लपून डोकावत होता. मध्यरात्र होवून गेली. बाहेर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. जॉर्ज हळूच त्याच्या घराच्या बाहेर आला. चहुकडे एक नजर फिरवली. त्याच्या हातात एक थैली होती त्यात त्याने ते बाहुलं कोंबलं. आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला. कंपाऊंडच्या बाहेर येतांना पुन्हा त्याने त्याची चौकस नजर चहुवार फिरवली. समोर रस्त्यावर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता. आता तो रस्त्यावर पटापट आपले पावलं टाकीत चालायला लागला. त्या शेजारच्या माणसाने आपल्या खिडकीतून लपून जॉनला बाहेर जातांना बघितले. जसा जॉर्ज रस्त्यावर पुढे चालू लागला तो माणूस आपल्या घराच्या बाहेर आला. तो माणूस त्याला काही चाहूल लागू नये किंवा आपण त्याला दिसू नये याची काळजी घेत होता. जॉर्ज झपाझप आपले पावलं टाकीत पुढे जात होता. जॉर्ज बराच पुढे गेल्यावर तो माणूस त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जावू लागला. तो माणूस जॉर्जचा पाठलाग करीत स्मशानाजवळ येवून पोहोचला. स्मशानाच्या आजुबाजुला दाट झाडी होती. कदाचित त्या झाडीत लपून घुबडं एखाद्या प्रेताची वाट पाहत बसत असावीत. दूर कुठेतरी कुत्र्यांचा विचित्र रडण्यासारखा आवाज येत होता. त्या माणसाला या सगळ्या वातावरणाची भिती वाटत होती. पण त्याला जॉर्ज इथे कशासाठी आला आहे हे पहायचे होते. जॉर्ज स्मशानात शिरला आणि तो माणूस बाहेरच कंपाऊंडच्या मागे लपून तो काय करीत आहे ते पाहू लागला. चंद्राच्या उजेडात त्या माणसाला जॉर्जची आकृती दिसत होती. जॉर्जने स्मशानात एक जागा निश्चित केली आणि तिथे तो खणू लागला. एक गड्डा खणल्यानंतर त्याने त्याच्या जवळच्या थैलीतून ते बाहुलं बाहेर काढलं. त्या बाहुल्याला त्याने जसे ते एखादे प्रेत असावे तसे त्या गड्ड्यात ठेवले आणि वरुन माती टाकु लागला. माती टाकतांनाही त्याचं आपलं मंत्रासारखं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. त्या बाहुल्यावर माती टाकुन तो गड्डा जेव्हा भरला तेव्हा जॉर्ज त्या मातीवर उभं राहून पायाने ती माती सारखी करीत दाबु लागला.... ... तो माणूस सांगत असलेली सर्व हकिकत डिटेक्टीव सॅम लक्ष देवून एकत होता. तो माणूस पुढे म्हणाला- '' दुसऱ्या दिवशी जेव्हा मला कळले की स्टीव्हनचा खुन झालेला आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता'' बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. या प्रकरणाला आता हे नविनच वळण लागलं होतं. सॅम विचार करु लागला. '' तुला काय वाटतं जॉर्ज खुनी असावा?'' सॅमने आपल्या इन्व्हेस्टीगेशनच्या भूमीकेत शिरत विचारले. '' नाही .. मला वाटते तो त्याची काळी जादू हे सगळे खुन करण्यासाठी वापरत असावा ... कारण ज्या दिवशी पॉलचा खुन झाला त्याच्या आधल्या रात्रीही जॉर्जने असेच एक बाहुले तयार करुन स्मशानात पुरले होते.'' तो माणूस म्हणाला. '' तुझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे?'' सॅमने थोडे उपरोधकच विचारले. '' नाही .. माझा विश्वास नाही ... पण जे धडधड डोळ्यांनी दिसत आहे त्या गोष्टींवर शेवटी विश्वास ठेवावाच लागतो'' तो माणूस म्हणाला. डिटेक्टीव्ह सॅमचा पार्टनर जो इतका वेळ दूर बसून सगळी हकिकत ऐकत होता, चालत त्यांच्या जवळ येत म्हणाला- '' मला आधीपासूनच खात्री होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी अमानुश शक्ती आहे'' सगळ्यामध्ये एक अनैसर्गीक शांतता पसरली. '' आता त्याने अजुन एक नविन बाहुलं बनविलं आहे'' तो माणूस म्हणाला .